दिव्यांगांना 6000 रु मानधन, कर्जमाफीसाठी काय ठरलं?; बच्चू कडूंनी सांगितली सरकारसोबतची चर्चा

दिव्यांगांना 6000 रु मानधन, कर्जमाफीसाठी काय ठरलं?; बच्चू कडूंनी सांगितली सरकारसोबतची चर्चा


Bacchu Kadu :  प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू (Bacchu Kadu) यांचे गेल्या सहा दिवसापासून अमरावतीत अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी हे अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. आज आंदोलनस्थळी बच्चू कडू यांच्याशी चर्चा करण्यासाठी अमरावतीचे पालकमंत्री आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Minister Chandrashekhar Bawankule)  आले आहेत. बावनकुळे यांच्यासोबत नेमकी काय चर्चा झाली? याबाबतची माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे. 

बैठकीत नेमकी काय चर्चा झाली?

दिव्यांगांना 6 हजार रुपये मानधन संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत चर्चा झाल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे. यासंदर्भात पुरवणी काढण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे. कर्जमाफी संदर्भात दोन दिवसात कमिटी स्थापन करुन निर्णय घेतला जाईल अशी चर्चा मुख्यमंत्र्यांसोबत झाल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे. तर इतर 17 मागण्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत बैठक होईल असे कडू यांनी सांगितले. 

बच्चू कडू आंदोलन मागे घेणार का?

सध्या आम्ही उपोषण मागे घेणार नाही. उद्या आम्ही यावर चर्चा करु असे बच्चू कडू म्हणाले. पण चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी शेतकरी कर्जमाफी करु हे सांगितल्याचे बच्चू कडू म्हणाले. 
शेवटी कमिटी करावीच लागते हे मलाही माहीत आहे. आम्ही कर्जमाफी मागितली नसती पण तुरीचे भाव घसरलेत, सोयाबीनचे भाव घसरलेत, आम्हाला योग्य भाव मिळाला तर आम्हीच सरकारचं कर्ज फेडू असेही कडू म्हणाले. दोन मुद्दे महत्वाचे आहेत. दिव्यांगांना इतर राज्यांप्रमाणे 6 हजार द्यावे असे कडू म्हणाले. शेतकरी सावकाराकडे जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांला नवीन कर्ज मिळाला पाहिजे. मुख्यमंत्री साहेबांसोबत पण बोलणं झाल्याचे बच्चू कडू म्हणाले. आम्हाला वाटलं बावनकुळे साहेब लवकर येतील पण त्यांनी मला 6 दिवस उपाशी ठेवल्याचे बच्चू कडू म्हणाले. 

सगळं राष्ट्र दुःखात आहे, त्यामुळं बच्चू कडू यांनी उपोषण मागे घ्यावं, बावनकुळेंची विनंती

देशात खूप मोठी वाईट घटना काल घडली आहे. देशात हा पहिलाच इतका मोठा विमान अपघात घडल्याचे मत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे. सगळीकडे शोक व्यक्त होत आहे. अशा दुःखात बच्चू कडू यांनी उपोषण मागे घ्यावे.  शेवटी आपण निर्णय घ्यावा. सगळ्यांना आंदोलन करण्याचा अधिकार असल्याचे बावनकुळे म्हणाले. माझी विनंती आहे तुम्हाला शासनाची पण विनंती आहे. सगळं राष्ट्र दुःखात आहे, त्यामुळे आपण उपोषण मागे घ्यावे ही विनंती असे बावनकुळे म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

बच्चू कडूंच्या आंदोलनाला जरांगे पाटलांची साथ, 15 जूनला राज्यभरात चक्काजाम आंदोलन 

आणखी वाचा



Source link

होस्टेलवर विमान कोसळलं, पाचव्या मजल्यावर झोपलेली अकोल्याची ऐश्वर्या ब्लँकेट गुंडाळून धावली, आग-

होस्टेलवर विमान कोसळलं, पाचव्या मजल्यावर झोपलेली अकोल्याची ऐश्वर्या ब्लँकेट गुंडाळून धावली, आग-


Air India Plane Crash In Ahmedabad: गुजरातमधील एअर इंडिया विमान अपघातात (Air India Plane Crash In Ahmedabad) अकोल्याची ऐश्वर्या तोष्णीवाल थोडक्यात बचावली आहे. विमान कोसळलेल्या मेडिकल कॉलेजमध्ये ती द्वितीय वर्षाला शिकती आहे. पाचव्या मजल्यावरून धुरामधून वाट काढत स्वत:भोवती ब्लँकेट लपेटून तिने स्वतःचा जीव वाचवला आहे. ऐश्वर्या तोष्णीवाल अकोल्यातील दुर्गा चौक येथील रहिवाशी आहे. 

गुजरातमधील अहमदाबाद येथे बुधवारी झालेल्या भीषण विमान अपघातात अकोल्याची मुलगी ऐश्वर्या तोष्णीवाल थोडक्यात बचावली. अपघाताच्यावेळी ती होस्टेलच्या दुसऱ्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर झोपलेली होती. अचानक मोठा आवाज झाला आणि सर्वत्र धुराचे लोट पसरले. त्या परिस्थितीतही ऐश्वर्याने धीर न सोडता धुराच्या गर्दीतून वाट काढत स्वतःचा जीव वाचवला.

ऐश्वर्याने स्वतःला चादरीत लपेटलं अन्…

ऐश्वर्या गुजरात कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट मेडिकल कॉलेज, अहमदाबाद येथे डीएम अँकोपॅथोलॉजीच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. ती काल सकाळीच आपल्या आजोबांचा वाढदिवस साजरा करून अकोल्याहून अहमदाबादला परतली होती. झोपेत असताना ती अचानक मोठ्या आवाजाने जागी झाली. उठून पाहिलं तर सर्वत्र धुराच धूर होता. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येताच ऐश्वर्याने स्वतःला चादरीत लपेटलं आणि अंधार व धुराच्या गर्दीतून मार्ग शोधत पाचव्या मजल्यावरून खाली उतरून स्वतःचा जीव वाचवला. या दरम्यान ऐश्वर्या चेहऱ्यावर, हातावर आणि पायावर भाजल्याचे निशाण आले.

मुलीचा फोन येताच वडील हादरुन गेले-

घाबरलेल्या अवस्थेत ऐश्वर्याने लगेच आपल्या वडिलांना अमोल तोष्णीवाल यांना फोन केला. ते त्या वेळी अकोल्याच्या दुर्गा चौकात आपल्या साड्यांच्या दुकानात होते. मुलीचा फोन येताच ते हादरून गेले आणि दुकान बंद करून तात्काळ घरी गेले. अमोल तोष्णीवाल यांनी सांगितले, टीव्हीवर बातम्या पाहताच आमचं डोकंच सुन्न झालं. पण देवाच्या कृपेने आमची मुलगी एवढ्या मोठ्या अपघातातून बचावली.

आजी-आजोबा यांच्या डोळ्यांतही अश्रू तरळले-

आई माधुरी तोष्णीवाल आणि आजी-आजोबा यांच्या डोळ्यांतही अश्रू तरळले. आजोबा म्हणाले, पोती आमच्या वाढदिवसासाठी आली होती, पण अशा अपघाताला तिला सामोरे जावे लागले. देवाचे शंभर वेळा आभार की ती सुखरूप आहे. हादरलेल्या तोष्णीवाल कुटुंबीयांनी या दुर्घटनेत जखमी आणि मृत्यूमुखी पडलेल्यांप्रती आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत. ऐश्वर्या म्हणाली, माझ्या आयुष्यातला हा सर्वात भयावह अनुभव होता, जो मी कधीच विसरू शकणार नाही.

गुजरातमधील विमान अपघातात एकूण 265 जणांचा मृत्यू-

गुजरातमधील अहमदाबाद येथे काल (12 जून) झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातात 265 जणांचा मृत्यू झाला आहे. यात विमानातील 241 प्रवासी तर विमान ज्या भागात कोसळलं तिथल्या 24 जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रातील 10 जणांचा अहमदाबाद अपघातात मृत्यू झाला आहे. यात मुख्य वैमानिक सुमीत सभरवाल यांच्यासह दीपक पाठक, मैथिली पाटील, रोशनी सोनघरे, अपर्णा महाडिक, साईनीता चक्रवर्ती या क्रू मेंबर्सचा समावेश आहे. त्याशिवाय मयूर पाटील, यशा कामदार, आशा पवार, महादेव पवार या प्रवाशांचाही समावेश आहे. 

संबंधित बातमी:

Air India Plane Crash In Ahmedabad: दोन एअर होस्टेस, काका-काकी जळत होते; मी विमानातून सीटसह बाहेर फेकला गेलो, बचावलेल्या प्रवाशाने थरार सांगितला!

आणखी वाचा



Source link

धक्कातंत्र.. राज ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांच्या भेटीवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

धक्कातंत्र.. राज ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांच्या भेटीवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया


मुंबई : राज्यात एकीकडे ठाकरें बंधुच्या एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच आज राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अचानक भेट झाल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे मनोमिलन होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यामुळे शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरला होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडून राजकीय चक्रं फिरवून शिवसेना-मनसे युतीला ब्रेक लावला जाण्याची शक्यता दिसून येत आहे. कारण, मुंबईत आज (12 जून) सकाळी एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली आहे. आता, या भेटीवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. 

राज्यातले विविध पक्षांचे नेते काही मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांची भेट घेत असतात, महाराष्ट्राची अशी संस्कृती राहिली आहे. आम्हीही विरोधी पक्षात होतो तेव्हा सत्ताधारी पक्षातील नेत्यांना आपल्या कामासाठी भेटत होतो, असे म्हणत अजित पवार यांनी राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर अधिकचं बोलणं टाळलं. अजित पवार सध्या महायुतीतील प्रमुख राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय नेते आहेत. त्यामुळे, राज ठाकरे महायुतीत सोबत येणार का, याच अनुषंगाने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. त्यामुळे अजित पवारांना विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी अधिकचं बोलणं टाळलं.  

राज ठाकरेंना आजही आमची ऑफर – शिरसाट

राज ठाकरेंच्या भेटीला निश्चित राजकीय अर्थ असतात. मात्र, ते जेव्हा भेटतात तेव्हा काही सूचना देखील करतात. त्यामुळे, महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने आजच्या भेटीवर बोलणं, त्याचा अर्थ काढणं हे गैर आहे. जे काही होईल ते लवकरच आपल्याला समजेल, अशी प्रतिक्रिया मंत्री संजय शिरसाट यांनी दिली. तर, यापूर्वी देखील आम्ही राज ठाकरेंना ऑफर दिली होती, आजही आमची ऑफर आहे, असेही शिरसाट यांनी म्हटलं. 

भाव कितीही वाढवले तरी दारु पिणारे पितातच

दरम्यान, राज्यातील उत्पादन शुल्क विभागाकडून दारुच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. उत्पादन शुल्क विभागाने कर वाढवल्याने दारुचे भाव वाढले आहेत. त्यासंदर्भातील प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला होता. त्यावर, दारुचे भाव कितीही वाढवले तरी पिणारे दारू पितातच, अशी मिश्कील प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. 

बच्चू कडूंच्या आंदोलनावर चर्चा सुरू

बच्चू कडू यांच्या आंदोलनावरही अजित पवारांनी भाष्य केलं. कोणताही प्रश्न हा चर्चेने सुटतो, त्यांच्याशी चर्चा करायला राज्य सरकार तयार आहे. या संदर्भात सरकार आणि प्रशासन नियमित त्यांच्या संपर्कात आहे, असे ते म्हणाले. तसेच, योग्यवेळी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करू, असेही अजित पवारांनी म्हटले. तर, या देशात कायदा आणि संविधान आहे, अशा पद्धतीने कुणी कायदा हातात घेण्याची भाषा करू शकत नाही, असे म्हणत माजी खासदार राजू शेट्टी यांच्या वक्तव्यावरुन एकप्रकारे इशाराच दिला.

अजित पवार ऑन खत आणि बियाणे लिंकिंग 

खतं आणि बियाणे लिंकिंग करणाऱ्या दुकानदार आणि कंपन्यांना सरकार सोडणार नाही. शेतकऱ्यांना लुटू पाहणाऱ्यांवर सरकार कारवाई करेल, दुकानदारांवर परवाना निलंबनाची कारवाई केली जाईल, असा इशाराच अजित पवारांनी खतं दुकानदारांना दिला आहे.  

हेही वाचा

राज ठाकरे-फडणवीसांची भेट आटोपताच चक्रं फिरली, आता मनसेचा बडा नेता उदय सामंतांच्या भेटीला

आणखी वाचा



Source link

कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचं आंदोलन, सरकार कधी निर्णय घेणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य

कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचं आंदोलन, सरकार कधी निर्णय घेणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य


Ajit Pawar : कर्जफीसह विविध शेती प्रश्नावरुन प्रहारचे प्रमुख बच्चू कडू (Bacchu Kadu) यांचे अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस आहे. सरकार कर्जमाफी कधी करणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)  यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. योग्य वेळी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करु असे मत अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे. कोणताही प्रश्न हा चर्चेने सुटतो. त्यांच्याशी चर्चा करायला राज्य सरकार तयार आहे. या संदर्भात सरकार आणि प्रशासन नियमित त्यांच्या संपर्कात असल्याचे अजित पवार म्हणाले. 

खत आणि बियाणे लिंकिंग करणाऱ्या दुकानदार आणि कंपन्यांना सरकार सोडणार नाही असेही अजित पवार म्हणाले. शेतकऱ्यांना लुटू पाहणाऱ्यांवर सरकार कारवाई करेल. दुकानदारांवर परवाना निलंबनाची कारवाई केली जाईल असेही अजित पवार म्हणाले. सरकार लाडक्या बहिणींना नियमित 1500 रुपये देण्यासाठी तत्पर असल्याचे अजित पवार म्हणाले. तसेच योग्य वेळी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करु असेही ते म्हणाले. 

आम्हीही विरोधी पक्षात होतो तेव्हा सत्ताधारी पक्षातील नेत्यांना कामासाठी भेटत होतो

राज्यातले विविध पक्षांचे नेते मुख्यमंत्र्यांना काही मुद्द्यांवर भेटत असतात. महाराष्ट्राची अशी संस्कृती राहिली आहे. आम्हीही विरोधी पक्षात होतो तेव्हा सत्ताधारी पक्षातील नेत्यांना आपल्या कामासाठी भेटत होतो असे अजित पवार म्हणाले. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात आज तासभर चर्चा झाली आहे. यावर बोलताना अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीवर देखील अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. सहकार क्षेत्रातल्या निवडणुका या पक्षाच्या चिन्ह आणि नावावर होत नाहीत. याआधीही अशा निवडणुकांमध्ये अनेक वेगळ्या विचारांचे लोक एकत्र येऊन निवडणूक लढले आहेत असे अजित पवार म्हणाले. दारुचे भाव कितीही वाढवले तरी पिणारे दारु पितातच असेही अजित पवार म्हणाले. 

कर्जमाफीसह विविध शेती प्रश्नांच्या मुद्यावरुन प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू (Bacchu Kadu) यांचे अन्नत्याग उपोषण सुरु आहे. आज या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. दरम्यान, आज बच्चू कडू  यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  यांच्यासोबत ऑनलाईन बैठक होणार आहे. पण ऑनलाईन बैठकीमध्ये कर्जमाफीची तारीख केव्हा देणार? हे सांगितल्यावरच आंदोलन मागे घेऊ असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं आहे. 

महत्वाच्या बातम्या:

बच्चू कडूंची आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, कर्जमाफीची तारीख दिल्यावरच आंदोलन मागे घेणार, कडू मागण्यांवर ठाम

आणखी वाचा



Source link

बच्चू कडूंची आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, कर्जमाफीची तारीख दिल्यावरच आंदोलन मागे घेणार

बच्चू कडूंची आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, कर्जमाफीची तारीख दिल्यावरच आंदोलन मागे घेणार


Bacchu Kadu : कर्जमाफीसह विविध शेती प्रश्नांच्या मुद्यावरुन प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू (Bacchu Kadu) यांचे अन्नत्याग उपोषण सुरु आहे. आज या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. दरम्यान, आज बच्चू कडू यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  यांच्यासोबत ऑनलाईन बैठक होणार आहे. पण ऑनलाईन बैठकीमध्ये कर्जमाफीची तारीख केव्हा देणार? हे सांगितल्यावरच आंदोलन मागे घेऊ असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत ऑनलाईन बैठक होणार आहे. या बैठकीत कर्जमाफीची तारीख केव्हा देणार हे सांगितल्यावरच आंदोलन मागे घेऊ असे बच्चू कडू म्हणाले. आंदोलन करत असताना कार्यकर्त्यांनी स्वतःला इजा होऊ देऊ नये असे आवाहन कडू यांनी केले. बच्चू कडू यांची प्रकृती पूर्णपणे खालावली आहे.  बच्चू कडू यांना उठून बसण्यासाठी त्रास होत आहे. सकाळी बच्चू कडू यांच्या उलट्या देखील झाल्या आहेत. गेल्या पाच दिवसापासून जेवण न केल्याने बच्चू कडू यांचे वजन चार किलोपेक्षा जास्त घटलं आहे. 

परभणीत प्रहारच्या पदाधिकाऱ्यांकडून मुंडण आंदोलन 

शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफी सह इतर मागण्यांसाठी उपोषणाला बसलेले प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांच्या आंदोलनाची सरकारकडून दखल न घेण्यात आल्याने आता राज्यातील इतर ठिकाणी पदाधिकारी आक्रमक झाल्याचा पाहायला मिळत आहे. परभणी मधील प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारच्या निषेधार्थ मुंडन आंदोलन केले आहे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत मुंडन करून सरकारचा निषेध केलाय. निवडणुकीत शेतकऱ्यांना कर्जमाफीच आश्वासन देऊन त्यांनी त्याची पूर्तता न केल्याने बच्चू कडू हे आंदोलन करत आहेत. जर सरकारने त्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन कर्जमाफी जाहीर केली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. 

नेमक्या काय आहेत मागण्या?

1. दिव्यांग व विधवा महिलांना रु 6000/- मानधन देण्यात यावे.
2. आपल्या संकल्पानूसार शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी देण्यात यावी शेतमालाला MSP (हमीभाव) वर 20 टक्के अनुदान देण्यात यावे.
3. दि.07 एप्रिल 2025 रोजी आपल्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीच्या ईतिवृत्तप्रमाणे शासन निर्णय काढण्यात यावे.
4. युवकांच्या हाताला काम द्यावे नाहीतर सन्मानजनक दाम देण्यात यावे तसेच रिक्त जागा तातडीने भरण्यात याव्यात व जास्त पदसंख्यांच्या जाहिराती प्रसिध्द करण्यात याव्या.
5. शहराप्रमाणे ग्रामिण भागातील घरकुलांकरीता समान निकष लावून किमान रू 5 लाख अनुदान घरकुल लाभार्थ्यांना देण्यात यावे.
6. शेतकऱ्यांप्रमाणे शेतमजूरांच्या अपघाती मृत्यु झाल्यास आर्थीक सहाय्य देण्यात यावे तसेच शेतमजूरांकरीता स्वतंत्र मंडळ स्थापन करण्यात यावे.
7. पेरणी ते कापणी पर्यंत मजूरीची सर्व कामे MSP मध्ये घेण्यात यावे तसेच फळपिकांना 3:5 रेषो लावून दुग्ध व्यवसायसूध्दा MSP ला जोडण्यात यावा. हे जर होत नसेल तर तेलंगाणाच्या धर्तीवर एकरी 10,000/- मदत किंवा भावाचा चढ उतार निधी देण्यात यावा.
8. ज्याप्रमाणे रासायनिक खाताला अनुदान देण्यात येते त्याच प्रमाणे शेणखताला / सेंद्रीयखताला अनुदान देण्यात यावे.
9. मेंढपाळ व मच्छीमार यांच्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करून त्यांचे प्रश्न मार्गी लावावे.
10. मनरेगा मधील मजूरी रू 312/- वरून रु.500/- करण्यात यावी.
11. निवासी अतिक्रमण नियमाकुल करण्यात यावे.
12. दुधातील भेसळ रोखण्यात यावी तसेच गायींच्या दुधासाठी बेस रेट रु.50/- प्रती लिटर व म्हशीच्या दुधासाठी बेस रेट रू 60/- प्रती लिटर मिळावा. i
13. कांद्याचे दर स्थिर राहावेत यासाठी किमान 40/- रूपये बाजार भाव होई पर्यत निर्यात बंदीचा निर्णय करू नये.
14. सन 2025-26 या वर्षासाठी ऊस पिकाला प्रति टन 4300/- रूपये दर 1 टक्के रिकव्हरी बेस रेट धरुन मिळावा. तसेच पुढील 11 टक्के सिकव्हरीसाठी 430/- रूपये एफआरपी दर मिळ वेत. तसेच प्रत्येक शेतकऱ्याला काटा करून रिकव्हरी काढण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात यावी व 15 दिवसामध्ये पैसे दिले नाही तर व्याजासह पैसे वसूल करण्याचे अधिकार स्थानिक यंत्रणेला देण्यात यावेत.

महत्वाच्या बातम्या:

बच्चू कडूंच्या आंदोलनाची ठिणगी महाराष्ट्रभर पडली पाहिजे, निलेश लंकेंचा हल्लाबोल, रास्ता रोको आंदोलन करण्याचं आवाहन

आणखी वाचा



Source link

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताफ्यातील रुग्णवाहिकेचा अपघात; ॲम्बुलन्स थार गाडीला जाऊन धडकली

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताफ्यातील रुग्णवाहिकेचा अपघात; ॲम्बुलन्स थार गाडीला जाऊन धडकली


Akola News: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे आज अकोला (Akola) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. अजित पवार आज साडे नऊ वाजता अकोल्यात दाखल झाले आहे. यावेळी त्यांचे शिवणी विमानतळावर स्वागत करण्यात आले. अकोला आणि वाशिम जिल्ह्याची आढावा बैठकीसाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यासाठी अजित पवार अकोला अकोल्यात आले आहे.

अशातच, अकोला शिवनी विमानतळाकडून अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात येत असताना ताफ्याच्या पाठीमागे असलेल्या ॲम्बुलन्सचा अपघात (Accident)  झाल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांच्या ताफ्याच्या पाठीमागे असलेल्या ॲम्बुलन्स वाहनाचा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.  अकोला विमानतळावरुन  राष्ट्रीय महार्गावर येत असताना या ताफ्यातील ॲम्बुलन्सचा अपघात झालाय. तर अजित पवारांच्या ताफ्यातील थार गाडीला धडक लागल्यामूळ अपघात झाल्याचे बोलल्या जात आहे. मात्र सुदैवाने या अपघातात कुठलेही जीवितहानी झाली नाहीये. 

काँग्रेसचे माजी महापौर मदन भरगडसह इतर पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश 

दरम्यान, नुकताच अजित पवारांचा ताफा अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाला आहे. या बैठकीला राज्यमंत्री इंद्रनील नाईक आणि आमदार अमोल मिटकरीसह अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील आमदार बैठकीसाठी उपस्थित आहेत. अजित पवार थोड्याच वेळात अकोला आणि वाशिम जिल्ह्याची आढावा बैठक घेणार आहेत. त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींच्या घरी जाऊन देखील ते भेट घेणार आहेत. त्यानंतर कार्यकर्ता संवाद मेळाव्याला अजित पवार उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेस नेते आणि माजी महापौर मदन भरगड आज राष्ट्रवादीत पक्षात प्रवेश करणार आहेत. या मेळाव्यात काँग्रेसचे माजी महापौर मदन भरगडसह इतर पदाधिकाऱ्यांचा देखील  राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे.

निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना नवा कानमंत्र?

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज अकोला आणि बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील अनेक काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत या सोबतच अजित पवार हे खामगाव येथे बुलढाणा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा संवाद मिळावा सुद्धा घेत आहे. अजित पवारांच्या या मेळाव्याला राज्याचे राष्ट्रवादीचे अनेक मंत्री व नेतेही उपस्थित राहणार आहेत आजच्या मेळाव्यात अजित पवार हे आगामी महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना काय मंत्र देतात हे बघणं महत्त्वाचं असेल 

इतर महत्वाच्या बातम्या 

 

आणखी वाचा



Source link