22 जानेवारीला राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करा; भाजप आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

22 जानेवारीला राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करा; भाजप आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी


नागपूर:   अयोध्येत (Ayodhya)  प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा येत्या 22 जानेवारीला होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते (PM Modi) या भव्य मंदिराचे उद्घाटन केले जाणार आहे. रामललाच्या अभिषेक सोहळ्यासाठी देश-विदेशातील अनेक दिग्गज उपस्थित राहणार आहेत. या दिमाखदार सोहळ्याकडे देश-विदेशातील तमाम रामभक्तांचे लक्ष लागले आहे. अशातच संपूर्ण देशातही  22 जानेवारीला मोठा उत्सव साजरा केला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर 22 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय सण जाहीर करत या दिवशी शासकीय सुट्टी जाहीर करण्यात यावी, अशी मागणी भाजप आमदार प्रवीण पोटे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

दरवर्षी शासकीय सुट्टी जाहीर करा 

अयोध्येमध्ये भव्य राम मंदिराचं निर्माणकार्य अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या 22 जानेवारीला राम मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या पार्श्वभूमीवर 22 जानेवारीला राज्यात दिवाळी साजरी करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका आयुक्तांना दिल्या आहेत. त्यामुळे हा अलौकिक सोहळा राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना बघता यावा, या करीता 22 जानेवारी 2024 रोजी शासकीय सुट्टी जाहीर करण्यात यावी. अशी मागणी भाजप आमदार प्रवीण पोटे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या मागणीचे पत्र प्रवीण पोटे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठवले आहे. तसेच दरवर्षी ह्या दिवशी शासकीय सुट्टी जाहीर करावी असे देखील भाजप आमदार प्रवीण पोटे पाटील यांनी या पत्रात म्हटले आहे. 

महाराष्ट्रातील 355 साधू – संतांनाही अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी निमंत्रण

महाराष्ट्रातून एकूण 889 जणांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले असून त्यामध्ये 534 विशेष निमंत्रित आहेत.  त्यामध्ये उद्योग, क्रीडा, कला तसेच आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा समावेश आहे.तर महाराष्ट्रातील 355 साधू – संतांनाही अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी खास निमंत्रित करण्यात आलं आहे.

22 जानेवारीच्या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील कोणत्या विभागातून किती प्रतिष्ठित  निमंत्रीत?

महाराष्ट्रातून एकूण निमंत्रित –  889
महाराष्ट्रातून विशेष निमंत्रित – 534
कोकण – 397
पश्चिम महाराष्ट्र – 84
मराठवाडा (देवगिरी ) – 17
विदर्भ – 36
महाराष्ट्रातून निमंत्रित साधू संत – 355
त्यामध्ये कोकण – 74
पश्चिम महाराष्ट्र -124
मराठवाडा (देवगिरी) – 80
विदर्भ – 77

अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जोरदार तयारी सुरु आहे. येथे मोठ्या संख्येने भाविक दाखल होणार असल्याने प्रशासन आणि मंदिर ट्रस्टकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या



Source link

आमचा पक्ष लहान तरी आमचे अस्तित्व, महाराष्ट्रात आपला दम दाखवू; बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य

आमचा पक्ष लहान तरी आमचे अस्तित्व, महाराष्ट्रात आपला दम दाखवू; बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य


अमरावती : आमचे पक्ष जरी लहान असले तरी आमचे अस्तित्व आहे, असे म्हणत माजी मंत्री तथा आमदार बच्चू कडू (MLA Bacchu Kadu ) यांनी महायुतीतील पक्षाला देखील खडेबोल सुनावले आहेत. ‘महायुतीच्या बैठकीचा निरोप आज सकाळी वेळेवर आला. त्यामुळे मला जाणे जमले नाही, शिवाय मला बैठकीचे काय विषय आहेत, हे देखील माहीत नसतात. ते डायरेक्ट बैठकीला बोलावतात. सगळे आपल्यासोबत आहेत, हे गृहित धरून सध्या भाजपचे (BJP)  काम सुरू आहे. भाजपने इतर घटक पक्षांवर लक्ष ठेवले पाहिजे’, अशी नाराजी माजी मंत्री तथा आमदार  बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी उघडपणे बोलून दाखवली आहे. 

पक्ष मोठा झाला म्हणजे लहान पक्षांना विसरू नये

भाजपची भूमिका नेहमीच काम काढून घेण्याची राहिली आहे. पक्ष मोठा झाला म्हणजे लहान पक्षांना विसरू नये. प्रत्येकाने युतीधर्म पाळायला हवा. आम्ही त्यांना चांगल्या पद्धतीने सांगितलं पण ते जर उलटं घेत असतील तर, तो त्यांचा प्रश्न. आमचा पक्ष महाराष्ट्रात आहे. तरी जिल्हा नियोजन समिती असेल किंवा निराधार योजना असेल, या संदर्भात कुठली विचारणा होत नाही. याबाबत सगळेजण नाराज आहेत. पक्ष मोठा झाला म्हणजे लहान पक्षांना विसरू नये. कारण त्यांच्या शिवाय तुमचे काम पूर्ण होणार नाही. येत्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा देणार हे भाजपने स्पष्ट केले पाहिजे, असंही बच्चू कडू म्हणाले आहेत.

…तर देशात इतर पक्षांची कमतरता नाही

‘राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली असल्यास त्यांचे आम्ही स्वागत करू.  मुख्यमंत्र्यांमुळेच भाजपचं महाराष्ट्रात थोडं काही जमेल. मात्र या दौऱ्याला सुरुवात करण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधी घटक पक्षांची चर्चा करावी आणि मग महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात करायला हवी.’ अशी मागणी करतानाच राजकुमार पटेल आणि आम्ही वेगळे निर्णय घेणार नसून सोबत निर्णय घेऊ, असंही आमदार बच्चू कडू यांनी जाहीर केलं आहे. ‘मी मुख्यमंत्री किंवा इतर कुणाशीही जागा वाटपाबाबत बोलणार नाही. हे सोबतच्या दोन्ही पक्षाने ठरवावं की, लहान पक्षांना कशा पद्धतीने सोबत न्यावं. त्यांनी जर सोबत घेतलं नाही तर, देशात इतर पक्षांची कमतरता नाही’, असे देखील कडू म्हणाले. 

‘भाजपची भूमिका नेहमीच काम काढून घेण्याची’

‘भाजपची भूमिका नेहमीच काम काढून घेण्याची राहिली आहे. जागावाटप बाबत कुठल्याही प्रकारची चर्चा न करता पुढे जाण्याची त्यांची भूमिका असते, पण असे चुकीचे ठरेल. आम्ही त्यांना चांगल्या पद्धतीने सांगितलं पण ते जर उलटं घेत असतील, तर तो त्यांचा प्रश्न. विधानसभेच्या आम्ही 15 जागा मागू. तर लोकसभेत देखील आम्हाला आमदारांच्या तुलनेत जागा मिळाली पाहिजे. येणाऱ्या निवडणुकीत आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात आपला दम दाखवू’, असा विश्वास देखील बच्चू कडू यांनी बोलताना व्यक्त केला. 

महत्वाच्या इतर बातम्या : 



Source link

NCP विधायक जितेंद्र आव्हाड के खिलाफ 3 FIR दर्ज: भगवान राम को मांसाहारी बताया था, बाद में माफी मांगते हुए कहा- बोलते समय गलती हुई

NCP विधायक जितेंद्र आव्हाड के खिलाफ 3 FIR दर्ज: भगवान राम को मांसाहारी बताया था, बाद में माफी मांगते हुए कहा- बोलते समय गलती हुई


  • Hindi News
  • National
  • Bhagwan Ram Non Vegetarian; NCP MLA Jitendra Awhad Controversy | Sharad Pawar

पुणे4 दिन पहले

  • कॉपी लिंक

जितेंद्र आव्हाड शिर्डी में कार्यकर्ता सम्मेलन में बोल रहे थे। माफी मांगते हुए उन्होंने कुछ दस्तावेज भी पेश किए।

NCP (शरद गुट) के विधायक जितेंद्र आव्हाड के भगवान राम को मांसाहारी कहने पर विवाद थम नहीं रहा है। धार्मिक भावनाओं को ठेस पहुंचाने को लेकर उनके खिलाफ पुणे, शिर्डी और मुंबई में 3 अलग-अलग मामले दर्ज किए गए हैं। आव्हाड के खिलाफ भारतीय दंड संहिता की धारा 295 (ए) के तहत प्राथमिकी दर्ज की गई है।

हालांकि, आव्हाड ने राम पर दिए विवादित बयान को लेकर माफी मांग ली है। उन्होंने मीडिया से बात करते हुए कहा कि अगर किसी की भावनाओं को ठेस पहुंची हो तो मैं खेद व्यक्त करता हूं। वे चुनाव के लिए श्रीराम को ला रहे हैं, लेकिन हमारे राम हमारे दिलों में हैं।

आव्हाड ने कहा कि सच कितना भी कड़वा क्यों न हो, जन भावनाओं को ध्यान में रखकर मैं खेद व्यक्त कर रहा हूं, हमारे शरद पवार साहब ने हमें यही सिखाया है।

दरअसल, ​​​​​​आव्हाड ने धवार (3 जनवरी) को शिर्डी में पत्रकारों से कहा था, ‘राम हमारे हैं, बहुजनों के हैं। भगवान राम शिकार करके खाते थे। हम भी श्री राम के आदर्शों पर चल रहे हैं। राम को आदर्श बताकर लोगों पर शाकाहारी खाना थोपा जा रहा है।’

आव्हाड के बयान की बड़ी बातें..

  • इतिहास को विकृत करना मेरा काम नहीं है। लेकिन मैंने कल जो कहा वह बार-बार दोहराया गया। राम, भगवान श्रीराम, जिन्हें हम महाराष्ट्र में पांडुरंग हरि कहते हैं। उस राम के बारे में बात करते हुए मैंने कहा कि वह मांसाहारी थे।
  • जो लोग इसके विरोध में खड़े हैं उनकी जानकारी के लिए बता दूं कि वाल्मिकी रामायण में 6 कांड हैं। मैं अयोध्या कांड के 52वें श्लोक 102 का सर्ग आप खुद ही पढिएगा, मैं नहीं पढूंगा, क्योंकि मैं विवाद नहीं बढ़ाना चाहता।
  • मैंने बिना स्टडी के कोई टिप्पणी नहीं की है, लेकिन मैं कहता हूं, आजकल पढ़ाई नहीं, भावनाएं महत्वपूर्ण हैं। इस पर मैं कहूंगा- अगर कल के मेरे बयान से किसी की भावनाएं आहत हुई हों तो मुझे खेद है।
BJP कार्यकर्ताओं ने जितेंद्र आव्हाड के पोस्टर्स लेकर प्रदर्शन किया और मुर्दाबाद के नारे लगाए।

BJP कार्यकर्ताओं ने जितेंद्र आव्हाड के पोस्टर्स लेकर प्रदर्शन किया और मुर्दाबाद के नारे लगाए।

आव्हाड के घर के बाहर प्रदर्शन
जितेंद्र आव्हाड के बयान को लेकर बुधवार देर शाम जमकर हंगामा हुआ। अजित गुट के NCP कार्यकर्ताओं ने ठाणे स्थित आव्हाड के घर के बाहर विरोध-प्रदर्शन किया। वे जितेंद्र आव्हाड के घर पर भगवान राम की तस्वीर लेकर आरती करने पहुंचे थे। उन्होंने ‘जय श्री राम’ और ‘जितेंद्र आव्हाड मुर्दाबाद’ के नारे भी लगाए।

इस घटना के बाद जितेंद्र आव्हाड के घर के बाहर भारी संख्या में पुलिस तैनात की गई। हालांकि, विवाद यहीं खत्म नहीं हुआ। जैसे ही प्रदर्शनकारी वहां से गए, जितेंद्र आव्हाड के लोगों ने उस जगह को गोमुत्र से साफ किया।

क्या है पूरा मामला…
भाजपा विधायक राम कदम ने महाराष्ट्र सरकार से अपील की थी कि 22 जनवरी को अयोध्या में प्राण प्रतिष्ठा समारोह के दिन राज्य में शराब और मांसाहार पर एक दिन का बैन लगाया जाए। इसके बाद शिर्डी में 2 दिन के कार्यकर्ता सम्मेलन के दौरान आव्हाड का बयान आया।

आव्हाड बोले- अजित ने शरद को वनवास पर भेजा

इसके बाद जितेंद्र आव्हाड ने सोशल मीडिया प्लेटफॉर्म एक्स पर एक पोस्ट के जरिए अजित पवार पर हमला बोला। उन्होंने कहा- श्री राम ने अपने भाई भरत को राजगद्दी देने के लिए चौदह साल का वनवास स्वीकार किया था।लेकिन, भरत ने भगवान राम की चरण पादुका को सिंहासन पर रखकर शासन किया।

यहां पिता समान चाचा (शरद पवार) को घर से बाहर निकाल दिया और वनवास पर भेज दिया गया। भगवान राम अपने माता-पिता का सम्मान करते थे। आपके नेता (अजित पवार) माता-पिता का अपमान कर उन्हें घर से निकाल देते हैं।

सुप्रीम कोर्ट में शरद-अजित गुट की लड़ाई
शरद पवार ने विधानसभा स्पीकर राहुल नार्वेकर से NCP तोड़ने वाले अजित पवार और 8 विधायकों को अयोग्य घोषित करने की मांग की थी। स्पीकर ने इस मुद्दे पर सुनवाई नहीं की तो शरद गुट ने सुप्रीम कोर्ट का दरवाजा खटखटाए।

सुप्रीम कोर्ट ने इस याचिका को शिवसेना विधायकों के मामले के साथ जोड़ दिया था। अब दोनों मामलों की सुनवाई साथ में हो रही है। इसके अलावा अजित पवार ने NCP का सिंबल लेने के लिए चुनाव आयोग में याचिका भी दी थी। चुनाव आयोग ने अभी तय नहीं किया है कि पार्टी पर किसका अधिकार होगा।

ये खबरें भी पढ़ें…

अजित को CM को बनते देखना चाहती हैं उनकी मां:बोलीं- मेरे जिंदा रहते इच्छा पूरी हो जाए; पंचायत चुनाव में वोट डालने पहुंची थीं

अजित पवार के महाराष्ट्र का मुख्यमंत्री बनने की बात एक बार फिर सुर्खियों में है। दरअसल यह इच्छा उनकी 86 साल की मां आशा पवार ने मीडिया के सामने जताई है। आशा पवार, 5 नवंबर को महाराष्ट्र में हुए ग्राम पंचायत चुनाव में वोट डालने आई थीं।

आशा ने कहा कि- अब मेरा आखिरी समय ही है, इसलिए लगता है मेरे जिंदा रहते मेरा बेटा मुख्यमंत्री बने। लेकिन लोगों का कुछ कह नहीं सकते हैं। बारामती में सब हमारे ही हैं… वहां सब लोग अजित से प्रेम करते हैं। पूरी खबर यहां पढ़ें…

शिंदे V/S उद्धव… 11 महीने की कहानी:एकनाथ लापता हुए, बागियों के साथ सूरत में दिखे; उद्धव ने पद-बंगला छोड़ा, पार्टी हाथ से गई

महाराष्ट्र में पिछले साल जून में सियासी उठापटक शुरू हुई। 11 महीने चले इस सियासी ड्रामे का क्लाइमैक्स 11 मई 2023 को सुप्रीम कोर्ट में हुआ। सुप्रीम कोर्ट ने कहा कि उद्धव ठाकरे ने फ्लोर टेस्ट का सामना नहीं किया था। उन्होंने अपनी मर्जी से इस्तीफा दिया, ऐसे में कोर्ट पुरानी सरकार को बहाल नहीं कर सकता। महाराष्ट्र में सत्ता परिवर्तन की पूरी टाइमलाइन पढ़ें…

खबरें और भी हैं…



Source link

बच्चू कडू म्हणजे कुटुंबात हट्ट धरणारा मुलगा, ते महायुतीतून बाहेर पडणार नाहीत: चंद्रकांत पाटील

बच्चू कडू म्हणजे कुटुंबात हट्ट धरणारा मुलगा, ते महायुतीतून बाहेर पडणार नाहीत: चंद्रकांत पाटील


Chandrakant Patil On Bachchu Kadu :  महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) यांच्यामध्ये जागावाटपावर चर्चा सुरु आहे. अशातच प्रहार जनशक्‍ती पक्षाने (Prahar Janshakti Party) अमरावती मतदारसंघावर दावा ठोकलाय. आम्ही सध्या कुणाच्याही बाजूने नाही, असेही त्यांनी म्हटले. त्यामुळे बच्चू कडू (Bachchu Kadu) महायुतीमधून बाहेर पडणार का, अशी चर्चा सुरू झाली. मात्र, या चर्चेला भाजप नेते, राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी फेटाळून लावले आहे. बच्चू कडू कुटुंबात असलेल्या हट्टी मुलासारखे असल्याची टिप्पणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. 

आमदार बच्चू कडू हे नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहे. यावर मंत्री चंद्रकांत पाटील हे अमरावतीत दौऱ्यावर असतांना त्यांनी प्रतिक्रिया दिली. चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की, बच्चू कडू नाराज नाहीत, एखाद्या कुटुंबात जो मुलगा हट्ट करतो पण मुलगा शिस्ती बाहेर जाणार नाही. बच्चू कडू हे महायुतीतुन बाहेर पडणार नाही. विरोधक मनातले मांडे खात आहे असं त्यांनी म्हटले.  

मागील काही दिवसांपासून बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा आरक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्नावर सरकारवर नाराजीदेखील त्यांनी व्यक्त केली आहे. त्यानंतर आता अमरावती लोकसभा मतदारसंघावर दावा ठोकला आहे. 

बच्चू कडू काय म्हणाले होते?

बच्चू कडू यांनी बुधवारी एबीपी माझासोबत बोलताना म्हटले की, आम्ही सध्या कोणाच्याही (महायुती, महाविकास आघाडी) बाजूने नाही. काही मुद्दे आणि पक्षाच्या धोरणाप्रमाणे आम्ही आपली राजकीय भूमिका निश्चित करणार आहोत. मी कुणाच्या बाजूने हे कोडं आहे आणि ते व्यवस्थितपणे सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. प्रहारची राजकीय मजबुती जिथे होईल तिकडे आम्ही जाऊ, असे बच्चू कडू म्हणाले. हो मी राजकीय मोलभाव ( बार्गेनिंग ) करतो आहे आणि ते आम्ही व्यवस्थित करू. लोकसभाऐवजी आम्हाला विधानसभेत जास्त जागा हव्या आहेत, असेही बच्चू कडू म्हणाले.  

बच्चू कडूंची नवनीत राणांनाही ऑफर 

बच्चू कडू यांनी एबीपी माझाशी बोलताना अमरावती लोकसभा मतदारसंघावर दावा ठोकलाय. त्याशिवाय नवनीत राणा यांनाही ऑफर दिली आहे. ते म्हणाले की, अमरावतीमध्ये प्रहार पक्षाचे दोन आमदार आहेत. इतर पक्षाचे तेवढे नाहीत. म्हणून अमरावती लोकसभेची जागा प्रहारला मिळाली पाहिजे. एकतर अमरावतीची जागा प्रहारला मिळावी. नाहीतर नवनीत राणांनी प्रहारच्या तिकिटावर अमरावती लोकसभा निवडणूक लढवावी. त्यांच्याशी अजून कुठलीही चर्चा झालेली नाही. मात्र एबीपी माझाच्या माध्यमातून मी त्यांना ही ऑफर देत आहे.



Source link

बावनकुळेंकडून पहिला उमेदवार जाहीर, राणांकडून आभार, नवनीत राणा कोणत्या पक्षाकडून लढणार?

बावनकुळेंकडून पहिला उमेदवार जाहीर, राणांकडून आभार, नवनीत राणा कोणत्या पक्षाकडून लढणार?


अमरावती : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी एबीपी माझाच्या ‘झीरो अवर’ या कार्यक्रमात नवनीत राणा (Navneet Rana) यांना उमेदवारी जाहीर केली. यावर नवनीत राणा यांनी ‘एबीपी माझा’शी संवाद साधताना प्रतिक्रिया दिलीये. मी आणि रवी राणा (Ravi Rana) निवडून आल्यापासून मोदींच्या सोबत आहोत आणी मोदी आमच्यासोबत आहेत. मी बावनकुळेंचे आभार मानते. जे लोक सध्या म्हणतायत की, नवनीत राणा आमच्याकडून लढल्या पाहिजे त्याचे कारण म्हणजे आमची कामं. आता देखील देवेंद्र फडणवीस बावनकुळे आणि आम्ही मिळून अमरावतीचा विकास करु. त्यामुळे नवनीत राणा या आता भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित झाल्याचंं म्हटलं जातंय. 

नवनीच राणा यांनी यावेळी बोलताना बच्चू कडू यांना देखील उत्तर देत त्यांचे आभार मानले. बच्चू कडूंचे मी आभार मानते की त्यांनी स्विकारलं अमरावतीचा विकास फक्त नवनीत राणाच करु शकते. पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, 2014 मध्ये लहर होती, 2019 मध्ये त्सुनामी होती पण 2024 मध्ये डबल त्सुनामी मोदींची येणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलं. 

बावनकुळेंकडून उमेदवार जाहीर

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी महायुतीचा पहिला उमेदवार जाहीर केला आहे. अमरावतीमधून बावनकुळे यांनी अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ‘एबीपी माझा’च्या ‘झिरो अवर’ या कार्यक्रमात बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी ही घोषणा केली.

बच्चू कडूंची नवनीत राणांना ऑफर

बच्चू कडू यांनी एबीपी माझाशी संवाद साधताना अमरावती लोकसभा मतदारसंघावर दावा केलाय. त्याशिवाय नवनीत राणा यांनाही ऑफर त्यांनी दिलीये. ते म्हणाले की, अमरावतीमध्ये प्रहार पक्षाचे दोन आमदार आहेत. इतर पक्षाचे तेवढे नाहीत. म्हणून अमरावती लोकसभेची जागा प्रहारला मिळाली पाहिजे. एकतर अमरावतीची जागा प्रहारला मिळावी. नाहीतर नवनीत राणांनी प्रहारच्या तिकिटावर अमरावती लोकसभा निवडणूक लढवावी. त्यांच्याशी अजून कुठलीही चर्चा झालेली नाही. मात्र एबीपी माझाच्या माध्यमातून मी त्यांना ही ऑफर देत आहे.  

नवनीत राणा कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवणार?

नवनीत राणा यांनी दिलेल्या या प्रतिक्रियेमुळे नवनीत राणा या भाजपच्या कमळावरच निवडणूक लढवणार असल्याचं जवळपास निश्चित झाल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे आता भाजप पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार आणि नवनीत राणा त्यावर ठाम राहणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 

हेही वाचा : 

Lok Sabha Election 2024 : Exclusive : महायुतीचा पहिला उमेदवार जाहीर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा



Source link

संत्रा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात; संतप्त बळीराजानं रस्त्यावर संत्रे फेकून केला चक्काजाम

संत्रा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात; संतप्त बळीराजानं रस्त्यावर संत्रे फेकून केला चक्काजाम



Amravati News : संत्रा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात; संतप्त बळीराजानं रस्त्यावर संत्रे फेकून केला चक्काजाम



Source link

YouTube
Instagram
WhatsApp