एका तासाला 200 रुपये, अमरावतीच्या कॅफेमध्ये तरुण तरुणींचे अश्लील चाळे; दामिनी पथकाने रंगेहात धर

एका तासाला 200 रुपये, अमरावतीच्या कॅफेमध्ये तरुण तरुणींचे अश्लील चाळे; दामिनी पथकाने रंगेहात धर


Amravati Crime News: अमरावती शहरात राजापेठ हद्दीत काही कॅफेमध्ये अश्लील प्रकार सुरु असल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. या कॅफेमध्ये बसण्यासाठी तासाला 200 रुपये आकरले जात असल्याचा प्रकार सुरु असून जोडप्यांना बसण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जात असल्याचं समोर आलं. अमरावती पोलिसांनी राजापेठ भागातील काही कॅफेवर छापेमारी केली आहे. 

यावेळी कॅफेत 13 तरुण तरुणी आक्षेपार्ह अवस्थेत आढळल्याचे समोर आले असून या प्रकरणी अमरावती शहर पोलिसांनी 13 जणांना ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर कारवाई करत त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधिन करण्यात आलं. या प्रकारामुळे अमरावतीमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

नेमका प्रकार काय?

देशभरात आता प्रमुख शहरांपासून गावागावात कॅफे कल्चर चांगलंच वाढलं आहे काम करण्यासाठी, मित्रमैत्रिणींना भेटण्यासाठी तरुणाईसाठी  कॅफे सोयीचे. मात्र, अमरावतीमध्ये काही कॅफे हे आंबट शौकिनांचा अड्डा झाल्याचे समोर येत आहेत.अमरावती शहरात राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही कॅफेजमध्ये अश्लील प्रकार सुरु असल्याची माहिती दामिनी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी दामिनी पथकाच्या मदतीने राजापेठ ठाण्याच्या हद्दीतील बर्गर लॅन्ड, फ्युजन बाईट, कॅफे आणि छत्री तलाव परिसरातील निर्जनस्थळी धाडी घातल्या. या कारवाईत दामिनी पथकाला 13 युवक-युवती नको त्या अवस्थेत आढळून आले. पोलिसांनी या सर्वांना पोलीस ठाण्यात आणलं. त्यांची कसून चौकशी केली आणि ओळखपत्र घेऊन नोंद घेतली. तसेच युवतींच्या आई-वडिलांना बोलावून मुलींना त्यांच्या ताब्यात दिले. या कारवाईमुळे शहरातील कॅफे चालकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

तासाला 200 रुपयांचा दर

दामिनी पथकाने धाडी टाकलेल्या कॅफेजमध्ये तरुण तरुणींना बसण्यासाठी 200 रुपयांचे शुल्क आकरले जात होते. जोडप्यांना बसण्यासाठी ही जागा उपलब्ध करून दिली जात होती. कॅफे चालक जोडप्यांना तासानुसार केबीन उपलब्ध  करून देत असल्याचं समोर आलं आहे. या केबीनमध्ये तरुण तरुणी, जोडपे लाईट बंद करून तासनतास बसतात. अशी माहिती मिळाल्यानंतर  पोलिसांनी काही कॅफेजमध्ये धाड मारली. त्यावेळी 13 तरुण तरुणी नको त्या अवस्थेत सापडले.

 

आणखी वाचा



Source link

स्वत:च्या मनाचं समुपदेशन करता करता थकल्याचं निशब्द वास्तव; डॉ. प्रशांत जावरकरांचे टोकाचे पाऊल

स्वत:च्या मनाचं समुपदेशन करता करता थकल्याचं निशब्द वास्तव; डॉ. प्रशांत जावरकरांचे टोकाचे पाऊल


अकोला : ‘इतरांच्या मनाचा भार हलका करणारा माणूस, स्वतःच्या अंतर्मनाच्या ओझ्याखाली गडप झाला…” अकोल्याच्या वैद्यकीय क्षेत्राला हादरवणारी ही बातमी सध्या शहरात चर्चेचा, चिंतेचा आणि वेदनेचा विषय बनली आहे. अकोल्यातील (Akola) ‘सन्मित्र हॉस्पिटल’मध्ये मानसोपचार तज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेले डॉ. प्रशांत जावरकर (Dr. Prashant Javarkar) यांनी विषारी इंजेक्शन घेत आत्महत्या (Sucide) केली. ही दुर्दैवी घटना न्यू तापडिया नगर परिसरातील त्यांच्या राहत्या घरी घडली. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असलं, तरी ही घटना मानसिक आरोग्य आणि आत्मिक पोकळी या दोघांवर प्रश्नचिन्ह उभी करणारी आहे.

“मन समजणारा माणूस… स्वतःचं मन न समजून हरवतो तेव्हा!”

डॉ. जावरकर हे गेल्या अनेक वर्षांपासून डॉ. दीपक केळकर यांच्या ‘सन्मित्र हॉस्पिटल’मध्ये रुग्णांना समुपदेशन करत होते. तणाव, नैराश्य, एकटेपणा, व्यसनमुक्ती, अशा अनेक क्षेत्रांतील रुग्णांना त्यांनी नवजीवन दिलं. पण, जे हात इतरांच्या डोळ्यातलं पाणी पुसत होते, तेच हात अखेर स्वतःसाठी मदतीचे वाढले, पण उशीर झाला होता. केवळ बुद्धी नव्हे, आत्मा ही पोषणाचा हक्कदार असतो. या घटनेने एक गोष्ट स्पष्ट होते की शिक्षण, समज, मानसशास्त्र याहूनही वरचढ आहे आत्मबल. अनेक रुग्णांचे आधारवड ठरलेले डॉक्टर जावरकर, जेव्हा स्वतःच अंतर्मनात हरवले, तेव्हा हा समाज, ही यंत्रणा, ही नाती… कुठे होती? “आपण मनाची काळजी घेतो, पण आत्म्याच्या वेदनेला दुर्लक्षित करतो आणि मग हेच अधुरेपण आयुष्य तोडून टाकतं.”

अध्यात्म म्हणजे भावनिक आरोग्याचा खरा पाया

आजच्या स्पर्धात्मक, एकसुरी जगण्यात अध्यात्म, नामस्मरण, प्रार्थना, सत्संग, आत्मशोध यांना स्थानच उरलेलं नाही. माणूस यशस्वी होतो, प्रसिद्ध होतो, पण मनातून कोरडा राहतो. “प्रत्येक वेदनेला उत्तर मिळतं, पण त्यासाठी ‘आत्म्याशी संवाद’ हवा. आणि तो संवाद म्हणजेच अध्यात्म.”

या घटनेतून शिकण्याची वेळ आली आहे

डॉ.जावरकर हे गेले, पण त्यांनी मागे एक मोठा सवाल ठेवला आहे. “आज किती जण बाहेरून हसतात आणि आतून कोसळलेले असतात?” वेळीच लक्ष दिलं नाही, तर ही एक शोकांतिका नव्हे, तर समाजघटकांची साखळी तुटण्याची सुरुवात असू शकते.

आपण काय करू शकतो? : 

– दररोज थोडा वेळ ‘स्वतःसाठी’ काढा
– भगवंताशी एकाकी संवाद साधा
– सत्संग, ध्यान, नामस्मरण, कीर्तन यामध्ये सहभागी व्हा
– कुणी काही बोलायला येत असेल, तर ऐका, त्यासाठी शास्त्रज्ञ असण्याची गरज नाही, माणूस असणं पुरेसं आहे.

“जगातली सगळ्यात मोठी भीती म्हणजे ‘मी एकटा आहे’ ही भावना आणि सगळ्यात मोठा दिलासा म्हणजे ‘भगवंत माझ्यासोबत आहे’ ही अनुभूती. डॉ. जावरकर यांच्या निधनाने वैद्यकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पण त्यांच्या जाण्याने समाजाने एक मोठा आरसा समोर पाहायला हवा. तो म्हणजे मानसिक आरोग्याबरोबरच अध्यात्मिक आधारही तितकाच गरजेचा आहे. डॉ. प्रशांत जावरकर यांना ‘एबीपी माझा’ची भावपूर्ण श्रद्धांजली. 

हेही वाचा

मोठी बातमी : सोलापूरचे डॉ. शिरीष वळसंगकर प्रकरणात 59 दिवसांनी आरोपपत्र, मनीषा मुसळेंविरोधात पोलिसांचे खळबळजनक दावे

 

आणखी वाचा



Source link

धक्कादायक! ख्यातनाम मानसोपचार तज्ज्ञ डॉ. जावरकर यांनी संपवलं जीवन; विषारी इंजेक्शन टोचून घेतलं

धक्कादायक! ख्यातनाम मानसोपचार तज्ज्ञ डॉ. जावरकर यांनी संपवलं जीवन; विषारी इंजेक्शन टोचून घेतलं


Akola: अकोल्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रशांत जावरकर यांनी विषारी इंजेक्शन टोचून आत्महत्या केली आहे. न्यू तापडिया नगरमधील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं समजतं आहे. (Sucide)

डॉ. जावरकर हे अकोल्यातील ख्यातनाम मानसोपचार तज्ज्ञ डॉ. दीपक केळकर यांच्या ‘सन्मित्र हॉस्पिटल’मध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत होते. तणाव, नैराश्य आणि मानसिक आजारांनी त्रस्त रुग्णांना समुपदेशन करून मदत करणाऱ्या डॉक्टरांनी स्वतःच जीव संपवल्याची घटना सुन्न करणारी ठरली आहे. (Dr Javarkar Sucide)

विषारी इंजेक्शन टोचून आत्महत्या

या घटनेमुळे संपूर्ण अकोला शहरातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. नेहमी सकारात्मक विचार मांडणारे, पेशंटच्या समस्या समजून घेऊन त्यांना मानसिक आधार देणारे डॉ. जावरकर स्वतःच इतक्या मोठ्या तणावाखाली होते का, हा प्रश्न आता उपस्थित होतोय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. विषारी इंजेक्शन टोचून त्यांनी आत्महत्या केल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून पुढील चौकशी सुरू आहे. समुपदेशन करणाऱ्या डॉक्टरनेच आत्महत्येचा निर्णय घेतल्यामुळे ही घटना आणखी धक्कादायक समजली जात आहे.

वळसंगकर आत्महत्या प्रकरणत दोषारोपपत्र

सोलापुरातील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या (shirish valsangkar death case) प्रकरणातील आरोपी मनीषा मुसळे हिच्या विरोधात पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले आहे. आत्महत्येच्या 59 दिवसानंतर पोलिसांनी आरोपी मनीषा मुसळे विरोधात 720 पानांचे दोषारोपपत्र दाखल केलं आहे. दोषारोप पत्रात अटकेतील आरोपी मनीषा मुसळे ह्याच डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येस कारणीभूत असल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला आहे. दोषारोप पत्रामध्ये पोलिसांनी म्हटले आहे की, ‘मनीषा हिची रुग्णालयातील अरेरावी व पैशांचा गैरव्यवहार समजल्यावर डॉ. शिरीष यांनी डिसेंबर 2024 पासून तिचे अधिकार कमी केले होते.’ शुक्रवारी (18 एप्रिल) रात्री 8 वा. एस.पी ऑफ न्युरो सायन्सेस येथे रुग्णांची तपासणी करून घरी परतले. रात्री 8:30 बेडरूमच्या बाथरूममधून बंदुकीच्या गोळीचा आवाज आला.  त्यानंतर दुसरी राउंड फायर झाल्यावर कुटुंबीयांनी बेडरूममध्ये धाव घेतली. यावेळी डॉ. शिरीष वळसंगकर हे रक्ताच्या थारोळ्यात माखलेले दिसले.

हेही वाचा

मोठी बातमी : सोलापूरचे डॉ. शिरीष वळसंगकर प्रकरणात 59 दिवसांनी आरोपपत्र, मनीषा मुसळेंविरोधात पोलिसांचे खळबळजनक दावे

आणखी वाचा



Source link

सोबत दारू प्यायला बसले अन् शा‍ब्दिक चकमक, ‘टकल्या’ने काढला जिवलग मित्राचा काटा; अकोला हादरलं

सोबत दारू प्यायला बसले अन् शा‍ब्दिक चकमक, ‘टकल्या’ने काढला जिवलग मित्राचा काटा; अकोला हादरलं


Akola Crime News : अकोला शहरातील रमाबाई नगर (Ramabai Nagar) परिसरात एका धक्कादायक घटना घडली आहे. प्रकाश पंचू जोसेफ (वय अंदाजे 35) या युवकाची त्याच्या जवळच्या मित्रानेच निर्घृण हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. पवन विलास मोरे उर्फ ‘टकल्या’ (रा. अकोला) असे आरोपीचे नाव असून, तो सध्या फरार आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. (Akola Crime News)

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश आणि पवन हे दोघेही चांगले मित्र होते. मंगळवारी रात्री ते रमाबाई नगर चौकात एकत्र दारू पीत होते. दरम्यान, त्यांच्यात काही कारणावरून शाब्दिक चकमक झाली. त्यातूनच पवन उर्फ ‘टकल्या’ने अचानक रागाच्या भरात प्रकाशवर दगडाने वार केले. या हल्ल्यात प्रकाश गंभीर जखमी झाला.

आरोपी फरार, पोलिसांकडून शोध सुरु

स्थानिक नागरिकांनी तातडीने प्रकाशला रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. घटनेनंतर पवन मोरे हा घटनास्थळावरून पळून गेला असून, पोलिसांनी त्याच्या शोधासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. घटनेची माहिती मिळताच जुने शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू केला आहे. 

दोन दिवसांत दुसरे हत्याकांड

दरम्यान, अकोल्यात गेल्या दोन दिवसांत हे दुसरे हत्याकांड असून, याआधी अकोट फैल भागात एका व्यक्तीची हत्या झाली होती, तर घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले होते. विशेष म्हणजे, त्या घटनेमागेही किरकोळ वादच कारणीभूत ठरला होता. त्यामुळे शहरात कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

व्याजाच्या पैशातून तरुणाचे अपहरण

दरम्यान, बीडच्या धारूरमध्ये उसने घेतलेल्या दहा हजार रुपयांचे व्याजासह 80 हजार रुपये झाल्याने ते वसूल करण्यासाठी एका तरुणाचे चौघा जणांनी अपहरण केले. तसेच त्या मुलाच्या घरी फोन करत मुलगा जिवंत पाहिजे असेल तर आताच्या आता पन्नास हजार रुपये टाका, नाहीतर तो तुम्हाला दिसणार नाही, अशी धमकी दिली. या प्रकरणात धारूर पोलिसांनी तातडीने तपास करत अंबाजोगाई जवळील साकुर येथून दोघांना अटक केली आहे तर दोघेजण फरार आहेत. कृष्णा मैंद असे अपहरण झालेल्या युवकाचे नाव असून त्याच्यावर सध्या अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

आणखी वाचा

Bhandara Accident News: भंडाऱ्याच्या महामार्गावरील उड्डाणपुलावर होंडा सिटीनं दुचाकीस्वारांना चिरडलं;पती-पत्नीसह दोन चिमुकले गंभीर

आणखी वाचा



Source link

अकोल्यात किरकोळ वादातून हत्याकांड; ऑटो रिक्षाचा दुचाकीला धक्का; धारदार शस्त्रांनी वार अन्…, ए

अकोल्यात किरकोळ वादातून हत्याकांड; ऑटो रिक्षाचा दुचाकीला धक्का; धारदार शस्त्रांनी वार अन्…, ए


अकोला: अकोल्यातल्या अकोट फैल भागात रात्री उशिरा किरकोळ वादातून हत्याकांड (Akola Crime News) घडलं असल्याची माहिती समोर आली आहे. अगदी शुल्लक कारणांवरून एकाची हत्या (Akola Crime News) झाली आहे, तर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. ऑटो रिक्षाचा एका दुचाकीला धक्का लागल्याने हा वाद झाला होता. वादाचं रूपांतर थेट हत्येपर्यंत पोचलंय. रिक्षा चालकाचा धक्का दुचाकीला लागल्यावरून शाब्दिक वाद होऊन हा खुनी हल्ला झाला होता. दोघांनी एकमेकांजवळ असलेल्या धारदार शस्त्राने हल्ला चढवला. या हल्ल्यात 3 ते 4 जण गंभीर स्वरूपात जखमी झालेत. उपचाराच्या दरम्यान जखमींमधील एकाचा मृत्यू झाला आहे. तर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. अहमद खान शाकूर खान असं हत्या (Akola Crime News)झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. जखमी व्यक्तींवर अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणात अकोट फेल पोलीस अधिक तपास करत आहेत. (Akola Crime News)

नेमकं काय घडलं?

या घटनेनं परिसरात खळबळ उडाली. अगदी क्षुल्लक कारणावरून (Akola Crime News) सुरू झालेल्या वादाचं रूपांतर हत्याकांडात झाल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एकाचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. ऑटो रिक्षाचा एका दुचाकीला धक्का लागल्याने हा वाद झाला होता. वादाचं रूपांतर थेट हत्येपर्यंत पोचलंय. रिक्षा चालकाचा धक्का दुचाकीला लागल्यावरून शाब्दिक वाद (Akola Crime News)होऊन हा खुनी हल्ला झाला होता. दोघांनी एकमेकांजवळ असलेल्या धारदार शस्त्राने हल्ला चढवला. यामध्ये 3 ते 4 जण जखमी झाले.

दोन्ही बाजुंनी एकमेकांवर हल्ला चढवला. दोघांनी एकमेकांजवळ असलेल्या धारदार शस्त्राने हल्ला चढवला. या हल्ल्यात 3 ते 4 जण गंभीर स्वरूपात जखमी झालेत. उपचाराच्या दरम्यान जखमींमधील एकाचा मृत्यू झाला आहे. तर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. अहमद खान शाकूर खान असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. जखमी व्यक्तींवर अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. 

हेदेखील वाचा

आणखी वाचा



Source link

इतर मुलांशी का बोलतेस? म्हणत भररस्त्यात तरुणीला काठीनं मारहाण, अकोल्यात तरुणाचा संतापजनक Video

इतर मुलांशी का बोलतेस? म्हणत भररस्त्यात तरुणीला काठीनं मारहाण, अकोल्यात तरुणाचा संतापजनक Video


Akola Crime: भर रस्त्यात एका तरुणीला काठीने मारहाण करतानाचा धक्कादायक प्रकार अकोल्यात उघडकीस आला आहे .खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीतील या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे .मिळालेल्या माहितीनुसार मारहाण करणारा मुलगा आणि पीडित मुलगी दोघेही अल्पवयीन आहेत .व्हिडिओमध्ये संबंधित मुलगा मुलीला जोरजोरात काठीने मारहाण करताना दिसतोय . 

नेमकं प्रकरण काय?

राज्यभरात महिलांवर होणाऱ्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असताना अकोल्यातील एका घटनेने मोठी खळबळ उडाली आहे . ‘तू इतर मुलाशी का बोलते? या कारणावरून भर रस्त्यात एका मुलीला हातातील काठीने जबर मारहाण केल्याची घटना अकोल्यात घडली आहे .मुलगा आणि मुलगी दोघेही जण अल्पवयीन असल्याचं सांगितलं जात आहे .मारहाण करत असतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय . व्हिडिओमध्ये संबंधित मुलगा मुलीला जोरजोरात काठीने मारहाण करताना दिसतोय .तू इतर मुलांची का बोलते ?या कारणावरून त्यानेही मारहाण केल्याची प्राथमिक माहिती आहे .विशेष म्हणजे रस्त्यावर घडलेल्या या घटने दरम्यान मारहाण करत असताना कोणीही या मुलाला रोखण्याचाही प्रयत्न केलेला नाही .या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी याची गंभीर दखल घेतलीय .त्यांनी मुलीच्या कुटुंबीयांचा शोध घेत त्यांची भेट घेतल्यानंतर अखेर मुलीचे आईने मारहाण करणाऱ्या मुलाविरोधात तक्रार दाखल केली आहे .या प्रकरणात पोलिसांनी विनयभंगासह अन्य कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत .दरम्यान  मारहाण करणाऱ्या मुलाचा खदान पोलीस शोध घेत आहेत .

कोल्हापुरात महाराष्ट्राला हादरवणारं हत्याकांड

राज्यातील पुरोगामी विचारांचा वारसा जपणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील आळते येथे एका धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थेत अल्पवयीन विद्यार्थ्याची हत्या (Murder News) करण्यात आली आहे. या घटनेमुळे कोल्हापूरमध्ये (Kolhapur) एकच खळबळ उडाली आहे. फैजान नाजिमा (वय 11) असे मृत मुलाचे नाव आहे. या संस्थेतील एका अल्पवयीन मुलानेच फैजानची हत्या केल्याचे उघड झाले आहे. ही संस्था बंद पडून आपल्याला घरी जायला मिळावे, यासाठी अल्पवयीन विद्यार्थ्याने फैजानची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा-

Kolhapur Crime: कोल्हापुरात महाराष्ट्राला हादरवणारं हत्याकांड, धार्मिक संस्थेत अल्पवयीन विद्यार्थ्याला शॉक देऊन संपवलं, चकीत करणारं कारण समोर!

आणखी वाचा



Source link