गडकरी साहेबांनी उमेदवारी दिली नसती तर माझा राजकीय जन्म झाला नसता : धनंजय मुंडे

गडकरी साहेबांनी उमेदवारी दिली नसती तर माझा राजकीय जन्म झाला नसता : धनंजय मुंडे


Dhananjay Munde : नितीन गडकरी साहेबांनी ( Nitin Gadkari) 2010 मध्ये मला भाजपच्या युवा आघाडीचा प्रदेशाध्यक्ष म्हणून विधानपरिषदेची उमेदवारी दिली. ही उमेदवारी जर त्यांनी दिली नसती तर माझा राजकीय जन्मच झाला नसता असे वक्तव्य राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे (Minister Dhananjay Munde) यांनी केलं. माझ्यासारखं राजकीय वाण गडकरीसाहेबांमुळे जन्माला आल्याचे मुंडे म्हणाले.

कृषीमंत्री पदाची जबाबदारी मिळावं हे स्वप्नं होतं

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या तीन दिवसीय शिवार फेरीच्या उद्धघाटनासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे हे विद्यापीठात दाखल झाले आहेत. यावेळी आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुंडे बोलत होते. गडकरी साहेबांनी उमेदवारी दिल्यामुळेच माझा राजकीय जन्म झाल्याचे मुंडे म्हणाले. दरम्यान, मला कृषीमंत्री पदाची संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे आभारही धनंजय मुंडे यांनी मानले. शेतकऱ्यांसाठी काम करण्यासाठी  कृषीमंत्री पदाची जबाबदारी मिळावं हे स्वप्नं होतं असेही मुंडे म्हणाले.

बदलत्या नैसर्गिक परिस्थितीनुसार शेतीचा पॅटर्न बदलावा

शेती हा व्यवसाय म्हणून स्विकारा असेही मुंडे म्हणाले. बदलत्या नैसर्गिक परिस्थितीनुसार शेतीचा पॅटर्न बदलावा लागेल असेही ते म्हणाले. पेरल्यानंतर 21 दिवसही पाऊस पडला नाही तर पिक जगलं पाहिजे अशा पिकांच्या जाती तयार व्हाव्यात असे मुंडे म्हणाले. दरम्यान, सभा सुरु असतानाच पाऊस सुरु झाला. गडकरी साहेब जिथे जातात तिथे पाऊस येतो. गडकरी साहेबांनी थोडं मराठवाड्यात यावं तिथेही पाऊस येईल असेही मुंडे म्हणाले.

नितीन गडकरींनी केंद्रात कृषीमंत्री पदाची जबाबदारी घ्यावी

नितीन गडकरी साहेबांनी केंद्रात कृषीमंत्री पदाची जबाबदारी घ्यावी असे वक्तव्य देखील धनंजय मुंडे यांनी केलं. राज्यातील शेतकऱ्यांसाठी काम करण्यासाठी कृषीमंत्री पदाची जबाबदारी मिळावं हे माझं स्वप्नं होतं असेही मुंडे म्हणाले. दरम्यान, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं एक आदर्श गाव निर्माण करावं. त्यात एकाही शेतकऱ्याची आत्महत्या व्हायला नको असे मुंडे म्हणाले. तसेच त्यांनी शेतकऱ्यांनी आत्महत्या करु नयेत असं आवाहन देखील केलं. 

महत्त्वाच्या बातम्या:

मोठी बातमी! वैद्यनाथ सहकारी साखर चालवण्यासाठी धनंजय मुंडेंनी कंबर कसली; सरकारला प्रस्ताव पाठवणार?



Source link

Akola Officer Action : महापारेषणच्या भंगार विक्री घोटाळ्याप्रकरणी 8 जणाचं निलंबन ABP Majha

Akola Officer Action : महापारेषणच्या भंगार विक्री घोटाळ्याप्रकरणी 8 जणाचं निलंबन ABP Majha



<p>अकोल्यात महापारेषणच्या भंगार विक्री घोटाळ्याप्रकरणी ८ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. &nbsp;४ हजार ७७५ किलो भंगाराची अफरातफर केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. महापारेषणचे अमरावती विभागाचे मुख्य अभियंता जयंत विखे यांनी ६ अभियंता आणि २ अधिकाऱ्यांवर निलबणाची कारवाई केली आहे.</p>



Source link

अकोल्यातील महापारेषणच्या कारंजा उपकेंद्रात 4775 किलो भंगाराची अफरातफर

अकोल्यातील महापारेषणच्या कारंजा उपकेंद्रात 4775 किलो भंगाराची अफरातफर


अकोला : अकोल्यात (Akola News) भंगार विक्रीतील (Scrap Scam) अपहार प्रकरणी महापारेषणनं मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी  आठ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.  2022 मधील एप्रिल महिन्यात अकोला आणि कारंजा येथील उपकेंद्रांचं हे भंगार होते. दोन्ही ठिकाणांवरील 85210  किलोपैकी 4775 किलो भंगाराची अफरातफर झाली होती. या भंगार विक्री प्रकरणात महापारेषणचे 8 जणांना निलंबित करण्यात आले.

 निलंबित लोकांमध्ये सहा अभियंते आणि दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. महापारेषणचे अमरावती विभागाचे मुख्य अभियंता जयंत विखे यांनी ही कारवाई केलीय. कारवाई झालेल्यांमध्ये कार्यकारी अभियंता रमेश वानखडे यांचा समावेश आहे.

निलंबित अधिकारी-कर्मचारी

1) रमेश कृष्णराव वानखडे : कार्यकारी अभियंता 
2) राहुल रामदास पाटील : अतिरिक्त कार्यकारी अभियंता 
3) दत्ता दिनकर शेजोळे : अतिरिक्त कार्यकारी अभियंता 
4) श्याम मेश्राम : अतिरिक्त कार्यकारी अभियंता 
5) गोपाल दिलीप लहाने : उपकार्यकारी अभियंता 
6) श्रीकांत टेहरे : उपकार्यकारी अभियंता 
7) सुरेश पेटकर : उपव्यवस्थापक वित्त व लेखा 
8) संजीत मेश्राम : उपव्यवस्थापक

अकोल्यातील महापारेषणच्या वीज उपकेंद्र आणि कारंजा उपकेंद्रात 2018 साली 852010 किलो वजनाचे भंगार होते.  मात्र 2022 साली भंगाराचे वजन केले असता तब्बल 4775 किलो कमी भंगार भरल्याची बाब समोर आली. ही बाब समोर आल्यनंतर चौकशी करण्याची मागणी करण्यात आली त्यानंतर आठ जणांचे निलंबन करण्यात आले परंतु अद्याप काही प्रश्न अनुत्तरीत आहे. 

पोलीस चौकशी करण्याची मागणी

कारंजा येथील उपक्रेंद्रातून 4775 किलो भंगाराचा अपहार झाला. अपहार झाला तरी कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. जवळपास पाच टनाचे भंगार नेण्यासाठी ट्रकची आवश्यकता असते. ते भरण्यासाठी किमान 10 ते 12 मजूर लागतात. मात्र यासंदर्भात कोठेच कोणतीच नोंद नाही. तसेच अपहाराबाबत पोलीस चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे



Source link

Akola Barabai :  बाराबाई गणपतीच्या पूजनानंतर मिरवणूक यंदाच 129 वर्ष , मोठा पोलिस बंदोबस्त तैनात

Akola Barabai : बाराबाई गणपतीच्या पूजनानंतर मिरवणूक यंदाच 129 वर्ष , मोठा पोलिस बंदोबस्त तैनात



<p>अकोल्यात सार्वजानिक गणेश विसर्जन मिरवणुकीला मोठ्या उत्साहात सुरूवात &nbsp;झालीय. &nbsp;शहरातील मानाचा गणपती समजल्या जाणाऱ्या बाराभाई गणपतीच्या पूजनानंतर शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या मिरवणुकीला सुरुवात झालीय. अकोल्यात गणेश विसर्जन मिरवणूकीचं हे 129 वं वर्ष आहे.&nbsp;</p>



Source link

‘मी लहान कार्यकर्ता…’ एकनाथ खडसेंच्या गौप्यस्फोटावर मिटकरींचं उत्तर

‘मी लहान कार्यकर्ता…’ एकनाथ खडसेंच्या गौप्यस्फोटावर मिटकरींचं उत्तर


अकोला : अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी आपल्याला राष्ट्रवादीमधून अजित पवार (Ajit Pawar) गटात येण्याची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केला होता. यावर भाजप आणि अजित पवारांच्या गटातील अनेक नेत्यांनी उत्तर देखील दिलं होतं. पण यावर आता अमोल मिटकरी यांनीच मौन सोडलं आहे. ‘एबीपी माझा’सोबत संवाद साधताना अमोल मिटकरी यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. आपण लहान कार्यकर्ते असून खडसे हे मोठे नेते आहेत. त्यामुळे मी त्यांना ऑफर देण्याचा प्रश्नच येत नाही, असं स्पष्टीकरण अमोल मिटकरी यांनी दिलं आहे. तर खडेंसना ऑफर राष्ट्रवादीमधले मोठे नेते देतील असं देखील अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. 

मागील अनेक दिवसांपासून एकनाथ खडसे यांना अजित पवारांच्या गटातून ऑफर आल्याच्या चर्चा रंगत होत्या. यावरुन राजकिय वर्तुळात देखील अनेक दावे-प्रतिदावे करण्यात आले होते. पण मी शरद पवारांसोबतच असल्याचं यावेळी एकनाथ खडसे यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. त्यामुळे या चर्चांना पूर्णविराम मिळाला. पण अमोल मिटकरी यांनी ऑफर दिल्याचं खडसेंनी म्हटलं आणि सत्ताधाऱ्यांकडून प्रत्युत्तर देण्यास सुरुवात झाली. तर यावर अमोल मिटकरींनी देखील आता मौन सोडलं आहे. 

काय म्हणाले मिटकरी?

अमोल मिटकरी यांनी एकनाथ खडसेंच्या आरोपांना उत्तर दिलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, मी लहान कार्यकर्ता आहे, त्यामुळे खडसेंना ऑफर पक्षातील मोठे नेते देतील. त्यांना पक्षात निमंत्रित करण्यासाठी पक्षाचे मोठे नेते आहेत. अजित पवारांसोबत जर चर्चा करायची असेल तर खडसेंना कोणत्याही मध्यस्थीची गरज नाही. तसेच पुढील काही काळआमध्ये अजित पवारांसोबतच्या आमदार आणि खासदारांची संख्या वाढणार असल्याचा दावा देखील यावेळी अमोल मिटकरी यांनी केला आहे. 

अमोल मिटकरी यांचं सूचक विधान 

सध्या आणखी एक खासदार आणि आमदार अजित पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. यामध्ये शरद पवार गटातील खासदारांची नावं समोर येत असून यामधील कोणता खासदार अजित पवारांकडे जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. यावर सूचक विधान करत अमोल मिटकरींनी म्हटलं की, राज्यातील सर्व अमोल नावाच्या व्यक्तींचं अजित पवारांवर खूप प्रेम आहे. 

दरम्यान एकनाथ खडसे यांचं उत्तर आणि अमोल मिटकरी यांच्या स्पष्टीकरणामुळे आता या वादाला पूर्णविराम मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच यावर आता एकनाथ खडसे देखील काही उत्तर देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

हेही वाचा : 

Jalgoan News : खडसेंनी भाजपमध्ये येण्याचा प्रयत्न करु नये, महाजनांचं टीकास्त्र; खडसेंचही प्रत्युत्तर म्हणाले…



Source link

राज्यावरील वीज संकट आणखी गहिरं, सातही औष्णिक विद्युत केंद्र तिसऱ्या दिवशीही प्रभावित

राज्यावरील वीज संकट आणखी गहिरं, सातही औष्णिक विद्युत केंद्र तिसऱ्या दिवशीही प्रभावित


Maharashtra Akola News Updates : अकोला : राज्यातील (Maharashtra News) सातही औष्णिक विद्युत केंद्रातील (Thermal Power Station) वीजनिर्मिती (Power Generation) सलग तिसऱ्या दिवशी प्रभावीत झाली आहे. त्यामुळे, राज्यातील वीज संकट वाढण्याची शक्यता आहे. सातही औष्णिक विद्युत केंद्रातून सध्या क्षमतेच्या 50 टक्केच वीजनिर्मिती केली जाणार आहे. पाऊस (Monsoon Updates), ओला कोळसा आणि दुरुस्तींच्या कामामुळे सातही केंद्रातील वीजनिर्मिती प्रभावित झाली आहे. 9540 मेगॅव्हॅटची क्षमता असताना सध्या फक्त 4732 मेगाव्हॅट वीजनिर्मिती या औष्णिक विद्युत केंद्रातून केली जात आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात राज्यावर भारनियमनाची टांगती तलवार आहे. 

महाराष्ट्रात एकूण सात औष्णिक विद्युत केंद्र आहेत. या सात केंद्रावरुन राज्यासाठी विजनिर्मिती केली जाते. परंतु, आज सलग तिसऱ्या दिवशी या केंद्रांवरील वीजनिर्मिती प्रभावित झाल्यानं राज्यातील वीज संकट गहिरं होण्याची शक्यता आहे. पाऊल, ओला कोळसा आणि दुरुस्तीची कामं खोळंबल्यानं या सातही वीजनिर्मिती केंद्रांच्या क्षमतेच्या केवळ 50 टक्केच वीजनिर्मिती सध्या सुरू आहे. आणखी काही दिवस असंच सुरू राहिलं तर मात्र, राज्याला भारनियमनाला सामोरं जावं लागू शकतं. 













केंद्र  क्षमता निर्मिती
     
कोराडी 2190 1184
नाशिक 630 130
भुसावळ  1210 726
पारस  500 346
परळी 750 414
खापरखेडा  1340 819
चंद्रपूर  2920 1114
एकूण  9540 4732



Source link

YouTube
Instagram
WhatsApp