अजित पवार मुख्यमंत्री होणार हे स्वप्नच, शरद पवारांचा बोचरा वार

अजित पवार मुख्यमंत्री होणार हे स्वप्नच, शरद पवारांचा बोचरा वार


Sharad Pawar Full PC : अकोला : अजित पवार मुख्यमंत्री (Ajit Pawar) होणार हे स्वप्न आहे, ते प्रत्यक्षात घडणार नाही, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी बोचरा वार केला. शरद पवार आज अकोला (Sharad Pawar Akola) दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी सहकार मेळाव्याला हजेरी लावली. या मेळाव्यानंतर त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना इंडिया आघाडीत (I.N.D.I.A.)घेण्यास आम्ही सकारात्मक आहोत. त्याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं. 

जर अजित पवार मुख्यमंत्री झाले तर मी स्वत: त्यांना हार घालेन असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. त्याबाबत शरद पवारांना विचारण्यात आलं. त्यावर पवार म्हणाले, “हे स्वप्न आहे, ते प्रत्यक्षात घडणार नाही”

प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीत घेणार? 

यावेळी शरद पवार यांनी प्रकाश आंबेडकरांच्या इंडिया आघाडीतील समावेशाबाबत भाष्य केलं. “प्रकाश आंबेडकरांनी यापूर्वी काय झालं याचा विचार न करता पुढचा विचार करावा की त्यांना आघाडीत यायचं आहे का? प्रकाश आंबेडकर इंडिया आघाडीच्या पुढील बैठकीला असतील की नाही ते आघाडी आणि प्रकाश आंबेडकर ठरवतील. आमचा आग्रह हाच असणार आहे की जे तीन पक्ष एकत्र आलो आहोत त्यांचंच सरकार येईल. प्रकाश आंबेडकरांना इ़ंडिया आघाडीत घेण्यास आम्ही सकारात्मक आहोत. त्याबाबत लवकरच निर्णय घेणार”, असं शरद पवार म्हणाले. 

शरद पवार काय काय म्हणाले? 

जनमानसात आम्हाला मिळणारा प्रतिसाद मतांत परिवर्तित झाला तर आमची सत्ता येईल. सुप्रिया सुळेंना पक्षाध्यक्ष करा हा छगन भुजबळांचा प्रस्ताव होता. मी उद्योगपती गौतम अदाणी यांच्या औषधाच्या कारखान्याच्या उद्घटनाला गेलो. सार्वजनिक कार्यक्रमात जावं लागतं. 
 
अजित पवार मुख्यमंत्री होणार हे स्वप्न. देशात अनेक भागात भाजप नाहीय. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढणं ही सरकारची जबाबदारी आहे,आमची नव्हे.
भुजबळांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना जास्त महत्व देण्याची गरज नाही

पक्षात फूट आम्ही पाडली नाही : शरद पवार 

आमची भूमिका स्वच्छ. पक्षात फूट आम्ही पाडली नाही. आम्हाला खात्री आहे की आम्हाला आमचा पक्ष म्हणून आमचं म्हणणं मांडण्याची संधी मिळेल.उद्या कुणी युनायटेड नेशन्सचा अध्यक्ष म्हणून पत्र लिहील. आमची भूमिका स्पष्ट आहे पक्षात फूट आम्ही पाडली नाही, असं शरद पवार म्हणाले.



Source link

धक्कादायक! डॉक्टरने घरात जीवन संपवलं, आजारापणाला कंटाळून उचलले टोकाचा निर्णय घेतल्याचा संशय

धक्कादायक! डॉक्टरने घरात जीवन संपवलं, आजारापणाला कंटाळून उचलले टोकाचा निर्णय घेतल्याचा संशय


अकोला :  अकोला शहरात (Akola) एका डॉक्टरनं राहत्या घरातील शौचालयामध्ये स्वतःच्या हातावर आणि गळ्यावर चाकूनं वार करून आत्महत्या केली आहे. ही घटना बुधवारी, 11 ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. डॉक्टराने असे टोकाचे पाऊल उचलल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. 

गजानन सुरेश बुवा उर्फ कुळकर्णी असं आत्महत्या केलेल्या डॉक्टराचं नाव आहे. ते जवाहरनगर परिसरातील चायना गेटजवळ राहत होते. गजानन हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्या आजाराला कंटाळूनच त्यांनी जीवन संपवलं असावं, अशी शक्यता कुटुंबीयांनी वर्तवली आहे. या प्रकरणी सिव्हिल पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. गजानन हे मूळ बीएचएमस डॉक्टर असून समर्थ कोचिंग क्लासेसवर ‘नीट’च्या विद्यार्थ्यांना शिकवायचे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीतील जवाहरनगर परिसरातील चायना गेट भागातील एका अपार्टमेंटमध्ये गजानन सुरेश बुवा उर्फ कुळकर्णी हे सहकुटुंब वास्तव्यात होते. गजानन हे मूळ बीएचएमस डॉक्टर असून समर्थ कोचिंग क्लासेसवर ‘नीट’च्या विद्यार्थ्यांना शिकवायचे. दरम्यान गजानन हे अगदी प्रेमळ आणि शांत स्वभावाचे होते. काल मंगळवारी कुटुंबियांना कुणालाही न सांगता घरातून रागाच्या भरात निघून गेले. सायंकाळपर्यंत सर्व ठिकाणी त्यांचा शोध घेण्यात आला. मात्र, कुटुंबीयांना कुठलाही त्यांचा सुगावा हाती लागला नाही. अखेर कुटुंबियांनी या संदर्भात सिव्हिल लाईन पोलिसांत ते बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. 

अन् त्यांनी स्वत: ला संपवण्याचा घेतला निर्णय 

24 तासानंतर गजानन कुळकर्णी हे स्वतःहून आज बुधवारी सकाळी साडेदहा वाजता घरी परतलेत. आपण कुठे गेले होते, काय झालंय? असे अनेक प्रश्न कुटुंबियांनी त्यांना विचारले पण त्यावर काही नं बोलता गजानन हे शांतचं बसले होते. गजानन घरी परतल्यानंतर सकाळी पत्नी आणि नवव्या वर्गात शिकणारा मुलगा त्यांच्यासह असे तिघे जण घरात होते. जेवण केल्यानंतर दुपारी तीन वाजताच्या सुमारास ते बाथरूमला जाण्यासाठी शौचलयामध्ये बराच वेळ झाल्यानंतर गजानन हे बाहेर आले नाही, त्यांच्या पत्नीने त्यांना हाक लावली मात्र आतून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. शेजारच्याच्या मदतीने शौचालयाचा दरावाजा तोडण्यात आला. त्यानंतर आतील दृश्य पाहून पत्नीला धक्काच बसला. 

गळा कापून घेऊन केली आत्महत्या  

गजानन हे रक्तबंबाळ अवस्थेत दिसल्यानंतर लागलीच यासंदर्भात सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली. ठाणेदारांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेटी दिल्यात. घटनास्थळाचा पंचनामा करून गजानन यांचा मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी अकोल्याचे शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. या घटनेसंदर्भात सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार गजानन यांनी स्वतः हातावर आणि गळ्यावर चाकूने वार करून आत्महत्या केल्याचे समजते. वैद्यकीय अहवालानंतर सर्व बाबी स्पष्ट होणार असेही ते म्हणाले.

आजारपणातून आत्महत्या केल्याचा संशय 

गजानन यांच्या मृतदेहाजवळ सुसाईड नोट आढळून आली नाही. ते सतत आजारी होते, त्यामुळे ते नेहमी तणावात राहायचे, अशा प्रकारची माहिती कुटुंबीयांनी पोलिसांना दिली आहे. तरीही त्यांच्या आत्महत्येच मूळ कारण अद्यापपर्यंत समोर आलं नाही. सिव्हील लाईन पोलीस त्या दिशेनेही तपास करीत आहे.



Source link

यशोमती ठाकुरांवर टीका करताना अनिल बोंडे यांची जीभ घसरली

यशोमती ठाकुरांवर टीका करताना अनिल बोंडे यांची जीभ घसरली


अमरावती : काँग्रेसनेत्या (Congress) आमदार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांच्यावर टीका करताना खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांची जीभ घसरली. इंग्रजांची चाकरी केली म्हणून यशोमती ठाकूर यांना ठाकुरांची पदवी मिळाली, असं बोंडे म्हणाले. तसंच यांचा डीएनए हा इंग्रजांची चाकरी करणाऱ्यांचा आहे, असंही ते म्हणाले. 

अनिल बोंडे म्हणाले, इंग्रजांची चाकरी केली म्हणून यशोमती ठाकूरांना ठाकुरांची पदवी मिळाली. इंग्रजांची चाकरी करणाऱ्यांचा यांचा डिएनए आहे. काँग्रेसचा डीएनए महात्मा गांधीचा नाही तर तो फिरोज जहांगीर गांधीचा आहे.  भाजपचा डीएनए हा भारताचा आहे..

दानधर्म केल्याने “ठाकुर” ही पदवी दिल्याचा भटांचा दावा

यशोमती ठाकूर यांचे अनिल बोंडें यांना थेट भाटांकडील इतिहास दाखवून  प्रतिउत्तर दिले आहे.1700 साली सव्वा तोळ्याची एक अशा सव्वा लाख सोन्याच्या गिन्या या गोरगरीबांना दान केल्या म्हणून यशोमती ठाकुरांच्या कुटुंबाला “ठाकुर” ही पदवी दिल्याचा दावा यशोमती ठाकूर यांच्या घरी आलेल्या भाटांनी  केला आहे. 

 यशोमती ठाकूर यांचे अनिल बोंडे यांना प्रत्युत्तर

 यशोमती ठाकूर म्हणाल्या,  सन 1700 मध्ये सव्वा तोळ्याची एक अशा सव्वा लाख सोन्याच्या गिन्या या गोरगरीबाना दान केल्या म्हणून यशोमती ठाकुरांच्या कुटुंबाला “ठाकुर” ही पदवी देण्यात आली आहे. दुष्काळात आमच्या पूर्वजांनी दान केले त्यांच्या नोंदी आहेत. माझ्या पूर्वजांनी गरीबांना मदत केली हा इतिहास आहे. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे दंगली झाल्या आहे.खासदार म्हणून 
 त्यांना जे मूळ काम त्यांना करायचे आहेत ते करत नाही. ओबीसीची जनगणना झालीच पाहिजे.   

भाजपचा आणि नथुराम गोडसे यांचा डीएनए एकच

भाजपचा आणि नथुराम गोडसे यांचा डीएनए एकच आहे. नथुराम गोडसे यांनी पण महात्मा गांधींना रावणाचं रूप दिलं होतं, आणि स्वतः महात्मा गांधीना मारायचा प्रयत्न केला. संघ आणि भाजप सतत करत असतात. गांधी त्या युगातला असो की या युगातला असो गांधी गांधी आहे. या देशाचा मूळ डीएनए गांधी आहे. कितीही मारण्याचा प्रयत्न केला तरी गांधी मरत नसतो.. जी काही विकृती आहे ती विकृती सत्ताधाऱ्यांच्या डोक्यांमध्ये आहे. ती विकृती नष्ट झाली पाहिजे यासाठी येत्या दसऱ्याला त्याचं दहन झालं पाहिजे असा आमचा अट्टाहास आहे, असे  काही दिवसांपूर्वी यशोमती ठाकूर म्हणाल्या होत्या.                

 

 

 



Source link

Amravati मध्ये  दोन डॉक्टरांविरुद्ध चिमुकल्या बाळासह आई-वडिलांचं उपोषण : ABP Majha

Amravati मध्ये दोन डॉक्टरांविरुद्ध चिमुकल्या बाळासह आई-वडिलांचं उपोषण : ABP Majha



<p>अमरावतीमध्ये दोन डॉक्टरांविरुद्ध चिमुकल्या बाळासह आई-वडिलांचं उपोषण. गर्भवती असताना तपासादरम्यान आधी बाळ चांगलं असल्याचं सांगितलं. मात्र नंतरच्या सोनाग्राफीमध्ये बाळ अॅबनॉर्मल असल्याचं सांगितलं.&nbsp;</p>



Source link

Heat Wave: ‘ऑक्टोबर हिट’चा तडाखा; विदर्भात घामाच्या धारा,  उकाड्याने नागरिक त्रस्त

Heat Wave: ‘ऑक्टोबर हिट’चा तडाखा; विदर्भात घामाच्या धारा, उकाड्याने नागरिक त्रस्त


गोंदिया:  देशभरातून मॉन्सून परतीच्या मार्गावर आहे. अनेक राज्यातून मॉन्सूनचा (Monsoon Withdrawal) परतीचा प्रवास सुरू झाला आहे. मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाल्याने उत्तरेकडील काही राज्यात थंडीची चाहूल लागली आहे.तर महाराष्ट्रात ऑक्टोबर हिटच्या (Heat Wave) झळा जाणवत आहे. विदर्भात पावसाने विश्रांती घेतल्याने तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबई पुण्यासह राज्यातील काही जिल्ह्यात उकाडा जाणावत आहे.  

ऑक्टोबरमधील वाढत्या उष्म्याने वर्धेकरांना चांगलाच घाम फोडला आहे. वर्धा जिल्हा आधीच उष्णता असताना आता  त्यात ऑक्टोबर हिटची भर पडलीय. त्यामुळं वातावरणात चांगलाच उकाडा निर्माण झाला आहे. वर्ध्याचे तापमान 36 अंशावर गेल्याने घामाच्या धारा लागत असल्याने नागरिक हैराण झाले आहे. गेल्या चार पाच दिवसापासून वातावरणात उष्मा असल्याने आरोग्यावर देखील त्याचा परिणाम होत आहे. वर्धेकरांना आणखी काही दिवस ऑक्टोबर हिटचा सामना करावा लागण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

विदर्भात ऑक्टोबरमध्येच घामाच्या धारा 

वर्ध्यात नाही तर हा परिणाम संपूर्ण विदर्भात दिसून येत आहे. विदर्भाला देखील या उष्म्याने घाम फोडला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे 37.1 अंश सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे.  त्यापाठोपाठ अकोला आणि वर्धा हे दोन जिल्हे 36 अंश सेल्सिअस वर आहे. तापमान अचानक वाढले तर वातावरणात उष्मा वाढल्याने चांगलाच उकाडा निर्माण झाला आहे. ब्रह्मपुरी, चंद्रपूर ,अकोला आणि, वर्ध्यात तापमानात वाढ झाली. वर्ध्याचे तापमान 36 अंशावर गेल्याने घामाच्या धारा लागत असल्याने नागरिक हैराण झाले आहे. गेल्या चार पाच दिवसापासून वातावरणात उष्णता वाढल्याने आरोग्यावर देखील त्याचा परिणाम होत आहे. वर्धेकरांना आणखी काही दिवस ऑक्टोबर हिटचा सामना करावा लागण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

 विदर्भातील कोणत्या जिल्ह्यात किती तापमान

तापमानामध्ये वाढ झाल्याने जनता उकाड्याने त्रस्त झाली आहे. येत्या काही आठवड्यात तापमानाचा पारा आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सध्या मॉन्सून देशाभरातून परतीच्या वाटेवर आहे. महाराष्ट्रातून ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात त्याचा परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता आहे.  किमान व कमाल तापमानामध्ये वाढ झाल्याने जनता उकाड्याने त्रस्त झाली आहे. येत्या काही आठवड्यात तापमानाचा पारा आणखी वाढण्याची शक्यता  आहे. 

हे ही वाचा :

Weather Update : पुढील 48 तासांत परतीच्या पावसाची हजेरी, महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांत पावसाचा अंदाज



Source link

Akola Teacher Protest : सरकारी शाळा खासगी कंपन्यांना देण्याच्या निर्णयाविरोधात शिक्षकांचा मोर्चा

Akola Teacher Protest : सरकारी शाळा खासगी कंपन्यांना देण्याच्या निर्णयाविरोधात शिक्षकांचा मोर्चा



<p>Akola Teacher Protest: सरकारी शाळा खासगी कंपन्यांना देण्याच्या निर्णयाविरोधात शिक्षकांचा मोर्चा</p>



Source link

YouTube
Instagram
WhatsApp