बैलपोळा सणासाठी आमदार बच्चू कडू पोहचले मूळगावी, पाहा फोटो

बैलपोळा सणासाठी आमदार बच्चू कडू पोहचले मूळगावी, पाहा फोटो

Amravati News: अमरावतीत हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात जिवंत देखाव्यांचं प्रदर्शन, भारतीय संस्कृती, परंपरा देखाव्यातून सादर

Source link

यशोमती ठाकूर राणा दाम्पत्यावर 100 कोटींचा दावा ठोकणार

यशोमती ठाकूर राणा दाम्पत्यावर 100 कोटींचा दावा ठोकणार

अमरावती :  लोकसभा निवडणुकीत (Loksaba Election) प्रचारासाठी राणा यांच्याकडून यशोमती ठाकूर यांनी पैसे घेतल्याचा आरोप नवनीत राणानी केला. त्यानंतर यशोमती ठाकूर आक्रमक झाल्यात.आमदार रवी राणांवर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर राणा दाम्पत्यावर 100 कोटींचा अब्रु नुकसानीचा दावा टाकणार आहेत.  राणा दाम्पत्यावर कायदेशीर कारवाई करुन निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचंही यशोमती ठाकूर यांनी सांगितले आहे.

लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी राणा यांच्याकडून यशोमती ठाकूर यांनी पैसे घेतल्याचा आरोप नवनीत राणानी केल्यानंतर यशोमती ठाकूर आक्रमक  झाला आहे. नवरा बायको जिल्ह्याचं वातावरण खराब करत आहेत. निवडणूक आयोग झोपा काढत आहे का? ईडी काय करत आहे? देवेंद्र फडणवीस पाठीशी घालत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही.पण त्यांना दहीहंडी कार्यक्रमात यायला वेळ आहे, अशी टीका यशोमती ठाकूर यांनी केली आहे.

नवनीत राणा यांचं यशोमती ठाकूरांना आव्हान

हर्मन्स कंपनी उद्धव ठाकरेजींनी अमरावतीमध्ये आणलेली ही कंपनी आहे. तु्म्ही हर्मन्स कंपनीचे आणि रेमन्स कंपनीचे कागदपत्रे घेऊन या. आम्ही फडणवीसांच्या काळातील कागदपत्रे घेऊन येतो. यावरून कळेल की, या कंपनीच्या नक्की कोणत्या सरकारच्या काळात मतदारसंघात आणल्या गेल्या आहेत. जर आम्ही बोलतोय, ते खरं झालं तर आमच्याऐवजी तुम्हालाच राजकारण सोडावं लागेल, असं आव्हान नवनीत राणा यांनी दिलं आहे.

Source link

अकोटमध्ये शेतकऱ्यानं फुलवला पानांचा पानमळा

अकोटमध्ये शेतकऱ्यानं फुलवला पानांचा पानमळा

अकोला : अकोला (Akola News) जिल्ह्यातील अकोटमध्ये शेतकऱ्यानं खाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पानांचा पानमळा फुलवला आहे. रामचंद्र बरेठिया असं या शेतकऱ्याचं नाव आहेय. 20  गुंठे क्षेत्रावर लावलेल्या या पानमळ्यातून बरेठिया आता लाखोंचं उत्पादन घेतायेत. त्यांच्या या प्रयोगाला कृषी विभागाने मार्गदर्शन करत बळ दिले आहे

रामचंद्र बरेठिया यांनी अकोला जिल्ह्यातील अकोट शहराचं राजकारण गाजवले आहे. अकोटचं नगराध्यक्षपद भूषवलेले रामूकाका  आता मात्र शेतीचं क्षेत्र  त्यांच्या शेतीतील वेगळ्या प्रयोगांमुळे गाजवत आहे. त्यांची अकोटपासून जवळच शेती आहे. या शेतात त्यांनी खाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कलकत्ता पानांचा मळा फुलवला आहे. अकोट हे कधीकळी विदर्भात पानांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला तालुका आहे. मात्र, अलिकडे हे पानमळे हळूहळू लुप्त होत आहेत. मात्र, बरेठिया यांनी आपल्या शेतातील 20 गुंठे क्षेत्रावर शेडनेट उभारुन कलकत्ता पान मळ्याची शेती साकारली आहे. यासाठी त्यांनी कलकत्ता मीठा पान लालदांडीचे पाच हजार वेलीचे रोप कोलकाता येथून मागवले आहे. त्यांना एक लाख पाच हजार रूपयांची ही रोपं मिळाली आहे

या शेतीसाठी त्यांना आधार  युट्यूब आणि कृषी विभागाचा मिळाला.  त्यांना नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत अंतर्गत शेडनेट हाऊस मिळालंय. साडेबारा लाख रुपये खर्चून शेडनेट हांऊसची उभारणी केलीय. यासाठी त्यांना 80 टक्के शासकीय अनुदान लाभलंय. पुढे मातीचीही चाचण्या म्हणजेच तपासणी त्यांनी करून घेतल्या आहे. गेल्या आठ महिन्यापूर्वी शेडनेट हाऊस उभ केलं असून पुढील तयारीला लागले. शेडनेट हाऊसमध्ये मल्चिंग पेपर आणि ठिंबक सिंचन त्याशिवाय पाण्याचे फवारे तयार केले आहेत. कलकत्ता पान लागवडसाठी त्यांना अडीच लाखांपर्यत खर्च आला आहे. वर्षातील आठ महिने हे पिक मिळणार आहे. पुढील दहा ते बारा वर्ष या पानगळ्यातून उत्पन्न मिळणार आहे.

शेतात सद्यस्थित पाच हजार वेली आहेत. पहिल्या तोडणीमध्ये प्रत्येकी वेलीची पाच पान तोडण्यात येईल. अशाप्रकारे महिन्यातून तीन वेळा म्हणजेच पहिल्यां तोड्यात 25 हजार दुसऱ्या तोडणीत 25 अन् तिसऱ्या तोडणी 25 हजार असे एकत्रित महिन्यात 75 हजार पान विक्रीसाठी उपलब्ध होतील. एक कलकत्ता पान तीन ते पाच रूपयांपर्यत जाऊ शकते. त्यानुसार महिन्याभराचं उत्पन्न दीड ते दोन लाखांपर्यंत असू शकणार आहे.

शेतीत मळलेल्या वाटा सोडत नवे प्रयोग करणं ही काळाची गरज आहेय.पारंपारिक शेती केल्या जात असलेल्या विदर्भात ही पानशेती नव्या बदलाची नांदी ठरणारं उदाहरण म्हणता येईल. इतर शेतकऱ्यांनी पानशेतीचं महत्व आणि अर्थशास्त्र समजून घेतल्यास हे बदल आणखी वेगानं घडतील यात शंकाच नाही.

Source link

आमदार रवी राणा यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न; हल्लेखोर ठाकरे गटाचा असल्याचा राणांचा दावा

आमदार रवी राणा यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न; हल्लेखोर ठाकरे गटाचा असल्याचा राणांचा दावा

अमरावती : आमदार रवी राणा यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला असून या प्रकरणी पोलिसांनी महेंद्र दिपटे या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. हल्ला करणारा व्यक्ती हा ठाकरे गटाचा असल्याचा आरोप रवी राणा यांनी केला आहे. आमदार रवी राणा हे दहीहंडीचा कार्यक्रम संपवून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी गेले असताना महेंद्र दिपटे यांनी राणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.अंजनगाव सुर्जी पोलिसांनी हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला ताब्यात घेतलं आहे.

आमदार रवी राणा हे सोमवारी दुपारी युवा स्वाभिमान पार्टीच्या दहीहंडीच्या कार्यक्रमात गेले होते. दहीहंडीचा कार्यक्रम संपल्यावर सायंकाळी रवी राणा हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी गेले. त्यावेळी अचानक एक व्यक्ती त्यांच्यासमोर येऊन त्याने रवी राणा यांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न केला. रवी राणा यांच्यावर हल्ला करणाऱ्याचं नाव महेंद्र दिपटे असून तो शिवसेना ठाकरे गटाचा माजी तालुका प्रमुख असल्याची माहिती समोर येत आहे.

यावेळी रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांनी अंगावर येणाऱ्या व्यक्तीला पकडून चांगलाच चोप दिला आणि पोलिसांच्या हवाली केले. अंजनगाव सुर्जी पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.  हल्ला करणारा व्यक्ती ठाकरे गटाचा असल्याचा आरोप रवी राणा यांनी केला असून चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला असल्याचा ही दावा रवी राणा यांनी केला आहे.

गेल्या वर्षी 25 सप्टेंबर 2022 ला हिंगोलीचे आमदार संतोष बांगर हे अंजनगाव सुर्जीला आले असता तेव्हा बांगर यांच्या वाहनावर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी हल्ला केला होता. त्यात महेंद्र दिपटे याचाही समावेश होता.

नवनीत राणांना धमकी देणारा तरूण गजाआड

काही दिवसांपूर्वीच खासदार नवनीत राणा यांना धमकी देणाऱ्या तरूणाला पोलिसांनी अटक केली होती. अमरावतीच्या नेरपिंगळाई भागातून त्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं होतं. श्याम तायवाडे असं त्याचं नाव आहे. या व्यक्तीने खासदार नवनीत राणा यांना धमकी देत शिवीगाळ केली होती.

श्याम तायवाडे या तरूणाने खासदार नवनीत राणा यांना कॉल करून धमकी दिली. त्यामध्ये त्याने तिवसामधून बोलत असल्याचं सांगितलं. तू गर्दीच्या ठिकाणी जातेस, त्या ठिकाणी तुझ्यावर कधी धारधार चाकूने वार करणार ते तुला माहितीही पडणार नाही असं त्याने म्हटलं. तसेच या तरूणाने खासदार नवनीत राणा यांच्याबद्दल अश्लील उद्गार काढत शिवीगाळ केली होती.

ही बातमी वाचा:

Source link

YouTube
Instagram
WhatsApp