मी गेलो की अजितदादा तिजोरीत पैसे आहेत की नाही पाहतील, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला  

मी गेलो की अजितदादा तिजोरीत पैसे आहेत की नाही पाहतील, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला  


Chandrashekhar Bawankule :  मी या सरकारमधून जेवढे पैसे आणू शकत नाही तेवढे पैसे आमदार संजय खोडके (Sanjay Khodke)  आणू शकतात. मी गेलो की अजितदादा (dcm Ajit Pawar)  तिजोरीत पैसे आहे की नाही? पाहतील, पण खोडके गेले की ते लगेच देतील असं वक्तव्य महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Minister Chandrashekhar Bawankule)  यांनी केलं आहे. ते अमरावतीत (Amravati ) आज प्रसारमाध्यमांशी बोलत होते.  संजय खोडके अजितदादांचे उजवे हात आहेत असे बावनकुळे म्हणाले. 

कर्ज फक्त मोठे लोकं बुडवतात

प्रत्येक आमदारांनी 100 बचत गट द्यावे, त्यांना उद्योगासाठी आपण एक लाख रुपये द्यावे. त्या एक हजार कोटी रुपयांचा व्यवसाय करतील असेही चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule)  म्हणाले. लाडक्या बहिणी (ladaki bahin) आयुष्यभर तुमच्या  पाठीशी राहतील असे बावनकुळे म्हणाले. जपर्यंत एकही महिला बचत गटांनी कर्ज बुडवलं नाहीय. कर्ज फक्त मोठे लोकं बुडवतात असेही बावनकुळे म्हणाले. ते अमरावतीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. प्रत्येक विधानसभेला 100 बचत गट द्यावे, अशा सूचना बावनकुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच यावेळी बोलताना बावनकुळे यांनी गावातील सरपंचाने पाण्याच्या व्यवस्थापनावर पाण्याची वॉटर लेवल वाढवण्यावर काम करा, जमिनीच्या पुनर्भरणावर भर द्या असे बावनकुळे म्हणाले. पुढच्या काळात खरा संघर्ष हा पिण्याच्या पाण्याचा असल्याचे बावनकुळे म्हणाले.

अमरावती शहर सुंदर करा! पोलिसांना सोबत घेऊन संपूर्ण अतिक्रमण काढा

मी मनपा आयुक्तांच अभिनंदन करतो. लोकांच्या तक्रारीसाठी व्हाट्सएप चॅट सुरु केला आहे. तातडीने त्याची दखल घेऊन त्याचा निपटारा होईल असे बावनकुळे म्हणाले. आयुक्तांना माझी सूचना आहे की अमरावती शहर सुंदर करा आणि पोलिसांना सोबत घ्या संपूर्ण अतिक्रमण काढा. मी मध्ये येणार नाही आणि आमदारही येणार नाहीत असे बावनकुळे म्हणाले. सिंधी समाज पट्टावाटप साठी 70 वर्षांपासून वाट पाहत होते, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली 50 हजार पट्टे वाटप आम्ही करणार असल्याचे बावनकुळे म्हणाले. फेस अॅप डाउनलोड करुन घ्या. आता तुमचा पगार यातूनच होईल. फेस अॅपवर पगार होणार हे लक्षात घ्या. जुलैचा पगार होईल पण ऑगस्टचा पगार होणार नाही जर फेस अॅपवर आले नाहीतर असे बावनकुळे म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

Land Fragmentation : जमिनींचे तुकडे प्रतिबंध अधिनियमात सुधारणांसाठी समिती स्थापन, GR जारी, 15 दिवसात अहवाल येणार

आणखी वाचा



Source link

पंजाबपासून तेलंगणापर्यंत देशातील 9 राज्यांत ‘अकोला पॅटर्न’; सघन कापूस लागवड पद्धत नेमकी काय?

पंजाबपासून तेलंगणापर्यंत देशातील 9 राज्यांत ‘अकोला पॅटर्न’; सघन कापूस लागवड पद्धत नेमकी काय?


अकोला : कापूस उत्पादनात (Cotton Cultivation) भारताला पुन्हा शाश्वत नेतृत्व मिळवून देणारा एक प्रयोग अकोल्यात आकाराला येतोये. सघन कापूस लागवड पद्धत असं या नव्या प्रयोगाचं नाव आहे. अनेक शेतकरी आता संपूर्ण देशाच्या कापूस धोरणाचा पाया बनणारा ‘अकोला पॅटर्न’ आकाराला आणतायेत. 11 जुलैला कोईम्बतूर येथे पार पडलेल्या भारतीय कापूस परिषदेत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी 2030 पर्यंत 25 लाख हेक्टर क्षेत्रावर ‘अकोला पॅटर्न’ ने (Akola Pattern In Cotton Cultivation) कापूस लागवड राबवण्याची मोठी घोषणा केलीये. आता कपाशीचं भविष्य अकोल्याच्या मातीत लिहिलं जातंय, पाहूयात हाच ‘अकोला पॅटर्न’ नेमका काय आहे. 

जगात सर्वाधिक कापूस पिकवणारा देश म्हणजे भारत. पण उत्पादकतेच्या शर्यतीत मात्र आपण मागे आहोत. या संघर्षातूनच अकोल्यातल्या एका शेतकऱ्यानं एक नवा प्रयोग सुरू केला. ‘सघन कापूस लागवड पद्धत’ जिथं पारंपरिक एका एकरात 6 ते 7 हजार झाडं लावली जातात, तिथं अकोल्यातील दिलीप ठाकरे एकाच एकरात 30 ते 35 हजार झाडं लावून चक्क एकरी 18 क्विंटलपर्यंत कापूस घेताय. कपाशीला भरपूर जागा न देता, योग्य वाण आणि मोजक्या अंतरावर लागवड केली तर उत्पादनात मोठी वाढ होते. मी हे केलं, आणि देशभरात शेतकऱ्यांनी ते स्वीकारलं! असे मत दिलीप ठाकरे यांनी व्यक्त केलंय. 

देशभरात 25 लाख हेक्टरवर नेण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न 

दरम्यान, दिलीप ठाकरे यांच्या या ‘सघन पद्धती’नं शेतकऱ्यांच्या उत्पादनात चमत्कारिक वाढ झाली. आज देशातील 9 राज्यांत, पंजाबपासून तेलंगणापर्यंत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी हेच मॉडेल राबवतायत. याच यशामुळे त्यांची नियुक्ती केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या समितीवर झालीय. कापूस लागवडीच्या या अकोला पॅटर्नला  केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री गिरीराजसिंग  यांनी मोठं बळ दिलंय. यावर्षी अकोला जिल्ह्यात 3 हजार हेक्टर क्षेत्रावर हा प्रयोग होतोय. पुढच्या हंगामात या पद्धतीने 50 हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड होणारेय. तर अकोला पॅटर्नने  कापूस लागवडीचं क्षेत्र देशभरात 25 लाख हेक्टरवर नेण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. 

2030 पर्यंत देशभर 25 लाख हेक्टरवर अकोला पॅटर्ननं कापूस लागवड करणार आहोत. शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्याचा मार्ग इथून सुरू होतो. अशी प्रतिक्रिया केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी दिली आहे. 

सघन कापूस लागवड पद्धत नेमकी काय?

20cm x 20cm अंतराने झाडं
एकरी 29 ते 40 हजार झाडं
योग्य वाण निवड (उभट वाढ, बुटके, कमी अंतरात बोंडं)
एकरी 15-18 क्विंटल उत्पादन

पारंपरिक पद्धत:

6-7 हजार झाडं एकरी
4-5 क्विंटल सरासरी उत्पादन
पावसावर आधारित, अनिश्चितता

या पॅटर्नचा पुढचा टप्पा आता शास्त्रशुद्ध संशोधनाच्या आधारावर राबवला जातोय. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला – जे स्वतः या संशोधनाचा भाग बनून पुढील वर्षभरात 50 हजार हेक्टरवर सघन पद्धतीनं लागवड करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे. शास्त्र, अनुभव आणि आधुनिक शेतीतंत्र या तिन्हीचा संगम ‘अकोला पॅटर्न’ आहे. विद्यापीठ स्तरावर याचं प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि बीजोत्पादन या सर्वांवर भर दिला जातोय. अशी प्रतिक्रिया अकोला पीडीकेव्हीचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी दिली आहे. 

शेतीतूनच समृद्धीची वाट जाते.दिलीप ठाकरेसारख्या प्रयोगशील शेतकऱ्यांच्या अनुभवातून, अकोल्यासारख्या जिल्ह्यांतूनच शाश्वत शेतीचं भविष्य आकार घेतंय. प्रकाश आंबेडकरांच्या राजकारणातील ‘अकोला पॅटर्न’नंतर आता हा शेतीतला नवा ‘अकोला पॅटर्न’ येतोये. शेतीतील हा ‘अकोला पॅटर्न’ आता देशासाठी कापूस उत्पादनासाठी आशेचा एक नवा किरण ठरलाय. उत्पादन, उत्पन्न आणि प्रतिष्ठा या तिन्ही गोष्टी शेतकऱ्याच्या आयुष्यात परत आणण्याची क्रांती सुरू झालीय.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा



Source link

रिपब्लिकन सेनेची शिवसेनेसोबतच्या राजकीय युतीचे आंबेडकर कुटुंबियात पडसाद; वंचितचीही नाराजी

रिपब्लिकन सेनेची शिवसेनेसोबतच्या राजकीय युतीचे आंबेडकर कुटुंबियात पडसाद; वंचितचीही नाराजी


Akola News : रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर (Anandraj Ambedkar) यांनी उपमुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेसोबत केलेल्या राजकीय युतीचे पडसाद आता आंबेडकर कुटुंबियात देखील उमटत असल्याचे पुढे आले आहे. आनंदराज आंबेडकर यांच्या भूमिकेमुळे त्यांचे बंधू आणि वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aaghadi) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) प्रचंड नाराज असल्याचे पुढे आले आहे. युतीची घोषणा करताना झालेल्या पत्रकार परिषदेतील आनंदराज आंबेडकरांच्या ‘संविधान कभी खतरे मे नही था’ आणि लाडकी बहीण योजनेची स्तुती करणाऱ्या वक्तव्यांवरून प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये मोठी नाराजी असल्याची माहिती पुढे आली आहे. 

दरम्यान, 17 जुलैला वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश कार्यकारिणीच्या ऑनलाईन बैठकीत आनंदराज आंबेडकरांच्या (Anandraj Ambedkar) नव्या भूमिकेवर प्रचंड टीका होत असल्याचे ही पुढे आले आहे. वंचितच्या प्रदेश कार्यकारिणीने या परिस्थितीत एकमुखाने प्रकाश आंबेडकरांच्या पाठीशी असल्याचा ठराव संमत केलाय. आनंदराज आंबेडकरांच्या निर्णयामुळे रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांना वंचितमध्ये (Vanchit Bahujan Aaghadi) येण्याची ऑफर देखील आता देण्यात आली आहे. तर दुसरीकडे शिंदेसोबतच्या आघाडीच्या घोषणेनंतर आनंदराज आंबेडकरांना (Anandraj Ambedkar) विधान परिषदेचे आमदारकी आणि मुंबई महापालिकेत पाच ते सात जागा देण्यात येणार असल्याची माहिती ही आता सूत्रांनी दिली आहे. 

प्रकाश आंबेडकरांची एकनाथ शिंदे संदर्भात आक्रमक भूमिका?

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काही ठिकाणी आंबेडकर आणि शिंदेंची शिवसेनेसोबत एकत्र येण्याबाबतच्या सर्व चर्चा आता थांबवण्यात आल्यात. मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगर या महापालिकांसह विदर्भातील अकोला, वाशिम आणि बुलढाणा जिल्हा परिषदेत दोन्ही पक्षांची एकत्र निवडणुका लढवण्यासाठी चाचपणी  सुरू होती. यासंदर्भात वंचितचे नेते माजी आमदार नातिकोद्दीन खतीब आणि शिवसेनेचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्यात प्रत्यक्ष भेटून चर्चा ही झाली होती. मात्र एकनाथ शिंदेंनी आनंदराज आंबेडकरांसोबत केलेल्या आघाडीच्या घोषणेमुळे प्रकाश आंबेडकर प्रचंड नाराज झाले आहेत. परिणामी, पुढील काळात प्रकाश आंबेडकरांची एकनाथ शिंदे संदर्भात आक्रमक भूमिका राहणार असल्याची माहिती  सूत्रांनी दिली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा



Source link

अकोल्यात दोन गटात गॅंगवॉर; ज्या ठिकाणी राडा त्याच ठिकाणी पोलिसांनी काढली आरोपींची धिंड 

अकोल्यात दोन गटात गॅंगवॉर; ज्या ठिकाणी राडा त्याच ठिकाणी पोलिसांनी काढली आरोपींची धिंड 


Akola Crime News : अकोला पोलिसांनी सराईत गुन्हेगारांची धिंड काढलीये. अर्थातच खाकीने गुन्हेगाराची मस्ती उतरवलीये. काल(18 जुलै) अकोल्यातल्या कृषी नगरात दोन गटात वाद होत गॅंगवॉर (Crime News) झाला होता. वर्चस्वाच्या लढाईतून हा गॅंगवॉर झाला होता. यात तलवारीसह बंदुकीचा या वादात वापर झाला होता. या वादादरम्यान दोन गट आमने-सामने भिडले. या संपूर्ण गॅंगवॉरमध्ये जवळपास 8 जण जखमी झाले होते. घटना स्थळावर गोळीबार देखील झाला होता. घटनास्थळावरून 2 जिवंत काडतूस आणि एक हवेत गोळी फायर केली होती. दरम्यान, काही जखमी आरोपींवर अकोल्याच्या (Akola Crime News) शासकीय रुग्णालयात उपचार सुरू. 

वर्चस्वाची लढाईतून वाद, सात आरोपींसह पिस्टल आणि तलवारी जप्त 

पुढे आलेल्या माहितीनुसार, आकाश गवई आणि संतोष वानखडे या दोन गटात वर्चस्वाच्या लढाईतून हा वाद झाला होता. अशातच यातील दोन्ही गटातील प्रमुखांना आणि त्यांच्या साथीदारांची आता कृषी नगर परिसरात धिंड काढण्यात आली.  सद्यस्थित या प्रकरणात सात आरोपींसह देशी बनावट पिस्टल आणि तलवारी जप्त करण्यात आले आहे. दरम्यान, यावेळी आरोपींनी कान पकडून माफी मागितली. तसेच यापुढे आपण गुन्हेगारी मार्गावर जाणार नसल्याचे आरोपींनी कान पकडून पोलिसांना सांगितले.

ज्या ठिकाणी राडा त्याच ठिकाणी पोलिसांनी काढली आरोपींची धिंड 

दरम्यान, अकोल्यात झालेल्या दोन गटातील गॅंगवॉरचा हा वाद इतका भयंकर होता की परिसरातील नागरिक आणि कृषी नगर परिसरात भीतीच वातावरण पसरल होत. तर अटक करण्यात आलेल्या सतीश वानखडेसह आकाश गवई आणि काही प्रमुख गुन्हेगारांची धिंड काढण्यात आली असून त्यांना चांगलाच धडा पोलिसांनी शिकवला आहे.

….अन् अलगद पोलिसांच्या जाळ्यात सापडला

जन्मठेपेतील फरार आरोपी पत्नीला भेटण्यासाठी घरी आला असता बीड पोलिसांनी बड्या शिताफीनं त्याला अटक केली आहे. बहिणीच्या खून प्रकरणात जन्मठेप झालेला आरोपी पाच वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देऊन फरार होता. मात्र, पत्नीला भेटण्यासाठी बीडमध्ये आल्याची माहिती पोलिसांना मिळताच आरोपीच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांना यश आलं आहे.

विठ्ठल उर्फ सोनू कळवणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. बहिणीच्या खून प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. मात्र जन्मठेप झाल्यानंतर पोलिसांच्या तावडीतून तो पसार झाला. आरोपीच्या बहिणीचे एका तरुणासोबत प्रेम संबंध होते दोघांना लग्न करायचे होते. मात्र, विठ्ठलचा याला विरोध होता. यातून त्याच्या बहिणीने आणि तिच्या प्रियकराने 2014 मध्ये विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. यादरम्यान खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना विठ्ठलने रुग्णालयात जाऊन बहीण आणि तिच्या प्रियकरावर प्राण घातक हल्ला केला. यात बहिणीचा मृत्यू तर प्रियकर गंभीर जखमी होता.या प्रकरणात सत्र न्यायालयाने विठ्ठल कळवणे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर तो पोलिसांच्या तावडीतून पसार झाला. तो घरी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्याला अटक करण्यात आली. 

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा



Source link

अकोल्यात दोन गटात तुफान राडा, गोळीबारासह तलवारी आणि पाईपचा वापर, 8 जण जखमी 

अकोल्यात दोन गटात तुफान राडा, गोळीबारासह तलवारी आणि पाईपचा वापर, 8 जण जखमी 


अकोला :  अकोल्यातील कृषीनगर भागात दोन गटात राडा झाल्याची घटना घडली आहे.‌ दोन गटात झालेल्या या राड्यामध्ये गोळीबारासह तलवारी आणि पाईपचा वापर झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता सतीश वानखडे हा गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या संपूर्ण वादात दोन्ही गटातील जवळपास 8 जण जखमी झाले आहेत. घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

वर्चस्वाच्या लढाईतून दोन गटात तुफान राडा 

अकोल्यातील कृषी नगरात दोन गटात वाद झाला आहे. वर्चस्वाच्या लढाईतून दोन गटात तुफान राडा झालाय. तलवारीसह बंदुकीचा या वादा दरम्यान वापर झालाय. या वादादरम्यान दोन गट आमने-सामने भिडलेत. या संपूर्ण वादात दोन्ही गटांतील जवळपास 8 जण जखमी झाले आहेत. दरम्यान, घटना स्थळावर गोळीबार झाला आहे तर घटनास्थळावर 2 जिवंत काडतूसे देखील पोलिसांनी जप्त केली आहेत. तर एक गोळी हवेत फायर झाली आहे. 

घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात 

जखमींवर अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. आज रात्री सात वाजता सुमारास आकाश गवई आणि संतोष वानखडे या दोन गटात वर्चस्वाच्या लढाईतून हा वाद झाला होता. हा वाद इतका भयंकर होता की परिसरातील नागरिक आणि कृषी नगर परिसरात भीतीचं वातावरण पसरल आहे. दोन्ही गट वंचितच्या कार्यकर्त्यांचे आहेत. घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथकासह, श्वान पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. दरम्यान, या वादानंतर काहीजण घटनास्थळावरुन पसार झाले आहेत. पोलीस सर्वांचे ओळख पटवण्याचे काम करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वर्चस्वाच्या लढाईतून आकाश गवई आणि संतोष वानखडे या दोन गटात तुफान राडा झाल्याचती माहिती मिळाली आहे. या राड्यात तलवारीसह बंदुकीचा देखील वापर करण्यात आला आहे. त्यामुळं अनेकजण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार 8 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये सतीश वानखडे हा गंभीर जखमी झाला आहे. घटना स्थळावर गोळीबार झाला आहे तर घटनास्थळावर 2 जिवंत काडतूसे देखील पोलिसांनी जप्त केली आहेत. दरम्यान, या घटनेनंतर पोलिस प्रशासन लगेच घटनास्थळी दाखल झाले होते.

महत्वाच्या बातम्या:

Chhatrapati Sambhajinagar: समृद्धी’च्या टोलनाक्यावर झटापट अन् गोळीबार; कर्मचाऱ्याच्या पोटात घुसली गोळी, कर्मचारी घटनेनंतर झाला फरार

आणखी वाचा



Source link

अकोल्यातील ड्रग्ज प्रकरणातला फरार आरोपी गब्बर जमादारचे कारनामे समोर; पोलिसांशी कनेक्शन, आमदारां

अकोल्यातील ड्रग्ज प्रकरणातला फरार आरोपी गब्बर जमादारचे कारनामे समोर; पोलिसांशी कनेक्शन, आमदारां


अकोला: अकोल्यातील ड्रग्ज प्रकरणातला फरार आरोपी गब्बर जमादार याचे अनेक वादग्रस्त कारनामे ‘एबीपी माझा’च्या हाती लागले आहेत. एमडी ड्रग्स विक्री प्रकरणात अकोल्यातल्या खदान पोलिसांनी काल (बुधवारी,ता-16) दोघांना अटक केली. मोहम्मद यासीन मोहम्मद आसिफ आणि मुस्ताक खान हादीक खान असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहे. त्यांच्याकडून 2 लाख 30 हजार रुपयांचं एमडी ड्रग्स जप्त करण्यात आलं. ताब्यात घेण्यात आलेल्या एमडी ड्रग्सचं वजन 46 ग्रॅम 30 मिली ग्रॅम इतकं आहे. तिसरा आरोपी गब्बर जमादार हा अद्याप फरार आहे. दरम्यान, अकोल्यातल्या गौरक्षण रस्त्यावरील मातृभूमी प्रेस परिसरात ही कारवाई करण्यात आली होती. (Akola Crime news)

आरोपी गब्बर जमादार हा वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता

अटकेतील मोहम्मद यासीन हा आरोपी ‘बीएएमएस’च्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी आहे. तर फरार आरोपी गब्बर जमादार हा वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता आणि पोलीस मित्र असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र वंचित बहुजन आघाडीने गब्बर जमादारचा पक्षाचा कोणताही संबंध नसल्याचा स्पष्ट केलं आहे. गब्बरचे आमदार अब्दुल सत्तार यांच्यासोबतही फोटो असल्याचं समोर आलं आहे. (Akola Crime news)

गब्बर जमादारचे व्हिडिओ ‘माझा’च्या हाती

पोलीस मित्र म्हणून वावरणाऱ्या गब्बर जमादारचे अनेक कारनामे ‘एबीपी माझा’च्या हाती (Akola Crime news) लागलेले आहेत. एका मिरवणुकीत जमादार हा उरळ पोलीस स्टेशनचे तत्कालीन ठाणेदार गोपाल ढोले आणि कायंदे नावाच्या आणखी एका अधिकाऱ्याला नोटांची ओवाळणी घालतानांचा व्हिडिओ ‘माझा’च्या हाती आले आहेत. यासोबतच पोलिसांच्या पथसंचालनात तो पोलीस अधिकाऱ्यांसोबत चालतांनाचाही व्हिडिओ समोर आला आहे. वाढदिवसाचा केक कापतांना गब्बरच्या कार्यकर्त्याच्या हाती तलवार असलेले फोटो समोर आलेले आहेत. गब्बरचे पंचगव्हाण परिसरात अनेक अवैध धंदे असल्याची सूत्रांंची माहिती आहे. पोलिसांचा अतिशय जवळचा मित्र असलेल्या गब्बरच्या धंद्यांकडे पोलिसांचं दुर्लक्ष कसं?, दुर्लक्ष झालं असेल तर त्याचा ‘अर्थ’ काय? याची चौकशी होण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर यामुळे पोलिसांच्या देखील कार्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. पंचगव्हाणमधील गब्बरच्या मालकीच्या ‘ऑरो वॉटर प्लांट’वर पोलिसांची नियमित उठबस असल्याचं समोर आलं आहे. फरार गब्बरला अटक झाली तर ड्रग्ज पेडलरचं मोठं ‘अकोला कनेक्शन’ समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गब्बर हाच अकोला आणि परिसरातील प्रमुख ड्रग्ज पुरवठादारांपैकी एक असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

आणखी वाचा



Source link