हृदय पिळवटून टाकणारी घटना, नाकात गेला तुरीचा दाणा,  3 वर्षीय चिमुकल्याचा तडफडून मृत्यू

हृदय पिळवटून टाकणारी घटना, नाकात गेला तुरीचा दाणा, 3 वर्षीय चिमुकल्याचा तडफडून मृत्यू


Akola Latest News Update : तुमच्या घरात जर लहान मुलं असेल तर ही बातमी वाचलीच पाहिजे. अलीकडच्या काळात आई-वडील कामात व्यस्त असताना लहान मुलांकडे लक्ष देणे कमी झाले आहे. पालकांच्या व्यस्ततेमुळे मुलांकडे लक्ष दिले जात नसल्याने अनुचित प्रकार घडल्याचे अनेकदा समोर आले आहे. नाकात  तुरीचा दाणा गेल्यामुळे अकोल्यात तीन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झालाय. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अकोल्यातील पाटसूल येथे ही घटना घडली आहे. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

तुरीचा दाणा नाकात अडकला अन्… 

तुरीचे दाणे खात असताना अचानकपणे नाकात तुरीचा दाणा अडकल्याने एका तीन वर्षीय चिमुकल्याचा तडफडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील पाटसूल येथे तीन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. घरात आजी तुरीचे दाणे काढत होती, त्यावेळी त्यांचा नातू योगिराज अमोल इसापुरे हा आजीजवळ आला. आजीने काढून ठेवलेले तुरीचे दाणे त्या चिमुकल्याने मुठीत घेतले आणि तोंडात कोंबले. त्यातील एक दाणा मुलाच्या नाकात गेला. त्याला लगेच श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तो तडफडत असल्याचे पाहून कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात भरती करण्याचा प्रयत्न केला. परंतु वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेनंतर शोककळा पसरली आहे.  

नेमकं काय झालं होतं ?

अकोल्यातील दहीहंडा पोलिस स्टेशनच्या परिसरात 23 जानेवारी रोजी रात्री ही घटना घडली. आजी तुरीचे दाणे काढत होती. त्यावेळी नातू तिथेच खेळत होता. त्याने खेळता खेळता तुरीच्या दाणे मुठीत घेतले अन् तोंडात कोंबले. पण त्यामधील एक दाणा त्या चिमुकल्याच्या नाकात गेला. चिमुकल्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तो तडफडत होता, कुटुंबियांनी तात्काळ त्याला रुग्णालयात दाखल करण्यासाठी पळ काढ काढला. पण वाटेतच त्या तरुणाने जीव सोडला. या घटनेमुळे पाटसूल  गावात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी अपघाती निधनाची नोंद केली आहे. 

लहान मुलांकडे लक्ष द्या 

एकीकडे सध्या सर्वांचंच आयुष्य धावपळीचं झालं आहे. महिला देखील घरातील आपलं काम करुन जॉब करत असतात. मात्र अशात लहान मुलांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले आहे. घरातील काम करत असताना अथवा मोबाईलमध्ये व्यस्त असल्यामुळे मुलांकडे लक्ष देता येत नाही. त्यामुळे अशा दुर्देवी घटना वारंवार घडतात. त्यामुळे पालकांनी वेळीच या गोष्टीकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे दिसते. 

आणखी वाचा :

जागावाटपाचा फॉर्मुला आज ठरणार? महाविकास आघाडीची आज महत्वाची बैठक, राजू शेट्टींना आमंत्रण नाही

अधिक पाहा..



Source link

खळबळजनक! आधी चिरला प्रेयसीचा गळा; नंतर स्वत:लाही संपवलं, प्रियकराच्या कृत्याने मूर्तीजापूर हादरलं

खळबळजनक! आधी चिरला प्रेयसीचा गळा; नंतर स्वत:लाही संपवलं, प्रियकराच्या कृत्याने मूर्तीजापूर हादरलं


Akola Crime News : अकोला : प्रेम संबंधातील (Love Affairs) वाद विकोपाला जाऊन प्रियकराने आपल्या प्रेयसीवर चाकूने सपासप वार करून हत्या केली आणि त्यानंतर स्वत:चंही आयुष्य संपवल्याची थरारक घटना उघडकीस आली आहे. अकोला (Akola Crime) जिल्ह्यातील मूर्तीजापूर (Murtizapur Crime News) तालुक्यातील माना पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. अनिल श्रीकृष्ण तायडे असं 45 वर्षीय प्रियकराचं नाव असून तो आकोट तालुक्यातील लाहेरी येथील रहिवासी आहे. या प्रकरणाचा सखोल तपास माना पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात येत असून 23 जानेवारीच्या भरदुपारी हा हत्येचा थरार घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आधी चिरला प्रेयसीचा गळा, नंतर स्वत:लाही संपवलं

मिळालेल्या माहितीनुसार, अनिल श्रीकृष्ण तायडे याचे माना येथील रहिवासी असलेल्या 36 वर्षीय शोभना नामक महिलेसोबत प्रेमसबंध होते. अनिल हा वर्षातून कित्येकदा शोभना हिला भेटायसाठी माना येथे येत होता. शिवाय त्यांच्यात फोनवर देखील संपर्क चालू होता. दरम्यान, यामधून या दोघांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र, मधल्या काळात या दोघांमध्ये दुरावा निर्माण होऊन त्यांच्यात वाद निर्माण झाला. कालांतराने हा वाद विकोपाला गेला. अशातच 23 जानेवारीच्या दुपारी तीन वाजताच्या सुमारास वस्तीतील इतर लोक कामावर गेले असता, वस्तीतील सुनसान वेळेचा फायदा घेत प्रियकर अनिल हा शोभनाच्या घरी आला.

त्यानंतर त्याने वाद घालत महिलेला शरीर सुखाची मागणी केली. त्यानंतर महिलेने नकार दिल्याने तो बळजबरी करू लागला. दरम्यान, त्याने स्वतःच्या अंगावरचे संपूर्ण कपडे काढून या महिलेच्या घराच्या दरवाज्याची आतील कडी लावून घेतली. या दरम्यान दोघांमध्ये कडाक्याचे भांडण सुरू झाले आणि हा वाद फार विकोपाला गेला. अगोदरच संपूर्ण खुनाच्या हेतूने आलेल्या अनिलने रागाच्या भरात सोबत आणलेल्या धारदार चाकूने शोभनावर सपासप वार केले.

दोघांचाही घटनास्थळी मृत्यू

या थरारक घटनेमध्ये क्षणातच शोभना रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडली.  शोभना मृत झाल्याचे समजून अनिल भयभीत झाला. त्यानंतर त्याने त्याच चाकूने स्वतःचा देखील गळा कापून स्वतःला अतिशय गंभीररित्या जखमी करून घेतले. दारम्यान त्यामध्ये अनिलचा देखील मृत्यू झाला. त्या दोघांच्या आरडा-ओरडणे बाहेरून रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या लक्षात येऊन काही लोकांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. पण, लोकांकडून दरवाजा उघडला गेला नाही. त्यानंतर घराच्या मागील लोखंडी खिडकी तोडून आत प्रवेश करत दरवाजा उघडला. त्यानंतर लोकांना आत झालेल्या खुनाचा थरार पहावयास मिळाला.

त्यानंतर या घटनेची माहिती माना पोलीस स्टेशनला देण्यात आली. माहिती मिळताच माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरज सुरोशे यांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने अकोला येथील पोलीस फॉरेन्सिक टीम, आयकर युनिट यांना बोलावून घेतले. सोबतच मूर्तीजापूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे, आणि माना पोलीस स्टेशनचे उमेश हरमकर, जय मंडावरे, पंकज, सरोदे, पंजाबराव इंगळे, इरफान, आणि  इतर सहकारी चौकशी कामात सहभागी होते. याप्रकरणी माना पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..



Source link

Bachchu Kadu : बच्चू कडूंनी शंकरपटात बैल जोडी हाकली, अवघ्या 8 सेकंदात पल्ला गाठला

Bachchu Kadu : बच्चू कडूंनी शंकरपटात बैल जोडी हाकली, अवघ्या 8 सेकंदात पल्ला गाठला



<p>अमरावतीच्या बहिरम यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं..या शंकरपटात राज्यभरातून बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या.&nbsp; यावेळी आमदार बच्चू कडूंनीही सहभाग घेतला होता.. दरम्यान त्यांच्याशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी प्रणय निर्बाण यांनी</p>
<p>&nbsp;</p>



Source link

Bachchu Kadu Shankar Pat Amravati : वेगाचा थरारssss, बच्चू कडूंनी शंकरपटात बैल जोडी हाकली

Bachchu Kadu Shankar Pat Amravati : वेगाचा थरारssss, बच्चू कडूंनी शंकरपटात बैल जोडी हाकली


Bachchu Kadu Shankar Pat Amravati : वेगाचा थरारssss, बच्चू कडूंनी शंकरपटात बैल जोडी हाकली आमदार बच्चू कडू यांनी शंकरपटात 8 सेकंदात गाठला पल्ला* विदर्भातील सर्वात मोठी यात्रा म्हणून प्रसिध्द असलेली बहिरम यात्रेला सुरुवात… यात्रेनिमित्त आमदार बच्चू कडू यांच्याकडून भव्य शंकरपटाचं आयोजन.. बहिरम यात्रेत विदर्भ केसरी जंगी शंकरपट बैलजोडी शर्यतचं आयोजन करण्यात आले.. यावेळी लाखो रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले.. या शंकरपटात राज्यभरातून प्रसिद्ध बैलजोड्या सामील झालेल्या आहे.. यावेळी बच्चू कडू यांनी स्वतः बैलजोडी घेऊन शंकरपटात सहभागी होऊन अवघ्या 8 सेकंदात पल्ला गाठला



Source link

55 किलो चॉकलेट पासून तयार केली  राममंदिराची प्रतिकृति; अमरावतीत बघ्यांची एकच गर्दी

55 किलो चॉकलेट पासून तयार केली राममंदिराची प्रतिकृति; अमरावतीत बघ्यांची एकच गर्दी


प्रत्येक वादळाचा सामना करण्यास सक्षम, अयोध्येतील राम मंदिराला 1000 वर्षे काहीही होणार नाही, L&T ने देशाला दिला मास्टरपिस



Source link

राणा दाम्पत्याकडून 11 लाख लाडूंचे वाटप; विश्वविक्रमात होणार नोंद

राणा दाम्पत्याकडून 11 लाख लाडूंचे वाटप; विश्वविक्रमात होणार नोंद


अमरावती : ज्या क्षणाची अवघ्या देशाला प्रतीक्षा होती, तो क्षण अवघ्या काही तासावर येऊन ठेपलाय. सोमवार 22 जानेवारीला राम मंदिरात (Ram Temple) प्रभू श्री रामांचा प्राणप्रतिष्ठा (Pran Pratishtha) सोहळा होणार आहे. या सोहळ्याच्या निमित्याने अयोध्यानगरीसह संपूर्ण देश सज्ज झाला आहे. या पार्श्वभूमीवर अमरावतीच्या हनुमान गढीवर  खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्या वतीने 11 लाख लाडूंचा प्रसाद वितरित केला जाणार आहे. विशेष बाब म्हणजे 11 लाख लाडू मिळून त्याचा एक भला मोठा लाडू तयार केला जाणार आहे. ज्याची नोंद ही विश्वविक्रमात होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून गेल्या 10 दिवसांपासून हे लाडू तयार करण्याचं काम सुरू आहे.

विश्वविक्रमी लाडूचे होणार वितरण 

अमरावतीच्या हनुमान गढीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 11 लाख लाडूंचा एक लाडू तयार करण्यात येत असून तो उद्या शहरातील भाविकांना प्रसाद म्हणून वितरित करण्यात येणार आहे. यावेळी सामूहिक हनुमान चालिसा पठण आणि कार सेवकांचा सत्कार देखील करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थित राहणार असल्याची माहिती आमदार रवी राणा यांनी दिली. 

अयोध्येतील पवित्र जल, मातीचे होणार वितरण

अयोध्येत प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा उद्या 22 जानेवारीला होणार आहे. हा दिवस भारताच्या इतिहासातील एक महत्वाचा दिवस आहे. सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्मिती झाली असताना ज्या ठिकाणी एकशे अकरा फूट उंच हनुमंताची मूर्ती निर्वाधिन आहे, अशा अमरावतीच्या हनुमान गढीवर 11 लाख लांडूचे वितरण करण्यात येत आहे. सोबतच पवित्र जलाच्या 51 हजार बॉटल आणि आयोध्येतील मंदिराची पवित्र मातीच्या 51 हजार पाकिटांचे वाटप करण्यात येणार आहे. सोबतच संध्याकाळी या हनुमान गढीवर 51 हजार दिव्यांचा दीपोत्सव साजरा करण्यात येणार असल्याचे आमदार रवी राणा म्हणाले. 

नाशिकमध्ये देखील 15 हजार मोतीचूर लाडूंचे वितरण  

22 जानेवारीला नाशकात नववर्ष स्वागत यात्रा समितीतर्फे तब्बल 15 हजार साजूक तुपातील मोतीचूर लाडूंचे श्रीरामाचा प्रसाद म्हणून रविवार कारंजा परिसरात वाटप करण्यात येणार आहे. हे लाडू बनवण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. हे लाडू तयार करण्यासाठी यासाठी 1 हजार 500 लिटर गाईचे तूप, 1 हजार 600 किलो बेसन पीठ, 2 क्विंटल साखर, 22 किलो ड्रायफ्रुटस आणि 1 किलो इलायची पावडरचा वापर करण्यात आला आहे. श्री राम नामाचा जप करत लाडू सध्या वळले जात आहेत.

 

अधिक पाहा..



Source link

YouTube
Instagram
WhatsApp