दहशतवादी हल्ल्यापूर्वी अमरावतीचे 11 जण हिरवळीवर आनंदाने बागडत होते, अवघ्या काही क्षणांचा फरक अन

दहशतवादी हल्ल्यापूर्वी अमरावतीचे 11 जण हिरवळीवर आनंदाने बागडत होते, अवघ्या काही क्षणांचा फरक अन


Kashmir Attack News: काश्मीरच्या पहलगाम येथे मंगळवारी दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. पोलिसांच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारुन टिपून-टिपून मारले. या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. तर काही पर्यटक जखमी झाले आहेत.  या दहशतवादी हल्ल्यापूर्वी अमरावतीमधील 11 पर्यटक याच जागेवर होते. पण केवळ दैव बलवत्तर म्हणून  अमरावतीचे हे 11 पर्यटक हल्ल्याच्या काही मिनिटं आधी येथून निघाले आणि त्यांचा जीव वाचला. हे सर्व पर्यटक श्रीनगरमध्ये सुखरुप आहेत. या पर्यटकांमध्ये बोडके, देशमुख, उमेकर आणि लांडे कुटुंबीयांचा समावेश होता.

तर दुसरीकडे विठ्ठलाच्या कृपेने पंढरपूरमधील नागरिकांचा जीव या दहशतवादी हल्ल्यातून वाचला आहे. पंढरपूर येथून काश्मीरला गेलेले जवळपास 50 पेक्षा जास्त पर्यटक पुढची ट्रीप सोडून परतीच्या तयारीला लागले आहेत. पहलगामला पोहोचण्यापूर्वीच झालेल्या हल्ल्यानंतर पर्यटक घाबरले. त्यामुळे हे पर्यटक पुढची ट्रीप कॅन्सल करुन पुन्हा महाराष्ट्राच्या दिशेने परत निघाले आहेत.

सांगलीतील पालांदे कुटुंबीयही या दहशतवादी हल्ल्यातून थोडक्यात बचावले. सांगली मधील डॉ. विठ्ठल पालांदे हे कुटुंबासमवेत काश्मीर पहेलगाम येथे फिरण्यास गेले होते.  त्यांना चित्र काढण्याचा छंद आहे. ज्या ठिकाणी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर  हल्ला केलाय त्याच ठिकाणी हे कुटूंब तीन तास अगोदर  चित्र काढून बाहेर पडले. त्यामुळे या हल्ल्यातून हे कुटूंब बचावले.

जळगावमधील मैत्रिणींचा ग्रूप हल्ल्यातून बचावला

जळगाव मधील पत्रकार तुषार वाघुळदे यांच्या पत्नी किशोरी वाघुळदे आणि त्यांच्या मैत्रिणी रेणुका भोगे या पहेलगाम येथे मुंबई येथील क्षितीज ट्रॅव्हल्स या पर्यटन कंपनीसोबत काश्मीरला गेल्या होत्या.  पहलगामध्ये हल्ला झाल्याची माहिती मिळताच आम्ही घाबरलो होतो. मात्र, त्या ठिकाणी असलेल्या सुरक्षा रक्षकांनी  तातडीने आम्हाला मदत केली. आम्ही सगळे सुखरुप आहोत. पहाटे साडेपाच वाजता आम्ही पहेलगाम येथून कटाराला जाण्यासाठी निघालो आहोत, अशी माहिती किशोर वाघदुळे यांनी फोनवरुन दिली.

महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा मृत्यू

जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झालाय. हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण 6 पर्यटकांचा मृत्यू झालाय. यात  डोंबिवलीच्या तिघांचा समावेश आहे. तर पुण्यातील दोन आणि पनवेलच्या एका पर्यटकाचा मृत्यू झालाय. डोंबिवलीचे अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी यांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालाय. पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. तर पनवेलमधील दिलीप देसले यांचाही हल्ल्यात मृत्यू झालाय.  तर महाराष्ट्रातले एस बालचंद्रू, सुबोध पाटील, शोबीत पटेल हल्ल्यात जखमी झाले आहेत.

आणखी वाचा

पंतप्रधान मोदी विमानातून उतरताच इंडियन जेम्स बाँड अजित डोवाल जवळ आले अन्….

अधिक पाहा..



Source link

Akola Water Problem | अकोल्याच्या ग्रामीण भागात पाणीटंचाईमुळे टँकरनं पाणी विकत घेण्याची वेळ

Akola Water Problem | अकोल्याच्या ग्रामीण भागात पाणीटंचाईमुळे टँकरनं पाणी विकत घेण्याची वेळ


Akola Water Problem | अकोल्याच्या ग्रामीण भागात पाणीटंचाईमुळे टँकरनं पाणी विकत घेण्याची वेळ 
अकोल्याच्या ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये पाणीटंचाईची दाहकता जाणवतेये. जिल्ह्यातल्या उगवा गावात गावकऱ्यांना तब्बल महिनाभरातून एकदाच नळाचं पाणी मिळतं.  त्यामुळे गावकऱ्यांवर टँकरचे पाणी विकत घ्यायची वेळ आलीये. बहुतांश कुटुंबांना दर १५ दिवसांनी ६०० रुपयांचं पाणी विकत घ्यावं लागतंय. त्यामुळे महिन्याला हजार ते बाराशे रुपये पाण्यावर खर्च करावे लागतायेत. गेली अनेक वर्षं इथं अशीच स्थिती आहे.. त्यामुळे एप्रिल महिन्याच्या मध्यापासून गावातील सर्वांनाच टँकरचा अतिरिक्त भुर्दंड सोसावा लागतो. 

आजच्या इतर महत्वाच्या बातम्या : 22 April 2025 
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांचा हल्ला, दोन पर्यटकाचा मृत्यू तर १२ जण जखमी, सुरक्षा यंत्रणांकडून सर्च ऑपरेशन सुरू 
मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतल्या निर्णयानं ४ लाख ६३ हजार मच्छिमारांना होणार फायदा, तर गोसीखुर्द प्रकल्पाला २६ हजार कोटींचा निधी, भंडार-चंद्रपूर-नागपूरच्या शेतकऱ्यांना होणार लाभ 
उद्धव ठाकरे हे मुंबईतील लॅण्ड स्कॅमचे बादशाह, भाजप नेते आशिष शेलार यांचा हल्लाबोल, राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर शेलारांचे गंभीर आरोप. 
राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चा पुढच्या महिन्यातच शक्य… राज ठाकरे ३० एप्रिलला तर उद्धव ठाकरे ४ मे रोजी परदेशातून परतणार..उद्धव ठाकरे कमालीचे सकारात्मक, संजय राऊतांची माहिती… 
सुनेत्रा काकी आणि अजितकाकांबद्दल प्रेम, आदर कायम, युगेंद्र पवारांचं स्पष्टीकरण…विद्या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाला शरद पवार आणि खासदार सुनेत्रा पवार एकत्र…



Source link

भाजप आमदाराला नशेत शिव्या देणं भोवलं, अकोल्यात पोलीस निरीक्षकावर मोठी कारवाई 

भाजप आमदाराला नशेत शिव्या देणं भोवलं, अकोल्यात पोलीस निरीक्षकावर मोठी कारवाई 


अकोला : भाजप आमदाराला फोनवर शिव्या देणे पोलिस निरीक्षकाला चांगलंच भोवल्याचं समोर आलं. अकोल्यातील मूर्तिजापूर मतदारसंघाचे भाजपचे आमदार हरीश पिंपळे यांना एका पोलिस अधिकाऱ्याने फोनवर शिव्या दिल्या होत्या. या प्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी बार्शीटाकळीचे पोलिस निरीक्षक प्रकाश तुनकलवार यांची बदली मुख्यालयात केली. 

गुरांच्या तस्करीवरून भाजप आमदार पिपंळे यांनी बार्शीटाकळी पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश तूनकलवार यांना फोन केला. मात्र या वेळी दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला अन पोलिस अधिकाऱ्याने  आमदाराला फोनवर शिव्या दिल्या. शिवीगाळीचा आरोप करीत भाजप आमदाराने शिव्या देणाऱ्या ठाणेदारावर तात्काळ निलंबनाची करा, अन्यथा राजकारणी आणि आमदारांची प्रतिष्ठा राहणार नाही अशी मागणी थेट गृहमंत्र्यांना ऑडिओ मॅसेजद्वारे केली. 

या तक्रारीनंतर तात्काळ वरिष्ठ पोलिस अधिकारी तुनकलवार यांच्यावर अकोला पोलिस अधीक्षकांनी मोठी कारवाई केली आहे. बार्शीटाकळी पोलिस ठाण्यातून त्यांची उचलबांगडी करत त्यांची पोलिस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. तसंच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी देखील होणार असल्याची प्राथमिक माहिती समोर येते. 

नेमकं काय आहे प्रकरण?

अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश तुनकलवारांनी थेट आपल्याला फोनवर नशेत शिव्या दिल्याचा आरोप भाजप आमदार हरीश पिंपळे यांना केला होता. महामार्गावरून कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या वाहनाची माहिती पोलिसांना दिल्यानंतर परस्पर पैसे घेत गुरांचं वाहन सोडून देण्यात आल्याचा आरोपही आमदारांनी केला होता. त्यानंतर आमदार पिंपळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक ऑडिओ क्लिप पाठवली. त्यामध्ये आपल्याला शिवीगाळ करणाऱ्या ठाणेदारावर निलंबनाच्या कारवाईची मागणी केली होती. 

आमदारासोबत असभ्य वर्तणूक केल्याप्रकरणी ठाणेदारवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अन्यथा राजकीय क्षेत्रात आमदार म्हणून इज्जत राहणार नाही अशा शब्दात गृहमंत्र्याकडे कळकळीची विनवणी केली होती. 

आज गृहखातं आपल्याकडे आहे, अशा शिव्या देणाऱ्या ठाणेदारावर तात्काळ निलंबनाची कारवाईची मागणी त्यांनी गृहम़ंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली. कारवाई झाली नाही तर राजकारणात आमदारांची यापुढे प्रतिष्ठा राहणार नाही. त्यामुळे अशा ठाणेदारावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी अपेक्षा आमदारांनी गृहमंत्र्यांसह राज्याच्या विधानसभा अध्यक्षांना ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून व्यक्त केली होती.

पोलिस निरीक्षकाची तडकाफडकी उचलबांगडी

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार पोलिस निरीक्षक प्रकाश तुनकलवारांवर बदलीची कारवाई झाली. अकोल्याच्या पोलिस कंट्रोल रूममध्ये त्यांना अटॅच करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.  बार्शीटाकळी पोलिस ठाण्याचा प्रभार सध्या सहायक पोलिस निरीक्षक दिपक वारे यांच्याकडे देण्यात आला आहे. 

आमदारांच्या तक्रारीनंतर थेट गृहमंत्र्यांनी तात्काळ वरिष्ठ पोलिस निरिक्षक तुनकलवार यांच्यावर कारवाईचे आदेश दिलेत. यानंतर अकोला पोलिस अधीक्षकांनी मोठी कारवाई केली आहे. बार्शीटाकळी पोलिस ठाण्यातून त्यांची उचलबांगडी करीत त्यांची पोलिस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. तसंच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सहायक पोलिस अधिक्षक अनमोल मित्तल करणार आहेत. 

अधिक पाहा..



Source link

माधव भंडारींकडून 26/11 च्या हल्ल्यासंदर्भाने राष्ट्रवादीवर आरोप; अमोल मिटकरींची बोचरी टीका

माधव भंडारींकडून 26/11 च्या हल्ल्यासंदर्भाने राष्ट्रवादीवर आरोप; अमोल मिटकरींची बोचरी टीका


मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील 26/11 (Mumbai) चा हल्ला रोखण्यास काँग्रेस अपयशी ठरले हे मी त्यावेळी देखील बोललो होतो आणि आजही बोलतो आहे. त्यावेळी त्यांनी प्रेस नोट काढली होती. मुंबईवरील हल्ल्यासंदर्भात 5 महिन्यांपूर्वीच सरकारला माहिती होती. मात्र, ते थांबवयला अपयशी ठरले, असा गंभीर आरोप भाजप उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी केला आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस,  काँग्रेसचं जरी सरकार होतं तरी जबाबदारी मुख्यमंत्री आणि गृहमंत्राची होती. त्यामुळे, याप्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणीही माधव भंडारी यांनी केली आहे. माधव भंडारी (Madhav bhandari) यांच्या वक्तव्यावर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तर, अजित पवारांनी याप्रकरणी चौकशी करावी, केंद्रात व राज्यात आपलंच सरकार आहे, असे म्हटलं. 

अजित पवार म्हणाले तसं त्यांनी आता या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे सत्य समोर आल पाहिजे, अशी मागणीच माधव भंडारी यांनी केली आहे. मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्यावरून राष्ट्रवादीवर आरोप करणाऱ्या माधव भंडारींवर राष्ट्रवादीने जोरदार पलटवार केला. भंडारी यांची मानसिक स्थिती ढासळली आहे, त्यांना उपचाराची गरज असल्याचा टोला आमदार अमोल मिटकरी यांनी लगावला आहे. उतारवयात विधानपरिषदेवर संधी न मिळाल्याने त्यांच्या डोक्यावर परिणाम झाल्याय. त्यांच्या उपचारासाठी काही सहकार्य लागलं तर राष्ट्रवादी तन-मन-धनाने भंडारींना सहकार्य करणार आहे,  असे म्हणत अमोल मिटकरी यांनी माधव भंडारींवर बोचरी टीका केली. भंडारींना पक्षात कोणीच विचारत नाहीय.‌ ते आऊटडेटेड झालेली बॅटरी असल्याचा टोला देखील मिटकरी यांनी लगावला आहे. 

काय म्हणाले होते माधव भंडारी

मुंबई शहरावर झालेल्या 26/11 रोजीच्या हल्ल्यात तत्कालीन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकारचा हात होता.  26/11 चा मुंबईवरील हल्ला होणार असल्याची कल्पना सर्वांना होती. स्थानिक प्रशासनावर प्रभाव असलेल्या व्यक्तीचा सहभाग असल्याशिवाय इतका मोठा हल्ला घडणे अशक्य आहे, असे खळबळजनक वक्तव्य माधव भंडारी यांनी एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात बोलताना केले होते. त्यावरुन, आता वाद निर्माण झाला असून काँग्रेस-राष्ट्रवादीकडून प्रत्त्युतर देण्यात येत आहे. 

त्यांच्याकडे कुठला पुरावा  – वडेट्टीवार

रस्त्यावरच्या सडकछाप व्यक्तीने करावे, असे हे आरोप आहेत. त्यांच्याकडे कुठला पुरावे आहे. एखादा राजकीय पक्षाविरोधात असे गंभीर आरोप करणे म्हणजे माधव भंडारी यांच्या अकलेचे दिवाळे निघाले आहे, अशा शब्दात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भंडारी यांच्या आरोपावर पलटवार केला आहे. 

हेही वाचा

हंडाभर गढूळ पाण्यासाठी ‘लाडक्या बहिणी’ची वणवण; कुठंय मिशन ‘जल’जीवन? पाहा फोटो

अधिक पाहा..



Source link

अकोल्यातील उगवा गावात दुष्काळाची दाहकता; आमदार नितीन देशमुखांवर गावकऱ्यांची माफी मागण्याची वेळ

अकोल्यातील उगवा गावात दुष्काळाची दाहकता; आमदार नितीन देशमुखांवर गावकऱ्यांची माफी मागण्याची वेळ


Akola Water Crisis अकोला : ‘एबीपी माझा’ने अकोला जिल्ह्यातील उगवा गावातल्या पाणीटंचाईची भीषण (Water Crisis) दाहकता दाखवली होती. ‘माझा’च्या या बातमीनंतर उगवा गावासह (Ugwa Village) जिल्ह्यात मोठी खळबळ उडालीय. ‘माझा’ च्या बातमीची दखल थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतलीय. त्यांनी या संदर्भात लगेच तातडीची पाऊले उचलत गावकऱ्यांना पाणी देण्याचे निर्देश संबंधितांना दिलेत. उगवा हे गाव अकोला जिल्ह्यातील बाळापुर मतदार संघात येतंय. दरम्यान, या गावातील पाणीटंचाई प्रकरणी बाळापुरचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी उगवावाशियांची माफी मागितलीये. या गावाला पाणी न मिळण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून आपलीच असल्याचं आमदार देशमुख म्हणालेय.

मात्र उगवा गावासह बाळापूर मतदारसंघातील 69 गावातील पाणीटंचाईला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच जबाबदार असल्याचा गंभीर आरोप आमदार देशमुखांनी केलाय. पुढच्या सहा महिन्यांमध्ये उगवा गावाच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटविणार असल्याचं आमदार देशमुख यांनी ‘एबीपी माझा’शी बोलतांना म्हणालेय.

69 गावातील पाणीटंचाईला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच जबाबदार- नितीन देशमुख

दरम्यान, 2022 मध्ये महाविकास आघाडीचे सरकार असतांना बाळापूर मतदारसंघातील 69 गावांसाठी 219 कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती. तेल्हारा तालुक्यातील वान प्रकल्पातील पाणी यासाठी आरक्षित करण्यात आलं होतंय.‌ मात्र महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर आलेल्या एकनाथ शिंदे सरकारने या योजनेला स्थगिती दिलीय. त्यावेळी अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी वान धरणातील पाण्याच्या आरक्षण निर्णयाला स्थगिती दिलीय. त्यानंतर आमदार देशमुखांनी अकोला ते नागपूरमधील फडणवीस यांच्या बंगल्यापर्यंत या प्रश्नावरून पदयात्रा काढली होती. मात्र देशमुख यांचं आंदोलन नागपूरात मोडून काढण्यात आलं होतं. यानंतर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आरक्षण स्थगितीच्या निर्णयाला रद्द केलं होतं. फडणवीस आणि त्यावेळच्या सरकारने हा निर्णय घेतला नसता तर आज उगवा गावासह मतदारसंघातील 69 गावांना पिण्याचे गोड पाणी मिळालं असतं असा टोला यावेळी आमदार देशमुखांनी लगावलाय.

दरम्यान 2019 मध्ये उगवा गावाला आपण 64 खेडी पाणीपुरवठा योजनेत लोकांना पाणी मिळावं म्हणून अवैधपणे समाविष्ट केल्याचा  गौप्यस्फोट आमदार देशमुख यांनी यावेळी केलाय.

इतर महत्वाच्या बातम्या 

विदर्भात सूर्याचा प्रकोप! चंद्रपुरात देशात सर्वाधिक तापमानाची नोंद, राज्यात कोणत्या जिल्ह्यात किती तापमानाची नोंद? 

अधिक पाहा..



Source link

अकोल्यातील उगवा गावात दुष्काळाची दाहकता, पाण्याच्या टाक्यांना कुलूप लावून संरक्षण

अकोल्यातील उगवा गावात दुष्काळाची दाहकता, पाण्याच्या टाक्यांना कुलूप लावून संरक्षण


अकोला : राज्यात अनेक ठिकाणी पाण्याचा तुटवडा जाणवत असताना अकोल्यात मात्र अधिकच भीषण परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र आहे. जिल्ह्यातील उगवा गावात पाण्याला सोन्याचं मोल आल्याचं दिसतंय. याचं कारण म्हणजे गावात असलेली तीव्र पाणीटंचाई. नळाला तब्बल महिनाभरानंतर पाणी येतं. त्यामुळे गावकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. विकत घेतलेलं हे पाणी चोरीला जावू नये म्हणून गावातील प्रत्येक घरात पाण्याच्या टाक्यांना कुलूपं लावण्यात आली आहेत. कुलूपबंद पाण्याच्या माध्यमातून दुष्काळाचा एक अत्यंत भेसूर चेहरा समोर आल्याचं दिसतंय. 

एखाद्या तिजोरीला कुलूप लावून ठेवावं तसं गावातील लोक पाण्याच्या टाकीला कुलूपं लावतात. कारण इथं सोन्यापेक्षा पाण्यालाच अधिक मोल आहे. पाण्याच्या टाकीला कुलूप लावणारं हे गाव आहे अकोला जिल्ह्यातलं उगवा. 15 हजार लोकसंख्येचं हे गाव सध्या पाणीटंचाईमुळे त्रस्त आहे.

महिनाभरानंतर नळाला पाणी येतं, तेसुद्धा अगदी थोडा वेळ. त्यामुळे पाणी विकत घेण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे. किमान 600 ते 700 रुपयांना छोटा टँकर मिळतो. त्यामुळे विकत घेतलेलं पाणी चोरी जाऊ नये म्हणून टाक्यांना कुलूपं लावली जातात. 

पाणी पुरवठा योजना कुचकामी

या गावामध्ये पाणीपुरवठा योजना आल्या खऱ्या, पण त्याचं पुढे काहीच झालं नाही. अकोल्यातील बाळापूर विधानसभा मतदारसंघात उगवा गाव येतं. ठाकरेंच्या शिवसेनेचे नितीन देशमुख हे तिथले आमदार आहेत. खारपान पट्ट्यातील 69 गावांसाठी 219 कोटींची योजना मंजूर झाली. पण नंतर योजनेला स्थगिती मिळाली. सध्या कार्यरत असलेली 84 खेडी पाणीपुरवठा योजना कुचकामी ठरली आहे. 

आरोप-प्रत्यारोप सुरू

अकोल्याच्या उगवा गावातील पाणीप्रश्न सोडवू न शकल्यानं ठाकरे सेनेचे आमदार नितीन देशमुखांनी गावकऱ्यांची माफी मागितली. मात्र उगवा गावासह बाळापूर मतदारसंघातील 69 गावातील पाणीटंचाईला मुख्यमंत्री फडणवीसच जबाबदार असल्याचा आरोप नितीन देशमुख यांनी केला. 

पाण्याचा प्रश्न लवकर सोडवण्याचं सरकारचं आश्वासन

‘एबीपी माझा’ने अकोला जिल्ह्यातील उगवा गावातील पाणीटंचाईचं भीषण आणि दाहक वास्तव समोर आणल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दखल घेतली. अजित पवारांनी यासंबंधी आमदार अमोल मिटकरीशी संवाद साधत पाणीटंचाईची परिस्थिती जाणून घेतली. दरम्यान लवकरच उगवा गावासह जिल्ह्यातील पाणीटंचाईचा प्रश्न राज्य सरकार मार्गी लावणार असल्याचं आमदार मिटकरी सांगितलंय.  

कोरडेठाक पडलेले नळ… टाक्यांना लागलेली कुलूपं.. गावकऱ्यांचे पाणावलेले डोळे.. आणि व्यक्त होणारा संताप. हे सगळं काही सांगून जातोय. पाण्यासारख्या मुलभूत गोष्टीसाठी संघर्ष करणाऱ्या उगवा ग्रामस्थांची समस्या मायबाप सरकार समजून घेईल आणि उपाययोजना करेल हीच अपेक्षा. 

 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..



Source link