विनोद तावडे सावरलेत, मात्र पकंजा मुंडे संभ्रमावस्थेत; त्या निर्णय घेऊ शकत नाहीत : एकनाथ खडसे
Eknath Khadse : विनोद तावडे (Vinod Tawde) सावरलेत, ते महाराष्ट्र सोडून दिल्लीला गेलेत. मात्र पंकजा मुंडे (Pankaja Munde) मात्र अद्याप संभ्रमावस्थेत असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केलं. पंकजा मुंडे या सध्या तिर्थाटन करतायेत. त्या सध्या निर्णय घेऊ शकत नाहीत, असेही खडसे म्हणाले. पंकजा मुंडे यांना वडीलकीच्या नात्यानं सध्या कोणताच सल्ला देणार नाही. त्या स्वत:च परिपक्व आहेत. त्या परिस्थितीनुसर अधिक परिपक्व होत चालल्याचे खडसे म्हणाले. ते अकोल्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
चंद्रकांत पाटील हे खोकेवाले आमदार
मी निर्णय घेतला अन आपली दिशा ठरवली. वेगळा मार्ग अवलंबल्याचे एकनाथ खडसे म्हणाले. पंकजा मुंडे यांना वडीलकीच्या नात्याने सध्या कोणताच सल्ला देणार नाही. त्या स्वत:च परिपक्व आहेत. त्या परिस्थितीनुसर अधिक परिपक्व होत चालल्या असल्याचे खडसे म्हणाले. जळगाव जिल्ह्यात एकनाथ खडसे विरुद्ध सारे असं चित्र झालं आहे. चंद्रकांत पाटील हे खोकेवाले आमदार आहेत. ‘नया है वह’, अभी अकल कम है’ असे म्हणत खडसेंनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. कोणाला नरकासुर म्हणायचं, कोणाला बकासुर म्हणायचं हे त्यांनाचं माहीत असे खडसे म्हणाले. चंद्रकांत पाटील हे एका जाग्यावर थांबतात का? अपक्ष म्हणून विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीनं जिंकली. नंतर उद्धव ठाकरेंसोबत गेले. आता एकनाथ शिंदेसोबत गेल्याचे एकनाथ खडसे म्हणाले. त्याला फार भाव देण्यात अर्थ नाही. त्याने आपल्यावर टीका केल्यावर त्याचं नाव टीव्हीवर येतं असल्याचे खडसे म्हणाले.
फडणवीसांच्या एंट्रीनंतरच राज्यातील राजकारण गढूळ झालं
दरम्यान, एकनाथ खडसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावरही टीका केली. देवेंद्र फडणवीसांची 2014 मध्ये राज्याच्या राजकारणात ठळकपणे एंट्री झाली. त्यानंतरच राज्यातील राजकारण गढूळ झाल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला. फडणवीसांनी आपल्याला वैयक्तिक त्रास दिल्याचा आरोपही खडसेंनी केला. राज्याचा राजकारणाचा स्तर 2014-15 पासून खाली गेला. 2019 नंतर तर तो प्रचंड खाली गेल्याचे खडसे म्हणाले. आधी यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक, शरद पवार, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदेंसारखे लोक मुख्यमंत्री होऊन गेलेत. त्यांनी कधी आपला संयम सोडला नाही. पण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर राजकारणाची दिशा बदलली. एकमेकांचं सुड उगवणारं अशा स्वरुपाचं राजकारण सुरू झाल्याचं खडसे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या:
Eknath Khadse : फडणवीसांनी वैयक्तिक त्रास दिला, त्यांच्या एंट्रीनंतरच राज्यातील राजकारण गढूळ; खडसेंचा आरोप
फडणवीसांनी वैयक्तिक त्रास दिला, त्यांच्या एंट्रीनंतरच राज्यातील राजकारण गढूळ; खडसेंचा आरोप
Eknath Khadse : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची 2014 मध्ये राज्याच्या राजकारणात ठळकपणे एंट्री झाली. त्यानंतरच राज्यातील राजकारण गढूळ झाल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केला. ते अकोला इंथे बोलत होते. फडणवीसांनी आपल्याला वैयक्तिक त्रास दिल्याचा गंभीर आरोपही खडसेंनी केला. छत्रपती संभाजीनगर येथे होत असलेल्या मंत्रीमंडळ बैठकीवर होत असलेल्या उधळपट्टीवर देखील खडसेंनी टीका केली.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर राजकारणाची दिशा बदलली
मी गेल्या चाळीस वर्षांपासून राज्याचं राजकारण पाहतोय. मी आता सातव्यांदा आमदार झालो आहे. मात्र, राज्याचा राजकारणाचा स्तर 2014-15 पासून खाली गेला. 2019 नंतर तर तो प्रचंड खाली गेल्याचे खडसे म्हणाले. आधी यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक, शरद पवार, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदेंसारखे लोक मुख्यमंत्री होऊन गेलेत. त्यांनी कधी आपला संयम सोडला नाही. पण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर राजकारणाची दिशा बदलली. एकमेकांचं सुड उगवणारं अशा स्वरुपाचं राजकारण सुरू झाल्याचं खडसे म्हणाले. मला विरोध करतो का तुला बघून घेऊ असं राजकारण सुरू झालं. यासाठी ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स अशा शस्त्रांचा वापर राजकारणात केला जाऊ लागल्याचे खडसे म्हणाले.
फडणवीसांना अनेक गोष्टी शिकवण्यात माझाच हात
देवेंद्र फडणवीसांना अनेक गोष्टी शिकवण्यात माझाच हात आहे. 2014 पुर्वी मीच विधानसभेत त्यांना माझ्या मागची जागा दिली. अनेक चर्चांमध्ये माझ्याऐवजी संधी दिली. अनेक प्रश्न त्यांनी त्यांच्या कौशल्याने उचलले. त्यानंतरच्या कालखंडात त्यांनी कुरघोडी करण्याचे अनेक प्रयत्न केल्याचे खडसे म्हणाले. मला मात्र, या गोष्टीचं दु:ख आहे की ज्या माणसाला प्रदेशाध्यक्ष करण्यात मोठी मदत केली, त्यामुळेच ते मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आले. पुढे त्यांनीच व्यक्तीगतरित्या माझा छळ करण्याची भूमिका घेतल्याचे खडसे म्हणाले. महाराष्ट्राच्या राजकारणासाठी हे चांगलं नाही असंही त्यांनी सांगितले.
खडसे ऑन संभाजीनगर मंत्रीमंडळ बैठक
छत्रपती संभाजीनगर हे पर्यटनस्थळ आहे. मराठवाड्यात सध्या दुष्काळ आहे. मुख्यमंत्री आणि त्यांचे आख्खं मंत्रीमंडळ सध्या दुष्काळी परिस्थितीत फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहतायेत. तीन हजारांच्या थाळीत जेवतायेत. गाड्यांचा मोठा ताफा आहे. ही उधळपट्टी असल्याचे खडसे म्हणाले. शासनाला संवेदना नाहीत. याऐवजी शेतकऱ्यांना मदत करता आली असती. हे सरकार इव्हेंटवालं, समारंभ साजरं करणारं आहे. कधी शासन आपल्या दारी, कधी मुख्यमंत्री आपल्या घरी, हे दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं असल्याचे खडसे म्हणाले.
Amravati Heavy Rain Alert : अमरावतीत एक ते दोन ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता ABP Majha
ABP Majha Impact : टीकेनंतर मुख्यमंत्र्यांनी सोडलं ते आलिशान हॉटेल आणि तामझाम; शिंदेंचा मुक्काम आता फाईव्ह स्टार हॉटेलमधून शासकीय विश्रामगृहात
Bacchu Kadu Amravati :Navneet Rana vs Yashomati Thakur यांच्यातील वादावर बच्चू कडू म्हणता…
<p>आमदार अपात्रता प्रकरणावर अपक्ष आमदार बच्चू कडूंनी प्रतिक्रिया दिलीये. आम्ही अपक्ष नाही आमचा प्रहार पक्ष आहे आणि आमचे दोन आमदार आहेत.. त्यामुळे बंडखोरीचा प्रश्नच येत नाही.अशी प्रतिक्रिया बच्चू कडूंनी दिलीय..तसंच अमरावतीत सध्या नव्या राजकीय वादाला तोंड फुटलंय. नवनीत राणांनी यशोमती ठाकूर यांच्यावर केलेल्य़ा आरोपांमुळे अमरावतीच्या राजकारणात खळबळ माजली..यावरही कडूंनी प्रतिक्रिया दिलीय. नवनीत राणा यांनी पैसे दिल्याच्या आरोपांबाबत पैसे कोणी दिले कोणी घेतले याबाबत आम्ही चौकशीची मागणी करू. अशी प्रतिक्रिया कडू यांनी दिलीये. </p>
<p> </p>
Source link
पैसे देणारा तेवढाच दोषी, यशोमती ठाकूर आणि राणा दाम्पत्याच्या वादात बच्चू कडू यांची उडी
अमरावती : यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) आणि नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यातील वादात आता प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी उडी घेतली आहे. मानहानीच्या दाव्याबाबत यशोमतीताईंचं काय चुकलं असं म्हणत नवनीत राणा यांनी पैसे दिल्याच्या आरोपांबाबत आम्ही पत्र देणार असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं. पैसे देणारा आणि घेणारा दोघेही दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असं बच्चू कडू म्हणाले. ते अमरावतीमध्ये (Amravati) एबीपी माझाशी बोलत होते.
बच्चू कडू काय म्हणाले?
“नवनीत राणा यांनी पैसे दिल्याच्या आरोपांबाबत आम्ही एक पत्र देणार आहोत. कारण पैसे देणाराही तेवढाच दोषी आहे. पैसे कोणी दिले, कोणी घेतले याबाबत आम्ही चौकशीची मागणी करणार आहोत. मानहानीच्या दाव्याबाबत यशोमती ताईंचं काय चुकलं? स्वतः उमेदवार सांगत आहे की निवडणुकीच्या वेळेस पैसे दिले, मग पहिला दोषी कोण आहे? पैसे देणारा आणि घेणारा दोघेही दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे,” असं बच्चू कडू म्हणाले.
यशोमती ठाकूर आणि नवनीत राणा यांच्यातील वाद
लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी राणा यांच्याकडून यशोमती ठाकूर यांनी पैसे घेतले, मात्र प्रचार दुसऱ्याचाच केला, असा आरोप नवनीत राणा यांनी केला होता. यानंतर यशोमती ठाकूर आक्रमक झाल्या आहेत. नवरा-बायको जिल्ह्याचं वातावरण खराब करत आहेत. निवडणूक आयोग झोपा काढत आहे का? ईडी काय करत आहे? देवेंद्र फडणवीस पाठिशी घालत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. पण त्यांना दहीहंडी कार्यक्रमात यायला वेळ आहे, अशी टीका यशोमती ठाकूर यांनी केली आहे.
यशोमती ठाकूर राणा दाम्पत्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार
दरम्यान नवनीत राणांच्या आरोपांनंतर यशोमती ठाकूर यांनी कोर्टाचा दार ठोठवण्याचा निर्णय घेतला आहे. यशोमती ठाकूर राणा दाम्पत्यावर 100 कोटींचा अब्रु नुकसानीचा दावा ठोकणार आहेत. राणा दाम्पत्यावर कायदेशीर कारवाई करुन निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचंही यशोमती ठाकूर यांनी सांगितलं.
VIDEO : Bachchu Kadu : यशोमती ठाकूर विरुद्ध राणा दाम्पत्याच्या वादात बच्चू कडूंची उडी, म्हणाले…
हेही वाचा