मोठी बातमी : बच्चू कडू जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरुन अपात्र, विभागीय सहनिबंधकांचा मोठा निर्णय

मोठी बातमी : बच्चू कडू जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरुन अपात्र, विभागीय सहनिबंधकांचा मोठा निर्णय


Bacchu Kadu अमरावती:   प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू (Bacchu Kadu)यांच्या बाबतीत एक मोठी बातमी समोर आली आहे. अमरावती जिल्हा बँकेच्या (Amravati District Central Cooperative Bank) अध्यक्ष पदावरून बच्चू कडू यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. विभागीय सहनिबंधक यांनी हा निर्णय घेत बच्चू कडू यांना मोठा दणका दिलं आहे. न्यायालयाच्या एक वर्षाच्या शिक्षेचा ठपका ठवेत बच्चू कडू यांच्याबाबत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 

नेमकं प्रकरण काय?

बँकेचे संचालक हरिभाऊ मोहोड यांच्यासह 11 संचालकांनी बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांना बँकेच्या संचालक पदावरून अपात्र करण्याबाबतची याचिका दाखल केली होती. नाशिक न्यायालयाने बच्चू कडू यांना एका प्रकरणात एका वर्षाची शिक्षा ठोठावली असल्याचा दाखला त्यांनी यामध्ये दिला. याचा आधार घेत विभागीय सहनिबंधक यांनी आपणास अपात्र का करण्यात येऊ नये, तसेच पुढील पाच वर्षाकरीता आपणास सदरचे पद धारण करण्यास अपात्र का करू नये? अशी नोटीस बच्चू कडू यांना बजावण्यात आली होती. 24 फेब्रुवारीला दुपारी 3 वाजता साक्ष नोंदविण्याकरिता समक्ष अथवा प्राधिकृत प्रतिनिधीमार्फत उपस्थित राहून आपले म्हणणे सादर करावे, असे नोटिसीत नमूद करण्यात आले होते. अशातच आता विभागीय सहनिबंधक यांनी हा निर्णय घेत बच्चू कडू यांना मोठा दणका दिलं आहे. 

न्यायालयाच्या एक वर्षाच्या शिक्षेचा ठपका ठेवत करवाई 

दरम्यान, 2017 साली नाशिकच्या सरकारवाडी पोलीस ठाण्यात बच्चू कडू यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी आणि मारहाण केल्या प्रकरणी गुन्हे दाखल आहेत. नाशिकच्या विशेष न्यायालयाने 2021 साली बच्चू कडू यांना एक वर्षापर्यंत कठोर कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेला बच्चू कडूंनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले असून हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. याच प्रकरणाचा दाखला देत विरोधी गटातील संचालकांनी बच्चू कडू यांना संचालक पदावरून हटवण्याची मागणी केली होती. बच्चू कडू यांना पंधरा दिवसात त्यांचं म्हणणं मांडण्याचे आदेशही त्यावेळी  देण्यात आले होते. अशातच आता या प्रकरणाचा दाखला देत न्यायालयाच्या एक वर्षाच्या शिक्षेचा ठपका ठवेत बच्चू कडू यांच्याबाबत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा



Source link

धक्कादायक! कुलरचा शॉक लागून आईसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू, अमरावती हादरलं

धक्कादायक! कुलरचा शॉक लागून आईसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू, अमरावती हादरलं


Amravati News : अमरावती (Amravati ) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. कुलरचा शॉक (cooler shocked)  लागून आईसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. अचलपूर तालुक्यातील चमक बुद्रुक येथे आज सायंकाळी 7 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली आहे. कुलरमध्ये पाणी टाकताना विद्युत शॉक लागून आईसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. 

सरमसपुरा पोलीस घटनास्थळी रवाना

मिळालेल्या माहितीनुसार, पती कामावरून आल्यानंतर या घटनेचा खुलासा झाला. तोपर्यंत याबाबत कोणालाच काही माहिती नव्हते. या घटनेनंतर सरमसपुरा पोलीस घटनास्थळी रवाना झाले आहेत. सुमती लक्ष्मण कासदेकर (वय 35) श्वेता लक्ष्मण कासदेकर (वय 4) आणि विकी लक्ष्मण कासदेकर (वय 3) अशी मृतांची नावे आहेत. दुसऱ्या खोलीत असलेली चार मुलं ही बचावली आहेत. लक्ष्मण कासदेकर यांना एकूण सहा अपत्य होती. दरम्यान, एकाचवेळी आईचा आपल्या दोन चिमकल्यांसह मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कुलरमध्ये पाणी टाकताना ही घटना घडली आहे. दरम्यान, या घटनेचा अधिकचा तपास पोलिस करत आहेत.  

जालन्यामध्येही गेल्या आठवड्यात घडली होती अशीच घटना

जालना जिल्ह्यातून हृदयद्रावक घटना समोर आली असून विजेचा धक्का लागल्याने बाप आणि दोन चिमुरड्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेत विनोद मस्के  आणि त्यांचा मुलगा समर्थ आणि मुलगी श्रद्धा मस्के यांचा मृत्यू झाला. दरम्यान, घटनेची माहिती कळताच गावकऱ्यांना तिघांनाही तात्काळ जालना शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केलं. या दुर्दैवी घटनेमुळे वरुड गावासह  संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. शेतकाम करत असताना विद्युत तारेचा स्पर्श होऊन पित्यासह दोन लहान मुलांचा मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली आहे. 

बीडच्या गेवराई तालुक्यातही शॉक लागून बाप लेकांचा मृत्यू झाला होता

बीडच्या गेवराई तालुक्यातील मारफळा येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यात उसाच्या शेतामध्ये खत देण्याचे काम करत असलेल्या बाप लेकाला विद्युत तारेचा शॉक लागल्याची घटना घडली आहे. या विद्युत तारेच्या जबर धक्क्यामध्ये पिता पुत्राचा मृत्यू झालाय.  अभिमान कबले आणि ज्ञानेश्वर कबले असे या दोघा बापलेकाचे नाव आहे. हे दोघेजण आपल्या शेतात काम करत असताना त्या ठिकाणी विद्युत तार खाली पडलेली होती. यात प्रवाह असल्याने दोघांनाही त्याचा शॉक लागला. ही घटना घडल्यानंतर त्या दोघांना तात्काळ बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

महत्वाच्या बातम्या:

ह्रदयद्रावक… वीजेचा शॉक लागून शेतकरी पित्यासह दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत; गावावर शोककळा

आणखी वाचा



Source link

Bachchu Kadu : बच्चू कडूंचे अन्नत्याग आंदोलन तूर्तास स्थगित, सरकारने काय दिलं आश्वासन

Bachchu Kadu : बच्चू कडूंचे अन्नत्याग आंदोलन तूर्तास स्थगित, सरकारने काय दिलं आश्वासन


Bachchu Kadu : बच्चू कडूंचे अन्नत्याग आंदोलन तूर्तास स्थगित, सरकारने काय दिलं आश्वासन 

Follow AI generated Transcription – (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)

शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी करणार हे ऑक्टोबर पर्यंत जाहीर करा, अन्यथा 2 ऑक्टोबर पासून पुन्हा आंदोलन करू असा इशारा देत बच्चू कडू यांनी त्यांच सात दिवसांपासून सुरू असलेल अन्नत्याग आंदोलन सध्या स्थगित केलय, आंदोलनाला ब्रेक दिलाय. उपोषणाच्या सातव्या दिवशी एका वृद्ध महिलेच्या हातून सरबत पिऊन बच्चू कडू यांनी आंदोलन सध्यातरी मागे घेतलय. बच्चू कडू यांनी उपोषण मागे घ्यावं म्हणून काल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आंदोलन स्थळी भेट दिली. तसच मुख्यमंत्र्यांशी बोलण देखील करून दिलं. गावात बोर्ड लावा, कोणी जर सक्तीची वसुली केली तर गावातल्या झाडाले बांधून ठेवल्याशिवाय राहणार नाही. आत्महत्या करायची गरज नाही आहे. वसूल करायचे असेल तर राधानी अंबा साले हो, आमचे वसूलकर ठोकल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि येत्या आठ तारखे, आठ दिवसाच्या आत वसुलीची अट रद्द करणे, शक्तीची वसुली थांबवणे आणि जे थकीत कर्जदार आहे त्याला. नवीन कर्ज देण्याची व्यवस्था करणे या दोन गोष्टी आठ दिवसाच्या आत झाल्या पाहिजे. देवेंद्रजी या कर्जमाफीवर कधीच बोलत नव्हते. ते पण आता बोलले आमचं म्हणणं तेच होतं का देवेंद्रजी तुम्ही जे मौन पाडला आहे ते मवन सोडा आणि कर्जमाफी बद्दल एक डाव तरी बोला बोलले ते. लक्षात घ्या. याच्यात हा किचकट विषय आहे मला माहित आहे का कर्जमाफी म्हणजे सर सगळ सगळ्यांना कर्जमाफी करा किती पैसे लागते काय लागते कोणाले माफ करायचं कोणाला नाही करायचं किती माफ करायचं आणि विशेषता ज्यान कर्ज भरल त्याचा पण विषय आहे.



Source link

उदयजी विश्वासघात केला तर… आधी दम भरला, पुन्हा पाणी प्यायले; बच्चू कडूंचं आंदोलन 7 व्या मागे

उदयजी विश्वासघात केला तर… आधी दम भरला, पुन्हा पाणी प्यायले; बच्चू कडूंचं आंदोलन 7 व्या मागे


Bachhu kadu: अमरावती: शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि दिव्यांगांच्या मानधनात वाढ या प्रमुख दोन मागण्या घेऊन गेल्या 5 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेल्या माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू (Bachhu kadu) यांनी अखेर आपलं उपोषण आज मागे घेतलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) हे कर्जमाफीबद्दल कधीच बोलत नव्हते. पण, आपल्या आंदोलनाने, उपोषणाने त्यांना यावर बोलायला भाग पाडलं. अजित पवार आज पुण्यातील कार्यक्रमात याबाबत बोलले, असे म्हणत बच्चू कडू यांनी सरकारने आपल्या मागण्या विचार घेतल्याचे सांगत अन्नत्याग आंदोलन (Agitation) मागे घेतलं आहे. आपलं अन्नत्याग आंदोलन आपण मागे घेत नसून पुढे ढकलत असल्याचे कडू यांनी म्हटले. दरम्यान, जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर उदय सामंतजी तुमच्या घराबाहेर आम्ही आंदोलन करू, असा इशारा बच्चू कडूंनी दिला. त्यानंतर, मंत्री उदय सामंत यांच्याकडून पाणी पिऊन कडू यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं. 

सरकारच्यावतीने मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी बच्चू कडू यांनी भेटली होती. या भेटीत सरकारने त्यांच्या मागण्यांची गंभीरतेनं दखल घेतली असून मंत्रिमंडळ बैठकीत हा विषय पटलावर येईल, असे म्हटले होते. त्यानंतर, आज मंत्री उदय सामंत यांनी लेखी पत्र दिल्यानंतर बच्चू कडूंनी आपलं उपोषण सोडलं आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल आश्वासन दिलं, तेच पत्र उदय सामंत यांनी बच्चू कडूंना दिले आहे. प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांचे गेल्या सहा दिवसापासून अमरावतीत अन्नत्याग आंदोलन सुरु होते. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी हे अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी बच्चू कडूंची भेट घेत अन्नत्याग आंदोलन मागे घ्यावं, अशी विनंती केली होती. मात्र बच्चू कडू आपल्या मागण्यांवर आणि उपोषणावर ठाम आहेत. बावनकुळेंनी कडूंची मुख्यमंत्र्यांशीही चर्चा घडवून आणली. यावेळी कडूंच्या पत्नी नयना कडू भावनिक झाल्याचं पहायला मिळालं. त्यानंतर, आज मंत्री उदय सामंत यांच्या भेटीनंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं असून बच्चू कडू यांच्याकडून सरकारला 2 ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. सरकारने मागण्या मान्य न केल्यास 2 ऑक्टोबरनंतर पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. 

दरम्यान, बच्चू कडू यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी उद्या 15 जून रोजी राज्यभरात करण्यात येणारे रास्तारोको आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. त्यामुळे, उद्या कुणीही रास्ता रोको आंदोलन करू नये, असे आवाहनही यावेली बच्चू कडू यांनी केली.   

हेही वाचा

एकीकडे राष्ट्रवादीच्या एकत्रि‍करणाची चर्चा; दुसरीकडे अजित पवारांचे आमदार शरद पवारांना भेटले

आणखी वाचा



Source link

अजित पवारांच्या कार्यक्रमात शेतकऱ्यांचा गोंधळ; बच्चू कडूंचा सरकारला निर्वाणीचा इशारा, म्हणाले..

अजित पवारांच्या कार्यक्रमात शेतकऱ्यांचा गोंधळ; बच्चू कडूंचा सरकारला निर्वाणीचा इशारा, म्हणाले..


Bacchu Kadu Protest : सरकार समिती गठित करणार आहे. मात्र अद्याप तारीख निश्चित केलेली नाही. समितीचा अहवाल नेमका किती दिवसात येईल? दिव्यांगांच्या मानधनात नेमकं किती वाढ केलं जाणार, हे ही सरकारनं सांगावं. किंबहुना कार्यकर्त्यांना आमचं आवाहन आहे सरकार आता बोलू लागलं आहे, त्यामुळे 2-3 तास धीर धरावा. मला दवाखान्यात दाखल होण्याचा सल्ला दिला आहे. कारण आता शरीरावर परिणाम होतोय. मात्र हे रोज रोज मारण्यापेक्षा एकदाच मेलेलं बरं, असे म्हणत माजी मंत्री आणि प्रहार पक्षाचे सर्वेसर्वा बच्चू कडूंनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे.

16 तारखेपासून अन्नत्याग सोबत पाणी सुद्धा पिणं बंद करू- बच्चू कडू

प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू (Bacchu Kadu) यांचे गेल्या सहा दिवसापासून अमरावतीत अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. तर बच्चू कडू अन्नत्याग उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी हे अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. आज या आंदोलनस्थळी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे उपोषणस्थळी भेट देणार आहेत. काल(13 जून) अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी देखील बच्चू कडूंची भेट घेतली होती. यावेळी अन्नत्याग आंदोलन मागे घ्यावं, अशी विनंती बावकुळेंनी केली होती. मात्र बच्चू कडू आपल्या मागण्यांवर आणि उपोषणावर ठाम आहेत. बावनकुळेंनी कडूंची मुख्यमंत्र्यांशीही चर्चा घडवून आणली. यावेळी कडूंच्या पत्नी नयना कडू भावनिक झाल्याचं पहायला मिळालं. मुख्यमंत्री फडणवीसांनी एक दिवस उपवास करावा आणि मग अमृता वहिनींची काय स्थिती होते ते पहावं, असं आव्हान नयना कडूंनी केलंय.

शेतकऱ्यांची अजित पवारांच्या कार्यक्रमात घोषणाबाजी 

अशातच  या आंदोलनांचे पडसाद आज पुण्यात देखील पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्यक्रमावेळी अमरावतीच्या शेतकऱ्यांची घोषणाबाजी केली, यावेळी मोठा गोंधळ झाला, बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अजित पवारांच्या कार्यक्रमात अमरावतीच्या शेतकऱ्यांची घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागण्यासाठी अजित पवारांचे भाषण सुरू होताच अमरावतीच्या शेतकऱ्यांनी जाब विचारला, यावेळी महिला आक्रमक झाल्याचे दिसून आले. पुण्यातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमात अचानक गोंधळ उडाला. बच्चू कडू यांच्या उपोषणावरून आंदोलनकर्ते आक्रमक झालेले दिसले.

बच्चू कडू नेमकं काय म्हणाले? 

खरं तर सरकारकडून या मागण्यांवर लवकर निर्णय होणं अपेक्षित होतं, मात्र दिवसेदिवस वेळ जात आहे. 90% कर्जमाफी बद्दल जे सरकार बोलत होतं, ते कधी पर्यंत करणार? मुख्यमंत्री म्हणतात बैठकी घ्या. मात्र त्यावर तोडगा नेमका काय हे ही सरकारनं सांगावे असेही बच्चू कडू म्हणाले. आंदोलनाचे पडसाद आता राज्यभर उमटू लागले आहे. पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे, असे समजतंय. मात्र कार्यकर्ते त्यात कुठेही कमी पडणार नाही. असेही बच्चू कडू म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज परत फोन आला, पण मला अजूनही लेखी पत्र मिळालेलं नाही. त्यामुळे मी असं ठरवलं की, 16 तारखेपासून मी अन्नत्याग सोबत पाणी सुद्धा पिणं बंद करणार. उद्या 15 तारखेला राज्यभरात चक्काजाम आंदोलन आहे की नाही, त्यावर मी दुपारी बैठक घेऊन निर्णय घेणार. नयना कडू यांचं कालच्या भाषणावर बच्चू कडू म्हणाले की, एक पत्नी म्हणून तो राग आहे. 

महत्वाच्या बातम्या:

बच्चू कडूंच्या आंदोलनाला जरांगे पाटलांची साथ, 15 जूनला राज्यभरात चक्काजाम आंदोलन 

आणखी वाचा



Source link