सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! तापमानाचा पारा 44 अंशावर, कोणत्या जिल्ह्यात किती तापमान? 

सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! तापमानाचा पारा 44 अंशावर, कोणत्या जिल्ह्यात किती तापमान? 


Maharashtra Weather : राज्यातील तापमानात (Temperature) वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राज्यातील बहुतांश भागात तापमानाचा पारा 35 ते 40 अंशाच्या घरात गेला आहे. तर काही ठिकाणी 42 ते 43 अंशावर तापमानाचा पारा गेला आहे. त्यामुळं नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार (IMD), अकोल्यात (Akola) आज राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झालीय. अकोल्यात आज तापमानाचा पारा 44.2 अंशांवर पोहोचलाय. तर चंद्रपूरमध्ये (Chandrapur ) 43.6 अंश तापमानाची नोंद झाली आहे. 

कोणत्या जिल्ह्यात किती तापमानाची नोंद?

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार अकोल्यात आज या मोसमतलं सर्वाधिक तापमान नोंदवण्यात आलं आहे. अकोल्याचा पारा आज 44.2 अंशांवर गेला आहे. काल अकोल्याचं तापमान 43.2 अंश सेल्सिअस होतं. दरम्यान जिल्हा प्रशासनाने नागरिकांना उन्हापासून संरक्षण करण्यासाठी उपाययोजना सुचविल्या आहेत. तर चंद्रपूर जिल्ह्यात देखील तापमानात मोठी वाढ झाली आहे. आज चंद्रपुरात तापमानाचा 43.6 अंशावर गेला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आज या मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. तसेच हिंगोली जिल्ह्यात देखील तापमानाचा पारा चांगलाच वाढल्याचे दिसत आहे. हिंगोलीत तापमानाचा पारा 41 अंशावर पोहोचला आहे. परभणी शहरासह जिल्ह्यात मागच्या 2 दिवसांपासून तापमान चांगलेच वाढले आहे. काल 40 तर आज थेट 41.03 अंशांवर तापमान गेले आहे. सलग दोन दिवस तापमान चाळीशी पार गेल्याने सर्वत्र प्रचंड उकाडा जाणवत आहे.ज्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांबरोबरच बाजारपेठेत ही दुपारच्या सुमारास शुकशुकाट पाहायला मिळत आहे.घरबाहेर पडलेले परभणीकर डोक्याला रुमाल,टोपी घालून बाहेर पडत आहेत.

दरम्यान, सध्या अकोल्यात सूर्य अक्षरशः आग ओकतोय. आज अकोल्यात या मोसमतला सर्वाधिक 44.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आलं आहे.  काल अकोला हे महाराष्ट्रातला सर्वाधिक उष्ण शहर होतं. कालचा अकोल्याचा पारा 43.2 अंशावर होता. या वाढत्या तापमानाचा परिणाम अकोल्याच्या जनजीवनावर झालाय. दुपारच्या वेळी अकोल्यातील रस्ते निर्मनुष्य होताना दिसत आहेत.  

गेल्या पाच दिवसातील अकोल्यातील तापमान 

तारीख                   तापमान 

03 एप्रिल         37.1
04 एप्रिल         39.0
05 एप्रिल         41.7
06 एप्रिल         43.2
07 एप्रिल          44.2

उन्हापासून संरक्षण करण्यासाठी काय काळजी घ्यावी?

दरम्यान, अकोला जिल्हा प्रशासनाने वाढत्या उन्हामुळे जिल्ह्यातील नागरिकांना स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन केलं आहे.  

उन्हात अतिशय महत्त्वाचे काम असले तरच घराबाहेर पडा. 
घराबाहेर पडताना डोक्याला सुती दुपट्टा किंवा उपरणं बांधा.
यासोबतच उन्हापासून डोळ्याचे संरक्षण करण्यासाठी सन गॉगल्स घाला.
बाहेर निघताना सोबत थंड पाण्याची बाटली ठेवा.
भरपूर पाणी प्या. यासोबतच ताक, नींबूपाणी आणि शीतपेय यांचा अधिकाधिक वापर करा.

महत्वाच्या बातम्या:

सावधान! विदर्भात उष्णतेची लाट, 3 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, मध्य महाराष्ट्रात विखुरलेले ढग, किती होते आज तुमच्या शहरात तापमान? वाचा सविस्तर

अधिक पाहा..



Source link

बाबा बागेश्वर बने क्रिकेट मैच के हीरो:  मुंबई में धीरेंद्र शास्त्री ने 4 विकेट लेकर महाराष्ट्र पुलिस को हराया; 38 रन की साझेदारी की – khajuraho News

बाबा बागेश्वर बने क्रिकेट मैच के हीरो: मुंबई में धीरेंद्र शास्त्री ने 4 विकेट लेकर महाराष्ट्र पुलिस को हराया; 38 रन की साझेदारी की – khajuraho News


बागेश्वर धाम के पीठाधीश्वर पं. धीरेंद्र कृष्ण शास्त्री 12 दिन की यात्रा पर मुंबई में हैं। यहां उन्होंने क्रिकेट में हाथ आजमाया। रविवार रात को कथा के बाद सेवादारों और अपनी सुरक्षा में तैनात महाराष्ट्र पुलिस के जवानों के साथ क्रिकेट मैच खेला। इसका वीडि

.

पं. धीरेंद्र शास्त्री और मुंबई पुलिस की टीम के बीच 6 ओवर का मुकाबला था। दोनों टीमों से 9-9 खिलाड़ी शामिल हुए। एक टीम में महाराष्ट्र पुलिस और निवासी सेवादार थे। दूसरी टीम में बाबा बागेश्वर, उनके सुरक्षाकर्मी और सेवादार शामिल थे।

पं. धीरेंद्र शास्त्री क्रिकेट मैच के दौरान अपनी टीम से रणनीति पर बात की।

पं. धीरेंद्र शास्त्री ने पहले ओवर में लिया विकेट पहले बल्लेबाजी करते हुए मुंबई टीम ने 6 ओवर में 48 रन बनाए। पं. धीरेंद्र शास्त्री ने पहले ओवर में 9 रन देकर एक विकेट लिया। चौथे ओवर में उन्होंने महज 3 रन देकर 3 विकेट झटके।

बॉलिंग करते हुए पं. धीरेंद्र शास्त्री ने पूरे मैच में 4 विकेट लिए।

बॉलिंग करते हुए पं. धीरेंद्र शास्त्री ने पूरे मैच में 4 विकेट लिए।

सेवादार के साथ की 38 रनों की पार्टनरशिप लक्ष्य का पीछा करते हुए धीरेंद्र शास्त्री और सेवादार सत्यम शुक्ला ने पारी की शुरुआत की। दोनों ने 38 रनों की साझेदारी की। पांचवें ओवर की आखिरी गेंद पर पं. धीरेंद्र रन आउट हो गए। इसके बाद सुरक्षाकर्मी दीपेश सोनी ने आकर आखिरी ओवर की चौथी गेंद पर टीम को जीत दिलाई। बागेश्वर पीठाधीश की टीम ने 9 विकेट से मुकाबला जीता।

पं. धीरेंद्र शास्त्री ने सेवादार के साथ मिलकर 38 रन बनाए।

पं. धीरेंद्र शास्त्री ने सेवादार के साथ मिलकर 38 रन बनाए।

इंदौर में भी क्रिकेट खेलते हुए वायरल हुआ था वीडियो पं. धीरेंद्र कृष्ण शास्त्री पहले भी कई मौकों पर क्रिकेट खेलते नजर आए हैं। तकरीबन 11 महीने पहले इंदौर में धीरेंद्र शास्त्री का बॉलिंग करते हुए एक वीडियो सामने आया था। जिसमें वो गेंदबाजी करते हुए नजर आए थे।

पं. धीरेंद्र शास्त्री का कहना है कि जब भी समय मिलता है वे क्रिकेट खेलते हैं।

पं. धीरेंद्र शास्त्री का कहना है कि जब भी समय मिलता है वे क्रिकेट खेलते हैं।

————

ये खबर भी पढ़ें…

धीरेंद्र शास्त्री बोले- हिंदू राष्ट्र से पहले कट्‌टर हिंदू बनाएंगे:देश के हर गांव में बनेगा सुंदरकांड मंडल छतरपुर स्थित बागेश्वर धाम के पीठाधीश्वर धीरेंद्र शास्त्री अब देशभर में हिंदू क्रांति अभियान चलाएंगे। मंगलवार को एक वीडियो में उन्होंने कहा- हिंदू राष्ट्र बनाने से पहले हर घर और गांव-गांव में कट्टर हिंदू बनाने का काम शुरू होगा। अभियान इसी महीने से शुरू होगा। इस काम के लिए बागेश्वर धाम से टीमें रवाना हो गई हैं। पूरी खबर पढ़ने के लिए यहां क्लिक करें…

बागेश्वर के हिंदू गांव की घोषणा पर एमपी में विवाद:कांग्रेस ने मांगी मुस्लिम, ईसाई, सिख गांव की अनुमति छतरपुर स्थित बागेश्वर धाम के पीठाधीश्वर धीरेंद्र शास्त्री के हिंदू गांव बसाने पर कांग्रेस की तरफ से प्रतिक्रिया आई है। कांग्रेस प्रवक्ता अब्बास हफीज ने कहा है कि अगर देश का संविधान धर्म के आधार पर गांव बसाने की अनुमति देता है, तो मुझे भी मुस्लिम, ईसाई और सिख ग्राम बसाने की अनुमति दी जाए। पूरी खबर पढ़ने के लिए यहां क्लिक करें…



Source link

सोबत फिरायला गेले, पण लग्नास नकार दिल्याने तरुण भडकला, अन् पुढे…; घटनेनं अकोला हादरलं!

सोबत फिरायला गेले, पण लग्नास नकार दिल्याने तरुण भडकला, अन् पुढे…; घटनेनं अकोला हादरलं!


Akola Crime News : अकोला शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याने तरुणीवर चक्क चाकू हल्ला केल्याची घटना अकोल्यात घडलीय. 25 वर्षीय तरुणानं 22 वर्षीय वैद्यकीय नर्स असलेल्या तरुणीला चाकूने भोकसून तिचा खून करण्याचा प्रयत्न केलाय. संतोष डिवरे असं चाकू हल्ला करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. बोरगाव मंजू पोलिसांनी त्याला अटक केली असून  पुढील तपास सध्या केला जात आहे. अकोल्यातल्या बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीतील सोनाळा रस्त्यावर ही घटना घडली. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  

नर्स असलेल्या तरुणीला चाकूने भोकसून तिचा खून करण्याचा प्रयत्न

पुढे आलेल्या माहितीनुसार, संतोष डिवरे आणि जखमी तरुणी हे दोघे चांगले मित्र आहेत. दोघेही जण बोरगाव मंजू परिसरात फिरायला गेले होते. याच दरम्यान संतोषने तरुणीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. मात्र तरुणीने स्पष्ट नकार दिल्याने दोघांमध्ये वाद झाला, आणि याच वादादरम्यान तरुणानी त्याच्या जवळील चाकूने तिच्यावर गंभीर स्वरूपात वार केले. या घटनेत तरुणी गंभीर स्वरूपात जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. सद्यस्थितीत तरुणीची प्रकृती स्थिर असून या घटनेने अकोला जिल्हा हादरून गेलाय. सध्या या घटनेचा अधिक तपास बोरगाव मंजू पोलीस स्टेशन करत असल्याची माहिती ठाणेदार अनिल गोपाळ यांनी दिली आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या आवारात गवताला मोठी आग

अकोला लगतच्या गायगाव येथील पेट्रोल आणि डिझेलच्या आवारात गवताला मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. गायगाव येथे इंडियन ऑइल, हिंदुस्तान पेट्रोलियम भारत पेट्रोलियमसह अनेक इंधन कंपन्यांचे पेट्रोल आणि डिझेलचे डेपो आहेत.  मात्र आग लवकर विझवल्याने मोठा अनर्थ टळला आहे.  आग वाढली असती तर गायगावसह आजूबाजूची गावं आणि अकोल्यात डाबकी रोड, जुने शहर भागात मोठे नुकसान झालं असतं.  मात्र आग विझवण्यासाठी अकोला महापालिकेचं अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं. पण त्याआधीच आग कंपनीतील कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांनी वेळीच आग विझवल्याने मोठा अनर्थ टळलाय. मात्र ही घटना घडल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली असून सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आला आहे. 

हे ही वाचा 

अधिक पाहा..



Source link

नितेश राणेंनी नितीन गडकरींकडे शिकवणी लावावी, आमदार अमोल मिटकरींचा महायुतीतील नेत्याला घरचा आहेर

नितेश राणेंनी नितीन गडकरींकडे शिकवणी लावावी, आमदार अमोल मिटकरींचा महायुतीतील नेत्याला घरचा आहेर


अकोला : छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम लोक नव्हते, असं म्हणणाऱ्या नितेश राणेंनी (Nitesh Rane) नितीन गडकरींकडे (Nitin Gadkari) शिकवणी लावावी, असा टोला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि आमदार अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) राणेंना लगावलाय. तर देशात छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj),  छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्यासह महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांविरोधात केंद्रानं लवकरच कठोर कायदा करावा, अशी मागणी ही त्यांनी केलीये. घरावर छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारल्यानंतर आमदार अमोल मिटकरींनी भाष्य करत महायुतीतील नेत्यालाच एकप्रकारे घरचा आहेर दिला आहे. ते अकोला येथे बोलत होते. 

पुतळा घरावर उभारणं हे आपलं भाग्य- अमोल मिटकरी

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांचा 7 एप्रिलला आपल्या नव्या घरात गृहप्रवेश होतोय. अकोल्यातील आरोग्यनगर भागातील ‘शिव-संभव’ निवासस्थानावर छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलाय. मिटकरींनी आपल्या घरावर या पुतळ्याची प्रतिष्ठापना केलीय. 9 फुट उंच आणि 6 फुट उंच चौथरा असा हा 15 फुट उंचीचा पुतळा झालाय.

 हा क्षण माझ्या दृष्टीनं अत्यंत भावनिक-अमोल मिटकरी

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर राज्यात सुरू असलेलं राजकारण हे अतिशय दुर्दैवी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी राजांचे विचार सांगूनच आपण येथपर्यंत आल्यानं त्यांचा पुतळा घरावर उभारणं हे आपलं भाग्य असल्याचं आणि  हा क्षण माझ्या दृष्टीनं अत्यंत भावनिक असल्याचे ही आमदार मिटकरी म्हणालेय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम लोक नव्हते असं म्हणणाऱ्या नितेश राणेंनी नितीन गडकरींकडे शिकवणी लावण्याचा टोला आमदार मिटकरींनी राणेंना लगावलाय. तर देशात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांविरोधात केंद्रानं लवकरच कठोर कायदा करावा, अशी मागणी त्यांनी केलीये.

शेतकऱ्यांचे मन दुखावले असतील तर ‘मी’ जाहीर माफी मागतो

कर्जमाफीच्या (loan waiver ) मुद्यांवर बोलताना राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना (Farmers) खडे बोल सुनावले होते. त्यानंतर राज्यभरातील शेतकऱ्यांसह राजकीय वर्तुळातून कृषीमंत्र्यांवर टीकेची झोड उठली होती. यानंतर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली. मात्र मी शेतकऱ्यांबाबत असं वक्तव्य केलं नाही, असेही कोकाटे यांनी म्हटलंय. दरम्यान याच मुद्यावरून आमदार अमोल मिटकरींनी भाष्य करत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मन दुखावले असतील तर ‘मी’ जाहीर माफी मागतो. असे म्हणत अमोल मिटकरी यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्याबद्दल शेतकऱ्यांना जाहीर माफी मागितली आहे. 

हे ही वाचा 

अधिक पाहा..



Source link

दिव्या खालीच अंधार! चक्क रेल्वे अन् विद्यापीठाच्या जागेत गांजाची लागवड; अकोला पोलिसांची कारवाई

दिव्या खालीच अंधार! चक्क रेल्वे अन् विद्यापीठाच्या जागेत गांजाची लागवड; अकोला पोलिसांची कारवाई


Akola Crime News : अकोल्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अकोल्यातल्या रेल्वेच्या जागेत आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला लागून चक्क चोरी छुपी गांजाची शेती केली जात असल्याचा प्रकार उजेडात आला आहे. अकोल्यातल्या एमआयडीसी पोलिसांना याचा सुगावा लागला असता त्यांनी थेट कारवाई करत हा धक्कादायक प्रकार उजेडात आणला आहे.या घटनेमुळे जिल्ह्यात सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. सध्या पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे.  

अकोला-नांदेड रेल्वे रुळाच्या जागेत या गांजाची लागवड

राज्यात गांजा लागवडीवर कायद्याने पूर्णतः बंदी आहे. मात्र, तरीही चोरी छुप्या पद्धतीनं गांजाची लागवड केली जात असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. अकोल्यातही गांजा लागवड केल्याचा प्रकार समोर आलाय. काही अज्ञातांनी अकोल्याच्या कृषी नगर परिसरातल्या रेल्वेच्या जागेत थेट गांजाची लागवड केली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी या ठिकाणी कारवाईत संपूर्ण गांजाची झाडे उध्वस्त केलेत. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या भिंतीला लागून आणि अकोला-नांदेड रेल्वे रुळाच्या जागेत या गांजाची लागवड करण्यात आली होती. एमआयडीसी पोलिसांची जवळपास 3 तास ही कारवाई सुरु होती.

गांजाची लागवड करणाऱ्या अज्ञातांचा शोध सुरू

अखेर, पोलिसांनी ही संपूर्ण गांजाची झाडे उखडून टाकली आहे. मात्र गांजा लागवड कुणी केलाय? याचा सुगावा अद्याप हाती लागला नाही. तरीही पोलिसांचा त्या दिशेने तपास सुरुये. परंतु या कारवाईनंतर अकोल्यात एकच खळबळ उडाली आहे. ऐन अकोला शहरातल्या गजबजलेल्या वस्तीतील रेल्वे रुळाच्या जागेत गांजा लागवड होत असल्याने अनेक सवाल उपस्थित होतायेत.

धारदार शस्त्रांसह एकाला अटक, दुसऱ्या फरार आरोपीचा शोध सुरू

घातपात करण्याच्या इराद्यानं शस्त्रसाठा घरात लपवून ठेवणाऱ्या एकाला भंडाऱ्याच्या साकोली पोलिसांनी धारदार शस्त्रांसह अटक केली. पोलीस येताच दुसरा आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. या कारवाईत साकोली पोलिसांनी तलवार, चाकू, गुप्ती, कोयता, हॉकीस्टिक आणि काही दारूचा साठाही जप्त केला. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून साकोली इथं प्रॉपर्टीच्या वादातून मोठा घातपात करणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.

पोलिसांनी घटनास्थळी गाठून ही कारवाई केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी ही कारवाई साकोलीच्या गणेश वार्ड इथं केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये ओडिसा राज्यातील दिनेश अग्रवाल (४४) याचा समावेश असून अशोक अग्रवाल हा फरार झाला असून साकोली पोलीस त्याचा शोध घेत आहे.

हे ही वाचा 

Ajit Pawar in Baramati: अजितदादांचा बारामती दौरा वेगळ्याच कारणामुळे चर्चेत, कट्टर विरोधकाच्या मेळाव्याला लावणार हजेरी?

 

अधिक पाहा..



Source link

विधानसभा गाजवणारे बच्चू कडू आता विधानपरिषदेच्या आखाड्यात, शिक्षक मतदारसंघातून लढण्याचे संकेत 

विधानसभा गाजवणारे बच्चू कडू आता विधानपरिषदेच्या आखाड्यात, शिक्षक मतदारसंघातून लढण्याचे संकेत 


अमरावती : तब्बल चारवेळा विधानसभेचा आखाडा गाजविणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडूंची विधान परिषदेच्या आखाड्यात उतरण्याची तयारी सुरू असल्याची माहिती आहे. बच्चू कडू अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी अतिशय सकारात्मक असल्याचं सांगितलं जातंय. ही निवडणूक पुढच्या वर्षी म्हणजे 2026 मध्ये होणार आहे. 

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदारसंघातून विधानसभेत पराभूत झाल्यानंतर बच्चू कडूंची शिक्षक मतदारसंघातून चाचपणी सुरू असल्याची माहिती आहे. बच्चू कडूंनी 2004, 2009, 2014 आणि 2019 असे तब्बल चार वेळा अचलपुरातून विजय मिळवला होता. 

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अचलपुरातून भाजपाच्या प्रवीण तायडे यांनी बच्चू कडूंचा 12,131 मतांनी पराभव केला. त्यानंतर आता बच्चू कडू डिसेंबर 2026 मध्ये होणाऱ्या अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक लढविण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. 

पुढच्या वर्षी विधान परिषदेची निवडणूक

सध्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाचे नेतृत्व अपक्ष आमदार किरण सरनाईक करत आहेत. किरण सरनाईक यांचा कार्यकाळ 6 डिसेंबर 2026 रोजी संपणार आहे. नुकत्याच अमरावतीमध्ये पार पडलेल्या प्रहार शिक्षक संघटनेच्या मेळाव्यात बच्चू कडू यांना शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढवण्यासाठी पक्षाकडून आग्रह करण्यात आला. त्याला बच्चू कडूंनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

बच्चू कडूंचे स्पष्ट संकेत

‘एबीपी माझा शी बोलताना बच्चू कडूंनी अमरावती शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा विचार असल्याचं स्पष्ट केलं. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षक मतदारांचा समावेश आहे. बच्चू कडूंच्या शिक्षक मतदारसंघातील एंट्रीने अमरावती शिक्षक मतदारसंघाची निवडणूक चुरशीची आणि हाय व्होल्टेज होण्याची शक्यता आहे.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..



Source link