Amravati Special Report : अमरावातीतील अडीच हजार कोटींचा प्रकल्प रद्द

Amravati Special Report : अमरावातीतील अडीच हजार कोटींचा प्रकल्प रद्द



<p>Amravati Special Report : अमरावातीतील अडीच हजार कोटींचा प्रकल्प रद्द&nbsp; महाराष्ट्रातून अनेक मोठे औद्योगिक प्रकल्प एकापाठोपाठ एक सोडून जात आहेत. पश्चिम विदर्भातुन ही एक मोठी कंपनी प्रस्तावित प्रकल्प गुंडाळण्याच्या तयारीत आहे. अमरावती नांदगावपेठ एमआयडीसीमध्ये हरमन फिनोकेम लि. ने मोठ्या थाटामाटात सुरुवात केली होती. मात्र आता या कंपनीने आपला मुक्काम दुसरीकडे हलवलाय. पण कंपनीने असा निर्णय का घेतला पाहूया या रिपोर्टमधून..</p>



Source link

संसदेत घुसणाऱ्या तरूणांची शिक्षा सरकारने माफ करावी; प्रकाश आंबेडकरांची मोठी मागणी

संसदेत घुसणाऱ्या तरूणांची शिक्षा सरकारने माफ करावी; प्रकाश आंबेडकरांची मोठी मागणी


अकोला : लोकसभेत (Lok Sabha) घुसखोरी करून चार तरुणांनी घातलेल्या गोंधळानंतर देशभरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा लोकसभेच्या सुरक्षेवर (Security Breach in Lok Sabha) प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान, संसदेत घुसणाऱ्या तरूणांनी सरकारी नोकरी न मिळाल्याच्या नैराश्यातून हे कृत्य केले आहे. त्यामुळे न्यायालयाने शिक्षा दिल्यानंतर सरकारने या तरूणांची शिक्षा माफ करावी अशी मोठी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केली आहे. ते अकोल्यात बोलत होते.

नोकरी न मिळाल्याच्या नैराश्यातून टोकाचे पाऊल 

लोकसभेची सुरक्षा भेदत गदारोळ करणारऱ्या चार आरोपींमध्ये महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील अमोल शिंदे नावाच्या तरुणाचा देखील सहभाग आहे. चाकूर तालुक्यातील झरी (खू.) गावात राहणारा अमोल शिंदेला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्यावर यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असे असताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी मोठी मागणी केली आहे. न्यायालयाने शिक्षा दिल्यानंतर सरकारने तरूणांची शिक्षा माफ करावी, असे आवाहन प्रकाश आंबेडकरांनी सरकारला केले आहे. सरकार नोकऱ्या देऊ शकलं नाही. त्यामूळे त्या मुलांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे. त्यांनी कायदा मोडला. हे बरोबर आहे, मात्र त्याची शिक्षा द्यायची की माफ करायाची, हे सरकारनं ठरवलं पाहिजे.असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

तरुणांना माफ करून हा इश्यू क्लोज करावा- प्रकाश आंबेडकर

लोकसभेचं कामकाज सुरू असताना अचानक दोन जण प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात आले. मग दोघेही खासदारांच्या बाकांवरून उड्या मारत धावू लागले. संसदेत विषारी धूर सोडला. लोकसभेत घुसखोरी करणाऱ्या तरुणाला खासदार कोटकांनी पकडलं. या घटनेमुळे संसदेच्या सुरक्षा यंत्रणेवर मात्र प्रश्न उपस्थित झाले. धक्कादायक बाब म्हणजे खासदाराच्या प्रताप सिम्हा यांच्या पासवर हे दोन्ही तरुण सभागृहात शिरले. संसदेच्या सुरक्षेतील त्रुटीप्रकरणी प्रकाश आंबेडकर म्हणाले की, संसदेची सुरक्षा कमकुवत होती. संसदेसाठी विशेष सुरक्षा व्यवस्थेची आवश्यकता असताना ती दिल्ली पोलिसांकडे का दिलीय?  जुनी सुरक्षा व्यवस्था मजबूत होती. उद्या आणखी काही घटना घडल्यास आश्चर्य वाटणार नाही. कोणत्या घटनेला किती महत्व द्यायचं हे सरकारनं ठरवावं. त्यामुळे सरकारने या तरुणांना माफ करावे आणि हा इश्यू क्लोज करावा. असे देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले.

बच्चू कडूंचे आभार, मात्र लोकांचा आशीर्वाद महत्वाचे

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार प्रकाश आंबेडकर यांना मुख्यमंत्री केले पाहिजे, दलित मुख्यमंत्री होऊ शकत नाही का? असं माजी मंत्री बच्चू कडू यांनी म्हटले होते. हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने सभागृहात बोलतांना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. यावर प्रकाश आंबेडकर यांनी बच्चू कडूंचे आभार मानले, बच्चू कडू यांनी जरी ही इच्छा व्यक्त केली असली तरी शेवटी लोकशाहीत यासाठी लोकांचा आशीर्वाद आणि संख्याबळ महत्वाचं असतं. असे मत प्रकाश आंबेडकर यांनी बोलताना व्यक्त केले. 

इतर महत्वाची बातमी: 



Source link

खळबळजनक! अमरावती शहरात घातक मोठा शस्त्रसाठा जप्त; 6 जणांची टोळी गजाआड

खळबळजनक! अमरावती शहरात घातक मोठा शस्त्रसाठा जप्त; 6 जणांची टोळी गजाआड


Amravati : अमरावती पोलिसांनी (Amravati Police)  शहरात मोठी कारवाई केली आहे. अमरावती शहरात अवैध घातक शस्त्रे विक्री करणार्‍या 6 जणांच्या टोळीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने (Crime Branch) 102 खंजर चाकू, 2 चायना चाकू आणि 2 देशी कट्टे जप्त केले आहे. या कारवाईने चांगलीच खळबळ उडाली आहे.  याप्रकरणी पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे.. या कारवाईची माहिती आज पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली.

आगामी काळात ख्रिसमस तसेच शहरामध्ये महाशिवपुराण कथा सारखे धार्मिक कार्यक्रम होणार आहे. त्यापुढे काही महिन्यातच लोकसभा निवडणुका आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेल्या कारवाईला महत्त्व प्राप्त झाले आहे. अमरावती शहर पोलीस आयुक्तांच्या सूचनेवरून गुन्हे शाखेच्या पथकांकडून विशेष मोहीम राबविण्यात येत होती. त्याचवेळी पथकाला घातक शस्त्रे विक्री करणार्‍या टोळीची माहिती मिळाली. 

गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी अब्दुल सोहेल अब्दुल शफी (वय 19 वर्ष, रा. गुलीस्ता नगर) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे 1 खंजर आणि 2 चायना चाकू मिळाले. त्याची सखोल चौकशी केल्यावर त्याने साथीदारांची नावे सांगितली. त्यानुसार टोळी प्रमुख अकरम खान उर्फ गुड्डु वल्द बादुल्ला खान (वय 19 वर्ष, रा. अलीम नगर), टोळी सदस्य फरदीन खान युसुफ खान (वय 21 वर्ष, रा.राहुल नगर), मुजम्मील खान जफर खान (वय 21 वर्ष, रा.गुलीस्ता नगर), शेख सुफियान मोहम्मद अशफाक (वय 19 वर्ष, रा. यास्मीन नगर), जाहेद शहा हमीद शहा (वय 20 वर्ष, रा. लालखडी) असे सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

टोळीतील सहा आरोपींकडे पोलिसांनी चौकशी केली. त्यावेळी त्यांनी मुंबईवरून शस्त्र आणून शहरातील गुन्हेगारांना पुरवठा करत असल्याचे चौकशीत सांगितले. सलग 72 तास सखोल तपास केल्यावर आणि विविध ठिकाणी छापा मारल्यावर आतापर्यंत 102 खंजर, 2 चायना चाकू आणि 2 अग्नीशस्त्रे (देशी कट्टे) असा एकूण 1 लाख 85 हजार 500 रूपयाची शस्त्रे जप्त करण्यात आली आहे. नागपुरी गेट पोलीस ठाण्यात आर्म अ‍ॅक्टच्या विविध कलमान्वये आणि सहकलम 135 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत. 

इतर महत्त्वाच्या बातम्या :



Source link

Exclusive :   मेळघाटातील बहुतेक गावांत स्थलांतर,कुपोषणाचा प्रश्न कायम

Exclusive : मेळघाटातील बहुतेक गावांत स्थलांतर,कुपोषणाचा प्रश्न कायम


नागपूर अमरावतीतल्या मेळघाटातील (Amravati Melghat)  कुपोषण (Malnutrition) आणि बालमृत्यूचा (Child Death Rate)  दर दहा वर्षांच्या तुलनेत कमी आहे परंतू बालमृत्यू आणि कुपोषण अजूनही संपलेलं नाही. एबीपी माझाच्या टीमने तीन दिवस मेळघाटातील धारणी, चिखलदरा या भागातील अनेक गावांना भेटी दिल्या. समृद्धी महामार्गापासून 100 ते 125 किमी असलेल्या मेळघाटातील अनेक गावात धड रस्ते नाहीत. जे रस्ते आहेत त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. आरोग्याच्या पायाभूत सुविधाही नाहीत. मेळघाटातील सर्वात मोठ्या धारणी परिसरात आजही कुपोषणाची प्रकरणं सर्वाधिक आहे.  एप्रिलपासून नोव्हेंबर अखेरपर्यंत उप जिल्हा रुग्णालयात 43 बालकांचा मृत्यू झाला आहे.

 उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर म्हणाले, कुपोषणामुळे एकही बाळ दगावले नाही पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. कारण प्रत्येक आईसाठी बाळ महत्त्वाचे आहे. सध्याचा मृत्यू दर पाहिला तर सहा टक्के आहे. आमच्या रुग्णालयात उपचार शक्य नसेल तर आम्ही पालकांना त्यांना शहरात घेऊन जाण्याचा सल्ला देतो. मात्र पालक रुग्णलात घेऊन न जाता मुलांना घरी घेऊन जातात. मुलांना त्यामुळे वेळेवर उपचार मिळत नाही. रुग्णालयातील स्टाफ  देखील कमी  आहे. शासकीय रुग्णालयावर भार कमालीचा आहे. 

रोजगारासाठी स्थलांतर, मेळघाटातील बहुतेक गावांत 50 टक्क्यांहून अधिक घरांना टाळं 

दरम्यान रोजगार मिळत नसल्याने मेळघाटातील बहुतेक गावांत 50 टक्क्यांहून अधिक घरांना टाळं लागलंय. तेथील लोक कामधंद्याच्या शोधात मध्य प्रदेश, गुजरातला विस्थापित झालेत. या स्थलांतरामुळे कुपोषणाचा प्रश्न कायम आहे. रोजगाराचा मोठा प्रश्न असल्याने स्थलांतर होत असल्याचे दिसून येत आहे. एकीकडी रोजगारासाठी सरकारने मनरेगा (महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी अॅक्ट) ही योजना आणली. मात्र आजही रोजगारासाठी स्थलांतर होत असेल तर रोजगार हमी योजना फोल ठरल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. 

गरोदर महिलांना न मिळणारा सकस आहार हे एक कारण

बालके अधिक प्रमाणात कुपोषित असून येथील परिस्थिती चिंताजनक आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून कुपोषणमुक्तीसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. मात्र आदिवासी समाजातील लोकांचे स्थलांतर तसेच परिस्थितीमुळे गरोदर महिलांना न मिळणारा सकस आहार, यामुळे जन्माला येणारे बाळ कुपोषित जन्मते. तर अनेक वेळा त्याचा मृत्यूही होतो. कुपोषण आणि बालमृत्यूच्या नावाने कोट्यवधी निधी येतो. मात्र तिथपर्यंत तो पोहोचत नाही तसेच त्याची जनजागृती होत नाही. या परिसरात कुपोषणाचे प्रमाण वाढत आहे. 



Source link

Melghat Amravati Malnutrition : मेळघाटातील बहुतेकगावांत स्थलांतर, कुपोषणाचा प्रश्न कायम

Melghat Amravati Malnutrition : मेळघाटातील बहुतेकगावांत स्थलांतर, कुपोषणाचा प्रश्न कायम



Melghat Amravati Malnutrition : मेळघाटातील बहुतेकगावांत स्थलांतर, कुपोषणाचा प्रश्न कायम
रोजगार मिळत नसल्याने मेळघाटातील बहुतेक गावांत 50 टक्क्यांहून अधिक घरांना टाळं लागलंय. तेथील लोक कामधंद्याच्या शोधात मध्य प्रदेश, गुजरातला विस्थापित झालेत. या स्थलांतरामुळे कुपोषणाचा प्रश्न कायम आहे.. दरम्यान याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी



Source link

दर्यापूर गोळीबार प्रकरणी तीन आरोपीला अटक तर तिघे फरार

दर्यापूर गोळीबार प्रकरणी तीन आरोपीला अटक तर तिघे फरार


Amravati Car Firing :  अमरावती जिल्ह्यातील (Amravati District ) दर्यापूर येथे गुरूवार 7 डिसेंबरच्या रात्री झालेले गोळीबार (Firing) प्रकरणी दर्यापूर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. तर या प्रकरणातील फरार झालेल्या अन्य तीन आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. अटक आलेले तिघांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. अमरावतीच्या दर्यापूरमध्ये पेट्रोल पंपाजवळ अमरावतीवरुन अंजनगावकडे जाणाऱ्या कुटुंबाच्या कारचा पाठलाग करुन गोळीबाराची थरारक घटना घडली होती. ज्यामध्ये पाठीमागे येणाऱ्या कारमधून आरोपींनी दोन राऊंड फायर केल्या. यात कारमध्ये बसलेली युवतीसह तिचे आई-वडील जखमी झाले होते. त्यानंतर गोळीबार करुन आरोपींनी पळ काढला असता, अवघ्या काही तासात दर्यापूर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत आरोपींनी अटक केली आहे.  

काय होते प्रकरण ?

या प्रकरणातील आरोपी महेश जालमसिंग हरदे आणि जखमी पीडित तरूणीची इंस्टाग्रामवर तीन-चार महिन्यांपूर्वी ओळख झाली होती. आरोपी हा बंगलोरमध्ये प्रापर्टी ब्रोकर म्हणन काम करीत होता, जखमी तरूणी ही अमरावती येथे शिक्षण घेत होती. कालांतराने या दोघांमध्ये मैत्री अधिक घट्ट होत गेली. त्यानंतर त्यांची मैत्री वाढत गेली. दरम्यान आरोपी हा बंगलोर वरून अमरावती येथे वास्तव्यास आला. त्यासाठी त्याने अमरावती मधील कठोरा नाका परिसरात भाड्याने घर देखील घेतले. कालांतराने या दोघांमध्ये काही वाद झाला आणि आरोपी हा काही दिवसांपूर्वी पीडित तरुणीच्या अंजनगाव येथील घरी गेला. त्याठिकाणी पीडित तरुणीच्या आई-वडिलांची भेट घेत त्यांच्यासोबत त्याने वाद घातला. मी तुमच्या मुलीसोबत लग्न केले आहे, तिला माझ्या सोबत पाठवा असा तगादा त्यावेळी आरोपीने लावला. तसेच त्याने दोघांच्या विवाह संबंधाचे कागदपत्रे सुध्दा दाखवले. मात्र पीडित तरुणीने हे सर्व कागदपत्र बनावट असल्याचे सांगितले. त्यानंतर पीडित तरुणीच्या आई-वडिलांनी त्यास घरातून निघून जाण्यास सांगितले.

चालत्या गाडीवर दोन राऊंड फायर

पीडित तरुणीने अंजनगाव सुर्जी पोलिस स्टेशन गाठून  1 डिसेंबरला  आरोपींविरुद्ध तक्रार दिली. तर दुसरीकडे आरोपी महेश हरदे याने देखील पीडित तरुणी आणि तीच्या आई-वडीलांच्या नावाने अमरावती येथील गाडगे नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी तरुणी आणि तीच्या आईवडिलांच्या चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये बोलविण्यात आले. त्यावरून 7 डिसेंबरला पीडित तरूणी ही तिची आई वडील आणि परीचयातील गजानन हरपुळे सोबत  गाडगेनगर पोलिस स्टेशन येथे आले होते. त्यानंतर चौकशी आटपून ते अमरावती ते अंजनगाव कडे जाण्याकरीता निघाले असता आरोपीने दुचाकी आणि चारचाकी वाहनाने त्यांचा पाठलाग केला. गाडी दर्यापूर येथील पेट्रोल पंपाजवळ आली असता आरोपीने चालत्या वाहनातून गोळ्या झाडल्या. या गोळीबारात पीडित तरुणीच्या मानेला गोळी लागली तसेच गजानन हरपुळे सुध्दा जखमी झाले. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन भातकुली मार्गे अमरावती शहर-कारंजा लाड असे पळुन गेले.पोलीसांनी त्वरीत सतर्कता दाखवून केलेल्या पाठलागाअंती आरोपीला वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथे अटक केली. या गुन्हात गुन्हा आरोपी महेश जालमसिंग हरदे यांच्यासह  श्रध्दा हरेल (वय22 ) अजय चंद्रकांत पवार (वय 45) सर्व रा मलकापूर आणि अन्य फरार साथीदार सोबत असल्याचे सांगीतले. या प्रकरणातील पुढील तपास दर्यापुर पोलीस करित आहे.



Source link

YouTube
Instagram
WhatsApp