Bappa Majha 2023 : अमरावतीत आझाद हिंद मंडळाचा अनोखा देखावा | बाप्पा माझा

Bappa Majha 2023 : अमरावतीत आझाद हिंद मंडळाचा अनोखा देखावा | बाप्पा माझा

Source link

Bappa Majha 2023 : अमरावतीत आझाद हिंद मंडळाचा अनोखा देखावा | बाप्पा माझा

Source link

विदर्भातील चिंतामणीच्या गणेशोत्सवाला सुरुवात, गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी.

Source link

Vidarbha Chintamani : विदर्भाच्या चिंतामणीच्या गणेशोत्सवाला सुरूवात,चिंतामणीच ऐतिहासिक महत्व

Source link

Amravati Ganesh Museum : गणेशोत्सव काळात संग्रहालयात गर्दी, चिखलदऱ्यात गणपती बाप्पाचं संग्रहालय

Source link
अकोला : शेतीला जोडधंद्याची जोड साथ मिळाली तर शेतकऱ्यांसमोरचं समस्यांचं दुष्टचक्र थांबू शकतंय. मात्र, दुर्दैवानं तसं होत नसल्यानं बळीराजा संकटांशी लढतोय. मात्र, अकोला (Akola News) जिल्ह्यातील शिर्ला अंधारे येथील गजानन अंधारे हा शेतकरी यशाचा नवा अध्याय लिहायला निघालाये. अन् ही यशोगाथा जन्माला येतीये ‘पोल्ट्री फार्म’च्या माध्यमातून. गावरान कोंबडीच्या अंड्यांचा (Egg) स्वत:चा ‘ब्रँड’ विकसीत केलाय. यातून तो महिन्याला सध्या तो 50 हजारांचा निव्वळ नफा कमावत आहे.
गजानन अंधारे… शिक्षण, बी.एस.सी. बायोलॉजी… गाव, अकोला जिल्ह्यातल्या पातूर तालूक्यातलं शिर्ला अंधारे…. गजानन यांच्याकडे वडिलोपार्जित आठ एकर शेतीत. त्यात ते भाजीपाल्याचे पिक घेतात. मात्र, ही शेती बेभरवशाची असल्यानं त्यांनी जोडधंदा म्हणून नोव्हेंबर 2022 मध्ये शेतात गावरान कोंबड्यांचा ‘पोल्ट्री फार्म’ उभारण्याचा निर्णय घेतलाय. यासाठी त्यांनी सुमारे एक हजार देशी पक्षी 28 हजार रूपयांमध्ये विकत आणले आहे.
अंधारे यांनी गेल्या चार ते पाच महिन्यांपूर्वी देशी कोंबडीपासून गावरान अंडी उत्पादनाला सुरुवात केलीय. अंधारे यांनी पोल्ट्री व्यवसायासाठी सुरुवातीला एक ते दीड लाख रुपये खर्च करुन शेतातील 20 गुंठ्यात टिनशेड उभे केलेय. यात एक हजार पिल्लांचे संगोपन सुरु केलेय. संगोपन करण्यासाठी त्यांना प्रति कोंबडीला 35 ते 40 रुपये खर्च आलाय.चार महिन्यांनंतर यातील पाचशे कोंबड्यांची विक्री केली. त्याला भाव देखील चांगला मिळाला असून लाख रुपयाचा नफा मिळाला. पुढे त्यांनी देशी कोंबडीच्या अंडीची अस्सल चव असलेल्या गावरान अंडी ‘VLE’ (Village Life Eggs) हा ब्रँड त्यांनी उदयास आणला आहे.
या गावरान अंडी ‘पॅकिंग बॉक्स’मध्ये सहा अंडी असतात. त्याची किंमत ठोक बाजारात 80 ते 90 रुपये आहेत. तर किरकोळ बाजारात 100 रुपये ते 108 रुपयापर्यंत विक्री होतायेत. 150 ते 160 दराप्रमाणे दररोज ही गावरान अंडी विकल्या जात असेल तर महिन्यासाठी 80 ते 90 हजार रुपयांपर्यंत उलाढाल होतेये. यातून कोंबड्याचा संगोपनाचा खर्च वजा करता त्यांना निव्वळ नफा म्हणजे 40 ते 45 हजार रुपये हाती उरतायेत. ‘जोडधंदा’ हे शेती व्यवसायातील अनेक प्रश्नांवरचा रामबाण उपाय आहे. सरकार शेती आणि शेतकऱ्यांसाठी सरकारनं गांभीर्यानं ‘जोडधंदा मॉडेल’ उभं करण्यासाठी सातत्याने आणि गांभीर्याने प्रयत्न करणं आवश्यक आहे.
हे ही वाचा :
जळगाव: शिवसेनेत फुट पडली आणि एकनाथ शिंदे गट गुवाहाटीला (Eknath Shinde Guwahati Visit) गेला, तिथून परत आल्यानंतर शिंदे थेट मुख्यमंत्रीच झाले. त्यानंतर राज्याच्या राजकारणात सुरू झालेली गुवाहाटीची चर्चा आता वर्ष होऊन गेलं तरीही संपत नाही. त्याच गुवाहाटीच्या विषयावर आता प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडूंनी (Bacchu Kadu) प्रतिक्रिया दिली आहे. गुवाहाटीला गेलो म्हणून बदनाम झालो, घराबाहेर पडलो की लोक खोके घेतले म्हणतात असं ते म्हणाले. जिकडे जातो तिकडे खोके घेऊन आलास असं लोक आम्हाला म्हणतात असंही ते म्हणाले.
आज जळगाव दिव्यांग विभागाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी आमदार बच्चू कडू उपस्थित होते. यावेळी भाषणात बच्चू कडू यांनी त्यांचं मत मांडत भूमिका स्पष्ट केली.
… पण बदनामीची भीती नाही
आमदार बच्चू कडू म्हणाले की, गुवाहाटीला जाऊन आल्यानंतर बदनाम झालो. जिकडे जातो तिकडे लोक म्हणतात की खोके घेऊन आला. घराबाहेर पडलो की खोके घेऊन आला असं म्हणतात आणि आमची बदनामी करतात. पण मला बदनामीची फिकर नाही. आम्ही जर गुवाहाटीला गेलो नसतो तर आम्हाला दिव्यांग मंत्रालय मिळालं नसतं.
गुवाहाटीला गेलो म्हणून दिव्यांग मंत्रालय मिळालं
एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा घटनाक्रम तसेच कारण देखील यावेळी आमदार बच्चू कडू यांनी सांगितलं. बच्चू कडू म्हणाले की, “उद्धव ठाकरे यांच्यासोबत दोन वर्षे राहिल्यानंतरही दिव्यांग मंत्रालय झालं नाही. म्हणून मी एकनाथ शिंदे यांना अट घातली होती जर तुम्ही मला दिव्यांग मंत्रालय देत असाल तरच मी तुमच्यासोबत येतो. नाहीतर गाडीतून खाली उतरतो. त्यांनी त्यांचा शब्द पाळला आणि आज दिव्यांग मंत्रालय आपल्याला मिळालं आहे.”
दुसऱ्या वेळी जेव्हा गुवाहाटीला गेलो त्यावेळी मी एकनाथ शिंदे यांना दिव्यांग मंत्रालयाबाबत आठवण करून दिली होती. त्यानंतर ते दिव्यांग मंत्रालय आपल्याला मिळालं असंही यावेळी आमदार बच्चू कडू यांनी सांगितलं.
ही बातमी वाचा: