‘स्वाभिमानीचा नारा सातबारा कोरा’, नवीन वर्षात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा नवा नारा

‘स्वाभिमानीचा नारा सातबारा कोरा’, नवीन वर्षात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा नवा नारा


Swabhimani Shetkari Saghtana : स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Saghtana) सातत्यानं शेतकऱ्यांच्या संदर्भातील महत्वाचे प्रश्न घेऊन लढत आहे. नवीन वर्षात स्वाभिमानी शेतकरी संघटेनं आता नवा नारा देणार आहे.  1 जानेवारीपासून महाराष्ट्रात ‘स्वाभिमानीचा नारा सातबारा कोरा’ हे नवीन अभियाने  स्वाभिमानी शेतकरी संघटना नवीन वर्षापासून राबवणार आहे. शेतकऱ्यांनी शेतीवर घेतलेलं सर्व प्रकारचे कर्ज माफ करुन त्यांचा सातबारा कर्जमुक्त करावा, यासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली युवक प्रदेशाध्यक्ष दामोदर इंगोले यांच्या संयोजनात स्वाभिमानीचा नारा कर्जमुक्त सातबारा अभियान  राज्यातील गावागावात राबवण्यात येणार आहे.

सोयाबीन कापूस दर वाढीची मागणी

नवीन वर्षापासून स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वाभिमानीचा नारा कर्जमुक्त सातबारा अभियान हे अभियान राबवणार आहे. 2013 मध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही संकल्पणा राबवून सोयाबीन कापूस दर वाढीची मागणी केली होती. आता त्यांना त्याप्रमाणे दर द्यावे अशी मागणी देखील यावेळी करण्यात येणार आहे. या अभियानाची सुरुवात 1 जानेवारी 2024 रोजी करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष  दामोदर इंगोले यांनी सांगितलं.

आगामी लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याचा स्वाभिमानीचा निर्णय

आगामी लोकसभा निवडणूक (Loksabha Election) स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी घेतला आहे. कोल्हापूरसह (Kolhapur Loksabha) सहा जागांवर लक्ष केंद्रित केलं असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीने देखील आम्हाला फसवलं आहे, त्यामुळे आम्ही स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्याचा निर्णय आधीच जाहीर केला असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. 

शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडीची स्थापना झाली. मात्र, महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या कालावधीत अनेक निर्णय शेतकरीविरोधी घेतले गेले. ऊसाच्या एफआरपीचे तुकडे केले. भूमी अधिग्रहण विधेयकात बदल करण्याचे काम महाविकास आघाडीच्या काळात झाले. यानंतर शरद पवारांना सात पानी पत्र लिहिलं होतं, पण उत्तर मिळाले नाही. त्यामुळे अडीच वर्षांपूर्वीच आम्ही निर्णय घेतला होता.  ते पुढे म्हणाले की, भाजपने छोटे मोठे सगळेच पक्ष संपवण्याचा विडा उचलला आहे. शेतकऱ्यांची नावे घेऊन फसवलं. त्यामुळे स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहे. मतदारांना योग्य वाटल्यास मदत करतील. चळवळ सुरु राहिलं.

महत्वाच्या बातम्या:

Raju Shetti : महाविकास आघाडी आणि महायुतीने देखील आम्हाला फसवलं; राजू शेट्टींनी कोल्हापूरसह सहा जागांवर शड्डू ठोकला!



Source link

दादांनी तुम्हाला लोकसभेच्या तोंडावर कामाला लावले; अमोल मिटकारींचे अमोल कोल्हेंना प्रत्युत्तर

दादांनी तुम्हाला लोकसभेच्या तोंडावर कामाला लावले; अमोल मिटकारींचे अमोल कोल्हेंना प्रत्युत्तर


अकोला : शरद पवार गटात असलेले राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात गेल्या काही दिवसांपासून कलगीतुरा रंगल्याचं पहायला मिळत आहे. दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर टीकाटिपणी होत आहे. आता या वादात राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी उडी घेत अमोल कोल्हेंच्या अजित पवारांवरील टिकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. अजितदादांवर टीका करणाऱ्या खासदार कोल्हेंनी थोडे बारामती आणि काटेवाडीत चक्कर मारून पाहावं. मग त्यांना अजितदादांचा विकास दिसेल. कोण सर्कशीतला आणि कोण जंगलातला हे दिल्लीपासून गल्लीपर्यंत साऱ्यांना ठाऊक आहे. तेव्हा कृपा करून दादांवर बोलताना थोडं सबुरीने घ्या. अजितदादांमुळेच सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हेना संघर्ष यात्रा काढावी लागलीये. अजितदादांनी या दोघांनाही कामाला लावलं असल्याचा टोला देखील यावेळी आमदार अमोल मिटकरी यांनी लगावला. 

देशात विकासाचा वादा अजित दादा – अमोल मिटकरी

कोल्हे साहेब आपल्यासारख्या अतिसामान्य माणसाला शिरूरमध्ये निवडणूक लढवायला लावले. तिथे वाघ बनवणाऱ्या अजित दादांवर ज्यावेळेस काटेवाडी मध्ये जाऊन तुम्ही सर्कशीतील वाघाशी त्यांची तुलना करण्याचा प्रयत्न करत आहात. तेव्हा खरंच आपल्या उत्तुंग व्यक्तिमत्व आणि उत्तुंग बुद्धिमत्तेवर मला हसावसं वाटतंय. ज्या काठेवाडीत तुम्ही उभे आहात त्या सुनेत्रा वहिनी पवार यांनी त्या काटेवाडीचे नेतृत्व केलं आहे. जाताना जरा बारामतीचे नवीन एसटी स्टँड पण बघा. कोण सर्कशीतलं, कोण जंगलातील वाघ आहे. दिल्लीपासून महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीला माहित आहे. या देशात विकासाचा वादा अजित दादा आहेत.” या शब्दात मिटकरी यांनी खासदार कोल्हेंना ठणकावले आहे.

दादांनी तुम्हाला कामाला लावलंय 

चार वर्षे आपण शिरूर लोकसभा मतदारसंघात कधीच प्रगट झाला नाहीत. पण आपल्याला आणि सन्माननीय वंदनीय सुप्रिया ताईंना दोन्ही खासदारांना मिळून जर संघर्ष यात्रा काढावी लागत असेल आणि लोकसभेच्या तोंडावर इतकं पळ-पळ पळावे लागत असेल, तर हेच दादाच वेगळेपण आहे. दादांनी तुम्हाला कामाला लावलंय. तेव्हा कृपा करून दादांवर बोलताना थोडं सबुरीने घ्या. बोलतांना जरा सांभाळून बोला. नाहीतर आपल्या बाबतीत महाराष्ट्राचा तरुण जो विचार करत आहेत, तुम्ही दादांवर जर अशा पद्धतीने बोलाल तर राज्यातील तरुण कदाचित हे खपवून घेणार नाही. बारामतीमधील लोकं फार हुशार आहेत. त्यांना हे सगळं माहीत आहे की, येणाऱ्या काळात काय केलं पाहिजे. अजितदादा हाच विकासाचा वादा आहेत. त्यामुळे तुम्ही त्यांच्याशी बरोबरी करण्याचा प्रयत्न करू नका. असा सल्लाही मिटकरी यांनी अमोल कोल्हेंना दिला. 

हेही वाचा : 



Source link

Radheshyam Mopalwar : मुख्यमंत्री वॉर रुमचे महासंचालक राधेश्याम मोपलवार यांचा राजीनामा

Radheshyam Mopalwar : मुख्यमंत्री वॉर रुमचे महासंचालक राधेश्याम मोपलवार यांचा राजीनामा


मुंबई माजी सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार (Radheshyam Mopalwar) यांनी मुख्यमंत्री वॉर रुमच्या (War Room)  महासंचालकपदाचा राजीनामा दिला आहे. लवकरच ते राजकारणात देखील एन्ट्री करतील अशी चर्चा रंगू लागली आहे.जर ते राजकारणात आले तर राजकारणात येणारे राधेश्याम मोपलवार हे एकमेव अधिकारी नसतील तर याआधीही अनेक अधिकाऱ्यांनी राजकारणात आपले नशीब आजमावले आणि ते यशस्वीही झाले आहेत.

 देशभर सध्या लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. सर्वच पक्ष आता आपले उमेदवार निश्चित करू लागलेत. त्यातच आता राधेश्याम मोपलवार हे देखील राजकारणात एन्ट्री करतील अशी चर्चा जोरदार रंगली आहे. मुख्यमंत्री वॉर रुमच्या महासंचालकपदाचा राजीनामा दिल्यानंतर ही चर्चा अधिकच रंगू लागलीय.  मोपलवार हिंगोली किंवा नांदेड -लोकसभा मतदारसंघातून ते भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढतील असा अंदाज व्यक्त केला जातोय. राधेश्याम मोपलवार यांच्या बाबत ज्या चर्चा रंगल्या तसे झाले तर आजवर ज्या अधिकाऱ्यांनी राजकारणात प्रवेश केला त्यांच्या यादीत मोपलवार असणार आहे.

कोणत्या अधिकाऱ्यांची राजकारणात एन्ट्री? 

  • श्रीनिवास पाटील –  शरद पवारांचे खास मित्र माजी सनदी अधिकारी जिल्हाधिकारी आणि अनेक महत्त्वपूर्ण पदांवर काम केले असून, त्यांनी सातारा लोकसभेची पोटनिवडणूक जिंकली. 
  • प्रताप दिघावकर – माजी पोलीस अधिकारी प्रताप दिघावकर यांनी ऑगस्ट 2023 मध्ये भाजपात प्रवेश केला असून, ते  धुळे लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जातेय..
  • प्रदीप शर्मा – इन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असलेल्या प्रदीप शर्मा यांनी 2019 मध्ये शिवसेना पक्षाकडून नालासोपारा विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला होता. 
  • अभिमन्यू पवार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक राहिलेले अभिमन्यू पवार यांनी 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीतून राजकारणात एन्ट्री झाली. ते औसा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेले आहेत.
  • श्रीकांत भारतीय – देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी ओएसडी म्हणून काम पाहिले होते. आता ते भाजपचे विधान परिषदेचे आमदार आहेत
  • सुमित वानखेडे – देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव राहिलेल्या सुमित वानखेडे यांच्यावर सध्या वर्धा लोकसभा मतदार संघाचे निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आर्वी विधानसभा मतदार संघातून विधान सभेसाठी त्यांनी तयारी देखील सुरू केलीय.

अलीकडच्या काळात अधिकारी वर्गाला राजकीय क्षेत्राची भुरळ पडत असल्याचं दिसून आलं आहे. जशी अधिकाऱ्यांना निवडणुकीच्या राजकारणाबाबत जवळीक वाटू लागली आहे तशीच नेत्यांनाही अधिकाऱ्यांच्या राजकीय प्रवेशाने मदतच होत असल्याचं चित्र आहे. अनेक अधिकारी राजकारणात आल्यानंतर त्यांची महत्त्वाच्या पदांवर लागलेली वर्णी आणि त्यातून नेत्यांची घट्ट झालेली पकड असे अनेक कंगोरे यामागे दडलेले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री वॉर रुमच्या महासंचालकपदाचा राजीनामा दिलेले मोपलवार आता राजकारणात कधी एन्ट्री करणार हे पाहणं महत्वाचे ठरेल.

हे ही वाचा :

राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष राजीनामा देण्याच्या तयारीत; कामकाजात दोन मंत्री, न्यायमूर्ती दिलीप भोसले हस्तक्षेप करत असल्याचा आरोप



Source link

मी जळगावला नोकरी करायचे, बाळासाहेबांभोवती गराडा असायचा, अंजली -प्रकाश आंबेडकरांची हटके लवस्टोरी

मी जळगावला नोकरी करायचे, बाळासाहेबांभोवती गराडा असायचा, अंजली -प्रकाश आंबेडकरांची हटके लवस्टोरी


Prakash Ambedkar : मी जळगावला नोकरी करायचे, बाळासाहेबांभोवती गराडा असायचा, भेट व्हायची नाही. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या पत्नी अंजली आंबडेकर यांच्या हटके लवस्टोरीची गोष्ट एका मुलाखतीदरम्यान अंजली आंबेडकर यांनी  सांगितली आहे. अभिनेते संदीप कुलकर्णी आणि दिग्दर्शक निलेश जळमकर यांनी प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)  आणि अंजली आंबेडकर (Anjali Ambedkar) यांची एकत्रितपणे मुलाखत घेतली. यावेळी अंजली आंबेडकरांनी त्यांच्या लवस्टोरीबाबत अनेक खुलासे केले आहेत. यावेळी प्रकाश आंबेडकर आणि प्रा. अंजली आंबेडकरांसह सुजात आ़ंबेडकरांनी अनेक राजकीय गौप्यस्फोट केलेय. 

प्रश्न : सावित्रीसारखाच संघर्ष तुमच्या आयुष्यात आला का?

अंजली आंबेडकर (Anjali Ambedkar)  : आमच्या लग्नामुळे मला आंबेडकरी चळवळीचा भाग होता आलं याचं फार मोठं समाधान आणि आनंद

प्रश्न : या महाराष्ट्राला आतापर्यंत महिला मुख्यमंत्री का मिळाली नाही. वंचितला सत्ता मिळाली तर तो चेहरा कोण असेल?. 

अंजली आंबेडकर : ज्या दिवशी वंचित घटकातील महिला मुख्यमंत्री बनेल तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वांत आनंदाचा दिवस. (लोकांमधून अंजली आंबेडकरांचं नाव) 

प्रश्न : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू असुनही एव्हढं साधं कसं वागता? 

प्रकाश आंबेडकर : यासंदर्भात लोकांचा दृष्टीकोन बदलणं आवश्यक आहे. मी वेगळा आहे हे वाटणं हे कृत्रिम जगणं.

प्रश्न : सध्या दहशतीचे वातावरण असतांना एक व्यक्तीच बोलत असतो. कोणतीही सुरक्षा नसते. 

प्रकाश आंबेडकर: तुमचं म्हणणं प्रामाणिक असेल. कोणता हेतू नसेल तर विरोधकही तुम्हाला स्विकारतात. मी स्वायत्त. माझा राजा मीच. नियम पाळणं हे मला जगण्यापुरते बाकी माझा राजा मीच. आपण स्पष्ट असलो तर कुणाचीच भिती बाळगण्याची गरज नाही. कलबुर्गी, दाभोळकर त्यांना जे वाटतं ते मांडायचे. शेवटी कुणाला पटत नाही म्हणून मांडणं थांबवायचे का?. शेवटी समाजामध्ये आपल्याला जे घडवावे वाटते ते घडवले पाहिजे. त्यासाठी किंमत मोजायलाही तयार असलं पाहिजे. त्यामुळे आपण लढत रहायचं हे ठरवलं.

प्रश्न : राज्यसभेचा खासदार म्हणून संसदेची पहिली पायरी चढतांना मनात काय भावना होती?. 

प्रकाश आंबेडकर : मी जेंव्हा संसदेमध्ये पाऊल ठेवणार होतो, तेंव्हा चालत गेलो. तेंव्हा संसदेची स्वत:ची सुरक्षा व्यवस्था होती. त्यांनी गेल्याबरोबर सुरक्षा रक्षकांनी स्वागत केल्यानं अवाक झालो. एक इतिहास समोर न्यावा लागेल अशी भावना होती. राज्यसभेच्या कार्पेटचा रंग लाल असल्याने त्याला लाल बावटा म्हणायचो. लोकसभेचा रंग हा हिरवा असल्याने तिथे जातांना ते नैसर्गिक अधिवासात आल्यासारखं वाटलं.

प्रश्न : संविधान योग्य लोकांच्या हाती आहे का?. सत्ताधारी-विरोधकांच्या भूमिकेबद्दल काय वाटतं. 

प्रकाश आंबेडकर : दोघांचाही कामाबद्दल खुश नाही. दोघांमधील रेष पुसट. ही रेष कॉम्परमाईज झाल्यासारखं वाटतं.

प्रश्न : संविधान धोक्यात आहे का? 

प्रकाश आंबेडकर  : 1950 साली ज्या संघटनांनी संविधान मानत नाही, अशी भूमिका घेतली त्या संघटना आजही कार्यरत. त्यांच्यामध्ये परिवर्तन झालं का?. सरदार पटेलांनी जी भिती व्यक्त केली ती भिती आजही आहे.  जरांगेंचं उपोषण सोडवायला न्यायधीश जात असेल हे वेगळे प्रकरण. ते समुहाचे प्रश्न घेऊन उपोषणाला बसले होते.

बाळासाहेबांच्या कुटुंबाचा संघर्ष?  (Prakash Ambedkar)

प्रकाश आंबेडकर   : माझे वडील, काका कधी दहावी पास झाले नाहीत. बाबासाहेबांच्या आंदोलनामुळे त्यांना अभ्यासाला कदाचित वेळ मिळाला नव्हता.

प्रश्न : एकत्र कुठला सिनेमा पाहिला. 

अंजली आंबेडकर (Anjali Ambedkar) : तो आठवत नाही. दोघांनीही मात्र शर्मिला टागोरचा एकही सिनेमा चुकवला नाही.

प्रश्न : घरात भांडणं होतात का?

अंजली आंबेडकर : टूटपेस्टची कॅप का लावली नाही येथपासून तर वंचितच्या निर्णयापर्यंत अनेक विषयांवर आम्ही भांडतो. अनेकदा सुजात आणि बाळासाहेबांमध्ये मुद्द्यांवर भांडणं होतात. ती अर्ध्या तासापेक्षा जास्त नसते.

प्रकाश आंबेडकर आणि अंजली आंबेडकर यांच्या मुलाखतीचा संपूर्ण व्हिडिओ 

इतर महत्वाच्या बातम्या 

लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येऊ शकतात, आमदार संजय शिरसाटांचा मोठा दावा



Source link

Sujat Ambedkar : बोहल्यावर कधी चढणार? सुजात आंबेडकरांनी दिले सूचक उत्तर 

Sujat Ambedkar : बोहल्यावर कधी चढणार? सुजात आंबेडकरांनी दिले सूचक उत्तर 


Sujat Ambedkar : राजकारणातील युवा नेत्यांच्या लाईफ स्टाईलची महाराष्ट्रात नेहमी चर्चा असते. तेवढीचं चर्चा ते लग्न कधी उरकणार यावरही होत असते. यापूर्वी शिवसेना नेते (उ.बा.ठा) आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या लग्नाबाबतच्या चर्चा रंगत होत्या. सध्या वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. अभिनेते संदीप कुलकर्णी आणि दिग्दर्शक निलेश जळमकर यांनी वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांची मुलाखत घेतली. या मुलाखतीवेळी प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या पत्नी अंजली आंबेडकरही उपस्थित होत्या. यावेळी सुजात आंबेडकर यांनी त्यांच्या लग्नाबाबत भाष्य केले आहे. 

 काय म्हणाले सुजात आंबेडकर?

वर्ष 2024 मध्ये सुजातसाठी ‘यंदा कर्तव्य आहे’ का? असा प्रश्न या मुलाखतीदरम्यान विचारण्यात आला होता.  या प्रश्नाला सुजात यांनी सूचक उत्तर दिले आहे. सुजात आंबेडकर म्हणाले, ” माझ्यासमोर पहिलं कर्तव्य अकोला लोकसभेचं आहे. 
माझ्या प्रत्येक प्रश्नाचं न थकता आतापर्यंत आई-बाबांनी उत्तरं दिलीत. त्यामुळेच मी घडू शकलो.” सुजात आंबेडकरांनी लग्नापेक्षा लोकसभा निवडणुकीला महत्व देण्याचा निर्णय घेतला आहे. 

प्रकाश आंबेडकरांशी विवाह झाल्यामुळे आंबेडकरी चळवळीचा भाग होता आले : अंजली आंबेडकर (Anjali Ambedkar)

प्रकाश आंबेडकरांनी दिलेल्या मुलाखती दरम्यान, त्यांच्या पत्नी अंजली आंबेडकर यांनीही अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. अंजली आबेडकर (Anjali Ambedkar) या वेळी बोलताना म्हणाल्या, आमच्या लग्नामुळे मला आंबेडकरी चळवळीचा भाग होता आले याचे समाधान आहे. शिवाय, मी त्यामुळेच आनंदी असते. ‘वंचित’ला सत्ता मिळाली तर मुख्यमंत्री कोण बनेल? असा सवाल अंजली आंबेडकरांना विचारण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर देताना अंजली आंबेडकर म्हणाल्या, “ज्या दिवशी वंचित घटकातील महिला मुख्यमंत्री बनेल तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वांत आनंदाचा दिवस असेल” कलबुर्गी, पानसरे, दाभोळकर यांची हत्या झाल्यानंतर आम्हाला सुरक्षेबाबत चिंता वाटायची. आपण सुरक्षा घ्यावी, असा प्रस्ताव आम्ही प्रकाश आंबेडकर यांच्यासमोर ठेवला होता. मात्र, प्रकाश आंबेडकरांनी हा प्रस्ताव फेटाळला होता, असे अंजली आंबेडकर म्हणाल्या आहेत. 

 राज्यसभेच्या कार्पेटचा रंग लाल असल्याने त्याला लाल बावटा म्हणायचो : प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)

अभिनेते संदीप कुलकर्णी आणि दिग्दर्शक निलेश जळमकर यांना अकोल्यात दिलेल्या मुलाखतीत वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले आहे.  “मी जेव्हा संसदेमध्ये पाऊल ठेवणार होतो, तेव्हा चालत गेलो होतो. तेव्हा संसदेची एक वेगळी सुरक्षा व्यवस्था होती. तिथे गेल्यानंतर सुरक्षारक्षकांनी स्वागत केले. त्यामुळे मी अवाक् झालो होतो. राज्यसभेच्या कार्पेटचा रंग लाल होता, त्यामुळे मी त्याला लाल बावटा म्हणायचो. लोकसभेचा रंग हा हिरवा असल्याने तिथे जातांना ते नैसर्गिक अधिवासात आल्यासारखं वाटलं”, असा खुलासा प्रकाश आंबेडकरांनी केला. 

काही गोष्टी सिक्रेट राहिल्या तर चांगल्या : प्रकाश आंबेडकर  (Prakash Ambedkar)

प्रकाश आंबेडकर आणि अंजली आंबेडकरांचा विवाह कसा झाला? याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. याला प्रश्नाचे उत्तर देण्याचे प्रकाश आंबेडकरांनी टाळले आहे. काही गोष्टी सिक्रेट राहिल्या तर चांगल्या असतात, असे उत्तर आंबेडकरांनी दिले. तर अंजली आंबेडकरांनी या प्रश्नाचे दिलखुलासपणे उत्तर दिले आहे. अंजली आंबेडकर याबाबत बोलताना म्हणाल्या, आमचा विवाह म्हणजे काही मित्रांनी जमवून दिलेला प्रेमविवाह आहे. आमची पहिली भेट भारिपच्या एका सार्वजनिक कार्यक्रमात झाली. तेव्हाही बाळासाहेब प्रसिद्ध होते. आम्ही अनेकदा ट्रेनमध्ये प्रवास करत भेटत होतो. त्या काळात मी जळगावमध्ये नोकरी करत होते. 

इतर महत्वाच्या बातम्या

Sharad Pawar Meet Bachchu Kadu : शरद पवार आणि बच्चू कडू यांच्यात झाली भेट; नेमकी काय झाली चर्चा ?

 

 



Source link

Akola : कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमात शेतकरी भडकला

Akola : कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमात शेतकरी भडकला



<p>Akola : कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमात शेतकरी भडकला अकोल्यात देवेंद्र फडणवीस कृषी विद्यापीठाच्या तीन दिवसीय कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यासाठी आले होते. यावेळी भाषणात भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांनी या सरकारनं शेतकर्यांना सरसकट 50 हजार रूपये दिल्याचं म्हटलं. यानंतर उपस्थितांमधून एक शेतकरी उठून उभा राहिला. आपल्यासह अनेकांना हा लाभ मिळाला नसल्याचा दावा केला. काही भाजप कार्यकर्त्यांनी त्याला शिवीगाळ करीत खाली बसवलं. या शेतकऱ्यांचा उल्लेख फडणवीस यांनी आपल्या भाषणातही केला. कार्यक्रम झाल्यानंतर या शेतकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. रामू दामोदर केंद्रे असं या शेतकर्यांचे नाव आहेय. तो वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालूक्यातल्या केळी गावाचा रहिवाशी आहे. या शेतकर्यावर काहीच कारवाई करू नये यासाठी पोलीस अधिक्षकांना विनंती करणार असल्याचं आमदार अमोल मिटकरींनी म्हटलंय.</p>



Source link

YouTube
Instagram
WhatsApp