by Hansraj Agrawal | Dec 18, 2023 | Current Affairs

अमरावती जिल्ह्यातील अचलपूरमध्ये एनआयएचे छापेमारी

अचलपूरमधील १९ वर्षीय तरुण एआयएच्या ताब्यात

विद्यार्थी दहशतवादी कारवायात गुंतल्याचा संशय

व्हॉट्सअॅप ग्रूपच्या माध्यमातून विद्यार्थी जिहादी संघटनांच्या संपर्कात

पहाटे ४ वाजता एटीएसचं पथक अचलपूरमध्ये दाखल

एनआयएकडून तरुणाची चौकशी सुरु

या विद्यार्थ्याची NIA पथक कसून चौकशी केली असून याची गुप्तता ठेवली आहे…

Source link
by Hansraj Agrawal | Dec 18, 2023 | Current Affairs
Amravati NIA : अमरावती जिल्ह्यातील अचलपूरमध्ये एनआयएची छापेमारी; एका विद्यार्थ्याची चौकशी अमरावती जिल्ह्यातील अचलपूरमध्ये एनआयएचा छापा, एका विद्यार्थ्याची एनआयए पथकाकडून चौकशी, विद्यार्थी दहशतवादी कारवायांमध्ये गुंतल्याचा संशय.
Source link
by Hansraj Agrawal | Dec 17, 2023 | Current Affairs

अमरावतीच्या हनुमान गडी येथे शिवमहापुराण कथेला उत्साहात सुरुवात झाली.. पंडित प्रदिपजी मिश्रा यांचे खासदार नवनीत राणा, महिलांनी पुष्पवृष्टी करून स्वागत केले..आज शिवमहापुराण कथेच्या दुसऱ्या दिवशी सफाई कामगार, रेल्वे स्टेशनवर काम करणारे कुली आणि बाजारात काम करणारे हमाल यांच्या हस्ते पूजन करून कथेला सुरुवात झाली.. ही कथा ऐकण्यासाठी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा सफाई कामगारांसोबत बसले.

Source link
by Hansraj Agrawal | Dec 16, 2023 | Current Affairs
INDIA Alliance And VBA : ‘इंडिया आघाडी’तील (India Alliance) वंचितच्या प्रवेशाचं भवितव्य 19 डिसेंबरच्या आगामी इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर ठरणार आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) वंचितच्या समावेशाचा मुद्दा मांडणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी दिली. ते अकोला जिल्ह्यातील (Akola) बार्शीटाकळी येथे माध्यमांशी बोलत होते. या बैठकीनंतर आम्ही आमचे निर्णय घ्यायला मोकळे असल्याचं आंबेडकर म्हणाले आहेत. यासंदर्भात नुकतीच वंचित आणि ठाकरे गटात उच्चस्तरीय बैठक झाल्याचं त्यांनी सांगितलं. त्यात ‘इंडिया’च्या बैठकीत नेमकं काय मांडायचं यावर झाली चर्चा झाली असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘इंडिया आघाडी’च्या बैठकीनंतर पुढचं सर्व चित्र स्पष्ट होणार असल्याचा विश्वास आंबेडकरांनी व्यक्त केला आहे.
वंचित बहुजन आघाडीचं ठरलं; 19 डिसेंबरनंतर घेणार निर्णय
वंचित बहुजन ‘इंडिया आघाडी’त सहभागी होणार की यावर 19 डिसेंबरला होऊ घातलेल्या ‘इंडिया’च्या बैठकीनंतर निर्णय होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वंचित बहुजन आघाडीच्या ‘इंडिया आघाडी’त सहभागाबद्दल चर्चा सुरू आहेत. मात्र, माध्यमांतून होत असलेल्या या चर्चा मात्र प्रत्यक्षात टेबलवर झाल्याच नाहीत. मात्र, आता लोकसभा निवडणुक अगदी जवळ आल्याने वंचितने याचा सोक्षमोक्ष लावायचा निर्णय घेतला आहे. वंचितनं ही सर्व जबाबदारी त्यांचा मित्रपक्ष असलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर सोपवली आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना ही आधीच ‘इंडिया आघाडी’तील महत्वाचा घटक पक्ष आहे. उद्धव ठाकरे आणि वंचितच्या युतीची घोषणा झालेली असतांना वंचितचा ‘इंडिया’ आघाडीतील प्रवेश मात्र रखडला आहे. यासंदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं हा मुद्दा आतापर्यंत थंडबस्त्यात ठेवला होता. वंचितनं यासंदर्भात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंना एक पत्र लिहिलं होतं. तर 26 नोव्हेंबरला मुंबईत झालेल्या ‘संविधान बचाव रॅली’ला काँग्रेस नेते खासदार राहुल गांधींना वंचितनं निमंत्रण दिलं होतं. तेलंगणात प्रचारात व्यस्त असलेल्या राहुल गांधींनी या रॅलीत आपले प्रतिनिधी म्हणून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना पाठवलं होतं.
उद्धव ठाकरे बनणार प्रकाश आंबेडकरांचे ‘दुत’ :
प्रकाश आ़ंबेडकरांच्या ‘इंडिया आघाडी’तील प्रवेशाबद्दल आधीपासूनच उद्धव ठाकरेंनी आग्रही भूमिका मांडली. मात्र, काँग्रेसनं हा मुद्दा आतापर्यंत तसाच प्रलंबित ठेवला होता. मात्र, तीन राजात काँग्रेसचा पराभव झाल्यानं काँग्रेस काहीशी ‘बॅकफूट’वर गेली आहे. याच परिस्थितीत आता 19 डिसेंबरच्या बैठकीत उद्धव ठाकरे ‘वंचित’च्या प्रवेशाचा मुद्दा धसास लावण्याच्या प्रयत्नात आहे. याच मुद्द्यावर वंचित आणि ठाकरे गटाची महत्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. यात भविष्यातील दोन्ही पक्षांच्या संबंधांवरही चर्चा झाली.
… तर वंचित घेणार पुढचा निर्णय!
या बैठकीत काय निर्णय होणार आहे, यावर पुढची राजकीय वाटचाल अवलंबून असेल. या बैठकीत ‘इंडिया आघाडी’त वंचित’च्या समावेशावर शिक्कामोर्तब झाले तर राज्याच्या राजकारणावर त्याचे दुरोगामी परिणाम होतील. आंबेडकरांच्या समावेशानं राज्यात ‘इ़डिया’ आघाडी मजबूत होईल. जर या बैठकीत समावेशाचा निर्णय झाला नाही तर आंबेडकरांना उद्धव ठाकरेंसोबतच्या मैत्रीवरही फेरविचार करावा लागू शकतो. यासोबतच पुढे ‘एकला चलो रे’ची भूमिका घ्यायची की नवे मित्रपक्ष जोडायचे यावर वंचितला निर्णय घ्यावा लागणार आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने इतिहासातून युतीचे महत्व शिकायला हवं : वंचित बहुजन आघाडी
काँगेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने इतिहासातून युतीचे महत्त्व शिकायला पाहिजे. हिटलरचा पराभव हा अनेक देशांच्या एकजुटीतूनच झाला होता. महाविकास आघाडीने अद्याप वंचित बहुजन आघाडीला का सहभागी करून घेतले नाही? हे उभ्या महाराष्ट्राला कोडं असल्याची प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी ‘एबीपी माझा’शी बोलतांना व्यक्त केली आहे. यासंदर्भात ‘वंचित बहुजन आघाडी’नं आपल्या ‘ट्वीटर हँडल’ (आताचे ‘एक्स’)वरून एक निवेदन प्रसिद्ध केलंय. त्यात राज्यातील ‘महाविकास आघाडी’ला थेट प्रश्न विचारले आहेत.
एकतर वंचित बहुजन आघाडीच्या वाढत्या पाठिंब्याबाबत आणि महासभांमध्ये दिसलेल्या ताकदीबद्दल महविकास आघाडी आंधळी आहे? किंवा त्यांचा अहंकार त्यांना वंचित बहुजन आघाडीला आमंत्रण देण्यापासून रोखत आहे?. की वंचितांची मदत घ्यावी लागते यात कमीपणा वाटतो आहे? असं म्हणत वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीच्या भूमिकेवर थेट प्रश्न उभा केला आहे.
संपूर्ण महाराष्ट्राने वंचित बहुजन आघाडीच्या सभांना उत्सुर्फपणे आलेला जनसमुदाय पहिला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपला हरवायची ‘प्रामाणिक’ इच्छा असेल, तर त्यांनी त्यांचा अहंकार बाजूला ठेवावा आणि वंचित बहुजन आघाडीला मविआमध्ये आमंत्रित करावं. पक्षीय अहंकार आणि इतर पक्षांना सोबत न घेतल्याचा परिणाम काय होतो हे राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये बघतोच आहोत. असं म्हणत वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीला थेट इशारा दिला आहे.
याआधी सुद्धा सातत्याने वंचित बहुजन आघाडी म्हणत आहे की, भाजपला हरवण्यासाठी आम्ही सातत्याने लढतोय आणि महाविकास आघाडी, इंडिया आघाडीचा भाग आम्हाला व्हायचा आहे. परंतु, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ह्या वागणुकीमुळे जनतेमध्ये रोष निर्माण होत असल्याचं वंचितनं ‘ट्वीटर’वर म्हटलंय.
Source link
by Hansraj Agrawal | Dec 16, 2023 | Current Affairs
Bachchu Kadu On Maratha Reservation : मराठा आरक्षणावरून आमदार बच्चू कडू आक्रमक झाल्याचं दिसून आलं. राज्य सरकारने शब्द पाळला नाही तर मी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आंदोलनात उभं राहणार असा थेट इशाराच आमदार बच्चू कडू यांनी दिला. मनोज जरांगे यांनी दिलेली 24 तारीख जवळ येत आहे, 17 तारखेला जरांगे नवीन आंदोलनाची घोषणा करणार आहेत असंही ते म्हणाले. सरकारने मनोज जरांगे यांना आतापर्यंत शिंदे समितीने काय काय काम केलं त्याचा अहवाल द्यावा अशी मागणी बच्चू कडू यांनी केली.
अंतरवाली सराटीमध्ये लाठीचार्जच्या वेळी मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते, ते गुन्हे सरकारने मागे घ्यावे अशी मागणी करत आमदार बच्चू कडू म्हणाले की मी जरांगे यांना शब्द दिला आहे त्यामुळे मी शब्दांचा पक्का आहे, नाहीतर मी जरांगे यांच्या आंदोलनात सहभागी होणार.
मराठा आंदोलनाला बच्चू कडूंचा पाठिंबा
आमदार बच्चू कडू यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या वेळी राज्य सरकार आणि जरांगे यांच्यामध्ये मध्यस्ती करून जरांगे यांच्या आंदोलन थांबवले होते. त्यानंतर जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला 24 डिसेंबर पर्यंत मुदत दिली होती. मराठ्यांना सरसकट कुणबी सर्टिफिकेट द्यावं अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. त्या मागणीला आमदार बच्चू कडूंनीही पाठिंबा दिला आहे.
या आधी मराठा आरक्षणावर बोलताना आमदार बच्चू कडू म्हणाले होते की, “निवडक मराठ्यांना आपण वाळीत टाकण्याचं कामक करत आहे. तसंही ओबीसीला भेटलेलं आरक्षण कमीच आहे. हे आरक्षण 52 टक्क्यांपर्यंत जातं. त्यामुळे ओबीसींचे आरक्षण वाढवून घ्या किंवा अ, ब, क, ड असे भाग करा. मराठा ओबीसी नाहीत का? मराठा कोण आहे? की मराठा पाकिस्तानचा आहे की अमेरिकेतला आहे?, त्यांचा आरक्षणावर अधिकार का नाही?”
गेल्या 70 वर्षांत ओबीसी समाजाच्या नेत्यांनी काय केलं?
गेली 70-75 वर्षे ओबीसी (OBC) नेते सत्तेत होते, तेव्हा त्यांनी ओबीसी समाजासाठी काय केलं? असा थेट सवाल आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी केला. गेल्या 75 वर्षापासून जर शेतीचे प्रश्न मिटले असते, मजुराला चांगली मजुरी मिळाली असती तर आरक्षणाचा हा मुद्दा समोर आलाच नसता हे सूर्य प्रकाशाएवढे सत्य आहे. त्यामुळे ओबीसी सभेप्रमाणेच सर्व मतभेद, पक्ष विसरून ओबीसीसाठी एकत्र आलेल्या नेत्यांनी शेतकरी, शेतमंजुरांसाठी एकत्र यावे, आम्ही सुद्धा स्टेजवर येऊ असा सल्ला बच्चू कडू यांनी दिला. जाती धर्माच्या नावाने लोक पेटतात हे राजकीय लोकांनी बरोबर हेरले आहे, त्यामुळे सर्व समाज बांधवांनी आपले कशात भले आहे हे ओळखले पाहिजे असे मत देखील बच्चू कडू यांनी बोलतांना व्यक्त केले आहे.
ही बातमी वाचा:
Source link
by Hansraj Agrawal | Dec 15, 2023 | Current Affairs
अमरावती : महाराष्ट्रातील अनेक मोठे औद्योगिक प्रकल्प एकापाठोपाठ एक सोडून जात आहेत. पश्चिम विदर्भातील ( Vidharbha) ही एक मोठी कंपनी प्रस्तावित प्रकल्प गुंडाळण्याच्या तयारीत आहे. अमरावती (Amravati) नांदगावपेठ एमआयडीसीमध्ये (MIDC) हरमन फिनोकेम लि. ने मोठ्या थाटामाटात सुरुवात केली होती. मात्र आता या कंपनीने आपला मुक्काम दुसरीकडे हलवलाय.
हरमन कंपनी नांदगावपेठेत औषध कारखाना काढणार होती. कंपनीला एमआयडीसीमध्ये डी-9 भूखंड देण्यात आला होता. कंपनीने तीन महिन्यांपूर्वी बांधकाम ही सुरू केले होते. कंपाउंड वॉलच्या बांधकामासह काही मशिनरीही आणण्यात आली. हा प्रकल्प 118 एकर जमिनीवर साकारला जाणार होता. यातून निश्चितच शेकडो कोटींची (2500 कोटी) गुंतवणूक होणार होती आणि मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार होती. अमरावती परिसरातील कुशल आणि अकुशल कामगारांच्या, विशेषत: फार्मा क्षेत्राशी निगडित तरुणांच्या येथे रोजगारासाठीच्या आशा वाढल्या होत्या. आतापर्यंत कंपनीने अनेक कामे सुरू केली होती. मात्र अमरावतीतील कामकाज अचानक बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतल्याचे सांगण्यात आले.
शेतकरी आणि कंपनीची बाचाबाची
औद्योगिक प्रकल्प उभारण्यासाठी अमरावतीच्या नांदगाव पेठ एमआयडीसीने जमीन दिल्यानंतरही अनेक वर्षे काहीही न झाल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी त्यावर शेती सुरूच ठेवली. जेव्हा काम सुरू झाले तेव्हा कंपनीच्या लोकांनी यावर आक्षेप घेतल्यास शेतकरी आणि कंपनीची बाचाबाची झाली. माहुली जहांगीर पोलीस ठाण्यात अशाच वादाची तक्रार ही दाखल झाली. त्यानंतर पोलीस बंदोबस्तात काही दिवस काम सुरू होते तरीही हरमन कंपनी अमरावतीतून निघून गेल्याचे सांगण्यात येत आहे.
औद्योगिक आणि राजकीय क्षेत्रात खळबळ
अमरावतीतून एवढा मोठा प्रकल्प निघून गेल्याने सर्वच औद्योगिक आणि राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. विशेषत: कंपनी सोडून जाण्याच्या कारणांची चर्चा होत आहे. स्थानिक समस्यांमुळे अमरावतीतून मोठी गुंतवणूक निघून गेल्याचे सांगण्यात येत आहे. याठिकाणी शेतकरी आणि इतर काही लोक कंपनीच्या अधिकाऱ्यांना सतत त्रास देत असल्याचे समोर आले आहे. तर राजकीय नेत्यांनी सुद्धा कंपनीला पुन्हा काम सुरू करण्यासंदर्भात बोलणी केली पण कंपनी काम करण्यास उत्सुक दिसत नाहीये अशी माहिती आहे.
हे ही वाचा :
Source link