by Hansraj Agrawal | Jul 29, 2023 | Current Affairs
भारताच्या इतिहासात असंख्य राजे आणि सम्राटांची नावे नोंदलेली आहेत. अशा परिस्थितीत अनेक राजे त्यांच्या विचित्र छंदांसाठी प्रसिद्ध आहेत. मात्र, भारतातील राजेशाही संपून बराच काळ लोटला असला तरी आज आम्ही तुम्हाला उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्याच्या एका व्यक्तीच्या अशाच राजेशाही राहणीमानाची कहाणी सांगणार आहोत, जे ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. या व्यक्तीला राजा बनण्याची एवढी हौस होती की त्याने आपल्या वडिलोपार्जित घराचे रूपांतर वाड्यात केले. त्यावर एक-दोन नव्हे तर 14 मजली घर बांधले.
एवढ्या उंच इमारतीच्या बांधकामाची तक्रार आजूबाजूच्या लोकांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे केली असता, प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर घराचे बांधकाम थांबवण्यात आले. मिर्झापूर जिल्ह्यातील जमालपूर विकास गटातील श्रुतिहार गावातील रहिवासी असलेल्या सियाराम पटेल यांना राजांसारखे जीवन जगण्याची आवड निर्माण झाली होती. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सियाराम पटेल यांनी वडिलोपार्जित घर हवेलीसारखे बांधण्यास सुरुवात केली. सियाराम पटेल यांनी एकामागून एक 14 मजली घर बांधले.
सियारामने एक दोन नाही तर चार लग्न केली यातून त्यांना 6 अपत्य झाली. सध्या या घराला टाळ असून तिसऱ्या लग्नापासून झालेल्या मुलीला देखभालीचा भत्ता न दिल्याने एसडीएमच्या आदेशानंतर ही इमारत सील करण्यात आली आहे. सियाराम पटेल आता गाव सोडून सोनभद्र जिल्ह्यात राहत आहेत.
शासकीय परवानगी न घेता बांधलेल्या 14 मजली घरामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांमध्ये नेहमीच भीतीचे वातावरण असते. शेजारी रामेश्वर गोंड यांनी सांगितले की, सियाराम पटेल हे औषधाचे काम करतात. राजा प्रमाणे ओळख निर्माण करण्यासाठी त्यांनी 14 मजली इमारत तयार केली आहे.
तुमचा फोन चोरी झालाय? मग घर बसल्या असा करा ब्लॉक, कोणी चुकीचा वापर करू शकणार नाही
वादळ आले की गावातली लोक भयभीत होतात. या इमारतीच्या आजूबाजूचे लोक घर सोडून दूर जातात. संतोष कुमार यांनी सांगितले की, सियारामचे हे संपूर्ण घर एका साध्या मिस्त्रीने बांधले आहे, ज्याचा पायाही कमकुवत आहे. त्यामुळे मोठे वादळ आल्यास ही इमारत कोसळल्याची भीती असल्याने आसपासची लोक त्यांची घरे सोडून दुसरीकडे स्थलांतर होत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
by Hansraj Agrawal | Jul 29, 2023 | Current Affairs
मुंबई, 29 जुलै : थलैवा रजनीकांत हे भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांचं तुफान फॅन फॉलोईंग आहे. त्यांच्या अभिनयावर लाखो चाहते जीव ओवाळून टाकतात. एवढंच नाही तर त्यांना चाहते आदर्श देखील मानतात. आता रजनीकांत यांनी आपल्या आयुष्याविषयी केलेलं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. रजनीकांतचा आगामी चित्रपट ‘जेलर’ हा या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. हा अॅक्शन थ्रिलर चित्रपट 10 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपट रिलीज होण्यापूर्वी एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी सुपरस्टार रजनीकांतने शानदार एन्ट्री केली. यावेळी उपस्थित हजारो चाहत्यांनी जल्लोष करत त्यांचे जल्लोषात स्वागत केले. यादरम्यान सुपरस्टारने अनेक विषयांवर मत मांडलं. त्याचवेळी त्याने त्यांच्या आयुष्यातील दारूच्या व्यसनाबद्दलही खुलासा केला.
रजनीकांत यांनी आपल्या दारूच्या व्यसनाविषयी मोकळेपणानं भाष्य केलं. याविषयी बोलताना ‘दारू नसती तर समाजाची सेवा केली असती’ असं ते म्हणाले आहेत. याविषयी बोलताना ते पुढे म्हणाले की, ‘दारूचे व्यसन ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक आहे. मी असे म्हणत नाही की ते पूर्णपणे टाळा. मजा आली की दारू प्या. नियमित मद्यपान करू नका. हे आरोग्य आणि आनंद खराब करेल.’ असा सल्ला त्यांनी चाहत्यांना दिला आहे.
सेटवर झालेला ‘तो’ अपमान सहन करू शकल्या नाहीत शबाना आझमी; थेट घेतलेला अभिनय सोडण्याचा निर्णय
मात्र, रजनीकांत यांनी या वाईट व्यसनाबद्दल बोलण्याची ही पहिलीच वेळ नाही. जानेवारीमध्ये, चारुकेसी या तामिळ नाटकाच्या ५०व्या दिवसाच्या समारंभासाठी त्यांना विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते, तेव्हा अभिनेत्याने व्यसनाधीनतेबद्दल भाष्य करत त्या काळात त्यांना मदत केल्याबद्दल त्यांच्या पत्नीचे आभार मानले होते. त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं की, ‘मी माझी पत्नी लताची ओळख करून देत आहे. जेव्हा मी कंडक्टर होतो तेव्हा मी रोज दारू प्यायचो आणि मी रोज किती सिगारेट ओढले याचा हिशेब नाही. मी दिवसाची सुरुवात मांसाहाराने करायचो आणि दिवसातून दोनदा तरी मांसाहार करायचो. मला शाकाहारी लोकांचा तिरस्कार वाटायचा, पण हे तिघे एक घातक कॉम्बिनेशन आहेत.’ रजनीकांत म्हणाले की, माझ्या मते जे लोक या तिघांचे दीर्घकाळ सेवन करतात, ते ६० नंतर निरोगी आयुष्य जगू शकत नाहीत.’ असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं.
दुसरीकडे, रजनीकांतच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास, रजनीकांतने ‘जेलर’मध्ये मुथुवेल पांडियनची दमदार भूमिका साकारली आहे. या चित्रपटात तमन्ना भाटिया, शिवा राजकुमार, जॅकी श्रॉफ, मोहनलाल आणि योगी बाबू या कलाकारांचा समावेश आहे. नेल्सन दिलीप कुमार दिग्दर्शित आणि सन पिक्चर्सच्या कलानिथी मारन निर्मित, हा चित्रपट मनोरंजन करणारा ठरेल. याशिवाय मेगास्टारकडे ‘लाल सलाम’ हा चित्रपटही आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
by Hansraj Agrawal | Jul 29, 2023 | Current Affairs
अजित मांढरे, प्रतिनिधी
ठाणे, 29 जुलै : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ठाण्यामध्ये उत्तर भारतीयांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागच्या वर्षी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच ठाण्यात जाहीर कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमातून उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा साधला.
‘मी म्हणजे ठाणे असं काहींना वाटतं, पण नाही. ठाणे म्हणजे असली शिवसेना, कारण मार्केटमध्ये चायनीज मालही येतो. बनावट चायनिज बोगस गद्दारांना वाटतंय ते खरी शिवसेना आहेत. शिवसेनेपेक्षा कुणी वर जाऊ शकत नाही, तुम्हाला वाटत असेल तर इतके वर जाल की परत येऊ शकणार नाही. हा जोश पाहून काहींचा होश उडाला आहे. ज्या सरकारचा जन्मच खोक्यांमधून झाला ते काय न्याय देणार?’ अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
‘हॉलमधील गर्दी पाहून अनेकांना चक्कर येईल. जे प्रश्न विचारतील त्यांना तुम्ही उत्तर भारतीयच उत्तर देतील. कोरोना काळात मला जे करायचं आहे ते मी केलं. राज्यातील जनता मला परिवारातील एक सदस्य मानतात. माझ्या कुटुंबाचं संरक्षण मीच करणार, महाराष्ट्र माझा परिवार आहे,’ असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.
‘माझ्या गळ्यात पट्टा बांधणारा जन्माला आला नाही,’ असं प्रत्युत्तरही उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. काहीच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावरून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. आम्ही घेतलेल्या निर्णयानंतर अनेक जण घराबाहेर पडले, त्यांच्या गळ्यातील पट्टेही निघाले, असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
by Hansraj Agrawal | Jul 29, 2023 | Current Affairs
डिंपल कपाडिया आणि रीना रॉय यांनी आता खूप कमी चित्रपटात दिसतात, परंतु या दोघींची काही जुने किस्से अजूनही खूप प्रसिद्ध आहेत. असे म्हटले जाते की, 1993 मध्ये एक चित्रपट प्रदर्शित झाला होता जो एक फॅमिली ड्रामा होता. चित्रपटाचे दिग्दर्शन जे. ओम प्रकाश यांनी केले तर पद्मा रानी यांनी चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाच्या माध्यमातून रीना रॉयने पुन्हा बॉलिवूडमध्ये आपले पाय रोवण्याचा प्रयत्न केला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, डिंपल कपाडियामुळे रीनाला हा चित्रपट मिळाला.

जितेंद्र, गोविंदा, रीना रॉय आणि मीनाक्षी शेषाद्री यांचा ‘आदमी खिलौना है’ हा चित्रपट तुम्ही कधी पाहिला आहे का? जर नसेल तर तुम्ही त्याची गाणी नक्कीच ऐकली असतील. या चित्रपटाचे शीर्षक गीत आदमी खिलौना है” सध्या सोशल मीडियावर चांगलेच गाजते आहे. हा चित्रपट रीना रॉयचा कमबॅक चित्रपट होता. या चित्रपटाद्वारे, तिने स्वतःला पुन्हा बॉलीवूडशी जोडले आणि चित्रपटात जितेंद्रची पत्नी आणि गोविंदाची वहिनी बनून त्यांनी प्रेक्षकांचे मन जिंकलं. पण या चित्रपटासाठी रीना पहिली पसंती नव्हती.

IMDb वरील एका अहवालानुसार, 1993 मध्ये आलेल्या ‘आदमी खिलौना है’ चित्रपटाचे दिग्दर्शन जे. ओम प्रकाश यांना डिंपल कपाडियासोबत हा चित्रपट करायचा होता. डिंपल यांनी या चित्रपटासाठी होकार दिला होता, पण डिंपलच्या हाय डिमांड पुढे दिग्दर्शकाला देखील विचार करायला भाग पाडले. शेवटी ती या चित्रपटाचा भाग होऊ शकली नाही. रिपोर्ट्सनुसार, जेव्हा चित्रपटाच्या प्री-प्रॉडक्शनचे काम सुरू होते, तेव्हा अभिनेत्री रीना रॉय आपल्या पतीपासून घटस्फोट घेऊन पाकिस्तानातून परतली होती. आणि तिला पुन्हा चित्रपटात यायचे होते. दिग्दर्शक जे ओम प्रकाश यांनी पुन्हा एकदा रीनाला जितेंद्रसोबत काम करण्यास तयार केले.

एकदा जितेंद्र यांनी लहरें रेट्रोला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल सांगितले होते. त्यांनी सांगितले होते की, जेव्हा दिग्दर्शकाने रीनाला चित्रपटासाठी संपर्क केला तेव्हा त्यांनी उत्तर देण्यासाठी एक महिन्याचा वेळ मागितला होता. यानंतर त्या या चित्रपटाचा भाग बनू शकल्या. जे. ओमप्रकाश यांनी याआधी रीना रॉय-जितेंद्र यांच्यासोबत ‘अपनापन’, ‘आशा’ आणि ‘अर्पण’ सारख्या चित्रपटात काम केले होते. अशा स्थितीत रीना रॉय यांना पुन्हा संधी देऊन त्यांनी रीना रॉयचे करिअर पुन्हा रुळावर आणण्याचा प्रयत्न केला.

या चित्रपटात रीना रॉयने जितेंद्रची पत्नी, गोविंदाची वहिनी आणि मीनाक्षी शेषाद्रीची जाऊ म्हणून भूमिका साकारली होती. गोविंदाचा हा पहिला आणि शेवटचा चित्रपट होता, ज्यामध्ये तो जितेंद्रचा भाऊ बनला होता. दुसरीकडे, जितेंद्रसोबत रीनाचा हा शेवटचा चित्रपट होता, ज्यामध्ये त्या पत्नीच्या भूमिकेत दिसल्या होत्या.

रीना रॉय 90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री होत्या. मात्र, जेव्हा अभिनेत्री तिच्या करिअरच्या शिखरावर होती, तेव्हा तिने अभिनय सोडला आणि पाकिस्तानी क्रिकेटर मोहसिन खानशी लग्न केल्यानंतर पाकिस्तानला गेली. बॉलिवूडपासून दूर त्या कौटुंबिक जीवनात व्यस्त झाल्या. मात्र, जेव्हा त्यांचे लग्न मोडले तेव्हा त्या पुन्हा भारतात परतल्या आणि पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये परतण्याचे त्यांनी मन बनवले. असे म्हटले जाते की, ती भारतात परतली तोपर्यंत तिचे वजन खूप वाढले होते. अशा स्थितीत त्यांना काम करणं खूप अवघड झालं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
by Hansraj Agrawal | Jul 29, 2023 | Current Affairs
पंचकुला, 29 जुलै : आपला फोन चोरी झाल्यावर किंवा हरवल्यावर टेंशन येत. कोणी मोबाईलचा गैर वापर तर करणार नाही ना अशी भीती वाटू लागते. परंतु आता काळजी करण्याची गरज नाही. कारण आता भारत सरकारने फोन चोरीच्या रिपोर्टसाठी CEIR पोर्टल सुरू केले आहे.
CEIR पोर्टलचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही तुमचा मोबाईल तात्काळ ब्लॉक करू शकता जेणेकरून कोणीही फोनवरून तुमचा डेटा आणि वैयक्तिक माहितीचा गैरवापर करू शकणार नाही. याशिवाय सर्वसामान्य माणूस या पोर्टलवर घरबसल्या आपली तक्रार नोंदवू शकतो आणि त्याच्या तक्रारीची स्थितीही जाणून घेऊ शकतो.
अधिकाऱ्यांना दिली जाते ट्रेनिंग :
भारतीय दूरसंचार विभागाच्या अधिकाऱ्यांनी राज्यातील सायबर सेल आणि सीसीटीएनएस अधिकाऱ्यांसाठी राज्य गुन्हे शाखेच्या मुख्यालयात एक दिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती. या वेबपोर्टलवर मोबाईल चोरी किंवा हरवल्याची तक्रार कशी नोंदवता येईल आणि तपास यंत्रणा या पोर्टलचा वापर कसा करू शकेल. या संदर्भात प्रशिक्षण सत्र घेण्यात आले.
एक रहस्यमयी जंगल, जेथील झाडांचे लाकूड मानले जाते अशुभ
प्रत्येक जिल्ह्यात ‘CEIR डेस्क’ तयार करणार :
माहिती देताना पोलिस प्रवक्त्याने सांगितले की, जर तुम्हाला पोर्टलचा वापर कसा करायचा हे माहित नसेल, तर लवकरच मोबाइलशी संबंधित तक्रारींसाठी सीईआयआर डेस्क सुरू केला जाईल. जिथे पोलीस सामान्य जनतेच्या तक्रारी सोडवतील. डेस्कवर नियुक्त कर्मचारी पोर्टलवर आपोआप तक्रार नोंदवतील आणि कॉल मिळाल्यावर फोनच्या मालकाला कळवतील आणि पुढील कारवाई करतील.
सीईआयआर पोर्टलवर चोरीच्या फोनची तक्रार कशी करावी :
1. सर्वप्रथम, ज्या व्यक्तीचा मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला असेल, त्याला जवळच्या पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवावा लागेल.
2. तुमच्या दूरसंचार सेवा प्रदात्याकडून हरवलेल्या नंबरसाठी डुप्लिकेट सिम कार्ड मिळवा.
3. सीईआयआर तक्रार ऑनलाइन नोंदणी फॉर्मवर जाण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. https://ceir.gov.in/Request/CeirUserBlockRequestDirect.jsp
4. पोर्टलवर मोबाईल नंबर/IMEI क्रमांक भरून माहिती सबमिट करा.
5. संपर्क साधण्यासाठी मोबाईल नंबर आणि पत्ता प्रविष्ट करा.
6. असे केल्याने भविष्यात हँडसेटला कोणत्याही मोबाइल नेटवर्कमध्ये प्रवेश करण्यापासून अवरोधित करेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
by Hansraj Agrawal | Jul 29, 2023 | Current Affairs
मुंबई, 29 जुलै : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि गीतकार जावेद अख्तर यांची बायको शबाना आझमी आपल्या वक्तव्यांमुळे कायम चर्चेत राहतात. घटना सामाजिक असो वा बॉलिवूडशी निगडित असो, प्रत्येक गोष्टीवर आपलं परखड मत मांडायला त्या मागेपुढे पाहत नाहीत. सध्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातील भूमिकेमुळे शबाना आझमी चर्चेत आहेत. तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार जिंकलेल्या शबाना आझमींना आज बॉलिवूडमध्ये चांगलाच मान सन्मान आहे. पण एकेकाळी एका चित्रपटात ज्युनियर आर्टिस्टसमोर त्यांचा अपमान झाला तेव्हा शबाना आझमींनी करिअर बाबत मोठा निर्णय घेतला होता.
शबाना आझमीनी नुकतीच एक मुलाखत दिली आहे. त्यात त्यांनी ‘एकेकाळी अभिनयक्षेत्र सोडण्याचा विचार केला होता’ असा खुलासा केला आहे. 1977 मध्ये आलेल्या ‘परवरिश’ चित्रपटाच्या सेटवर घडलेल्या एका घटनेने शबाना आझमी एवढ्या दुःखी झाल्या की त्या कुठलाही पुढचा मागचा विचार न करता त्या रडत अनवाणी पायानेच आपल्या जुहूच्या घरी निघून गेल्या होत्या. आता 46 वर्षांनंतर त्यांनी या घटनेचा खुलासा केला आहे.
शबाना यांनी नुकतंच एका पॉडकास्टमध्ये सांगितलं की, त्यांना अभिनय चांगला येत असला तरी डान्स अजिबातच करता येत नव्हता. पर्वरीश या चित्रपटादरम्यान अभिनेत्रीला एक डान्स सीक्वेन्स शूट करायचा होता. तो शूट करताना त्या खूपच नर्व्हस होत्या कारण त्यांना नीतू सिंगसोबत डान्स करायचा होता जी डान्समध्ये खूप चांगली होती. खूपच दडपण येऊन अभिनेत्रीने प्रसिद्ध कोरिओग्राफर कमल मास्टरला शूटिंगपूर्वी तिची रिहर्सल घ्यायला सांगितली होती, मात्र कमल मास्टरने तिला ‘रिहर्सलची काही गरज नाही, कारण तुला फक्त टाळ्या वाजवायच्या आहेत.’ असं सांगितलं. पण त्यांनी कमलला डान्स स्टेप्स खूप अवघड असल्याचं सांगितलं आणि त्यात काही बदल करता येतील का असं विचारलं. त्यावेळी सेटवर अनेक ज्युनियर कलाकार उपस्थित होते.
Tejashree Pradhan : ‘किती वर्ष तुम्ही तेच दाखवणार…’ तेजश्रीच्या नव्या मालिकेचा प्रोमो पाहताच भडकले प्रेक्षक
कोरिओग्राफर शबानाला म्हणाला, ‘आता शबाना जी, कमल डान्स मास्टरला कुठल्या स्टेप्स करायच्या ते सांगणार.’ असं म्हणत त्यांनी सगळ्यांसमोर अभिनेत्रीचा अपमान केला. शबानाला तेव्हा एवढं वाईट वाटलं कि त्या आहे त्या कपड्यांमध्ये सेटच्या बाहेर आल्या. त्यांची गाडी तिथे हजर नव्हती. पण त्यांना त्या सेटवर क्षणभरही थांबण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे त्या मुंबईतील जुहू येथील आपल्या घराकडे तडक अनवाणी पायानेच चालत गेल्या. तेव्हा तो अपमान सहन न झाल्याने त्यांनी परत कधीच काम न करण्याचा निर्णय घेतला होता.
पण त्यानंतर ‘परवरिश’चे दिग्दर्शक मनमोहन देसाई आल्यावर त्यांनी शबाना आझमी यांना मिठी मारली आणि झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली. दुसऱ्या दिवशी नीतू सिंगने शबाना यांना घटनेबद्दल विचारले. त्यानंतर सुलक्षणा पंडित यांनी शबानाला, तू मुख्य अभिनेत्री असल्याने या चित्रपटासाठी कोरिओग्राफरपेक्षा जास्त महत्त्वाची आहेस.असं सांगून सेटवर पुन्हा परत आणलं.
करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात 72 वर्षीय शबाना आझमी झळकल्या आहेत. यात त्यांचा 87 वर्षीय धर्मेंद्रसोबतचा किस सीन चर्चेत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link