काँग्रेस नेत्याच्या भावाची हत्या, जामिनावर बाहेर आलेल्या गुंडाने माजी अभियंत्याला संपवलं

काँग्रेस नेत्याच्या भावाची हत्या, जामिनावर बाहेर आलेल्या गुंडाने माजी अभियंत्याला संपवलं


अकोला : जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय कौसल यांचे बंधू आणि माजी अभियंता संजय कौसल यांची हत्या करण्यात आली आहे. महेंद्र पवार असं आरोपीचं नाव असून त्याने 60 वर्षीय संजय कौसल यांची हत्या केली. संजय कौसल हे सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंते म्हणून निवृत्त झाले होते. अकोल्यातल्या रणपिसे नगरात हे थरारक हत्याकांड घडलं. अकोल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक आर्चित चांडक यांनी पदभार घेताच पहिल्याच आठवड्यात हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.  

महेंद्र पवार हा सराईत गुन्हेगार असून तो एका प्रकरणात तुरुंगात गेला होता. सध्या तो जामीनावर बाहेर होता.  त्याने संजय कौसल यांच्या छातीवर आणि डोक्यावर धारदार लोखंडी टिकासने वार करत त्यांना जागीच ठार केले. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली असून पोलीसांचा त्या दिशेने तपास सुरू आहे. दरम्यान, जुन्या वादातून हे हत्याकांड घडले असल्याची चर्चा सुरू आहे. पोलिसांनी आरोपी महेंद्र पवारला अटक केली आहे. 

संजय कौसल हे अकोल्यातील काँग्रेसचे जेष्ठ नेते विजय कौसल यांचे लहान बंधू आहेत. नवे पोलिस अधीक्षक अर्चित चांडक अकोल्यात रुजू झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात ही हत्या झाली आहे.

Akola Sanjay Kausal Murder : आरोपी जामिनावर बाहेर

मारेकरी महेंद्र पवार याची पार्श्वभूमी ही गुंड प्रवृत्तीची असून त्याने या आधीही एका व्यक्तीवर गंभीर हल्ला केला होता. त्या प्रकरणात तो जामीनावर तुरुंगाबाहेर आला होता. मारेकरी महेंद्र पवार आणि मृत संजय कौसल हे रणपिसे नगरमधील मुरलीधर टॉवरमध्ये राहतात. एका जुन्या वादातून ही हत्या झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेतली.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा



Source link

अकोला जिल्ह्यातील वाघाडी नदीच्या पुलावरून भीषण अपघात; कार थेट खाली कोसळली; तिघांचा मृत्यू,

अकोला जिल्ह्यातील वाघाडी नदीच्या पुलावरून भीषण अपघात; कार थेट खाली कोसळली; तिघांचा मृत्यू,


Akola Accident News : अकोल्यात चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झालाय. यामध्ये चारचाकी वाहन थेट नदीच्या पुलाचे कठडे तोडून पुलाखाली कोसळली आहे. अकोल्यातल्या वाडेगाव बाळापुर रस्त्यावर हा भीषण अपघात (Accident News) झाला आहे. या अपघातात तीन लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. तर एक जण गंभीर जखमी आहे. वाहनातील कन्हैयासिंग ठाकूर (वय 54), विशाल भानुदास सोलनकर (वय 45) आणि सुनील शर्मा (वय 45) असे अपघातात मरण पावलेल्या व्यक्तींची नाव आहेत. तर आशिष कन्हैयासिंग ठाकूर हे गंभीर स्वरूपात जखमी आहेत. त्यांच्यावर सध्या अकोल्याचे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. मात्र या अपघाताच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

वाघाडी नदीच्या पुलावरून थेट कार खाली कोसळली  

पुढे आलेल्या माहितीनुसार, अपघातात मरण पावलेली व्यक्ती हे बाळापुर शहरातील रहिवासी आहे. दरम्यान, अकोल्यातल्या बाळापूर वाडेगाव रस्त्यावरील कुपटा नजीकच्या वाघाडी नदीच्या पुलावरून थेट कार खाली कोसळली आहे. वाडेगावकडून बाळापुरकडे जात असताना मध्यरात्रीच्या दरम्यान ही दुर्दैवी घटना घडलीये… मिळालेल्या माहितीनुसार, पातूर MH 30 ऐ-झेड 7557 क्रमांकाची कार थेट नदीच्या पुलावरील कठडे तोडून पलटी झाली आहे. घटनेची माहिती मिळतच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पुढील कारवाई सुरू केलीय. यावेळी मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिकही जमेल होते.  

ट्रॅव्हल्समधून प्रतिबंधित कपाशी बियाण्याची तस्करी; राज्यातील सर्वात मोठी कारवाई

खरीप हंगाम तोंडावर असताना अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर वेलकम पॉईट चौकामध्ये गुजरातच्या अहमदाबादमधून एका ट्रॅव्हल्समध्ये  प्रतिबंधित एचटीबीटी या कपाशी बियाण्याची तस्करी होत होती, अशी माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे विभागीय कृषी सहसंचालक विभागाच्या भरारी पथकाने थेट कारवाई करत या ट्रॅव्हल्समध्ये शासन मान्यता नसलेले अनधिकृत एचटीबीटी बियाण्याचा एकूण 50 पांढरे कट्टे, प्रति कट्ट्यात 50 पाकीट प्रमाणे 2500 पाकिटे आणि प्रिंटिंग केलेले चार कट्टे जप्त केले आहेत. ज्याची अंदाजीत रक्कम 25 लाख रुपयाचा आढळून आली आहे.  कृषी विभागाकडून हा साठा जप्त करण्यात आलेला आहे. दरम्यान ही राज्यातील सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात असून गुजरातच्या अहमदाबादमधून प्रतिबंधित एचटीबीटीच बियाणे राज्यात येत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

अशोक चव्हाणांच्या मुलीसाठी हाकेंचे भोकरमध्ये तोडपाणी, OBC उमेदवार मागे घेतला: अमोल मिटकरी

अशोक चव्हाणांच्या मुलीसाठी हाकेंचे भोकरमध्ये तोडपाणी, OBC उमेदवार मागे घेतला: अमोल मिटकरी


अकोला : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि लक्ष्मण हाकेंमधील वाद थांबवण्याचं नाव घेत नाही. अमोल मिटकरींनी ट्वीट करत हाकेंवर टीकेचा आसूड ओढला. विधानसभा निवडणुकीत ओबीसी उमेदवारांना उभं करून हाकेंनी तोडपाणी केली असा आरोप त्यांनी केला. अशोक चव्हाणांच्या मुलीला निवडून आणण्यासाठी लक्ष्मण हाकेंनी तोडपाणी केलं आणि दबाव टाकून ओबीसी उमेदवार मागे घ्यायला लावा असा आरोपही केला. मिटकरींनी त्यासंबंधी एक ऑडिओ क्लीप शेअर केली. एबीपी माझा या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.

Amol Mitkari Tweet On Laxman Hake : काय म्हटलंय मिटकरींनी? 

अमोल मिटकरींनी त्यांच्या सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप शेअर करत म्हटलंय की, “सदर ऑडिओ ही भोकर मतदारसंघातील आहे. याच मतदारसंघात एका OBC बांधवाचा राजकीय बळी देऊन हाक्याने आर्थिक देवाण-घेवाण केली आणि अर्ज मागे घ्यायला भाग पाडले. आता या मतदारसंघात आर्थिक तडजोड किती मोठी झाली असेल हे सुज्ञास सांगणे न लगे”.

 

Amol Mitkari Vs Laxman Hake : काय आहे नेमकं प्रकरण? 

नोव्हेंबर महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत नामदेव आईलवाड नावाच्या उमेदवाराने प्रहार पक्षाकडून भोकर विधानसभेसाठी अर्ज भरला होता. पण शेवटच्या दिवशी त्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला. अर्ज मागे घेण्यासाठी लक्ष्मण हाकेंचा दबाव होता असं तो म्हणाल्याचं एका ऑडिओ क्लिपमधून ऐकू येतं. या मतदारसंघात भाजपच्या तिकिटावर अशोक चव्हाण यांच्या कन्या सुजया चव्हाण निवडून आल्या आहेत. 

Amol Mitkari Audio Clip : ती क्लिप खरी, प्रहारच्या शेखर कुंटे यांचा दावा

अमोल मिटकरींनी ट्वीट केलेली ऑडिओ क्लिप आपलीच असल्याचं भोकरमधील प्रहारचे तालुकाध्यक्ष शेखर कुंटे यांनी स्पष्ट केलं. भाजपनं आर्थिक तडजोड करून भोकरचा उमेदवार फोडला असा दावा त्यांनी केला. तर या सगळ्या प्रकरणात लक्ष्मण हाके यांनी तोडपाणी करत ओबीसीचे उमेदवार पाडले असा आरोपही त्यांनी केला. 

Prahar Shaikhar Kunte : शेखर कुंटेंचे लक्ष्मण हाकेंवर आरोप काय? 

अमोल मिटकरींनी केलेल्या दाव्यावर बोलताना शेखर कुंटे म्हणाले की, नामदेव आईलवाड यांनी शेवटच्या दिवशी, 4 नोव्हेंबर रोजी अर्ज माघारी घेतला. आपल्याशी कोणतीही चर्चा न करता त्यांनी अर्ज माघार घेतला. त्यावर विचारले असता त्यांच्यावर लक्ष्मण हाकेंचा दबाव असल्याची माहिती दिली. नंतर तोच उमेदवार 7 नोव्हेंबर रोजी लक्ष्मण हाकेंच्या गाडीतून लोहा मतदारसंघात फिरत होता. 12 नोव्हेंबर रोजी पंकजा मुंडे यांनी भोकरमध्ये सभा घेतली. त्यामध्ये आईलवाड हा स्टेजवर होता. नंतरच्या काळात तो सातत्याने लक्ष्मण हाकेसोबत दिसला. त्यामुळे लक्ष्मण हाकेंनी ओबीसी उमेदवार उभे करुन तोडपाणी केल्याचं स्पष्ट आहे. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..





Source link

अकोल्यातील अंडरपासचं तळ्यात रूपांतर; महिला कपडे धुवू लागले, साचलेलं पाणी घरीही नेले!

अकोल्यातील अंडरपासचं तळ्यात रूपांतर; महिला कपडे धुवू लागले, साचलेलं पाणी घरीही नेले!



Akola News: अकोल्यातील अंडरपासचं तळ्यात रूपांतर; महिला कपडे धुवू लागले, साचलेलं पाणी घरीही नेले!



Source link

भीषण अपघात! जनावरांची तस्करी करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करताना ट्रक थेट घरावर आदळला,अन्…

भीषण अपघात! जनावरांची तस्करी करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करताना ट्रक थेट घरावर आदळला,अन्…



Akola Accident News: भीषण अपघात! जनावरांची तस्करी करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करताना ट्रक थेट घरावर आदळला,अन्…



Source link

भाजप आमदारांनी उतावीळपणापेक्षा जरा दमानं घ्यावं, राष्ट्रवादीचे आमदार मिटकरींचा सल्ला 

भाजप आमदारांनी उतावीळपणापेक्षा जरा दमानं घ्यावं, राष्ट्रवादीचे आमदार मिटकरींचा सल्ला 


Amol Mitkari : राज्यातील भाजप आमदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्याकडे मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar)  यांच्याविषयी तक्रारी केल्याची बातमी समोर आली होती. याच मुद्यावरुन राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी भाजप आमदारांना उतावीळपणापेक्षा जरा दमानं घेण्याचा सल्ला दिला आहे. अजित पवारांची तक्रार करणाऱ्या भाजपा आमदारांनाच अमित शाह यांनी त्यांच्यासारखं काम करण्याच्या कानपिचक्या दिल्याचे मिटकरी म्हणाले.

संभाजी भिडेंवर अमोल मिटकरींनी केली टीका 

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन सोहळा हद्दपार करण्याची भाषा करणाऱ्या संभाजी भिडेंवर मिटकरींनी टीका केली आहे. अशा पद्धतीने बोलण्याची भिडेंसारख्यांची हिंमत होतेच कशी? असा सवाल त्यांनी केला आहे. संभाजी भिडेंना कुत्रा नेमकं कुठे चावला होता? अशी शंका निर्माण होते असेही मिटकरी म्हणालेत. महाराजांचा राज्याभिषेक सोहळा दिवस साजरा करण्यासाठी राज्यातील लाखो शिवभक्त समर्थ असल्याचे मिटकरी म्हणाले.

नेमकं प्रकरण काय?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर भाजपच्या काही आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात नाराजी सूर व्यक्त केला. अजित पवारांच्या कुरघोड्यांना रोखा, असे म्हणत भाजप आमदारांनी अमित शाह यांच्याकडे साकडे घातले. यावर अमित शाह यांनी भाजपच्या आमदारांना कानमंत्र दिला आहे. भाजप आमदार अमित शाह यांच्याकडे अजित पवारांबाबत तक्रार घेऊन गेले. यावर उलट अजित पवारच माझ्याकडे तक्रार घेऊन आले पाहिजेत, असा कानमंत्र दिल्याची सूत्रांची माहिती आहे. अजित पवारांची तक्रार करु नका, उलट सर्व मंत्र्यांच्या मागे लागा अशी सूचना अमित शाह यांनी दिल्या. आपल्या आमदारांची संख्या अधिक,अशात मागे हटू नका, प्रशासन आणि सरकार पातळीवर आक्रमकपणे कामांचा पाठपुरावा करा, असं अमित शाह यांनी आमदारांना म्हणाले. आपल्याला महायुती म्हणूनच पुढे जायचं आहे, असंही अमित शाह यांनी सांगितले. 

2024 साली विधानसभेत भाजपा आमदारा समोर पराभूत उमेदवाराना ताकद देण्याचे काम मुद्दाम अजित पवार करत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवत अजित पवार मुद्दाम भाजपा ताकद कमी करू पाहत असून भाजपा विरोधकांना ताकद देताय, याकडे लक्ष द्यावे…अशी तक्रारी पाढाच भाजपा आमदारांनी मंत्री यांनी अमित शाहा समोर मांडला. 

महत्वाच्या बातम्या:

अमोल कोल्हे अन् जानकरांनी नाक घासून अजित दादांची माफी मागावी, मगच एकीची चर्चा; आ. मिटकरींनी ठेवली अट

अधिक पाहा..



Source link