Nitin Deshmukh Akola : हिवाळी अधिवेशनाआधी कर्जमाफी दिली नाही तर.. नितीन देशमुखांचा थेट इशारा

Nitin Deshmukh Akola : हिवाळी अधिवेशनाआधी कर्जमाफी दिली नाही तर.. नितीन देशमुखांचा थेट इशारा


Nitin Deshmukh Akola : हिवाळी अधिवेशनाआधी कर्जमाफी दिली नाही तर.. नितीन देशमुखांचा थेट इशारा

Follow AI generated Transcription – (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)

अकोल्यात कर्जमाफीच्या मखगणीसाठी आज ठाकरेंच्या शिवसेनेनं आज आक्रमक होत भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढलाय. ठाकरे गटाच्या या मोर्चाच्या व्यासपीठावर प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडूंनी उपस्थिती लावल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या गेल्यायेत. ठाकरे गटाची उपनेते आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला होताय. या मोर्चात शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी जिल्हा मंगेश काळे यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्य केलीय. बच्चू कडूंनी देवेंद्र फडणवीसांचा आपल्या भाषणात एकेरी उल्लेख केलाय. 

कर्जमाफीच्या मुद्द्यावर आज अकोल्यासह पश्चिम विदर्भात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झालीय. अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात आज ठाकरे गटाने ट्रॅक्टर मोर्चा काढत सरकारकडे शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी केलीय. अकोल्यात शिवसेना ठाकरे गटाची उपनेते आणि बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आलाय. या मोर्चात जिल्हाभरातून पाचशेवर ट्रॅक्टरसह शेतकरी, शिवसैनिक आणि महिला सहभागी झाल्या होत्याय. अकोला क्रिकेट क्लब मैदानापासून या मोर्चाला सुरुवात झालीय. बस स्थानक चौक पंचायत समिती असं मार्गक्रमण करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर या मोर्चाचा मोर्चा सभेने समारोप झालाय.



Source link

कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन बच्चू कडूंचा प्रहार, ‘डीसीएम टू सीएम’ आंदोलनाची घोषणा

कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन बच्चू कडूंचा प्रहार, ‘डीसीएम टू सीएम’ आंदोलनाची घोषणा


Bacchu Kadu : कर्जमाफीच्या मुद्द्यावर (loan waiver) प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. कडू यांनी पुढच्या महिन्यापासून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. बच्चू कडू यांनी ‘डीसीएम टू सीएम’ अशा आंदोलनाची घोषणा केली आहे. या आंदोलनांतर्गत बच्चू कडू 2 जूनला बारामतीत अजित पवारांच्या घरासमोर ‘अर्थसंकल्प वाचन आंदोलन’ करत त्यांना कर्जमाफीची आठवण करुन देणार आहेत. बारामतीत सुरु करणाऱ्या आंदोलनाचा शेवट नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर आंदोलन करुन केला जाणार असल्याची माहिती कडू यांनी दिली आहे. 

7 जुलैपासून तुकडोजी महाराजांचे समाधीस्थळ असलेल्या मोझरी इथं आमरण उपोषण करणार

अजित पवारांच्या घरासमोरील आंदोलनानंतर बच्चू कडू पुढे टप्प्याटप्याने पंकजा मुंडे, बाळासाहेब पाटील आणि संजय राठोड यांच्या घरासमोर आंदोलन करणार आहेत. यात सर्वात शेवटी कर्जमाफीच्या मुद्द्यावर नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर आंदोलनाची घोषणा त्यांनी केली आहे. बच्चू कडू यांनी अकोल्यात आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान, कर्जमाफीच्या मुद्द्यावर 7 जुलैपासून तुकडोजी महाराजांचे समाधीस्थळ असलेल्या अमरावती जिल्ह्यातील गुरुकूंज मोझरी किंवा आपलं जन्मगाव असलेल्या कुरळपूर्णा येथे आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. 

अजित पवारांवरही जोरदार टीका

दरम्यान, अजित पवारांनी कर्जमाफीचे आश्वासन आपण दिले नसल्याच्या मुद्द्यावरून त्यांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादीचा राजकीय बाप असलेल्या भाजपचं कर्जमाफीचं वचन पूर्ण करणं ही अजित पवारांची जबाबदारी असल्याचं ते म्हणालेत. शेवटी बापानं दिलेलं वचन मुलालाच पुर्ण करावं लागतं असा टोलाही त्यांनी अजित पवारांना लगावलाय.

सरकारला 100 दिवस झाले तरीही कर्जमाफी नाही

सरकारला 100 दिवस उलटून देखील शेतकरी कर्जमाफी बाबतीत सरकार निर्णय घेत नसल्याने प्रहार संघटना आक्रमक झाली आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (dcm Ajit Pawar) यांनी 31 मार्चपर्यंत शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाचे पैसे भरावे असं वक्तव्यही केलं होतं. यावरुनच प्रहार संघटना आक्रमक झाली आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुतीने जो जाहीरनामा प्रसिद्ध केला होता, यामध्येसुद्धा शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी या विषयाचा उल्लेख होता. तसेच महायुतीच्या नेत्यांनी देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी करु असं आश्वासनं दिलं होतं. मात्र, अद्यापही कर्जमाफीबाबतचा निर्णय झालेला नाही. त्यामुळं शेतकरी आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 

महत्वाच्या बातम्या:

सरकारचे 100 दिवस पूर्ण तरी कर्जमाफी नाही, बच्चू कडू आक्रमक, कृषीमंत्र्यांच्या दारातच पेटवणार मशाल

अधिक पाहा..



Source link

काँग्रेसचं अधिवेशन बोलवा आणि मोदींच्या अभिनंदनाचा ठराव घ्या, बावनकुळेंची मागणी

काँग्रेसचं अधिवेशन बोलवा आणि मोदींच्या अभिनंदनाचा ठराव घ्या, बावनकुळेंची मागणी


Chandrashekhar Bawankule : आता जातीनिहाय जनगणना होणार आहे. 1948 नंतर काँग्रेसने लोकांना…बनवलं. इंदिरा गांधी, पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी लोकांचा विचार केला नाही, अशी टीका मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली. 2027 पर्यंत जनगनणा होणार आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणत होते की जनगणना केव्हा होणार? पण त्यांनी 65 वर्ष काय केलं? तुम्ही जनगणना केली नाही, अशी टीका बावनकुळे यांनी केली. काँग्रेसचं अधिवेशन बोलवा आणि मोदींच्या अभिनंदनाचा ठराव घ्या, असेही बावनकुळे म्हणाले. 

काँग्रेसचं अधिवेशन बोलवा आणि मोदींच्या अभिनंदनाचा ठराव घ्या

जातीनिहाय जनगणनेसाठी राहुल गांधी यांना जर मोदींचं अभिनंदन करायचं असेल तर काँग्रेसचे अधिवेशन बोलवा आणि त्यात अभिनंदनाचा ठराव घ्यावा असे बावनकुळे म्हणाले. जनगणनेच्या निर्णयाचे अभिनंदन करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून मी निर्णय घेतला की महाराष्ट्रातील 1 लाख 186 बूथ वर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अभिनंदनाचा ठराव घेणार असल्याचे बावनकुळे म्हणाले. तर येणाऱ्या ग्रामसभेत राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा अभिनंदनचा ठराव घेतला जाणार असल्याचे बावनकुळे म्हणाले. 

राज्यात मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतीमध्ये महिला निवडणूक लढवणार 

राज्यात मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतीमध्ये महिला निवडणूक लढवणार आहेत. देशात 200 च्या वर महिला खासदार होणार आहेत असे बावनकुळे म्हणाले. आरोप प्रत्यारोप आणि नौटंकी वेगळी असते, पण मतदारसंघाच्या समस्या मांडण्यासाठी वकील म्हणून प्रवीण तायडे काम करत आहेत. मी अमरावतीच्या आचलपूर विधानसभेच्या जनतेच्या पाया पडतो, नतमस्तक होतो तुम्ही नरेंद्र मोदी यांचे ऐकले असे बावनकुळे म्हणाले. 15 दिवसात अचलपूर येथील बंद पडलेल्या फिनले मिलच्या संदर्भात मिटिंग लावेल. आता अचलपूरच्या विकासाच्या गाडीच्या मधात कोणीही आलं तर अँक्सिडेंट होणार आहे असे बावनकुळे म्हणाले. मंत्रालयात तिजोरी खाली करण्यासाठी डाकू म्हणून प्रवीण तायडे यांचं नाव येईल. पण मला अभिमान आहे प्रवीण तायडे यांचा असे बावनुकळे म्हणाले. पुढच्या निवडणुकीत जेव्हा प्रवीण तायडे फॉर्म भरेल तेव्हा इथले विरोधक दुसरा मतदार संघ शोधतील असेही बावनकुळे म्हणाले. 

अधिक पाहा..



Source link

महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई यांची सरन्यायाधीश पदावर नियुक्ती; 14 मे रोजी घेणार शपथ

महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई यांची सरन्यायाधीश पदावर नियुक्ती; 14 मे रोजी घेणार शपथ


Justice BR Gavai: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली पुढील मुख्य न्यायमूर्तीसाठी भूषण गवई (Justice Bhushan Gavai) यांच्या नावाला परवानगी दिली आहे. महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई यांची भारताचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भूषण गवई हे 14 मे रोजी देशाचे पुढील न्यायमूर्ती म्हणून शपथ घेतली. विद्यामान सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना 13 मे रोजी निवृत्त होणार आहे. 

न्यायाधीश भूषण गवई यांची कारकीर्द-

न्यायमूर्ती भूषण गवई यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1960 रोजी महाराष्ट्रातील अमरावती येथे झाला. भूषण गवई यांनी 16 मार्च 1985 रोजी वकिली सुरू केली. 1990 नंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर भूषण गवई यांनी वकिली केली. 12 नोव्हेंबर 2005 रोजी त्यांची उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आणि सर्वोच्च न्यायालयातील अनेक घटनात्मक खंडपीठांचा ते भाग होते ज्यांनी ऐतिहासिक निकाल दिले आहेत.

कोण आहेत भूषण गवई?

सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइटनुसार, न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1960 रोजी महाराष्ट्रातील अमरावती येथे झाला. त्यांनी 16 मार्च 1985 रोजी वकिली क्षेत्रात प्रवेश घेतला आणि सुरुवातीला 1987 पर्यंत माजी महाधिवक्ता आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश स्वर्गीय राजा एस. भोसले यांच्यासोबत काम केले. 1987 मध्ये त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात स्वतंत्रपणे वकिली सुरू केली आणि 1990 पासून ते प्रामुख्याने नागपूर खंडपीठासमोर हजर राहिले. भूषण गवई यांनी संवैधानिक आणि प्रशासकीय कायद्यात विशेष तज्ज्ञता मिळवली आणि नागपूर आणि अमरावती महानगरपालिका तसेच अमरावती विद्यापीठासाठी स्थायी वकील म्हणून काम केले. भूषण गवई यांनी विदर्भातील विविध सरकारी संस्था आणि परिषदांचे नियमितपणे प्रतिनिधित्व केले.

ऑगस्ट 1992 मध्ये न्यायमूर्ती गवई यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सहाय्यक सरकारी वकील आणि अतिरिक्त सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली आणि नंतर जानेवारी 2000 मध्ये भूषण सरकारी वकील आणि सरकारी वकील झाले. 14 नोव्हेंबर 2003 रोजी भूषण गवई यांना मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून बढती देण्यात आली आणि 12 नोव्हेंबर 2005 रोजी ते कायमस्वरूपी न्यायाधीश बनले. त्यांच्या कार्यकाळात, भूषण गवई यांनी मुंबई, नागपूर, औरंगाबाद आणि पणजी येथील खंडपीठांचे अध्यक्षपद भूषवले आणि सर्व क्षेत्रातील प्रकरणे हाताळली. 24 मे 2019 रोजी भूषण गवई यांना सर्वोच्च न्यायालयात बढती देण्यात आली. सध्या ते न्यायमूर्ती खन्ना यांच्यानंतर सर्वात वरिष्ठ न्यायाधीश आहेत. नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि पणजी येथे भूषण गवई यांनी न्यायाधीश म्हणून काम केले आहे.

भूषण गवई होते कलम 370 रद्द करणाऱ्या खंडपीठाचा भाग-

कलम 370 रद्द करून जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्याचे समर्थन करणाऱ्या खंडपीठाचा भूषण गवई भाग होते. 2016 च्या नोटाबंदीला घटनात्मक आणि कायदेशीरदृष्ट्या योग्य घोषित करणाऱ्या खंडपीठाचेही ते सदस्य होते. निवडणूक देणग्यांसाठी इलेक्टोरल बाँड योजना रद्द करण्याचा निर्णय देणाऱ्या खंडपीठाचाही भूषण गवई हे भाग होते.

महाराष्ट्रासह देशभरातील विविध घडामोडी, VIDEO:

ही बातमीही वाचा:

सर्वोच्च न्यायालयाचा आदेश; कॅबिनेटमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांसह माजी मंत्र्यांवरही गुन्हा दाखल

अधिक पाहा..



Source link

Amravati Citizen On Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्याबाबत अमरावतीकराच्या प्रतिक्रिया, व्यक्त केला तीव्र संताप

Amravati Citizen On Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्याबाबत अमरावतीकराच्या प्रतिक्रिया, व्यक्त केला तीव्र संताप


Amravati Citizen On Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्याबाबत अमरावतीकराच्या प्रतिक्रिया, व्यक्त केला तीव्र संताप

Follow AI generated Transcription – (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)

२२ एप्रिल २०२५ रोजी, पाच सशस्त्र अतिरेक्यांनी जम्मू आणि काश्मीरच्या भारत-प्रशासित प्रदेशात हल्ला केला , ज्यामध्ये २६ पुरुष ठार झाले आणि २० हून अधिक जखमी झाले, २००८ च्या मुंबई हल्ल्यानंतर भारतातील सर्वात घातक घटना होती . ही घटना पहलगामजवळील लोकप्रिय पर्यटन स्थळ असलेल्या बैसरन व्हॅलीमध्ये घडली . बळी पडलेल्यांपैकी बहुतेक हिंदू होते .

पाकिस्तानस्थित संयुक्त राष्ट्रांनी नियुक्त केलेल्या लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी गटाची एक शाखा मानल्या जाणाऱ्या रेझिस्टन्स फ्रंट (TRF) ने सुरुवातीला जबाबदारी स्वीकारली , ने म्हटले की हा हल्ला भारतीय नागरिकांना काश्मीरमध्ये राहण्याची आणि काम करण्याची परवानगी देणाऱ्या भारत सरकारच्या धोरणाच्या विरोधात होता , ज्यामुळे या प्रदेशात स्थानिक वसाहत झाली नाही. चार दिवसांनंतर, त्यांनी त्यांचा दावा मागे घेतला.



Source link

Navneet Rana : नवनीत राणांच्या हाती तलवार, म्हणाल्या, उनकी आंख निकाल लेंगे!

Navneet Rana : नवनीत राणांच्या हाती तलवार, म्हणाल्या, उनकी आंख निकाल लेंगे!


Navneet Rana : नवनीत राणांच्या हाती तलवार, म्हणाल्या, उनकी आंख निकाल लेंगे!

आजच्या इतर महत्वाच्या बातम्या : 28 April 2025  

२६ राफेल लढाऊ विमानाच्या खरेदीसाठी भारत आणि फ्रान्समध्ये ६३ हजार कोटींचा करार, पाकिस्तानसोबत तणावाचं वातावरण असताना कराराला विशेष महत्त्व 
भारत पाकिस्तान वादाच्या पार्श्वभूमीवर इतर देशांकडून मदत…भारताला स्वीडननं दिलं कार्ल गुस्ताफ रॉकेट लाँचर…तर पाकिस्तानला तुर्कस्ताननं दारूगोळा पाठवल्याची माहिती… 
धर्म विचारायला दहशतवाद्यांकडे वेळ कुठे आहे? काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी गाठला असंवेदनशीलतेचा कळस, वडेट्टीवारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, नितेश राणेंची मागणी 
शॉर्ट टर्म व्हिसावर आलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडावाच लागणार, फडणवीसांकडून भूमिका स्पष्ट…तर लाँग टर्म व्हिसावर आलेल्या सिंधींना महाराष्ट्र सोडण्याची गरज नसल्याचं स्पष्ट… 
पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीच्या उलट्या बोंबा…भारतच हल्ले घडवून आपल्या लोकांना मारतो असे तोडले तारे…तर औवैसींनी उडवली आफ्रिदीची खिल्ली… 
पाच लाखांहून अधिक पाकिस्तानी महिला भारतात, भाजप खासदार निशिकांत दुबेंचा खळबळजनक दावा… लग्न करून भारतात राहणाऱ्या महिलांना नागरिकत्व नसल्याचीही दिली माहिती



Source link