कधीकाळी बायकोवर कवितांमधून जीव ओवाळून टाकला, मरताना म्हणाला, तिला चेहरा सुद्धा दाखवू नका

कधीकाळी बायकोवर कवितांमधून जीव ओवाळून टाकला, मरताना म्हणाला, तिला चेहरा सुद्धा दाखवू नका


Akola Crime : अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तहसील कार्यालयाअंतर्गत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने गळ्याला दोर लावत आत्महत्या केली आहे. शिलानंद तेलगोटे असं आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचं नाव आहे. कधीकाळी कवितेच्या माध्यमातून बायकोवर जीव ओवाळून टाकणाऱ्या  शिलानंद तेलगोटे यांनी आयुष्य संपण्यापूर्वी एक स्टेटस ठेवलं. या स्टेटसमध्ये त्यांनी बायकोला चेहरा सुद्धा दाखवू नका, असं लिहिलंय. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 

शिलानंद तेलगोटेंनी कधीकाळी बायकोवर जीव ओवाळणाऱ्या कविता लिहिल्या होत्या. मात्र, त्याच बायकोच्या भावामुळे शिलानंद यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आणि त्यांनी मरताना बायकोला माझा चेहरा देखील दाखवू नका, असं म्हणत आत्महत्या केली आहे. 

स्टेटसमध्ये शिलानंद तेलगोटेंनी काय म्हटलंय?

मी श्री शिलानंद माणिकराव तेलगोटे वय २९ रा तेल्हारा शाहू नगर गाडेगाव रोड तेल्हारा..  मी दि ३०/०३/२०२५ रोजी आत्महत्या करत आहे. माझ्या मुत्यु माझी पत्नी नामे प्रतिभा नेलगोटे हे असून मला खूप अश्लील शिव्या देते.  माझ्या मुला समोर आणि मला फाशी घेय असे वारंवार सांगते. माझे पैसे तिचा भाऊ श्री प्रविण गायगोले असुन त्याच्या कडे त्यांना शेतीसाठी मी काही रक्कम दिली सदर रक्कम मी तलाठी कडून काढली. त्यांचे व्याज व्याज देणे अपेक्षित आहे कारण माझ्या पगार मधुन रक्कम कटोती सुरु आहे. माझ्या मुत्यु झाल्यास माझी शेवटची ईच्छा माझी PM होणार नाह चहेरा…माझा चेहरा पत्नीला  दाखवू नये कारण आज मी ५ दिवस झाले मी जेवम केले नाही. माझी पत्नी ला सोडून कोणालाही चेहरा दाखवा.

अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तहसील कार्यालय अंतर्गत कार्यरत पटवारी शिलानंद तेलगोटे यांची गळफास घेऊन आत्महत्या. ‘व्हाट्सअप’वर स्टेटस ठेवून थार येथील एमआयडीसीमध्ये घेतला गळफास. पत्नीच्या सततच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचं ‘स्टेट्स’मध्ये नमूद केलं आहे. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तेल्हारा येथील ग्रामीण पाठवण्यात आलाय. पत्नीला मृत्यूनंतर आपला चेहरा पाहू न देण्याची विनंती. पत्नीने आर्थिक आणि मानसिक छळ केल्याचा स्टेटसमधून आरोप करण्यात आलाय. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

MS Dhoni : धोनी चेन्नईसाठी आता पनवती झालाय, पहिल्यांदा त्याला काढून टाका, दोन पराभवानंतर कोणी केली बोचरी टीका? युवराज सिंगच्या वडिलांची सुद्धा करून दिली आठवण!

Beed Jail Walmik Karad: ज्याला अख्खं बीड थरथर कापायचं त्या वाल्मिक कराडच्या अंगावर हात टाकणारे ‘ते’ दोघे कोण?

अधिक पाहा..



Source link

अकोल्यात बायकोच्या छळाला कंटाळून नवऱ्याने गळ्याला दोर लावला, काळजाचं पाणी करणारं व्हॉटसॲप स्टेट

अकोल्यात बायकोच्या छळाला कंटाळून नवऱ्याने गळ्याला दोर लावला, काळजाचं पाणी करणारं व्हॉटसॲप स्टेट


Akola Talathi Suicide: अकोल्यात एका नवऱ्याने आपल्या बायकोच्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिलानंद तेलगोटे यांनी रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. शिलानंद तेलगोटे हे अकोला (Akola Suicide) जिल्ह्यातील तेल्हारा तहसील कार्यालयाच्या अंतर्गत तलाठी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या आत्महत्येच्या वृत्ताने अकोला जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. 

शिलानंद तेलगोटे  यांनी आत्महत्या करण्यापूर्वी व्हॉटसॲपवर एक स्टेटस ठेवले होते. त्यामधून तेलगोटे यांच्या आत्महत्येमागील कारण स्पष्ट झाले आहे. शिलानंद तेलगोटे यांनी मृत्यूपूर्वीच्या या स्टेटसमध्ये पत्नी आपला मानसिक छळ करत असल्याचे म्हटले आहे. माझ्या मृत्यूनंतर माझा चेहरा माझ्या पत्नीला दाखवू नये, असेही तेलगोटे यांनी स्टेटसमध्ये म्हटले आहे. पोलिसांनी शिलानंद तेलगोटे (Shilanand Telgote) यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. या पोस्टमार्टेम रिपोर्टवर पोलिसांचा पुढील तपास अवलंबून असेल. दरम्यान, शिलानंद तेलगोटे यांनी व्हॉटसॲप स्टेटसमध्ये पत्नीने आपला छळ केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी आपले मृत्यूपत्रही तयार केले होते. यामध्ये त्यांनी आपली सर्व संपत्ती मुलाच्या नावावर केली आहे. 

शिलानंद तेलगोटे यांचं मृत्यूपूर्वीचं व्हॉट्सअप’वर स्टेटस नेमकं काय ?

मी श्री. शिलानंद माणिकराव तेलगोटे (वय 39, रा. तेल्हारा, शाहूनगर, गाडेगाव रोड, तेल्हारा). मी दिनांक 30/03/2025 रोजी आत्महत्या करत आहे. माझ्या मृत्यूला जबाबदार माझी पत्नी प्रतिभा तेलगोटे ही असून ती मला खूप माझ्या मुलासमोर अश्लील शिव्या देते आणि मला वारंवार फाशी घे असं सांगते. माझे पैसे तिचा भाऊ श्री. प्रवीण गायबोलेकडे असून, त्यांना शेतीसाठी मी काही रक्कम दिली होती. सदर रक्कम मी तलाठीकडून काढली असून त्याचं व्याजासह रक्कम देणे अपेक्षित आहे. कारण माझ्या पगारामधून ती रक्कम कट होत आहे. माझ्या मृत्यू झाल्यास माझी शेवटची इच्छा आहे की, माझं पोस्टमार्टेम होईल तेव्हा माझा चेहरा माझ्या पत्नीला दाखवू नये. कारण आज मी पाच दिवस झाले, जेवण केलेलं नाही. माझ्या पत्नीला सोडून कोणीही पाहिलं तरी चालेल… कारण माझी पत्नी…

आणखी वाचा

संतोष देशमुखांनी भावाच्या हत्येचा बदला घेतला, त्याच झाडाखाली बबलुला संपवलं अन् पोलिसांसमोर हजर झाले

वादानंतर राकेशने गौरीवर चाकूने वार केले; मृत समजून सुटकेसमध्ये भरलं पण…; ती सुटकेसमध्ये जिवंत होती, फॉरेन्सिक अहवालात माहिती आली समोर

अधिक पाहा..



Source link

तोपर्यंत मी दिशा सालियन प्रकरणावर बोलणार नाही; बानवकुळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

तोपर्यंत मी दिशा सालियन प्रकरणावर बोलणार नाही; बानवकुळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा


Chandrashekhar Bawankule :  दिशा सालीयन प्रकरणी (Disha Salian case) जोपर्यंत पोलीस अंतिम आकलणावर येत नाहीत तोपर्यंत मी त्यावर बोलन योग्य नाही असे वक्तव्य मंत्री चंद्रेशखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केलं आहे. तसेच यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंसह सजंय राऊत यांच्यावरही टीका केली. 2047 पर्यंत आता शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेसला वाव नाही. संपूर्ण देश मोदींजीसोबत आहे असे वक्तव्य मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. विरोधी पक्षात त्यांनी चांगलं काम करावं त्यासाठी त्यांना मी शुभेच्छा देतो असेही ते म्हणाले. वक्फ बोर्डाने जी जागा बळगवली आहे, त्या जागा परत मिळाव्यात यासाठी सरकार काम करणार आहे असेही बावनकुळे म्हणाले. 

महाराष्ट्र संजय राऊतांना ऐकायला तयार नाही 

संजय राऊत (Sanjay Raut) यांचं मला काहीच ऐकू येत नाही आणि महाराष्ट्र त्यांना ऐकायला तयार नाही असा टोला मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी लगावला. उद्धव ठाकरे यांनी भगव्याचा विचार सोडला आहे. म्हणून मी म्हटलं की, उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे मेंबर झाले आहेत, आता ते अध्यक्षही होतील असा टोला बावनकुळे यांनी लगावला. 

उद्धव ठाकरे यांचे खासदार नाशिक, परभणी आणि धाराशिवमध्ये निवडून आले आहेत. त्यांनी रॅलीत पाकिस्तानचे झेंडे फडकवले होते. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व पायदळी तुडवलं असल्याची टीका मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. बाळासाहेब यांनी सांगितले होते की, ज्या दिवशी मला काँग्रेससोबत जावं लागेल त्यादिवशी मला दुकान बंद करावं लागेल असे बावनकुळे म्हणाले. 

नितेश राणे हे हिंदू विरोधात काम करणाऱ्यांबद्दल बोलतात

नितेश राणे हे हिंदू विरोधात काम करणाऱ्यांबद्दल बोलतात. पाकिस्तान जिंकली तर फटाके फुटतात. हे लोक फायदा या देशाचा घेतात पण गुण पाकिस्तानचं गातात असेही बावनकुळे म्हणाले. देशविरोधी षडयंत्र रचले जाते त्यावर नितेश राणे बोलत आहेत. रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. लवकरच अंतिम बैठक या आठवड्यात होणार आहे. तो फार मोठा हा विषय नाही पण यावर निर्णय होईल असे ते म्हणाले. समाजामध्ये तेड निर्माण होणार नाही यावर सगळ्यांनी भर दिला पाहिजे असेही ते म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

हिंदुत्व आमच्या DNA मध्येच, उद्धव ठाकरेंकडे औरंगजेब फॅन क्लबचे नेतृत्व, बावनकुळेंचा हल्लाबोल, म्हणाले, पंतप्रधानांवर बोलण्याची तुमची पात्रता नाही 

अधिक पाहा..



Source link

आंब्याचा सिझन आल्यामुळे भिडे बेताल बरळतोय, संभाजी भिडेंच्या वक्तव्यावर अमोल मिटकरींचा हल्लाबोल

आंब्याचा सिझन आल्यामुळे भिडे बेताल बरळतोय, संभाजी भिडेंच्या वक्तव्यावर अमोल मिटकरींचा हल्लाबोल


अकोला: शिवप्रतिष्ठान संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे नवीन चर्चेला तोंड फुटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) हे सर्वधर्मीय नव्हते. शिवरायांनी आणि छत्रपती संभाजी महाराजांनी शहाजी राजे यांचा हिंदवी स्वराज्याचा विचार राबवला. आपल्याकडील प्राध्यापक, शिक्षक मात्र चुकीचा इतिहास मांडत आहेत, असं मत संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी व्यक्त केलं. त्यांच्या वक्तव्यनंतर आता अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत. 

अशातच, या वक्तव्यावरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी संभाजी भिडे (Bhide Guruji) यांना चांगलंच सुनावलंय. आता आंब्याचा सिझन आल्यामूळे भिडे बेताल बरळतायेत, असा टोला मिटकरींनी लगावलाय. भिडेंनी बहूजन समाजातील पोरं हाताशी धरून इतिहासाची मोडतोड सुरू केल्याचं ही अमोल मिटकरी म्हणालेय. ते अकोला येथे बोलत होते. 

शिवाजी महाराजांवर आक्षेपार्ह्य विधान केलेल्या कोरटकर, सोलापूर आणि विकृत इतिहास लिहाणाऱ्या राम गणेश गडकरींवर भिडे का बोलले नाहीत?, असा सवाल देखील आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केलाय. आता संभाजी भिडेंची व्हॅलीडीटी संपल्याचा टोला यावेळी मिटकरींनी लगावलाय.

….हे जगानं मान्य केलं आहे-  अजित पवार

दरम्यान, याच मुद्यांवर भाष्य करताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, त्यांना जे वाटतं ते बोलू शकतात, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यामध्ये सर्व जाती धर्माची लोक होती. छत्रपती शिवाजी महाराज हे एक आदर्श राजा होते आणि रयतेचे राजा होते. राजा कसा असावा हे जगानं मान्य केलं आहे,असे अजित पवारांनी म्हटलं आहे. ते कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते.

संभाजी भिडे नेमकं काय म्हणाले?

छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वधर्मीय नव्हते. शिवरायांनी आणि छत्रपती संभाजी महाराजांनी शहाजी राजे यांचा हिंदवी स्वराज्याचा विचार राबवला. आपल्याकडील प्राध्यापक, शिक्षक मात्र चुकीचा इतिहास मांडत आहेत, असं मत शिवप्रतिष्ठान संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी म्हटलं आहे. छत्रपती शहाजी राजे हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावे, या मताचे होते. मात्र त्यांना यश आले नाही. छत्रपती शिवाजी महाराज  आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी तो विचार पुढे आणला. राजकीय पक्ष, गट, संघटना मात्र स्वार्थासाठी शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करून घेत आहेत, असं संभाजी भिडे यांनी केलं आहे. ते बुधवारी सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. 

हे ही वाचा 

 

अधिक पाहा..



Source link

भीषण अपघात! विटा वाहून नेणाऱ्या ट्रॅकची खाजगी स्कूल वॅनला जोरदार धडक; 10 विद्यार्थी जखमी, तर 3 जण गंभीर

भीषण अपघात! विटा वाहून नेणाऱ्या ट्रॅकची खाजगी स्कूल वॅनला जोरदार धडक; 10 विद्यार्थी जखमी, तर 3 जण गंभीर



Akola Truck Accident : भीषण अपघात! विटा वाहून नेणाऱ्या ट्रॅकची खाजगी स्कूल वॅनला जोरदार धडक; 10 विद्यार्थी जखमी, तर 3 जण गंभीर



Source link

सिरसा में ठगी करने वाला मुंबई से पकड़ा:  कनाडा भेजने के नाम पर 29 लाख ठगे, बिहार का रहने वाला, एक पहले गिरफ्तार – rania News

सिरसा में ठगी करने वाला मुंबई से पकड़ा: कनाडा भेजने के नाम पर 29 लाख ठगे, बिहार का रहने वाला, एक पहले गिरफ्तार – rania News



वर्क परमिट वीजा पर कनाड़ा भेजने के नाम पर ठगी करने वाला आरोपी मुंबई से काबू।

सिरसा पुलिस ने वर्क परमिट वीजा घोटाले में मुंबई से एक शातिर ठग को गिरफ्तार किया है। आरोपी ने कनाडा भेजने का झांसा देकर 29 लाख रुपए की ठगी की। पीड़ित की शिकायत पर थाना सदर सिरसा में मामला दर्ज किया था।

.

पुलिस अधीक्षक विक्रांत भूषण ने बताया कि आरोपी को कोर्ट में पेश कर 2 दिन का पुलिस रिमांड लिया गया है। रिमांड के दौरान ठगी की रकम की बरामदगी और अन्य आरोपियों की गिरफ्तारी की कोशिश की जाएगी।

जानें क्या है पूरा मामला

जानकारी के अनुसार आरोपी की पहचान बिहार के मुज्जफरपुर के सत्यकेतू शंकर के रूप में हुई है। वह वर्तमान में मुंबई के ओसिवाड़ा में रह रहा था। मामला 2019 का है। शिकायतकर्ता पवनदीप सिंह मोहाली में नौकरी करता है। उसकी मुलाकात सिराजुद्दीन अंसारी से हुई, जो खुद को फिल्म निर्माता बताता था।

फाईल जमा करवाने के लिए मुंबई बुलाया

सिराजुदीन ने पवनदीप को कनाडा भेजने का झांसा दिया। उसने कहा कि वर्क परमिट वीजा के लिए 29 लाख रुपए लगेंगे। उसने कनाडा में अपने संपर्कों का हवाला देते हुए जल्द वीजा दिलाने का वादा किया। इसके बाद अगस्त 2019 में फाईल जमा करवाने के लिए मुझे मुंबई बुलाया गया और 60 हजार रुपए अपने खाता में ट्रांसफर करने के लिए कहने लगा।

इस तरह से फंसा पीड़ित

पीड़ित ने 26 अगस्त 2019 को 60 हजार रुपए उनके खाते में ट्रांसफर कर दिए । इस प्रकार पीड़ित व्यक्ति उनके चंगुल में पूरी तरह से फंस गया और शातिर ठगों ने उसे गुमराह करके वर्क परमिट वीजा पर कनाड़ा भेजने के नाम पर 29 लाख रुपए की धोखाधड़ी को अंजाम दे दिया।

पीड़ित की शिकायत पर थाना सदर सिरसा में मामला दर्ज कर जांच शुरू की गई थी। पुलिस अधीक्षक विक्रांत भूषण ने बताया कि जांच के दौरान स्पेशल स्टाफ की एक पुलिस टीम ने आरोपी सत्यकेतू शंकर को मुंबई से गिरफ्तार कर लिया है।

एक आरोपी पहले से गिरफ्तार

मामले में एक आरोपी सिराजुद्दीन अंसारी को पुलिस पहले ही गिरफ्तार कर चुकी है। पुलिस अधीक्षक ने बताया कि अभियोग की जांच जारी है। पुलिस ने आमजन से भी आह्वान किया है कि स्टडी व वर्क वीजा का पत्राचार करते समय सरकार द्वारा मान्यता प्राप्त इमिग्रेशन सेंटर संचालकों से ही संपर्क करें।



Source link

YouTube
Instagram
WhatsApp