अकोला हादरले! गे-डेटिंग ॲपवरून बँकेच्या अधिकाऱ्याची ओळख, अज्ञात स्थळी बोलवत चौघांकडून अत्याचार

अकोला हादरले! गे-डेटिंग ॲपवरून बँकेच्या अधिकाऱ्याची ओळख, अज्ञात स्थळी बोलवत चौघांकडून अत्याचार


Akola Crime: अकोल्यात ‘गे-डेटिंग’ अँप’द्वारे पुरुषांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. आजकाल ‘गे-डेटिंग’ अप्स समलिंगी पुरुषांसाठी फसवणुकीचा मोठा अड्डा बनलाय… या ॲपच्या माध्यमातून काही गुन्हेगार ब्लॅकमेलिंग, लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीच्या जाळ्यात अडकवत आहे. अकोल्यात देखील ‘गे-डेटिंग’ ॲपच्या माध्यमातून बँकेच्या एका अधिकाऱ्याची मोठी फसवणूक झाली.. या ॲपवर ओळख करत या अधिकाऱ्याला भेटण्यासाठी अज्ञात स्थळी बोलवण्यत आलं. तिथे चौघांनी त्याच्यावर लैंगिक अत्याचार केलाय. इतकंच नव्हे तर या संपूर्ण घटनेचं मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड केले. पुढं बँकेच्या अधिकाऱ्याला ब्लॅकमेलिंग करीत तब्बल 80 हजार रुपयांनी आर्थिक फसवणूक केलीय. चौघांपैकी दोघांना पकडण्यात अकोला पोलिसांना यश आले.. मनीष नाईक आणि मयूर बागडे असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. 

आजकाल डेंटींग ॲप, मॅट्रिमोनिअर साईटवरून होणाऱ्या फसवणुकीचे अनेक प्रकार समोर येत आहेत. सायबर गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ होत असताना अकोल्यातील या धक्कादायक घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.

नेमके घडले काय?

‘गे-डेटिंग’ ॲपवर ओळख करून दिली आणि त्या माध्यमातून बँक अधिकाऱ्याला जाळ्यात ओढून त्याच्यावर लैंगिक अत्याचार, ब्लॅकमेलिंग आणि आर्थिक फसवणूक केल्याची धक्कादायक घटना अकोल्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणात खदान पोलीस ठाण्याच्या पथकाने दोघा आरोपींना अटक केली असून इतर दोन आरोपींचा शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्यातील एका नामांकित बँकेत कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याची ‘गे-डेटिंग’ ॲपवर आरोपींशी ओळख झाली. काही दिवस संभाषण झाल्यानंतर आरोपींनी त्या अधिकाऱ्याला शहराबाहेरील एका अज्ञात ठिकाणी भेटीसाठी बोलावलं. ठिकाणी पोहोचताच अधिकाऱ्याला चौघांनी मिळून ताब्यात घेतलं आणि त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला.या संपूर्ण घटनेचा मोबाईल फोनमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला. त्यानंतर आरोपींनी अधिकाऱ्याला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेलिंग सुरू केली. घाबरलेल्या अधिकाऱ्याकडून 80 हजार रुपये उकळण्यात आले. त्यानंतर त्याने थेट खदान पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करत मनीष नाईक आणि मयूर बागडे या दोघा आरोपींना अटक केली आहे. इतर दोन आरोपींच्या शोधासाठी विशेष पथक तैनात करण्यात आलं आहे. अकोला पोलिसांनी या घटनेचा गांभीर्याने तपास सुरू केला असून, या प्रकारात आणखी कुणाचा सहभाग आहे का, याची चौकशी सुरू असल्याचं. पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांनी सांगितलं.

 

हेही वाचा:

वाढदिवसाची पार्टी रंगली, टिश्यू पेपरवरून वाद अन् अल्पवयीन तरुणांनी दारूची बाटली डोक्यात फोडत …लातूरच्या रिंगरोड परिसरात धक्कादायक घटना

आणखी वाचा



Source link

आधी कारने उडवलं, नंतर सपासप वार करुन संपवलं; ASI हत्या प्रकरणातील तीन आरोपींना बेड्या

आधी कारने उडवलं, नंतर सपासप वार करुन संपवलं; ASI हत्या प्रकरणातील तीन आरोपींना बेड्या


Amravati Police Murder Case : अमरावती शहरातील सहायक पोलीस उपनिरीक्षक (ASI) अब्दुल कलाम हत्या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. एएसआय कलाम हत्या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या युनिट 2 ने तीन आरोपींना ताब्यात घेतलंय. फाजील खान साबीर खान, जियान उद्दीन ऐसान उद्दीन (वय 22) आणि आवेज खान अयुब खान (वय 22) असे या आरोपींची नावे असून त्यांना अमरावती पोलिसांकडून आता अटक करण्यात आली आहे.

तर फाजील खान साबीर खान याला ख्वाजानगरमधून  जखमी अवस्थेत ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्याचा डावा पाय अपघातात फॅक्चर झाला असल्याची माहिती ही समोर आली आहे. मात्र एएसआय अब्दुल कलाम यांची हत्या नेमकी का आणि कोणत्या कारणातून करण्यात आली हे अद्याप कळू शकलेलं नाही. परिणामी पोलीस आता त्या दिशेने ही कसून चौकशी करत आहेत. 

आधी कारने उडवलं, नंतर सपासप वार करुन हत्या 

अमरावतीतील सहायक पोलीस उपनिरीक्षक अब्दुल कलाम अब्दुल कादर असं हत्या करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. कलाम यांच्या टू व्हिलरला आरोपीने आधी फोर व्हिलरने धडक दिली. त्यानंतर त्यांच्या पोटावर आणि छातीवर धारधार शस्त्राने सपासप वार करण्यात आले. घटना घडल्यानंतर हल्लेखोर फाजील खान घटनास्थळावरुन पसार झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण पोलीस विभागसह अमरावती शहरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू करत आरोपीचा शोध घेतला असता त्याला ख्वाजानगरमधून जखमी अवस्थेत ताब्यात घेण्यात आलं. सध्या त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. मात्र या हत्येमागचे नेमकं कारण काय? हे अद्याप समोर आलं नाही. दुसरीकडे एका पोलीस अधिकाऱ्याचीच अशा पद्धतीने हत्या करण्यात आल्यानंतर सर्वसामान्यांची सुरक्षा कशी करणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

हत्ये मागचं नेमकं कारण काय?

पुढे आलेल्या माहितीनुसार, एस आय कलाम हे अमरावती पोलिस आयुक्तालय अंतर्गत वलगाव पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते. ते त्यांच्या टू व्हिलरवरून जात असताना त्यांच्या बाईकला एका फोर व्हिलरने धडक दिली. त्यानंतर कलाम यांच्या पोटावर आणि छातीवर धारधार शस्त्राने वार करण्यात आले. या हल्ल्यामध्ये कलाम हे गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना नजिकच्या बेस्ट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण तोपर्यंत डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनास्थळावर पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांनी भेट दिली. हल्लेखोरांना शोधण्यासाठी पोलिसांचे दोन पथक रवाना करण्यात आले होते. अशातच आता आरोपी फाजील खान साबीर खान  स्थानिक गुन्हे शाखेच्या युनिट 2 ने या आरोपीला ताब्यात घेतलंय.

हे ही वाचा 

आणखी वाचा



Source link

अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याची हत्या; आधी कारने उडवलं, नंतर सपासप वार करुन हल्लेखोर पसार

अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याची हत्या; आधी कारने उडवलं, नंतर सपासप वार करुन हल्लेखोर पसार


अमरावती: शहरामध्ये एका सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाची हत्या करण्यात आली आहे. अब्दुल कलाम अब्दुल कादर असं हत्या करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचं नाव आहे. कलाम यांच्या टू व्हिलरला आधी फोर व्हिलरने धडक दिली. नंतर त्यांच्या पोटावर आणि छातीवर धारधार शस्त्राने सपासप वार करण्यात आले. हल्ला केल्यानंतर हल्लेखोर पसार झाले आहेत. या हत्येमागचे नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही. एका पोलिस अधिकाऱ्याचीच अशा पद्धतीने हत्या करण्यात आल्यानंतर सर्वसामान्यांची सुरक्षा कशी करणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

एस आय कलाम हे अमरावती पोलिस आयुक्तालय अंतर्गत वलगाव पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत होते. ते त्यांच्या टू व्हिलरवरून जात असताना त्यांच्या बाईकला एका फोर व्हिलरने धडक दिली. त्यानंतर कलाम यांच्या पोटावर आणि छातीवर धारधार शस्त्राने वार करण्यात आले. पाच ते सहा हल्लेखोर यामध्ये असल्याची माहिती असून ते फरार झाले आहेत. 

या हल्ल्यामध्ये कलाम हे गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना नजिकच्या बेस्ट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण तोपर्यंत डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनास्थळावर पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांनी भेट दिली. हल्लेखोरांना शोधण्यासाठी पोलिसांचे दोन पथक रवाना करण्यात आले आहेत. 

पोलिसांवरील हल्ल्यामुळे शहर हे सुरक्षित नसून सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा काय? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. तसेच या हल्लेखोरांना लवकरात लवकर पकडून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणीही केली जात आहे.

ही बातमी वाचा: 

आणखी वाचा



Source link

हभप नारायण महाराज तराळे यांचे निधन; 60 वर्षे केली पंढरीची वारी, 98 व्या वर्षी अखरेचा श्वास

हभप नारायण महाराज तराळे यांचे निधन; 60 वर्षे केली पंढरीची वारी, 98 व्या वर्षी अखरेचा श्वास


अकोला : अवघ्या महाराष्ट्राला पंढरीच्या वारीचे (Pandharichi wari) वेध लागले असून लाडक्या विठुरायाच्या भेटीसाठी शेकडो दिंड्या पंढरीकडे चालत आहेत. पाऊले चालती पंढरीची वाट म्हणत ऊन, पाऊस अन् वाऱ्यातही माऊली.. माऊली… नाम जपत वारकऱ्यांची पाऊले पंढरपूरकडे जात आहेत. गावखेड्यातील वारकरी, महाराज, हभप आणि साधू-संताकडूनही वारीच्या आठवणी जागवल्या जात आहेत. मात्र, अकोला (Akola) जिल्ह्यातून एक दु:खद वार्ता समोर आली आहे. जिल्ह्यातील वारकरी संप्रदायातील जेष्ठ संत हभप नारायण महाराज तराळे यांचं आज वृद्धापकाळाने निधन झालं, मृत्यूसमयी ते 98 वर्षांचे होते.

हभप नारायण महाराज तराळे यांनी बाळापूर तालुक्यातल्या व्याळा गावी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या नवव्या वर्षापासून त्यांनी वारकरी संप्रदायाची धुरा खांद्यावर घेतली. त्यांनी 60 वर्ष सलगपणे पंढरीची वारी केलीय. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर त्यांनी कीर्तनातून वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करत सेवा बजावली. वारकरी संप्रदायातील त्यांचे ‘विरह अभंग’ खूप प्रसिद्ध आहेत. दरम्यान, उद्या रविवार सकाळी 10 वाजता त्यांच्यावर व्याळा या त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. महाराष्ट्रभरातून उद्या त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी वारकरी मंडळी उपस्थित राहणार आहे. 

हेही वाचा

मोठी बातमी! 11 वी प्रवेशाची पहिली यादी जाहीर; विद्यार्थ्यांनो, 7 जुलैपर्यंत प्रवेश घ्या; कुठं पाहाल यादी?

आणखी वाचा



Source link

पातूर नगरपालिकेवरून राजकीय वादंग; आमदार नितीन देशमुखांची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी, नेमकं प्र

पातूर नगरपालिकेवरून राजकीय वादंग; आमदार नितीन देशमुखांची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी, नेमकं प्र


Akola News : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची चाहूल लागताच अकोला जिल्ह्यातील पातूर नगरपालिकेतील (Patur Nagarpalika) प्रशासकीय भूमिकेवरून मोठे राजकीय वादंग निर्माण झाले आहे. बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी पातूर नगरपालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी सय्यद एहसानोद्दीन यांच्या त्वरित बदलीची मागणी करत राज्य निवडणूक आयोगाकडे (Election Commission) तक्रार दाखल केली आहे.

सध्या पातूर नगरपालिकेत प्रभाग रचनेची प्रक्रिया सुरू आहे. त्याचदरम्यान, मुख्याधिकारी पदावर असलेले सय्यद एहसानोद्दीन हे पातूर शहराचेच रहिवासी असल्यामुळे निवडणूक प्रक्रियेत निष्पक्षता धूसर होण्याचा धोका असल्याचा गंभीर आरोप आमदार देशमुख यांनी केला आहे. त्यांच्या मते, मुख्याधिकारी यांचे स्थानिक राजकीय घराण्याशी संबंध असल्याने निवडणुकीत एकतर्फी धोरण राबवले जाऊ शकते.

निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रातील मुद्दे 

1. मुख्याधिकारी हे पातूरचेच स्थायिक नागरिक आहेत. त्यामुळे ते निष्पक्ष प्रशासन चालवू शकणार नाहीत.

2. त्यांचे स्थानिक राजकीय नेत्यांशी घनिष्ठ संबंध आहेत.

3. महसूल विभागाचे अधिकारी असूनही, शासन नियमानुसार नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदावर नियुक्ती अवैध आहे.

4. नगर विकास निधीचा विनियोग नियमबाह्य स्वरूपात केला गेला आहे.

5. प्रभाग रचना पक्षीय हितसंबंध लक्षात घेऊन करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे.

6. कामांचे तुकडे पाडून ठराविक व्यक्तींना लाभ मिळवून देण्याची प्रथा मुख्याधिकाऱ्यांकडून राबवली जात आहे.

7. याबाबत पालकमंत्री आकाश फुंडकर आणि जिल्हाधिकारी अजित कुंभार यांना वेळोवेळी कळवूनही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

राजकीय हस्तक्षेपाचे आरोप

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती गंभीर असून भाजप आपला पक्षीय अजेंडा राबवत असल्याचा आरोपही आमदार देशमुख यांनी केला. अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या माध्यमातून हे नियोजन होत असल्याचे सांगत, देशमुख यांनी सरकार व प्रशासनावरही टीकास्त्र सोडले आहे.

सय्यद एहसानोद्दीन यांच्याकडे पातूरच्या मुख्याधिकारीपदाचा प्रभार

सय्यद एहसानोद्दीन हे बाळापुर तहसीलमध्ये नायब तहसीलदार पदावर कार्यरत आहेत. मात्र 13 मे 2023 पासून त्यांच्याकडे पातुर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदाचा प्रभार देण्यात आला आहे. त्यांच्या आधीचे मुख्याधिकारी शेषराव टाले यांची बदली झाल्यानंतर आतापर्यंतही पातुर नगरपालिकेला पूर्णवेळ मुख्याधिकारी देण्यात आलेला नाही. पातुरतेच रहिवासी असलेल्या आणि कारभार वादग्रस्त ठरलेल्या सय्यद अहिंसामुद्दीन यांना दोन वर्षानंतरही त्याच पदावर प्रभारी ठेवण्यामागे काय ‘अर्थ’ आहे, याची चर्चा पातुरकरांमध्ये आहे. सय्यद एहसानोद्दीन यांच्या कार्यकाळातील अनेक विकास कामातील गैरव्यवहाराची‌ चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी आमदार देशमुख यांनी केली आहे.‌ निवडणुकीच्या काळातही पातुर शहराचा नागरिक असलेल्या व्यक्तीला त्या पदावरून आता निवडणूक आयोग हटवतो का?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तर जिल्हाभर आंदोलन पेटेल  : आमदार नितीन देशमुख 

आमदार देशमुख यांनी प्रशासन आणि निवडणूक आयोगाला इशारा देत म्हटले आहे की, “जर या अधिकाऱ्यांची त्वरित बदली झाली नाही, तर याचे पडसाद संपूर्ण जिल्हाभर उमटतील.” त्यांनी या प्रकरणी निवडणूक आयोगाने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

प्रशासन आणि आयोगाकडून अद्याप मौन

या तक्रारीबाबत प्रशासनाकडून आणि निवडणूक आयोगाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही. मात्र, या प्रकारामुळे राजकीय व प्रशासकीय पातळीवर खळबळ उडाली असून, पुढील हालचालीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

आगामी निवडणुकीच्या पारदर्शकतेसाठी निर्णय अत्यावश्यक

पातूर नगरपालिकेतील प्रशासकीय कारभारावर लावले गेलेले आरोप हे निवडणुकीच्या पारदर्शकतेसाठी गंभीर प्रश्न उभे करतात. त्यामुळेच राज्य निवडणूक आयोग, जिल्हा प्रशासन व सरकार यांनी त्वरित आणि स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे, अशी स्थानिक जनतेची अपेक्षा आहे. 

आणखी वाचा 

शेतीच्या धुऱ्याचा वाटप ठरलं जीवघेणं, वर्ध्यात काकू अन् चुलत भावाला कुऱ्हाडीनं संपवलं, नंतर आरोपीनं विष पित टोकाचं पाऊल उचललं

आणखी वाचा



Source link

मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, ले-आऊटवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री स्पष्टच बोलले

मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, ले-आऊटवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री स्पष्टच बोलले


अमरावती : राज्यात शेतकऱ्यांना (Farmer) कर्जमाफी देण्याची मागणी सातत्याने पुढे येत असताना राज्याचे मुख्यमंत्री व अर्थमंत्री यांनी कर्जमाफीबाबत योग्य वेळी निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यानंतर, आता महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar bawankule) यांनी देखील शेतकरी कर्जमाफीबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. अमरावती (Amravati) जिल्ह्यातील कौडण्यापूर येथील विठ्ठल मंदिराच्या दर्शनासाठी गेल्यानंतर आयोजित कार्यक्रमातून राज्य सरकारच्या योजनांबाबत माहिती देताना, राज्य सरकारने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयावर बोलताना सरकारकडून कर्जमाफीचा निर्णय देखील घेतला जाईल, अशी माहिती दिली. मात्र, ले-आऊटवाल्यांना, फार्म हाऊस वाल्यांना आणि कर्ज काढून मर्सिडीज घेऊन फिरणाऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.  

आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने लाडक्या बहि‍णींसाठी जो महिना 1500 रुपये सुरू केला होता, तो पुढच्या काळात लाडक्या बहिणीना 2100 रुपये देणार आहोत. आमच्या शेतकऱ्यांना आम्ही शेतकऱ्यांना शब्द दिला होता की, शेतकऱ्यांना पुढील 5 वर्षे शेतात वीजेचा बिल येणार नाही. तसेच, आमच्या सरकारने सांगितले की, खऱ्या खऱ्या गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी आम्ही देणार आहोत. त्यांची कर्जमाफी आम्ही करणार आहोत, पण शेतीवर कर्ज काढून ज्यांनी मर्सिडीज घेतल्या, ज्यांचे लेआऊट आहेत, फॉर्म हाऊससाठी कर्ज घेतलेल्यांना कर्जमाफी भेटणार नाही. धन दांडग्याना कर्जमाफी नको, ज्यांना गरज आहे त्यांनाच कर्जमाफी मिळायला हवी, असे देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले.

कर्जमाफीसाठी उच्चस्तरीय समिती

कर्जमाफीसाठी उच्चस्तरीय समिती तयार होत आहे, अधिवेशन काळात ती समिती घोषित करू, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्र्यासोबत कालच चर्चा झाली आहे, आमची समिती तयार होत आहे, अधिवेशन काळात ती घोषित करू.  येत्या 3 तारखेला 4 वाजतापासून रात्री 10 वाजेपर्यंत बच्चू कडू यांच्यासोबत विधानभवनात बैठक लावली आहे. माझ्या दालनात बैठका लावल्या आहेत. या बैठकीत 8 ते 10 मंत्री सोबत असतील, तेव्हा महत्त्वाच्या निर्णयाचे शासन निर्णय होतील, असेही त्यांनी सांगितले. 

अधिवेशनात शेतकरी कर्जमाफी महत्त्वाचा विषय

यंदाच्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा कार्यक्रम आणि वेळापत्रक निश्चित झाले आहेत. त्यानुसार 30 जून ते 18 जुलै या काळात पावसाळी अधिवेशन होणार आहे. यंदाच्या पावसाळी अधिवेशनात शाळांमध्ये पहिलीपासूनची हिंदी भाषेची सक्ती, शक्तीपीठ महामार्ग आणि शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन विरोधकांकडून महायुती सरकारला घेरले जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा

धक्कादायक! भाजप मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील 19 कारमध्ये डिझेलऐवजी भरले पाणी; पेट्रोल पंपच सील

आणखी वाचा



Source link