Akola Crime : अकोल्यातील घटना निंदनीय, कडक शिक्षा देण्याबाबत कार्यवाही केली जाईल – रूपाली चाकणकर

Akola Crime : अकोल्यातील घटना निंदनीय, कडक शिक्षा देण्याबाबत कार्यवाही केली जाईल – रूपाली चाकणकर



<p>Akola Crime : अकोल्यातील घटना निंदनीय, कडक शिक्षा देण्याबाबत कार्यवाही केली जाईल – चाकणकर&nbsp;</p>



Source link

अल्पवयीन मुलीचे मुंडन करून तिच्यावर लैंगिक अत्याचार, सार्वजनिक स्थळी विवस्त्र करण्याचा प्रयत्न

अल्पवयीन मुलीचे मुंडन करून तिच्यावर लैंगिक अत्याचार, सार्वजनिक स्थळी विवस्त्र करण्याचा प्रयत्न


अकोला: अकोल्यातील एका घटनेने राज्यातील महिला आणि मुली खरंच सुरक्षित आहेत का? असा प्रश्न निर्माण झालाय आहे. अकोल्यात एका गावगुंडाने एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अक्षरश: अमानवी अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. पीडित मुलीला सिगारेटचे चटके देत, तिचं मुंडन करत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. यानंतर तिला सार्वजनिक स्थळी विवस्त्र करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी अकोल्यातील खदान पोलिसांनी आरोपी गुंड गणेश कुमरे उर्फ गणीभाईला अटक करत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.  
 
अकोल्यात खरंच कायदा आणि सुव्यवस्था राहिली आहे का? असा प्रश्न आता विचारण्यात येतोय. चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर सिगारेटचे चटके देत, तिचं मुंडन करण्यात आलं. नंतर तिच्यावर अमानवीय लैंगिक अत्याचार करण्यात आले. एवढंच नाही तर कैलासटेकडी स्मशानभूमी परिसरात विवस्त्र करीत तिची धिंड काढण्याचा प्रयत्नही झाला. 

शहरातील कैलास टेकडी भागात परिसरात गुंड गणेश कुमरे याची दहशत आहे. पीडित मुलीचे वडील मजुरी करतात. तिला एक मोठी बहीण आणि लहान भाऊ आहे. गेल्या दोन वर्षांपासून या गुंडानं सातत्यानं दहशत माजवत मुलीवर अत्याचार केला. मात्र दोनदा पोलिसात जाण्याचा प्रयत्न करूनही पोलिसांच्या दुर्लक्षामुळे निर्ढावलेल्या या गावगुंडानं मुलीचं आख्ख आयुष्यच बरबाद केलं.
 
बुधवारी आणि गुरूवारी या गुंडानं हैदोस घालत मुलीवर पुन्हा अत्याचार केला. शुक्रवारी या प्रकरणाची माहिती स्त्री चळवळीतील नेत्या आणि वंचितच्या प्रदेश महासचिव अरूंधती सिरसाट यांना मिळाली. या प्रकरणाला वाचा फुटली. मात्र अकोल्यातील खदान पोलिसांनी हे प्रकरण असंवेदनशीलपणे हाताळल्याचा आरोप अरूंधती सिरसाट यांनी अकोला पोलिसांवर केला. 

गावगुंड गणेश कुमरेची गुन्हेगारी पार्श्वभूमी : 

1) अकोल्यातील कैलासटेकडी भागातील गावगुंड अशी गणेशची ओळख. 
2) गावगुंड गणेशची कैलासटेकडी परिसरात ‘गणीभाई’ या टोपणनावाने ओळख. 
3) गणेशचा कैलासटेकडी परिसरात दारू आणि गांजाविक्रीचा धंदा. 
4) त्याच्यावर खदान पोलिस स्टेशनमध्ये अनेक गुन्हे दाखल. 
5) गणेशच्या दहशतीमुळे लोक तक्रार करण्यास घाबरत असल्याची माहिती. 
 
याप्रकरणी खदान पोलिसांनी आरोपी गुंड गणेश कुमरे उर्फ गणीभाईला अटक करीत त्याच्यावर गुन्हा दाखल केला. तर पीडित मुलीची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. सध्या अकोला पोलिसांची यावर कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकली नाही. तर मुलीच्या समाजातील नेत्यांनी हा खटला जलदगती न्यायालयात चालवत मुलीच्या पुनर्वसनाची मागणी केली. 

राज्यातील महिला आणि मुलींच्या सुरक्षेविषयी अनेकदा प्रश्न निर्माण करणाऱ्या घटना सातत्याने घडत आहेत. मात्र पुरोगामी महाराष्ट्रातील या घटना थांबता थांबत नाहीत. अकोल्यातील घटना जितकी संतापजनक आहे, तितकीच गंभीरही आहे.

 

 



Source link

गेल्या 70 वर्षांत ओबीसी नेत्यांनी समाजासाठी काय केलं? आमदार बच्चू कडूंची ओबीसी नेत्यांवर टीका

गेल्या 70 वर्षांत ओबीसी नेत्यांनी समाजासाठी काय केलं? आमदार बच्चू कडूंची ओबीसी नेत्यांवर टीका


नागपूर : गेली 70-75 वर्षे ओबीसी (OBC) नेते  सत्तेत होते, तेव्हा  त्यांनी ओबीसी समाजासाठी काय केलं? असा थेट सवाल आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी केला. गेल्या 75 वर्षापासून जर शेतीचे प्रश्न मिटले असते, मजुराला चांगली मजुरी मिळाली असती तर आरक्षणाचा हा मुद्दा समोर आलाच नसता हे सूर्य प्रकाशाएवढे सत्य आहे. त्यामुळे ओबीसी सभेप्रमाणेच (Jalna OBC Sabha) सर्व मतभेद, पक्ष विसरून ओबीसीसाठी एकत्र आलेल्या नेत्यांनी शेतकरी, शेतमंजुरांसाठी एकत्र यावे, आम्ही सुद्धा स्टेजवर येऊ असा  सल्ला बच्चू कडू यांनी दिला. जाती धर्माच्या नावाने लोक पेटतात हे राजकीय लोकांनी बरोबर हेरले आहे, त्यामुळे सर्व समाज बांधवांनी आपले कशात भले आहे हे ओळखले पाहिजे असे मत देखील बच्चू कडू यांनी बोलतांना व्यक्त केले आहे.

मराठा समाजाला (Maratha Reservation) सरसकट कुणबी दाखले (Kunbi Certificate ) देऊ नये या प्रमुख मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये भव्य ओबीसी सभेचे (Jalna OBC Sabha) आयोजन करण्यात आले होते. या सभेस्थळी एकाच मंचावर ओबीसी समाजाचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. त्यामध्ये  प्रामुख्याने अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar), महादेव जानकर (Mahadev Jankar), इत्यादींसह अनेकांचा समावेश आहे. यावर बच्चू कडू ( Bachchu Kadu) यांनी आपली प्रतिक्रिया देताना ओबीसी सभेला शुभेच्छा देत आता ओबीसी सभेप्रमाणेच सर्व मतभेद, पक्ष विसरून शेतकरी, शेतमंजुरांसाठी एकत्र या असा सल्ला दिला आहे.

कधी धर्माच्या नावानं चांगभलं, तर कधी जातीच्या नावानं चांगभलं

ओबीसी सभेवर (OBC Sabha) प्रतिक्रिया देतांना बच्चू कडू ( Bachchu Kadu) म्हणाले की, तुम्ही ज्यावेळी 70-75 वर्षे सत्तेत होते तेव्हा ओबीसी साठी काय केलं? कधी धर्माच्या नावानं चांगभलं, तर कधी जातीच्या नावानं चांगभलं. शेतकऱ्यांसाठी लोक पेटवून पेटत नाहीत, मात्र जाती धर्माच्या नावाने लोक पेटतात हे राजकीय लोकांनी बरोबर हेरले आहे. त्यामुळे सर्व समाज बांधवांनी आपले कशात भले आहे हे ओळखले पाहिजे.

तर आम्ही देखील स्टेजवर येऊ

आमदार बच्चू कडू म्हणाले की, येणाऱ्या काळात जातीपातीचे प्रश्न हे अधिक मोठे होणार आहेत. त्यावरून राजकारण होणार आहे, दोन समाजात लढाया लागणार आहे. मात्र प्रत्येक समाजाच्या लोकांना मी विनंती करतो की नेत्यांच्या भाषणावर भडकू नका. तुम्ही भडकले तर राजकारण्यांच भलं होणार आहे. माझ्यासारख्याचे भलं होणार आहे. आमचं भलं होण्यापेक्षा तुमचं भलं कशात हे ओळखा. कारण 75 वर्षापासून जर शेतीचे प्रश्न मिटले असते, मजुराला चांगली मजुरी मिळाली असती तर आरक्षणाचा हा मुद्दा समोर आला नसता. हे सूर्य प्रकाशाएवढे सत्य आहे. मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोणी समोर येत नाही याचं दुःख आहे. आज या निमित्ताने सर्व नेते एकत्र आले तसेच शेतकऱ्यांच्या मुद्द्यासाठी सुद्धा सर्वांनी एकत्र यावं, आम्ही सुद्धा त्या स्टेजवर येऊ.

ही बातमी वाचा: 

 



Source link

दोन समाजात दंगली घडवण्याचा काहींचा प्रयत्न सुरू; प्रकाश आंबेडकरांचा भुजबळांचे नाव न घेता आरोप

दोन समाजात दंगली घडवण्याचा काहींचा प्रयत्न सुरू; प्रकाश आंबेडकरांचा भुजबळांचे नाव न घेता आरोप


अकोला: आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यात दोन समाजात दंगली घडवण्याचा काहींचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला आहे. छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) जालन्यातील ओबीसी मेळाव्याच्या (Jalna OBC Melava) ठिकाणाहून मनोज जरांगेंना आव्हान देण्याची गरज काय होती असा सवालही त्यांनी विचारला. 

आज अकोल्यातील जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ओबीसी संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला प्रकाश आंबेडकर, प्रा. अंजली आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना आंबेडकरांनी आजच्या अंबडमधील ओबीसी एल्गार सभेवर टीका केली. या सभेत बोलताना युवानेते सुजात आंबेडकरांनी आरक्षणासोबतच शेतमालाला भाव आणि ओबीसी जनगणनेचा प्रश्न महत्वाचा असल्याचं म्हटलंय. 

भुजबळांनी जरांगेंना राजकीय आव्हान देण्याची गरज काय होती? 

वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यात दोन समाजात दंगली घडवण्याचा काहींचा प्रयत्न आहे. पण आम्ही हे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी जिल्ह्याजिल्ह्यात बैठका घेऊ. अंबडच्या आजच्या सभेत भुजबळांना जरांगेंना राजकीय आव्हान देण्याची गरज काय होती? आरक्षणावरून भांडून काय साध्य होणार? आपल्याला एकत्र राज्यातच रहायचं आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न कायद्याच्या चौकटीत सुटू शकतो. 

जरांगेंचा बोलविता धनी कोण विचारणाऱ्या राज ठाकरेंचा बोलविता धनी कोण? असा प्रश्न प्रकाश आंबेडकरांनी विचारला आहे. 

भुजबळांची मनोज जरांगेंवर टीका 

जालन्यात झालेल्या ओबीसी मेळाव्यामध्ये राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, मराठा समाजाचे नवीन झालेले नेते त्यांना हे आरक्षण कळणार नाही, ते त्यांच्या डोक्याच्या बाहेर आहे. कुणाचं खाताय म्हणतो, अरे तुझं खातो काय?, यांना काहीच माहित नाही. अरे आरक्षण काय आहे आधी ते तर समजून घे, आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही. छगन भुजबळ दोन वर्ष बेसन भाकर खाऊन आला असा म्हणतो, हो खातो बेसण भाकर कांदा, आजही खातो. पण तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही, असा टोला भुजबळांनी जरांगेंना लगावला. आमची सुद्धा लेकरं आहे, तुम्ही वेगळ आरक्षण घ्या, असे भुजबळ म्हणाले. 

जालन्यात ओबीसी महाएल्गार सभा

मराठा समाजाला ओबीसीमधून सरसकट आरक्षण देऊ नये या मागणीसाठी जालन्यातील अंबडमध्ये ओबीसी नेत्यांची जाहीर सभा झाली. ओबीसीमधून मराठा समाजाला सरसकट आरक्षण देऊ नये यासाठी सर्वात आधी मंत्री छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर त्यांना इतर ओबीसी नेत्यांचा देखील पाठिंबा मिळाला. जालन्यातील सभेत छगन भुजबळांनी मनोज जरांगे यांच्यावर सडकून टीका केली. त्यानंतर जरांगे यांनीही त्याला प्रत्युत्तर दिलं.

ही बातमी वाचा: 



Source link

शरद पवारांनी मोदींसोबत यावं, यासाठी अजितदादा प्रयत्नशील:  आमदार रवी राणा

शरद पवारांनी मोदींसोबत यावं, यासाठी अजितदादा प्रयत्नशील: आमदार रवी राणा


अमरावती : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी (Sharad Pawar) पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत यावं, यासाठी अजित पवार (Ajit Pawar) प्रयत्नशील असल्याचं वक्तव्य अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी केले आहे.  अजित पवार आणि अमित शाहांच्या (Amit Shah) भेटीत अनेक रहस्य दडलेले आहेत, असा गौप्यस्फोट  आमदार रवी राणा यांनी केला आहे. 

रवी राणा  म्हणाले,  शरद पवार हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आहेत. अजित पवार हे सातत्याने शरद पवारांना मोदींसोबत सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करत आहेत. शरद पवार  देखील यामुळे तयार झाले असतील असं मला वाटते. अजित पवार आणि अमित शहा यांच्या भेटीत भेटीत अनेक रहस्य दडलेले आहेत. राजकारणात अनेक घडामोडी घडत असतात. येणाऱ्या काळातही काही घडामोडी घडणार आहेत. शरद पवार मोदीजींचे काम बघून त्यांना नक्कीच पाठिंबा देतील.

येत्या काळात काँग्रेसचे अनेक नेते आपल्याला भाजपसोबत

रवि राणा म्हणाले,  राज्याच्या विकासासाठी पवार साहेब मोदीजींना पाठिंबा देतील आणि राज्य सरकार मजबूत करतील असं चित्र सध्या दिसत आहे. निवडणुकांपूर्वी अनेक घडामोडी घडणार आहेत.  काँग्रेसचे अनेक नेते आपल्याला भाजपसोबत दिसतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सुद्धा आपल्याला मोदीजींसोबत दिसतील.

मंत्रीपद माझ्यासाठी महत्त्वाचे नाही

मंत्रिमंडळ विस्ताराची किंवा मंत्रीपदाची मी कधीही मागणी केली नाही आणि मला मंत्रीपदात इंटरेस्टही नाही. जनतेचे प्रश्न आणि जनतेचा विकास हे माझ्यासाठी प्राधान्य आहे. मंत्रीपद माझ्यासाठी महत्त्वाचे नाही. मी कधीच विस्ताराबद्दल विचारलं नाही आणि त्याची अपेक्षाही नाही, असे रवी राणा म्हणाले.  

अजित पवारांनी घेतली अमित शाहांची भेट

अमित शाह यांच्या भेटीसोबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, महाराष्ट्र अध्यक्ष सुनील तटकरे हे देखील सोबत होते. मागील काही दिवसांमध्ये राज्यात राजकीय घडामोडी सुरू आहेत. मराठा आरक्षण आंदोलन, ओबीसी आरक्षण आंदोलनाचा मुद्दा तापला आहे. राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून महायुतीच्या सरकारमध्ये एकवाक्यता नसल्याचे दिसून आले होते. त्यामुळे सरकारबद्दलची प्रतिमा चुकीची जात असल्याची चर्चा सुरू होती. त्याशिवाय, मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकटेच आंदोलनाला सामोरे जात असल्याचे चित्र होते. तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निवडणूक प्रचारात होते. तर, अजित पवार हेदेखील आजारपणात होते  

हे ही वाचा :

मराठा, धनगर, ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर थेट अमित शाह लक्ष घालण्याची शक्यता, लवकरच राज्यांतील महायुतीच्या नेत्यांची घेणार बैठक



Source link

खाजगी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांची लूट, बसचं भाडं दोन ते तीन पट जास्त

खाजगी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांची लूट, बसचं भाडं दोन ते तीन पट जास्त


अकोला : सध्या दिवाळीमुळे राज्यभरातील चाकरमान्यांची लगबग सुरू आहे ती आपल्या गावाकडे जाण्याची… मात्र, गावाकडे पोहोचतांना चाकरमान्यांचा खिसा खाली होतोये ते अव्वाच्या सव्वा बस भाड्यामुळे. एकीकडे सरकारनं 2018 मध्ये   प्रवाशांची खाजगी बसेसकडून होणारी लुटमार थांबविण्यासाठी अध्यादेश काढला होता. सरकारी बसभाड्याच्या फक्त दीडपट भाडे आकारण्याची मुभा शासनानं खाजगी ट्रॅव्हल्सना दिली होती. मात्र, सरकारच्या परिवहन विभागाच्या नाकावर टिच्चून राज्यभरात प्रवाशांची सुटका बिनबोभाटपणे सुरू आहे. पुणे-मूंबईपासून दूर असलेल्या विदर्भात (Vidharbha News) ही लूट अधिक सुरू असल्याची ओरड होतीये. अनेक ठिकाणी परिवहन विभागाचं दरपत्रकच शासन निर्णयाला छेद देणारे असल्याचा आरोप होत आहे. 

 दिवाळी, गणपती, दसरा… अशी सण-उत्सव असले की प्रत्येकाला चाहूल लागते ती आपल्या गावाला जाण्याची…. मात्र, या उत्सव काळातला प्रवास म्हणजे प्रत्येकासाठी दिव्य असाच… कारण, प्रचंड गर्दीमुळे गाड्यांमध्ये जागा मिळणं म्हणजे अगदी लॉटरी लागण्यासारखंच… मात्र, बस, रेल्वेच्या कन्फर्म तिकीटाची लॉटरी न लागलेल्या लोकांच्या खिशाला  ते मिळविण्यासाठी कात्री लागली आहे.  पुणे आणि मुंबईत राज्यभरातील अनेकजण नोकरी आणि व्यवसायासाठी स्थायिक झाले आहेत. पुणे-मुंबईतून विदर्भात दिवाळीसाठी येऊ पाहणाऱ्या चाकरमान्यांना सध्या खाजगी बसच्या तिकिटासाठी दुप्पट ते अडीचपट पैसे मोजावे लागत आहेत

 विदर्भातील काही शहरात पुण्यावरून येण्यासाठी परिवहन विभागाच्या दरपत्रकानुसार लागणारं खाजगी बसची भाडं

 चंद्रपूर ते छत्रपती संभाजीनगर

  • स्लीपर एसी बस : 2250 रू
  • सिटींग एसी बस : 1560 रू

चंद्रपूर ते पुणे : 

  • स्लीपर एसी बस : 3300 रू 
  • सिटींग एसी बस : 2315 रू

चंद्रपूर ते मुंबई 

  • स्लीपर एसी बस : 3690 रू 
  • सिटींग एसी बस : 2560 रू 

पुणे ते अकोला

  • सरकारी शिवशाही : 1180
  • खाजगी एसी : 2200 ते 2500
  • नियमानुसार खाजगी : 1800 

 प्रवाशांची होणारी लूट थांबविण्यासाठी राज्य सरकारने 2018 मध्ये एक अध्यादेश काढला आहे. यात सरकारी एसटी बसच्या भाड्याच्या दीडपट भाडं आकारण्याची मुभा खाजगी ट्रॅव्हल्सना देण्यात आली आहे. यापेक्षा जास्त भाडं आकारणाऱ्या खाजगी बसेसवर कारवाईचे अधिकार परिवहन विभागाला देण्यात आलेत. मात्र, परिवहन विभागानंच अनेक जिल्ह्यांत सरकारी आदेशाला हरताळ फासत नियमापेक्षा अधिक रकमेचं दरपत्रक जारी केल्याचा आरोप होत आहे. विदर्भातील यवतमाळ आणि चंद्रपूरमध्ये प्रवाशांना प्रत्येकी 300 ते 700 रूपये अधिक मोजावे लागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. खाजगी वातानुकुलित चंद्रपूर ते पुणे प्रवासाला 2600 रूपयांपर्यंत भाडं अपेक्षित असतांना ते 3300 पर्यंत गेल्याने प्रवाशांना आर्थिक भुर्दंड बसतोये. मात्र, चंद्रपूर परिवहन विभागानं याचं वेगळंच उत्तर दिली आहे.

 सरकारी बसेस आणि खाजगी बसेसची प्रवासभाड्याचं तुलनात्मक दरपत्रक प्रत्येक खाजगी बस वाहनतळाच्या ठिकाणी लावावं असे सरकारचे निर्देश आहेत. राज्यात बीडमध्ये याची चांगली अंमलबजावणी झाली आहे. मात्र, अनेक ठिकाणी खाजगी बस कंपन्यांकडून प्रवाशांची सुटका सुरू असतांना परिवहन विभाग मात्र कागदी घोडे नाचवतांना दिसताये. अकोल्यात वर्षभर परिवहन विभाग असं करणाऱ्या खाजगी बसेस कारवाई करत असल्याचं विभागानं म्हटलंय. तर यवतमाळातही सर्व आलबेल असल्याचं यवतमाळ परिवहन विभाग सांगतोय. 

सरकार शासननिर्णय हे लोकांसाठी काढतंय. मात्र, आपली यंत्रणा त्याची अंमलबजावणी कशी करते याचं मुल्यमापन करणारी सरकारी यंत्रणा पार तकलादू आणि कागदी घोडे नाचवणारी आहेय. बिनबोभाटपणे जनतेचा खिसा कापणार्या या प्रकाराला सरकार आळा घालणार का हाच खरा प्रश्न आहे.



Source link

YouTube
Instagram
WhatsApp