आयुष्यभर पै-पै जोडून कमावलेली संपत्ती चोरट्यांनी लुटून नेली, बातमी कळताच घरमालकाचा हृदयविकाराच्

आयुष्यभर पै-पै जोडून कमावलेली संपत्ती चोरट्यांनी लुटून नेली, बातमी कळताच घरमालकाचा हृदयविकाराच्


Akola: अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील हातगाव या गावात धक्कादायक घटना समोर आली आहे. आयुष्यभर मेहनत करून जमवलेली संपत्ती काही क्षणांत चोरट्यांनी लंपास केली, आणि ही बातमी कानावर येताच 65 वर्षीय घरमालक अशोक नामदेवराव बोळे यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडलीय. अशोक नामदेवराव बोळे असं मृत व्यक्तीचे नाव  असून, ते हातगाव येथील रहिवासी होते. गुरुवारी रात्री पावणे आठच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून या संदर्भात अकोला स्थानिक पोलिसांचा आणि गुन्हे शाखेचा संयुक्त पंचनामा सुरुय. आता या चोरट्यांना पकडण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभं आहे. (Heartattack After Theft)

नक्की झालं काय?

अशोक बोळे यांच्या घरात रात्री अज्ञात चोरट्यांनी शिरकाव करत सुमारे 4 ते 5 लाखांचा मुद्देमाल लंपास केला. यामध्ये सोन्याचे दागिने आणि रोख रक्कमेचा समावेश होता. चोरी झाली तेव्हा घरात कोणीच नसल्याने चोरट्यांनी संधी साधत ही लूट केली. काही वेळाने बोळे कुटुंबीयांनी घरी चोरी झाल्याची माहिती मिळताच, अशोक बोळे यांनी तात्काळ घराकडे धाव घेतली. मात्र, घराजवळ पोहोचण्याआधीच त्यांना अचानक चक्कर आली आणि ते जमिनीवर कोसळले. गावकऱ्यांनी लगेचच त्यांना रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. चोरीचा धक्का इतका तीव्र होता की अशोक बोळेंचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक गुन्हे शाखा आणि मूर्तिजापूर पोलिसांनी संयुक्तपणे पंचनामा करत तपास सुरू केला आहे.

चोरट्यांचा मागमूस लागेना

सध्या चोरट्यांचा काही ठावठिकाणा लागलेला नसून, पोलिसांसमोर हे मोठं आव्हान उभं राहिलं आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, शेजारील लोकांची माहिती आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू असून, लवकरच आरोपींचा छडा लागेल, असा विश्वास पोलीस प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना केवळ चोरीपुरती मर्यादित राहिलेली नसून, एका कुटुंबासाठी ती आयुष्यभराची जखम घेऊन आली आहे. स्थानिक नागरिकांनीही या घटनेनंतर चोरट्यांना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी केली आहे.

हेही वाचा:

Beed Crime Walmik Karad: आम्ही बराकीतून बाहेर पडलो अन् वाल्मीक कराडच्या…. महादेव गित्तेची नवी थिअरी, सीसीटीव्ही ठरणार महत्त्वाचा पुरावा

अधिक पाहा..



Source link

महिला शिक्षिका प्रशिक्षणासाठी गेल्या, हेमंतने गैरफायदा घेतला; शाळेतील 10 विद्यार्थीनींचा विनयभं

महिला शिक्षिका प्रशिक्षणासाठी गेल्या, हेमंतने गैरफायदा घेतला; शाळेतील 10 विद्यार्थीनींचा विनयभं


Akola Crime News अकोला: महाराष्ट्राला हादरवणारी बातमी समोर आली आहे. अकोला शहरातील कौलखेड भागातल्या एका शाळेत एका कर्मचाऱ्याने तब्बल दहा चिमुकल्या विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी जिल्हा व महिला बालविकास अधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या चाइल्ड हेल्पलाइनच्या महिला समन्वयक हर्षाली गजभिये यांच्या तक्रारीवरून हेमंत विठ्ठल चांदेकर या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

चौथी अन् सातवीत शिक्षण घेणाऱ्या दहा विद्यार्थिनींसोबत विनयभंग-

सदर शाळेतील काही महिला शिक्षिका प्रशिक्षणासाठी 5 मार्चपासून बाहेरगावी गेल्या होत्या. यावेळी शाळेचे कामकाज सांभाळण्याची जबाबदारी असलेल्या हेमंत चांदेकर या आरोपीने परिस्थितीचा गैरफायदा घेत इयत्ता चौथी आणि इयत्ता सातवीत शिक्षण घेणाऱ्या दहा विद्यार्थिनींशी शारीरिक लगट करत विनयभंग केला. 

आरोपी हेमंत चांदेकरला अटक-

शाळेतील शिक्षिका प्रशिक्षण आटोपून आल्यानंतर सदर विद्यार्थीनींकडून प्रकार शिक्षकांच्या कानावर पडला. यानंतर शिक्षकांनी हा प्रकार शाळेच्या संचालकांच्या कानावर टाकला. संचालकांनी या प्रकाराची तक्रार लगेच चाईल्ड हेल्पलाइनला केली. दरम्यान, या प्रकरणी आरोपी हेमंत चांदेकर याला पोलिसांनी अटक केली आहे. सध्या आरोपी चांदेकरची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आलेली आहे.

नेमकं प्रकरण काय?

सदर शाळेतील काही महिला शिक्षिका प्रशिक्षणासाठी 5 मार्चपासून बाहेरगावी गेल्या होत्या. यावेळी शाळेचे कामकाज सांभाळण्याची जबाबदारी असलेल्या हेमंत चांदेकर या आरोपीने परिस्थितीचा गैरफायदा घेतला. आरोपी हेमंतने इयत्ता चौथी आणि सातवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या दहा विद्यार्थीनींचा विनयभंग केला. ज्यावेळी शाळेतील सर्व शिक्षिका प्रशिक्षण दौरा आटोपून आल्यानंतर पीडित विद्यार्थीनींनी घडलेला प्रकार शिक्षकांना सांगितला. यानंतर तातडीने शाळेतील संचालकांनी घडलेल्या प्रकाराची माहिती चाईल्ड हेल्पलाइनला दिली. पोलिसांनी आरोपी हेमंत चांदेकरला अटक केली असून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

संबंधित बातमी:

Sassoon Hospital : पुण्याच्या ससून रुग्णालयात ACB चा छापा, दोन अधिकारी लाच घेताना रंगेहाथ सापडले

अधिक पाहा..



Source link

राज्यात अवकाळी पावसाचा कहर! रब्बी पिकांना फटका; शेतकर्‍यांचा तोंडचा घास हिरावला

राज्यात अवकाळी पावसाचा कहर! रब्बी पिकांना फटका; शेतकर्‍यांचा तोंडचा घास हिरावला


Unseasonal Rain : ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाने राज्यातील अनेक भागात दमदार हजेरी लावली आहे. तर एप्रिलचा पहिल्या आठवड्यातील  काही दिवस अवकाळीचे ढग (Unseasonal Rain) अजून गडद होण्याची शक्यता आहे. अशातच अकोल्यात सलग दुसऱ्या दिवशी पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालंय. बाळापुर तालुक्यातल्या कांदा आणि केळी उत्पादक शेतकऱ्याला याचा मोठा फटका बसलाय. बाळापुर तालुक्यातल्या तामशी गावात कांदा (Onion) उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका बसलाय. काढणी करून कापण्यासाठी ठेवलेला शेतातला कांदा अक्षरशः अवकाळी पावसाच्या पाण्याने भिजलाय. यात जवळपास हजारो क्विंटल कांद्याचं नुकसान झालं आहे. 

वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हाता तोंडाशी आलेला घास हिरावला 

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, अकोल्यात अवकाळी पावसानं काल (1 एप्रिलच्या) रात्रीच्या सुमारास पावसाने हजेरी लावली आहे. यात कांदा आणी केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं आहे. बाळापुर तालुक्यात रात्री अवकाळी पावसाचा कहर होता. याशिवाय सोबत वारा देखील वाहत होता. या वाऱ्यामुळे अनेक केळी उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झालंय. वाऱ्यामुळं केळीची झाडं पडल्याने केळीचे घड अक्षरश: मातीत भिजल्या गेलेय. यात शेतकऱ्यांच एकरी जवळपास 35 ते 40 टक्के  नुकसान झालंय. अवघ्या दोन दिवसांवर केळी कापण्यावर आली होती, मात्र अवकाळी पावसाचा फटका बसल्याने शेतकऱ्यांकडं ऐनवेळी व्यापाऱ्यांनी पाठ फिरवलीय. अमोल काळे यांच्या शेतातील जवळपास साडेचार एकर पैकी दीड एकर केळीचे नुकसान झालं आहे.

कांदा उत्पादक शेतकरीही संकटात 

तर अशीच परिस्थिती जिल्ह्यातील कांदा उत्पादकांची झालीय. यासोबतच अवकाळी पावसाचा तडाखा आता जनावरांना बसलाय. या पावसात शेतकऱ्यांच्या मेंढ्या भिजल्याने आजारी पडल्या आहेत. त्यामुळे मेंढापालन करणारे शेतकरी चिंतेत पडलेय.

अवकाळी पावसाचा रब्बी पिकांना फटका

जालन्यात देखील अवकाळी पावसाचा रब्बी पिकांना फटका बसला आहे. यात काढणीस आलेला गहू आणि मका पिकाचं मोठं  नुकसान झालंय. जालन्यातील घनसांवगी तालुक्यातील शेवगळ आणि परिसरात सकाळच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसाने गहू आणि मका पिकाच नुकसान झालं आहे. तालुक्यातील शेवगळ आणि परिसरात अवकाळी पावसाने रब्बी हंगामातील मक्का आणि गहू पिकाच मोठा नुकसान झालं आहे. घनसावंगी तालुक्यातील शेवगळ आणि परिसरात सकाळच्या सुमारास अवकाळी पाऊस झाला आणि या पावसामुळे गहू आणि मक्का पिकाच मोठ नुकसान झालं. यामुळे काढणीला आलेला गहू आणि मका पीक अवकाळी पावसामुळे आडवं झाल्याचं पाहायला मिळाले,

दरम्यान या बेमोसमी अवकाळी पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला असून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी केली आहे.

हे ही वाचा 

अधिक पाहा..



Source link

Akola : अकोल्याच्या बाळापूरात क्षारयुक्त पाणी प्यावं लागत असल्यानं शेकडो ग्रामस्थांना किडनीचे आजार

Akola : अकोल्याच्या बाळापूरात क्षारयुक्त पाणी प्यावं लागत असल्यानं शेकडो ग्रामस्थांना किडनीचे आजार


Akola : अकोल्याच्या बाळापूरात क्षारयुक्त पाणी प्यावं लागत असल्यानं शेकडो ग्रामस्थांना किडनीचे आजार 
अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातल्या ६० पेक्षा अधिक गावांतील विहीर आणि बोअरवेलमध्ये क्षारयुक्त पाणी असल्याने एक-दोन नव्हे तर शेकडो ग्रामस्थांना किडनीचे आजार झाल्याची धक्कादायक बाब समोर आलीये…इतकंच नव्हे तर अनेकांच्या किडनीही निकामी समोर आलंय…सावरपाटी गावात एकाला किडनी गमवावी लागलीये, तर प्रशांत काळे नावाच्या ग्रामस्थाची किडनी निकामी झालीये त्यांना उपचारासाठी तब्बल १२ लाख खर्च करूनही काही फायदा झाला नसल्याची तक्रार या ग्रामस्थाने केलीये…पारस ते निंबा फाटापर्यंतमधील गावं खारपण पट्ट्यात येतात, मात्र अनेक गावांत पाणीपुरवठा योजना मंजूर होऊनही पाण्याचा प्रश्न मार्गी लागला नसल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे… 
 अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातल्या 60 पेक्षा अधिक गावातील बिहिरी आणि बोरवेल मध्ये क्षारयुक्त पाणी असल्यान एक दोन नवे तर शेकडो ग्रामस्तांना किडनीचे आजार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इतकच नव्हे तर अनेकांच्या किडनी देखील निकामी झाल्यात. सावरपाटी गावात एकाला किडनी गंबावी लागली तर प्रशांत काळे नावाच्या ग्रामस्थाची किडनी निकामी झाली. त्यांना उपचारासाठी तब्बल 12 लाख खर्च करूनही काही फायदा झाला नसल्याची तक्रार या ग्रामस्थांनी केली आहे. पारस ते निंबा.



Source link

‘नाफेड’च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल

‘नाफेड’च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल


अकोला : जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील अंदुरा येथील ‘अंदुरा ॲग्री प्रोड्युसर कंपनी’च्या सोयाबीन खरेदीत घोटाळा उघडकीस आला. ज्यात सुमारे 63 लाख 44 हजार 924 रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. यात तब्बल 1297 क्विंटल सोयाबीनची खरेदी न करता नाफेडच्या पोर्टलवर नोंदणी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यासंदर्भात कंपनीच्या संचालकांसह 12 जणांविरुद्ध आर्थिक व फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक उपक्रम राबविल्याने ही कंपनी जिल्ह्यात नावारूपास आली. शेतकरी उत्पादक कंपनीला बदनाम करण्यासाठीच काही व्यापारी, पणन विभागाचे काही अधिकारी आणि कंपनीतील काही भ्रष्ट प्रवृत्तींनी हा कट रचल्याचा गंभीर आरोप शेतकरी कंपनीने केला आहे.

काय आहे नेमके प्रकरण? 

अकोला जिल्ह्यातील अंदुरा येथील सोयाबीन खरेदी घोटाळा सध्या राज्यभरात गाजतो आहे. यात खरेदी करण्यासाठी शासनाने नियुक्त केलेली ‘अंदुरा ॲग्री प्रोड्युसर कंपनी’ सध्या अडचणीत आलीये. याला कारण ठरलंय कंपनीच्या सोयाबीन खरेदी केंद्रावर झालेला गैरव्यवहार. कंपनीने 15 फेब्रुवारीनंतर एकूण 19723.92 क्विंटल सोयाबीन खरेदी केलेय. मात्र ‘नाफेड’च्या (NAFED) गोदामात केवळ 18426.92 क्विंटल माल जमा झालाय. उर्वरित 1297 क्विंटल सोयाबीनची फक्त कागदोपत्री ऑनलाईन खरेदी झाल्याचं समोर आलंय. 

शेतकरी उत्पादक कंपनीच्या खरेदी केंद्रावर 68 शेतकऱ्यांच्या नावावर सुमारे 63 लाख 44 हजार 924 रूपयांनी शासनाला चुना लावण्यात आलाय. नाफेड’मार्फत पणन विभागाच्या माध्यमातून शासकीय आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत हमीभावाने शेतकऱ्यांकडून सोयाबीन, हरभरा, तूर, मूग, उडीद आदी मालाची खरेदी केली जातेय. यासाठी अंदुरा येथे सबएजन्ट म्हणून ‘अंदुरा ॲग्री प्रोड्युसर कंपनी’ या नोंदणीकृत संस्थेला खरेदीसाठी नियुक्त केले होतेय. मात्र, याच कंपनीला बदनाम करण्यासाठी काही व्यापारी, पणन विभागाचे काही अधिकारी आणि कंपनीतील काही भ्रष्ट प्रवृत्तींनी हा कट रचल्याचा गंभीर आरोप कंपनीनं केलाय. 

कंपनीने सोयाबीन खरेदीसाठी नियुक्त केलेल्या व्यवस्थापक आणि कॉम्प्युटर ऑपरेटरशी काही व्यापाऱ्यांसह नाफेडच्या अधिकाऱ्यांनी संगनमत केल्याचा आरोप कंपनीच्या संचालक मंडळाने केलाय. यात शेतकऱ्यांच्या नावावर व्यापारी, व्यवस्थापक आणि कॉम्प्युटर ऑपरेटरने सोयाबीन खरेदीच्या खोट्या नोंदी केल्यात. 

घोटाळ्याची व्याप्ती

बाळापूर तालुक्यातील अंदुरा येथील शेतकरी उत्पादक कंपनीच्या खरेदी केंद्रावर 68 शेतकऱ्यांची सुमारे 63  लाख 44 हजार 924 रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे यात काही बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सात-बारांची ऑनलाईन नोंद करण्यात आली. 

खरेदी आणि विक्रीतील फरक 

कंपनीने 15 फेब्रुवारीनंतर एकूण 19723.92  क्विंटल सोयाबीन खरेदी केले, मात्र नेफेडच्या (NAFED) गोदामात केवळ 18426.92 क्विंटल माल जमा झाला. उर्वरित 1297 क्विंटल सोयाबीनचा गैरवापर झाल्याचे निष्पन्न झाले.

खोट्या नोंदी 

अज्ञात व्यापाऱ्याने व्यवस्थापक आणि संगणकचालकाला हाताशी धरून 1297 क्विंटल सोयाबीन विक्रीच्या खोट्या नोंदी केल्याचा संशय आहे. 

‘अंदुरा ॲग्री प्रोड्युसर कंपनी’ने राबविले होते शेतकरी हिताचे अनेक उपक्रम  

‘अंदुरा ॲग्री प्रोड्युसर कंपनी’… अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील अंदुरा गावातील विविध शेतकरी हिताचे उपक्रम राबविल्याने नावारूपास आलेली शेतकरी उत्पादक कंपनी. या कंपनीने आपल्या केंद्रावर माल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना चहापाणी, नाश्त्याची व्यवस्था केली होती. यासोबतच शेतकऱ्यांसाठी विविध विषयांवर मार्गदर्शन करणारे विविध परिसंवाद आयोजित केले होते. यासोबतच महिलांसाठी हळदीकुंकू, शेतकऱ्यांसाठी किर्तन असे अनेक उपक्रम कंपनीने राबविले होते. यासाठी कंपनीला वेळोवेळी कृषी विभाग आणि आत्माच्या वतीने सन्मानित करण्यात आले होते. कंपनीने ‘स्मार्ट प्रकल्पां’तर्गत अंदुरा येथे उभारलेले गोदाम, शेतमाल खरेदी केंद्र पहायला या प्रकल्पाचे अनेक मोठे अधिकारी अंदुरा येथे येऊन गेले आहेत. 

कंपनीच्या तक्रारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष? 

हा प्रकार लक्षात आल्याने कंपनीच्या वतीने 24 फेब्रुवारी, 4 मार्चला जिल्हा पणन अधिकाऱ्यांना या प्रकाराची लेखी तक्रार करण्यात आली. यासोबतच 9 मार्चला कंपनीने जिल्हा पणन अधिकाऱ्यांच्या कारणे दाखवा नोटीसला उत्तरही दिले. तर 11 तारखेला शेतकरी कंपनीने याप्रकरणात दोषींवर कारवाईसाठी पोलीस तक्रारही केलीय. मात्र, या तक्रारींवर अधिकाऱ्यांनी कोणतीच कारवाई केली नाहीय. मात्र, यात कोणतीही कारवाई न केलेल्या जिल्हा पणन अधिकारी मारूती काकडे यांच्या तक्रारीवरून उरळ पोलिसांनी कंपनीच्या संचालक मंडळासह 12 लोकांवर गुन्हे दाखल केलेय. यासंदर्भात संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी ‘एबीपी माझा’ला प्रतिक्रियेसाठी कोणताही प्रतिसाद दिला नाहीय. याप्रकरणात काकडे यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. 

खरेदी घोटाळ्याचे मुख्य सुत्रधार काही संशयीत व्यापारी?

यात सहभागी व्यापाऱ्यांनी संगनमत करून काही शेतकऱ्यांकडून त्यांचे सातबारे घेतलेत. एका शेतकऱ्याच्या ‘सात-बाऱ्या’वर एका दिवशी 25 क्विंटल खरेदी करण्याची परवानगी ‘नाफेड’ने  दिलीय. याचाच फायदा घेत शेतकऱ्यांच्या नावावर व्यापाऱ्यांचे सोयाबीन हमीभावापेक्षा खरेदीचा गोरखधंदा राज्यभरात सुरू असल्याची गंभीर बाब समोर आलीय. यासोबतच 6 फेब्रुवारीला अंदुरा केंद्रावर फक्त अर्ध्या तासात 742 क्विंटल सोयाबीनची ऑनलाईन नोंदणी ‘नाफेड’च्या पोर्टलवर करण्यात आली. याकडे पणन विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले का?, हा प्रश्न विचारला जातोय. 

कंपनीला बदनाम करण्यासाठी राजकीय हस्तक्षेपाचा आरोप 

दरम्यान, राजकीय हस्तक्षेपातून कंपनीला बदनाम केलं जात असल्याचा आरोप कंपनीने केला आहे. यात काही व्यापारी, दलाल, कंपनीतील काही लोक यासोबतच काही राजकीय लोकांनी लोकप्रतिनिधींना दिशाभूल करणारी चुकीची माहिती दिल्याचा आरोप कंपनीने केला आहे. यातून कंपनीची प्रतिमा डागाळत शेतकरी हिताच्या कामात खोडा घालण्याचा प्रयत्न गैरव्यवहाराच्या आरोप करून केला जात असल्याचं कंपनीने म्हटलंय. यात कंपनीतील कुणीही दोषी असेल तर त्यावर कठोर कारवाईची मागणी संचालक मंडळाने केलीय. प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून यातील संभ्रम दूर करण्याची विनंती सरकारला केली आहे. 

अकोला जिल्ह्यातील सोयाबीन खरेदीतील गैरव्यवहार हे यातील भ्रष्टाचाराच्या हिमनगाचं टोक आहेय. या संपुर्ण प्रकरणात सरकारने तटस्थपणे चौकशी करत ‘दुध का दुध, पाणी का पाणी करणे’ आवश्यक आहेय. मात्र, व्यापारी, पणन विभाग, नाफेड आणि कंपनीतील भ्रष्ट प्रवृत्तीच्या दृष्ट साखळीत निरपराध भरडले जावू नयेत हिच सर्वसामान्य शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. 

अधिक पाहा..



Source link

अकोल्यात रेल्वे टीसीची मालगाडीसमोर उडी; थरकाप उडवणारी घटना, पोलिसांच्या भीतीने जीवन संपवलं?

अकोल्यात रेल्वे टीसीची मालगाडीसमोर उडी; थरकाप उडवणारी घटना, पोलिसांच्या भीतीने जीवन संपवलं?


अकोला : अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर एका टीसीने आत्महत्या (Akola Crime News) केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मुर्तीजापुरात तिकीट तपासणीकाने अर्थातच रेल्वे टीसीने टोकाचे पाऊल उचलत रेल्वेसमोर उडी घेत आपलं जीवन संपवलय. मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावरच मालगाडी समोर उडी घेत टीसीने आत्महत्या केली आहे. काल (31 मार्च) रात्रीच्यादरम्यान ही आत्महत्येची (Crime News) घटना उघडकीस आली आहे. कौटुंबिक कलहातून टीसीने टोकाची भूमिका घेतल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी‌ दिली आहे. सुमेध मेश्राम असं या आत्महत्या करणाऱ्या रेल्वे टीसीचं नाव आहे. विशेष म्हणजे सुमेध मेश्रावर यांच्यावर अल्पवयीन मुलीच्या छेडछाडीचा गंभीर स्वरूपाचा गुन्हे दाखल आहे. पोलीस अटक करणार होते, याच भीतीने मेश्राम यांनी आत्महत्येसारखं टोकाचं उचलल्याचं बोललं जाते आहे.

काय आहे सुमेध मेश्राम यांच्या आत्महत्येचं खरं कारण? 

40 वर्षीय सुमेध मेश्राम हे मागील काही दिवसांपासून घरगुती कारणामुळे तणावात होते. काल रात्री मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक 1 वर कर्तव्य बजावत असताना सुमेध मेश्राम यांनी रेल्वे समोर उडी घेतली. मुर्तिजापूरवरून भुसावळकडे जाणाऱ्या मालगाडी समोर उडी घेतल्याने ते गंभीर जखमी झालेत. यात सुमेध मेश्राम यांचा जागीच मृत्यू झाला होता. रात्रीच घटनास्थळी मुर्तिजापूर पोलीस दाखल झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास अकोला लोहमार्ग पोलीस करत आहेत.

सुमित मेश्राम यांना होती अटकेची भीती?

सुमेध मेश्राम यांच्यावर अमरावती जिल्ह्यातील बडनेरा पोलीस स्टेशनमध्ये नुकतेच गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत. एका 14 वर्षे अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार मेश्राम यांच्यावर अत्याचार केल्यासह विनयभंग त्याशिवाय बाल संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हे झाले होते. पीडित मुलीवर मूर्तिजापूर शहरातीलचं एका कॉलनीमध्ये घर सामान काढण्याच्या बहाण्याने तिच्यावर बळजबरी अत्याचार केल्याचा आरोप मेश्राम यांच्यावर होता. कुणाला काही सांगितलं तर आईसह तुला जिवे ठार मारू, अशी धमकी देखील पीडितीला त्यांनी दिल्याचा आरोप पोलीस तक्रारीत करण्यात आला होता. यात पीडित मुलीला गुंगीचं औषध दिल्याचाही आरोप करण्यात आला होता.

अखेर पीडित मुलीने सर्व प्रकार आईला सांगितला. आईने अमरावती जिल्ह्यातील बडनेरा पोलीस स्टेशन गाठलं. नातेवाईकांच्या तरीवरून मृतक सुभेध मेश्राम यांच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेत. यामध्ये 64 (2) (m), 64(2)(f), 65(1), 65(2), 351 (3) भान्या स सहकलम 4, 6 पोक्सो प्रमाणे कलमांची नोंद आहे. पुढे हा तपास मुर्तीजापुर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. त्यानंतर पोलीस सुमेध मेश्राम यांना अटक करण्यासाठी रवाना झाली. मात्र अटकेच्या भीतीने त्यांनी आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त केला जातो आहे.

टीसीच्या आत्महत्येने रेल्वेच्या वर्तुळात खळबळ : 

या संपूर्ण घटनेनंतर अकोला आणि अमरावती जिल्ह्यातील रेल्वेच्या कर्मचारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.‌ मृतक सुमेध मेश्राम यांच्यावर गुन्ह्यानंतर कोणी दबाव टाकत होतं का?. हा प्रश्न यातून उपस्थित होतो आहे.‌ याप्रकरणी मुर्तीजापुर पोलिस आणि लोहमार्ग पोलीस अधिक तपास करीत आहेत.

हे ही वाचा 

अधिक पाहा..



Source link

YouTube
Instagram
WhatsApp