Akola DPDC Meeting Rada : अकोल्यात Thackeray BJP भिडले, नेमकं काय घडलं?

Akola DPDC Meeting Rada : अकोल्यात Thackeray BJP भिडले, नेमकं काय घडलं?

अकोला जिल्हा नियोजन समितीच्या सभेत राडा

भाजपचे रणधीर सावरकर आणि ठाकरे गटाच्या नितीन देशमुखांमध्ये वाद

भर बैठकीत दोन्ही आमदारांची एकमेकांना अश्लिल शिवीगाळ

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने

पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर काढले

अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात मोठ्या प्रमाणात पोलीस दल दाखल. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत भाजप आमदार रणवीर सावरकर आणि ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्यात झालेला होता जोरदार राडा. दोघेही एकमेकांच्या अंगावर गेले होते धावून. दोघांनी एकमेकांना केली यथेच्छ शिवीगाळ. दोघांमधील वादाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते गोळा होण्यास झाली होती सुरुवात. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयातून काढून देण्यास केली सुरुवात. दोन्ही गटाचे कार्यकर्ते समोरासमोर येण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची खबरदारी.

Source link

अकोला जिल्हा नियोजन समितीच्या सभेत मोठा राडा, अश्लील शिवीगाळ करत दोन आमदार ऐकमेकांवर धावले

अकोला जिल्हा नियोजन समितीच्या सभेत मोठा राडा, अश्लील शिवीगाळ करत दोन आमदार ऐकमेकांवर धावले

Akola : अकोला (Akola)  जिल्हा नियोजन समितीच्या सभेत प्रचंड राडा झाल्याची घटना घडली आहे. भाजपचे आमदार रणधीर सावरकर (Randhir Savarkar) आणि अकोला जिल्ह्यातील बाळापुरचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh,) एकमेकांवर धावून गेले आहेत. दोघांकडून एकमेकांना प्रचंड अश्लील शिवीगाळ देखील करण्यात आली आहे. भर बैठकीतच राडा झाल्यानं या घटनेची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, दलित वस्तीच्या मुद्द्यावरुन भाजपचे आमदार रणधीर सावरकर आणि बाळापुरचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख या दोन्ही आमदारांमध्ये भांडण झालं. पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेत आज अकोला जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरू होती. भर बैठकीत दोन्ही आमदारांनी एकमेकांना अश्लील शिवीगाळ केली. यावेळी उपस्थित अधिकारी मंत्री आणि आमदारांनी दोघांना आवरल्यामुळे हाणामारीचा प्रसंग टळला. यावेळी दोन्ही आमदार ऐकमेकांवर धावून गेल्याचं पाहायला मिळालं.

महत्वाच्या बातम्या:

शिंदेंसोबत सूरतला गेले, पण गुवाहाटीला जाण्यापूर्वीच ठाकरेंकडे परतले; नितीन देशमुख ठरले पात्र

आणखी वाचा

Source link

Akola : ‘गण गण गणात बोते’च्या गजरात अकोला नगरी दुमदुमली; गजानन महाराजांच्या पालखीचं शहरात आगमन!

Akola : ‘गण गण गणात बोते’च्या गजरात अकोला नगरी दुमदुमली; गजानन महाराजांच्या पालखीचं शहरात आगमन!

जालिंदर सुपेकरांनी जप्ती करताना बँकेच्या लॉकरमधील पैसे अन् सोनं हडपलं, 150 कोटींचा भ्रष्टाचार, अमिताभ गुप्तांच्या सहभागाचा आरोप

Source link

Amol Mitkari : हा कुत्रा पुन्हा भुंकला तर सगळं बाहेर काढू, अमोल मिटकरींचा हाकेंना इशारा   ABP MAJHA

Amol Mitkari : हा कुत्रा पुन्हा भुंकला तर सगळं बाहेर काढू, अमोल मिटकरींचा हाकेंना इशारा ABP MAJHA

’मिटकरी ऑन शिंदे गट मंत्री नाराजी :

# अजित पवार निधी देत नाहीये, अशी कुठलेही नाराजी व्यक्त केली नसल्याचे एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक आणि मंत्र्यांनी स्वतः स्पष्ट केलंय.

# जाणीवपूर्वक चुकीच्या बातम्या पसवरण्याचं काम केल्या जात आहे, त्यामधून अजित पवार आणि महायुतीला बदनाम करण्याचा हा प्रयत्न.

# अजित दादा सर्वाना समान न्याय देणारे आहेत.. निधी वाटपावरून कुठल्याही पक्षातील मंत्र्यांची आमदाराची नाराजी नाही.. निवळ चुकीच्या बातम्या पसवरल्या जातायेत.. त्यामुळं नाराजी असल्याचे कारण नाही, स्वतः शिंदे शिवसेनेचे प्रवक्ते तथा मंत्री प्रताप सरनाईक बोलले… असेही ते म्हटले..

मिटकरी ऑन हाके :

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी पुन्हा लक्ष्मण हाकेंवर निशाणा साधलाय.. लक्ष्मण हाके यांच्यावर ड्रायव्हरचा 5 वर्षांचा पगार थकवल्याचा आरोप मिटकररींनी केला होता.. या आरोपानंतर लक्ष्मण हाकेच्या काही लोकांकडून ड्रायव्हर सचिन बंडगर यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना धमक्या दिल्या जात आहे, असा आरोप मिटकरींनी केलाय.. पाच वर्ष ड्रायव्हर सचिन बंडगर यांच्याकडून निशुक्ल सेवा ककरून घेतली, त्यासाठी हाकेने सचिन याच्या पत्नीला नोकरीवर लावून देण्याचा आमिष केलं होतं, त्यासाठी आर्थिक व्यवहार देखील झाला असल्याचे मिटकरी म्हटले..

सचिन बंडगर यांच्यासोबत आम्ही खंबीरपणे उभ आहो, त्यांच्यासह त्यांच्या कुटूंबियांच्या केसालाही धक्का लागला तर हाकेचे नकली केस त्यांच्यात हातात ददेऊ, अन त्याच्याच घशात त्याचे दात घालू, असा स्पष्ट इशारा मिटकरींनी हाकेला दिलाय..

दरम्यान, मिटकरींनी हाकेला कुत्रा म्हणून उल्लेख केला.. जर हा कुत्रा पुन्हा भुंकला तर त्याचे सर्व प्रकरण बाहेर काढू, असा इशारा मिटकरींनी दिला आहे..

Source link

अकोला पुन्हा हादरला, आठवडी बाजारासाठी आला, किरकोळ वाद हत्येपर्यंत पोहोचला, एकटं बघून भोसकलं, रक

अकोला पुन्हा हादरला, आठवडी बाजारासाठी आला, किरकोळ वाद हत्येपर्यंत पोहोचला, एकटं बघून भोसकलं, रक

Akola Crime:अकोला जिल्हा पुन्हा हत्याकांडाने हादरून गेलाय. अकोल्यात सलग दुसऱ्या हत्या झाली आहे. एका 22 वर्षीय तरुणीची चाकू भोकसून हत्या करण्यात आली आहे. मंगेश बिहारीलाल ढीगर असं हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. तर 30 वर्षीय सेवकराम पतिराम साकोम असं मारेकरी आरोपीचे नाव आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातल्या वस्तापूर गावात रात्री उशिरा हे हत्याकांड घडलंय. मृतक आणि मारेकरी हे दोघेही वस्तापूर गावातील रहिवासी आहे. (Akola News)

नेमकं काय घडलं?

वस्तापूर गावात काल आठवडी बाजार भरला होता, याच दरम्यान बाजारात खरेदीसाठी आलेला मृतक मंगेश आणि मारेकरी सेवकराम या दोघांमध्ये किरकोळ कारणांवरून शाब्दिक वाद झाला.. दोघांमधील वाद चांगलाच विकोपाला गेला, अन वादाचं रूपांतर हत्येपर्यंत पोहचलं. सेवकरामने सायंकाळी झालेला वादाचं कारण मनात साठवून ठेवलं, काल रात्रीच्या वेळी सेवकरामने मंगेशला एकटं बघितलं अन त्याला कायमचं सपवलं. त्याच्या पोटात आणि छातीवर गंभीर वार केल्याने मंगेश रक्ताच्या थारोळ्यात पडला.. आणि त्याचा या हल्ल्यात अंत झाला. दरम्यान, या प्रकरणात श्रीकांत चैत्राम तोटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू केलाय. दरम्यान, आरोपीच्या घरासमोर वस्तापूर रस्त्यावर हे हत्याकांड घडलं असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

दिल्लीच्या प्रसिद्ध टॅटू आर्टिस्टची अकोल्यात निर्घृण हत्या

दिल्लीची रहिवासी असलेल्या 26 वर्षीय प्रसिद्ध टॅटू आर्टिस्ट शांतीक्रिया प्रशांत कश्यप (वय 26) हिची अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे हत्या झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली होती. तब्बल 11 महिन्यांनंतर या प्रकरणातील मारेकरी चेतन महादेव शृंगारे याला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. शांतीक्रिया आणि चेतनची ओळख सोशल मीडियावर झाली होती. चेतनने तिला कामाच्या आमिषाने मूर्तिजापुरला बोलावले होते. काही दिवस ते दोघे प्रतिक नगरमधील एका खोलीत एकत्र राहत होते. 23 जुलै 2024 रोजी रात्री उशिरा दोघांमध्ये वाद झाला आणि रागाच्या भरात चेतनने शांतीक्रियाच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या केली. घटनास्थळीच तिचा मृत्यू झाला.

आणखी वाचा

Source link

दिल्लीच्या प्रसिद्ध टॅटू आर्टिस्टची अकोल्यात निर्घृण हत्या; प्रेम अन् कामासाठी दिल्लीवरून गाठल

दिल्लीच्या प्रसिद्ध टॅटू आर्टिस्टची अकोल्यात निर्घृण हत्या; प्रेम अन् कामासाठी दिल्लीवरून गाठल

अकोला : दिल्लीची रहिवासी असलेल्या 26 वर्षीय प्रसिद्ध टॅटू आर्टिस्ट शांतीक्रिया प्रशांत कश्यप (वय 26) हिची अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे हत्या झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली होती. तब्बल 11 महिन्यांनंतर या प्रकरणातील मारेकरी चेतन महादेव शृंगारे याला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. शांतीक्रिया आणि चेतनची ओळख सोशल मीडियावर झाली होती. चेतनने तिला कामाच्या आमिषाने मूर्तिजापुरला बोलावले होते. काही दिवस ते दोघे प्रतिक नगरमधील एका खोलीत एकत्र राहत होते. 23 जुलै 2024 रोजी रात्री उशिरा दोघांमध्ये वाद झाला आणि रागाच्या भरात चेतनने शांतीक्रियाच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या केली. घटनास्थळीच तिचा मृत्यू झाला.

हत्येनंतर चेतन फरार झाला होता. पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू ठेवला. अखेर पोलिसांना त्याचा शोध मुंबईतील सांताक्रूझ परिसरात लागला. स्थानिक पोलिसांच्या मदतीने मूर्तिजापुर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

नेमकी कशासाठी शांतीक्रियाची हत्या?

शांतीक्रिया प्रशांत कश्यप (वय 26) आणि चेतन शृंगारे या दोघांची सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री झाली होती. चेतनने काम देतो म्हणून शांतीक्रियाला अकोल्यातल्या मूर्तिजापुर शहरात बोलावून घेतलं होतं. त्यानंतर दोघे सोबत राहू लागले होते. मात्र, 23 जुलै 2024 रोजी रात्री उशिरा दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला, अन् रागाच्या भरात चेतनने तिच्या डोक्यावर धारदार शस्त्रानं वार केले. यात तरूणीचा मृत्यू झाला होता. दरम्यान मृत शांतिक्रिया ही प्रसिद्द टॅटू आर्टिस्ट होती.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, चेतन आणि शांतीक्रिया यांच्यात प्रेमसंबंध होते. एकदा मुंबईत शांतीक्रियाच्या सांगण्यावरून चेतनला तिच्या मित्रांनी मारहाण केली होती. त्यानंतर त्यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. शिवाय, शांतीक्रिया‌ चेतनला वारंवार शिवीगाळ करायची. त्यामुळे चेतनच्या मनात राग साचत गेला आणि अखेर तो एका रात्री जीवघेण्या टोकाला पोहोचला. शांतिक्रीया 21 जुलै 2024 रोजी मुर्तीजापुर शहरात आली होती. त्यावेळी चेतन तिला घेऊन वैशाली वाईन बारमध्ये काम मागण्यासाठी गेला होता. मात्र, बार मालकानं काम द्यायला स्पष्ट नकार दिला, त्यानंतर दोघेही तिथून परतले होते. विशेष म्हणजे चेतन पाच ते सहा महिन्यांपूर्वी याच बारमध्ये वेटरचं काम करत होता. त्यानंतर दोघेही मूर्तिजापूरातील प्रतिक नगरमध्ये खोली घेवून राहत होते. चेतनला दारू पिण्याचं व्यसन होतं. हत्येच्या घटनेपासून चेतन फरार होता.

मुर्तीजापुर पोलिसांनी अखेर लावला शोध

मारेकरी चेतन हा यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील हरसूल गावातील रहिवासी आहे. तो सात वर्षांपासून गावात राहत नसल्याची माहिती मिळाली होती. आरोपीबाबत कुठलीही माहिती मिळत नव्हती. त्यामुळे तांत्रिक माहितीच्या आधारावर व मिळालेल्या माहितीच्या आधारे मूर्तिजापूर शहर पोलिसांच्या पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे यांच्या नेतृत्वातील ‘टीम’ने मुंबई येथे जाऊन त्याचा पोलिस स्टेशन सांताक्रुझच्या हद्दीत स्थानिक पोलिसांच्या मदतीने शोध घेतला अन अटक करण्यात अखेर यश आलं. या आरोपीस ताब्यात घेऊन त्यास गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. तब्बल 11 महिन्यानंतर या आरोपीला अटक करण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणातील तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे.

आणखी वाचा

Source link