Amol Mitkari : Meeran Borwankar यांनी दादांवरील आरोपांचे पुरावे सादर करा अन्यथा…मिटकरी संतापले
Meera Borwankar : बिल्डर, पोलीस, प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय नेते यांच्यापासून सावध राहा! असं मीरा बोरवणकर का म्हणाल्या?
Meera Borwankar : बिल्डर, पोलीस, प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय नेते यांच्यापासून सावध राहा! असं मीरा बोरवणकर का म्हणाल्या?
Agriculture news : जंगलासह ग्रामीण भागातील शेतात मोठ्या प्रमाणात रानभाज्या उगवतात. या भाज्यांची कोणीही लागवड करत नाही, या भाज्या आपोआपच येतात. कुणी त्याची स्वतःहून लागवड करत नाही. त्यासाठी कुणी खत देखील घालत नाह. त्यामुळं या रानभाज्यांकडं रानमेवा म्हणून पाहिले जाते. अशाच रानमेवा म्हणून ओळखली जाणाऱ्या करटूल्याच्या भाजी लागवडीचा प्रयोग अकोला जिल्ह्यातील एका शेतकरी दाम्पत्यानं केला आहे. दहा गुंठ्यात या शेतकऱ्याला चांगल उत्पन्न देखील मिळालं आहे. पाहुयात त्यांची यशोगाथा.
अकोला शहरापासून पंचवीस किमी अंतरावर असलेलं पारस गावातील शेतकरी श्रीकृष्ण पांडुरंग लांडे आणि संगिता लांडे यांनी करटुल्याच्या भाजीचा प्रयोग केला आहे. दोन महिन्यात तब्बल 250 क्विंटलहून अधिक शेतमालाल निघला असून त्यातून चाळीस ते पन्नास हजार रुपयांचे उत्पन्न मिळालं आहे. करटुल्याची भाजीचा धाडसी प्रयोग करणारे हे पहिलेच शेतकरी ठरले आहेत.
पारंपारिक पिकातून बसला फटका
श्रीकृष्ण लांडे यांच्याकडं पाच एकर शेती आहे. लांडे पारंपरिक पिके घेतात, मात्र त्यातून हवे तसे उत्पन्न त्यांना लाभत नाही. आता पारंपरिक शेतीसह काहीतरी नवीन धाडस करण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला आणि तो यशस्वी झाला. युट्युबवरुन आणि कृषी विभागाच्या आत्म्यानं केलेल्या मार्गदर्शनानुसार त्यांनी गेल्या वर्षी आपल्या शेतात पाच गुंठ्यात रानातील मेवा म्हणून ओळखलं जाणारं करटूल्याची भाजीची लागवड केली. त्यावेळी त्यांना चांगलं उत्पन्न झालं होतं. म्हणून या वर्षी देखील त्यांनी करटूल्यांचे लागवड क्षेत्र वाढवलं असून ते दहा गुंठ्यांपर्यंत पोहोचवलं आहे.
युट्यूब आणि कृषी विभागाचं मार्गदर्शन
कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार लांडे यांनी शेतात करटूल्याची लागवड करण्यासाठी वेलीचा संगोपन म्हणजेच वाढ कशी करता येईल याची काळजी घेतली. सुरुवातीला त्यांनी शेतात चाळीस फूट अंतरावर सिमेंटचे खांब गाडले. त्यानंतर त्यांना तार बांधून झिक-झ्याकं जाळे बांधण्यात आले. यासाठी त्यांना वीस हजार रुपये इतका खर्च लागला. प्रति 16 हजार रूपये किलोप्रमाणे जालण्यावरुन दोन किलो करटुल्याचं बियाणे आणलं. मे महिन्यात करटुल्याची लागवड केली. जूनच्या अखेरपर्यंत त्यांना पीक यायला सुरुवात झालं. सुरुवातीला तीन ते चार दिवसाआड त्यांनी तोडा सुरू केला. पहिल्या तोड्यात त्यांना 25 ते 30 किलो इतकx पिक मिळालं, त्यावेळी त्याचा भाव 250 ते 300 प्रतिकिलो प्रमाणे होता. साधारणता करटूल्याचे पिके दोन महिने राहत असून त्यांना दोन महिन्यात जवळपास 250 अधिक उत्पन्न मिळालं. सद्यस्थितीत त्यांच्या करटूल्याला 200 रुपयांपर्यतचा भाव भेटत आहे.
रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर केला नाही
लांडे यांनी रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर केला नाही. सुरुवातीला फक्त शेणखताचा वापर केला. त्यानंतर कुठल्याच खताचा वापर केला नाही. दरम्यान, करटुल्याची लागवड केल्यानंतर त्याला जमीनीत कंद तयार होतात. ते कंद वर्षानुवर्षे जमिनीमध्ये राहतात. त्यामुळं दरवर्षी लागवड करण्याची झंझट नाही. त्यामुळं बियाण्यांचा खर्चही वाचत आहे. श्रीकृष्ण आणि संगीता या दोघांनी अवघ्या दहा गुंठ्यामध्ये रानभाजी असलेल्या करटुल्याची शेती केली आहे. करटुले हे रानभाजी आहे. डोंगरदऱ्या, घनदाट झुडपांमध्ये करटुल्याचे वेल दिसून येतात. मात्र, करटुल्याची लागवड सुपीक जमिनीत करण्याचा जिल्ह्यातील हा पहिलाच धाडसी प्रयोग या शेतकरी दामत्यानं केला आहे.
25 ते 30 किलोचा एक-एक तोडा काढला की स्वतःच आसपास गावात त्याची विक्री करायचे. सुरूवातीला 80 ते 100 रुपये पाव भाव मिळाला. नंतरचे तोडे सरासरी 200 रूपये किलोने विकले गेले. ही शेती करताना त्यांना कृषी विभागाने मोठी मदत केली आहे.
काय आहेत करटूल्याचे विशेष गुणधर्म?
१) करटूल्यांमध्ये जीवनसत्त्व ‘अ’ मोठ्या प्रमाणात असतंय. जे डोळ्यांसाठी अतिशय फायदेशीर राहते.
२) या भाजीतील रस पिंपल्स आणि एक्झिमा ठीक करण्यासाठी वापरला जातो. करटूल्याच्या बिया भाजून खाण्याचा सल्ला देखील तज्ज्ञ देतात.
३) करटूल्यांमध्ये फ्लेव्होनॉईड्स आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. ‘ही’ भाजी शरीराला अनेक आजारांपासून दूर ठेवते.
४) शरीराची शक्ती वाढवणाऱ्या एका आयुर्वेदिक भाजीची चर्चा आहे. ही भाजी शरीराला अनेक आजारांपासून दूर ठेवते, फायदे निरोगी राहण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करतोय. त्यासाठी दैनंदिन आयुष्यातील सवयींमध्ये बदल करुन खाण्यापिण्याची पथ्य आणि व्यायामही महत्त्वाचा असतो.
५) डोकेदुखी, केस गळती, कान दुखणे, खोकणे, पोटात इंफेक्शन, मुळव्याध, डायबिटीज, खरुच, अर्धांगवायू, ताप, सूज, बेशुद्ध पडणे, सापाने दंश करणे, डोळ्यांच्या व्याधी, कँसर, ब्लड प्रेशर सारख्या अनेक आजारांवर या भाजीचा चांगला परिणाम होतो.
अकोला : माजी पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर (Meera Borwankar) यांचा बोलविता धनी हा शरद पवार गटातील नेता असल्याचा दावा अजित पवार (Ajit Pawar) गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरींनी केलाय. बोरवणकरांनी केलेल्या आरोपाचे पुरावे द्यावेत. नाहीतर कायदेशीर कारवाईला समोर जावं असा इशारा अमोल मिटकरींनी बोरवणकरांना दिलाय. ते अकोला येथे माध्यमांशी बोलत होतेय.
अमोल मिटकरी म्हणाले, मीरा बोरवणकरांचे आरोप बिनबुडाचे आहेत. बोरवणकरांनी केलेल्या आरोपाचे पुरावे द्यावेत. नाहीतर कायदेशीर कारवाईला समोर जावे. बोरवणकरांनी आपलं भंगार पुस्तक विकलं जावं यासाठी असे आरोप केलेत. याचा बोलविता धनी कोण?. ज्याला आमच्याकडे यायचं होतं. परंतु तिकडे राहून दाखवायचं होतं असा नेता आहे. हा आरोप आमच्या व्यक्तीच्या सांगण्यावरून करण्यात आला आहे. घर का भेदी लंका ढाये असा प्रकार आहे.
त्याग, श्रद्धा आणि समर्पण हे कायम भाजप कार्यकर्त्यांकडून शिकण्याचे गुण असल्याचे म्हणत मिटकरींनी भाजपची स्तुती केली आहे. बारामतीतील संभाव्य मुकाबल्यावर मिटकरींनी वक्तव्य केले आहे. सुप्रिया सुळे यांना शरद पवारानंतर सर्वाधिक ताकद ही अजितदादांनी दिलीय. निवडणुकीत कुणी कुठे आणि कुणामागे उभं रहावं याचं प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, असे मिटकरी म्हणाले.
पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी आपल्या पुस्तकातून अजित पवारांबद्दल खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. येरवडा कारागृहाशेजारची जागा खासगी बिल्डरला विकण्यासाठी अजित पवारांनी दबाव आणल्याचा आरोप मीरा बोरवणकर यांनी केला आहे. मॅडम कमिशनर: द एक्स्ट्राऑर्डिनरी लाईफ ऑफ अॅन इंडियन पोलीस चीफ पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांचं हे पुस्तक येत्या काही दिवसात बाजारपेठेत येणार आहे पण त्याआधीच या पुस्तकातल्या एका दाव्यामुळं खळबळ माजली आहे.
पुण्याच्या पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना भेटले. त्याचबरोबर आसपासच्या पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांचा आढावा घेतला. एक दिवस मला विभागीय आयुक्तांचा कॉल आला. त्यांनी सांगितलं की, पुण्याचे पालकमंत्री तुमच्याबद्दल विचारत आहेत. तुम्ही त्यांना एकदा भेटा. याचवेळी विषय येरवडा पोलीस स्टेशनच्या जमिनीसंदर्भातील असल्याचंही त्यांनी मला सांगितलं. विभागीय कार्यालयातच मी पालकमंत्र्यांची भेट घेतली. पालकमंत्र्यांकडे येरवडा पोलीस स्टेशन परिसराचा नकाशा होता. त्यांनी मला सांगितलं की, या जागेचा लिलाव झालेला आहे. जास्त बोली लावणाऱ्यासोबत जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पार पाडावी. मी पालकमंत्र्यांना सांगितलं की, येरवडा पुण्यातील मध्यवर्ती ठिकाणी आहे. त्यामुळे भविष्यात मोक्याच्या ठिकाणी पुन्हा जागा मिळणार नाही. शिवाय कार्यालयासाठी आणि पोलीस वसाहतीसाठी आपल्याला या जागेची गरज आहे. मी आताच आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारलेला असताना सरकारी जमीन खासगी व्यक्तीला दिल्यास माझ्याकडे चुकीच्या नजरेनं बघितलं जाईल. पण, त्या मंत्र्यानं माझं काहीही ऐकलं नाही आणि जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्याचा आग्रह धरला. या ३ एकर जागेवर पोलिसांचं कार्यालय होणार होतं. पण जिल्ह्याच्या दादा मंत्र्यांनी माझं न ऐकता विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून जमिनीचा व्यवहार पूर्ण केला
अमरावती : लोकांमधील अंधश्रद्धा कमी करण्यासाठी अनेक संस्था, संघटना करत असतात. मात्र, लोकांमधील अंधश्रद्धा कमी होत नसल्याचे चित्र आहे. बालकाच्या मदतीने गुप्तधन शोधाऱ्या टोळीला अमरावती पोलिसांनी (Amaravati Police) ताब्यात घेतले आहे.
एका 11 वर्षीय पायाळू बालकाच्या मदतीने अमरावतीच्या टाकळी जहागीर येथील एका महिलेच्या घरात गुप्तधन शोधण्याचा प्रकार सुरू होता. या प्रकाराबाबत काही गावकऱ्यांना या प्रकाराची कुणकूण लागली. गुप्तधन शोधासाठी सुरू असलेल्या या प्रकाराची माहिती पोलिसांना देण्यात आली. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्याचे आरोपींना समजताच घटनेतील सर्व आरोपींनी वेगवेगळ्या ठिकाणी पळ काढला. त्यानंतर सहा आरोपींना पकडण्यात नांदगाव पेठ पोलिसांना यश आले असून घटनेने मात्र परिसरात चर्चांना उधाण आले आहे.
टाकळी जहागीर येथील मुक्ता बाभळे (65) यांच्या घरात गुप्तधन असल्याची माहिती त्यांनी जवळच्या एका व्यक्तीला दिली. गुप्तधन काढण्यासाठी एक महाराज, 11 वर्षीय पायाळू बालक आणि चार तांत्रिक व्यक्ती या महिलेच्या घरी आले. घरात पूजापाठ मांडून त्या बालकाची देखील पूजा करण्यात आली आणि घरात धन कुठे आहे यासाठी त्याला चालायला लावले. मात्र, सर्वकाही सुरळीत असताना या अघोरी प्रकारची कुणकूण गावातील काही सुज्ञ लोकांना लागताच त्यांनी या बाबत पोलीसांना माहिती दिली.
घटनास्थळी पोलीस येईपर्यंत ग्रामस्थ हे त्या महिलेच्या घरावर पाळत ठेवून बसले होते. मात्र घरात असलेल्या मांत्रिक आणि महिलेला घराबाहेरील हालचाल लक्षात येताच सर्वांनी पोलीस येण्याच्या आत तेथून पळ काढला.
पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल होताच त्यांनी घरात मांडलेली पूजा आणि पूजेसाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याचा पंचनामा करून मुक्ता बाभळे या महिलेला तसेच महाराज सुखदेव पाटोरकर (भांडुप) यांना ताब्यात घेतले.
या महिलेची विचारपूस केल्यानंतर तिने सचिन बोबडे याचे नाव घेतले त्यानुसार पोलिसांनी लगेच गौरखेडा कुंभी गाव गाठून फरार झालेला आरोपी सचिन बोबडे याला ताब्यात घेतले. सचिन बोबडे याने पोलिसांसमक्ष या कृत्याची कबुली देत यामध्ये समाविष्ट असलेल्या सर्व आरोपींची नावे सांगितली आणि तपास पथक तेथूनच पुढील फरार आरोपी ताब्यात घेण्यासाठी भैसदेही (मध्यप्रदेश) येथे रवाना झाले. त्यांनी तेथून मुख्य आरोपी असलेला रामकिसन अखंडे याला ताब्यात घेतले. या प्रकरणातील तिसरा मुख्य आरोपी तिवसा येथील सातरगाव येथे दडून बसला होता पोलिसांच्या पथकाने तेथून रवी धिकार आणि त्या अकरा वर्षीय बालकाला ताब्यात घेतले.
अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर शरद पवार गट (Sharad Pawar) आणि अजित पवार गटाकडून (NCP Ajit Pawar) एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अजित पवार यांच्या नेतृत्त्वातील गटाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि निवडणूक चिन्ह घडाळ्यावर दावा केला आहे. तर, दुसरीकडे राष्ट्रवादीत पडद्यामागे हालचाली सुरू असल्याचे म्हटले जात आहे. अशा चर्चेला पुन्हा एकदा उधाण आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आणि अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांची गुप्त भेट झाली असल्याचे म्हटले जात आहे. विशेष म्हणजे मिटकरी यांनी ही बाब पूर्णपणे नाकारली देखील नाही.
निवडणूक आयोगात राष्ट्रवादीच्या चिन्हाबाबत आणि मूळ पक्षाचा वाद सुरू आहे. या सुनावणीत शरद पवार यांच्या कार्यपद्धतीबाबत आक्षेप अजित पवार गटाकडून नोंदवण्यात आले आहेत. तर, दुसरीकडे शरद पवार हे पक्ष बांधण्यासाठी पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. एका बाजूला ही स्थिती असताना दुसरीकडे शरद पवार गटाकडून अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांची मनधरणी सुरू आहे का, याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे.
अकोल्यात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांची अकोल्यात भेट झाल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. अकोल्यात शरद पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर एका गुप्त ठिकाणी ही भेट झाल्याची सूत्रांची माहिती आहे. चर्चेचा नेमका तपशील गुलदस्त्यात आहे. शरद पवारांच्या खडकी येथील सर्वात शेवटच्या संवाद कार्यक्रमात जयंत पाटील हे गैरहजर होते. त्याचवेळी त्यांची अमोल मिटकरींसोबत भेट झाल्याची चर्चा आहे.
यासंदर्भात ‘एबीपी माझा’ने आमदार अमोल मिटकरी यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी या मुद्यावर थेट भाष्य करणं टाळलं. मात्र, सर्वच गोष्टी बोलायच्या नसतात. काही वेळ आल्यावर सांगायच्या असतात, असे वक्तव्यही केले. आमच्या गटाकडून अद्यापही समेटासाठी प्रयत्न सुरू असल्याचं मिटकरींनी स्पष्टीकरण दिले आहे.
अजित पवार मुख्यमंत्री (Ajit Pawar) होणार हे स्वप्न आहे, ते प्रत्यक्षात घडणार नाही, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी बोचरा वार केला. शरद पवार आज अकोला (Sharad Pawar Akola) दौऱ्यावर असताना माध्यमांशी संवाद साधताना हे वक्तव्य केले. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना इंडिया आघाडीत (I.N.D.I.A.)घेण्यास आम्ही सकारात्मक आहोत. त्याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं.
Sharad Pawar on Chhagan Bhujbal: अकोला : मंत्री छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) उपस्थित केलेल्या प्रश्नांना जास्त महत्व देण्याची गरज नाही, असं म्हणत थोरल्या पवारांनी थेट भुजबळांच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष केलं आहे. तसेच, भाजपसोबत जाण्याचा काहींचा आग्रह होता, ही गोष्ट खरी आहे. सुप्रिया सुळेंना (Supriya Sule) अध्यक्ष करावं हा भुजबळांचाच प्रस्ताव होता. आमचा तो प्रस्ताव नव्हताच. पण तो स्वीकारला नाही. अध्यक्षपद स्वीकारल्यानंतरची पुढची जी स्टेप होती ती मान्य नव्हती, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच, शरद पवारांनी भुजबळांवरच पलटवारही केला आहे. भुजबळ यांनीच आपण खोटं बोलून शपथविधीला गेल्याचं कबुल केल्याचा गौप्यस्फोट शरद पवारांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावरही निशाणा साधला आहे. प्रकाश आंबेडकरांनी इंडिया आघाडीतील मतभेदावरुन निशाणा साधला होता. शरद पवार अदानी सोबत असतात आणि राहुल गांधी अदानीला विरोध करतात, असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी निशाणा साधला होता. गुजरातमध्ये एका शेतकऱ्यानं डेअरी टाकली. दूधापासून नवीन औषध करण्याचा हा कारखाना होता. त्याच्या उद्घाटनाला मी गेलो होतो. त्या कार्यक्रमाला अदानींनाही बोलावलं होतं. एखादा सार्वजनिक कार्यक्रम असेल आणि वेगवेगळ्या विचारांचे लोक एकत्र जमले तर ती राजकीय भूमिका असत नाही, असं शरद पवार म्हणाले.
आमची भूमिका स्वच्छ. पक्षात फूट आम्ही पाडली नाही. आम्हाला खात्री आहे की आम्हाला आमचा पक्ष म्हणून आमचं म्हणणं मांडण्याची संधी मिळेल.उद्या कुणी युनायटेड नेशन्सचा अध्यक्ष म्हणून पत्र लिहील. आमची भूमिका स्पष्ट आहे पक्षात फूट आम्ही पाडली नाही, असं शरद पवार म्हणाले.
2019 साली शरद पवारांनी भाजपसोबत सरकार स्थापन करण्याचं ठरवलं होतं, असा गौप्यस्फोट मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. त्यावेळी सर्व चर्चा झाली होती, पण ऐनवेळी शरद पवारांनी भाजपसोबत जाण्यास नकार दिल्याचं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं आहे.
जनमानसात आम्हाला मिळणारा प्रतिसाद मतांत परिवर्तित झाला तर आमची सत्ता येईल. सुप्रिया सुळेंना पक्षाध्यक्ष करा हा छगन भुजबळांचा प्रस्ताव होता. मी उद्योगपती गौतम अदाणी यांच्या औषधाच्या कारखान्याच्या उद्घटनाला गेलो. सार्वजनिक कार्यक्रमात जावं लागतं. अजित पवार मुख्यमंत्री होणार हे स्वप्न. देशात अनेक भागात भाजप नाहीय. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढणं ही सरकारची जबाबदारी आहे,आमची नव्हे. भुजबळांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना जास्त महत्व देण्याची गरज नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Sharad Pawar on Ajit Pawar: अजित पवार मुख्यमंत्री होणार हे स्वप्नच, शरद पवारांचा बोचरा वार