तुम्ही एक नाही तर दहा खासदार पाठवा, बच्चू कडू पडणार नाही; बच्चू कडूंचा भाजपला थेट इशारा

तुम्ही एक नाही तर दहा खासदार पाठवा, बच्चू कडू पडणार नाही; बच्चू कडूंचा भाजपला थेट इशारा


वाशिम: एकीकडे आम्हाला सत्तेत या म्हणून सांगायचं आणि दुसरीकडे काहीही करून बच्चू कडूला (Bachchu Kadu) पाडा असा आदेश द्यायचा हे काही बरोबर नाही, मी बावनकुळेंना (Chandrashekhar Bawankule) सांगतो, एक नाही तर दहा खासदार पाठवा, बच्चू कडू पडणारन नाही असा थेट इशारा प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे. वाशिममध्ये एका दिव्यांग मेळाव्याला आले असताना बच्चू कडू यांनी भाजपला हा इशारा दिला आहे. 

एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाची साथ सोडून भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी त्यांना साथ दिली होती. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात बच्चू कडू मंत्री होते, शिंदेंनीही त्यांना मंत्रीपद देतो असं आश्वासन दिलं होतं. पण रखडलेल्या मंत्रिमंडळाच्य विस्तारामुळे बच्चू कडूंना अद्याप मंत्रीपद मिळालं नाही. त्यावर या आधीही बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली होती. आता त्यानंतर त्यांनी भाजपला थेट इशाराच दिला आहे. 

Bachchu Kadu On BJP : भाजपला थेट इशारा 

अमरावती जिल्ह्यातील बच्चू कडू यांच्या अचलपूर मतदारसंघातून बच्चू कडू यांच्याविरोधात भाजपने जोरदार तयारी सुरू केली असल्याची चर्चा आहे. कोणत्याही परिस्थिती अचलपूरचा आमदार हा भाजपचाच असला पाहिजे या दृष्टीने भाजपने गेल्या चार वर्षांपासून प्रयत्न सुरू केला आहे. पण बच्चू कडू यांनी शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि भाजपसोबत सत्तेत सामील झाले. त्यानंतरही या मतदारसंघावर भाजपचा डोळा असल्याचं लपून राहिलं नाही. 

बच्चू कडूंना त्यांच्याच मतदारसंघात घेरण्याच्या भाजपच्या रणनीतीवर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “एकीकडे आम्हाला सांगायचं की सत्तेमध्ये या आणि दुसरीकडे मित्रत्व पाळायचं नाही हे असं भाजपचं सुरू आहे. काही करून बच्चू कडू पडला पाहिजे यासाठी हालचाली सुरू आहेत. आपण यासंबंधी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना सांगितलं होतं की खासदार अनिल बोंडे यांच्याकडे लभ द्या म्हणून. आता मी त्यांना सांगतो, एक नव्हे तर दहा खासदार पाठवा, बच्चू कडू पडणार नाही.”

भाजप त्रास देत असल्याचा आरोप 

आमदार बच्चू कडूं यांनी मंगळवारी अकोल्यात बोलताना भाजपवर गंभीर आरोप केला आहे. आपल्या मतदारसंघात भाजप आपल्याला त्रास देत असल्याचा आरोप बच्चू कडूंनी भाजपवर केला आहे. आपल्या मतदारसंघात काँग्रेस आणि इतर पक्षांचा आपल्याला त्रास नाही. मात्र, भाजपचं आपल्याला त्रास देत असल्याचा खळबळजनक आरोप कडूंनी भाजपवर केला. मात्र आपण त्याची काळजी करत नसल्याचं बच्चू कडूंनी ठणकावले आहे.  

ही बातमी वाचा: 

 



Source link

जून-जुलैमधील अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईसाठी 1 हजार 71 कोटींची मदत

जून-जुलैमधील अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईसाठी 1 हजार 71 कोटींची मदत


Agriculture News : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) आणि अमरावती (Amravati) महसूल विभागात जून आणि जुलैमध्ये अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) झालेल्या नुकसानीच्या मदतीपोटी शेतकऱ्यांना 1 हजार 71 लाख 77 हजार वितरित करण्यास राज्य सरकारने मंगळवारी मान्यता दिली आहे. या दोन्ही विभागांतील एकूण 14 लाख 9 हजार 318 शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. ज्यात, अमरावती विभागातील एकूण 7 लाख 63 हजार 23 शेतकऱ्यांना 557  कोटी 26  लाख रुपये आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील 6 लाख 46 हजार 295 शेतकऱ्यांना 435 कोटी 74 लाख रुपयांची मदत दोन हेक्टरच्या मर्यादेत पीक नुकसानीसाठी मिळणार आहे. 

शेतकऱ्यांना दिलासा मिळणार? 

जून आणि जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानंतर तत्कालीन कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या आदेशाने पंचनामे करण्यात आले होते. त्यानुसार स्थानिक कृषी विभागसह महसूल प्रशासनाकडून पंचनामे करून अहवाल सरकारकडे पाठवण्यात आला होता. त्यानंतर आता या नुकसानीची भरपाईला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. मात्र, हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यासाठी आणखी किती वेळ लागेल हे देखील पाहणं महत्वाचे असणार आहे. 

आता पुन्हा पंचनामे करण्याची मागणी? 

जून जुलैमध्ये झालेली अतिवृष्टी मोजक्याच काही भागात झाली होती. मात्र, इतर भागात पावसाने दडी मारल्याचे चित्र होते. विशेष म्हणजे अजूनही अनेक भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे खरीपाचे पीकं हातून गेली असून, त्यांचे पंचनामे करण्याची मागणी शेतकरी करत आहे. मराठवाड्यात आणि विदर्भात परिस्थिती गंभीर असून, अनेक भागात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. तर प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करून मदत करण्याची मागणी शेतकरी करत आहे. 

कोणत्या जिल्ह्याला किती निधी? 

छत्रपती संभाजीनगर विभाग










जिल्हा  लाभार्थी शेतकरी  मदतीची रक्कम 
जालना  282 33 लाख 59 हजार 
परभणी  201 27 लाख 75 हजार 
हिंगोली  27,742 14 कोटी 54 लाख 28 हजार 
नांदेड  6,17,911 420 कोटी 46 लाख 61 हजार 
बीड  127 9 लाख 64 हजार 
लातूर  32 2 लाख 92 हजार 

अमरावती विभाग 

छत्रपती संभाजीनगर जिल्हा वगळला? 

दरम्यान, जून आणि जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये मराठवाड्यातील काही भागात शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. याचवेळी छत्रपती संभाजीनगरच्या काही भागाचे देखील नुकसान झाले होते. यावेळी प्रशासनाकडून पंचनामे देखील केली गेली होती. मात्र, मंगळवारी जाहीर करण्यात आलेल्या मदतीत संभाजीनगर जिल्ह्याला वगळण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

चिंता वाढणार! बीड जिल्ह्यात 79 टक्के पाऊस, धरणांमध्ये केवळ 18 टक्के पाणीसाठा शिल्लक



Source link

भाजपने आपल्यासोबत राहणाऱ्यांविरोधात फिल्डिंग लावायचे धंदे बंद करावेत; बच्चू कडूंचा हल्लाबोल

भाजपने आपल्यासोबत राहणाऱ्यांविरोधात फिल्डिंग लावायचे धंदे बंद करावेत; बच्चू कडूंचा हल्लाबोल


अकोला महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात मंत्रिपद आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत असलेले प्रहार जनशक्तीचे आमदार बच्चू कडू यांनी आता भाजपवरच हल्लाबोल केला आहे. भाजपने आपल्यासोबत उभं राहणाऱ्यांची फिल्डिंग लावण्याचे धंदे बंद करावेत, असा थेट हल्लाबोल बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी केला आहे. काँग्रेस (Congress) आणि इतर पक्षांकडून जेवढा त्रास होत नाही तेवढा त्रास भाजपकडून (BJP) होत असल्याचा आरोप त्यांनी केला. 

‘प्रहार जनशक्ती पक्षा’चे अध्यक्ष आमदार बच्चू कडूंनी अकोल्यात (Akola) भाजपवर गंभीर आरोप केला आहे. आपल्या मतदारसंघात भाजप आपल्याला त्रास देत असल्याचा आरोप बच्चू कडूंनी भाजपवर केला आहे. आपल्या मतदारसंघात काँग्रेस आणि इतर पक्षांचा आपल्याला त्रास नाही. मात्र, भाजपचं आपल्याला त्रास देत असल्याचा खळबळजनक आरोप कडूंनी भाजपवर केला. मात्र, आपण त्याची काळजी करत नसल्याचं बच्चू कडूंनी ठणकावले आहे.  आपल्याला त्रास देण्यासाठी भाजपनं आणखी दोन आमदार, तीन खासदार लावावेत असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे. याला आपण घाबरणार नसल्याचे ही बच्चू कडू यांनी म्हटले.

भाजपनं मैत्री करताना आणि मित्रत्व निभावतांना ते सर्वच प्रकारे निभवावं. फक्त कामापुरतं वापरून फेकून द्यावं, असं करू नये असंही बच्चू कडू यांनी म्हटले. भाजपनं आपल्याच सोबत राहणाऱ्यांची फील्डिंग लावायचे धंदे बंद करावेत असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. गेल्या काही काळात बच्चू कडू यांचा खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याशी वाद चांगलाच गाजला होता. याला भाजपचं समर्थन असल्याचा त्यांचा आरोप आहे.

मागील काही काळात भाजपने अमरावती जिल्ह्यात (Amaravati) पक्षाची पकड मजबूत करण्यासाठी जोर लावला आहे. अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) या 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीच्या पाठिंब्यावर निवडून आल्या होत्या. त्यानंतर भाजपने त्यांना आपल्या गोटात वळवले. त्यांचे पती आमदार रवी राणा (Ravi Rana) हे देखील भाजपच्यासोबत आहेत. तर, आमदार बच्चू कडू हे अमरावतीमधील अचलपूर मतदारसंघातून आमदार आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना 81,252 मते मिळाली होती. तर, काँग्रेस उमेदवार अनिरुद्ध देशमुख यांना 72,856 मते मिळाली होती. 

इतर महत्त्वाच्या बातम्या : 



Source link

प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात आंबेडकरांचे ‘तांडे सामू चालो’

प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात आंबेडकरांचे ‘तांडे सामू चालो’


अकोला :  वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) म्हटलं की सर्वात आधी चेहरा समोर येतोय तो प्रकाश आंबेडकरांचा. मात्र, अलिकडे वंचितमध्ये आंबेडकरांच्या पुढच्या पिढीचे प्रतिनिधी असलेले प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) सक्रिय होताना पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत सुजात अकोल्यात फारसं लक्ष घालत नव्हते. मात्र, ते आता अकोल्यात अधिक सक्रिय झाले आहेत. प्रकाश आंबेडकर 2024 ची  लोकसभा निवडणूक अकोल्यातून लढणार आहेत. त्याच अनुषंगाने कालपासून (2 ऑक्टोबर) सुजात यांनी अकोला जिल्ह्यातील बंजारा मतदारांना समोर ठेवत चार दिवसीय ‘तांडे सामू चालो’ (‘तांड्याकडे चला’) ही बंजारा तांड्यांची पदयात्रा सुरु केलीय. या चार दिवसांत ते 48 बंजारा तांड्यांना भेटी देत बंजारा बांधवांशी संवाद साधणारेयत. या चारही दिवसांत त्यांचा मुक्कामही बंजारा तांड्यांवर असणारेय. 

वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर म्हणाले,  बंजारा समाजाची संस्कृती, परंपरा आणि प्रश्न समजून घेण्यासाठी ही यात्रा आहे. वंचितचा ‘इंडिया’ आघाडीत समावेश झाला नाही तर त्याचे परिणाम काँग्रेसला भोगावे लागतील. लोकांच्या रागाचा सामना त्यांना करावा लागेल. आमची स्वत:च्या ताकदीवर तयारी सुरू केली आहे. सध्याच निवडणूक लढण्याबद्दल विचार केलेला नाही. 

लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सुजात आंबेडकर सक्रिय

सुजात याच्या दौऱ्यादरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रकाश आंबेडकर हे   अकोला लोकसभा मतदार संघात निवडणूक लढत आहेत. आता 2024 मध्ये सलग अकराव्यांदा ते अकोल्यातूनच निवडणूक लढविणार आहेत. त्यामुळे आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सुजात आंबेडकर सक्रिय झालेले पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी  राज्यात होत असलेल्या कंत्राटी भरतीविरोधात वंचित बहुजन आघाडीकडून युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वात सांगली (Sangli News) जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. डेंग्यू झाला असतानाही सुजात आंबेडकरानी नियोजित  मोर्चाला उपस्थिती दर्शवली होती. 

सुजात आंबेडकर आगामी काळात निवडणूक लढवणार का?

सुजात आंबेडकर आगामी काळात निवडणूक लढवणार का? या चर्चांना उधाण आले होते. अखेर प्रकाश आंबेडकरांनी यावर उत्तर देत चर्चांना पूर्णविराम दिला.  या विषयी उत्तर देताना प्रकश आंबेडकर म्हणाले, सुजात आंबेडकर अकोल्यातून लोकसभा आणि विधानसभेची कोणतीच निवडणूक लढणार नाही. 
सामाजिक कार्य हा त्याचा पिंड आहे. निवडणुकीच्या राजकारणात त्याला रस आहे का हे त्यालाच सिद्ध करावं लागेल. अकोल्याबाहेरही त्याच्या मतदारसंघाबद्दल विचार केलेला नाही.  

हे ही वाचा :

Sangli News : ‘वंचित’कडून कंत्राटी भरतीविरोधात सांगलीत मोर्चा; डेंग्यू झाला असतानाही सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात धडकला मोर्चा 



Source link

ठाकरे आणि आमचा साखरपुडा झालाय, मात्र लग्नासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीरुपी भटजीचे अडथळे: आंबेडकर

ठाकरे आणि आमचा साखरपुडा झालाय, मात्र लग्नासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीरुपी भटजीचे अडथळे: आंबेडकर


Prakash Ambedkar : आपल्या आणि उद्धव ठाकरेंच्या (Uddhav thackeray) मैत्रीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच (NCP) खोडा घालत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला आहे. ते आज अकोल्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी आंबेडकरांनी अनेक रुपकं वापरत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या शरद पवार गटावर टीका केली. ठाकरे आणि आमचा साखरपुडा झालाय. मात्र, लग्नाच्या मुहूर्तासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीरुपी दोन भटजीच अडथळे आणत असल्याचं आंबेडकर म्हणालेत. 

वेळप्रसंगी बिना लग्नाचं राहू, परंतू, दुसरं स्थळ पाहणार नाही

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष राजकीय अस्पृष्यता पाळतात. आता मी एकाएकाची पोलखोल करणार आहे. मी आतापर्यंत कुटुंबामुळं शांत होतो. कुटूंबातील मुलं मोठी झालीत, त्यामुळं आता काही लोकांबद्दल बोलणार असल्याचे आंबेडकर म्हणाले. वेळप्रसंगी बिना लग्नाचं राहू, परंतू, दुसरं स्थळ पाहणार नसल्याचं सांगत त्यांनी इतर दुसऱ्या पक्षांशी आघाडी करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळेच दुसरा मार्गच नसल्यानं स्वबळावर लोकसभेच्या 48 जागांची तयारी सुरू केल्याचं आंबेडकर म्हणाले. 

महाविकास आघाडीतील नाराज पक्षांशी स्वत:हून संपर्क साधणार नाही

दरम्यान, महायुती आणि महाविकास आघाडीतील कोणत्याही नाराज पक्षांशी स्वत:हून संपर्क साधणार नसल्याचं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं. महादेव जानकर, विनायक मेटे, सदाभाऊ खोत, राजू शेट्टी यांना कुणाशी लढायचं यावरुन संभ्रम आहे. यांच्यापैकी कुणाशीच आघाडीची शक्यता त्यांनी फेटाळून लावली. शिवसेनेच्या ठाकरे गटाने लोकसभेसाठी पाच जागांचा प्रस्ताव दिल्याच्या चर्चेचे प्रकाश आंबेडकरांनी खंडन केलं आहे. दरम्यान, सुजात आंबेडकर अकोल्यातून लोकसभा आणि विधानसभेची कोणतीच निवडणूक लढणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 

महत्त्वाच्या बातम्या:

Prakash Ambedkar : नरेंद्र मोदी हे देशाला धोकादायक, त्यांना समर्थन देणाऱ्या हिंदू संघटनांनी फेरविचार करावा : प्रकाश आंबेडकर 



Source link

30 टक्के लोकसंख्या गावं सोडून शहरात गेली कारण….नितीन गडकरींनी सांगितली शेतकऱ्यांची व्यथा

30 टक्के लोकसंख्या गावं सोडून शहरात गेली कारण….नितीन गडकरींनी सांगितली शेतकऱ्यांची व्यथा


Nitin Gadkari : गावात चांगले रस्ते नाहीत. शिक्षणाच्या सुविधा नाहीत, स्वच्छ पाण्याची उपलब्धता नाही. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, त्यामुळं रोजगाराच्या संधी नाहीत. त्यामुळं लोकांचं स्थलांतर होत असल्याचे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Minister Nitin Gadkari) यांनी केलं. या सर्व कारणामुळं देशातील 30 टक्के लोकसंख्या गावं सोडून शहराकडे आली आहे. ती खुशीनं नाही तर मजबुरीने आली असल्याचे ते म्हणाले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या तीन दिवसीय शिवार फेरीच्या उद्धघाटनासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे आले होते. त्यावेळी गडकरी बोलत होते.

शेतमालाला हवी तेवढी किंमत मिळत नाही

शेतीमालाच्या दराचा संबंध मागणी आणि पुरवठ्यावर अवलंबून असल्याचे नितीन गडकरी म्हणाले. कापूस स्वस्त आहे, कापड महाग आहे. लिंबू, संत्रा स्वस्त आहे, सरबत महाग आहे. गहू स्वस्त आहे, ब्रेड बिस्कीड महाग आहे. शेतमालाला जेवढी हवी तेवढी किंमत मिळत नसल्याचे गडकरी म्हणाले. आपण सगळेजण ग्लोबल इकॉनॉमीमध्ये आहोत. शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे. भावाचा संबंध हा जागतिक ग्लोबल इकॉनॉमीशी असल्याचे गडकरी म्हणाले. आपण दरवर्षी मोठ्या प्रमाणात तेल आयात करतो. मलेशिया आणि इंडोनिशियातून तेलाची आात केली जाते. सूर्यफूलाचे तेल युक्रेनमधून, सोयाबीनचे तेल अर्जेंटीनामधून आयात होते असे गडकरी म्हणाले. 

कृषी विद्यापीठांनी जागतिक स्तरावर कोणत्या मालाचा किती स्टॉक याची माहिती द्यावी 

केंद्र सरकार शेतकऱ्यांना फायदा व्हावा म्हणून दरवर्षी हमीभावात वाढ करते. आज परिस्थिती अशी आहे की, हमीभाव जास्त आहे आणि मार्केटमध्ये दर कमी आहेत. यासाठी सरकारला दीड लाख कोटी द्यावे लागत असल्याचे गडकरी म्हणाले. यावेळी गडकरींनी कृषी विद्यापीठाला सल्ला देखील दिला. सगळ्या शेतकऱ्यांकडे मोबाईल आहेत, विद्यापाठीने एक वेबसाईट उघडावी. त्यामध्ये मे आणि ऑक्टोबर दोन महिन्यात  शेतकऱ्यांना जागतिक स्तरावर कोणत्या मालाचा किती स्टॉक शिल्लक आहे. त्याची विक्री किती झाली आहे, यासंदर्भातील माहिती द्यावी. त्याआधारे शेतकऱ्यांना पीक पद्धतीत बदल करण्याची माहिती द्यावी असे गडकरी म्हणाले. 

…तर गुजरातऐवजी विदर्भातील कापसाला मागणी वाढेल

विदर्भातील कापसाला किंमत का मिळते कारण येथील मोठ्या प्रमाणातील कापूस जीनींग प्रेसमधून बांगलादेशमध्ये जातो. कोविड काळात बांगलादेशमध्ये कापूस निर्यात कमी झाला, त्यामुळं किमंती कमी झाल्याचे गडकरी म्हणाले. विदर्भातील कापूस बांगलादेशमध्ये नेण्यासाठी एका कंटेनरमागे दोन लाख रुपयांचा खर्च येतो. कापसाला दर मिळवायचा असेल तर मुंबईचा समुद्र विदर्भात आणला पाहिजे अशी संकल्पना मी मांडली होती. आता रेल्वेने कापूस कोलकातामध्ये जाईल, तिथून नदीमार्गाने कापूस बांगलादेशमध्ये जाईल. याबाबत बांगलादेशच्या मंत्र्यांशी मी बोललो आहे. त्यामुळं एका कंटेनरमागे एक ते दीड लाख रुपये वाचतील. त्यामुळं विदर्भातील कापसाला मागणी वाढेल णि त्यातीन किंमतीत वाढ होईल असे गडकरी म्हणाले. बांगलादेशला गुजरातचा कापूस घेण्यासाठी दोन लाख रुपयांचा खर्च येतो आणि विदर्भातील कापूस घेण्यासाठी एक लाख रुपयांचा खर्च येईल, त्यामुळं बांगलादेशचे व्यापारी विदर्भाचा कापूस घेतील असे गडकरी म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या:

Nitin Gadkari : ’60 टक्के इथेनॉलवर चालणारे वाहन स्वतः 40 टक्के मोफत वीजनिर्मिती करणार’; मंत्री नितीन गडकरी यांची माहिती



Source link

YouTube
Instagram
WhatsApp