कुणबी प्रमाणपत्रासाठी जुनी अभिलेखे तपासण्याचे न्या. शिंदे समितीचे निर्देश

कुणबी प्रमाणपत्रासाठी जुनी अभिलेखे तपासण्याचे न्या. शिंदे समितीचे निर्देश

अमरावती: मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तिंना देण्याबाबतची कार्यपद्धती विहीत करण्यासाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली शासनाने समिती (Justice Shinde Committe On Maratha Reservation) स्थापन केली आहे. या समितीची कार्यकक्षा संपूर्ण महाराष्ट्र राज्य करण्यात आली आहे. समितीला यासंबंधीचा अहवाल सादर करावयाचा असल्याने कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीची नोंद असलेले दस्तावेज आणि कागदपत्रांचा समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे (नि.) यांनी विभागीय बैठकीत आढावा घेतला.

समितीच्या कामकाजाच्या अनुषंगाने राज्यातील महसूली विभागात दौऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुषंगाने अमरावती येथील विभागीय आयुक्त कार्यालयात निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांनी मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीच्या नोंदी, अनुषंगिक बाबींचा आणि कामकाजाचा आढावा घेतला. विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय, विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, विधी व न्याय विभागाचे सहसचिव ॲड. शेखर मुनघाटे, समिती कक्षाचे उपसचिव विजय पोवार, ॲड. अभिजीत पाटील, कक्ष अधिकारी माधुरी देशमुख यांचेसह पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि इतर विभागांचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते.

न्यायमूर्ती शिंदे म्हणाले की, अमरावती विभागांतर्गत असणाऱ्या पाचही जिल्ह्यांत कुणबी व मराठा जातीच्या समाजाची लोकसंख्या अधिक प्रमाणात आहे. शासकीय विभागाकडे विशेषत: महसूल विभागाकडे असलेल्या महसूली अभिलेखांच्या सन 1948 पूर्वीच्या तसेच सन 1948 ते सन 1967 कालावधीतील मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीच्या नोंदीची तपासणी करुन त्याबाबतचा अहवाल समितीला सादर करण्यात यावा. तसेच जिल्ह्यातील नागरिकांकडून त्यांच्याकडे उपलब्ध असलेले पुरावे, वंशावळी, शैक्षणिक व महसुली पुरावे, संस्थानिकांनी दिलेल्या सनदा, राष्ट्रीय दस्तावेज इ. जुनी अभिलेखे जिल्हाधिकारी कार्यालयातील स्थापित विशेष कक्षाने स्वीकारुन त्याबाबतही अहवाल सादर करण्यात यावेत.

अमरावती विभागातील पाचही जिल्हा प्रशासनाचा याअनुषंगाने कामकाजाचा सविस्तर आढावा न्यायमूर्ती शिंदे यांनी बैठकीत घेतला. मागील पाच वर्षात मराठा, कुणबी जातीचे जात प्रमाणपत्र वितरणाचा तसेच विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून अवैध ठरलेल्या प्रकरणांच्या कारणांचा आढावा घेतला. प्रारंभी विभागीय आयुक्त डॉ. पाण्डेय यांनी प्रास्ताविकात कामकाजाची माहिती देवून विभागात कुणबी जातीच्या नोंदी आढळलेल्यांची संख्या 20,06,413 असल्याचे सांगितले..

यावेळी अमरावती विभागातील पाच जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी माहितीचे सादरीकरण करुन कुणबी जाती विषयक सांख्यिकी आणि केलेल्या कामकाजाविषयी विवेचन केले. यावेळी अधिकाऱ्यांनी प्रकरणांचे निरीक्षण, पडताळणी, तपासणी, वस्तुस्थितीबाबत समिती अध्यक्षांना सविस्तर माहिती दिली.

ही बातमी वाचा:

Source link

Amravati : दर्यापूरमध्ये दुकानदार आणि हिंदुत्ववादी संघटनेत बाचाबाची

Amravati : दर्यापूरमध्ये दुकानदार आणि हिंदुत्ववादी संघटनेत बाचाबाची

Amravati : दर्यापूरमध्ये दुकानदार आणि हिंदुत्ववादी संघटनेत बाचाबाची दर्यापूर मध्ये काही विशिष्ट समाजाच्या दुकानं बंद करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते गेले असता झाली बाचाबाची

Source link

Amravati Bandh : शिवरायांबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याच्या निषेधार्थ अमरावती बंद

Amravati Bandh : शिवरायांबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याच्या निषेधार्थ अमरावती बंद

शिवरायांबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनेकडून मोर्शी, दर्यापूर आणि चांदूरबाजार शहर बंदचं आवाहन, तर पोस्ट व्हायरल करणाऱ्याला अमरावती जिल्ह्यातून तडीपार करण्याची मागणी.

Source link

कुणबी प्रमाणपत्रासाठी जुनी अभिलेखे तपासण्याचे न्या. शिंदे समितीचे निर्देश

न्यायमूर्ती शिंदे समिती उद्यापासून अमरावती, नागपूर दौऱ्यावर

नागपूर : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला (Shinde Committee) राज्य सरकारने अहवाल सादर करण्यासाठी 24 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्या अनुषंगाने कार्यपद्धती विहित करण्यासाठी गठित समितीचे कार्यक्षेत्र संपूर्ण राज्य करण्यात आले आहे. शासन निर्णय 3 नोव्हेंबर 2023 नुसार राज्यातील  मराठा- कुणबी, कुणबी- मराठा जातीच्या पात्र व्यक्तींना राज्यात सक्षम अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जात प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी मराठवाड्याच्या धर्तीवर इतरत्र विशेष कक्ष स्थापन केले आहे. तसेच या कक्षाला अधिक मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश  निवृत्त न्यायमूर्ती तथा गठित समितीचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिले आहे. याच पार्श्वभूमीवर  कुणबी मराठा जात प्रमाणपत्र समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची समिती उद्या बुधवार दि. 22 नोव्हेंबर 2023  पासून अमरावती ( Amravati ) आणि नागपूर ( Nagpur ) दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यामध्ये अमरावती येथील विभागीय कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन कुणबी नोंदी तपासल्या जाणार आहेत. त्यानंतर दिनांक 23 नोव्हेंबरला पुन्हा नागपुरात प्रमाणपत्रांच्या वाटपाबाबत बैठक घेण्यात येणार आहे.

राज्य सरकारने मराठा समाज आर्थिकदृष्ट्या कसा मागास आहे, या समाजाला शैक्षणिक आणि सरकारी नोकरीमध्ये कसे आरक्षण देता येईल यासाठी न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली असून ही समिती सध्या राज्याच्या दौर्‍यावर आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा सध्या जोर धरत असताना सरकारने हालचालींना वेग आणला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती सध्या विदर्भाच्या दौऱ्यांवर आहे.  22 नोव्हेंबरला ही समिती अमरावती येथील पडताळणी आटोपल्यानंतर 23 नोव्हेंबरला पुन्हा नागपुरात प्रमाणपत्रांच्या वाटपाबाबत बैठक घेणार आहे. मराठा समाजाला मराठा- कुणबी, कुणबी- मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने अभिलेखांची तपासणी, तसेच नोंदी प्रशासनाकडून तपासण्यात येत आहेत. ज्यामध्ये मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्र जिल्हा व तालुकास्तरावरील सर्व कार्यालयांमध्ये अभिलेख तपासणीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. तहसील कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालयस्तरावरील  पेरेपत्रक, कुळ नोंदवही, हक्क नोंद पत्रक, कोतवाल बुकांची नक्कल, टिपण बुक, योजना बुक तपासणी करण्यात येत आहे. अभिलेखांची तपासणी व अभिलेख उपलब्ध करून देण्याबाबतची कार्यवाही ठराविक कालावधीत पूर्ण करण्याचे आदेश सर्वच जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते. त्यानुसार 1948 ते 1967 या कालावधीतील नोंदी तपासण्यात येत आहेत. यापूर्वी  या तपासणीमध्ये मराठा- कुणबी, कुणबी- मराठा अशा अनेक नोंदी आढळल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर अधिक नोंदी शोधण्याचे काम सध्या राज्यभर सुरू आहे.

>> असा असेल समितीचा दौरा

> अमरावती विभाग (अमरावती, यवतमाळअकोला, वाशिम व बुलडाणा) – बुधवार दि. 22 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11.30 वा. विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती येथे बैठक होणार आहे.

> नागपूर विभाग (नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली ) – गुरुवार दि. 23 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11 वा. विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर येथे बैठक होणार आहे.

> कोल्हापूर व सांगली – मंगळवार दि. 28 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे बैठक होणार आहे.

> पुणे विभाग ( पुणे, सातारा व सोलापूर) – बुधवार दि. 29 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11 वा. विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे येथे बैठक होणार आहे.

> नाशिक विभाग (नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे व नंदुरबार) – शनिवार दि. 2 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 12 वा. विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक येथे बैठक होणार आहे.

> सिंधुदुर्ग व रत्नागिरी – सोमवार दि. 11 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्गनगरी, ओरोस येथे बैठक होणार आहे.

> कोकण विभाग ( मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर व रायगड) – गुरुवार दि. 14 डिसेंबर 2023 सकाळी 11 वा. विभागीय आयुक्त कार्यालय, कोकण भवन, बेलापूर, नवी मुंबई येथे बैठक होणार आहे. या प्रमाणे दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Source link

Asha Mirge : अकोल्यातील अल्पवयीन मुलीवरील अमानवी अत्याचार प्रकरणातील आरोपींचं मॉब किलिंग व्हायला हवं

Asha Mirge : अकोल्यातील अल्पवयीन मुलीवरील अमानवी अत्याचार प्रकरणातील आरोपींचं मॉब किलिंग व्हायला हवं

अकोला अल्पवयीन मुलीवर अमानवी अत्याचार प्रकरणी, राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या डॉ. आशा मिरगे यांचं वादग्रस्त नक्तव्य. आरोपींचं मॉब किलिंग व्हायला हवं. डॉ. आशा मिरगे याची संतप्त प्रतिक्रिया.

Source link

Akola News : डॉ. मिरगेंच्या अशा मागणीचं समर्थन कधीच केलं जाऊ शकत नाही : सुषमा अंधारे

Akola News : डॉ. मिरगेंच्या अशा मागणीचं समर्थन कधीच केलं जाऊ शकत नाही : सुषमा अंधारे

डॉ. मिरगेंच्या अशा मागणीचं समर्थन कधीच केलं जाऊ शकत नाही. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचं मिरगे यांना प्रत्युत्तर.

Source link

YouTube
Instagram
WhatsApp