माता न तू वैरिणी… चिमुकलीच्या नाकाला चिमटा लावून पोटच्या मुलीला आईनंच संपवलं अन् रचला बनाव

माता न तू वैरिणी… चिमुकलीच्या नाकाला चिमटा लावून पोटच्या मुलीला आईनंच संपवलं अन् रचला बनाव


Akola Crime: अकोला : नाकाला चिमटा लावून मुलगी झोपल्याचा बनाव एका आईनं केला. पण, वैद्यकीय अहवालात या साडेपाच वर्षीय मुलीच्या हत्येचा उलगडा झाला आहे. या प्रकरणात अकोल्यातील खदान पोलिसांनी मुलीची आईला ताब्यात घेतले आहे. अकोला शहरातील बलोदे लेआऊटमधील ही घटना आहे. किशोरी रवी आमले (वय 5) असं मृत मुलीचं नाव असून विजया आमले असं मारेकरी आईचं नाव आहे. या संदर्भात वडील रवी आमले यांनी दिलेल्या तक्रारीवरून हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुपारच्या वेळी घरात कोणी असतानाच आईनं तिचा काटा काढला असल्याचं समोर येत आहे. तरीही आईनं आपल्या पुढच्या मुलीला का संपवलंय? या मागील गूढ अजूनही कायम आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोरी हिच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, लग्नापासून पती-पत्नीमध्ये वाद होते. पत्नीने पतीला घटस्फोटाची मागणी देखील अनेकदा केली आहे. या वादात किशोरीचा बळी गेल्याची चर्चा आहे. 

…अन् आईनं घेतला गोंडस चिमुकलीचा जीव? 

नाकाला चिमटा लावल्यानं चिमुकल्या किशोरीचे प्राण गेले. किशोरी नाकाला चिमटा लावून झोपली आणि तिचा मृत्यू झाला, असा बनाव किशोरीच्या आईने केला होता. किशोरीच्या वडिलांनी आईवरच संशय व्यक्त केला होता. त्यांनी पोलिसांना त्याबाबत माहिती दिली होती. पोलिसांनी या प्रकरणात किशोरीची वैद्यकीय तपासणी केली अन् अहवालाच्या तपासात अनेक नवनवे खुलासे समोर आले. यात नाकाला चिमटा लावून किशोरीचा मृत्यू झाल्याचा केलेला देखावा समोर आला. तर तिच्या अंगावर आणि शरीरावर मारहाणीच्या खुणा आढळून आल्यात. या महिन्याच्या सुरुवातीला किशोरीच्या अकस्मात मृत्यूची नोंद खदान पोलिसांनी घेतली होती. आता किशोरीची आई विजया आमले हिच्या विरोधात हत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला. या प्रकरणात तपास अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक धनंजय सायरे, सहायक पोलीस निरीक्षक निलेश करंदीकर, पोलीस उपनिरिक्षक निता दामधर आणि पोलीस कर्मचारी आकाश राठोड काम पाहत आहेत.

2 जूनचा दिवस ठरला तिच्यासाठी काळरात्र? 

2 जून 2023 रोजी सकाळी 8 वाजता कामावरुन वडील रवी हे घरी जेवणाकरीता आले, किशोरी ही घरी ट्युशनवरून आलेली होती, त्यानंतर किशोरीने सोबत जेवण केले आणि काही वेळ रूममध्ये खेळले अन् मस्ती केली. पुन्हा थोड्यावेळांनं कामाकरिता घरून दुपारी निघाले. या दरम्यान, पत्नी विजया हिचा फोन आला तिने त्यांना सांगितले की, मी घरातील कामं करत असताना किशोरी ही पलंगावर खेळता-खेळता झोपली होती, कामं संपल्यावर जेवणासाठी किशोरी हिला झोपेतून उठविलं, परंतु किशोरी ही झोपेतून उठत नाहीये, तुम्ही लवकर घरी या असे म्हणाली. लगेच मित्र वैभव हांडे याला फोन केला अन् तो घरी गेला. किशोरी हिला शासकीय रुग्णालयात नेले असता येथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. 

या संदर्भात त्यांनी विजया हिला विचारपुस केली असता तीने सांगितले की, किशोरी ही पलंगावर ओले कपडे घराबाहेर वाळु घालण्याकरीता असलेल्या चिमटयानं खेळत होती, कामे झाल्यानंतर घरात पाहिले असता किशोरी हीचे नाकाला चिमटा लावलेला होता आणि किशोरी ही काहीच हालचाल करीत नव्हती, असे तिने सांगितले.

दरम्यान, घटनावेळी किशोरीची आई ही एकटीच घरी होती, अन्य घरात कोणीच नव्हतं. त्यामुळे सर्व संशय सध्या पोलिसांना तिच्यावर आहे. त्यात वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तिच्या आईविरुद्ध गुन्हे दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे.



Source link

Kokan Kashedi Ghat : गणेशोत्सवाच्या आधी कशेडी बोगदा सुरु होणार : ABP Majha

Kokan Kashedi Ghat : गणेशोत्सवाच्या आधी कशेडी बोगदा सुरु होणार : ABP Majha



<p>कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी… कशेडी घाटाला पर्याय म्हणून निर्माण केलेल्या बोगद्यातील एक लेनमधून गणेशोत्सवापूर्वी वाहतूक सुरू होणार आहे. त्यामुळे कशेडी घाटातील रस्त्यांची दुरवस्था आणि त्यातून होणारे अपघात तसेच वाहतूक कोंडीतून कोकणवासीयांची सुटका होणार आहे&nbsp;</p>



Source link

…नाहीतर पुन्हा सरकारचा अंत व्हायला वेळ लागणार नाही; बच्चू कडू थेटच म्हणाले

…नाहीतर पुन्हा सरकारचा अंत व्हायला वेळ लागणार नाही; बच्चू कडू थेटच म्हणाले


अमरावती : जालन्यात (Jalna) मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटत असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, राजकीय वर्तुळातून देखील अनेक प्रतिक्रिया या घटनेवर येत आहेत. आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी देखील या घटनेवर भाष्य करत लाठीचार्ज ही अधिकाऱ्यांची बदमाशी असल्याचं म्हटलं आहे. तर अभ्यास करुन सरकारने धनगर मुस्लिम आणि मातंग समाजाला देखील आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावायला हवा असं बच्चू कडू म्हणाले आहेत. जालन्यात झालेल्या लाठीचार्जवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची माफी देखील मागितली.

बच्चू कडूंनी घेतली मनोज जरांगेंची भेट

आमदार बच्चू कडू यांनी जालना येथे जाऊन उपोषणकर्ते मनोज जरांगेंची देखील भेट देखील घेतली आहे. यावेळी त्यांनी म्हटलं आहे की, “आमच्याकडून जितके प्रयत्न करता येतील तितके प्रयत्न आम्ही करु. सरकारने आंदोलकांकडे आंदोलन म्हणून पाहावे. पण इथे येणाऱ्यांना सेल्फीचं पडलयं. त्यांच्या आरोग्याचं काहीच पडलं नाही. आज या लोकांनी जी ज्योत पेटवली आहे त्याचा सन्मान करणं हे महत्त्वाचे आहे. वेळ पडली तर मी देखील उपाशी राहण्यास मागे पुढे पाहणार नाही. त्यामुळे सरकारने अंत पाहू नये. नाहीतर पुन्हा एकदा सरकारचा अंत व्हायला वेळ लागणार नाही. तर महाराष्ट्रामध्ये मराठा कुणबी आहे ही काळ्या दगडावरची रेष आहे. त्यामुळे सरकाने वेगळा कायदा करण्याच्या भानगडीत पडू नका.” 

“माफी मागून राज्य शांत होत असेल तर फार चांगल होईल”

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितल्या नंतर यावर आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, “जर माफी मागून राज्य शांत राहत असेल तर फार चांगलंय. लाठीचार्ज ही अधिकाऱ्यांची बदमाशी आहे.” अधिकाऱ्यांनी लाठीचार्ज कसा केला? असा सवाल देखील यावेळी आमदार बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे. मराठा आरक्षणासाठी जालन्यामध्ये उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांना आमदार बच्चू कडू यांनी पाठिंबा दिला आहे. 

जालन्यामध्ये सुरु असेलेल्या मनोज जरांगे यांच्या उपोषणाला अनेक राजकीय नेत्यांनी भेट दिली आहे. आमदार बच्चू कडू यांनी सोमवार (4 सप्टेंबर) रोजी रात्री उशीरा जालन्यामध्ये मनोज जरांगे यांची भेट घेतली. दरम्यान त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा देखील दर्शवलाय. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेला लाठीचार्ज ही पोलिसांची दादागिरी, फडणवीसांचा कुठलाही हात; रामदास आठवलेंचं स्पष्ट वक्तव्य



Source link

तलाठी भरती परीक्षेत पुन्हा हायटेक कॉपीची घटना, उमेदवाराकडून मोबाईल, डिव्हाईस, इयर फोन जप्त

तलाठी भरती परीक्षेत पुन्हा हायटेक कॉपीची घटना, उमेदवाराकडून मोबाईल, डिव्हाईस, इयर फोन जप्त


अमरावती: तलाठी भरती परीक्षेच्या  (Maharashtra Talathi Recruitment 2023) आज तिसऱ्या सत्रामध्ये हायटेक कॉपी करणाऱ्याला एकाला पोलीसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याच्याकडून मोबाईल, डिव्हाईस, ईअर फोन जप्त करण्यात आलं आहे. उमेदवारांना परीक्षा केंद्रात आत सोडण्याआधी तपासणी केली जाते, त्यावेळी बीड जिल्ह्यातील एका उमेदवाराकडे हायटेक सामुग्री सापडल्याने खळबळ उडाली आहे. अमरावतीच्या ड्रीमलॅन्ड मार्केट या परीक्षा केंद्रात हा प्रकार घडला असून नांदगाव पेठ पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दीपक चवरे (बीड) असं अटक करण्यात आलेल्या उमेदवाराचं नाव असून त्याची चौकशी सुरू आहे.  त्याचे नाव आहे..

गेल्या अनेक दिवसांपासून तलाठी परीक्षा (Talathi Exam 2023) चर्चेत आहे. खरंतर परीक्षेची तारीख जाहीर झाल्यापासून या संपूर्ण प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींची चर्चा जास्त झाली. कधी कॉपीची कीड, तर कधी सर्व्हर डाऊनमुळे आतापर्यंत अनेक अडचणी आल्या. आता पुन्हा यामध्ये हायटेक कॉपीची सामुग्री सापडल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. 

या आधीही नाशिकमध्ये तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये पेपर फुटीची घटना घडली असून त्या प्रकरणी गणेश गुसिंगे या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. आरोपीचा पिंपरी चिंचवड पोलिस भरती प्रक्रियेमध्ये आणि म्हाडाच्या परीक्षेचा पेपर फोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर दोन वर्षे तो फरार होता. यावर कहर म्हणजे वैद्यकीय भरती प्रक्रियेच्या एका परीक्षेच्या गुणवत्ता यादीतही आरोपीचे नाव आले आहे. त्यामुळे या आरोपीचा किती पेपर फुटींमध्ये समावेश आहे, यामागे कोणतं रॅकेट कार्यरत आहे याची चौकशी केली जात आहे. 

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती न्यायालयात जाण्याच्या तयारीत 

राज्यातील तलाठी भरतीपरीक्षेत उघडकीस येत असलेला गैरप्रकार पाहता या सगळ्या संदर्भात तातडीने चौकशी समिती नेमावी, या मागणीसाठी स्पर्धा परीक्षा समन्वय समिती मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहे. 

राज्यभरात तलाठी भरती परीक्षा  पार पडत असताना या परीक्षेत हायटेक कॉपी प्रकरण आणि इतर गैरप्रकार समोर येत आहे. यामध्ये आरोपी गणेश गुसिंगेसह मोठी टोळी कार्यरत असल्याचा संशय आहे. या गैरप्रकारामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या उमेदवारांवर अन्याय होत असल्याने तातडीने या सगळ्या प्रकारावर चौकशी समिती नेमावी, यासाठी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीमधील (Competitive Examination Coordination Committee) परीक्षा देणारे उमेदवार मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती आहे. 

ही बातमी वाचा: 

 



Source link

प्रफुल्ल पटेल बोले- उद्धव चाहते तो बच जाती MVA सरकार: हमने ढाई साल के लिए CM पद मांगा था, लेकिन जवाब नहीं मिला

प्रफुल्ल पटेल बोले- उद्धव चाहते तो बच जाती MVA सरकार: हमने ढाई साल के लिए CM पद मांगा था, लेकिन जवाब नहीं मिला


मुंबई11 घंटे पहले

  • कॉपी लिंक

पटेल ने दावा किया कि उन्होंने उद्धव और सांसद संजय राउत से साथ में सरकार बनाने के लिए बात की थी, लेकिन उन्होंने जवाब नहीं दिया। (फाइल फोटो)

NCP में अजित पवार गुट के नेता प्रफुल्ल पटेल ने दावा किया कि साल 2019 में महाराष्ट्र विकास अघाड़ी सरकार (MVA) बन रही थी, तब हमारी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने शिवसेना से बात की थी। हमने उद्धव ठाकरे से सीएम का पद ढाई साल के लिए साझा करने को कहा था, लेकिन उन्होंने इस बात को हल्के में लिया और कोई जवाब नहीं दिया।

पटेल ने दावा किया कि उन्होंने उद्धव, उनके बेटे आदित्य और सांसद संजय राउत से साथ में सरकार बनाने के लिए बात की थी, लेकिन हमारी मांग पर तीनों ने एक शब्द भी नहीं कहा।

हमारी पार्टी NCP के पास 54 और शिवसेना के पास 56 विधानसभा सीटें थीं। उनकी पार्टी से हमारे पास केवल 2 सीटें कम थीं, इसलिए हमने मुख्यमंत्री की कुर्सी साझा करने की मांग की थी। हमारी ये मांग बिल्कुल जायज थी। अगर हमारी मांग मान ली जाती तो महाराष्ट्र विकास अघाड़ी की सरकार नहीं जाती।

प्रफुल्ल पटेल ने दावा किया कि उन्होंने 2019 में शिवसेना के साथ मिलकर सरकार बनाने की बात की थी, लेकिन उद्धव ने जवाब नहीं दिया था।

प्रफुल्ल पटेल ने दावा किया कि उन्होंने 2019 में शिवसेना के साथ मिलकर सरकार बनाने की बात की थी, लेकिन उद्धव ने जवाब नहीं दिया था।

उद्धव गुट की नेता सुषमा अंधारे बोलीं- पटेल पर भरोसा कैसे करें?
उद्धव गुट की नेता सुषमा अंधारे ने तंज कसते हुए कहा कि जिन लोगों ने अपनी पार्टी तोड़ दी, उन पर भरोसा कैसे करें। वे अब अपने कामों को सही ठहराने और अपने आकाओं को खुश करने के लिए कुछ भी कहेंगे।

ढाई साल मुख्यमंत्री पद न मिलने पर भाजपा से अलग हुए थे उद्धव
उद्धव ठाकरे विधानसभा चुनाव के बाद से ही भाजपा से आधे-आधे समय के लिए सीएम की कुर्सी बांटने की मांग कर रहे थे। वे चाहते थे कि पहले ढाई साल उनकी पार्टी का सीएम रहे, लेकिन भाजपा ने उनकी मांग नहीं मानी। इससे नाराज होकर ठाकरे ने कांग्रेस और NCP के साथ महाराष्ट्र विकास अघाड़ी बनाकर राज्य में सरकार बनाई थी।

महाराष्ट्र की राजनीति से जुड़ी ये खबर भी पढ़ें…
शिंदे के Out होने के डर से अजित In, फडणवीस हो सकते हैं महाराष्ट्र के अगले CM

अजित पवार को अपने साथ लाकर BJP ने महाराष्ट्र में अपनी सरकार बचाने की कोशिश की है। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के साथ शिवसेना से अलग होने वाले 16 विधायकों को अयोग्य करार देने पर जल्द फैसला आना है। पूरी खबर पढ़ें …

शरद बोले-अजित हमारे नेता, NCP में टूट नहीं, फिर बदले

नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी (NCP) चीफ शरद पवार ने शुक्रवार को बारामती में कहा है कि अजित पवार उनकी पार्टी के नेता हैं। NCP में कोई टूट नहीं हुई है। उन्होंने कहा, ‘कोई पार्टी तब टूटती है, जब पार्टी का एक बड़ा ग्रुप राष्ट्रीय स्तर पर अलग होता है। NCP में ऐसा कुछ नहीं हुआ। पूरी खबर पढ़ें …

खबरें और भी हैं…



Source link

अकोल्यात चंद्रशेखर बावनकुळेंना दाखवले काळे झेंडे; जालन्यातील घटनेविरोधात मराठा समाज आक्रमक

अकोल्यात चंद्रशेखर बावनकुळेंना दाखवले काळे झेंडे; जालन्यातील घटनेविरोधात मराठा समाज आक्रमक



Akola: अकोल्यात चंद्रशेखर बावनकुळेंना दाखवले काळे झेंडे; जालन्यातील घटनेविरोधात मराठा समाज आक्रमक



Source link

YouTube
Instagram
WhatsApp