बच्चू कडूंच्या आंदोलनाची ठिणगी महाराष्ट्रभर पडली पाहिजे, निलेश लंकेंचा हल्लाबोल

बच्चू कडूंच्या आंदोलनाची ठिणगी महाराष्ट्रभर पडली पाहिजे, निलेश लंकेंचा हल्लाबोल

Nilesh Lanke : शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी अमरावतीमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरु केलं आहे. या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी या आंदोलनस्थळी भेट देऊन बच्चू कडू यांच्या तब्बेतीचे विचारपूस केली. तसेच त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. सरकारने बच्चू भाऊच्या आंदोलनाची दखल घेतली पाहिजे. हे जाड कातड्याचे गेंड्याचे सरकार आहे. त्याला काही फरक पडत नाही अशी टीका लंके यांनी केली आहे. या आंदोलनाची ठिणगी महाराष्ट्र भर पडली पाहिजे. रास्ता रोको आंदोलन झाले पाहीजेत असेही लंके म्हणाले.

अभी नही तो कभी नही,  बच्चू भाऊंची महाराष्ट्रला गरज

प्रत्येकाने आपापल्या भागात आंदोलन केले पाहिजे. प्रत्येक दिवशी वेगवेगळे आंदोलन केले पाहिजे असे निलेश लंके म्हणाले. अभी नही तो कभी नही. बच्चू भाऊ समोर जर सरकार झुकल नाही तर कोणाच समोर झुकणार नाही असेही लंके यावेळी म्हणाले. बच्चू भाऊंची महाराष्ट्रला गरज आहे असेही निलेश लंके म्हणाले.

बच्चू कडू यांच्या आंदोलनातील मागण्या काय?

1. दिव्यांग व विधवा महिलांना रु 6000/- मानधन देण्यात यावे.
2. आपल्या संकल्पानूसार शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी देण्यात यावी शेतमालाला MSP (हमीभाव) वर 20 टक्के अनुदान देण्यात यावे.
3. दि.07 एप्रिल 2025 रोजी आपल्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीच्या ईतिवृत्तप्रमाणे शासन निर्णय काढण्यात यावे.
4. युवकांच्या हाताला काम द्यावे नाहीतर सन्मानजनक दाम देण्यात यावे तसेच रिक्त जागा तातडीने भरण्यात याव्यात व जास्त पदसंख्यांच्या जाहिराती प्रसिध्द करण्यात याव्या.
5. शहराप्रमाणे ग्रामिण भागातील घरकुलांकरीता समान निकष लावून किमान रू 5 लाख अनुदान घरकुल लाभार्थ्यांना देण्यात यावे.
6. शेतकऱ्यांप्रमाणे शेतमजूरांच्या अपघाती मृत्यु झाल्यास आर्थीक सहाय्य देण्यात यावे तसेच शेतमजूरांकरीता स्वतंत्र मंडळ स्थापन करण्यात यावे.
7. पेरणी ते कापणी पर्यंत मजूरीची सर्व कामे MSP मध्ये घेण्यात यावे तसेच फळपिकांना 3:5 रेषो लावून दुग्ध व्यवसायसूध्दा MSP ला जोडण्यात यावा. हे जर होत नसेल तर तेलंगाणाच्या धर्तीवर एकरी 10,000/- मदत किंवा भावाचा चढ उतार निधी देण्यात यावा.
8. ज्याप्रमाणे रासायनिक खाताला अनुदान देण्यात येते त्याच प्रमाणे शेणखताला / सेंद्रीयखताला अनुदान देण्यात यावे.
9. मेंढपाळ व मच्छीमार यांच्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करून त्यांचे प्रश्न मार्गी लावावे.
10. मनरेगा मधील मजूरी रू 312/- वरून रु.500/- करण्यात यावी.
11. निवासी अतिक्रमण नियमाकुल करण्यात यावे.
12. दुधातील भेसळ रोखण्यात यावी तसेच गायींच्या दुधासाठी बेस रेट रु.50/- प्रती लिटर व म्हशीच्या दुधासाठी बेस रेट रू 60/- प्रती लिटर मिळावा. i
13. कांद्याचे दर स्थिर राहावेत यासाठी किमान 40/- रूपये बाजार भाव होई पर्यत निर्यात बंदीचा निर्णय करू नये.
14. सन 2025-26 या वर्षासाठी ऊस पिकाला प्रति टन 4300/- रूपये दर 1 टक्के रिकव्हरी बेस रेट धरुन मिळावा. तसेच पुढील 11 टक्के सिकव्हरीसाठी 430/- रूपये एफआरपी दर मिळ वेत. तसेच प्रत्येक शेतकऱ्याला काटा करून रिकव्हरी काढण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात यावी व 15 दिवसामध्ये पैसे दिले नाही तर व्याजासह पैसे वसूल करण्याचे अधिकार स्थानिक यंत्रणेला देण्यात यावेत.

महत्वाच्या बातम्या:

…तर रस्त्यावर उतरावं लागेल, शेतकरी कर्जमाफी होत नाही तोपर्यंत रस्ते बंद करा, मनोज जरांगेंचा इशारा, बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा

आणखी वाचा

Source link

आधी लोकसभा उमेदवाराने साथ सोडली, आता विधानसभा उमेदवाराचा जय महाराष्ट्र; ठाकरेंना ‘दे धक्का’

आधी लोकसभा उमेदवाराने साथ सोडली, आता विधानसभा उमेदवाराचा जय महाराष्ट्र; ठाकरेंना ‘दे धक्का’

अमरावती : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या (Election) अनुषंगाने राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. एकीकडे महायुतीमध्ये इनकमिंग सुरू असताना दुसरीकडे महाविकास आघाडीतील नेतेमंडळी पक्ष सोडून जाताना दिसत आहे. शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत असून लोकसभा उमेदवाराने साथ सोडल्यानंतर आता विधानसभा उमेदवारानेही ठाकरेंना जय महाराष्ट्र केला आहे. उद्धव ठाकरे यांना अमरावतीत पुन्हा एकदा राजकीय धक्का देण्यात आली असून शिवसेना उबाठाला अमरावतीत (Amravati) मोठी खिंडार पडली आहे. शिवसेना (Shivsena) माजी जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

अमरावती जिल्ह्यातील बडनेरा विधानसभा मतदारसंघात रवी राणा यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या सुनील खराटे यांनी मविआची साथ सोडत ठाकरेंना जय महाराष्ट्र केला. विधानसभा निवडणुकीत दारुन पराभव झाल्यानंतर सुनील खराटे यांनी आज भाजपचे कमळ हाती घेतलं. खराटे यांच्या भाजप प्रवेशामुळे अमरावती जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठी खिंडार पडली आहे. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी आज मुंबई येथे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. शेकडो कार्यकर्त्यांसह खराटे यांनी भाजपचे कमळ हाती घेतले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत याचा फटका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला बसू शकतो.

खराटेंना विधानसभेला केवळ 7121 मतं

दरम्यान, बडनेरा विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार रवी राणा हे मोठ्या मताधिक्याने आमदार म्हणून विजयी झाले आहेत. त्यांच्याविरोधात प्रीती बंड आणि शिवसेना महाविकास आघाडीचे सुनील खराटे यांनी निवडणूक लढवली होती. त्यामध्ये, प्रीती बंड यांना 60,836 मतं मिळाली तर सुनील खराटे यांना केवळ 7121 मतं मिळाली आहेत. त्याच, खराटे यांनी आज भाजपात प्रवेश केला.

चंद्रहार पाटलांचाही शिवसेनेत प्रवेश

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत सांगली मतदारसंघातून निवडणूक लढलेल्या आणि निवडणुकांपूर्वी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलेल्या चंद्रहार पाटील यांनीही उद्धव ठाकरेंची साथ सोडली. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. क्रीडा क्षेत्रातील काही प्रश्न आणि खेळाडूंच्या मागण्यांसाठी आपण सरकारसोबत जात असल्याचं यावेळी त्यांनी म्हटलं.

हेही वाचा

पेरण्यांची घाई नको, 15 जून नंतरच मोसमी पाऊस; मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा, कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन

आणखी वाचा

Source link

Pravin Tayade : बच्चू कडू दर 2 तासांनी व्हॅनिटी व्हॅनमध्ये बसतात,शेतकऱ्यांनी काय अपेक्षा कराव्या

Pravin Tayade : बच्चू कडू दर 2 तासांनी व्हॅनिटी व्हॅनमध्ये बसतात,शेतकऱ्यांनी काय अपेक्षा कराव्या

अचलपूर मतदार संघातुन विधानसभेत बच्चू कडूचा पराभव करणारे भाजपचे आमदार प्रवीण तायडेची बच्चू कडूच्या उपोषणावर सडकून टिका

सोफिया प्रकल्पाच्या विरोधात आजचे आंदोलनकर्ते तेव्हा देखील सक्रिय होते… मात्र तेव्हा अशी कोणती देवाण-घेवाण झाली जे तुम्हाला आंदोलन स्थगित करावे लागले? असा सवाल उपस्थित केला

आता देखील आंदोलन करीत असताना व्हॅनिटी व्हॅनवर शंका उपस्थित करत प्रवीण तायडे यांनी आरोप केला की, बच्चू कडू हे दर दोन तासांनी व्हॅनिटी व्हॅन मध्ये जाऊन बसतात, शेतकऱ्यांनी यांच्याकडून काय अपेक्षा कराव्या?

मी सुद्धा शेतकरी आहे शेतकऱ्यांचा कुठलाही प्रश्न असो तो आमच्यासाठी जिव्हाळ्याचा आहे, मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या संदर्भात निश्चितच धोरण आखतील याचा मला विश्वास आहे…

राष्ट्रसंतांच्या समाधी जवळ उपोषण सुरू आहे मात्र उपोषणकर्ते हे महिलांबद्दल अभद्र भाषेत भाषण करताना दिसले…

बच्चू कडू हे 20 वर्ष सभागृहात राहिले त्यामुळे आता त्यांना बाहेर करमत नाहीये…

मोझरीला आंदोलन करण्यामागे काही कारण आहेत, नॅशनल हायवे असल्यामुळे चक्का जाम करता येतो, ते स्वतःचा पेंडॉल देखील जाळू शकतात, उग्र स्वरूपाच्या आंदोलनाचा तोच एक प्रकार त्यांच्याजवळ आहे…*

ते भाषणात नेहमी म्हणतात आम्हाला काही गरज नाही आमदारकीची, आम्ही रस्त्यावर उतरून लढाई करू, मग आता त्यांना शिक्षक मतदार संघ लढायची इतकी घाई का होत आहे ?…

कधीकाळी तेच शिक्षकांना शिव्या देत होते, राज्यात जो  शिक्षक भरती घोटाळा झाला आहे तो त्यांच्याच राज्यमंत्री पदाच्या काळात झाला आहे त्यांनी आधी या सर्वांची उत्तरं द्यावी…

Source link

जालिंदर सुपेकर यांच्या कारागृह महानिरीक्षक पदाच्या कार्यकाळातील अनेक बदल्या संशयाच्या भोवऱ्यात!

जालिंदर सुपेकर यांच्या कारागृह महानिरीक्षक पदाच्या कार्यकाळातील अनेक बदल्या संशयाच्या भोवऱ्यात!

Pune crime news: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे चर्चेत आलेले वरिष्ठ पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर (Jalindar Supekar) यांच्या काळ्या कारनाम्यांचे किस्से आता बाहेर येत आहेत. अशातच आता जालिंदर सुपेकर यांच्या कारागृह महानिरीक्षक पदाच्या कार्यकाळातील अनेक बदल्या संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या आहे. सोबतच या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आधी तुरुंग अधिकारी, वरिष्ठ तुरुंगाधिकारी, वरिष्ठ लिपिक कार्यालयीन अधीक्षक आणि तांत्रिक कर्मचारी या पदांवरील बदल्यांचे अधिकार विभागीय कारागृह उपमहानिरीक्षकांना होते. मात्र सुपेकरांनी विभागीय उपमहानिरिक्षकांचे हे अधिकार काढत ते स्वतःकडे घेतले. त्यानंतर 2023 या एकाच वर्षात 14 वेळा विविध बदल्यांचे आदेश निघाले असल्याचे बोललं जात आहे.

दरम्यान, सुपेकर यांच्या कार्यकाळात एकूण जवळपास 450 बदल्या झाल्याची माहिती समोर आली आहे. या बदल्यांमध्ये तुरुंग अधिकारी, वरिष्ठ तुरुंगाधिकारी, वरिष्ठ लिपिक कार्यालयीन अधीक्षक आणि तांत्रिक कर्मचारी या पदांवरील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यातील 205 बदल्यांमध्ये संशयास्पद आर्थिक देवाण-घेवाण झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यासाठी सुपेकर एकाच विभागात कार्यरत राहण्याची आधीची 10 वर्षाची मुदत घटवत ती  6 वर्षांवर आणली असल्याचे ही बोललं जात आहे. या कार्यरत काळाची मुदत घटवल्यामुळे मोठ्या प्रमाणात बदल्यांचे व्यवहार झाला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

भाजप आमदार सुरेश धस यांनीही केले होते गंभीर आरोप

काही दिवसापूर्वी भाजप आमदार सुरेश धस यांनी ही  जालिंदर सुपेकर (Jalindar Supekar) यांच्यावर गंभीर आरोप केले होते.  जालिंदर सुपेकर  यांनी तुरुंगातील कैद्यांकडून 300 कोटी रुपये मागितल्याचा आरोप त्यांनी केला होता. यानंतर दुसऱ्याच दिवशी पुण्यातील एका सावकाराच्या वकिलांनी जालिंदर सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप केलेत. जालिंदर सुपेकर हे विशेष महानिरीक्षक (कारागृह) (Special IG Prisons) या पदावर कार्यरत होते. या काळात त्यांनी अमरावती येथील कारागृहात असणाऱ्या नानासाहेब गायकवाड आणि त्यांचा मुलगा गणेश गायकवाड यांच्याकडून जामीन मिळवून देण्याच्या मोबदल्यात 550 कोटी रुपये मागितल्याचा आरोप ॲडव्होकेट निवृत्ती कराड यांनी केला आहे. यासंदर्भात आपण नागपूर खंडपीठात याचिका दाखल केल्याचेही त्यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना सांगितले.

जालिंदर सुपेकरांची बदली, डिमोशनही झालं

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाशी संबंध आढळून आल्यानंतर गृह विभागाने जालिंदर सुपेकर यांच्यावर कारवाई केली होती. जालिंदर सुपेकर हे सध्या विशेष पोलीस महानिरिक्षक कारागृह व सुधार सेवा या पदावर कार्यरत होते. आता तिथुन त्यांची बदली पदावनती करुन उप महासमादेशक होमगार्ड या पदावर पाठवण्यात आले होते.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Source link

भक्ती, अध्यात्म, पांडुरंगाच्या भेटीची ओढ अन् फुललेल्या निसर्गाचा अनोखा संगम; गजानन महाराजांच्या पालखी पातूर घाटात, PHOTO

भक्ती, अध्यात्म, पांडुरंगाच्या भेटीची ओढ अन् फुललेल्या निसर्गाचा अनोखा संगम; गजानन महाराजांच्या पालखी पातूर घाटात, PHOTO

Shegaon Gajanan Maharaj Palkhi: भक्ती, अध्यात्म, पांडुरंगाच्या भेटीची ओढ अन् फुललेल्या निसर्गाचा अनोखा संगम; गजानन महाराजांच्या पालखी पातूर घाटात, PHOTO

Source link

… तर आषाढी एकादशीपर्यंतही बहीण-भाऊ एकत्र येऊ शकतात, अमोल मिटकरींचा गौप्यस्फोट

… तर आषाढी एकादशीपर्यंतही बहीण-भाऊ एकत्र येऊ शकतात, अमोल मिटकरींचा गौप्यस्फोट

अकोला : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपूर्वी अजित पवार (Ajit pawar) आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा जोर धरत होती. या चर्चेनंतर आता ठाकरे बंधु एकत्र येणार असल्याची चर्चा जोर धरत असून दोन्ही नेत्यांची वक्तव्ये चर्चेत आहेत. महाराष्ट्राच्या मनात जे आहे, तेच होईल, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले. तर, मी मातोश्रीवर चाललोय, असे गुगली राज ठाकरेंनी टाकल्याचं पाहायला मिळालं. या दोन्ही नेत्यांच्या एकीचे चर्चा सुरू असतानाचा राष्ट्रवादीचे आमदार आणि प्रवक्ते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी मोठा गौप्यस्फोटच केलाय. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी देखील दोन राष्ट्रवादी (NCP) एकत्र येण्याच्या चर्चेवर भाष्य करताना, तो निर्णय सुप्रिया सुळे घेतील, असे म्हटले होते. तर, सध्या देश महत्त्वाचा आहे, एकत्र येण्याचं पुन्हा ठरवू असे म्हणत युद्धजन्य परिस्थीताचा संदर्भ सुप्रिया सुळेंनी दिला होता.

राज्यात ठाकरे बंधुंच्या एकत्र येण्याची जोरदार चर्चा सुरू असून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा जरा मागे पडली आहे. मात्र, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येण्यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. पांडुरंगाची ईच्छा असली तर बहीण-भाऊ आषाढी एकादशीपर्यंतही एकत्र येऊ शकतात, असा गौप्यस्फोटच मिटकरी यांनी केला आहे. 10 तारखेला पक्षाच्या मेळाव्यापर्यंत वाट बघा, मेळाव्यात मोठे संकेत मिळण्याचे सुतोवाच मिटकरींनी केले आहेत.

शिवसेना उद्धव ठाकरे आणि मनसेचे राज ठाकरे एकत्र येण्यावरही मिटकरींनी आपलं मत मांडलं. दोन्ही भाऊ एकत्र येणं महाराष्ट्र आणि मराठी माणसांसाठी सुचिन्ह आहे. दोन्ही ठाकरे एकत्र आल्यास मराठी माणसांची ताकद वाढणार आहे, त्यांच्या एकत्र येण्याचा महायुतीवर कोणताच परिणाम होणार नसल्याचा दावा देखील त्यांनी केला. तर, दोघे भाऊ एकत्र यावा हा त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. जर दोघे भाऊ एकत्रित येत असतील तर त्यांच्या निर्णयाला आमच्या शुभेच्छा, असेही मिटकरींनी म्हटलं.

ठाकरे एकत्र आल्यास मुंबईत परिणाम होऊ शकतो

कुणालाही कमजोर समजू नये, दोघे  भाऊ एकत्र आल्यास निश्चितच मराठी माणसाची ताकद वाढणार आहे. निश्चितच एकत्र आल्यावर राजकीय समीकरणे बदलणार, अर्थातच परिणाम होणार आहे. दोघे भाऊ एकत्र येत असल्यास त्यांच्या, आणि मराठी माणसाच्या, मुंबईच्या दृष्टीने राजकीय समीकरणांवर परिणाम होऊ शकतो. मात्र, त्यांच्या एकत्र येण्याने महायुतीवर काही परिणाम होईल, असं वाटत नाही. कारण, महायुती म्हणून आम्ही भक्कम आहोत, असे अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. दरम्यान, महायुतीमधील भाजप नेत्यांकडून ठाकरे बंधुंच्या एकीचा मुंबई महापालिका निवडणुकीवर देखील काहीही परिणाम होणार नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे, मिटकरी आणि भाजप नेत्यांच्या वक्तव्यात तफावत दिसून येते.

हेही वाचा

उद्योजकाच्या मुलास भरधाव कारचालकाची आधी धडक, पुन्हा मारहाण; दारूच्या नशेतील चौघांविरुद्ध गुन्हा

आणखी वाचा

Source link