अयोध्‍येला जाणार पाचशे किलो कुंकवाचा करंडा; अमरावतीच्या सकल हिंदू समाजाचा संकल्‍प

अयोध्‍येला जाणार पाचशे किलो कुंकवाचा करंडा; अमरावतीच्या सकल हिंदू समाजाचा संकल्‍प


Ayodhya Ram Mandir: अयोध्येत (Ayodhya) प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठापना येत्या 22 जानेवारीला होणार आहे. या नेत्रदीपक आणि ऐतिहासिक सोहळ्याकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे. या राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने जगभरातील रामभक्त आपली सेवा प्रभू श्रीरामाच्या चरणी अर्पण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. आशातच अंबानगरी  अमरावतीची(Amravati) खास ओळख असलेले  500 किलो कुंकवाचा करंडा अयोध्येत पाठवण्याचा संकल्प आमरावतीच्या सकल हिंदू समाजने केला आहे. कौंडण्यपूर येथील रुक्मिणी पीठाचे पीठाधीश्वर श्री राजराजेश्वर माउली सरकार हे त्यांच्यासोबत प्रतीकात्मक कलशात कुंकू सोबत नेतील. तसेच उर्वरित कुंकू रुक्मिणी पीठाचे सेवक अयोध्येला घेऊन जाणार आहेत.

अंबानगरीच्या कुंकूची खास ओळख

अयोध्येत भव्य राम मंदिरात रामलल्ला प्रतिष्ठापना सोहळ्याला काल, 16 जानेवारी पासून सुरुवात झाली. काल प्रभू श्रीरामाच्या बालस्वरूप मूर्तीची पूजा झाली. त्यानंतर 18 जानेवारीला गाभाऱ्यात रामलल्लाची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. तर येत्या 22 जानेवारीला प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे. या निमित्याने जगभरातील रामभक्तांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. अशातच अमरावतीच्या सकल हिंदू समाजने 500 किलो कुंकू अयोध्येत पाठवण्याचा संकल्प केला आहे. श्री राजराजेश्वर माउली यांना विशेष निमंत्रित करण्यात आले आहे. त्या निमित्ताने 17 जानेवारीला अमरावतीत कुंकू अर्पण सोहळा आयोजित करण्यात आला.

कुंकू तयार करणारे शहर म्हणून अमरावतीची खास ओळख आहे. हळदीबरोबर चिंचोका, रताळ्याची पावडर, टोपिओका, डोलामॅट यांपासून कुंकू बनवले जाते. अमरावतीत आता कुंकू तयार करणारे कारखाने बोटावर मोजण्‍याइतके शिल्‍लक असले, तरी काही वर्षांपूर्वीपर्यंत येथील कुंकवाला मोठी मागणी होती. त्यामुळे अमरावतीचे हे खास कुंकू प्रभूश्रीराम मंदिराच्या हा सोहळ्यासाठी पाठवण्याचा आमचा मानस असल्याचे केसरी धर्मसभेचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री जगदीश गुप्ता म्हणाले. 

22 जानेवारीला अनेक शुभ योग

ज्योतिषांच्या मते, 22 जानेवारीला अनेक शुभ योग तयार होत आहेत. या दिवशी अभिजीत मुहूर्त, सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग आणि रवि योग असे तीन शुभ योग तयार होत आहेत. कोणताही शुभ कार्य करण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. या योगांमध्ये कोणतेही काम केल्याने व्यक्तीला सर्व प्रकारच्या कामात यश मिळते.

म्हणून झाली 22 जानेवारीची निवड

धार्मिक मान्यतेनुसार, भगवान रामाचा जन्म अभिजीत मुहूर्तावर मृगशीर्ष नक्षत्र, अमृत सिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धी योगाच्या संयोगादरम्यान झाला. हे सारे शुभ योग 22 जानेवारी 2024 रोजी पुन्हा एकदा जुळून आले आहेत. त्यामुळेच अयोध्येमध्ये राम मंदिरात रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी 22 जानेवारीची निवड करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

 

अधिक पाहा..



Source link

अकोल्याची जागा प्रकाश आंबेडकरांसाठी सोडली; केंद्रीय राज्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

अकोल्याची जागा प्रकाश आंबेडकरांसाठी सोडली; केंद्रीय राज्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य


Akola Lok Sabha Election 2024: अकोला : देशात सध्या आगामी लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha Election 2024) वारे वाहू लागले आहेत. सर्वच पक्षांनी लोकसभेसाठी कंबर कसली आहे. लोकसभेसाठी आता जवळपास सर्वच पक्षांनी दावे-प्रतिदावे करण्यास सुरुवात केली आहे. अकोला मतदारसंघ प्रकाश आंबेडकरांच्या (Prakash Ambedkar) उमेदवारीनं राज्यभरात चर्चेत राहणारा मतदारसंघ समजला जातो. अशातच अकोल्याची जागा प्रकाश आंबेडकरांसाठी सोडली, असं वक्तव्य रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केलं आहे. रामदास आठवलेंच्या या वक्तव्यानं अकोल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. 

केंद्रीय मंत्री रामदास आठवले आज (15 जानेवारी 2024) वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत रामदास आठवलेंना अकोल्याची जागा तुम्ही मागणार का? असा प्रश्न विचारला. त्यावेळी अकोल्याची जागा आम्ही प्रकाश आंबेडकरांसाठी सोडली, असं मोठं वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी केलं आहे. तसेच, प्रकाश आंबेडकरांना तुमचा पाठिंबा आहे का? असं विचारलं असता, त्यांनी आम्हाला पाठिंबा दिल्यास, आम्हीही त्यांना पाठिंबा देऊ, असंही रामदास आठवले म्हणाले आहेत.

रामदास आठवलेंनी यावेळी बोलताना महाविकास आघाडीला टोलाही लगावला आहे. प्रकाश आंबेडकरांनी दिलेला बारा बारा जागांचा फॉर्म्युला महाविकास आघाडीनं स्विकारावा, असा सल्ला आठवलेंनी दिला आहे. तसेच, जर त्यांनी प्रकाश आंबेडकरांचा फॉर्म्युला स्विकारला, तर आम्हाला त्यांचे बारा वाजवण्यात यश येईल, असा टोला रामदास आठवलेंनी महाविकास आघाडीला लगावला आहे. 

अकोल्यात प्रकाश आंबेडकरांची उमेदवारी ‘कन्फर्म’

महाविकास आघाडीशी प्रकाश आंबेडकरांच्या संभाव्य आघाडीवर या मतदारसंघातील निवडणुकीचं भवितव्य अवलंबून आहे. कारण प्रकाश आंबेडकर काँग्रेसशी युती असतांना 1998 आणि 1999 च्या निवडणुकीत येथून विजयी झालेत. ही आघाडी झाली तर प्रकाश आंबेडकरच आघाडीचे उमेदवार असतील. प्रकाश आंबेडकरांच्या वंचितचा समावेश ‘महाविकास’ आणि ‘इंडिया अघाडी’त होतो की नाहीय?, ही शक्यता सध्या अधांतरी आहेत. आंबेडकर जरी लढणार असले तरी ते एकटे लढतात की महाविकास आघाडीत यावर निवडणुकीचं चित्र ठरणार आहे. 

अकोल्यात संभाव्य लढतीचं चित्र अद्याप अस्पष्टच

प्रकाश आंबेडकरांच्या ‘वंचित’चा समावेश ‘महाविकास’ आणि ‘इंडिया अघाडी’त होतो की नाही?, समावेश न झाल्यास अकोला लोकसभा काँग्रेस किंवा ठाकरे गटाच्या वाट्याला येणार?, की आघाडी न झाल्यानंतरही महाविकास आघाडी न मागता आंबेडकरांना पाठींबा देणार?, या सर्वच शक्यता सध्या अधांतरी आहेत. त्यासोबतच धोत्रे आजारी असल्याने भाजपला नवा उमेदवार द्यावा लागणार असल्याची चर्चा आहे. आंबेडकर जरी लढणार असले, तरी ते एकटे लढतात की महाविकास आघाडीत यावर निवडणुकीचं चित्र ठरणार आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीचा उमेदवार या मुद्द्यांवर संभ्रमाचं वातावरण असल्यानं अकोल्यातील संभाव्य लढतीचं चित्र अद्यापही अस्पष्टच आहे. मात्र, 2024 चा लोकसभेचा अकोल्यातील रणसंग्राम राज्यासाठी औत्सुक्याचा विषय ठरणार आहे.

‘अकोला पॅटर्न’ची आठवण करून देणारा मतदारसंघ

अकोला लोकसभा मतदारसंघ राज्यातील एक अतिशय महत्वाचा मतदारसंघ आहे. कारण या मतदारसंघाने राज्याला नेहमीच एक नवा विचार आणि दिशा दिली आहे. राज्याच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावत असलेल्या प्रकाश आंबेडकर यांच्या हा मतदारसंघ असल्याने राज्याच्या राजकारणात देखील ‘केंद्रबिंदू’ समजला जातो. 1990 च्या दशकात राज्यभरात गाजलेला प्रकाश आंबेडकर यांच्या ‘अकोला पॅटर्न’ याच जिल्ह्यात जन्माला आलेला. अलीकडे ‘सोशल इंजीनिअरिंग’ हा रूढ झालेला राजकीय विचार याच काळात प्रकाश आंबेडकरांनी अठरा पगड जातींना सोबत घेत यशस्वी करून दाखविला होता. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Akola Lok Sabha Constituency : अकोला लोकसभा मतदारसंघात ‘राजकीय वादळा’ पूर्वीची शांतता; प्रकाश आंबेडकर विरुद्ध भाजपची थेट लढत



Source link

पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या पाच आरोपींना पोलिसांकडून अटक; आरोपींवर होते 25 हजारांचं बक्षीस

पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या पाच आरोपींना पोलिसांकडून अटक; आरोपींवर होते 25 हजारांचं बक्षीस


अकोला: गस्तीवर असलेल्या पोलिसांवर दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबार प्रकरणी पाच आरोपींना पकडण्यात अखेर अकोला (Akola) पोलिसांना यश आले आहे. विशेष बाब म्हणजे या दरोडेखोरांवर पोलिसांनी 25 हजार रुपयांचे इनाम जाहीर केले होते. त्यानंतर तब्बल 15 दिवसांनी या आरोपींना पकडण्यात यश आले आहे. 30 डिसेंबरच्या रात्री अकोल जिल्ह्यातील (Akola District) उरळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही खळबळजनक घटना घडली होती. पकडण्यात आलेले पाच आरोपी परिसरात शिकारीसाठी फिरत असल्याची माहिती पोलीस सूत्राने दिली आहे.

गस्तीवर असलेल्या पोलिसांवर केला होता गोळीबार

अकोला जिल्ह्यातील उरळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत 30 डिसेंबरच्या रात्री पोलिसांचे गस्ती पथक फिरत होते. दरम्यान त्यांना काही व्यक्ति दुचाकीवरून संशयास्पदरित्या  फिरतांना आढळले. त्यानंतर पोलीस पथकाने आरोपींना हटकल्यावर या आरोपींना पळ काढण्यास सुरुवात केली. पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू केला असता त्यांनी अचानक पोलीस पथकाच्या दिशेन गोळीबार सुरू केला. यात पोलीसांच्या वाहनावर नऊ गोळ्या झाडल्याचे निशान होते. या गोळीबारात पोलीस कर्मचारी थोडक्यात  बचावले. तर या गोळीबारात एक पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. घटनेनंतर पोलीस पथकाने आरोपींचा पाठलाग केला, मात्र आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले.

आरोपींवर होते 25 हजारांचं बक्षीस

या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण अकोला शहरात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासाचे चक्र गतिमान करत आरोपींचा शोध सुरू केला. मात्र काही केल्या या आरोपींचा पत्ता पोलिसांना लागत नव्हता. परिणामी, या आरोपींची माहिती अथवा पकडून देणाऱ्याला पोलिसांकडून  25 हजारांचं इनाम जाहीर केले होते. अखेर 15 दिवसानंतर या आरोपींचा शोध घेण्यात अकोला पोलिसांना यश आले आहे. पकडण्यात आलेले आरोपी शिकार करण्यासाठी फिरत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून या आरोपींचा पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. 

हे आहेत आरोपी 

अश्विन गणेश मुंडे, वय 21 वर्ष, राहणार नखेगाव, भावेश उर्फ अर्जुन रवींद्र मुंडाले, वय 19 वर्ष, राहणार : हातरूण, सागर ज्ञानेश्वर चौके, वय 25 वर्ष, राहणार : नेरधामणा अविनाश भिमराव मुंडाळे, वय 25 वर्ष, राहणार : नखेगाव योगेश रामराव मुंडाळे, वय 26 वर्ष, राहणार : नखेगाव असे पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 

 



Source link

संजय राऊतांचे 3 इंद्रिये निकामी झालेत, अमोल मिटकरींची जहरी टीका

संजय राऊतांचे 3 इंद्रिये निकामी झालेत, अमोल मिटकरींची जहरी टीका


Amol Mitkari on Sanjay Raut : “कोणी बापाचा पक्ष चोरलाय तर कोणी काकाचा पक्ष चोरलाय”, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले होते. संजय राऊतांच्या या टीकेला अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “संजय राऊतांचे 3 इंद्रिये निकामी झाले आहेत. मेंदू, जीभ आणि डोळे हे ते इंद्रिय आहेत”, अशी जहरी टीका अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केली आहे. महायुतीचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा अकोला येथे पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपचे विधानपरिषदेचे आमदार प्रवीण (Pravin Darekar)दरेकर उपस्थित होते. 

अमोल मिटकरी म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 44 आमदार 4 खासदार आणि अख्खा पक्ष अजित पवार यांच्याकडे आहे. त्यामुळे संजय राऊतांनी डोळ्याला झालेल्या मोतीबिंदूचे ऑपरेशन करावे. अजित पवार संजय राऊतांना उत्तर देणार नाहीत. आम्ही कार्यकर्ते त्यासाठी सक्षम आहोत.” 

‘अजित पवारच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष’ – अमोल मिटकरी 

महायुतीच्या जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना अमोल मिटकरी यांनी अजित पवारांचा ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष’ असा उल्लेख केला आहे. पुलोदचे सरकार स्थापन झाले तेव्हा जनसंघाचे लोकही सोबत होते. असा प्रयोग अजित पवार यांनी केला तर कोणाला वाईट वाटण्याचे कारण नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जेव्हा जेव्हा संकट आले तेव्हा तेव्हा अजित पवार ढाल बनून पुढे गेले. जे पोटात आहे ते त्यांच्या ओठात आहेत, असेही मिटकरी म्हणाले.

2024 मधील निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मेळावा

महायुताने 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन आजचा मेळावा आयोजित केला आहे. आम्ही एकत्र आहोत. हे सांगण्यासाठी हा महामेळावा आहे. महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आल्यानंतर अनेकांना प्रश्न पडला. एकमेकांच्या विरोधात असणारे एकत्रित कसे आले? आमच्या पक्षाचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबई याबाबत भूमिका मांडली, असेही मिटकरी यांनी स्पष्ट केले. 

‘मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे केवळ दोनदाच मंत्रालयात आले’ 

मिटकरी म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार असताना मंत्रालयात सातत्याने काम करणारे केवळ अजित पवारच होते. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केवळ दोनदाच मंत्रालयात आले होते. कोरोनाच्या काळात जीवाची पर्वा न करता अजित पवार मंत्रालयात काम करत होते. देशात तरुणांना आकर्षित करत असेल आणि आपले राज्य विकासाच्या मार्गाने नेईल, असे कोणते नेतृत्व असेल तर ते पीएम मोदींचे नेतृत्व आहे, असे अजित पवार म्हणाले होते. आमचा नेता जे सांगेन तेच धोरण आणि आमचा नेता जो बांधेन तेच तोरण हीच आमची भूमिका आहे, असे अमोल मिटकरी यांनी स्पष्ट केले. 

इतर महत्वाच्या बातम्या

Eknath Shinde on Uddhav Thackeray : लोक लोकांची कामे करणाऱ्याला कसे साफ करतील? घरात बसणाऱ्याला साफ करतील; एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला



Source link

Bachchu Kadu :  आम्ही तटस्थ, निर्णय झाला तर ठीक नाहीतर गेम करू; बच्चू कडूंचा भाजपला इशारा

Bachchu Kadu : आम्ही तटस्थ, निर्णय झाला तर ठीक नाहीतर गेम करू; बच्चू कडूंचा भाजपला इशारा


Bachchu Kadu अमरावती : देशभरात लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha Elections) वारे वाहू लागले आहेत. लोकसभा निवडणुका जाहीर होण्यास काही महिन्यांचा अवधी शिल्लक असतांना राजकीय पक्षांनी, आघाड्यांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. अशातच प्रहार जनशक्‍ती पक्षाचे सर्वेसर्वा बच्चू कडू आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा कलगीतुरे रंगल्याचे समोर आले आहे. रविवारी अमरावती (Amravati) येथे आयोजित महायुतीच्या लोकसभा निहाय बैठकीला आपण मुद्दाम जाणार नसल्याचे आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी स्पष्ट करत भाजपला इशारा दिला.

भाजपने वापरुन घेण्याची भाषा करु नये. भाजपला लोकसभा निवडणूक जितकी महत्त्वाची आहे, तेवढीच आम्हाला विधानसभा महत्त्वाची आहे. त्यांनी लोकसभेचा विचार करावा. परंतु, आमच्या डोक्यात विधानसभा आहे. त्यामुळे विधानसभेचं चित्र स्पष्ट होत नाही तोवर आमची भूमिका तटस्थ राहील. काही काळ आम्ही वाट पाहू, मात्र त्यातून काही निर्णय झाला नाही तर, मग आम्ही गेम करू, असा इशाराच बच्चू कडूंनी भाजपला दिला आहे. 

बैठकीला जाणार नाही – बच्चू कडू

गेल्या काही दिवसांपासून प्रहार जनशक्‍ती पक्षाचे सर्वेसर्वा बच्चू कडू हे नाराज असल्याचे चित्र आहे. दरम्यान त्यांनी भाजपवर वेळोवेळी टीका करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप सोबतच्या मित्रपक्षांमध्ये काहीसे बिनसले आल्याच्या चर्चा रंगत आहे. अशातच बच्चू कडू यांनी पुन्हा आपली नाराजी व्यक्त करत भाजपला थेट इशारा दिला आहे. भारतीय जनता पार्टी सध्या राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघात मतदारसंघनिहाय बैठका घेत आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवारी 14 जानेवारीला अमरावतीत देखील बैठक बोलावण्यात आली. या बैठकीला भाजपाने सर्वच मित्रपक्षांच्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना बोलावलं आहे. परंतु, बच्चू कडू यांनी आपण या बैठकीला जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. 

कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर

महाराष्ट्रामध्ये आमच्या  200 ते 300 ग्रामपंचायत, नगरपंचायत आहे. त्याला निधी मिळाला नाही, त्यामुळे कार्यकर्त्यांचा नाराजीचा सूर आहे. कुठल्याही पक्षात कार्यकर्ता महत्वाचा आहे. त्याशिवाय कोणत्याही पक्षाचे काम होऊ शकत नाही. आम्हाला संपूर्ण राज्यभरातल्या जिल्हाप्रमुखांचे फोन येत आहेत. आम्ही नेहमीच युतीसाठी प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता विधानसभेबाबत भाजपा काय निर्णय घेणार, हे आधी स्पष्ट केले पाहिजे.

5 फेब्रुवारीला महाराष्ट्रातील प्रमुख कार्यकर्त्यांची आम्ही बैठक घेणार आहोत. त्यामध्ये आम्ही निर्णय जाहीर करू. त्याआधी भाजपाने आमच्यासोबत जे युतीपक्ष म्हणून आम्ही सोबत आहोत, त्यावर चर्चा करावी आणि त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगावं, तर आम्ही बैठकीला जाऊ नाही तर जाणार नसल्याचे आमदार बच्चू कडू म्हणाले.

हेही वाचा : 



Source link

महिला CEO का पुलिस स्टेशन में पति से आमना-सामना: बोली- जब तक मैं हिरासत में हूं, तुम आजाद हो; बेटे की हत्या से इनकार किया

महिला CEO का पुलिस स्टेशन में पति से आमना-सामना: बोली- जब तक मैं हिरासत में हूं, तुम आजाद हो; बेटे की हत्या से इनकार किया


पणजी2 घंटे पहले

  • कॉपी लिंक

सूचना सेठ के पति वेंकट रमन ​​​​​शनिवार को ​अपना बयान दर्ज कराने के लिए गोवा के कैलंगुट पुलिस स्टेशन पहुंचे थे। यहीं पर सूचना को भी कस्टडी में रखा गया है।

बेंगलुरु की महिला CEO सूचना सेठ और उसके पति वेंकट रमन का गोवा के कैलंगुट पुलिस स्टेशन में शनिवार (13 जनवरी) को आमना-सामना हुआ। सूचना और उसके पति ने एक-दूसरे से मिलने की इच्छा जताई थी। पुलिस ने उन्हें 15 मिनट मिलने की इजाजत दी।

इस दौरान सूचना ने कहा- जब तक मैं पुलिस कस्टडी में हूं, तुम आजाद हो। तुम्हारी वजह से आज मेरी ये हालत हुई है। सूचना ने 4 साल के बेटे की हत्या के आरोपों से भी इनकार किया। पति वेंकट ने भी अपनी भड़ास निकाली और पूछा कि जब तुमने बच्चे को नहीं मारा तो उसकी मौत कैसे हुई।

वेंकट ​​​​​शनिवार को ​अपना बयान दर्ज कराने के लिए अपने वकील के साथ गोवा के कैलंगुट पुलिस स्टेशन पहुंचे थे। बेटे के मर्डर के वक्त वे इंडोनेशिया में थे। पुलिस से बेटे की मौत की खबर मिलने के बाद वे 9 जनवरी को भारत आए और 10 जनवरी को बेंगलुरु में बेटे का अंतिम संस्कार किया।

सूचना ने सीन रीक्रिएशन के वक्त पूरी घटना बताई
गोवा पुलिस ने बताया कि सूचना सेठ के स्टेटमेंट के आधार पर शुक्रवार (12 जनवरी) को डेढ़ घंटे तक क्राइम सीन रीक्रिएट किया गया। पुलिस सूचना को होटल के उस कमरे में ले गई, जहां वह अपने बेटे के साथ ठहरी थी।

क्राइम सीन रीक्रिएशन के वक्त सूचना ने अपने चार साल के बेटे के मर्डर से जुड़ी कुछ बातें पुलिस के साथ शेयर कीं। उसने बताया कि गोवा के होटल के कमरे में उसका बेटा कहां सोया था, उसका सूटकेस कहां रखा था और उसने सूटकेस में अपने बेटे की लाश कैसे रखी थी।

उसने यह भी बताया कि बेटे की मौत के बाद उसने कैसे चाकू से अपनी कलाई काटी और सुसाइड करने की कोशिश की। पुलिस ने बताया कि सूचना ने बेंगलुरु से गोवा के लिए एकतरफा फ्लाइट टिकट बुक कराया था। शायद उसका इरादा सड़क के रास्ते ही लौटने का था।

पति का वकील बोला- सूचना को सजा मिले या बेल, फर्क नहीं पड़ता
सूचना के पति के वकील अजहर मीर ने शनिवार (13 जनवरी) को मीडिया से बात की। उन्होंने बताया कि कपल के बीच पिछले एक साल से बेंगलुरु के एक फैमिली कोर्ट में बच्चे की कस्टडी की लड़ाई चल रही थी। कोर्ट ने पिता को बच्चे से फोन या वीडियो कॉल के जरिए बात करने की इजाजत दी थी।

नवंबर 2023 में कोर्ट ने पिता को बच्चे से हर रविवार घर पर मिलने की इजाजत दी थी। हालांकि, सूचना ने कहा था कि पिता को अपने बेटे से किसी कैफे में मिलना चाहिए। वेंकट 7 जनवरी यानी रविवार को बेटे से मिलना वाला था।

वेंकट 7 जनवरी को सुबह 10 बजे सूचना के घर गए और 11 बजे तक इंतजार किया। उन्होंने सूचना को एक मैसेज भी भेजा, लेकिन कोई जवाब नहीं मिला। सूचना पिछले 5 रविवार से वेंकट को उसके बच्चे से मिलने नहीं दे रही थी।

वकील अजहर ने कहा कि वेंकट अपने बेटे के लिए जान भी दे सकता था। उसे अपने बच्चे के लिए न्याय नहीं चाहिए, जो अब इस दुनिया में नहीं है। सूचना को सजा हो या बेल मिले, इससे रमन को कोई फर्क नहीं पड़ेगा।

कर्नाटक के बेंगलुरु में हरिश्चंद्र घाट पर बुधवार (10 जनवरी) को सूचना सेठ के पति ने चार साल के अपने बेटे का अंतिम संस्कार किया।

कर्नाटक के बेंगलुरु में हरिश्चंद्र घाट पर बुधवार (10 जनवरी) को सूचना सेठ के पति ने चार साल के अपने बेटे का अंतिम संस्कार किया।

सूचना के बैग से नोट मिला, इसमें लिखा- पति को बच्चा नहीं दे सकती
पुलिस को सूचना के बैग से टिश्यू पेपर पर लिखा एक नोट भी मिला है। इसमें लिखा है- मेरे बच्चे की कस्टडी को लेकर कोर्ट और मेरे हसबैंड दबाव बना रहे हैं। मेरा हसबैंड हिंसक है। मैं उसे एक दिन के लिए भी अपना बच्चा नहीं दे सकती।

पुलिस ने बताया कि टिश्यू पेपर पर आईलाइनर या काजल पेंसिल से नोट लिखा गया है। सूचना ने नोट लिखकर उसे फाड़ दिया था। पुलिस ने टिश्यू पेपर के टुकड़े को जोड़कर उसमें लिखा मैसेज पढ़ा।

पुलिस का मानना है कि यह एक सुसाइड नोट हो सकता है, क्योंकि सूचना ने बेटे की हत्या के बाद अपने हाथ की नस काट ली थी। पुलिस ने होटल के कमरे से चाकू, तौलिया, तकिया और एक लाल बैग जब्त किया है।

6 जनवरी को सूचना ने पति को मैसेज कर बेटे से मिलने को कहा था
सूचना अपने पति वेंकट रमन से अलग रह रही थी। दोनों के तलाक की प्रक्रिया चल रही थी। बच्चे की कस्टडी सूचना के पास थी और कोर्ट ने वेंकट को हर रविवार अपने बच्चे से मिलने की इजाजत दी थी।

पुलिस की जांच में सामने आया है कि सूचना ने 6 जनवरी को अपने पति को मैसेज किया था कि वह अगले दिन बेटे से मिल सकता है। हालांकि 7 जनवरी को जब वह बेटे से मिलने पहुंचा तो पता चला कि मां-बेटा बेंगलुरु में नहीं हैं। इसके बाद वेंकट रमन उसी दिन इंडोनेशिया के लिए रवाना हो गया।

गोवा के होटल मैनेजर ने बताया कि सूचना ने 6 जनवरी से 10 जनवरी तक के लिए एडवांस में कमरा बुक किया था। लेकिन, 7 और 8 जनवरी की दरम्यानी रात 12:30 बजे उसने अचानक चेक-आउट कर लिया। इससे पहले उसने दिन में बेटे के लिए दो कफ सिरप की बोतल भी रिसेप्शन से ऑर्डर की थीं।

सूचना सेठ और वेंकट रमन की 2010 में शादी हुई थी। 2019 में सूचना ने एक बेटे को जन्म दिया। इसके बाद दोनों ने 2022 में तलाक की अर्जी लगाई।

सूचना सेठ और वेंकट रमन की 2010 में शादी हुई थी। 2019 में सूचना ने एक बेटे को जन्म दिया। इसके बाद दोनों ने 2022 में तलाक की अर्जी लगाई।

सूचना को पति और उसके बच्चे का मिलना पसंद नहीं था
सूचना नहीं चाहती थी कि उसका पति बेटे से मिले। सूचना ने अगस्त 2022 में पति पर अगस्त में घरेलू हिंसा का भी आरोप लगाया था। उसने कहा था- पति मेरा और मेरे बेटे का शारीरिक शोषण करता है।

सूचना ने दावा किया था कि उसके पति की सालाना इनकम 1 करोड़ रुपए से ज्यादा है। उसने गुजारा भत्ते के तौर पर पति से हर महीने 2.5 लाख रुपए की मांग की थी।

घटना के वक्त सूचना का पति वेंकट रमन जकार्ता (इंडोनेशिया) में था। गोवा पुलिस की सूचना पर वे 9 जनवरी को कर्नाटक के चित्रदुर्ग आए। वेंकट ने बुधवार (10 जनवरी) को बेंगलुरु में बेटे का अंतिम संस्कार किया।

महिला के एक्स हसबैंड वेंकट रमन जकार्ता (इंडोनेशिया) से कर्नाटक के चित्रदुर्ग पहुंचे।

महिला के एक्स हसबैंड वेंकट रमन जकार्ता (इंडोनेशिया) से कर्नाटक के चित्रदुर्ग पहुंचे।

सूचना AI एथिक्स लिस्ट में 100 प्रतिभाशाली महिलाओं में शामिल
सूचना सेठ की लिंक्डइन प्रोफाइल के अनुसार, वह एक आर्टिफिशियल इंटेलिजेंस एथिक्स एक्सपर्ट और डेटा साइंटिस्ट हैं। उसके पास डेटा साइंस और AI में काम करने का 12 साल का अनुभव है।

सूचना साल 2021 में AI एथिक्स लिस्ट में 100 प्रतिभाशाली महिलाओं की लिस्ट में शामिल थी। इसके अलावा वह डेटा एंड सोसाइटी में मोजिला फेलो, हार्वर्ड यूनिवर्सिटी के बर्कमैन क्लेन सेंटर में फेलो और रमन रिसर्च इंस्टीट्यूट में रिसर्च फेलो रह चुकी है।

ये खबरें भी पढ़ें…

पुलिस बोली- महिला CEO ने बच्चे का मर्डर प्लान किया: होटल में कफ सिरप की हैवी डोज दी, पोस्टमॉर्टम में दम घुटने से मौत की बात

गोवा पुलिस ने सूचना को मंगलवार (9 जनवरी) को गिरफ्तार किया। उसे पणजी के मापुसा कोर्ट में पेश किया। कोर्ट ने उसे 6 दिन की पुलिस कस्टडी में भेज दिया।

गोवा पुलिस ने सूचना को मंगलवार (9 जनवरी) को गिरफ्तार किया। उसे पणजी के मापुसा कोर्ट में पेश किया। कोर्ट ने उसे 6 दिन की पुलिस कस्टडी में भेज दिया।

बेंगलुरु की स्टार्टअप कंपनी की CEO सूचना सेठ ने अपने 4 साल के बेटे की हत्या प्लान की थी। इसी प्लानिंग के तहत 39 साल की सूचना अपने बेटे को लेकर गोवा आई और होटल रूम में उसका मर्डर किया। गोवा पुलिस ने मर्डर के दो दिन बाद बुधवार को इस बात की आशंका जाहिर की है।

गोवा पुलिस के मुताबिक, जिस होटल के कमरे में महिला रुकी हुई थी, वहां से कफ सिरप की दो खाली बॉटल्स बरामद हुई हैं। पुलिस को शक है कि मर्डर से पहले सूचना ने अपने बेटे को कफ सिरप की हैवी डोज दी होगी। पूरी खबर पढ़ें…

महिला CEO ने 4 साल के बेटे की हत्या की: गोवा से शव लेकर बेंगलुरु जाते समय गिरफ्तार, होटल में खून मिलने से खुलासा

बेंगलुरु की एक स्टार्टअप कंपनी की CEO ने गोवा के एक होटल में अपने 4 साल के बेटे की हत्या कर दी। इसके बाद शव को बैग में भरकर टैक्सी से बेंगलुरु के लिए रवाना हो गई। गोवा पुलिस की जानकारी के बाद कर्नाटक पुलिस ने आरोपी महिला को गिरफ्तार कर लिया है।

उसके बैग से बेटे की बॉडी बरामद हुई है। पुलिस की पूछताछ में सामने आया है कि सूचना ने पहले होटल में अपने बेटे का गला घोंटकर उसे मार डाला, इसके बाद धारदार हथियार से अपनी कलाई की नस काटकर आत्महत्या की कोशिश की। पूरी खबर पढ़ें…

खबरें और भी हैं…



Source link

YouTube
Instagram
WhatsApp