मनोज जरांगेंच्या आंदोलनात सहभागी होणार, सरकार म्हणून आता माझी भूमिका संपली, बच्चू कडूंचे स्पष्टीकरण

मनोज जरांगेंच्या आंदोलनात सहभागी होणार, सरकार म्हणून आता माझी भूमिका संपली, बच्चू कडूंचे स्पष्टीकरण


अमरावती : प्रहारचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) हे देखील मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या आंदोलनात सहभागी होणार असून सरकार म्हणून आता माझी भूमिका संपली, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली. शनिवार 20 जानेवारी रोजी मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने कूच केली. यावर बच्चू कडू यांनी भाष्य केलं आहे. सरकारने सगे सोयरेंबाबतीत भूमिका स्पष्ट केलीये आणि जरांगे पाटलांनी ती स्विकारली देखील, असं देखील बच्चू कडू यांनी म्हटलं. 

अंतरवाली सराटी येथून शनिवार 20 जानेवारी रोजी मनोज जरांगे यांचे आंदोलन मुंबईच्या दिशेने सरकू लागले आहे. तसेच हे आंदोलन 26 जानेवारी रोजी मुंबईत धडकणार असल्याचा दावा देखील मनोज जरांगे यांनी केलाय. दरम्यान हे आंदोलन सुरु होण्याआधी बच्चू कडू हे सरकारचं शिष्टमंडळ म्हणून मनोज जरांगेंची समजूत काढण्यासाठी अंतरवाली सराटी येथे गेले होते. पण तरीही मनोज जरांगे हे त्यांच्या भूमिकेवर ठाम होते. 

जरांगें पाटलांच्या आंदोलनाला यश यावं आणि समाजाचं भलं व्हावं – बच्चू कडू 

कुणबी नोंदी बाबत दुरुस्त्या केल्या आहेत. नोंदी बाबत प्रश्न मिटला असल्याचं जरांगेंनी सांगितलं. तसेच सरकारने सगे सोयरे यांच्यासंदर्भात देखील भूमिका स्पष्ट केलीये. तसेच जरांगे पाटली यांनी ती भूमिका स्विकारली देखील आहे. 54 लाख नोंदी सापडलेल्यांना जातीचे दाखले दिले पाहिजे. याबाबत सरकार देखील सकारात्मक आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश यावं आणि समाजाचं भलं व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न करतोय, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली. 

धोराणात्मक लढाई जरांगे पाटलांच्या आंदोलनाने जिंकली आहे – बच्चू कडू

धोराणात्मक लढाई मनोज जरांगेंच्या आंदोलनाने जिंकली आहे. तसेच मनोज जरांगे यांनी सरकारला जे काम सांगितलं ते सरकारने केलं आहे. तसेच सापडलेल्या नोंदीवर वंशावळ करणं हे फार किचकट काम आहे. 

अधिसूचना आल्या तर जरांगे पाटील यांना मोठं यश – बच्चू कडू

चार ते पाच दिवस मुख्यमंत्री आणि आम्ही त्यावर सातत्याने काम केलं आहे. काही सूचना मनोज जरांगे यांनी सुचविल्या त्या दुरुस्त करुन देखील आणल्यात. ण एकदा वाचून सांगणार होते पण त्या अंतिम सूचना आल्या आणि जर त्याच अधिसूचना निघाल्या तर हे खूप मोठं यश जरांगे पाटील मुळे समाजाला होणार आहे. दुसरं जरांगे पाटील यांनी 54 लाखांना दाखला द्या सांगितले होते पण त्यात प्रशासन कमी पडले. हे मान्य आहे की 200 – 250 तरुणांनी आत्महत्या केल्या.शिंदे समिती, नोंणी पाहायचं काम झाले आहे. काहीच काम झाले नाही, असं बोलता येणार नाही. भावून होऊन ते म्हणाले असतील पण सरकारचं काम हे थोडं राहिलं आहे आणि ते पूर्ण करतील, असंही मनोज जरांगे म्हणालेत. 

हेही वाचा : 

6 लाख भाकरी, 200 पोती बुंदी, तीनशे क्विंटलची भाजी; जरांगेंच्या आरक्षण दिंडीच्या पहिल्या मुक्कामी अशी तयारी?

अधिक पाहा..



Source link

वंचितची आज अमरावतीत लोकशाही गौरव महासभा; प्रकाश आंबेडकर करणार सभेला संबोधित

वंचितची आज अमरावतीत लोकशाही गौरव महासभा; प्रकाश आंबेडकर करणार सभेला संबोधित


अमरावती: राज्यात लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha Elections 2024) वारे वाहत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काही महिनेच राहिले असताना राजकीय पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान राज्यातही महायुती आणि महाविकास आघाडीकडून बैठका, सभांचे सत्र सुरु झालेले आहे, त्याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने सुद्धा आपले रणशिंग फुंकले आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी अमरावतीमध्ये जाहीर सभेचे आयोजन केले आहे. या सभेला स्वत: प्रकाश आंबेडकर संबोधित करणार असून या सभेला लोकशाही गौरव सभा असे नाव देण्यात आले आहे.   

लोकशाही गौरव सभेच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन 

अमरावती लोकसभा मतदारसंघ हा विदर्भात महत्त्वाचा मतदार संघ मानला जातो. वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडीमध्ये सहभागी करून घेण्याबद्दल अद्याप कुठलाही निर्णय झाला नसल्याने प्रकाश आंबेडकर आपल्या परीने आगामी लोकसभा  निवडणुकांसाठी तयारी करत असल्याचे चित्र आहे. त्या अनुषंगाने प्रकाश आंबेडकर यांनी आज 20 जानेवारीला अमरावतीच्या सायन्सकोर मैदानावर लोकशाही गौरव जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

या सभेला जिल्ह्याभरातील वंचितचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या सभेची तयारी पूर्ण झाली असून हजोरोंच्या संख्येने लोक या सभेला उपस्थित राहणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. यापूर्वी वंचितची मुंबई, लातूर, अहमदनगर, सातारा, बीड, अकोला, सांगली ,जळगाव आणि नागपूर येथे सभा झाली होती. त्यामुळे प्रकाश आंबेडकर आज या सभेतून शक्तीप्रदर्शन करत अमरावती लोकसभेसाठी आपला उमेदवार जाहीर करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

इंडिया आघाडीवर काय म्हणाले आंबेडकर?

राज्यात सुरू असलेली ठेकेदारी पद्धत बंद व्हावी. मतांच्या ध्रुवीकरणाचा मी कधी विचार करत नाही, ज्या प्रश्नांसाठी लढतोय ते सोडवण्यासाठी संसदेत कसं पोहचायला हवे याकडे बघतो. इंडिया आघाडीतील बोलणी अद्याप पुढे सरकली नाही. वर्षभरापूर्वी जिथे होतो तिथेच थांबलेलं आहे. इंडिया आघाडीत जाण्यासाठी शेवटपर्यंत वाट पाहणार, असेही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

‘इंडिया आघाडी’तील प्रवेशापासून आंबेडकर अजूनही दुरच

गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात सर्वाधिक चर्चेत असलेला प्रश्न म्हणजे आंबेडकरांचा राज्यात ‘महाविकास आघाडी’ आणि देशपातळीवर ‘इंडिया आघाडी’त प्रवेश कधी होणार?. आंबेडकर यांचा पक्ष सध्या या दोन्ही आघाड्यांचा घटकपक्ष असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेचा मित्रपक्ष आहे. दोन्ही पक्षांनी 2023 मध्ये ‘शिवशक्ती-भिमशक्ती’चा नारा देत नव्या राजकीय मैत्रीची घोषणा केली होती. उद्धव ठाकरेंनी आंबेडकरांना आघाडीत घेण्यासाठी अनेकदा जोरदार प्रयत्नही केलेत. आता शरद पवारही या नव्या मैत्रीसाठी तयार झालेत. मात्र, काँग्रेसने अद्याप त्यांच्या हातात मैत्रीचा हात दिलेला नाही.

इतर महत्वाच्या बातम्या 

 

अधिक पाहा..



Source link

प्रकाश आंबेडकर कोणाच्या निमंत्रणाची वाट बघतायत; इंडिया आघाडीत यायंच असेल तर…काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांचं मोठे विधान

प्रकाश आंबेडकर कोणाच्या निमंत्रणाची वाट बघतायत; इंडिया आघाडीत यायंच असेल तर…काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांचं मोठे विधान


अमरावती: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काढलेल्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’त सहभागी होण्याचं निमंत्रण वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)यांना देण्यात आले आहे. मात्र वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीमध्ये सहभागी करून घेण्याबद्दल आद्याप कुठलाही निर्णय झाला नसल्याने प्रकाश आंबेडकर आधी हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली आहे. इंडिया किंवा महाविकास आघाडीचा घटक नसताना भारत जोडो यात्रेमध्ये सामील होणं आमच्यासाठी अडचणीचं ठरू शकेल, असं प्रकाश आंबेडकरांनी मत व्यक्त केलं आहे. यावर माजी मुख्यमंत्री, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण(Prithviraj Chavan) यांनी थेट प्रकाश आंबेडकरांनी प्रश्न विचारत मोठं विधान केले आहे.

आंबेडकरांना काय अडचण आहे?

 आजघडीला इंडिया आघाडीत 28 पक्ष आहेत. प्रकाश आंबेडकर हे इंडिया आघाडीतील सर्व नेत्यांना वैयक्तिक ओळखतात. आंबेडकरांना इंडिया आघाडीत यायचं असेल, तर त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली पाहिजे किंवा त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. मात्र ते कुणाच्या निमंत्रणाची वाट पाहत आहेत, याची मला माहिती नाही. मल्लिकार्जुन खर्गेंना भेटण्यास प्रकाश आंबेडकरांना काय अडचण आहे? असा प्रश्न देखील पृथ्वीराज चव्हाणांनी उपस्थित केला आहे. ते अमरावतीत बोलत होते. 

.. तर  प्रकाश आंबेडकर देशाचे नेते होतील

प्रकाश आंबेडकर जर आमच्या सोबत आले तर देशाचे नेते होतील. ते  देशातील दलितांचे एक मोठे नेते आहे. कारण देशात आंबेडकर हे नाव दुसऱ्या कोणाकडेच नाही. त्यांनी राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होऊन त्यांनी संसदेत आलं पाहिजे. प्रकाश आंबेडकर सर्वांना ओळखतात, त्यामुळे त्यांनी जाऊन म्हटले की मला यायचं आहे, तर त्यांना कोण नाही म्हणणार नाही.  प्रकाश आंबेडकर यांनी व्यवहारिक मागणी करून बाबासाहेबांचे संविधान वाचवलं पाहिजे. अवास्तव मागणी केली तर फायदा मोदीला होतो. जास्तीत जास्त लोक उभी करून काँग्रेसचे मतांमध्ये विभाजन करणे आणि उमेदवारांना पाडणं ही मोदींची स्टॅटीजी आहे. मागच्या निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकरांमुळे मुळे आमचे नऊ खासदार पडले हे खरं आहे. त्यामुळे त्यांनी पुढाकार घेऊन मल्लिकार्जुन खर्गेंना भेटने गरजेचे आहे. ते आमच्या सोबत असावे. ही इंडिया आघाडीतील प्रत्येकाची व्यक्तिगत इच्छा असल्याचे पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं.  

भाजपाचा आत्मविश्वास ढळला आहे

भाजपाचा आत्मविश्वास ढळला आहे. त्यामुळे त्यांनी आता अयोध्येतील  प्रभू श्री राम मंदिराचा विषय समोर आणला आहे. पण, भाजपाला यात यश मिळेल असे वाटत नाही. म्हणून त्यांनी ईडी आणि आर्थिक आमिषे दाखवून पक्ष फोडण्यात काम सुरू केले आहे. तरीही, भाजपाला जिंकण्याचा आत्मविश्वास नाही. ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून नेत्यांना पक्षात घेण्यासाठी भाजपाकडून धाक दाखवण्यात येत आहे. मात्र आगामी निवडणुकांमध्ये सर्व चित्र स्पष्ट होईल. असे देखील पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..



Source link

अमरावती लोकसभेवर हक्क आमचाच; महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा दावा

अमरावती लोकसभेवर हक्क आमचाच; महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा दावा


Amravati News अमरावती : राज्यात लोकसभेच्या (Lok Sabha Election) निवडणुकांचे वारे वाहत आहे. त्याकरिता सर्वच पक्षांनी आपापल्यापरीने जोरदार तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक आरोप-प्रत्यारोप आणि टीका होत असतानाच संभाव्य उमेदवार आणि नेतेमंडळींकडून मतदारसंघांवर दावा केला जात आहे. आता महाराष्ट्र काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे (Sandhya Sawalakhe) यांनी अमरावती (Amravati) लोकसभेवर आमचाच हक्क असल्याचा दावा केला आहे. तसेच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यावर देखील त्यांनी सडकून टीका केली आहे. 

अमरावती लोकसभेवर आमचाच हक्क आहे. आमच्याकडे त्याकरिता सक्षम उमेदवार देखील आहे. जेव्हा महाविकास आघाडीची बैठक होईल, त्यात आम्ही अमरावतीच्या जागेसाठी शंभर टक्के मागणी करू. राहुल गांधी यांनी कायम देशातील युवा वर्ग आणि महिलांनी देशाचे नेतृत्व करावे, यासाठी प्रोत्साहन दिले आहे. युवा आणि महिला देशाच्या राजकारणात सक्रिय असायला पाहिजे. ही काँग्रेसची कायम भूमिका राहिली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये देखील युवा आणि महिलांना उमेदवारी देण्याचा राहुल गांधी यांचा मानस असणार आहे.

पंतप्रधान मोदींवर टीका

राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रेनंतर आता भारत न्याय यात्रा सुरू झाली आहे. देशात बिलकिस बानो, महिला पहलवान यांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत ही यात्रा सुरू राहील. मोदींनी निवडणुकांच्या तोंडावर महिला आरक्षणावर विषयी खोटं आश्वासन देऊन मतदान घेतलं. त्यानंतर ते दहा वर्ष झोपून राहिले आणि आता त्यांनी महिला आरक्षणाचा मुद्दा काढला आहे. मात्र देशातल्या महिला मूर्ख नाहीत. त्यांना आरक्षण द्यायचंच होतं तर पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये का दिलं नाही, असा प्रश्न उपस्थित करत संध्या सव्वालाखे यांनी पंतप्रधान मोदीवर टीका केली आहे. 

…त्यांना लाज वाटली पाहिजे

आम्ही जेव्हा आंदोलन करतो, तेव्हा आमच्यावर अजामीनपात्र गुन्हे दाखल करतात, यांना लाज वाटली पाहिजे. आम्ही चार महिला जेव्हा जातो तेव्हा हे निर्ढावलेले लोक बाहेर सुद्धा निघत नाहीत. मात्र आता चार नाही तर चार हजार महिला जातील आणि कमिशनर असो किंवा कोणी मोठे पोलीस अधिकारी, यांना बाहेर यावच लागेल. आम्ही महिलांचा न्याय आणि सन्मानासाठी लढत राहणार आहे. आगामी निवडणुकांसाठी प्रत्येक जण आपापला दावा करणारच आहे. त्यावर मला फार काही बोलायचे नाही. काही लोकांबद्दल आम्हाला अजिबात बोलायचेच नाही. जे लोक दलबदलू आहेत. आमच्या महिलांचे मतदान घेऊन निवडून आले आणि त्यानंतर ज्यांनी आपली भूमिका बदलली.  अशा लोकांवर बोलणे आम्हाला योग्य वाटत नाही, असा टोला संध्या सव्वालाखे यांनी खासदार नवनीत राणा यांचे नाव न घेता लगावला. 

संबंधित बातमी

अधिक पाहा..



Source link

नऊ साल कुछ नहींं किया काम, अब वो बोलते जय श्रीराम; विजय वडेट्टीवारांची भाजपवर खोचक टीका

नऊ साल कुछ नहींं किया काम, अब वो बोलते जय श्रीराम; विजय वडेट्टीवारांची भाजपवर खोचक टीका


अमरावती : अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या (Ram Temple Ayodhya) मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा येत्या 22 जानेवारीला होणार आहे. मात्र या सोहळ्याला चारही शंकराचार्यांनी विरोध केला आहे. असे असतानादेखील केवळ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि त्यातून होणाऱ्या राजकीय फायद्यासाठी भाजप (BJP) राम मंदिराचा इव्हेंट करत आहे. मुळात मंदिराचे काम अजून पूर्ण व्हायचे आहे. मग मंदिर लोकार्पण सोहळ्याची इतकी घाई का, असा प्रश्न काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी भाजपला विचारला आहे. भाजप आणि आरएसएसकडून राम मंदिराच्या अक्षदा वाटप केल्या जात आहे. जसे काही यांनीच मंदिर बांधले आहे. हे म्हणजे ‘बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना’, अशा सारखे आहे. असा टोला देखील विजय वडेट्टीवार यांनी भाजपला लगावला आहे. 

‘जो नौ साल कुछ नहींं किया काम, अब वो बोलते जय श्रीराम’

अयोध्येतील राममंदिराचा हा पवित्र सोहळा संपूर्ण देशासाठी त्यांच्या श्रद्धेचा आणि आस्थेचा विषय आहे. मात्र भाजप आणि संघ परिवाराकडून या सोहळ्याच्या निमित्याने राजकीय फायदा मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अयोध्येतील नवनिर्मित राम मंदिर अद्याप पूर्ण झालेले नाही. शिवाय हिंदू धर्मियांतील पूजनीय अशा चारही शंकराचार्यांनी मंदिराच्या सोहळ्यानिमिती विरोध दर्शवत, कार्यक्रमाला न जाण्याचे जाहीर केले आहे. हा सोहळा केवळ राजकीय फायदा मिळवण्यासाठी केला जात आहे, हे उघड आहे. म्हणजे ‘जो नौ साल कुछ नहींं किया काम, अब बो बोलते जय श्रीराम’ असा खोचक टोला देखील विजय वडेट्टीवारांनी भाजपला लगावला आहे. 

2014 आणि 2019 ची पुनरावृत्ती होऊ नये

राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांना तीन वेळा तारीख देऊन वेळ मागून घेतला. मराठा समाजाला टिकणारे आणि कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण मिळाले पाहिजे. ही आमची आग्रही भूमिका आहे. आरक्षण देताना घाईघाईत कुठलाही निर्णय होता कामा नये. सोबतच कुठल्याही समाजाचे यात नुकसान करता कामा नये. मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का लागता काम नये. याची काळजी सरकारने घेतली पाहिजे, असे देखील विजय वडेट्टीवार म्हणाले.

मराठा समाजाला आरक्षण देताना कुठल्याही न्यायालयात ते टिकू शकेल असे ते आरक्षण असायला हवे. नाही तर मग केवळ निवडणूक आहे म्हणून थातुरमातुर आरक्षण देऊ आणि निवडणूक झाल्या की त्यांना वाऱ्यावर सोडू हे सरकारचे धोरण असायला नको. ओबीसींंचे नुकसान करून मराठा समाजाला फायदा होईल किंवा मराठा समाजाचे नुकसान करून ओबीसीला फायदा होईल, असे सरकारने करू नये इतकीच आमची मागणी आहे. 2014 आणि 2019 ला निवडणुकांच्या तोंडावर सरकारने जे केलं त्याची पुनरावृत्ती होऊ नये, असे देखील विजय वडेट्टीवार म्हणाले.

वंचितबाबत निर्णय अंतिम टप्प्यात

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा पक्ष इंडिया आघाडीत असायला हवा, अशी काँग्रेसची भूमिका आहे. याबाबत बैठक अंतिम टप्प्यात असून येत्या 25 तारखेला मुंबईत बैठक आहे. त्यानंतर इंडिया आघाडीला कळवले जाईल. या बाबत शरद पवार आणि उद्धव ठाकरे चर्चा करत असल्याचे देखील विजय वडेट्टीवार म्हणाले.  

ही बातमी वाचा: 



Source link

भाजपवाल्यांकडे स्वत:चे ओरिजनल लोक राहिलेत किती? काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांची भाजपवर टीका

भाजपवाल्यांकडे स्वत:चे ओरिजनल लोक राहिलेत किती? काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांची भाजपवर टीका


अमरावती: काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी भाजपमध्ये येण्याची ऑफर देण्यात येत असल्याचा मोठा गौप्यस्फोट केला आहे. या खळबळजनक व्यक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे. नुकतेच काँग्रेस नेते मिलिंद देवरांनी (Milind Deora) काँग्रेसची (Congress) साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत (Shinde Group) प्रवेश केला आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठं खिंडार पडले आहे. अशात सुशीलकुमार शिंदे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहे. असे असले तरी काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur ) यांनी प्राणिती शिंदे आणि  सुशीलकुमार शिंदे हे कायम काँग्रेससोबत असतील असा विश्वास व्यक्त केला आहे.

आई वडिलांना कोणी सोडत असतात का ? – यशोमती ठाकूर

प्रणिती शिंदे आणि काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांना भाजपकडून ऑफर आल्या असल्याची शक्यता नाकारता येत नाही. मुळात भाजपवाल्यांकडे स्वत:चे ओरिजनल लोक राहिलेत किती? आमच्या पक्षातील लोक भाजपमध्ये घेण्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र मला विश्वास आहे प्रणिती शिंदे आणि काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे हे कायम काँग्रेस सोबत राहतील. शिंदे कुटुंबीय कट्टर काँग्रेसचे असून ते सर्वधर्म समभाव आणि व्यापक विचारधारेचे आहेत. त्यामुळे ते नेहमी काँग्रेससोबत राहतील. असा काँग्रेसनेत्या आमदार यशोमती ठाकूर यांनी बोलताना व्यक्त केला. पक्ष सोडण्यामागे दोन मुख्य कारण असतात. एक म्हणजे भीती, नाहीतर सत्तेची ताकद असते. हे दोनच कारण असू शकतात, नाहीतर आई वडिलांना कोणी सोडत असतात का ? असे देखील यशोमती ठाकूर म्हणाल्या. 

नेमकं काय म्हणाले सुशीलकुमार शिंदे? 

अक्कलकोट तालुक्यातील बोरोटी येथे झालेल्या हुरडा पार्टी दरम्यान कार्यकर्त्यांशी संवाद साधतांना सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, ‘माझा दोन वेळा पराभव झाला असला, तरीही प्रणिती ताईला किंवा मला भाजपकडून आमच्या पक्षात या असे सांगितले जात आहे. मात्र, काँग्रेस आमच्या रक्तात आहे. आम्ही कधीही काँग्रेस सोडून जाणार नाही असे स्पष्टीकरण देखील यावेळी सुशीलकुमार शिंदे यांनी दिले. तसेच, आता मी 83 वर्षाचा आहे. त्यामुळे आता मी दुसऱ्याचं बरोबर आहे असं कसं म्हणणार. तसेच प्रणिती पक्षीय बदलाच्या भानगडीत पडणार नाही. राजकारणामध्ये असे (पराभव) होतं राहतात. पंडित जवाहरलाल नेहरू या माणसासोबत असं झालं. मात्र, परभवाबाबतीत पंडित नेहरू म्हणाले होते की, ‘लहान मुलाला सुरुवातीला आधार देऊन चालवावे लागते. नंतर तो स्वतः चालतो. चालताना पडतो पुन्हा उठतो, पुन्हा पडतो पुन्हा उठतो. मग तो जेव्हा चालायला लागतो तेव्हा तो पुन्हा कधी पडत नाही’. त्यामुळे तुम्ही काहीही काळजी करू नका, आज वाईट दिवस आहेत, मात्र ते दिवस निघून जातील, असे सुशीलकुमार शिंदे म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

 



Source link

YouTube
Instagram
WhatsApp