अमरावतीत हुंडाबळीचा प्रकार? पतीच्या त्रासाला कंटाळून महिलेने जीवन संपवले

अमरावतीत हुंडाबळीचा प्रकार? पतीच्या त्रासाला कंटाळून महिलेने जीवन संपवले


अमरावती : पुणे येथील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजे असतानाच अमरावतीमध्येही तशीच घटना घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अमरावती शहरातील जय भोले कॉलनी परिसरात एका 30 वर्षांच्या महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. शुभांगी निलेश तायवाडे असे या आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. बँकेत कामाला असलेल्या पतीच्या छळाला कंटाळून शुभांगीने आत्महत्या केल्याचं बोललं जातंय. 

शुभांगीचा पती निलेश तायवाडे हा सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये सीनियर मॅनेजर पदावर कार्यरत आहे. तर शुभांगी ही आरोग्य विभागात कम्युनिटी हेल्थ ऑफिसर या पदावर कार्यरत आहे. शुभांगी आणि निलेशचा विवाह चार वर्षांपूर्वी झाला. त्यांना एक तीन वर्षाची मुलगी आणि एक वर्षाची मुलगी अशा दोन मुली आहे. लग्नानंतर काही दिवसातच निलेशने शुभांगीचा छळ करणे सुरू केले होते. या त्रासामुळेच शुभांगीने आत्महत्या केल्याचा आरोप शुभांगीचे वडील आणि आईने केला आहे.

Shubhangi Taywade Suicide Case : जावयानेच मुलीची हत्या केली, वडिलांचा दावा

शुभांगीचे प्रेत शवविच्छेदनासाठी अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. जोपर्यंत शुभांगीचा लहान भाऊ येत नाही तोपर्यंत शवविच्छेदन करु नये अशी मागणी तिच्या कुटुंबीयांनी केलेली आहे. आपल्या मुलीने आत्महत्या केली नाही तर निलेशने तिला फासावर लटकवले असा देखील आरोप मृत शुभांगीच्या आईने केला आहे. 

Amravati Woman Suicide Case : आठ दिवसांपूर्वी मारहाण

आठ दिवसांपूर्वी आपल्या मुलीला मारहाण करण्यात आली होती. तुमची मुलगी घेऊन जा, मला घटस्फोट द्या असं जावयाने म्हटल्याचं मृत महिलेच्या वडिलांनी सांगितलं. आपली मुलगी कम्युनिटी हेल्थ ऑफिसर असून ती असं करूच शकत नाही असा दावाही तिच्या वडिलांनी केला. आपल्या मुलीने आत्महत्या केली नाही तर तिला जावयानेच गळफास लावला असा मोठा आरोप मृत महिलेच्या वडिलांनी केला. या प्रकरणाची चौकशी करून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणीही त्यांनी केली. 

आता या प्रकरणाचा संपूर्ण तपास गाडगे नगर पोलिस करत आहेत. मृत शुभांगीचा पती निलेश तायवाडे आणि सासू यांना गाडगे नगर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेले आहे. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..



Source link

घराला लागली आग, वडिलांनी मुलाला वाचवण्यासाठी घेतली धाव पण…. अकोला जिल्ह्यात दुर्वैवी घटना 

घराला लागली आग, वडिलांनी मुलाला वाचवण्यासाठी घेतली धाव पण…. अकोला जिल्ह्यात दुर्वैवी घटना 


Akola  : अकोला (Akola) जिल्ह्यातील अकोट तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. जिल्ह्यातील मुंडगाव येथे घराला लागलेल्या आगीत वडील आणि मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मुंडगावातील बाजारपूरा येथे राहणारे सचिन हरिभाऊ ठाकरे यांच्या घरातील बेडरुममध्ये त्यांचा 9 वर्षीय मुलगा झोपलेला असताना अचानक आग लागली. बेडरुममधून धूर निघत असल्याचे वडील सचिन हरिभाऊ ठाकरे यांच्या लक्षात येताच वडिलांनी मुलाला वाचवण्यासाठी धाव घेतली. यात वडील सचिन हे आगीत गंभीररित्या भाजले गेले होते. जखमी दोघांनाही अकोला येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय. 

सोन्या चांदीसह रोख 1 लाख 85 हजार रुपये जळून खाक

आगीत वडील आणि मुलाचा मृत्यू झाल्यानं मुंडगावावर शोककळा पसरली आहे. या घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. आग विझावण्यासाठी अग्नीशामक दल दाखल झालं होतं. पण तोपर्यंत गावकऱ्यांनी आग विझवली होती. या आगीत अंदाजे घरादील सोने चांदीचे 3 लाख 75 हजारांचे दागिने यासह कपडे व घरेलु साहित्य अंदाजे किंमत 3 लाख आणि रोख रक्कम 1 लाख 85 हजार रुपये जळून खाक झाली आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Solapur Fire: पाण्याचे 100 बंब संपले, तरीही आग विझेना, मालकाच्या कुटुंबाला शोधायला भिंत फोडली, अग्निशमन दलाचे जवान भगदाडातून आत शिरले

अधिक पाहा..



Source link

राज्य महिला आयोगाकडून खरंच हलगर्जी झालीय का? अजित दादांच्या पक्षातूनच सरकारकडे चौकशीची मागणी

राज्य महिला आयोगाकडून खरंच हलगर्जी झालीय का? अजित दादांच्या पक्षातूनच सरकारकडे चौकशीची मागणी


Rupali Thombare on Vaishnavi Hagawane Case : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात (Vaishnavi Hagawane Case ) राज्य महिला आयोगाकडून खरंच हलगर्जी झाली आहे का?, याची चौकशी करा. अशी मागणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेत्या रूपाली ठोंबरे पाटील (Rupali Patil Thombare) यांनी सरकारकडे केली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकरर (Rupali Chakankar) आणि आयोगाच्या भूमिकेबद्दल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी, अशी मागणी रूपाली ठोंबरे यांनी केली आहे. 

दरम्यान, रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यासंदर्भात पक्षाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार निर्णय घेतील, असेही रूपाली ठोंबरे यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना सांगितली आहे. महिला आयोगाचा अध्यक्ष हा गैरराजकीय असावा, या चर्चेसंदर्भात सरकारने विचार करण्याची मागणी ही रूपाली ठोंबरे यांनी केली आहे. त्या अकोला येथे बोलत होत्या. महिला आयोगावर निवृत्त न्यायमूर्ती किंवा निवृत्त सनदी पोलीस अधिकारी यांची नियुक्ती करण्याच्या चर्चेवर सरकारने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही रूपाली ठोंबरे यांनी यावेळी बोलून दाखवली आहे. मात्र पक्षातील नेत्यांनीच आता महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या विरोधात भाष्य केल्याने राष्ट्रवादीतील असंतोष आणखी मिश्र होण्याची चिन्हं असल्याचे बोलले जात आहे.

रूपाली चाकणकर यांच्या कार्यपद्धतीवरून पक्षातून नाराजीचा सुर

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या कार्यपद्धतीवरून राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक मोठा गट नाराज आहे. हगवणे प्रकरणात महिला आयोगाच्या भूमिकेवरून टीका होत असल्याने पक्षातला एक गट अस्वस्थ असल्याचे ही बोलले जात आहे. परिणामी, पक्षातील नाराज गटाने रूपाली चाकणकर यांच्या कार्यपद्धतीची तक्रार पक्षाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर रूपाली चाकणकर यांच्याकडे कोणतंही एक पद ठेवण्याची नाराज गटाची मागणी असल्याचे ही बोलले जात आहे.

रूपाली चाकणकर यांच्याकडे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासोबतच पक्षाच्या महिला आघाडीचे प्रदेशाध्यक्षपद देखील आहे. चाकणकर यांना दोन पैकी एका पदावरून हटवण्याची पक्षातील नाराज गटाची मागणी असल्याचे सांगण्यात येतंय. त्यामुळे आता रूपाली चाकणकर यांच्या पदाबाबत पक्ष काय निर्णय घेतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.  

इतर महत्वाच्या बातम्या 

 

अधिक पाहा..



Source link

सलमान के घर में जबरन घुस रहा शख्स गिरफ्तार:  कार के पीछे छिपकर गैलेक्सी अपार्टमेंट में घुसा था; सलमान के पास है Y+ सिक्योरिटी

सलमान के घर में जबरन घुस रहा शख्स गिरफ्तार: कार के पीछे छिपकर गैलेक्सी अपार्टमेंट में घुसा था; सलमान के पास है Y+ सिक्योरिटी


मुंबई18 घंटे पहले

  • कॉपी लिंक

सलमान खान को लॉरेंस गैंग की धमकियां मिलने के बाद Y प्लस सिक्योरिटी मिली है।

सलमान खान के घर में एक बार फिर एक शख्स के घुसने का मामला सामने आया है। पुलिस के मुताबिक, यह घटना 20 मई की है। खुलासा गुरुवार को हुआ।

पुलिस ने बताया कि आरोपी को गिरफ्तार कर लिया गया है। 23 साल के आरोपी का नाम जीतेंद्र कुमार है और छत्तीसगढ़ का रहने वाला है। 2 दिन में यह दूसरी घटना थी।

बीती रात ईशा छाबड़ा नाम की महिला ने भी गैलेक्सी अपार्टमेंट में घुसने की कोशिश की थी। इसे भी पुलिस ने अरेस्ट कर लिया था। दोनों मामलों की जांच जारी है।

बांद्रा में FIR दर्ज, आरोपी को एक बार भगाया तो फिर लौट आया

सलमान की सुरक्षा में तैनात पुलिस अधिकारी संदीप नारायण की शिकायत पर बांद्रा पुलिस ने FIR दर्ज की है। संदीप ने बताया कि 20 मई की सुबह 09:45 बजे एक अज्ञात व्यक्ति को गैलेक्सी अपार्टमेंट बिल्डिंग के आसपास घूमते देखा गया। मैंने उसे समझाया और उसे चले जाने को कहा। इस पर आरोपी ने अपना मोबाइल फोन जमीन पर फेंककर तोड़ दिया।

संदीप ने कहा कि वह शख्स शाम करीब 7:15 बजे फिर गैलेक्सी अपार्टमेंट के मुख्य द्वार पर वापस आया और इमारत में रहने वाले एक व्यक्ति की कार से गेट के अंदर प्रवेश कर गया। मौके पर मौजूद पुलिस कॉन्स्टेबल सुर्वे, महेत्रे, पवार और सुरक्षा गार्ड कमलेश मिश्रा ने तुरंत उसे हिरासत में लिया और बांद्रा पुलिस के हवाले कर दिया।

14 अप्रैल 2024 की फायरिंग के बाद सलमान के अपार्टमेंट की बालकनी को बुलेटप्रूफ कर दिया गया। इसी बालकनी से वह अपने फैंस का अभिवादन करते हैं।

14 अप्रैल 2024 की फायरिंग के बाद सलमान के अपार्टमेंट की बालकनी को बुलेटप्रूफ कर दिया गया। इसी बालकनी से वह अपने फैंस का अभिवादन करते हैं।

सलमान को Y+ कैटेगरी की सुरक्षा, 24 घंटे 11 जवान साथ

  • 2023 में लॉरेंस गैंग से धमकी मिलने के बाद ही सलमान की सुरक्षा बढ़ा दी गई थी। उन्हें महाराष्ट्र सरकार की तरफ से Y+ कैटेगरी की सुरक्षा मिली हुई है। 11 जवान हर समय साथ रहते हैं, इसमें एक या दो कमांडो और 2 PSO भी शामिल होते हैं।
  • सलमान की गाड़ी के आगे और पीछे एस्कॉर्ट करने के लिए दो गाड़ियां हमेशा रहती हैं। इसके साथ-साथ सलमान की गाड़ी भी पूरी तरह बुलेटप्रूफ है।
  • गैलेक्सी अपार्टमेंट पर हुई फायरिंग के बाद जनवरी में सलमान के अपार्टमेंट की बालकनी बुलेटप्रूफ कर दी गई है। साथ ही हाई रेजोल्यूशन कैमरे भी चारों तरफ लगाए गए हैं।

पिछले महीने धमकी मिली थी, कार बम से उड़ाएंगे

14 अप्रैल 2024 को सलमान के घर फायरिंग हुई थी। उसके ठीक एक साल बाद पिछले महीने 14 अप्रैल 2025 को सलमान को फिर एक बार जान से मारने की धमकी मिली थी। मुंबई के वर्ली स्थित ट्रांसपोर्ट डिपार्टमेंट में अज्ञात शख्स ने वॉट्सएप मैसेज कर सलमान की कार को बम से उड़ाने की बात कही।

मैसेज में लिखा था- हम सलमान खान को घर में घुसकर मारेंगे। मुंबई की वर्ली पुलिस ने केस दर्ज करके आरोपी को अरेस्ट कर लिया था।

पिछले साल 14 अप्रैल को सलमान खान के गैलेक्सी अपार्टमेंट में फायरिंग हुई थी। इस हमले की जिम्मेदारी लॉरेंस गैंग ने ली थी। इस केस में पुलिस ने 7 लोगों को गिरफ्तार किया था। इनमें से एक आरोपी ने खुदकुशी कर ली है।

14 अप्रैल 2024 की फायरिंग की 2 तस्वीरें

14 अप्रैल 2024 को सुबह करीब 5 बजे सलमान के गैलेक्सी अपार्टमेंट पर फायरिंग हुई थी। CCTV फुटेज में घटनास्थल से भागते हुए बाइक सवार दिखे थे।

14 अप्रैल 2024 को सुबह करीब 5 बजे सलमान के गैलेक्सी अपार्टमेंट पर फायरिंग हुई थी। CCTV फुटेज में घटनास्थल से भागते हुए बाइक सवार दिखे थे।

सलमान ने धमकियों पर कहा था- जितनी उम्र लिखी, उतना जिएंगे

लॉरेंस गैंग से लगातार मिल रही धमकियों पर सलमान खान ने इस साल 26 मार्च को कहा था –

QuoteImage

भगवान-अल्लाह ने जितनी उम्र लिखी होगी, उतनी जरूर जिएंगे।

QuoteImage

सिक्योरिटी बढ़ाई जाने पर सलमान ने कहा, ‘कभी-कभी इतने लोगों को साथ लेकर चलने से दिक्कत हो जाती है।’ पढ़ें पूरी खबर

—————–

सलमान खान से जुड़ी ये खबर भी पढ़ें..

बाबा सिद्दीकी से पहले सलमान को मारने की साजिश थी:शूटर ने पुलिस को बताया- एक्टर की सिक्योरिटी टाइट होने पर प्लान बदल दिया

NCP नेता बाबा सिद्दीकी की हत्या के मामले में गिरफ्तार आरोपी ने खुलासा किया है कि सलमान खान उनकी हिटलिस्ट में थे। पूरी खबर पढ़ें..

2. सलमान खान@59, 85 फिल्में, 74 अवॉर्ड:सोशल वर्क में अव्वल, लेकिन विवादों में जिंदगी, जानिए कैसे शिकार केस में चश्मदीद अड़े

बॉलीवुड के सुपरस्टार सलमान खान आज 59 साल के हो चुके हैं। 3 दशकों से ज्यादा के एक्टिंग करियर में सलमान ने 85 फिल्में कीं, 74 अवॉर्ड जीते। वो चैरिटी में भी अव्वल हैं, इसके बावजूद सलमान की जिंदगी विवादों नाम रही और उन्हें बैड बॉय का तमगा दिया गया। पूरी खबर पढ़ें..

खबर लगातार अपडेट हो रही है…

खबरें और भी हैं…



Source link

केवळ 20 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्यानं संपवलं जीवन; सोयायटी सचिवाचं तलाठ्याला पत्र

केवळ 20 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्यानं संपवलं जीवन; सोयायटी सचिवाचं तलाठ्याला पत्र


अकोला : राज्यात एकीकडे पावसाने थैमान घातले असून शेतकऱ्यांना (Farmers) नुकसान सहन करावे लागत आहे. मान्सूनपूर्वच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने काही ठिकाणी वादळीवाऱ्यासह वीज कोसळून नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. दुसरीकडे निवडणुकांपूर्वी शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन देणाऱ्या नेत्यांनी पाठ फिरवल्याने शेतकरी चिंतातूर आहे. त्यातच, अकोल्यात (Akola) एका अल्पभूधारक शेतकऱ्याने केवळ 20 हजार रुपयांच्या कर्जापोटी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. देवानंद सुखदेव इंगळे असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असून शेतातीलच आंब्याच्या झाडाला गळफास घेत त्यांनी आपलं जीवन संपवलं. अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातल्या निमकर्दा येथे देवानंद इंगळे राहात होते. मृत इंगळे यांच्याकडे जवळपास मुद्दल आणि व्याजाची रक्कम मिळून 20 हजार रुपयापेक्षा अधिक कर्ज होते. 

अतिवृष्टी व कर्जमुक्ती होत नसल्याच्या चिंतेमुळेच या शेतकऱ्यानं आत्महत्या केली असल्याचं कुटुंबीयांनी म्हटलं आहे. इंगळे यांच्याकडे एकर शेती होती, नापिकी आणि कर्जबाजारीला कंटाळून इंगळे यांनी आत्महत्यासारखं टोकाचा पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. याप्रकरणी उरळ पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आलीय. दरम्यान, सेवा सहकारी सोयायटीच्या सचिवांनी गाव तलाठ्यांना पत्र लिहून या कर्जाबाबतची माहिती दिली आहे. देवानंद इंगळे या शेतकऱ्याने आत्महत्या केली असून त्यांच्याकडे सन 2022 चे पीकर्ज रुपये 15000 आणि 5400 रुपये व्याज अशी एकूण 20,450 रुपयांचे कर्ज असल्याची नमूद केले आहे. मयत सभासदाच्या कर्जाची माहिती देण्यात येत असल्याचे सांगत सोसायटी सचिवांनी हे पत्र तलाठी महोदयांना दिले आहे. 

महाविस्तार AI अॅपचे लोकार्पण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे ‘राज्यस्तरीय खरीप हंगाम नियोजन बैठकी’दरम्यान महाराष्ट्र शासनाच्या ‘डिजिटल भारत, आत्मनिर्भर महाराष्ट्र‘ संकल्पनेला अनुसरुन कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने शासन अधिक सक्षम, लोकाभिमुख आणि पारदर्शक करण्याच्या दृष्टीने कृषी विभागाने विकसित केलेल्या ‘महाविस्तार – AI अ‍ॅप’चे लोकार्पण केले. शेतकऱ्यांना शास्त्रशुद्ध व रिअल-टाइम कृषी विषयक सल्ला देणाऱ्या ‘महाविस्तार – AI ॲप’ची माहिती सांगणारी AV याप्रसंगी सादर करण्यात आली.

हेही वाचा

वैष्णवीच्या वडिलांनी लग्नात दिलेली फॉर्च्युनर अन् ॲक्टिव्हा पोलिसांकडून जप्त; कारवाईला वेग

अधिक पाहा..



Source link