अकोल्यात पोलीस कर्मचाऱ्यानंच केला सहकाऱ्याच्या पत्नीवर अत्याचार, आरोपी शिवम दुबेवर गुन्हा दाखल

अकोल्यात पोलीस कर्मचाऱ्यानंच केला सहकाऱ्याच्या पत्नीवर अत्याचार, आरोपी शिवम दुबेवर गुन्हा दाखल


अकोला : अकोल्यात पोलीस शिपायाने आपल्याच सहकारी मित्राच्या पत्नीवर बलात्कार केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवम दुबे असं या आरोपी पोलीस शिपायाचं नाव आहे. तो स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत आहे. अकोट शहर पोलिसांत याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. सहकारी मित्राच्या पत्नीसोबत फेसबुकवरून मैत्री करीत त्याने तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप पोलीस तक्रारीत करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यावर (Akola Police Rape Case) शिवम दुबे फरार झाला आहे.

‘सद्रक्षणाय, खलनिग्रहनाय’ असं ब्रीद असलेल्या पोलीस दलांत अकोल्यात अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यानं आपल्याच पोलीस सहकाऱ्याच्या पत्नीवर बलात्कार केल्याच्या आरोपानं खळबळ उडाली आहे. यासोबतच पीडितेला आरोपी पोलिसानं सातत्याने ब्लॅकमेल देखील केल्याचं देखील समोर आलं आहे. शिवम दुबे असं या पोलीस पोलीस शिपायाचं नाव असून असा तो स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत आहे. 

फेसबुकवर मैत्री आणि ओळख (Akola Police Rape Case) 

आधी शिवमनं पीड़ित महिलेशी फेसबुकवर मैत्री केली. नंतर मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. याच ओळख अन प्रेमाचा फायदा घेत तिच्यावर अनेकदा अतिप्रसंग केल्याच तक्रारीत नमूद आहे. दीर्घ काळानंतर आरोपी ब्लॅकमेल करायला लागल्यानं पिडीत महिलेने अकोट शहर पोलिसांत याप्रकरणी तक्रार केली. यानंतर आरोपी दुबेवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनं अकोला पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. 

शिवम दुबेनं केला मैत्री आणि मित्राचा विश्वासघात 

अकोला शहरातील रामदासपेठ पोलीस ठाण्यात मागील वर्षी शिवम दुबे हा कार्यरत होता, यादरम्यान त्याची सोबतच्या एका पोलीस कर्मचाऱ्यांशी चांगली मैत्री झाली. यातूनच शिवमचं ‘त्या’ मित्र झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी येणं-जाणं सुरू झालं. याचदरम्यान त्याची वाईट नजर मित्राच्या पत्नीवर पडली. शिवमनं आपल्या या मित्राच्या पत्नीला ‘फेसबुक’वर ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ पाठवली. तिने ती स्वीकारल्यानंतर दोघांमध्ये बोलणं सुरू झालं. 

त्यानंतर शिवम आणि तिच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. यातच शिवमने तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. कालांतरानं शिवमनं मित्राच्या पत्नीला म्हणजेच पीडित महिलेला ब्लॅकमेल करणं सुरू केलं. तिने मोठ्या हिमतीने हा प्रकार पतीला सांगितला आणि लागलीच आकोट शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. या तक्रारीवरून शिवमवर आकोट शहर पोलीस ठाण्यात 526/2023 कलम 354, 354 (अ), 354 (ड), 376(1) (ए), 376(2) (एन), 376 (3) या कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आलेत. या प्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरिक्षक योगिता ठाकरे करीत आहेत.

पीडितेवर अकोला-अमरावतीत केलेत अत्याचार 

तक्रारीत सर्व घटनाक्रम नमूद करण्यात आला आहे. शिवमनं पीड़ित महिलेसोबत फेसबुकदवारे मैत्री संपादन करून प्रेमसंबंध केले. त्यातून शारिरीक संबंध ठेवून भाबडेपणाचा फायदा घेत ब्लॅकमेल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तिच्या इच्छेविरुद्ध आरोपीने दोन ते तीनदा शारिरीक संबंध केले अशा तक्रारीवरुन सदरचा गुन्हा दाखल झाला आहे. 

दरम्यान शिवमनं पंडित विवाहित महिलेवर तिच्या राहत्या घरी तसेच अमरावती येथे नेऊन वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले आहे. तसेच रामदास पेठ पोलीस स्टेशन हद्दीत देखील पीडित महिलेवर शिवमनं इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले होते. दरम्यान अकोट पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर शिवम हा फरार झाला असून आरोपी पोलीस कर्मचाऱ्याचा पोलीस शोध घेत आहेत.

अद्याप आरोपी पोलीस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आलेली नाहीय. आरोपी पोलीस खात्यात असल्याने पोलीस दलाचे बदनामी होत असल्याने पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणावर मौन बाळगलं आहे. या प्रकरणाची अकोल्याच्या पोलीस दलात मोठी चर्चा असून यावरून मोठी खळबळ उडाली आहे. 

ही बातमी वाचा: 

 



Source link

Amravati Accident  : अमरावतीत एका कुटुंबातील सहाजणांना कारची धडक देऊन उडवले

Amravati Accident  : अमरावतीत एका कुटुंबातील सहाजणांना कारची धडक देऊन उडवले



<p>Amravati Accident &nbsp;: अमरावतीत एका कुटुंबातील सहाजणांना कारची धडक देऊन उडवले<br />अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील नाचोना गावात एका कुटुंबांतील सहा जणांना कारने उडवल्याची घटना घडलीय.. पूर्ववैमनस्यातून रागाच्या भरात कुटुंबातील सहा सदस्यांचा अंगावर कार घातली..कारच्या या धडकेत तिघांना जागीच मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी आहेत. धक्कादायक म्हणजे तीन जणांची कारनं हत्या करून आरोपी कार घेऊन तिथून निघून गेला. त्यानंतर मृतांचे नातेवाईक तिथं जमा झाले. त्यांना रुग्णालयात नेताना आरोपी पुन्हा कार घेऊन आला, आणि तीन नातेवाईकांवरही गाडी घातली, यात हे तिघं गंभीर जखमी झाले. कार अनेकदा पुढे-मागे करत आरोपीनं वारंवार त्यांच्यावर हल्ला केला. दरम्यान आरोपी नाचोना गावातच अवैधरित्या दारूचा व्यवसाय करत असल्याची माहिती समोर येतेय.&nbsp;</p>



Source link

एकाच कुटुंबातील सहा जणांना कारने उडवले, तिघांचा मृत्यू; पूर्ववैमनस्यातून घटना घडल्याचा आरोप

एकाच कुटुंबातील सहा जणांना कारने उडवले, तिघांचा मृत्यू; पूर्ववैमनस्यातून घटना घडल्याचा आरोप


Amravati Crime News :  अमरावती जिल्ह्यातील (Amaravati) दर्यापूर तालुक्यातील (Daryapur) नाचोना गावात (Nachona Village) धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कुटुंबांतील सहा सदस्यांना चारचाकी वाहनाने उडवले. या घटनेत तीन जण जागीच ठार झाले असून तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना पूर्ववैमनस्यातून घडली असल्याचा आरोप करण्यात येत आहे. मारेकरी हा गावात अवैध दारू विक्रेता असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 

दर्यापूर तालुक्यातील नाचोना गावात या घटनेनंतर तणावाचे वातावरण आहे. वाहन चालवणाऱ्या व्यक्तीने जुन्या वैमनस्यातून रागाच्या भरात हे कृत्य केल्याचे म्हटले जात आहे.  आरोपीने आपली कार पीडित कुटुंबाच्या घराजवळ नेली.  त्यावेळी घराजवळ उभे असलेल्या कुटुंबातील काही सदस्यांच्या अंगावर जाणून बुजून कार नेली आणि त्यांना उडवले. आरोपी हा गावात बेकायदेशीरपणे दारु विक्री करत असून कायम नशेत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. 

या भीषण अपघातात  तीन जण जागीच ठार झाले असून अन्य तीन गंभीर जखमी झाले आहेत. दर्यापूर तालुक्यातील खल्लार पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नाचोना या गावात हा भयंकर प्रकार घडला आहे. आरोपीचे नाव चंदन गुजर असल्याची माहिती आहे. 

या घटनेत अनुसया शामराव अंभोरे (वय 67), शामराव लालूजी अंभोरे (वय 70) आणि अनारकली मोहन गुजर (वय 43) यांचा मृत्यू झाला. तर, जखमींमध्ये शारदा उमेश अंभोरे (वय 40) उमेश अंभोरे (वय 40)
 किशोर शामराव अंभोरे (वय 38) यांचा समावेश आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्थानिक पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे. 



Source link

एनआयएची अमरावती आणि पुण्यात छापेमारी; तरुण एनआयएच्या ताब्यात,

एनआयएची अमरावती आणि पुण्यात छापेमारी; तरुण एनआयएच्या ताब्यात,


पुणे:  राष्ट्रीय एजन्सी एनआयएने (NIA) आज महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात केलेल्या छापेमारी व कारवाईनंतर इसिस मॉड्युल (ISIS Module) हे पुन्हा एकदा राष्ट्रीय तपास यंत्रणाच्या रडारवर आलेला आहे. अमरावती जिल्ह्यातील अचलपूरमध्ये एनआयएने छापा टाकला आहे.   एका विद्यार्थ्याची एनआयए पथकाकडून चौकशी सुरू आहे. विद्यार्थी दहशतवादी कारवायांमध्ये गुंतल्याचा संशय आहे.  त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अमरावतीबरोबर पुणे– गुलटेकडी येथे राहणाऱ्या तरुणाची एनआयएकडून चौकशी NIA ने केली आहे. 

अमरावती जिल्ह्याच्या अचलपूरमध्ये एनआयएने छापेमारी केली आहे.  अमरावती जिल्ह्यातील अचलपूरमध्ये एनआयएच्या पथकाकडून छापेमारी करून एका 19 वर्षीय  युवकाला घेतलं ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या 19 वर्षीय युवकाची अमरावती येथील जोग क्रीडा संकुल मधील मंथन हॉल याठिकाणी चौकशी सुरू आहे.  NIA टीम नी ताब्यात घेतलेल्या तरुणाच्या घरून काही कागदपत्रे आणि लपटॉप आणल्याची माहिती समोर आली आहे. अचलपूरच्या अकबरी चौक मधील बियाबानी गल्लीतून तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून जिहादी संघटनांच्या संपर्कात

 राष्ट्रीय एजन्सी एनआयएने  ताब्यात घेतलेला तरुण हा अचलपूर येथील महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थी सोशल मीडिया, विशेषत: व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून जिहादी संघटनांच्या संपर्कात होता. हा विद्यार्थी दहशतवादी कारवायांमध्ये सामील असल्याच्या संशयावरून एनआयएचा पथक स्थानिक एटीएस आणि जिल्हा पोलिसांच्या पथकासह आज पहाटे 4 वाजता अचलपूरला पोहोचले होते. 

 गुलटेकडी येथे राहणाऱ्या तरुणाची एनआयएकडून चौकशी

पुण्यातील गुलटेकडी परिसरात राहणाऱ्या तरुणाकडे NIA ने चौकशी केलीय.  त्याचबरोबर  एन.आय.ए.च्या  गुन्ह्यात आधीपासून आरोपी असलेल्यांच्या घरी जाऊन देखील चौकश करण्यात आली आहे. NIAच्या  बंगळूरुमधील पथकाने ही कारवाई केलीय.  पुण्यातील  अरिहंत कॉलेजचा विद्यार्थी असलेल्या 19 वर्षीय साफवान शेखची एनआयएकडून चौकशी करण्यात आली आहे.   साफवानकडून मोबाईल आणि इलेक्ट्रॅानिक डिव्हाइस जप्त करण्यात आलेत. साफवान हा बेंगलोरस्थित इसिस मॅाड्यूलच्या टेलिग्राम गृपमध्ये सहभागी असल्याने चौकशी करण्यात आली आहे. NIA ने अलिकडच्या काही महिन्यांत मोठ्या प्रमाणावर छापे टाकले आहेत आणि ISIS च्या दहशतवादी कट प्रकरणात अनेक दहशतवादी कार्यकर्त्यांना अटक करून वेगवेगळ्या ISIS मॉड्यूल्सचा पर्दाफाश केला आहे.

हे ही वाचा :

                                   



Source link

अमरावती विभागात तब्बल 951 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन, मंत्री अनिल पाटलांची विधान परिषदेत माहिती

अमरावती विभागात तब्बल 951 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन, मंत्री अनिल पाटलांची विधान परिषदेत माहिती


Farmers News : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना (Maharashtra Farmers) सातत्यानं विविध संकटांचा सामना करावा लागत आहे. नैसर्गिक संकटामुळं (Natural Disaster) वाढती नापिकी आणि कर्जबाजारीपणा यामुळं अनेक ठिकाणी शेतकरी टोकाचं पाऊल उचलत आहेत. जानेवारी 2023 ते 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत अमरावती विभागात तब्बल 951 शेतकऱ्यांनी आत्महत्या (farmers suicide) केल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी अमरावती जिल्ह्यात 268, यवतमाळ जिल्ह्यात 246, बुलढाणा जिल्ह्यात 237 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी विधान परिषदेत लेखी उत्तरात दिली आहे. 

छत्रपती संभाजीनगरमध्ये मार्च 2023 ते ऑक्टोबर 2023 या 8 महिन्याच्या कालावधीत 741 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. 289 अंतर्गत नागपूरजवळच्या सोलार इंड्रस्टीत झालेल्या स्फोट प्रकरणावर विधान परिषदेत चर्चा सुरु आहे. या चर्चेत मंत्री अनिल पाटील यांनी शेतकरी आत्महत्या प्रकरणी ससविस्तर माहिती दिली आहे. 

कोणत्या विभागात किती आत्महत्या?

अमरावती विभागात – 951
छत्रपती संभाजीनगर मराठवाडा विभागात – 877
नाशिक विभागात – 254
नागपूर विभागात – 257
पुणे विभागात – 27
लातूर जिल्हा – 64
धुळे जिल्हा – 28

अशा एकूण 2478 शेतकरी आत्महत्येची प्रकरण राज्यभरातून समोर आली आहेत. जानेवारी ते ऑक्टोबर महिन्या दरम्यान समोर आल्याची माहिती लेखी उत्तरात राज्य सरकारकडून देण्यात आली आहे.

शेतकरी आत्महत्येनंतर विविध प्रश्न समोर

राज्यात विविध कारणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रमाणात वाढ झाल्याबाबत विविध प्रश्न समोर येत आहेत. राज्यात सततची नापिकी, कर्जबाजारीपणा, हवामानातील बदल, शेत मालाला भाव नसणे इत्यादी अनेक कारणास्तव मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.  शेतकरी आत्महत्याग्रस्त भागाकडे शासनाने विशेष लक्ष देवून आत्महत्यांसाठी कारणीभूत ठरणाऱ्या अनेक समस्यांचे निराकरण करुन या आत्महत्या रोखण्यासंदर्भात शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे? असा सवालही करण्यात येत आहे. या प्रकरणी शासनाचे चौकशी करून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचे पुनर्वसन तसेच त्यांना आर्थिक मदतीबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे. नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ? असे सवाल उपस्थित केले जात आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या:

धक्कादायक! महाराष्ट्रात 10 महिन्यात तब्बल 2478 शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा, राज्य सरकारची कबुली



Source link

NIA Team Enquiry : NIAटीमने ताब्यात घेतलेल्या तरुणाच्या घरून कागदपत्रे आणि लॅपटॉप आणल्याची माहिती

NIA Team Enquiry : NIAटीमने ताब्यात घेतलेल्या तरुणाच्या घरून कागदपत्रे आणि लॅपटॉप आणल्याची माहिती



<p>NIA ने अचलपूर मधून ताब्यात घेतलेल्या 19 वर्षीय युवकाची अमरावती येथील जोग क्रीडा संकुल मधील वसंत हॉल याठिकाणी चौकशी सुरू.. NIA टीम नी ताब्यात घेतलेल्या तरुणाच्या घरून काही कागदपत्रे आणि लॅपटॉप आणल्याची माहिती…</p>



Source link

YouTube
Instagram
WhatsApp