ठाकरे बंधू एकत्र येणार असतील तर स्वागत, तुतारी गटानेही अजितदादांच्या नेतृत्वात एकत्र यावं : अमो

ठाकरे बंधू एकत्र येणार असतील तर स्वागत, तुतारी गटानेही अजितदादांच्या नेतृत्वात एकत्र यावं : अमो


Amol Mitkari : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) एकत्र येणार असल्याची चर्चा सध्या महाराष्ट्रभर सुरु आहे. याबाबत दोन्ही नेत्यांनी केलेल्या वक्तव्यामुळं या चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, यावर राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari ) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या शक्यतेचं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी स्वागत केलं आहे. तसेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने देखील अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली एकत्र यावं असं वक्तव्य केलं आहे. 

 तुतारी गटानेही अजित दादांच्या नेतृत्वात एकत्र यावं

महाराष्ट्राच्या भल्यासाठी दोन भाऊ एकत्र येत असतील तर त्याचा स्वागतच असल्याचे आमदार मिटकरी यांनी म्हटलं आहे. दरम्यान, या संदर्भात आमदार रोहित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरही मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा आदर्श घेऊन तुतारी गटानेही अजित दादांच्या नेतृत्वात एकत्र यावं असं मिटकरी म्हणालेत. त्यामुळं आता अमोल मिटकरींच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते काय प्रतिक्रया देतात हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात भक्कम होण्यासाठी जर तुतारी गटाला वाटत असेल तर त्यांनी अजितदादांच्या नेतृत्वात एकत्र यावं असेही मिटकरी म्हणाले. पक्षाचा कार्यकर्ता म्हणून बेरजेचं राजकराण करणं माझं कर्तव्य असल्याचे मिटकरी म्हणाले. 

रोहित पवारांच्या वक्तव्यावरही मिटकरींनी दिली प्रतिक्रिया 

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेचं स्वागत केलं आहे. तसेच सर्वच कुटुंबांनी एकत्र यावं असं म्हटलं होतं. यावर मिटकरींनी तुतारी गटाने अजित पवार यांच्या नेतृत्वाखी एकत्र यावं असं वक्तव्य केलं आहे. मराठी अस्मितेला नख लावू पाहणाऱ्या महाराष्ट्रद्रोही शक्तीच्या विरोधात ठाकरे कुटुंब एकत्र येत असेल तर मराठी मनासाठी हा सुवर्णक्षण असल्याचे रोहित पवार यांनी म्हटलं होतं. केवळ ठाकरे कुटुंबानेच नाही तर सर्वच कुटुंबांनी  महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी एकत्र यायला हवं आणि यातच महाराष्ट्राचं हीत असल्याचं वक्तव्य रोहित पवारांनी केलं होते. 

महत्वाच्या बातम्या:

मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची मुद्द्यांवरून दिलजमाई? अनेक प्रश्नांवर एकच भूमिका? 

अधिक पाहा..



Source link

कुलूप बंद पाणी, दुर्दैवी कहाणी! अकोल्याच्या उगवा गावात दुष्काळाचा अत्यंत भेसूर चेहरा समोर

कुलूप बंद पाणी, दुर्दैवी कहाणी! अकोल्याच्या उगवा गावात दुष्काळाचा अत्यंत भेसूर चेहरा समोर


नळाला पाणी महिनाभरानंतर, पाणी चोरी जावू नये म्हणून कुलूपबंद ठेवण्याची वेळ

अकोल्याच्या उगवा गावात दुष्काळाच्या झळा सोसतंय. गावात प्रत्येक घरासमोर पाण्याच्या टाक्या ठेवण्यात आलेल्या आहे आणि त्यातील प्रत्येक टाकीला कुलूप लावलेलं आहे.मात्र ही कुलूपं लागलीयेत ते आपलं पाणी चोरी न जाण्याच्या भितीने. हे चित्रं आहे 15 हजार लोकसंख्येचं गाव असलेल्या अकोला जिल्ह्यातल्या उगवा गावातलं. येथे सध्या पाणी समस्येमुळे नागरिक कासावीस झालेय. गावात सध्या पाणी पुरवठा योजनेचे नळ फक्त महिन्यात एकदाच येतात. तेही अगदी काही वेळेपुरतेच. त्यामूळे शेकडो रूपये मोजून टँकरचं विकत घेतलेलं पाणी चोरी जावू नये म्हणून ते कुलूपबंद ठेवण्याची वेळ उगवेकरांवर आलीये.

….अन् उगवावासियांच्या पाणी संकट कायमचं सुटण्याच्या स्वप्नांवर पाणी फेरलं 

उगवा हे गाव बाळापूर मतदारसंघात येतं. सध्या ठाकरे गटाचे नितीन देशमुख येथील आमदार आहेत. त्यांच्या मतदारसंघातील खारपान पट्ट्यात येत असलेल्या 69 गावांसाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात 219 कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती. मात्र नंतर आलेल्या एकनाथ शिंदेंच्या महायुती सरकारने या योजनेला स्थगिती दिलीय. आणि उगवावासियांच्या पाणी संकट कायमचं सुटण्याच्या स्वप्नांवर पाणी फेरलंय. सध्या या गावात कार्यरत असलेली 84 खेडी पाणीपुरवठा योजना कुचकामी ठरलीय. येथील गावाकऱ्यांना आता महिनाभरातून एकदाच नळाचं पाणी मिळतंय. या नियोजनशुन्यतेमूळे गावात पाण्याचा दुष्काळ पडलाय आणि याच पाण्याच्या रडगाण्यानं महिलांच्या डोळ्यात पाणी आलंय. 

 सरकार आणि व्यवस्थेने जीवंत माणसांना प्यायला पाणी द्यावे, अशी माफक अपेक्षा

गावात नळ महिनाभर येत नाही. मात्र, प्रशासनाने एकही टँकर गावात अद्याप सुरू केला नाहीये. त्यामूळे गावाकऱ्यांना एका छोट्या टँकरसाठी तब्बल 600-700 रूपये मोजावे लागतायेत. तर गावाच्या पाण्याच्या दुष्काळात ग्रामपंचायतीच्या लेटलतिफी आणि संवेदनेचा तेरावा महिनाही गावकऱ्यांना अनुभवावा लागतोय. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आपण नुकताच साजरा केलाय. चंद्रावर पाणी शोधू पाहणाऱ्या आपल्या सरकार आणि व्यवस्थेने जीवंत माणसांना प्यायला पाणी द्यावे, अशी माफक अपेक्षा त्यांना आहे. उगव्यात पाण्याच्या टाक्यांना लागलेली कुलूपं ही आपलं सरकार, व्यवस्था आणि आपल्या संस्कार आणि उच्च परंपरांचा नैतिक पराभव आहे, असं म्हटल्यास वावगं ठरू नये. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

Akola Drought : अकोल्याच्या उगवा गावात दुष्काळाचा अत्यंत भेसूर चेहरा समोर

Akola Drought : अकोल्याच्या उगवा गावात दुष्काळाचा अत्यंत भेसूर चेहरा समोर



<p>पाण्याशिवाय मानवी जीवन अपूर्ण समजलं जातं…त्यामुळेच पाण्याला जीवन असंही म्हटलं जातं…मात्र, याच पाण्याला अकोला जिल्ह्यातील उगवा गावात अगदी सोन्याची किंमत आल्याचं पहायला मिळतंय…गावात तीव्र पाणीटंचाई आहे…दुसरीकडे नळाला तब्बल महिनाभरानंतर पाणी येतंय…त्यामुळे गावकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ आलीये…आता हेच विकत घेतलेलं पाणी चोरी जावू नये म्हणून गावातील प्रत्येक घरात पाण्याच्या टाक्यांना कुलूपं लावण्यात आलीयेत…कडेकोट सुरक्षेत असलेल्या उगवा गावातील कुलूपबंद पाण्याच्या माध्यमातून दुष्काळाचा एक अत्यंत भेसूर चेहरा समोर आलाय…&nbsp;</p>
<p>दरम्यान उगवा ग्रामस्थांचं पाणीटंचाईचं वास्तव एबीपी माझानं समोर आणलंय…उगवा गावात जाऊन या संपूर्ण परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश अलोणे यांनी…</p>
<p>तालुकापातळीवर पाणीपुरवठ्यासाठी जबाबदार अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, असे निर्देश राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी दिलेत…ग्रामीण भागात टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी ‘जलदूत अॅप’ चा वापर करावा, असंही विखेंनी सांगितलंय…&nbsp;</p>



Source link

अवकाळीचं संकट ओसरलं, आता पुन्हा उष्णतेचा भडका! पुढच्या दोन ते तीन दिवसात विदर्भात उष्णतेची लाट

अवकाळीचं संकट ओसरलं, आता पुन्हा उष्णतेचा भडका! पुढच्या दोन ते तीन दिवसात विदर्भात उष्णतेची लाट


Maharashtra Weather Update : एप्रिल महिन्याच्या उन्हाळ्याच्या दिवसात नागपूरसह बहुतांश जिल्ह्यात तापमानाच्या पाऱ्याने चाळीशी ओलांडली आहे. अशातच नुकतेच पूर्व  विदर्भातील (East Vidarbha) अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावत एकच दाणादाण उडवली आहे. अचानक आलेले या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला असून रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाचे संकट ताजे असताना आता वैदर्भीयांची काहीशी चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. पुढच्या दोन ते तीन दिवसात विदर्भात उष्णतेच्या लाटेची शक्यता असल्याचा अंदाज नागपूर वेध शाळेकडून देण्यात आला आहे. तर संभाव्य इशारा लक्षात घेता नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

अकोला विदर्भातील सर्वात हॉट, तर नागपुरात या मोसमातील उच्चांकी तापमानाची नोंद 

नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने विदर्भात तापमानात वाढ होणार असल्याचा इशारा दिला आहे. यात विशेष करून पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांना या उष्णतेच्या लाटेचा अधिक फटका बसण्याची शक्यता वर्तवली आहे. विदर्भाच्या तापमानाचा विचार करायचं झाल तर अकोल्याचे तापमान 44.2 अंशावर पोहोचलंय. तर अकोला विदर्भातील सर्वात हॉट जिल्हा ठरला आहे. तर नागपुरात या मोसमातील उच्चांकी 43 अंश तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. तर ढगाळ वातावरणातही अकोल्याचा तापमान 44.2 अंश नोंदविण्यात आले आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 40 अंशांच्या पुढे गेले आहे. यात अमरावती 43.6, यवतमाळ येथे 43.4, चंद्रपूर 42.6, वर्धा 42.1 तर वाशिममध्ये 42.6 अंश कमाल तापमान नोंदविण्यात आले आहे. 

भंडाऱ्यात मध्यरात्री वादळी वाऱ्यासह पाऊस, झाड कोसळली

मध्यरात्रीच्या सुमारास भंडाऱ्याच्या ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. यामुळे काही घरांवरील पत्रे उडालीत. तर, काही ठिकाणी वृक्ष कोसळल्याची घटना घडली. यामुळं काही गावातील वीज पुरवठा खंडित झाल्यानं नागरिकांना रात्री अंधारात राहावं लागलं. वरळी वाऱ्यामुळं अनेक ठिकाणी आंबे गळून पडल्यानं आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.

तर दुसरीकडे, यवतमाळच्या वणी येथे वातावरणात अचानक बदल होऊन अवकाळी पावसाने हजेरी लावली. दिवसभर कडाक्याचे ऊन तापले असताना अचानक आलेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण होऊन नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. तापमानाचा पारा चाळीशी पार असून कडक उन्हामुळे घराबाहेर निघणेही अवघड ठरत आहे, अशात आलेल्या अवकाळी पावसामुळे काहीसा गारवा निर्माण झाला. मात्र रात्रीच्या वेळी नागरिकांना गर्मीचाच सामना करावा लागतोय.

हे ही वाचा 

 

अधिक पाहा..



Source link