by Hansraj Agrawal | Nov 3, 2023 | Current Affairs
<p>अकोल्याचे भाजप आमदार आणि माजी राज्यमंत्री गोवर्धन शर्मा यांचं निधन झालंय. ते ७४ वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून ते कॅन्सरशी झुंज देत होते. १९९५ मध्ये ते पहिल्यांदा अकोला विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर विजयी झाले. त्यानंतर १९९९, २००४, २००९, २०१४ आणि २०१९ असे सलग सहा वेळा निवडून आले. </p>
Source link
by Hansraj Agrawal | Nov 3, 2023 | Current Affairs
अकोला : अकोल्याचे (Akola) भाजप आमदार आणि माजी राज्यमंत्री गोवर्धन शर्मा (Gowardhan Sharma) यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर येत आहे. वयाच्या 74 व्या वर्षी गोवर्धन शर्मा यांनी अखेरचा श्वास घेतला. गोवर्धन शर्मा हे मागील अनेक दिवसांपासून कर्करोगाशी झुंज देत होते. पण उपचारादम्यान शुक्रवारी रात्री 8 वाजता त्यांचा मृत्यू झाला. मागील अनेक दिवसांपासून राहत्या घरीच त्यांच्यावर उपचार सुरु होते. दरम्यान 04 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता त्यांच्यावर अकोल्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वाहिली श्रद्धांजली
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ट्वीट करत गोवर्धन शर्मा यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी म्हटलं की, ‘अकोला पश्चिमचे भारतीय जनता पार्टीचे आमदार गोवर्धनजी शर्मा यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.’ तसेच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील त्यांना श्रद्धांजली वाहिली.
गोवर्धन शर्मा यांचा राजकीय प्रवास
गोवर्धन शर्मा यांचा जन्म 2 जानेवारी 1949 रोजी यवतमाळमधील पुसद तालुक्यात झाला. त्यांनी अकोल येथील एलआरटी वाणिज्य महाविद्यालयातून बी.कॉमचे शिक्षण पूर्ण केले. 1985 ते 1995 पर्यंत अकोला नगरपालिकेत डाबकीरोड भागातून नगरसेवक म्हणून ते विजयी झाले. 1995 मध्ये पहिल्यांदा अकोला विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर त्यांचा विजय झाला. जून 1995 ते 7 मे 1998 या कालावधीत युती सरकारमध्ये मनोहर जोशी यांच्या मंत्रीमंडळात पशु, मत्स्य संवर्धन आणि दुग्धविकास खात्याचे ते राज्यमंत्री होते. अकोला आणि यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिलं.
1999, 2004, 2009, 2014 आणि 2019 असं सलग सहा वेळा अकोल्यातून ते भाजपचे उमेदवार म्हणून निवडून आलेत. अकोला जिल्ह्यात आणि भाजपच्या वर्तुळात ‘लालाजी’ नावाने लोकप्रिय होते. अतिशय साधं राहणीमान आणि लोकांना सहज उपलब्ध असलेला नेता अशी त्यांची ओळख होती. लोकांशी थेट जनसंपर्क असल्याने सलग सहावेळा ते निवडणुकीच्या रिंगणात विजयी झाले होते. दरम्यान त्यांनी कधीही चारचाकी किंवा फोनही वापरला नाही. त्यांच्या या राहणीमानाचं विशेष कौतुक केलं जायचं.
हेही वाचा :
व्ही पी. बेडेकर अँड सन्सचे संचालक अतुल बेडेकर यांचे निधन, वयाच्या 56 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Source link
by Hansraj Agrawal | Nov 2, 2023 | Current Affairs
Maratha Reservation : मराठा समाजात सध्या ओबीसीमध्ये असलेल्या कुणबी समाजानं मोठं मन करावं. मराठ्यांना कुणबीचं जात प्रमाणपत्र देण्यासाठी ओबीसीतील कुणबींचं मन वळवण्याचं आवाहन राष्ट्रवादी काँग्रसचे अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केलं आहे. इतर जातीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या, अशी अजित पवारांसह पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांची भूमिका आहे. अशातच अमोल मिटकरींच्या नव्या भूमिकेनं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
अमोल मिटकरी यांच्या घरासमोर आत्मक्लेष आंदोलन सुरु
मराठा आंदोलकांनी आमदार अमोल मिटकरी यांच्या घरासमोर आत्मक्लेष आंदोलन सुरु केलं आहे. त्यामुळं अकोल्यातील न्यू तोष्णीवाल लेआऊट भागातील घरासमोर पोलिसांचा प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, आंदोलन सुरु धाल्यानंतर आमदार मिटकरी यांनी आंदोलकांची भेट घेऊन चर्चा देखील केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी मराठ्यांना कुणबीचं जात प्रमाणपत्र देण्यासाठी ओबीसीतील कुणबींचं मन वळवण्याचं आवाहन केलं.
जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा नववा दिवस
सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. या मुद्द्यावरून राज्यभरात मराठा समाजाची आंदोलने, निदर्शने सूरू आहेत. आमदारांची घरे, पक्ष कार्यालये पेटवली जातायत. एकूणच मराठा समाज आरक्षण घेण्याच्या मागणीवर पेटून उठला. सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे यासाठी जरांगे पाटलांचे उपोषण सुरू आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा नववावा दिवस आहे. जरांगेंनी काल रात्रीपासून पाणी पिणे देखील बंद केलेय. अशात आज जरांगे पाटलांच्या भेटीसाठी सरकारचे शिष्ठमंडळ जाणार आहे.शिष्ठमंडळाकडून जरंगे पाटील यांची समजूतकाढून सरकारला थोडा वेळ देण्यातयावा यासाठी विनंती करून आंदोलन मागे घ्यावे अशीही विनंती केली जाणार आहे.
मुंबईत मंत्रालयाच्या (Mumbai Mantralaya) गेटवर सर्वपक्षीय आमदारांनी आंदोलन सुरु केलं आहे. आज तिसऱ्या दिवशी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी या आमदारांनी आंदोलन केले. या आमदारांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यावेळी हे आमदार आक्रमक झाले. मंत्रालयासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले . मात्र हा अतिशय संवेदनशील परिसर आहे तसेच जवळ वानखेडे स्टेडियममध्ये भारत आणि श्रीलंकेचा सामना आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांनी आमदरांना ताब्यात घेतले यावेळी या आमदारांनी घोषणाबाजी केली. ‘एक मराठा लाख मराठा’च्या घोषणा दिल्या.
महत्त्वाच्या बातम्या:

<p>Amravati : राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा 55 वा पुण्यतिथी महोत्सव , लाखो गुरुदेव भक्त तुकडोजी महाराजांना मौन श्रद्धांदली वाहणार </p>
Source link
by Hansraj Agrawal | Oct 29, 2023 | Current Affairs
अयोध्या : प्रहारचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) हे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अयोध्येतून संसद भवनापर्यंत जाणार असल्याचं त्यांनी ‘एबीपी माझा’ला सांगितलं. दरम्यान अयोध्येमध्ये (Ayodhya) बच्चू कडू यांनी श्रीरामाचं दर्शन घेतलं. शेकडो कार्यकर्ते यावेळी बच्चू कडूंसोबत होते. तसेच त्यांनी मोठ्या प्रमाणात धान्य बच्चू कडूंनी श्रीरामाचरणी अर्पण केलं.
जोपर्यंत शेतकऱ्यांना आर्थिक आरक्षण मिळत नाही तोपर्यंत त्यांना न्याय मिळणार नाही. त्यामुळे आता तिसऱ्या टप्प्यामध्ये बच्चू कडू यांनी संसद भवनापर्यंत जाण्याचा निर्णय घेतलाय. तसेच अयोध्येतील रामाचं दर्शन घेणं हा त्यांचा दुसरा टप्पा होता. आता तिसऱ्या टप्प्यात ते अयोध्येतून संसद भवनापर्यंत जाणार असल्याची माहिती यावेळी स्वत: बच्चू कडू यांनी दिली.
बच्चू कडूंना काय म्हटलं?
बच्चू कडू यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया देताना म्हटलं की, जोपर्यंत शेतकऱ्यांना आर्थिक आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत त्यांना न्याय मिळणार नाही. जोपर्यंत शेतकऱ्यांना आर्थिक आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत तो सुखी होणार नाही. आता आम्ही संसद भवनात जाऊन शेतकऱ्यांचं बजेट जाणून घेणार आहोत. सरकार इतरांना किती आणि शेतकऱ्यांनी किती बजेट मिळवून देते हे त्यांनी दाखवले पाहिजे. केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो शेतकऱ्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात बजेट मिळायला हवं. त्यामुळे जर केंद्र सरकार आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांचा विचार केला नाही, तर आम्ही अयोध्या ते संसद भवनापर्यंत तिसऱ्या टप्प्यात आंदोलन करु.
बच्चू कडूंचा ताफा अडवला
शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी श्रीरामाला साकडे घालण्यासाठी गेलेल्या आमदार बच्चू कडूंचा (Bachchu Kadu) ताफा पोलिसांनी अडवला आणि त्यांच्या सभेला परवानगी दिली नाही. त्यामुळे आक्रमक झालेल्या बच्चू कडू यांनी चौकातच छोटेखानी भाषण केलं. आमदार बच्चू कडू यांच्यासोबत 100 च्या वरती गाड्यांचा ताफा अयोध्यामध्ये गेला होता. पोलिसांनी फक्त पाच वाहनं घेऊन जाण्याची परवानगी दिली.
दरम्यान बच्चू कडू यांनी आमदार खासदारांसोबत शेतकऱ्यांचा देखील तितकाच विचार करण्याची गरज असल्याचं यावेळी बच्चू कडू यांनी म्हटलं. तसेच सुरुवातीला रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी बच्चू कडू यांना अडवण्यात आलं होतं. पण त्यानंतर त्यांना परवानगी देण्यात आली. तर आता शेतकऱ्यांसाठी बच्चू कडू संसद भवनात जाऊन कोणती भूमिका जाहीर करतात हे येत्या काळात स्पष्ट होईल.
हेही वाचा :
Bachchu Kadu : बच्चू कडूंना अयोध्येत अडवलं, सभेला परवानगीही नाकारली, आक्रमक बच्चू कडूंचे चौकातच भाषण
Source link