Akola Gram Panchayat Result:   अकोल्यात संमिश्र कौल, वंचितला अपेक्षित यश नाही

Akola Gram Panchayat Result: अकोल्यात संमिश्र कौल, वंचितला अपेक्षित यश नाही


अकोला :  आगामी विधानसभा निवडणुकीआधी (Akola GramPanchayat Election Result 2023)  सत्‍वपरीक्षा मानल्‍या गेलेल्‍या ग्रामपंचायतींच्‍या निवडणुकीत अकोला जिल्‍ह्यात संमिश्र कौल दिसून आला आहे. काँग्रेस, भाजप आणि स्थानिक आघाड्यांसाठी गटासाठी ही निवडणूक लाभदायक ठरली आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार आणि अजित पवार गटाला चमकदार कामगिरी करता आलेली नाही. तर वंचितला अपेक्षित यश मिळाले नाही. 

अकोला जिल्ह्यातील 14 पैकी प्रत्येकी तीन ग्रामपंचायतींवर भाजप, काँग्रेस आणि स्थानिक आघाड्यांचा झेंडा फडकवला आहे.  बार्शीटाकळी तालुक्यातील दोन ग्रामपंचायती शरद पवार गटाच्या ताब्यात आहेत तर पातूर तालूक्यातील कोसगाव ग्रामपंचायतीवर अजित पवार गटाची सत्ता आली आहे.  भाजपचे नेते आणि माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या गावात वंचितने बाजी मारली आहे. रणजीत पाटलांचे काका अनिल पाटील वंचितच्या पाठिंब्याने सरपंचपदी निवडून आले आहेत.  घुंगशीत पाटील घराण्यात फूट पडली आहे.  रणजीत पाटलांचे चुलतभाऊ असलेले राहुल पाटील सरपंच पदाच्या निवडणुकीत तिसऱ्या स्थानी आहेत. 

निवडणूक झालेल्या एकूण ग्रामपंचायत : 14

बिनविरोध : 01

अकोला तालुका : एकूण ग्रामपंचायत : 04 (Akola Talula GramPanchayat Election)

1) कापशी : वेणूताई उमाळे : भाजप
2) काटीपाटी : संगिता कासमपुरे : स्थानिक आघाडी
3) एकलारा : राजेश बेले : भाजप
4) मारोडी : पुजा वाघमारे : स्थानिक आघाडी

बार्शीटाकळी तालुका : एकूण ग्रामपंचायत : 04 (Barshi Takali GramPanchayat Election)

1) खोपडी : काँग्रेस 
2) दोनद खुर्द : सागर कावरे, राष्ट्रवादी शरद पवार गट
3) खांबोरा : राष्ट्रवादी शरद पवार गट
4) जांभरून : काँग्रेस

मूर्तिजापूर तालुका : 02 (Murtijapur Gram Panchayat Result)

1) घुंगशी : अनिल पाटील पवित्रकार : वंचित
2) गाजीपूर टाकळी : मिना सचिन दिवनाले : वंचित

पातूर तालुका : एकूण ग्रामपंचायत : 01 (Patur Taluka Gram Panchayat Result) 

1) कोसगाव : रत्नमाला करवते : राष्ट्रवादी अजित पवार गट

तेल्हारा तालुका : एकूण ग्रामपंचायत : 03 (Telhara Taluka Gram Panchayat Result)

1) बारूखेडा : अविरोध : स्थानिक आघाडी
2) पिंपरखेड : भाजप
3) झरीबाजार : काँग्रेस

अकोला जिल्हा ग्रामपंचायत निवडणूक अंतिम निकाल

  • भाजप : 03
  • वंचित : 02
  • काँग्रेस : 03
  • स्थानिक आघाड्या : 03
  • राष्ट्रवादी शरद : 02
  • राष्ट्रवादी अजित : 01

अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तालुक्यातल्या घुंगशी ग्रामपंचायतीवर वंचितचा झेंडा

घुंगशी माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचे गाव आहे.  सरपंचपदी माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचे काका अनिल पाटील पवित्रकार 54 मतांनी विजयी झाले आहेत. काँग्रेसचे उमेदवार संजय देशमुख यांचा  पराभव केला. डॉ. रणजीत पाटील यांचे चुलतभाऊ राहूल पाटील सरपंचपदाच्या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. घुंगशी ग्रामपंचायतीत पाटील घराण्यात दोन पॅनल पडत  फूट पडली होती. डॉ. रणजीत पाटलांचा आशीर्वाद चुलतभाऊ राहुल पाटील यांच्या पाठीशी आहे. डॉ. रणजीत पाटलांच्या काकांनी  पुतण्याला धोबीपछाड केला आहे.  सदस्यांपैकी सर्वच्या सर्व जागा जिंकत अनिल पाटील यांची गावावर सत्ता आली आहे.  काँग्रेसच्या ताब्यातील ग्रामपंचायत  हिसकावून घेतली आहे. 

हे ही वाचा:

Gram Panchayat Election Result: गावकऱ्यांचा प्रस्थापित राजकीय पुढाऱ्यांना तगडा झटका! अनेक नेत्यांना गाव सांभाळताना घाम फुटला

 



Source link

Amravati  Gram Panchayat Elections : कारला मतदान केंद्रावर दोन गटात बाचाबाची : ABP Majha

Amravati Gram Panchayat Elections : कारला मतदान केंद्रावर दोन गटात बाचाबाची : ABP Majha



<p>अमरावतीतील कारला मतदान केंद्रात उमेदवारांच्या &nbsp;प्रतिनिधींवरुन दोन गटात बाचाबाची, पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना &nbsp;मतदान केंद्राबाहेर काढलं.&nbsp; &nbsp;</p>



Source link

Gowardhan Sharma : दो हंसो का जोडा; खासदार संजय धोत्रे आणि आमदार गोवर्धन शर्मा 

Gowardhan Sharma : दो हंसो का जोडा; खासदार संजय धोत्रे आणि आमदार गोवर्धन शर्मा 


अकोला : ‘राजकारणात सर्वकाळ कुणीच कुणाचं शत्रू आणि मित्रं नसतं’, असं सर्रासपणे बोललं जातं. गेल्या पाच वर्षांत हेच आपल्या राज्यात झालेल्या अनाकलनीय राजकारणानं उभ्या महाराष्ट्रानं हे अनुभवलंय. मात्र अकोल्याच्या राजकारणानं दोन नेत्यांमधील राजकारणापलिकडची मैत्री गेल्या अडीच दशकांत फार जवळून अनुभवलीय. ही मैत्री म्हणजे खासदार संजय धोत्रे (Sanjay Dhotre)  आणि आमदार गोवर्धन शर्मा  (Gowardhan Sharma) यांची.

गोवर्धन शर्मा हे 1995 पासून अकोला शहराचे आमदार. 1995 ते 1998 या काळात ते राज्यमंत्रीही होते. तर संजय धोत्रेंचा अकोल्याच्या राजकीय पटलावरचा उदय 1999 मधला. संजय धोत्रे 1999 मध्ये मुर्तिजापूर मतदारसंघातून आमदार होते. तर गोवर्धन शर्मा अकोला शहराचे. मात्र संजय धोत्रेंच्या उदयापासून गोवर्धन शर्मांनी संजय धोत्रेंना संपूर्ण राजकीय ताकद दिली. याच मैत्रीतून पुढे संजय धोत्रे 2004 पासून सातत्यानं चारदा सलग अकोल्यातून खासदार म्हणून विजयी झाले. 

गेल्या 2019 च्या निवडणुकीत संजय धोत्रे विजयी झाल्यानंतर मतमोजणी केंद्रातून ते गोवर्धन शर्मांना दुचाकीवर कार्यकर्त्यांपर्यंत घेऊन आलेत. हा फोटो त्यांच्यातील मैत्रीची सहजता दर्शविणारा आहे. अकोल्याच्या राजकारणात या दोघांत वर्चस्ववाद अन् त्यातून येणारी कटूता कधीच न आल्याने त्यांची मैत्री अभंग होती. 

गेल्या दोन वर्षांपासून संजय धोत्रे हेसुद्धा एका दुर्धर आजाराने अंथरुणाला खिळून आहेत. वर्षभरापूर्वी कॅन्सरची लागण झालेल्या गोवर्धन शर्मा यांचं 3 नोव्हेंबरला रात्री निधन झालं अन् अकोल्याच्या राजकारणातील ‘दोन हंसां’मधला एक हंस कायमचा सोडून निघून गेला. त्यांच्या मैत्रीतील ‘वीण’ किती घट्ट होतीय हे अनेक घटनांतून दिसून आलंय. 

गोवर्धन शर्मा यांचा राजकीय प्रवास

गोवर्धन शर्मा यांचा जन्म 2 जानेवारी 1949 रोजी यवतमाळमधील पुसद तालुक्यात झाला. त्यांनी अकोल येथील एलआरटी वाणिज्य महाविद्यालयातून बी.कॉमचे शिक्षण पूर्ण केले. 1985 ते 1995 पर्यंत अकोला नगरपालिकेत डाबकीरोड भागातून नगरसेवक म्हणून ते विजयी झाले. 1995 मध्ये पहिल्यांदा अकोला विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर त्यांचा विजय झाला. जून 1995 ते 7 मे 1998 या कालावधीत युती सरकारमध्ये मनोहर जोशी यांच्या मंत्रीमंडळात पशु, मत्स्य संवर्धन आणि दुग्धविकास खात्याचे ते राज्यमंत्री होते. अकोला आणि यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. 

1999, 2004, 2009, 2014 आणि 2019 असं सलग सहा वेळा अकोल्यातून ते भाजपचे उमेदवार म्हणून निवडून आलेत. अकोला जिल्ह्यात आणि भाजपच्या वर्तुळात ‘लालाजी’ नावाने लोकप्रिय होते.  अतिशय साधं राहणीमान आणि लोकांना सहज उपलब्ध असलेला नेता अशी त्यांची ओळख होती. लोकांशी थेट जनसंपर्क असल्याने सलग सहावेळा ते निवडणुकीच्या रिंगणात विजयी झाले होते. दरम्यान त्यांनी कधीही चारचाकी किंवा फोनही वापरला नाही. त्यांच्या या राहणीमानाचं विशेष कौतुक केलं जायचं. 

ही बातमी वाचा: 



Source link

Devendra Fadnavis : गोवर्धन शर्मांना सत्तेचा लोभ नव्हता, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी उभे राहत

Devendra Fadnavis : गोवर्धन शर्मांना सत्तेचा लोभ नव्हता, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी उभे राहत


Pradeep Sharma : वादग्रस्त पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा पुन्हा सक्रिय; ‘या’ पक्षातून मुंबईतून निवडणूक लढवणार?



Source link

Akola BJP Govardhan Sharma : Devendra Fadnavis यांनी गोवर्धन शर्मा यांना वाहिली आदरांजली

Akola BJP Govardhan Sharma : Devendra Fadnavis यांनी गोवर्धन शर्मा यांना वाहिली आदरांजली



<p>Akola BJP Govardhan Sharma : अकोल्याचे भाजप आमदार आणि माजी राज्यमंत्री गोवर्धन शर्मा यांचं निधन झालंय. गोवर्धन शर्मा यांच्यावर आज दुपारी 2 वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गोवर्धन शर्मा यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी येणार आहेत.तर ठाकेर गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी &nbsp;गोवर्धन शर्मा यांचं अंत्यदर्शन घेतलंय.</p>



Source link

YouTube
Instagram
WhatsApp