शिंदे सरकारमधील शिवसेना मंत्र्‍यांच्या OSD ने मला 5 लाख मागितले, अमोल मिटकरींचा दावा

शिंदे सरकारमधील शिवसेना मंत्र्‍यांच्या OSD ने मला 5 लाख मागितले, अमोल मिटकरींचा दावा


अकोला : राज्याच्या मंत्रिमंडळातील दलाली बंद करणार, त्यासाठी विशेष यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं होतं. त्यानुसार, राज्यातील मंत्र्‍यांच्या ओएसडींची नावे निश्चित करण्यावरुन सध्या मंत्रालय व राजकीय वर्तुळात घमासान सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी स्वीय सहायकांच्या नेमणुकीसंदर्भाने वक्तव्य करताना मुख्यमंत्री कोणाचंच चालू देत नाहीत, असे म्हटले होते. त्यानंतर,  कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंना कदाचित हे माहीत नाही की मंत्र्यांचे पीए, ओएसडी नेमण्याचे अधिकार हे मुख्यमंत्र्यांनाच असतात. मंत्र्यांनी नावाचा प्रस्ताव पाठवायचा असतो. कुणाला राग आला तरी चालेल, पण ज्यांच्यावर आरोप आहेत, अशा ‘फिक्सर लोकांच्या नावाला मंजुरी देणार नाही, अशा कडक शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकाटेंना खडसावले आहे. सध्या मंत्र्‍यांच्या ओएसडींचा विषय शीर्षस्थानी असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol mitkari) यांनी देखील मंत्र्‍यांच्या ओएसडींकडून पैशांची मागणी होत असून मलाही त्याचा अनुभव आल्याचे म्हटले. यावेळी, शिवसेना मंत्र्‍यांच्या ओएसडींकडून मला 5 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती, असेही मिटकरींनी म्हटले आहे. 

मंत्र्यांचे ओएसडी आणि स्वीय सहाय्यकांच्या संदर्भात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी गौप्यस्फोट केला आहे. आपल्यालाही एका मंत्र्यांच्या ओएसडींकडून 5 कोटींच्या एका कामासाठी 5 लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप अमोल मिटकरी यांनी केला आहे. तत्कालिन रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भूमरेंच्या ओएसडीसंदर्भात आपणास हा अनुभव आल्याचे आमदार मिटकरी यांनी सांगितले. मंत्र्यांच्या ओएसडी आणि स्वीय सहाय्यकांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या रोखठोक भूमिकेचं मिटकरी यांच्याकडून स्वागत करण्यात आलं आहे. यासंदर्भात, ‘एबीपी माझा’शी बोलतांना अमोल मिटकरी यांनी मोठा दावा केला. आधीच्या शिंदे सरकारमधील रोजगार हमी विभागाच्या एका ओएसडी संदर्भात हा अनुभव आल्याचे त्यांनी म्हटले. 

स्वीय सहायकांवर सीएमओंची नजर

मंत्र्याकडे सध्या जे पीए, पीएस, ओएसडी नेमले गेले आहेत ते पुढील पाच वर्षे राहतीलच असे नाही, त्यांच्याविषयी तक्रारी आल्या आणि त्यात तथ्य आढळले तर त्यांना मध्येच घरी बसावे लागणार आहे. या शिवाय ‘उसनवारी’ (लोन) तत्त्वावर आपापल्या मंत्री कार्यालयात अनेकांची भरती केलेल्या मंत्र्यांना चाप बसविला जाण्याची शक्यता आहे. मंत्री कार्यालयांमधील पीए, पीएस, ओएसडी नियुक्तीचे अधिकार हे मुख्यमंत्र्यांना आहेत. हे अधिकारी कसे वागतात, चुकीचे निर्णय घेतात कार पारदर्शक कारभारासाठी भूमिका बजावतात की नाही, यावर मुख्यमंत्री कार्यालयाची बारीक नजर असेल सातत्याने त्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला जाणार आहे. जे गडबड करतील त्यांना काढले जाईल, अशी भूमिका मुख्यमंत्री फडणवीस यांची आहे. त्यामुळे, पारदर्शक कारभारासाठी मुख्यमंत्र्‍यांच्या भूमिकेचं स्वागत होत आहे. 

हेही वाचा

लेक अधिकारी बनली, शेतकरी बापाने गावी येताच वाजत गाजत मिरवणूक काढली; गुलालची उधळण अन् फुलांचा वर्षाव

अधिक पाहा..



Source link

भयावह! अकोल्यातील मालवाहू वाहनासह ट्रॅक्टरमधील शेतमजुरांचा जीवघेणा प्रवास, VIDEO आला समोर

भयावह! अकोल्यातील मालवाहू वाहनासह ट्रॅक्टरमधील शेतमजुरांचा जीवघेणा प्रवास, VIDEO आला समोर


Akola News: अकोल्यात एका मालवाहू वाहनासह ट्रॅक्टरमधील शेतमजुरांचा जीवघेणा प्रवास करतानाचा व्हिडिओ (VIDEO) समोर आलाय. यात ठिकठिकाणी रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या चिंतेचा विषय बनला असतानाच आता अकोल्यात प्रमुख रस्त्यावर शेतमजुरांचा हा जीवघेणा प्रवास सुरुये. असुरक्षित वाहनांतून शेकडो शेतमजूरांचा दररोज हा जीवघेणा प्रवास सुरूये. अकोल्यातल्या अकोट तालुक्यातल्या पणज आणि रुईखेड मार्गावर दररोज शेतमजुर असा हा धोकादायक प्रवास करताना सर्रास दिसून येतोय. ही घटना म्हणजे अपघाताला आमंत्रण देणारी ठरत असून व्हिडिओ समोर आल्याने यावर वेळीच योग्य ती दखल घेण्यात यावी अशी भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

क्षमतेपेक्षा अधिक शेतमजूर कोंबून जीवघेणा प्रवास

विशेष म्हणजे ट्रॅक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात शेतातील साहित्य भरलेलं असतानाच त्यावर क्षमतेपेक्षा अधिक शेतमजूर कोंबून नेत असल्याचे video मधून स्पष्टपणे दिसत आहे. तर मालवाहून वाहनात देखील बसायला जागाही नसल्याचे चित्र बघावयास मिळतेय. मात्र, तरीही शेतमजूर वाहनात कोंबून नेल्या जात आहे. तर काही तरुण वाहनाच्या लोखंडी अँगलवर बसून प्रवास करतायेत. आपण पाहू शकता आज ही वाहने अपघातांना आमंत्रण देणारी ठरते आहेत. परंतु या वाहतुकीकडे स्थानिक वाहतूक पोलीसांचं अक्षरश: दुर्लक्ष होत आहे.

रोडगे पार्टी जिवावर बेतली, धमाशांच्या अचानक हल्ला

अकोल्यात रोडगे पार्टी जिवावर बेतलीय. रोडगेच्या जेवणाच्या कार्यक्रमादरम्यान मधमाशांच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झालाय. तर अनेक जण यात जखमी झालेय. अकोल्यातल्या बार्शीटाकळी तालुक्यातील काजळेश्वर येथे शेतात रोडगे जेवणासाठी मोठ्या उत्साहात स्वयंपाक सुरू असताना अचानक मधमाश्यांनी हल्ला चढविला. मधमाशांच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झालाय. रेश्मा आतिश पवार यांचा यात मृत्यू झाला आहे. 

मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा जागीच दुर्देवी मृत्यू 

दरम्यान, प्रकाश पांडुरंग पवार यांच्या शेतात आयोजित रोडगे जेवणाच्या कार्यक्रमात अचानक मधमाश्यांनी हल्ल्या चढवला. तर मीरा राठोड आणि दोन लहान मुलांसह काही अन्य लोक जखमी झाले आहेत. काल (24 फेब्रुवारी) दुपारपासून रोडगे पार्टीसाठी तयारी सुरू होती. रोडगेसाठी गोवऱ्या पेटवून रोडगे बनवण्याचे काम सुरू झाले. मात्र, याच गोवऱ्याच्या धुरामुळे जवळील मधमाश्यांचे पोळे फूटले आणि मधमाशांनी नागरिकांवर अचानक हल्ला चढवला होता. परंतु मधमाशांच्या हल्ल्यात रेश्मा पवार यांचा जागीच दुर्देवी झालाय. तर जखमींवर अकोल्यातल्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

अकोल्यात रोडगे पार्टी जिवावर बेतली, मधमाशांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी

अकोल्यात रोडगे पार्टी जिवावर बेतली, मधमाशांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी


अकोला : अकोल्यात रोडगे पार्टी जिवावर बेतली असून रोडगेच्या जेवणाच्या कार्यक्रमादरम्यान मधमाशांच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात अनेकजण जखमी झाले आहेत. रेश्मा आतिश पवार असं मृत महिलेचं नाव आहे. 

अकोल्यातल्या बार्शीटाकळी तालुक्यातील काजळेश्वर येथे शेतात रोडगे जेवणासाठी मोठ्या उत्साहात स्वयंपाक सुरू असताना अचानक मधमाशांनी हल्ला चढविला. मधमाशांच्या हल्ल्यात आतिश पवार या महिलेचा मृत्यू झाला. प्रकाश पांडुरंग पवार यांच्या शेतात रोडगे जेवणाचं आयोजन करण्यात आलं होतं.  

सोमवार दुपारपासून रोडगे पार्टीसाठी तयारी सुरू होती. रोडगेसाठी गोवऱ्या पेटवून रोडगे बनवण्याचे काम सुरू झाले. मात्र, याच गोवऱ्याच्या धुरामुळे जवळील मधमाश्यांचे पोळे फूटले आणि मधमाशांनी नागरिकांवर अचानक हल्ला चढवला. मधमाशांच्या या हल्ल्यात रेश्मा पवार यांचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला. जखमींमध्ये दोन मुलांचाही समावेश आहे. त्यांच्यावर अकोल्यातल्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..



Source link

उष्णतेच तडाखा, मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील पाणवठ्यावर आलं वाघाचे अख्खे कुटुंब; अन् पुढे….

उष्णतेच तडाखा, मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील पाणवठ्यावर आलं वाघाचे अख्खे कुटुंब; अन् पुढे….


प्रकाश आंबेडकरांसोबत काम करताना ते आतापर्यंत काय काय केलं, हे बाहेर काढेन, सुषमा अंधारेंचा नीलम गोऱ्हेंना बेधडक इशारा, 10 मोठी विधानं



Source link

छावा चित्रपटात शिर्के बंधू अन् सोयराबाई यांना व्हिलन दाखवण्याचा प्रयत्न; अमोल मिटकरींचा आरोप

छावा चित्रपटात शिर्के बंधू अन् सोयराबाई यांना व्हिलन दाखवण्याचा प्रयत्न; अमोल मिटकरींचा आरोप


Amol Mitkari on Chhaava Movie : ‘छावा’ चित्रपटातून (Chhaava Movie) छत्रपती संभाजी महाराजांची (Chhatrapati Sambhaji Maharaj) शौर्यगाथा आणि पराक्रम रुपेरी पडद्यावर दाखवण्यात आली आहे. सध्या हा चित्रपट केवळ महाराष्ट्रातच नाही, तर संपूर्ण जगभरात धुमाकूळ घालत आहे. अशातच ‘छावा’ चित्रपटात दिग्दर्शकाने शिर्के बंधू आणि सोयराबाई यांना व्हिलन म्हणून दाखवण्यात आल्याचा प्रयत्न हा चुकीचा असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार आणि शिवव्याख्याते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी दिलीय. इतिहासात संभाजी महाराजांना शिर्के बंधूंनी पकडून दिल्याचं कुठेही स्पष्ट होत नसल्याचं ते म्हणालेय. ते अकोला येथे ‘एबीपी माझा’शी बोलत होते.

खरे आणि प्रमाणित चरित्र समोर आणण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा

दरम्यान, महाराष्ट्र सरकारने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे खरे आणि प्रमाणित चरित्र समोर आणण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी आमदार मिटकरी यांनी केलीये. यासंदर्भात इंद्रजीत सावंत, जयसिंगराव पवार आणि शिवचरित्रकार विजयराव देशमुख यांचा समितीत समावेश करावा, अशी ही मागणी आमदार मिटकरींनी केलीये. ‘छावा’ चित्रपटाच्या माध्यमातून संभाजी महाराजांचं व्यक्तिमत्व जगात जरी गेलं असलं, तरी त्यात काही बाबी अतिरंजित दाखविण्यात आल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केलाय.

उलट नीलम गोऱ्हे यांनी आमच्यासारख्या नवोदित आमदारांना..

दरम्यान, लक्षवेधी मांडण्यासाठी विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे या पैसे घेत असल्याचा आरोप आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होताय. संजय राऊतांच्या या आरोपांवर बोलताना राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार समाचार घेतलाय. नीलम गोऱ्हे यांच्या संदर्भात राऊतांनी लावलेले आरोप खोटे असल्याचं ते म्हणालेय. उलट नीलम गोऱ्हे यांनी प्रत्येक वेळी आमच्यासारख्या नवोदित आमदारांना जनतेचे प्रश्न प्राधान्य क्रमाने उचलण्यासाठी मार्गदर्शन केल्याचं‌ ते म्हणालेय.  

दुकानात पुड्या बांधणाऱ्याला अजित पवारांनी आमदार केलंय –  अमोल मिटकरी

नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या मर्सिडीजच्या आरोपांवर बोलताना त्यांनी आपल्या पक्षाचं उदाहरण दिलंय. ठाकरेंच्या पक्षात काय चालतंय हे आपल्याला माहित नाहीय.‌ मात्र माझ्यासारख्या एका सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मुलाला अजित पवारांनी एक रुपयाही न घेता आमदार केल्याची कृतज्ञता त्यांनी व्यक्त केलीय.‌ आपले वडील लोकांकडे सालगडी म्हणून काम करत होते. तर आपण वडिलोपार्जित किराणा दुकानात पुड्या बांधण्याचे काम करीत होतो. अशा व्यक्तीला अजित पवारांनी आमदार केल्याचं‌ ते म्हणालेय.दरम्यान, साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या राजकीय वक्तव्यावर टीका होतीये. त्यावर बोलताना आमदार मिटकरी यांनी तो अधिकार गोऱ्हे यांना घटनेने दिल्याचं ते म्हणालेत.

हे ही वाचा 

अधिक पाहा..



Source link

नथुराम गोडसे हा नीच आणि नालायक ब्राह्मण होता; श्रीपाल सबनीसांचं स्फोटक वक्तव्य

नथुराम गोडसे हा नीच आणि नालायक ब्राह्मण होता; श्रीपाल सबनीसांचं स्फोटक वक्तव्य


अकोला: अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या ब्राम्हण समाजावरील वक्तव्यावरून राज्यात वाद पेटण्याची चिन्ह आहेत. नथुराम गोडसे (Nathuram Godse) हा नीच आणि नालायक ब्राह्मण होता. त्यानेच महात्मा गांधीजींना (Mahatma Gandhi) ठार केले. यासोबतच देशातील चातुर्वण्य व्यवस्थेच्या मुळाशी ब्राह्मण (Brahmin) आहेत.  ही सर्व वर्ण व्यवस्था दिसत असताना त्याला कट्टर विरोध डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केला. माझ्या पूर्वजांनी केलेल्या चुकांबद्दल आपण माफी मागत असल्याचं डॉ. सबनीस (Shreepal Sabnis) यांनी म्हटले. ते अकोला जिल्ह्यातील अकोट येथील श्री. शिवाजी महाविद्यालयात आयोजित डॉ. विलास तायडे लिखीत ‘वाड्:मय विलास गौरवग्रंथ’ आणि ‘बैलबंडी ते हवाई दिंडी’ या दोन पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यात बोलत होते. त्यांच्या या वक्तव्याची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

नथुराम गोडसे हा नीच ब्राह्मण आणि नालायक ब्राह्मण होता. महात्मा गांधींना त्याने ठार मारलं. आताचे हिंदुत्ववादी (Hindutva) त्या नथुरामचे पुतळे उभारत आहेत. हे धर्मकारण नव्हे, तर हे धर्माची मग्रुरी आहे. अशा धर्मापासून देशाचं संरक्षण करण्याची गरज आहे, असे मत श्रीपाल सबनीस यांनी मांडले.

दरम्यान, डॉ. श्रीपाल सबनीस यांनी देशातील मतदार, मंत्री, आमदार आणि सरपंच विकाऊ असल्याचा आरोप केला. पाच कोटीला एक आमदार (MLA) विकला जात आहे. या देशातील जनता दोन हजाराच्या नोटेला आपलं मत विकत आहे. ज्या देशातील जनता लोकशाही विकायला काढते त्या देशाचे भवितव्य काय?, असा सवाल श्रीपाल सबनीस यांना उपस्थित केला.

विद्रोही साहित्य संमेलनात धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत ठराव

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात विद्रोही साहित्य संमेलनात ठराव मंजूर करण्यात आला.  मराठवाड्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पोहोचलेले गुन्हेगार यांना त्वरित शिक्षा करण्यात यावी .चौकशी नि:पक्षपाती होण्यासाठी नैतिकतेचा भाग म्हणून संबंधित मंत्र्यांनी मंत्रिपदापासून दूर राहावे असा ठराव नाव न घेता संमत करण्यात आला.

आणखी वाचा

ब्राह्मण समाजाला आरक्षणाची गरज नाही, जिथे जाऊ तिथे आपलं स्थान निर्माण करू : माधव भंडारी

मोठी बातमी ! ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळास कॅबिनेटची मंजुरी

Neelam Gorhe On Uddhav Thackeray: ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं; नीलम गोऱ्हेंच्या विधानाने खळबळ, दानवे म्हणाले, ही नमकहरामी…

अधिक पाहा..



Source link

YouTube
Instagram
WhatsApp