सराफा व्यावसायिकाला भरदिवसा संपवलं ; अमरावतीच्या तिवसा शहरातील खळबळजनक घटना

सराफा व्यावसायिकाला भरदिवसा संपवलं ; अमरावतीच्या तिवसा शहरातील खळबळजनक घटना


Maharashtra Amravati Crime : अमरावती जिल्ह्यातील (Amravati District ) तिवसा शहरात भर दिवसा घडलेल्या एका सराफा व्यवसायिकाच्या हत्येने  (Murder) सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे शहरात गुन्हेगारी नव्याने डोके वर काढत आहे का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. तिवसा शहरातील सराफा व्यावसायिक असलेले संजय मांडळे यांची भरदिवसा अज्ञात व्यक्तीकडून हत्या करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार चोरीच्या उद्देशातून घरी आलेल्या आरोपीने ही हत्या केली असावी असा संशय पोलिसांना आहे. सदर घटनेचा तपास तिवसा पोलीस करत असून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे. मात्र या घटनेमुळे गुन्हेगारी विश्वात पोलिसांचा दबदबा कमी तर झाला नाही ना? अशी प्रतिकीय नागरिकांमध्ये उमटतांना दिसते आहे. 

घरात कुणी नसल्याचा घेतला फायदा 

अमरावतीच्या  (Amravati) तिवसा शहरातील रहिवासी असलेले संजय मांडळे हे पेशाने सराफा व्यावसायिक (Bullion Businessman) आहेत. सोमवार 27 नोव्हेंबरच्या दुपारी मृतक संजय मांडळे यांची पत्नी या डायलेसिस या आजाराच्या रुग्ण होत्या. त्यामुळे त्यांना सतत डायलेसिस करण्याकरिता अमरावती येथे घेऊन जावे लागते होते. सोमवारी सुद्धा त्यांचा मुलगा वैशाक हा आपल्या एका मित्रासह आईला अमरावती येथून घेऊन गेला होता. तर मुलगी ही मामाकडे होती. दरम्यान संजय मांडळे हे घरी एकटेच होते. या संधीचा फायदा घेत त्यांच्यावर पाळत ठेवलेल्या काही अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घरात प्रवेश केला. घरात पैसे आणि मौल्यवान दाग-दागिने चोरण्याचा प्रयत्न या आरोपींचा होता. दारम्याने या आरोपी आणि मृतक संजय मांडळे यांच्याशी सामना झाला आणि त्यातून या आरोपीने संजय मांडळे यांची निर्घुण हत्या केली असावी, असा अंदाज पोलीस व्यक्त करत आहे. 

सदर घटनेचा तपास तिवसा पोलिसांकडून सुरू असून पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि अतिरिक्त पोलिस अधिक्षक विक्रम साळी यांनी घटना स्थळाची पाहणी करून अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. या प्रकरणाचा तिवसा पोलिसांसह गुन्हे शाखा पोलीस तपास करत असून आरोपींचा शोध घेत आहेत. प्राथमिक माहितीनुसार संजय मांडळे यांच्या घरी तब्बल 73 लाख सोन्याचे दागिने असल्याची कुणकुण या आरोपींना लागली असावी. त्याच दागिन्यांच्या चोरीसाठी आरोपींनी संजय मांडळे यांची निर्घृण हत्या केली असावी, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. हत्येच्यांच दिवशी मृतक संजय मांडळे यांची पत्नी आणि मुलगा अमरावती वरुण सायंकाळी परत आले असता तेव्हा त्यांना संजय मांडळे हे रक्तात पडलेले आढळले. तसेच यावेळी घरातील दागिण्याची बॅग घरातून  गायब होती. सदर घटनेची माहिती संजय मांडळे यांच्या पत्नीने पोलिसांनी दिली असून पोलिसांनी या अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. मात्र भर दिवसा घडलेल्या या थरारक घटनेमुळे शहरात मात्र दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.



Source link

Akola Crop Loss Rain : अकोल्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस, पावसामुळे रब्बी पिकांचं नुकसान

Akola Crop Loss Rain : अकोल्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस, पावसामुळे रब्बी पिकांचं नुकसान



<p>अकोल्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस, पावसामुळे रब्बी पिकांचं नुकसान, गेल्या २४ तासांत ३९.६ मिलीमीटर पावसाची नोंद.&nbsp;</p>



Source link

अमरावती, नागपूर विद्यापीठात 33 प्राध्यापकांचे नेट-सेट बनावट ?

अमरावती, नागपूर विद्यापीठात 33 प्राध्यापकांचे नेट-सेट बनावट ?


 अमरावती : महाविद्यालयात प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक पदासाठी राज्य पात्रता परीक्षा (सेट) अथवा राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट) आवश्यक आहे. मात्र, अमरावती (Amravati) विभागात काही जणांनी बनावट नेट-सेट प्रमाणपत्राच्या आधारे सहयोगी प्राध्यापक पदाची नोकरी बळकावल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आलीये. अमरावती आणि नागपूर विद्यापीठ संलग्न महाविद्यालयात प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक असे 33 जणांकडे बनावट नेट-सेट प्रमाणपत्र असल्याची माहिती समोर आली. 

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्न महाविद्यालयात तब्बल 19 प्राध्यापकांचे नेट-सेट प्रमाणपत्र बनावट असल्याची माहिती पुढे आली आहे. यासंदर्भात केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाचे पत्र अमरावती विद्यापीठाला प्राप्त झाले. यातील एक सहयोगी प्राध्यापकांचे नेट प्रमाणपत्र बनावट असल्याचे यामधून निष्पन्न झाले.  त्यानुसार नेट-सेट प्रमाणपत्राची माहती विद्यापिठाकडून महाविद्यालयाने मागवलीये.  अमरावती, नागपूर आणि नांदेड विद्यापीठातील तब्बल 69 प्राध्यापकांचे नेट-सेट बनावट असल्याची माहिती मिळत असल्याने राज्यात मोठा रॅकेटच काम करत असल्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येतेय. 

बोगस प्रमाणपत्र युजीसीकडे सादर

वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्याच्या कामरगाव येथील कला विज्ञान महाविद्यालयामध्ये कार्यरत असलेले शारीरिक शिक्षक तथा सहयोगी प्राध्यापक सुरेंद्र तुळशीरामजी चौहान यांचे नेट प्रमाणपत्र बोगस असल्याचा अहवाल यूजीसीने विद्यापीठाकडे सादर केला.  त्यामुळे प्राध्यापक चौहान यांचे नेट प्रमाणपत्र फेक असल्याचे उघड झाले.  प्राध्यापक चौहान यांच्या विरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करण्याचे निर्देश यूजीसीने दिलेत. त्यानुसार प्राचार्य जाणे यांनी तक्रार दाखल करण्यासाठी धनज पोलीस स्थानकात धाव घेतली. परंतु येथील ठाणेदार योगेश इंगळे हे 27 नोव्हेंबर पर्यंत सुट्टीवर असल्याने प्रभारी ठाणेदारांनी तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यामुळे 28 नोव्हेंबरला प्राध्यापक चौहान यांचे विरुद्ध धनज पोलिसात तक्रार दाखल  करणार असल्याची माहिती प्राचार्य जाणे यांनी दिली.

महाविद्यालयाने प्रमाणपत्राची पडताळणी केली नाही? 

चौहान यांनी डिसेंबर 2004 मध्ये फिजिकल एज्युकेशन नेट परीक्षा प्रमाणपत्र जोडून ही नोकरी मिळविली असून आता ते प्रमाणपत्र फेक असल्याचे उघड झालय. त्यामुळे त्यांनी बनावट प्रमाणपत्र कसे मिळविले असा सवाल सध्या उपस्थित केला जातोय. शिवाय विद्यापीठ आणि महाविद्यालयाने नेट प्रमाणपत्राची पडताळणी न करता सहयोगी प्राध्यापक पदाला मान्यता दिली कशी प्रश्न देखील महाविद्यालयाला विचारण्यात येतोय. त्यामुळे या प्रकरणात महाविद्यालयाकडून प्राध्यापकांवर आणि युजीसीकडून महाविद्यालयांवर कोणती कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 

हेही वाचा : 

Maratha Reservation : शिंदे समितीने घेतला अमरावती विभागाचा आढावा, कुणबी प्रमाणपत्रासाठी जुनी अभिलेखे तपासण्याचे निर्देश



Source link

‘खासदार अमोल कोल्हे लवकरच अजितदादांसोबत येतील’, अमोल मिटकरींचा दावा

‘खासदार अमोल कोल्हे लवकरच अजितदादांसोबत येतील’, अमोल मिटकरींचा दावा


मुंबई : ‘राष्ट्रवादीच्या शरद पवार (Sharad Pawar) गटाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) लवकरच अजितदादांसोबत येतील’ असं वक्तव्य राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केलंय. ते अकोला येथे ‘एबीपी माझा’शी बोलत होते. अमोल कोल्हेंचं प्रतिज्ञापत्र अजित पवार गटाकडे असल्याचे संकेत दोन महिन्यांपूर्वी मिटकरींनी ‘माझा’शी बोलतांना दिले होते. दरम्यान, राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे दोन्ही अजित पवार गटाकडेच मिळणार असल्याचा आशावाद मिटकरींनी व्यक्त केलीय. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणाचं आंदोलन भरकटत असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय. जरांगे पाटील यांच्या छगन भूजबळांसंदर्भातील भाषेवरही त्यांनी शंका उपस्थित केलीय. 

नुकतीच अजित पवार गटाकडून लोकसभेतील खासदारांवर कारवाई करण्यासाठी पत्र देण्यात आलं होतं. यामध्ये  खासदार अमोल कोल्हे यांचे नाव वगळण्यात आलं.  अमोल कोल्हे यांनी आधीच अजित पवार गटाला प्रतिज्ञापत्र सादर करत आपला पाठिंबा दर्शवल्याची माहिती समोर आली होती. पण, अजित पवार गटाला जरी शपथपत्र दिलं असलं तरी त्यांनी शरद पवार गटाला देखील शपथपत्र देत आपण शरद पवार गटासोबत असल्याचा दावा केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं.

अमोल कोल्हे लवकरच अजितदादांसोबत येतील – अमोल मिटकरी

मला शिवसंदेश यात्रेत संधी ही अजित पवार अमोल कोल्हेंमुळे मिळाली होती. त्यांच्या नेतृत्वामध्ये एखाद्या यात्रेत पुन्हा एकदा काम करण्याची संधी मिळाली तर आणखी आनंद होईल. राज्यसभेतील आणखी काही खासदारांची प्रतिज्ञापत्रं आमच्याकडे आहेत. त्यामुळे खासदार अमोल कोल्हे देखील लवकरच अजित दादांसोबत येतील असा दावा देखील अमोल कोल्हे यांनी केलाय. 

राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांचीच – अमोल मिटकरी

सध्या निवडणूक आयोगात राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह यांच्या लढाई सुरु आहे. यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस ही अजितदादांचीच असून निवडणूक आयोगाच्या निकालानंतर त्यावर शिक्कामोर्तब होईल. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे दोन्ही अजित पवारांनी गटालाच मिळणार असल्याची प्रतिक्रिया अमोल मिटकरींनी दिली. 

जरांगे पाटलांचं आंदोलन भरकटतयं – अमोल मिटकरी

मनोज जरांगे यांचं आंदोलन सध्या भरकटत असून त्यामध्ये आता राजकारण घुसलंय. भुजबळ हे मोठे नेते आहे, त्यांच्याविरुद्ध जरांगेंची भाषा ही आक्षेपार्ह्य आहे. जरांगे हे राजकीय वक्तव्यांमुळे दूर जाणार असल्याची शक्यता देखील यावेळी मिटकरींनी बोलताना व्यक्त केली. 

हेही वाचा : 

Ajit Pawar Amol Kolhe : सकाळी खासदार अपात्रतेच्या पत्रातून नाव वगळलं, दुपारी अमोल कोल्हे अजित पवारांच्या भेटीला; कोल्हे म्हणतात…



Source link

पंकजा मुंडे शिंकल्या तरी बातमी होते, दुर्दैवाने त्यांचं नुकसान होतंय : चंद्रकांत पाटील

पंकजा मुंडे शिंकल्या तरी बातमी होते, दुर्दैवाने त्यांचं नुकसान होतंय : चंद्रकांत पाटील


Amravati news अमरावती : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी चष्मा लागल्याचा व्हिडीओ शेअर करताना, त्यांनी केलेल्या वक्तव्यावरुन राजकीय चर्चांना ऊत आला. त्यावर आता भाजप नेते आणि राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तसेच अमरावतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)  यांनी प्रतिक्रिया दिली. 

“पंकजाताईंचं दुर्दैव असं आहे की त्या शिंकल्या तरी बातमी होते, त्या हसल्या तरी बातमी होते. कधी गंभीर झाल्या की बातमी होते. त्यामुळे त्यांचं दुर्दैव की त्यांच्या प्रत्येक म्हणण्याचा वेगळा अर्थ काढला जातो. त्यामुळे तुम्ही त्यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढल्यामुळे त्यांचं मोठं नुकसान होतं आहे”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. ते अमरावतीत बोलत होते. 

पंकजा मुंडे काय म्हणाल्या होत्या? (Pankaja Munde Video)

आपल्याला जवळचा चष्मा लागलाय असं पंकजा मुंडेंनी गाणं गात सांगितलं होतं. आता जवळचं सगळं स्पष्ट दिसेल असंही पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. आमच्या पप्पांनी गणपती आणला, या गाण्याच्या चालीवर ताईला चष्मा लागला, असं म्हटलं होतं. लांबचा चष्मा नाही बरं का, जवळचा चष्मा आहे, जवळचं कमी दिसत होतं वाटतं. ते आता स्पष्ट दिसायला लागेल. छोटा नंबर आहे. दूरचं आधीही चांगलं दिसत होतं, आताही चांगलं दिसतं असं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. 

चंद्रकांत पाटील काय म्हणाले? (Chandrakant Patil on Pankaja Munde)

चंद्रकांत पाटील यांना पंकजा मुंडे यांनी शेअर केलेल्या व्हिडीओबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, “पंकजा मुंडे शिंकल्या तरी बातमी होते. मीडियातून चुकीचा अर्थ काढला जातो आणि त्यांचं नुकसान होतं.”

संजय राऊतांना सीरियस घेत नाहीत (Chandrakant Patil on Sanjay Raut)

दरम्यान, यावेळी चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला. “संजय राऊत यांना त्यांच्या पक्षात कोणीही सीरियस घेत नाही. राज्यातही कोणी सीरियस घेत नाही. केवळ तुम्ही रोज भरपूर दाखवता म्हणून रोज उत्साहाने बोलण्याचं धाडस ते करतात”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

मराठवाड्याला हक्काचं पाणी मिळेल 

जायकवाडी धरणातील पाण्याबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले, उपमुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री यांनी कालच सांगितले की मराठवाड्याला त्यांना त्यांच्या हक्काचं पाणी मिळेल. 

मागासवर्ग आयोग हे स्वायत्त आहे. मुख्यमंत्रीही त्यांना सूचना देऊ शकत नाही.घटनेअंतर्गत तरदूत असलेला तो आयोग आहे.त्यामुळे त्यावर मी टिप्पणी करणं योग्य नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. 

संबंधित बातम्या



Source link

Amravarti : अमरावती बंदचं आवाहन शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानकडून मागे, पोलिसांसोबतच्या बैठकीनंतर निर्णय

Amravarti : अमरावती बंदचं आवाहन शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानकडून मागे, पोलिसांसोबतच्या बैठकीनंतर निर्णय



<p>अमरावती जिल्ह्यातील रिद्धपुर येथे एका युवकाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल आक्षेपार्ह पोस्ट समाज माध्यमावर प्रसारीत केल्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.. या घटनेचा निषेध म्हणून मोर्शी, दर्यापूर, चांदूरबाजार नंतर आज अमरावती शहर बंदचं आवाहन हिंदुत्ववादी संघटने कडून करण्यात आले होते पण पोलिसांच्या बैठकीत हा निर्णय मागे घेतल्याचं सांगण्यात आले..</p>



Source link

YouTube
Instagram
WhatsApp