मूलबाळ होत नसल्याने सल्ला घेतला, नवस पूर्ण करण्यासाठी आळंदीला आणलं; अन्…

मूलबाळ होत नसल्याने सल्ला घेतला, नवस पूर्ण करण्यासाठी आळंदीला आणलं; अन्…


Akola Crime News: अकोल्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय .मूलबाळ होत नसलेल्या एका महिलेने इंस्टाग्राम फेसबुकवरून मैत्री करत एका दांपत्याचा सल्ला घेतला . बार्शीटाकळीच्या आसरा देवीला नवस केल्यानंतर दुसरा नवस पूर्ण करण्यासाठी आळंदीत गेलेल्या महिलेला  लॉजवर थांबवत एका नराधमाने महिलेच्या जेवणात गुंगीचे औषध टाकून तिच्यावर लैंगिक अत्याचार केलाय . (sexual Assault) दाम्पत्याच्या सहाय्याने हा सगळा प्रकार घडला . लैंगिक अत्याचार करून महिलेला पुण्यात सोडून देण्यात आले .या घटनेनंतर पीडित महिलेने अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी पोलिसांना घडलेला प्रकार सांगत तक्रार दिली . पोलिसांनी आरोपी सुरेश पाचपोरसह बुलढाणा जिल्ह्यातील नागेश हिवराळे आणि ज्योती हिवराळे या दांपत्यालाही अटक केली आहे . (Akola crime news)

नक्की घडले काय ?

इंस्टाग्राम आणि फेसबुकवरून झालेली ओळख अकोल्यातील एका महिलेला चांगलीच महागात पडली आहे. मुलबाळ न झाल्याने चिंता वाढलेल्या महिलेने बुलढाणा जिल्ह्यातील नागेश आणि ज्योती हिवराळे या दांपत्याचा सल्ला घेतला. मात्र, त्यांच्या ‘नवसाचे’ सल्ले आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली या महिलेला जाळ्यात ओढून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. दांपत्याने महिलेला अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील दोनद येथील आसरा देवीच्या दर्शनाला जाऊन नवस करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर दुसऱ्या नवसासाठी तिला आळंदीला नेण्यात आले. दाम्पत्याच्या सहाय्याने सुपेश पाचपोर नावाच्या नराधमाने महिलेच्या जेवणात गुंगीचं औषध मिसळून तिला बेशुद्ध केलं आणि नंतर एका लॉजवर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. या घटनेनंतर पीडित महिलेला पुणे येथे सोडून दिलं. घडलेला प्रकार लक्षात आल्यावर पीडितेने धाडस करून अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी सुपेश पाचपोर याच्यासह नागेश आणि ज्योती हिवराळे या दांपत्याला अटक केली असल्याचं बार्शीटाकळीचे ठाणेदार दीपक वारे यांनी सांगितलं.

हेही वाचा:

Pune Crime News: मागून येऊन तोंड दाबलं, गळा दाबत मागे नेऊन लैंगिक अत्याचार केला अन्…, पोलिसांकडून चाकण अत्याचाराबाबत नवी अपडेट

अधिक पाहा..



Source link

अमोल कोल्हे अन् जानकरांनी नाक घासून अजित दादांची माफी मागावी, मगच चर्चा; मिटकरींनी ठेवली अट

अमोल कोल्हे अन् जानकरांनी नाक घासून अजित दादांची माफी मागावी, मगच चर्चा; मिटकरींनी ठेवली अट


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रिकरणावर सध्या जोरदार चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) बैठकीत अजित पवारांनी (Ajit pawar) याबाबत स्पष्टीकरण दिल्याचे वृत्त माध्यमांत झळकले आहे. त्यानंतर, आमदार अमोल मिटकरी यांनी बैठकीत अशी कुठलाही चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट करत दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत आमच्या पक्षाच्या काही अटी व शर्ती असल्याचं त्यांनी म्हटलंय. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा कुठलाही विषय आमच्या बैठकीत नव्हता. तसेच, दोन पक्ष एकत्र येण्याच्या बातम्या पेरण्यात आल्या असून त्यात तथ्य नाही. मात्र, जर दोन राष्ट्रवादी एकत्र येत असतील तर आमच्या पक्षाच्या काही अटी-शती आहेत, असे म्हणत त्यांनी एकत्र येण्याचा फॉर्म्युलाच एकप्रकारे सांगितला आहे. त्यामध्ये, अजित पवारांवर विखारी टीका करणाऱ्या शरद पवारांच्या पक्षातील नेत्यांनी नाक घासून माफी मागावी, अशी अट अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी घातली आहे. 

अजितदादांवर ज्यांनी निवडणुकीत विखारी टीका केली, त्यांनी नाक घासून दादांची माफी मागावी, त्यानंतरच दादांनी एकत्रिकरणाबाबत चर्चा करावी, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि आमदार अमोल मिटकर यांनी व्यक्त केली. तसेच, टोकाची भाषणं करणाऱ्यांमध्ये पहिला नंबर उत्तमराव जानकर तर दुसरा नंबर अमोल कोल्हेंचा आहे, यांना लाज, लज्जा, शरम वाटत असेल तर माफी मागून पापक्षालन करावं, अशा शब्दात अमोल मिटकरींनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील एकत्रिकरणाच्या चर्चेवर अटी व शर्तींसह भाष्य केलं आहे. मात्र, दोन्ही पक्षाच्या एकत्र येण्यासंदर्भात अजित पवार सांगतील तेच धोरण, आणि ते बांधतील तेच तोरण असेही मिटकरी यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, राज्याचे क्रीडामंत्री दत्ता भरणे यांच्या शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादीच्या आमदार व प्रमुख नेत्यांची बैठक झाली, या बैठकीला आमदार अमोल मिटकरीही मुंबई येथे उपस्थित होते. दरम्यान, पक्षाच्या बैठकीतल्या गोष्टी बाहेर जात असतील तर असं करणाऱ्यांवर पक्षाने कठोर कारवाई करावी. पक्षातील बैठकीत न झालेल्या चर्चांच्या खोट्या बातम्या बाहेर पेरणाऱ्या सूत्रांवर पक्षाने कारवाई करण्याची मागणी आपण अजित पवार यांच्याकडे करणार असल्याचेही आमदार मिटकरी यांनी सांगितले. 

शरद पवार आणि सुप्रिया सुळे निर्णय घेतील

पवार कुटुंब हे कुटुंब म्हणून एकत्रच आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एकत्र आल्यास मला आनंदच होईल, असे खासदार बजरंग सोनवणे यांनी म्हटलं. परंतु, याबाबतचा जो काही अंतिम निर्णय असेल तो आमचे नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे हेच घेतील. ते जे काही निर्णय घेतील त्यासोबत आम्ही राहणार असल्याचेही बजरंग सोनवणे यांनी स्पष्ट केले. 

हेही वाचा

मोदीजी ने मेरा ‘सिंदूर’ मुझे लौटा दिया; BSF जवानाची पत्नी भावूक, पतीसोबत व्हिडिओ कॉलवरुन संवाद

अधिक पाहा..



Source link

अमरावती, अकोला, परतवाड्यासह यवतमाळच्या सराफ दुकानात आयकर विभागाच्या धाडी; सराफा वर्तुळात खळबळ

अमरावती, अकोला, परतवाड्यासह यवतमाळच्या सराफ दुकानात आयकर विभागाच्या धाडी; सराफा वर्तुळात खळबळ


Income Tax Department Raids : अमरावती, अकोला, परतवाडा येथील एकता ज्वेलर्स या दुकानावर आज (14 मे 2025)आयकर विभागाने (Income Tax Department) एकाएकी धाडी टाकल्याचे समोर आले आहे. एकता ज्वेलर्सची मुख्य शाखा ही अमरावती शहरातील जयस्तंभ चौकात आहे. सध्या एकता ज्वेलर्स हे सराफा दुकान पूर्णपणे बंद असून आतमध्ये आयकर विभागाचे अधिकारी तपास करत आहे. तर बाहेर तीन वाहनं असून अंदाजे 15 आयकर विभागाचे अधिकारी या प्रकरणी तपासणी करत असतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र या धाडीमागील नेमकं करण काय? आणि यामध्ये काय घबाड बाहेर येईल? हे तपासणीनंतर कळू शकणार आहे. सोबतच एकता ज्वेलर्सची ब्रांच परतवाडा याठिकाणी सुद्धा असल्याने त्याठिकाणी सुद्धा आयकर विभागाचे अधिकारी तपास करताय.

 यवतमाळ शहरातील एकता ज्वेलर्स बंद 

अमरावती, अकोला, परतवाडा येथील सराफा दुकानावर आयकर विभागाच्या धाडी पडल्यानंतर  यवतमाळ शहरातील मेन लाईन परिसरात असलेल्या एकता ज्वेलर्स हे सराफा दुकान पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे. परतवाडा येथील एकता ज्वेलर्स या प्रमुख पेढीवर कारवाई सुरू आहे. त्याच एकता ज्वेलर्सच्या यवतमाळ सराफा दुकानाचे सर्व्हर एकच असल्याने यवतमाळ येथील दुकान बंद आहे. यवतमाळच्या दुकानात प्रत्यक्ष कारवाई सुरू नसली तरी सर्व्हर एकच असल्याने कामकाज ठप्प आहे.

अकोल्यातही कारवाई, सराफा वर्तुळात खळबळ

दुसरीकडे, अकोला शहरातल्या गांधी रोडवरील पाच ते सहा ज्वेलर्सवर आयकर विभागानं छापा टाकला आहे. आज सकाळपासूनच ही कारवाई सुरू झाली असल्याची माहिती समोर आली आहे. शहरातील पूनम ज्वेलर्स, अग्रवाल ज्वेलर्स, ईशा ज्वेलर्स यांच्यावर इन्कम टॅक्सची धाड पडली आहे. नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथील पथकांचा यामध्ये समावेश असून आयकर विभागाच्या या  कारवाईने अकोल्यातील सराफा वर्तुळात खळबळ उडाली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षकला 1 लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक 

मुंबईच्या गोवंडी परिसरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव मधुकर देशमुख यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 1 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली.

15 ऑगस्ट 2024 रोजी या परिसरातील एका शाळेच्या गेटचे कुलूप तोडून काही जणांनी परिसरात जबरदस्तीने प्रवेश केला होता. यासंदर्भात शाळेच्या ट्रस्टीनी  शिवाजीनगर पोलीस ठाणे आणि धर्मादाय आयुक्त यांच्याकडे तक्रार दिली होती. या प्रकरणात पोलीस संरक्षण आणि विरोधकांना ट्रस्टच्या परिसरात प्रवेश न देण्याच्या मोबदल्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबूराव देशमुख यांनी तीन लाख रुपयांची मागणी केली होती.

या बाबत ट्रस्टीने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. काल (13 मे ) रात्री यातील 1 लाख रुपये स्वीकारताना लाचलुचपत विभागाने त्याला रंगेहात पकडले असून पुढील कारवाई लाचलुचपत विभाग करीत आहे. मात्र यामुळे पुन्हा एकदा मुंबई पोलीस खात्यातील भ्रष्टाचाराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

हे ही वाचा 

अधिक पाहा..



Source link

अमरावतीत जन्म, अनेक ऐतिहासिक निकाल; कोण आहेत भारताचे नवे सरन्यायाधीश भूषण गवई?

अमरावतीत जन्म, अनेक ऐतिहासिक निकाल; कोण आहेत भारताचे नवे सरन्यायाधीश भूषण गवई?


Chief Justice of India BR Gavai: न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई (Bhushan Gavai) यांनी आज (14 मे 2025) भारताचे 52 वे सरन्यायाधीश (Chief Justice of India) म्हणून रोजी शपथ घेतली आहे. सध्याचे सरन्यायाधीश संजीव खन्ना 13 मे 2025 रोजी झाले, त्यांच्या शिफारशीवरून न्यायमूर्ती गवई यांची नियुक्ती झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात भूषण गवई यांचा शपथविधी सोहळा पार पडला. भूषण गवई यांचा कार्यकाळ 14 मे 2025 पासून 23 नोव्हेंबर 2025 पर्यंत, म्हणजेच सुमारे सहा महिने आणि दहा दिवसांचा असणार आहे.

भूषण गवई यांच्याविषयी थोडक्यात माहिती-

जन्म आणि शिक्षण-

भूषण गवई यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1960 रोजी महाराष्ट्रातील अमरावती येथे झाला. त्यांनी अमरावती येथून प्राथमिक शिक्षण घेतले.

कायदेशीर कारकीर्द-

– 16 मार्च 1985 रोजी त्यांनी वकिलीला सुरुवात केली.
– 1987 ते 1990 दरम्यान मुंबई उच्च न्यायालयात स्वतंत्रपणे वकालत केली, त्यानंतर मुख्यतः नागपूर खंडपीठात काम केले.
– 1992-93 मध्ये नागपूर खंडपीठात सहाय्यक सरकारी वकील आणि अतिरिक्त लोक अभियोक्ता म्हणून कार्यरत होते
– 17 जानेवारी 2000 रोजी नागपूर खंडपीठासाठी सरकारी वकील आणि लोक अभियोक्ता म्हणून नियुक्त झाले.
– 14 नोव्हेंबर 2003 रोजी मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून पदोन्नती मिळाली आणि 12 नोव्हेंबर 2005 रोजी कायमस्वरूपी न्यायाधीश झाले.
– 24 मे 2019 रोजी त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली.

भूषण गवई यांचे महत्त्वाचे योगदान-

– सर्वोच्च न्यायालयात त्यांनी जनहित याचिकांसाठी आठवड्यातून एक दिवस निश्चित केला.m
– उत्तर प्रदेशातील बुलडोझर कारवाईविरोधात सरकारला फटकारले.
– नोटबंदी (2016), अनुच्छेद 370 रद्द करणे, आणि इलेक्टोरल बॉण्ड योजना रद्द करण्याच्या ऐतिहासिक निकालांमध्ये त्यांचा सहभाग होता.
– अनुसूचित जाती आणि जमातींसाठी उप-वर्गीकरणाला समर्थन देताना “क्रीमी लेयर” ची ओळख आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले
– त्यांचे वडील रा. सु. गवई हे भारतीय रिपब्लिकन पक्षाचे नेते, माजी खासदार आणि बिहार, सिक्कीम, केरळचे राज्यपाल होते.
– गवई कुटुंबाला आंबेडकरी चळवळीचा वारसा आहे
नागपूर बार असोसिएशनचे ते तिसरे सदस्य आहेत जे CJI होत आहेत (यापूर्वी मोहम्मद हिदायतुल्ला आणि शरद बोबडे).
– शपथविधी 14 मे 2025 रोजी होईल, आणि त्यांचा कार्यकाळ 23 नोव्हेंबर 2025 पर्यंत असेल, कारण सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्ती वय 65 आहे.
– त्यांच्या नियुक्तीची अधिसूचना केंद्रीय विधी मंत्रालयाने 29 एप्रिल 2025 रोजी जारी केली.
– केंद्रीय विधी मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली.

संबंधित बातमी:

Justice Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई सरन्यायाधीशपदी; आज घेणार गोपनीयतेची शपथ

अधिक पाहा..



Source link

महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई सरन्यायाधीशपदी; आज घेणार गोपनीयतेची शपथ

महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई सरन्यायाधीशपदी; आज घेणार गोपनीयतेची शपथ


Justice Bhushan Gavai: न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई हे भारताचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून आज शपथ घेणार आहेत. विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना काल निवृत्त झाले. आता आज (14 मे) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या नव्या सरन्यायाधीशांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. न्यायमूर्ती भूषण गवई यांचा सरन्यायाधीशपदाचा कार्यकाळ आजपासून 23 नोव्हेंबर 2025 पर्यंत म्हणजेच सहा महिने दहा दिवसांचा असणार आहे. 

न्यायाधीश भूषण गवई यांची कारकीर्द-

न्यायमूर्ती भूषण गवई यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1960 रोजी महाराष्ट्रातील अमरावती येथे झाला. भूषण गवई यांनी 16 मार्च 1985 रोजी वकिली सुरू केली. 1990 नंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर भूषण गवई यांनी वकिली केली. 12 नोव्हेंबर 2005 रोजी त्यांची उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आणि सर्वोच्च न्यायालयातील अनेक घटनात्मक खंडपीठांचा ते भाग होते ज्यांनी ऐतिहासिक निकाल दिले आहेत.

भूषण गवई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठात कार्यरत असतानाच्या काही आठवणी – 

न्यायाधीश भूषण गवई हे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असताना नागपूर खंडपीठातही कार्यरत होते.. त्यादरम्यान ताडोबा व्याघ्र प्रकल्प येथे पर्यटनासाठी गेले असताना तिथल्या परंपरेप्रमाणे बँड वादनाने त्यांना मानवंदना देण्यात आली होती.. न्यायाधीश गवई यांनी त्या परंपरे संदर्भात विचारले असता ब्रिटिश काळापासून ती परंपरा कायम असून उच्च पदस्थ सरकारी अधिकारी किंवा न्यायमूर्ती आल्यास अशीच मानवंदना दिली जाते असे त्यांना सांगण्यात आले.. तेव्हा न्यायाधीश गवई यांनी त्या ब्रिटिश कालीन परंपरेला विरोध दर्शवत ती त्वरित बंद करण्याचे निर्देश ताडोबा येथील अधिकाऱ्यांना दिले होते.

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कार्यरत असताना न्या. गवई यांनी “महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ” नागपुरात स्थापन व्हावे यासाठी महत्त्वाचे योगदान दिले होते. महाराष्ट्रातील सार्वजनिक बांधकाम विभागातील कोट्यवधी रुपयांचा घोटाळा, तसेच हजारो कोटींचा सिंचन घोटाळा या संदर्भातील न्यायालयीन खटल्यामध्ये त्यांनी कठोर भूमिका स्वीकारली होती. महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत सुधारणा व्हावी, विविध न्यायालयांमधील पायाभूत सुविधांच्या उभारणी संदर्भातही त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून विशेष योगदान दिले होते आणि त्यासाठी विविध आदेशही पारित केले होते. 

भूषण गवई होते कलम 370 रद्द करणाऱ्या खंडपीठाचा भाग-

कलम 370 रद्द करून जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्याचे समर्थन करणाऱ्या खंडपीठाचा भूषण गवई भाग होते. 2016 च्या नोटाबंदीला घटनात्मक आणि कायदेशीरदृष्ट्या योग्य घोषित करणाऱ्या खंडपीठाचेही ते सदस्य होते. निवडणूक देणग्यांसाठी इलेक्टोरल बाँड योजना रद्द करण्याचा निर्णय देणाऱ्या खंडपीठाचाही भूषण गवई हे भाग होते.

संबंधित बातमी:

Justice Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई यांची सरन्यायाधीश पदावर नियुक्ती; 14 मे रोजी घेणार शपथ

अधिक पाहा..



Source link

मोठी बातमी : उद्या होतं लग्न, काँग्रेस नेत्याचा मुलगा आज बेपत्ता, अमरावती पोलिसात तक्रार दाखल

मोठी बातमी : उद्या होतं लग्न, काँग्रेस नेत्याचा मुलगा आज बेपत्ता, अमरावती पोलिसात तक्रार दाखल


Congress leader Haribhau Mohod son went missing : अमरावती जिल्ह्यातून खळबळजनक बातमी समोर आलीये. उद्या ज्या मुलाचं लग्न होतं, तो मुलगा आज (दि.13) बेपत्ता झालाय. विशेष म्हणजे हा मुलगा अमरावतीतील काँग्रेस (Congress) नेत्याचा आहे. या प्रकरणी वडील असलेल्या काँग्रेस नेत्याकडून (Congress leader) अमरावती पोलीस (Amravati police station) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

लग्नाच्या एकदिवस आधी वैभव मोहोड बेपत्ता 

अधिकची माहिती अशी की, काँग्रेस नेते हरिभाऊ मोहोड (Haribhau Mohod) यांचा मुलगा लग्नाच्या एकदिवस आधी बेपत्ता झालाय. वैभव मोहोड (Vaibhav Mohod) (वय 30) असं बेपत्ता झालेल्या तरुणाच नाव आहे. याप्रकरणी वैभव मोहोड याचे वडील हरिभाऊ मोहोड यांनी अमरावतीच्या  फ्रेजरपुरा पोलिसात तक्रार दाखल केली आहे. 

शिवाजी महाविद्यालयात लिपिक म्हणून कार्यरत होता वैभव 

वैभव हा काँग्रेसचे नेते आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक हरिभाऊ मोहोड यांचा मुलगा आहे. वैभव  शिवाजी महाविद्यालयात लिपिक म्हणून कार्यरत होता. आज सकाळी सामान आणायला बाहेर जातो, असं सांगून गेलेला वैभव घरी परत न आल्याने वडिलांकडून पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

एटीएममधून 40 हजार रुपये काढल्याचीही माहिती समोर

बेपत्ता झालेल्या वैभव याने सकाळीच एटीएममधून 40 हजार रुपये काढल्याचीही माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास फ्रेजरपुरा  पोलीस करत आहेत. पोलिसांनी मिसिंगची नोंद केली आहे. हरिभाऊ मोडक हे  काँग्रेस पक्षाचे एक ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत विविध पदांवर काम केले होते. 

हरिभाऊ मोहोड हे जिल्हापरिषदेचे माजी उपाध्यक्ष आहेत. त्यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिवपदी देखील करण्यात आली होती. हरिभाऊ मोहोड हे काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचे कट्टर समर्थक मानले जातात. अभ्यासू नेते म्हणून हरिभाऊ मोहोड यांची ओळख आहे. दरम्यान, ऐन लग्नाच्या एक दिवस अगोदर मोहोड यांचा मुलगा बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. अमरावती पोलिसांनी वैभव मोहोड यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli Rohit Sharma : निवृत्ती घेतली आता 2027 चा वनडे विश्वचषक विसरा… विराट कोहली-रोहित शर्मावर सुनील गावसकर यांचं खळबळजनक वक्तव्य

South Africa Squad WTC Final 2025 : ड्रग्ज प्रकरणानंतर कागिसो रबाडा परतला, बावुमाकडे कर्णधारपदाची धुरा! WTC फायनलसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर

अधिक पाहा..



Source link