कुणाचे आमदार कुठल्या गटात जाणार हे आठवड्याभरात महाराष्ट्राला समजेल : अमोल मिटकरी

कुणाचे आमदार कुठल्या गटात जाणार हे आठवड्याभरात महाराष्ट्राला समजेल : अमोल मिटकरी


अकोला: राष्ट्रवादीच्या शरद पवार (Sharad Pawar) गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी अजितदादा गटाचे 15 आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. या दाव्याचा समाचार घेतांना अजित पवार (Ajit Pawar)  गटाने जयंत पाटील यांच्यावर पलटवार केला आहे. कुणाचे किती आमदार कुणाच्या गटात जाणार याचं उत्तर 25-26 तारखेपर्यंत महाराष्ट्राला समजेल असं अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) म्हणाले. ते अकोला येथे बोलत होते. त्यांच्यातलाच एक मोठा नेता कुणाच्या संपर्कात आहे याचं उत्तर लवकरच मिळेल असंही आमदार अमोल मिटकरी म्हणालेय. 

जयंत पाटील यांना उत्तर देताना अमोल मिटकरी म्हणाले की, “कुणाचे किती आमदार कुणाच्या गटात जाणार याचं उत्तर 25-26 तारखेपर्यंत महाराष्ट्राला समजेल. शरद पवार गटातला एक मोठा नेता कुणाच्या संपर्कात आहेत याचं उत्तर लवकरच मिळेल. सांगली जिल्ह्यातील आमदार मानसिंगराव नाईक आधीपासूनच शरद पवारांसोबत आहेत. त्यामूळे ते आमच्या गटातून गेलेत या चर्चांमध्ये तथ्य नाही. कोण कोणत्या गटात याचं लवकरच उत्तर मिळेल. महाराष्ट्रासमोर दूध का दूध, पाणी का पाणी होईल.”

पाच राज्यातील निवडणुकीवर बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, दोन्ही गटांनी पाच राज्यांत निवडणूक न लढवण्याचा निर्णय एकाचवेळी होणं हा केवळ योगायोग आहे. शेवटी आमच्यात बोलणं होत असतंच. दोन्ही गटांतील नेत्यांत संवादाचे सूर आहेत, विसंवाद नको. परतीचे दोर त्यांनी कापले असले तरी शरद पवार गटाने अजितदादांच्या नेतृत्वात एकत्र यावे यासाठी आमचे आजही प्रयत्न आहे. 

रोहीत पवार यांच्या संघर्षयात्रेवर काय म्हणाले मिटकरी? 

आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या नियोजित संघर्षयात्रेवर बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, रोहीत पवारांना आमच्या शुभेच्छा आहेत.  त्यांना कुणाविरूद्ध संघर्ष करायचा हे त्यांनी ठरवून घ्यावं. जर ते आपल्याच लोकांविरुद्ध संघर्ष करणार असतील तर जनताच त्यांच्याविरुद्ध संघर्ष करेल. दादांच्याविरोधात ते बोलतात. आम्हाला ते एकेरी भाषेत बोलतात, गद्दार म्हणतात, ते त्यांनी करू नये. त्यांनी संघर्ष यात्रेत अजितदादा किंवा आमच्या इतर वरिष्ठ नेत्यांबद्दल बोलले तर आम्हालाही दुसरी यात्रा काढावी लागेल. रोहीत पवार हे कधीच अजितदादा होऊ शकत नाहीत. त्यांनी अजितदादांविरोधात बोलून स्वत:ची छबी खराब करू नये. 

लोकसभेचे आणि विधानसभेचे जागावाटप कसे होणार, तीन पक्षांचा जागावाटपाचा फॉर्म्युला काय असेल असा प्रश्न विचारल्यानंतर अमोल मिटकरी म्हणाले की, मी यावर काही बोलणार नाही. तीनही पक्षाचे वरिष्ठ नेते यावर एकत्रित बसून चर्चा करतील. 

ही बातमी वाचा: 



Source link

नागपूरनंतर अकोल्यात काँग्रेसमध्ये राडा! फोटो काढण्यावरून वाद

नागपूरनंतर अकोल्यात काँग्रेसमध्ये राडा! फोटो काढण्यावरून वाद


अकोला : नागपूरनंतर आज अकोल्यातही (Akola) आज काँग्रेसमध्ये (Congress) राडा पहायला मिळाला. पीकविम्यासंदर्भात काँग्रेसने बोलाविलेल्या पत्रकार परिषदेनंतर फोटो काढण्यावरून काँग्रेसच्या दोन जेष्ठ नेत्यांमध्ये ‘हमरी-तुमरी’ झाली. प्रदेश सचिव डॉ. अभय पाटील (Dr Abhay Patil) आणि दुसरे प्रदेश सचिव मदन भरगड (Madan Bharagad) एकमेकांच्या अंगावर धावून गेलेत. डॉ. अभय पाटील काँग्रेसचे लोकसभेच्या संभाव्य उमेदवारांपैकी एक आहेत. तर मदन भरगड अकोल्याचे माजी महापौर आहेत. अकोला काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आलेलाच असतांना पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक अमानकरांनी काहीच झालं नसल्याचं म्हटलं. तर मदन भरगडांनी अभय पाटलांवर गंभीर आरोप केलेत. दरम्यान, यावर ‘माझा’ने डॉ. अभय पाटील यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी वाद झाल्याचं मान्य करीत भरगडांनीच वाद निर्माण केल्याचा दावा केला. तर मदन भरगडांनी डॉ. अभय पाटलांचं पक्षासाठी काहीच योगदान नसल्याचं म्हटलं आहे. 

पत्रकार परिषदेनंतर फोटो काढण्यावरून उफाळला वाद 

काँग्रेस अन वाद हे अतिशय घट्ट असं समीकरण असल्याचे म्हटले जाते. याच पक्षांतर्गत वाद आणि भांडणातून देश आणि राज्यात काँग्रेसची ताकद कमी झाली. अकोला जिल्ह्यात तीस वर्षांपासून काँग्रेस अंतर्गत भांडणामुळे अक्षरश: नेस्तनाबूत झाली. मात्र, यानंतरही अकोल्यात काँग्रेस यातून काही धडा शिकण्यास तयार नसल्याचे म्हटले जात आहे. आज अकोल्यात झालेल्या एका वादानं अकोल्यातील काँग्रेसमधला कलह पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेसच्या पत्रकार परिषदमध्ये दोन पदाधिकाऱ्यांचा शाब्दिक वाद पाहायला मिळाला. हा वाद होताय माजी महापौर मदन भरगड आणि अभय पाटिल यांच्यातील. माजी मंत्री अजहर हुसेन  यांच्या समोरच हा वाद झाला आहे. या वादात एकमेकांना पाहून घेण्याची भाषा झाली. शासकीय विश्रामगृहातील पत्रकार कक्षात हा वाद झाला. हा वाद झाल्यानंतर डॉ. अभय पाटील रागाने सभागृहाबाहेर गेलेत. आपल्या गाडीकडे गेलेल्या डॉ. पाटील आणि नंतर गाडीकडे आलेल्या भरगड यांच्यात परत एकदा वाद झाला. 
 

वादात रिव्हॉल्वर काढण्याच्या अफवांना ऊत 

डॉ. पाटील आणि भरगड यांच्यातील वाद इतका टोकावर गेला की चक्क अभय पाटील रागाच्या भरात कक्षाच्या बाहेर पडले. तिथे गाडीजवळ भरगड आल्यानंतर परत वाद पेटला. यादरम्यान डॉ. पाटील यांनी भरगड़ यांच्यावर ‘रिव्हॉल्वर’ ताणल्याची चर्चा सुरू झाली. मात्र, डॉ. अभय पाटील यांच्याशी यासंदर्भात ‘एबीपी माझा’ने संपर्क केला असता त्यांनी ही गोष्ट स्पष्टपणे फेटाळून लावली. तर मदन भरगडांनी डॉ. पाटील हे रिव्हॉल्वर आणण्यासाठीच बाहेर आल्याचा आरोप केला. 

अकोला आज पिक विम्यासह विविध विषयांवरून काँग्रेसची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. ही पत्रकार परिषेद अकोल्यातील शासकीय विश्रामगृह येथे आज चार वाजताच्या सुमारास आयोजित होती. या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, माजी मंत्री अजहर हुसेन, माजी महापौर मदन भरगड यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. काँग्रेसची पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी सर्वच पदाधिकाऱ्यांनी आपापली जागा राखून ठेवत खुर्चीवर बसले होते. आणि पत्रकार परिषद सुरू झाली. ही पत्र परिषद सुरू झाल्यानंतर थोड्या वेळात काँग्रेसचेच पदाधिकारी अभय पाटील येथे दाखल झाले. 

… अन् असा झाला वाद 

भरगड म्हणाले, ‘मी’ पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वीच खुर्चीवर समोरच्या बसलो होतो. पत्रकार परिषद सुरू होताच काही क्षणात तेथे अभय पाटील आणि मला म्हणाले की आपण इथून उठा मला बसायचं आहे, त्यावेळी मी त्यांना एवढेच म्हणालो की मी पक्षात सीनियर आहे, आणि माजी महापौर देखील राहिलो आहे, त्यामुळे आपण ज्युनिअर असल्यामुळे मागे बसावं आणि ते पाठीमागे बसले. पत्रकार परिषद संपल्यानंतर त्यांनी माझ्याशी खुर्चीवर बसण्यावरुन वाद घातला, ते मला रागाच्या भरात म्हणाले की ‘मी’ इथून बाहेर जातो, मी जा म्हटलं. आणि ते निघून गेले. येथूनच या वादाची सुरूवात झाली. 

मागच्या बैठकीतील विषय वादाचं मुळ कारण? 

मागील बैठकीत काँग्रेसच्या अकोला लोकसभा निवडणुकीसाठी अनेकांनी आपले नावे समोर ठेवली. या बैठकीत काँग्रेसचे माजी महापौर मदन भरगड़ यांनी ज्या लोकांनी पक्षासाठी मागील पाच वर्षात काय केलंय? पक्षासाठी कोणते आंदोलन केले? कोणते काम केलंय? याची पार्श्वभूमी तपासणी यावी? त्यानंतर त्यांनाच नियमाप्रमाणे उमेदवार घोषित करावे, म्हणजेच उमेदवारी द्यावी, अशी मागणी घातली. काँग्रेसचे अभय पाटील यांनी देखील आपलं नाव उमेदवारीसाठी पुढे केले होते, त्यातूनच त्याचाही रोष अभय पाटिल यांच्या मनात असू शकतो, असा दावा खुद्द भरगड यांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे अभय पाटील हे पाच वर्षात कोणत्याच बैठकीत हजर राहत नव्हते, आता उमेदवारीला माझा स्पष्टच विरोध  असणार असल्याचे ते म्हणाले.

“मी रिव्हॉल्वर काढलेच नाही!” : डॉ. अभय पाटील

यासंदर्भात ‘एबीपी माझा’ने डॉ. अभय पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी घटनाक्रम सांगितला. पत्रकार परिषद संपल्यानंतर एक पत्रकार माझ्याजवळ आला आणि म्हणाला आपण सर्वांचा ग्रुप फोटो हवा. त्यासाठी मी ग्रुपमध्ये उभा राहलो. त्यावेळी बाजूला भरभर देखील उभे होते, ते म्हणाले तुम्ही बाहेर जा, मी बाजूला हटलो, इथे बाहेर नाहीये गेटच्या बाहेर जा. असे म्हणाले. त्यानंतर थोडा शाब्दिक वाद झाला, आणि बाहेर पडलो. पत्रकार दिनेश शुक्ला यांनी मध्यस्थी करत मला गाडीत बसवले आणि आपण शांत रहा आणि मी तिथून शांततेत निघालो. तसं पाहिलं तर माझ्याकडे ‘लायसन्ड रिव्हॉल्व्हर’ आहे, पण अशा प्रकारचे कोणतेही रिव्हॉल्व्हर काढण्याची धमकी मी दिली नाही. रिव्हॉल्व्हर माझ्याकड़ं असल्याने असा आरोप लावल्या जात असावा, असं डॉ. पाटिल ‘एबीपी माझा’शी बोलतांना म्हणालेत. 

कोण आहेत डॉ. अभय पाटील? :

–  विदर्भातील नामवंत अस्थिरोगतज्ञ. 
– वडील डॉ. के. एस. पाटील विदर्भातील नामवंत अस्थिरोगतज्ञ होते. डॉ. के. एस. पाटील विश्व हिंदू परिषदेचे मोठे नेते. 
– डॉ. अभय पाटील सध्या प्रदेश काँग्रेसचे सचिव. 
– डॉ. पाटील अकोला लोकसभेसाठी काँग्रेसचे संभाव्य उमेदवार. 
– मराठा मोर्चाच्या समन्वयकांपैकी एक. 

कोण आहेत मदन भरगड? :

– सध्या काँग्रेसचे प्रदेश सचिव आणि अकोल्याचे माजी महापौर. 
– 2019 मध्ये काँग्रेसने तिकीट नाकारल्यामुळे वंचितच्या तिकीटावर अकोला पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवली. 18 हजार मतं घेत झाला पराभव. मात्र, काँग्रेस उमेदवाराच्या पराभवाला ठरले कारणीभूत. 

जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर म्हणतात “काहीच झाले नाही!”.

या वादानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले काँग्रेस जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर यांनी असं काहीच झालं नसल्याचं पत्रकारांना सांगितलं. पक्षात सारं आलबेल असल्याचा दावा त्यांनी केला आहे. 



Source link

October Heat:  ऑक्टोबर हिट’ने अकोलेकर त्रस्त; पारा 38  अंशांवर

October Heat: ऑक्टोबर हिट’ने अकोलेकर त्रस्त; पारा 38 अंशांवर


अकोला : राज्यात सध्या ‘ऑक्टोबर हिट’चा  (October Heat) प्रकोप वाढला आहे. ऑक्टोबर हिटच्या गरमीमुळे नागरिक बेहाल झालेयेत. याच ऑक्टोबर हिटचा मोठा फटका संपुर्ण विदर्भाला बसलाय. यामुळे दैनंदिन जीवन प्रभावीत झाली आहे.  देशातील सर्वाधिक उष्ण शहरांपैकी एक असलेल्या अकोल्यातही (Akola News) ऑक्टोबर हिटचा मोठा प्रभाव पहायला मिळत आहे. ऐन थंडीची चाहूल लागण्याआधी अकोल्याचा पारा 38 अंशांपर्यंत गेला आहे. 

ऑक्टोबरमधील वाढत्या उष्म्याने अकोलेकरांना चांगलाच घाम फोडला आहे. अकोला जिल्हा आधीच उष्णता असताना आता  त्यात ऑक्टोबर हिटची भर पडलीय. त्यामुळं वातावरणात चांगलाच उकाडा निर्माण झाला आहे. अकोल्याचे तापमान 38 अंशावर गेल्याने घामाच्या धारा लागत असल्याने नागरिक हैराण झाले आहे. गेल्या चार पाच दिवसापासून वातावरणात उष्मा असल्याने आरोग्यावर देखील त्याचा परिणाम होत आहे. वर्धेकरांना आणखी काही दिवस ऑक्टोबर हिटचा सामना करावा लागण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

गेल्या सात दिवसांत अकोल्यात नोंदवण्यात आलेलं तापमान 











दिनांक          तापमान (सेल्सियस अंशांमध्ये)
10 ऑक्टोबर  37.2 
11 ऑक्टोबर 37.2 
12 ऑक्टोबर 37.5
13 ऑक्टोबर 37.2 
14 ऑक्टोबर 37.8
15 ऑक्टोबर 37.0 
16 ऑक्टोबर 36.5

विदर्भात घामाच्या धारा

अकोला नाही तर  हा परिणाम संपूर्ण विदर्भात दिसून येत आहे. विदर्भाला देखील या उष्म्याने घाम फोडला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी  त्यापाठोपाठ वर्धा हे दोन जिल्हे 36 अंश सेल्सिअस वर आहे. तापमान अचानक वाढले तर वातावरणात उष्मा वाढल्याने चांगलाच उकाडा निर्माण झाला आहे. ब्रह्मपुरी, चंद्रपूर ,अकोला आणि, वर्ध्यात तापमानात वाढ झाली. वर्ध्याचे तापमान 36 अंशावर गेल्याने घामाच्या धारा लागत असल्याने नागरिक हैराण झाले आहे. 

तापमानाचा पारा आणखी वाढण्याची शक्यता

तापमानामध्ये वाढ झाल्याने जनता उकाड्याने त्रस्त झाली आहे. येत्या काही आठवड्यात तापमानाचा पारा आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सध्या मॉन्सून देशाभरातून परतीच्या वाटेवर आहे.   किमान व कमाल तापमानामध्ये वाढ झाल्याने जनता उकाड्याने त्रस्त झाली आहे. येत्या काही आठवड्यात तापमानाचा पारा आणखी वाढण्याची शक्यता  आहे. आता थंडीची प्रतीक्षा आहे.  देशभरात बुधवारपासून अधिक उकाडा वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवलाय. त्यामुळे ऑक्टोबर हीटचा तडाखा अधिक बसण्याची शक्यता आहे. तसेच मुंबईत आज आणि उद्या ढगाळ वातावरणाची शक्यता आहे.                   

 

 



Source link

अकोल्यात पती, पत्नी आणि ‘तो’ अशा त्रिकोणाची अंगावर शहारे आणणारी घटना

अकोल्यात पती, पत्नी आणि ‘तो’ अशा त्रिकोणाची अंगावर शहारे आणणारी घटना


 अकोला :   जगातील सर्वात पवित्र नात्यापैकी एक पवित्र नातं म्हणजे ‘पती-पत्नी’चं नातं. मात्र, याच नात्याची वीण सैल होत असल्याच्या अनेक घटना समाजात सातत्याने घडत असल्याचं दुर्दैवी चित्रं अलिकडे सातत्याने पहायला मिळते आहे. अशीच या नात्याला काळीमा फासणारी घटना अकोल्यात (Akola Crime News) घडली आहे. अकोल्यात आपल्या मुलाच्या वयाच्या तरूणाच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या महिलेने त्यांच्याकडूनच आपल्या पतीची हत्या (Love Triangle) करविली. यात महिलेच्या मनात पतीविरूद्ध आपल्या 20 वर्षीय मुलाच्या आत्महत्येचा रागही होता. 

अकोला शहरालगतच्या उगवा येथील शेतशिवारात काही दिवसांपूर्वी एका 50 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. त्याची हत्या करण्यात झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर अकोला शहरातील अकोटफैलचे ठाणेदार चंद्रशेखर कडू यांनी या प्रकरणात अधिक तपास करीत आरोपीस बेड्या ठोकल्यात. मृत पती अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने त्याच्या पत्नीने प्रियकराकरवी पतीचा काटा काढल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. 

‘तिच्या’ मनात धुमसत होती बदल्याची आग! 

‘एबीपी माझा’ला पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 12 ऑक्टोंबर रोजी अकोल्यातील अकोटफैल पोलीस स्टेशन हद्दीतील उगवा गावातील शेतशिवारातल्या एका गवताच्या कुरणात सुमारे 50 वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्यानं मृतदेहाची ओळख पटवणं कठीण झालं होते. शवविच्छेदनासाठी मृतदेह शासकीय रुग्णाल्यात पाठवण्यात आला होता. वैद्यकीय अहवालात धक्कादायक बाब समोर आली. मृताच्या डोक्यावर, छातीवर मारहाण केल्याच्या जखमा होत्या. पोलिसांनी ‘त्या’ दिशेने तपास सुरू केला. परंतु अकोला पोलिसांसमोर मृतदेहाचं ओळख पटवण्याचं एक मोठं आव्हान होतं. अकोटफैल पोलिसांनी जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या सर्व बेपत्ता प्रकरणाची तपासणी सुरू केली. तपासादरम्यान सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात कृषीनगरातील एक व्यक्ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल होती. त्यामध्ये पन्नास वर्षीय व्यक्तीच्या अंगावर जांभळे शर्ट, कंबरला पट्टा बांधलेल्या अवस्थेत बेपत्ता असल्याचं नमूद होतं. त्यात मृतदेहाजवळ देखील हेचं साहित्य मिळून आलेलं होतं. नातेवाईकांना ठाण्यात बोलावनं दिलं असून ओळख निष्पन्न झाली. विद्यावान बरीळाम प्रधान असं मृत व्यक्तीचं नाव निष्पन्न झालं. 

पती-पत्नीत होता बेबनाव? 

विद्यावान प्रधान आणि कंकूला (वय 40) या दोघा पती-पत्नींना एक मुलगा होता. मागील दोन वर्षांपूर्वी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येला तिने आपल्या पतीला जबाबदार धरलं होतं. त्यानंतर दोघांमध्ये सातत्यानं वाद व्हायचे. आणि दोघेही वेगळे-वेगळे राहू लागले. पत्नी शिवणी तर पती कृषीनगरात राहायचे. पत्नी कंकूला ही हॉटेलमध्ये काम करायची. तर पती विद्यावान याला दारुच व्यसन असल्याने तो रिकामाच होता. 

मुलाच्या आत्महत्येचा बदला खुनानं घ्यायची खुन्नस ठेवली मनात 

  मुलाच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या पतीला संपवण्याचा  कट तिने सुरू केला. आपण एकट्यानं काही करू शकणार नाहीये, यासाठी कोणाला तरी हाताशी घेऊ, असं ठरवलं. ज्या ठिकाणी कंकूला काम करायची, तिथूनच जवळ असलेल्या एका हॉटेलमध्ये लकी श्रवण तेलंते (वय 24 वर्ष रा. मोठी उमरी, अकोला) हा तरुण काम करायचा. त्यानंतर दोघांमध्ये हळूहळू संवाद वाढू लागला, दोघे बाहेर भेटू लागले, मैत्रीही घट्ट झाली. आणि या मैत्रिणीचे रूपांतर कालांतराने प्रेमात झालं. 

‘लकी’च्या मदतीनं रचना खुनाचा प्लॅन 

बघता बघता लकी कंकूलाच्या प्रेमाच्या प्रचंड वेडा झाला.  दोघे एकमेकांची दु:ख हलकं करू लागलेत. काही दिवस उलटले आणि तिने आपल्या मनात साठवून ठेवलेलं दुःख त्याच्यासमोर मांडलं. दुःख ऐकल्यानंतर लकीने तिला भरवसा दिलाय. त्यानंतर इथून पुढे विद्यावानच्या हत्येचा कट रचला गेला. तिच्या पतीची संपूर्ण माहिती लकीनं गोळा करून घेतली आणि कामाला लागलाय.

…अन् लकी झाला विद्यावानचा मित्र 

विद्यावानला दारूचे प्रचंड व्यसन होतं. तो नेहमी मुर्तीजापूर रोडवरील बिग सिनेमागृहांसमोर बसायचा. हळूहळू लकीनंही आपला मार्ग येथे वळवला. तोही रोज इथे येऊ लागला, लकी आणि विद्यावानची ओळख झाली. दोघेही सोबत दारु पिऊ लागले. लकीनं त्याचा खर्चही उचलला. अनेकदा टॉकीजमध्ये दोघांनी सोबत अनेक सिनेमे बघितलेत. दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. अन यातूनच विद्यावानच्या हत्येचा प्लॅन ठरत गेला… 

‘त्या’ दिवशी त्याने विद्यावानला संपवलं 

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मागील माहिन्यातील 24 सप्टेंबर रोजी दोघेही दारू सोबत घेऊन लक्झरी बसनं ग्राम उगवा येथे गेले. येथल्या एका शेतात दोघे दारू प्यायला बसले. रात्री उशिरापर्यंत लकीनं मनसोक्त दारू पाजून विद्यावान डोक्यावर हातातील लोखंडी कड्यानं वार केले. छातीवर 40 ते 50 वेळा बुक्क्या मारल्यात. त्याच्या गुप्तांगावरही लोखंडी कड्यानं मार केला. यामध्ये जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला अन् लकीनं घटनास्थळावरून पळ काढला. परंतु सुमारे 18 दिवसानंतर विद्यावानचा मृतदेह आढळला आणि संपूर्ण प्रकरणाचा खुलासा झाला. 

लकी आणि कंकूला पोलिसांच्या अटकेत 

मृतकाच्या नातेवाईकांनी त्याच्या पत्नीवर संशय व्यक्त केला. त्यात विद्यावान ज्या ठिकाणी रोज बसायचा तिथेही पोलिसांनी चौकशी केली असा असता, एका सायकल पंक्चरवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार एका मुलासोबत तो नेहमी राहत असायचा, अस समजलं. या तरुणाची चौकशी केल्यानंतर तरुण हॉटेलमध्ये वेटर असल्याचं समोर आलं, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि चौकशी सुरू केली. चौकशीदरम्यान लकीनं या संपूर्ण घटनेचा खुलासा केला. त्याच्याच पत्नीच्या म्हटलंप्रमाणे आपण असं कृत्य केल्याची त्यांनं कबुली दिली. सद्यस्थितीत कंकूला आणि लकी दोघे पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेचा संपूर्ण खुलासा पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कडू यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय जगदीश जायभाय, जितेंद्र काटखेडे, संतोष चिंचोळकर, इंगळे असलम शहा यांनी केली आहे.



Source link

दिवाळीपूर्वी शरद पवार गटातले अजून चार आमदार अजित पवारांसोबत येणार, अमोल मिटकरींचा दावा

दिवाळीपूर्वी शरद पवार गटातले अजून चार आमदार अजित पवारांसोबत येणार, अमोल मिटकरींचा दावा


अकोला: दिवाळीपूर्वी शरद पवार गटाची साथ सोडून आणखी चार आमदार अजित पवारांसोबत (Ajit Pawar) येणार असल्याचा दावा अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना केला आहे. तसेच लोकसभा आणि राज्यसभेचा आणखी प्रत्येकी एक-एक खासदारही अजित पवारांना साथ देईल असंही ते म्हणाले. त्यामुळे शरद पवारांना (Sharad Pawar) सोडण्याची शक्यता असलेले ते चार आमदार आणि दोन खासदार कोण याची चर्चा रंगली आहे. 

निवडणूक आयोगाकडे दिलेल्या शपथपत्रात नमूद केलेल्या 42 आमदारांव्यतिरिक्त आणखी दोन आमदार अजित पवार गटासोबत असल्याचं आमदार अमोल मिटकरी म्हणाले. तसेच दिवाळीपूर्वी त्यात आणखी चार आमदारांची भर पडून एकूण आमदारांची संख्या ही 44 इतकी होणार असल्याचा दावाही त्यांनी केला. त्याचसोबत लोकसभेतील एक खासदार आणि राज्यसभेतील एक खासदार लवकरच अजित पवारांसोबत येणार असल्याचं ते म्हणाले. 

मीरा बोरवणकर यांचा बोलवता धनी कोण हे सांगणार

मीरा बोरवणकरांनी (Meera Borwankar) केलेल्या दाव्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी या प्रकरणी अजित पवारांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यालाही अमोल मिटकरी यांनी उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, रोहित पवारांना आपल्या काकांनी कशी आणि किती मदत केली याचं भान ठेवावं. अजितदादांची भेट घेतल्यावर मीरा बोरवणकरांचा बोलविता धनी कोण याची माहिती माध्यमांना देणार. त्या आधी अजित पवारांवर आरोप करणाऱ्या मीरा बोरवणकर यांच्या मागे शरद पवार गटातील नेता असल्याचा आरोप मिटकरींनी केला होता. 

मिटकरींचा रोख प्राजक्त तनपुरेंवर?

नगर जिल्ह्यातील शरद पवार गटातला एक आमदार अजित पवार गटात येण्यास इच्छुक असल्याचं आमदार अमोल मिटकरी म्हणाले. त्यामुळे त्यांचा रोख प्राजक्त तनपुरेंवर असल्याची चर्चा आहे. मंत्रिमंडळ विस्तारापुर्वी अनेक नवे चेहरे अजितदादांसोबत दिसतील असंही मिटकरी म्हणाले. 

शरद पवारांकडे निर्देश?

मीरा बोरवणकरांनी त्यांच्या पुस्तकातून केलेल्या दाव्यावर बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, अजितदादांची भेट घेतल्यावर त्यांनी परवानगी दिल्यास बोरवणकरांचा बोलविता धनी कोण याची माहिती माध्यमांना देणार. शहिद बलवासोबत विमानात कोण बसलं होतं असं सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवारांनाही टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे. 

ही बातमी वाचा: 

 



Source link

YouTube
Instagram
WhatsApp