नाराज चल रहे छगन भुजबल महाराष्ट्र कैबिनेट में मंत्री बने:  बोले- अंत भला तो सब भला, जो जिम्मेदारी मिलेगी निभाऊंगा; धनंजय मुंडे की ली जगह

नाराज चल रहे छगन भुजबल महाराष्ट्र कैबिनेट में मंत्री बने: बोले- अंत भला तो सब भला, जो जिम्मेदारी मिलेगी निभाऊंगा; धनंजय मुंडे की ली जगह


  • Hindi News
  • National
  • Maharashtra CM Devendra Fadnavis Cabinet Minister Update | Chhagan Bhujbal NCP

मुंबई4 दिन पहले

  • कॉपी लिंक

भुजबल को राजभवन में राज्यपाल सी पी राधाकृष्णन ने शपथ दिलाई।

नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी (NCP) के नेता छगन भुजबल ने मंगलवार सुबह महाराष्ट्र कैबिनेट में मंत्री पद की शपथ ली। मंत्री बनने के बाद उन्होंने कहा- ‘कहते हैं न- अंत भला तो सब भला। मैंने अब तक हर जिम्मेदारी अच्छे से निभाई है। अब भी जो जिम्मेदारी मिलेगी, उसे निभाऊंगा।’

दरअसल, पिछले साल नवंबर में महाराष्ट्र में महायुति गठबंधन की सरकार बनी थी। हालांकि, 77 साल के छगन को मंत्रिमंडल में शामिल नहीं किया गया था, जिससे वह नाराज चल रहे थे।

भुजबल ने महाराष्ट्र कैबिनेट में NCP के दिग्गज नेता धनंजय मुंडे की जगह ली है।। मुंडे ने मार्च में स्वास्थ्य कारणों का हवाला देते हुए खाद्य, नागरिक आपूर्ति और उपभोक्ता संरक्षण मंत्री पद से इस्तीफा दिया था।

भुजबल को यही खाद्य, नागरिक आपूर्ति और उपभोक्ता संरक्षण मंत्रालय मिल सकता है, क्योंकि इसके पहले वह दो बार यह मंत्रालय संभाल चुके हैं।

दिसंबर में मंत्री पद नहीं मिलने पर कहा था- क्या मैं खिलौना हूं महाराष्ट्र के नासिक जिले के येवला से विधायक भुजबल का कई दशकों लंबा राजनीतिक करियर रहा है। वह राज्य में OBC समुदाय के एक बड़े नेता हैं। भुजबल इससे पहले अलग-अलग सरकारों में उपमुख्यमंत्री और कैबिनेट मंत्री के पद पर काम कर चुके हैं।

पिछले साल दिसंबर में मुख्यमंत्री फडणवीस के मंत्रिमंडल विस्तार के दौरान उन्हें मंत्री पद नहीं मिला था, जिससे वह नाराज थे। उन्होंने 17 दिसंबर को नागपुर में एक एक प्रेस कॉन्फ्रेंस में दावा किया था कि मुख्यमंत्री फडणवीस उन्हें मंत्री बनाने के पक्ष में थे, लेकिन NCP अध्यक्ष अजित पवार ने इस पर कोई फैसला नहीं किया।

भुजबल ने कहा, ‘मैंने नासिक से लोकसभा चुनाव लड़ने का सुझाव स्वीकार किया था। जब मैं राज्यसभा में जाना चाहता था, तो मुझे विधानसभा चुनाव लड़वाया। अब 8 दिन पहले मुझे राज्यसभा सीट की पेशकश की गई, जिसे मैंने इनकार कर दिया।’

‘उन्होंने तब मेरी बात नहीं सुनी, अब वे मुझे राज्यसभा सीट दे रहे हैं। अगर मैं इस्तीफा दे दूंगा तो मेरे निर्वाचन क्षेत्र के लोग क्या सोचेंगे? क्या मैं आपके हाथों का खिलौना हूं? जब भी आप मुझसे कहेंगे मैं खड़ा हो जाऊंगा, जब भी आप मुझसे कहेंगे मैं बैठ जाऊंगा और चुनाव लड़ूंगा?’

भुजबल ने कहा था- मराठा आरक्षण का विरोध किया, इसलिए मंत्री नहीं बनाया भुजबल ने दावा किया था कि नौकरियों और शिक्षा में मराठा समुदाय के आरक्षण की मांग करने वाले मनोज जरांगे का विरोध करने के कारण उन्हें कैबिनेट से बाहर रखा गया। भुजबल ने कहा कि कैबिनेट विस्तार के बाद से उन्होंने NCP प्रमुख अजित पवार से बात नहीं की है।

NCP नेता ने आगे कहा, ‘लोकतंत्र में हर किसी को अपने विचार व्यक्त करने का अधिकार है। मैं पता लगाने की कोशिश कर रहा हूं कि मुझे मंत्री पद के लिए किसने अस्वीकार किया। मंत्री पद आते-जाते रहते हैं। मगर मुझे खत्म नहीं किया जा सकता।’

‘हर पार्टी में निर्णय पार्टी प्रमुख लेते हैं। जैसे देवेंद्र फडणवीस BJP के लिए और एकनाथ शिंदे शिवसेना के लिए, वैसे ही अजित पवार NCP के लिए निर्णय लेते हैं। CM फडणवीस ने जोर दिया था कि मुझे मंत्रिमंडल में शामिल किया जाना चाहिए। मैंने खुद इसकी पुष्टि की है।’

15 दिसंबर को हुआ था महाराष्ट्र सरकार का कैबिनेट विस्तार

राज्य की उप-राजधानी नागपुर में 33 साल बाद कैबिनेट विस्तार और शपथ ग्रहण हुआ था।

राज्य की उप-राजधानी नागपुर में 33 साल बाद कैबिनेट विस्तार और शपथ ग्रहण हुआ था।

महाराष्ट्र में विधानसभा चुनाव रिजल्ट के 23वें दिन 15 दिसंबर को नागपुर में मंत्रिमंडल विस्तार हुआ था। फडणवीस सरकार में 33 कैबिनेट और 6 राज्य मंत्रियों ने शपथ ली थी। CM और 2 डिप्टी CM समेत यह संख्या 42 हो गई थी। कैबिनेट में कुल 43 मंत्री शपथ ले सकते हैं। एक सीट खाली रखी गई। पूरी खबर यहां पढ़ें…

………………………………..

महाराष्ट्र की यह खबर भी पढ़ें…

CJI को महाराष्ट्र के चीफ सेक्रेटरी-DGP ने रिसीव नहीं किया, गवई बोले- बड़े अफसर प्रोटोकॉल का पालन नहीं करते

चीफ जस्टिस ऑफ इंडिया बनने के बाद जस्टिस बीआर गवई 18 मई को पहली बार मुंबई पहुंचे। हालांकि, उन्हें रिसीव करने चीफ सेक्रेटरी, DGP और मुंबई के पुलिस कमिश्नर नहीं पहुंचे। इस पर उन्होंने महाराष्ट्र-गोवा बार काउंसिल के कार्यक्रम में निराशा जताई। CJI गवई ने कहा, ‘मैं ऐसे छोटे-मोटे मुद्दों पर बात नहीं करना चाहता, लेकिन मैं इस बात से निराश हूं कि महाराष्ट्र के बड़े अफसर प्रोटोकॉल का पालन नहीं करते।’ पूरी खबर पढ़ें…

खबरें और भी हैं…



Source link

शेतकऱ्यांनंतर आता शिक्षकांच्या प्रश्नासाठी बच्चू कडू आक्रमक, अमरावतीच्या गुरुकुंज मोझरीत आंदोलन

शेतकऱ्यांनंतर आता शिक्षकांच्या प्रश्नासाठी बच्चू कडू आक्रमक, अमरावतीच्या गुरुकुंज मोझरीत आंदोलन


Bacchu Kadu : शेतकऱ्यांच्या प्रश्नानंतर आता शिक्षकांच्या प्रश्नासाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू (Bacchu Kadu) आक्रमक झाले आहेत. अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी येथे शिक्षकांच्या मागणीसाठी बच्चू कडू यांनी आंदोलन केले. शिक्षकांच्या उपस्थितीत बच्चू कडू यांनी सरकारच्या आदेशाची होळी केली. जिल्हा परिषद शाळांना जाचक ठरणारा जीआर रद्द करा अशी मागणी यावेळी बच्चू कडू यांनी केली. 

राज्य शासनाने 15 मार्च 2024 रोजी शालेय शिक्षणासंबंधी काढलेला संच मान्यतेचा शासन निर्णय हा जिल्हा परिषद शाळांचा घात करुन ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था मोडकळीस आणणारा आहे. त्यामुळं सरकारने यावर आपली भूमिका स्पष्ट करत हा जीआर तत्काळ रद्द करावा अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे.  सरकारने काढलेला हा जीआर बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम 2009 ला छेद देणारा असल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे. 

शेतकरी प्रश्नावरुनही बच्चू कडू आक्रमक

विधानसभा निवडणुकीपुर्वी सर्व पक्षीय आमदारांनी आपापल्या पक्षाच्या जाहिरनाम्यात शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते. आम्ही निवडून आल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफी देवू, असे ते म्हणाले होते. आम्ही शेतकऱ्यांचे पूत्र आहोत अशी जनतेला साद घालून ते निवडून आले. परंतु, आता कर्जमाफी बाबत चकार शब्दही बोलत नाही. शासनाने दिलेले आश्वासन न पाळल्याने महाराष्ट्रातील शेतकरी आसमानी संकटांनी कर्जाच्या खाईमध्ये डुबलेला आहे. राज्यात प्रत्येक दिवसाला 7 शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे अहवाल सांगतो आहे.  बच्चू कडू 2 जूनला बारामतीत अजित पवारांच्या घरासमोर ‘अर्थसंकल्प वाचन आंदोलन’ करत त्यांना कर्जमाफीची आठवण करुन देणार आहेत. बारामतीत सुरु करणाऱ्या आंदोलनाचा शेवट नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर आंदोलन करुन केला जाणार असल्याची माहिती कडू यांनी दिली आहे. अजित पवारांच्या घरासमोरील आंदोलनानंतर बच्चू कडू पुढे टप्प्याटप्याने पंकजा मुंडे, बाळासाहेब पाटील आणि संजय राठोड यांच्या घरासमोर आंदोलन करणार आहेत. यात सर्वात शेवटी कर्जमाफीच्या मुद्द्यावर नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्या घरासमोर आंदोलनाची घोषणा त्यांनी केली आहे. बच्चू कडू यांनी अकोल्यात आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान, कर्जमाफीच्या मुद्द्यावर 7 जुलैपासून तुकडोजी महाराजांचे समाधीस्थळ असलेल्या अमरावती जिल्ह्यातील गुरुकूंज मोझरी किंवा आपलं जन्मगाव असलेल्या कुरळपूर्णा येथे आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. 

महत्वाच्या बातम्या:

कर्जमाफीच्या मुद्द्यावर बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेचा एल्गार; राज्यभरात कार्यकर्ते आक्रमक, थेट कृषिमंत्र्यांच्या घरासमोर मशाल मोर्चा

 

अधिक पाहा..



Source link

अमरावतीत राणा-खोडके वाद पुन्हा चव्हाट्यावर; पालिका निवडणुकीच्या तोंडावर शाब्दिक चकमक

अमरावतीत राणा-खोडके वाद पुन्हा चव्हाट्यावर; पालिका निवडणुकीच्या तोंडावर शाब्दिक चकमक


Amravati Politics : अमरावती जिल्ह्यात राणा-खोडके वाद सर्वश्रुत आहे. अशातच स्थानिक स्वराज्य निवडणुकीत अमरावती जिल्ह्यात महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढणार की स्वबळावर याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान भाजप नेत्या यांनी नवनीत राणा (Navneet Rana) यांनी स्वबळावर लढणार आणि महापौर भाजपचाच होणार, असं वक्तव्य केलं.  आणि याला प्रत्युत्तर देतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय खोडके (Sanjay Khodke) यांनी तर थेट युवा स्वाभिमान पक्षावर निशाना साधत युती शक्यच नाही, असं विधान केलं. मात्र आम्ही भाजप सोबत जायला तयार पण युतीमध्ये युवा स्वाभिमान पक्ष असेल तर ही युती होणं शक्यच नाही, असे ही संजय खोडके म्हणाले. त्यामुळे आता पालिका निवडणुकीच्या तोंडावर अमरावतीत राणा-खोडके वाद चव्हाट्यावर आला आहे.

..तर ही युती होणं शक्यच नाही, संजय खोडकेंचा इशारा

राज्यात आगामी महापालिका निवडणुकांचं वारं वाहू लागलं आहे. या पार्श्वभूमीवर अमरावतीमध्येही राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजप अमरावती पालिका स्वबळावर लढणार, असं वक्तव्य नवनीत राणा यांनी केल्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार संजय खोडके यांनी रवी राणा आणि नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला आहे. अमरावती महापालिकेत भाजपशी युतीचा वरच्या स्तरावर निर्णय जरी होत असेल, तरी अमरावतीत राणा यांचा पक्ष सोबत असेल तर आम्ही स्वतंत्र निवडणूक लढणार. त्यांच्यासोबत आमचं ताळमेळ बसूच शकत नाही, असं संजय खोडके यांनी सांगितलंय. त्यामुळे हा वाद आता आणखी चिघळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. 

आम्ही सुद्धा पालिका निवडणूक स्वबळावर लढू- संजय खोडके

भाजप जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवत असतील तर आम्हीपण स्वबळावर लढण्यास तयार आहोत, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेले आहे. अमरावतीत भाजपने सांगितले की, आम्ही स्वबळावर लढू तर आम्हीसुद्धा पालिका निवडणूक स्वबळावर लढत आहे आणि याची तयारी सुद्धा आम्ही सुरू केली आहे. अमरावतीत 100 टक्के युती होऊ शकणार नाही..काही आमचे तत्व आहे. आमच्या सोबत भाजप असली तर आम्ही तयार आहोत, पण भाजप सोबत जे सहयोगी पक्ष आहे जे अमरावतीचे आहे. त्यांच्यासोबत युती होऊ शकत नाही. नाहीतर आम्ही स्वबळावर लढू. असा इशारा राष्ट्रवादीचे (अजित पवार) आमदार संजय खोडके यांनी नवनीत राणा यांना दिला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

तोंडात बंदुकीची नळी लावली तरी कलमा म्हणणार नाही, ‘भारत माता की जय’ हेच शेवटचे शब्द असतील : नवनी

तोंडात बंदुकीची नळी लावली तरी कलमा म्हणणार नाही, ‘भारत माता की जय’ हेच शेवटचे शब्द असतील : नवनी


Navneet Rana : तोंडात बंदुकीची नळी लावली तरी कलमा म्हणणार नाही, ‘भारत माता की जय’ हेच शेवटचे शब्द असतील, असे वक्तव्य भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी केले आहे. तुम्ही एका भारतीयाचा जीव घेतलात तर मोदी हजार जीव घेईपर्यंत शांत बसणार नाहीत, असेही त्यांनी म्हटले आहे. 

जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे निर्दोष भारतीय नागरिकांना धर्म विचारून त्यांची हत्या पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून (Pahalgam Terror Attack) करण्यात आली होती. यानंतर भारताच्या तीनही सैन्य दलाच्या जवानांनी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या (Operation Sindoor) माध्यमातून पाकिस्तानातील दहशतवादी अड़े नष्ट केले. भारतीय संरक्षण दलाच्या या गौरवपूर्ण कामगिरीच्या सन्मानार्थ आणि अमरावती शहरात भव्य तिरंगा रॅलीचे (Tiranga Rally) आयोजन करण्यात आले होते.  या रॅलीत भाजप नेत्या नवनीत राणा सहभागी झाल्या होत्या. ही रॅली राजकमल चौक येथून सुरू होऊन गांधी चौक, जवाहर गेट आणि पुढे जयस्तंभ चौक येथे आली. यानंतर महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून राष्ट्रगीताने रॅलीचा समारोप करण्यात आला. 

नेमकं काय म्हणाल्या नवनीत राणा? 

यावेळी नवनीत राणा यांनी भाषण करताना म्हटले की, ‘पाकिस्तान को मालूम होना चाहिये, भारत पाकिस्तान का बाप है, और बाप रहेगा…’ मी देखील एका माजी सैनीकाची मुलगी आहे. काही लोक पहलगामवरून घरी एसीत बसून दुःख व्यक्त करत आहे. दहशतवाद्यांनी विचारलं की, तुम्ही हिंदू आहे की मुसलमान आहे? मुसलमान आहे तर कलमा वाचा. आम्ही या देशासाठी आमचं रक्त देऊ, पण कलमा वाचणार नाही. जय श्रीरामचा नारा देऊ, तोंडात बंदुकीची नळी लावली तरी आम्ही कलमा म्हणणार नाही. फक्त भारत माता की जय हाच नारा आमच्या तोंडून निघेल. हिंदुळ्यानी पर आख भी उठाई तो तुम्हारा बाप मोदी दिल्ली मे बैठा है. एक-एक जीवाचा बदला हजारात घेईपर्यंत मोदी शांत बसणार नाहीत, असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला. तर या रॅलीत नवनीत राणा यांच्याकडून पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देखील देण्यात आल्या.  

नवनीत राणा यांना मिळाली होती पाकिस्तानमधून धमकी 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तानमधून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. नवनीत राणा यांनी खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून या धमकीविषयी सविस्तर माहिती दिली होती. पाकिस्तानहून आलेल्या कॉलमध्ये धमकी दिली गेली होती की, “हमारे पास तुम्हारी पुरी जानकारी है, हिंदू शेरनी तू कुछ दिन की मेहमान है, तुझे खत्म कर देंगे, ना सिंदूर बचेगा ना सिंदूर लगाने वाली बचेंगी,” असे म्हटले गेले होते. तर अशाच प्रकारचे कॉल त्यांचे पती रवी राणा यांच्या मोबाईलवर देखील आल्याची माहिती समोर आली होती. या संपूर्ण प्रकरणाची नोंद खार पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस तपास सुरू आहे.

आणखी वाचा 

पाकिस्तानचा भारताला काॅपी करण्याचा धंदा सुरुच; अन्यथा सिंधू नदीमधून रक्ताचे पाट वाहतील म्हणणाऱ्या बिलावल भुट्टोंना जबाबदारी!

अधिक पाहा..



Source link

शेतकऱ्यांना खतं आणि बियाणं जास्त भावात विकणाऱ्या कंपन्यांवर कारवाई होणार : आकाश फुंडकर

शेतकऱ्यांना खतं आणि बियाणं जास्त भावात विकणाऱ्या कंपन्यांवर कारवाई होणार : आकाश फुंडकर


Akash Fundkar : खतं आणि बियाणांचं लिंकिंग करणाऱ्या आणि जास्त भावात विकणाऱ्या कंपन्यांवर राज्य सरकार कारवाई करणार असल्याची माहिती राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिली आहे. अकोला येथे आज जिल्हा खरीप नियोजनची बैठक पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी आकाश फुंडकर बोलत होते. आज अकोला जिल्ह्याची खरीपपुर्व आढावा बैठक प्रचंड वादळी ठरली. 

अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात ही बैठक पार पडलीय. या बैठकीत शेतकऱ्यांना वेळेवर आणि गुणवत्तापूर्ण कृषी निविष्ठांचा पुरवठा करण्याच्या मागणीवर लोकप्रतिनिधींनी भर दिला आहे. यावेळी बियाणे आणि खतांच्या पुरवठ्यावरुन जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांची चांगलीच सरबत्ती केली आहे. मात्र, यात अपुऱ्या माहितीमुळं अनेकदा कृषी विभागाचं पितळ उघडं पडलं आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात एकूण 10 लाख हेक्टर क्षेत्रावर पीक लागवडीचे नियोजन कृषी विभागाने ठरवलं आहे. जिल्ह्यातील आमदारांनी यावेळी पालकमंत्र्यांकडे लिंकिंग आणि आणि जास्त भावात बियाणांची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या बैठकीला जिल्ह्यातील आमदारांसह जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी लिंकिंग करणाऱ्या कंपन्यांवर सरकार कारवाई करणार असल्याचा इशारा दिला आहे. 

दरम्यान, खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातील स्वर्ग’ या पुस्तकावरून त्यांनी जोरदार टीका केलीये. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे आम्ही बाल साहित्य वाचत नसतो असं ते म्हणाले. यासोबत संजय राऊत हा वाह्यात माणूस असल्याचा टोलाही मंत्री आकाश फुंडकर यांनी राऊतांना लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या:

Nashik News : खते-बियाण्यांमध्ये भेसळ, कृषी विभाग अ‍ॅक्शन मोडवर, नाशिकमध्ये 62 विक्रेत्यांविरोधात मोठी कारवाई

अधिक पाहा..



Source link

Amravati Rain Loss : अमरावतीच्या धामणगावातील बाजार समितीत पावसामळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

Amravati Rain Loss : अमरावतीच्या धामणगावातील बाजार समितीत पावसामळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान


Amravati Rain Loss : अमरावतीच्या धामणगावातील बाजार समितीत पावसामळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

आजच्या महत्वाच्या बातम्या –
भारताच्या ब्राह्मोसच्या ताकदीपुढं पाकिस्ताननं गुडघे टेकले, संरक्षणमंत्री राजनाथसिंहांचं भूजमध्ये वक्तव्य..अंधाऱ्या रात्री पाकिस्तानला उजेड दाखवल्याचे गौरवोद्गार..  
दोन दिवसांत पाकिस्तानच्या सहा दहशतवाद्यांचा खात्मा, काश्मीर पोलीस आणि लष्करानं पत्रकार परिषद घेऊन दिली माहिती, काश्मिरमधली दहशतवादाची इकोसिस्टीम संपवून टाकण्याचा निर्धार… 
भारत सरकार पाकला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्तानचा फास आवळणार, एअर इंडिया आणि इंडिगोला तुर्कीच्या विमान कंपन्यांसोबतची भागीदारी तोडायला सांगण्याची शक्यता
सोलापुरातल्या तिरंगा रॅलीला भव्य प्रतिसाद, हजारो लोकांचा उत्स्फुर्त सहभाग, पालकमंत्री जयकुमार गोरेंनी केलं नेतृत्व..
कारागृहात संजय राऊतांनी लिहिलेलं पुस्तक एबीपी माझाच्या हाती, ‘नरकातला स्वर्ग’ पुस्तकात बाळासाहेबांनी अमित शाहांवर उपकार केल्याचा दावा
गोध्राकांडात मोदींना अटक करु नये अशी शरद पवारांनी भूमिका घेतली होती, नरकातला स्वर्ग पुस्तकात संजय राऊतांचा गौप्यस्फोट, अमित शाहांच्या जामीनासाठी प्रयत्न केल्याचा दावा



Source link