by Hansraj Agrawal | Aug 28, 2023 | Current Affairs
अमरावती : राष्ट्रवादी काँग्रेसचे (National Congress Party) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रहार (Prahar Party) पक्षाचे नेते बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्याबाबत मोठं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादी पक्षाला खिंडार पडल्याची चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी बच्चू कडू कोण ओळखत नसल्याचं वक्तव्य केलं होतं. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नगरसेवकांनी प्रहार पक्षामध्ये प्रवेश केला आहे. वाशिम जिल्ह्यातील मानोरा नगर पंचायतीच्या नगराध्यक्षासह 12 नगरसेवकांनी प्रहार पक्षामध्ये प्रवेश केल्याने एकच चर्चा सुरू झाली आहे.
हेमेंद्र ठाकरे यांच्यासह 10 नगरसेवकांचा प्रहारमध्ये प्रवेश
वाशिमच्या (Washim) मानोरा नगरपंचायतचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष हेमेंद्र ठाकरे यांच्यासह 10 नगरसेवक आणि स्वीकृत नगरसेवक यांचा प्रहार पक्षामध्ये (Prahar Party) प्रवेश झाला आहे. आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. या प्रवेशामुळे वाशिममध्ये राष्ट्रवादीला मोठा खिंडार पडलं आहे. अमरावती जिल्ह्याच्या चांदूरबाजार तालुक्यातील कुरळपूर्णा येथे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या प्रहार पक्षामध्ये बच्चू कडू यांच्या उपस्थितीत हेमेंद्र ठाकरे यांच्यासह एक भाजप आणि नऊ राष्ट्रवादीचे नगरसेवक, एक स्वीकृत सदस्यांचा प्रहारमध्ये पक्षप्रवेश झाला आहे. हेमेंद्र ठाकरे हे जिल्हा परिषदेचे माजी सभापती असून सध्या ते नगर पंचायतचे नगराध्यक्ष असल्याने मानोरा तालुक्यात त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. त्यामुळे हेमेंद्र ठाकरे यांच्या प्रहारमध्ये प्रवेश झाल्याने पक्षाला चांगलाच फायदा होईल.
‘आम्ही एक-एक सुतळी बॉम्ब लावू’
यावेळी आमदार बच्चू कडू म्हणाले की, पदाला आणि सत्तेला महत्व नाही, हेमेंद्र ठाकरे यांच्या प्रवेशामुळे प्रहार आता आणखी मजबूत होईल. विधानसभा निवडणुकीची ही सुरुवात आहे आणि बऱ्याच गोष्टी आम्ही थांबवून ठेवल्या आहेत, जर त्या केल्या तर, स्फोट होईल… आम्ही एक-एक सुतळी बॉम्ब लावू, असं बच्चू कडू म्हणाले आहेत. त्यामुळे बच्चू कडू यांनी विरोधकांना सूचक इशारा दिला आहे.
प्रत्येकाला स्वबळाची तयारी करण्याचा अधिकार : बावनकुळे
भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी याआधी बच्चू कडू यांच्याबाबत प्रतिक्रिया देत म्हटलं होतं की, ‘प्रत्येकाला आपल्या पक्षाच्या स्वबळाची तयारी करण्याचा अधिकार आहे, बच्चू कडू यांनी स्वबळाची तयारी करायची ठरवली असतील ते त्यांनी करावी. पण ते महायुतीमध्ये आहेत, त्यांचा सन्मान करतो. पुन्हा आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. समाधान करण्याचा प्रयत्न होईल.’
Source link
by Hansraj Agrawal | Aug 28, 2023 | Current Affairs
Amravati Kavad Yatra : 'हर हर महादेव'चा जयघोष! अचलपुरात भव्य कावड यात्रेचं आयोजन
Source link
by Hansraj Agrawal | Aug 27, 2023 | Current Affairs
पुलिस के मुताबिक, 25 अगस्त को 6 लोगों ने गांव के चार लोगों को उनके घर से निकाला और पेड़ से बांधकर पीटा।
महाराष्ट्र के अहमदनगर में चार युवकों को पेड़ से लटकाकर पीटने का मामला सामने आया है। पीड़ितों को 6 लोगों ने डंडे से पीटा है। इन लोगों पर एक बकरी और कुछ कबूतर चुराने का आरोप था। पुलिस ने एक आरोपी को 26 अगस्त को गिरफ्तार कर लिया है, पांच अभी भी फरार हैं।
4 युवकों को पेड़ से उल्टा लटकाकर निर्वस्त्र करके पीटा गया।
युवकों के कपड़े उतरवाकर पीटा गया
यह मामला श्रीरामपुर तालुके के हरेगांव गांव का है। आरोपियों में से एक ने घटना का वीडियो बनाया था, जो अब सोशल मीडिया पर वायरल हो रहा है। पुलिस के मुताबिक, 25 अगस्त को 6 लोगों ने गांव के चार लोगों को उनके घर से निकाला। इसके बाद उनके कपड़े उतरवाए गए और एक पेड़ से लटका दिया गया, फिर सभी आरोपियों ने उन्हें डंडे से पीटा।
घटना के बाद पीड़ितों को अस्पताल ले जाया गया, जहां उनका इलाज जारी है। पुलिस ने बताया कि पीड़ित शुभम मगाड़े ने शिकायत दर्ज कराई है। आरोपियों की पहचान युवराज गलांदे, मनोज बोदाके, पप्पू फड़के, दीपक गायकवाड़, दुर्गेश वैद्य और राजू बोरागे के रूप में हुई है।
पुलिस ने धारा 307 (हत्या की कोशिश), धारा 304 (अपहरण) और अन्य संबंधित धाराओं समेत एससी-एसटी एक्ट में केस दर्ज किया है।
यह खबर भी पढ़ें…
मध्य प्रदेश में दो युवकों को पेड़ से बांधकर पीटा, VIDEO, सिर के बाल काटे, चोरी का आरोप
मध्य प्रदेश के इंदौर में दो युवकों को पेड़ से बांधकर पीटा गया। उनके सिर के बाल भी काट दिए। लोगों ने चोरी के आरोप में दोनों की जमकर पिटाई की। बाद में मौके पर पहुंची पुलिस ने दोनों युवकों को हिरासत में ले लिया। पूरी खबर पढ़ें..
खबरें और भी हैं…
Source link
by Hansraj Agrawal | Aug 26, 2023 | Current Affairs
<p>Amravati : अमरावतीत जिल्हा स्त्री रुग्णालयाचा वीज पुरवठा खंडित, दुपारी 12 वाजल्यापासून वीज पुरवठा खंडित , रुग्णांचे हाल</p>
Source link
by Hansraj Agrawal | Aug 26, 2023 | Current Affairs
अमरावती : अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात शासकीय बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, या बैठकीला शासकीय अधिकारीचं गैरहजर राहिल्याने राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच, बैठकीसाठी उपस्थित असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि आमदार यशोमती ठाकूर यांच्याही संतापाला सामोरं जावं लागलं.
राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई संदर्भात शासकीय विश्राम गृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, जिल्हाधिकारी तसेच इतर संबंधित अधिकारी या बैठकीला गैरहजर राहल्याने ही बैठक होऊ शकली नाही.
शासकीय बैठकीला अधिकारी गैरहजर
यावेळी विश्रामगृहच्या ठिकाणी एकटे उपजिल्हाधिकारी हे आले असता त्यांना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि आमदार यशोमती ठाकूर यांच्या नाराजीचा सामना करावा लागला. आमदार यशोमती ठाकूर यांनीही अधिकाऱ्यांवर आपली नाराजी व्यक्त केली. तसेच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी, “तुम्ही त्यांना मिटिंग संदर्भात बोलावून घ्या”, अशा कडक सूचना उपजिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आणि काँग्रेस भवनकडे निघून गेले.
दहा महिन्यात सरकार बदलणार : वडेट्टीवार
यावेळी काँग्रेस भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत वडेट्टीवार यांना अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीबाबत हा प्रश्न विचारला असता त्यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं की, अधिकाऱ्यांनी येणं अपेक्षित होतं, पण ते आले नाही. एक त्यांनी लक्षात ठेवावे की “माझं नाव वडेट्टीवार आहे“, असं बोलून अधिकाऱ्यांना इशारा त्यांनी दिला. सगळे अधिकारी घाबरून आहे, त्यामुळे आले नाही, सरकार बदलत असतं, हे त्यांनी विसरू नये. दहा महिन्यात सरकार बदलणार आहे असेही वडेट्टीवार म्हणाले.
पवारांच्या बोलण्याचा नेमका अर्थ सांगता येणार नाही : वडेट्टीवार
दरम्यान, सध्या राष्ट्रवारी पक्षात फूट पडली की नाही हा विषय सध्या चर्चेत आहे. यावर प्रतिक्रिया देताना वडेट्टीवार म्हणाले की, “शरद पवार मोठे नेते आहेत. त्यांच्या बोलण्याचा नेमका अर्थ काय? हे सांगता येणार नाही. उद्या त्यांच्या पक्षाच्या फुटीचं प्रकरण निवडणूक आयोगात जाईल, कोर्टात जाईल. त्यामुळे तो त्यांच्या रणनितीचा भाग असू शकतो. आमच्या पक्षात फूट पडलेली नाही, हे जाहीररीत्या सांगावं”, असं वडेट्टीवार म्हणाले. “प्रत्येक पक्षाला आपापल्या परीनं तयारी करावी लागते. निवडणुकीमध्ये असे प्रसंग येतात की, शेवटच्या टप्प्यामध्ये आघाडी तुटते. त्यासाठी प्रत्येक पक्षाला रणनिती तयार ठेवावी लागते.”, असं वक्तव्यही वडेट्टीवार यांनी केलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Source link
by Hansraj Agrawal | Aug 25, 2023 | Current Affairs
अमरावती : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी 2024 सालची निवडणूक ही भाजपच्या कमळ या चिन्हावर लढावी, त्यांनी तसं नाही केलं तर मग आम्ही वेगळा विचार करू असं सूचक वक्तव्य भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे हे आज अमरावती दौऱ्यावर असताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. आता बावनकुळे यांच्या वक्तव्यानंतर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा काय भूमिका घेणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, जर नवनीत राणा यांनी 2024 ची लोकसभा निवडणूक कमळावर नाही लढवली तर तो त्यांचा निर्णय आहे. मग आम्ही वेगळा विचार करू. आमची सगळ्यांची भावना आहे की नवनीत राणा यांनी कमळ चिन्हावर 2024 ची लोकसभा निवडणूक लढवावी. आम्ही त्यांना विनंती करू. पण त्यांचा एनडीएमध्ये सहभाग असल्याने याबाबत केंद्रीय पार्लमेट्री बोर्ड निर्णय घेईल.
खासदार नवनीत राणा यांनी जर त्यांच्या स्वाभिमानी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर आम्ही वेगळा निर्णय घेऊ असं बावनकुळे म्हणाले. अमरावतीचा खासदार हा भाजपचाच व्हावा अशी लोकांची मानसिकता असल्याचंही ते म्हणाले.
युवा स्वाभिमानी पक्षाच्या नवनीत राणा यांनी 2019 सालची निवडणूक ही अपक्ष म्हणून लढवली होती आणि जिंकली होती. त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला होता. गेल्या दोन निवडणुकीवेळी नवनीत राणा यांना राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळाला होता. त्या जोरावर त्यांनी दोनदा निवडणूक लढली.
मधल्या काळात राजकारणाच्या पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आणि खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी भाजपची कास धरली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीयांमध्ये आमदार रवी राणा यांचा समावेश झाला. त्यामुळे अमरावतीमध्ये त्यांची ताकद वाढली.
महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर राणा दाम्पत्याने थेट उद्धव ठाकरेंशी पंगा घेतला आणि उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून चांगलंच घेरलं. उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर त्यांनी हनुमान चालिसा पठण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना 14 दिवस तुरुंगात जावं लागलं होतं. तुरुंगातून आल्यानंतरही त्यांनी शिवसेनेला त्यांचा विरोध कायम ठेवला.
अमरावतीचा खासदार हा भाजपचा असावा असा प्रयत्न गेल्या अनेक वर्षांपासून केला जात आहे. त्यासाठी भाजपने व्यवस्थितरित्या कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही आपले कार्य वाढवले आहे. त्यामुळे या ठिकाणी आता भाजपला पुरक वातावरण निर्माण झालं असून या जागेवर आता भाजपचे लक्ष आहे. त्याचाच एक भाग म्हणून नवनीत राणा यांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवावी नाहीतर त्या ठिकाणी वेगळा विचार केला जाईल असं भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनीच सांगितलं आहे.
अमरावतीच्या अंबादेवीत चंद्रशेखर बावनकुळे यांची महाआरती
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज अमरावती दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी अमरावती शहरात ‘घर घर चलो अभियाना’ची सुरूवात केली. अमरावती शहरातील कुलदैवत माता अंबादेवीसमोर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे नतमस्तक झाले. त्यांनी अंबादेवी आणि एकविरा देवीची महाआरती केली. यावेळी मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
ही बातमी वाचा:
Source link