..तर कोणाचाही पाठिंबा घेऊन आमदार होता आलं असतं, पण लाचारी आमच्यात नाही; बच्चू कडू स्पष्टच बोलले

..तर कोणाचाही पाठिंबा घेऊन आमदार होता आलं असतं, पण लाचारी आमच्यात नाही; बच्चू कडू स्पष्टच बोलले


Amravati : बच्चू कडूंनी (Bacchu Kadu) लाचारी स्वीकारली असती तर कोणत्याही पक्षाचा पाठिंबा घेऊन आमदार होता आलं असत, पण मी शेतकऱ्यांसाठी बोलत राहणार. अजून पडलो तरी त्याची परवा नाही. असं वक्तव्य माजी आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी केलंय. मी हे शेतकरी म्हणून बोलत आहे. त्याचा कोणाला राग आला तरी चालेल. पण बच्चू कडू याची पर्वा करत नाही. तशीच ही लाचारी नाही. मी कधीही लाचारी स्विकारली नाही, तसं केलं असतं तर कोणाचा पाठिंबा घेऊन मला आमदार होता आलं. असतं पण ती लाचारी आमच्यात नाही. असे वक्तव्यही बच्चू कडू यांनी केलंय. ते अमरावती जिल्ह्यातील पळसखेड येथे शिवजयंती निमित्तच्या कार्यक्रमात बोलत होते.

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून काँग्रेस- भाजपवरही ‘प्रहार’

छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशातली वतनदारी बंद केली आणि शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावाल तर कापले जाल असं म्हणणारा राजा आता कोणत्याच पक्षात दिसत नाही. 50% नफा धरून आम्ही शेतमालाला भाव  देऊ असं भाजपने म्हटलं होतं आणि काँग्रेसने स्वामीनाथन आयोग लागू करू असं म्हटलं होतं. मात्र काँग्रेसने सुद्धा ते लागू केलं नाही. पार्टी कोणतीही असली तरी ते शेतकऱ्यांच्या हितासाठी राहत नाही, हे 75 वर्षात आपण पाहिलं. मी हे शेतकरी म्हणून बोलत आहे. त्याचा राग आला तरी चालेल, बच्चू कडू याची पर्वा करत नसल्याचे ही बच्चू कडू म्हणाले. 

विषबाधेमुळे 15 शेळ्यांचा मृत्यू, रिसोड तालुक्यातील घटना

वाशिमच्या रिसोड तालुक्यातील मोठेगाव शेतशिवारात विषबाधेमुळे 15 शेळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दुपारी काही शेळ्या शेतात चरण्यासाठी गेल्या असता, हळदीच्या पिकासाठी वापरण्यात येणाऱ्या फवारणीसाठी  वापरण्यात येणारे औषध टाकीतील विषारी पाणी प्यायल्याने त्यांना विषबाधा झाली. रासायनिक कीटकनाशकेच हे पाणी पिल्यामुळे 15 शेळ्या मृत्युमुखी पडल्या. या घटनेत काही शेळ्यांना देखील विषबाधा झाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे शेळीपालकांच मोठं आर्थिक नुकसान झालंय.

हे ही वाचा 

 

 

अधिक पाहा..



Source link

भाजपा नगर अध्यक्ष के करीबी पर एक्ट्रेस ने कराई FIR:  सोशल मीडिया पर अश्लील फोटो अपलोड करने का आरोप, मुंबई के वर्सोवा थाने में केस दर्ज – Saharanpur News

भाजपा नगर अध्यक्ष के करीबी पर एक्ट्रेस ने कराई FIR: सोशल मीडिया पर अश्लील फोटो अपलोड करने का आरोप, मुंबई के वर्सोवा थाने में केस दर्ज – Saharanpur News



भाजपा महानगर अध्यक्ष के करीबी जगदीप की फाइल फोटो।

सहारनपुर के भाजपा नगर अध्यक्ष पर यौन शोषण का आरोप लगाने वाली मुंबई की एक्ट्रेस एक बार फिर चर्चाओं में है। एक्ट्रेस ने मुंबई के वर्सोवा थाने में नगर अध्यक्ष के करीबी पर मुकदमा दर्ज कराया है।

.

आरोप है कि आर्टिफिशियल इंटेलिजेंस से फोटो को एडिट कर उनकी न्यूड फोटो बनाकर सोशल मीडिया पर अपलोड की है। जिसके बाद फिर से भाजपा खेमे की धड़कने बढ़ गई है।

मुंबई की रहने वाली अभिनेत्री ने 15 अक्टूबर 2024 को भाजपा नगर अध्यक्ष पुनीत त्यागी पर शारीरिक शोषण करने का आरोप लगाया था। एक्ट्रेस ने सोशल मीडिया पर एक सप्ताह तक एक के बाद एक वीडियो अपलोड किया।

लेकिन पुनीत त्यागी को लेकर एक्ट्रेस सॉफ्ट भी दिखाई दी। क्योंकि यौन शोषण को लेकर कोई भी शिकायत दर्ज नहीं की। लेकिन पुनीत त्यागी ने अपने पद से इस्तीफा दिया। जो आज तक स्वीकार नहीं हुआ है।

लेकिन भाजपा नगर अध्यक्ष पुनीत त्यागी के करीबी जगदीप पर एक्ट्रेस ने एआई के माध्यम से फोटो एडिट कर न्यूड फोटो सोशल मीडिया पर डालने का आरोप लगाया है। वहीं मुंबई के वर्सोवा थाने में मुकदमा भी दर्ज कराया है। आरोप है कि सोशल मीडिया पर टिप्पणी भी की।

दरअसल, पिछले चार माह से सब शांत हो गया था। लेकिन 23 फरवरी यानी आज डिप्टी सीएम केशव प्रसाद का सहारनपुर का दौरा है।

प्रोटोकॉल में महानगर अध्यक्ष के रूप में पुनीत त्यागी का नाम है। जिसको लेकर एक्ट्रेस भड़की हुई है। एक्ट्रेस ने इस मामले में भाजपा के एक विधायक को भी घेरने का काम किया है और गंभीर आरोप लगाए है।

वहीं भाजपा के क्षेत्रीय अध्यक्ष सतेंद्र सिसौदिया का कहना है कि पुनीत त्यागी अब महानगर अध्यक्ष नहीं है। ये पद खाली है। गलती से प्रोटोकॉल में पुनीत का नाम चढ़ गया होगा। इसकी जांच कराएंगे।



Source link

नवनीत राणा हाज़िर हो! ओवैसी बंधूंवरील 15 सेकंदाच्या वक्तव्यावर हैदराबाद न्यायालयाची नोटीस

नवनीत राणा हाज़िर हो! ओवैसी बंधूंवरील 15 सेकंदाच्या वक्तव्यावर हैदराबाद न्यायालयाची नोटीस


मुंबई : अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांना हैदराबाद न्यायालयाने समन्स पाठवले आहे. खासदार अससुद्दीन ओवैसी आणि त्यांच्या बंधूंच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात त्यांना न्यायालयाने समन्स पाठवलं आहे. या प्रकरणी 28 फेब्रुवारी रोजी हैदराबाद न्यायालयात राणांनी उपस्थित राहावे असे आदेश आहेत. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी, 8 मे 2024 रोजी हैदराबादमध्ये प्रचारसभेत बोलताना, 15 सेकंद पोलिसांना हटवावं असं वक्तव्य करत त्यांनी ओवैसी बंधूंना आव्हान दिलं होतं. त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

नवनीत राणांनी हैदराबादमध्ये भाजपच्या उमेदवार माधवी लता यांच्यासाठी 8 मे 2024 रोजी प्रचार सभा घेतली होती. त्यामध्ये बोलताना नवनीत राणा यांनी थेट असदुद्दीन ओवैसींवर निशाणा साधला. 2013 मध्ये अकबरुद्दीन ओवैसींनी 15 मिनिटांसाठी पोलिसांना बाजूला करा, असं म्हणत आव्हान दिलं होतं. त्या 15 मिनिटांच्या आव्हानाला राणांनी प्रतिआव्हान दिलं. आम्हाला 15 सेकंद पुरेशी आहेत. पोलिसांना 15 सेकंदांसाठी हटवा. कोण कुठून आलं आणि कुठून गेलं हे दोन्ही भावांना कळणार नाही, असं नवनीत राणा म्हणाल्या होत्या. राणांच्या याच वक्तव्याची दखल निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतली आणि त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. 

नंतरही राणा त्यांच्या वक्तव्यावर ठाम

गुन्हा दाखल केल्यानंतरही नवनीत राणा त्यांच्या वक्तव्यावर ठाम राहिल्या होत्या. त्या म्हणाल्या होत्या की, “मी कुणालाही घाबरत नाही.  माझ्या वक्तव्यावर मी नेहमीच ठाम राहिलेली आहे. ओवैसी यांनी 15 मिनिटं फक्त पोलिसांना हटवून आम्हाला द्या असं म्हटलं होतं. पण हा हिंदुस्थान आहे, जे लोक हिंदू विचारधारेचे आहेत, त्यांना 15 सेकंदच लागतील.” 

ज्या देशाचं नावच हिंदुस्थान आहे, त्या देशामध्ये हे पाकिस्तानच्या आवलादी येऊन आम्हाला धमकी देत असतील. तर आम्ही उत्तर देण्यास ठाम आहेत. मी माझ्या त्या वक्तव्यावर अजूनही ठाम आहे. तुम्हाला 15 मिनिटं लागत असतील तर आम्हाला फक्त 15 सेकंदच लागतील, असे राणा म्हणाल्या होत्या.

ही बातमी वाचा: 

                                                                                                     

अधिक पाहा..



Source link

राणा-ओवेसी वादाला उकळी, 15 सेकेंदाचे वक्तव्य अंगलट; नवनीत राणांना हैदराबाद न्यायालयाचा समन्स

राणा-ओवेसी वादाला उकळी, 15 सेकेंदाचे वक्तव्य अंगलट; नवनीत राणांना हैदराबाद न्यायालयाचा समन्स


Navneet Rana vs Asaduddin Owaisi : भाजप नेत्या नवनीत राणा (Navneet Rana)यांनी एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांना दिलेल्या चॅलेंज प्रकरणी राणा यांच्या अडचणीत अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. हैदराबादला जाऊन नवनीत राणा यांनी खासदार ओवेसीं जाहीर आव्हान देत केलेल्या वक्तव्याप्रकरणी  हैदराबाद न्यायालयाने नवनीत राणांना  समन्स पाठवला आहे. शिवाय येत्या 28 फेब्रुवारीला न्यायालयात हजर राहण्याचेही आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे आता माजी खासदार नवनीत राणा न्यायालयात हजर राहणार का याकडे सऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

नेमकं प्रकरण काय? 

ज्या देशाचं नावच हिंदुस्थान आहे, या देशामध्ये हे पाकिस्तानच्या आवलादी येऊन आम्हाला धमकी देत असतील. तर आम्ही उत्तर देण्यास ठाम आहेत. मी माझ्या त्या वक्तव्यावर अजूनही ठाम आहे. तुम्हाला 15 मिनिटं लागत असतील तर आम्हाला फक्त 15 सेकंदच लागतील, असं वक्तव्य माजी खासदार नवनीत राणा यांनी केलं होतं. या वक्तव्यावरून मोठा वाद रंगला होता आणि नवनीत राणा यांच्या विरोधात हैदराबाद मध्ये गुन्हा देखील दाखल झाला होता. 8 मे 2024 ला नवनीत राणा यांनी हे वक्तव्य केलं होतं. त्यानंतर 10 फेब्रुवारीला हैदराबाद येथील शादनगरमध्ये गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान आता याच 15 सेकंदाच्या वक्तव्य विरोधात नवनीत राणा यांना समन्स आला असून येत्या 28 फेब्रुवारी रोजी हैदराबाद न्यायालयात हजर राहण्यासाठी सांगण्यात आले आहे. 

नेमकं काय म्हणाल्या होत्या नवनीत राणा?

ज्या देशाचं नावच हिंदुस्थान आहे, त्या देशामध्ये हे पाकिस्तानच्या आवलादी येऊन आम्हाला धमकी देत असतील. तर आम्ही उत्तर देण्यास ठाम आहेत. मी माझ्या त्या वक्तव्यावर अजूनही ठाम आहे. तुम्हाला 15 मिनिटं लागत असतील तर आम्हाला फक्त 15 सेकंदच लागतील, असे राणा म्हणाल्या होत्या.

ओवैसी यांनी तीन तलाकला विरोध दर्शवला. महिलांच्या 33% आरक्षणालाही त्यांनी विरोध केला. आमची बाबरी आहे आणि राहणार या पद्धतीने भाषा करणारे हिंदुस्थानात राहतात आणि पाकिस्तानवर प्रेम करत आहेत, हे खपवून घेतलं जाणार नाही. पाकिस्तानला शांत करण्यासाठी आमचे मोदीजी सक्षम आहेत, असं ही राणा म्हणाल्या.

हे ही वाचा 

अधिक पाहा..





Source link

माणिकराव कोकाटे, धनंजय मुंडेंचा राजीनामा अटळ? चंद्रशेखर बावनकुळे स्पष्टच बोलले, म्हणाले…

माणिकराव कोकाटे, धनंजय मुंडेंचा राजीनामा अटळ? चंद्रशेखर बावनकुळे स्पष्टच बोलले, म्हणाले…


अमरावती: बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि कृषी खात्यातील कथित घोटाळ्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा असलेले मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या मंत्रि‍पदाच्या राजीनाम्याच्या मागणीने सध्या जोर धरला आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या सदनिका या बनावट दस्तऐवज तयार करून लाटल्या प्रकरणात कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) व त्यांचे भाऊ विजय कोकाटे देखील अडचणीत आले आहे. त्यामुळे महायुतीच्या या दोन्ही नेत्यांच्या राजीनाम्याच्या मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी केली होती. दुसरीकडे या मागणीवर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया देत भाष्य केलं आहे. अण्णा हजारे यांनी जी मागणी केली आहे त्याबद्दल आपले सरकार ऐकून घेतील आणि त्यावर निर्णय करतील, असेही ते म्हणाले आहे. 

एकनाथ शिंदे महायुतीत नाराज नाहीत- चंद्रशेखर बावनकुळे

दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुतीत नाराज नाहीत. एकनाथ शिंदे प्रगल्भ आणि महायुतीतील महत्त्वाचे घटक आहेत. एकनाथ शिंदे महायुतीला मजबूत करण्यासाठी काम करतायत. एकनाथ शिंदे यांच्या विधानाचा वेगळा अर्थ काढू नये. विरोधकांना नामोहर करण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी नेहमी केल आहे. हिंदुत्वाचा वसा घेतलेलं काम एकनाथ शिंदे करत आहेत. तसेच बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची शिवसेना पुढे नेण्याचं काम शिंदे करत आहेत. त्यामुळेच भाजप सेना युती अधिक मजबूत झाली आहे. आता राजकारण नको लोकांना जी आश्वासने दिली ती पूर्ण करायची आहे. महाराष्ट्र विकसित महाराष्ट्र व्हावा यासाठी आता महायुती काम करते असल्याचे ही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

दोन पालकमंत्र्यांचा प्रश्न मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सोडवतील

महायुती सरकारच्या पुढाकाराने 20 लक्ष घर मंजूर झाली आहेत. 20 लाख घरांचं आवर्तन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. 20 लाख घरांचा वाटप होणे हा आजचा ऐतिहासिक दिवस आहे. तसेच सर्व लाभार्थ्यांना आज चेकचे वितरण केले जाईल, अशी माहितीही चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. इथल्या दोन पालकमंत्र्यांचा प्रश्न हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार मिळून सोडवतील. असेही ते म्हणाले. 

हे ही वाचा 

अधिक पाहा..



Source link

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अकोल्यात सट्टाबाजारवाल्यांचा हायटेक सेटअप, गोदामात गाद्या टाकून 34 जणांनी खेळ मांडला, पोलिसांनी धाड टाकताच…

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अकोल्यात सट्टाबाजारवाल्यांचा हायटेक सेटअप, गोदामात गाद्या टाकून 34 जणांनी खेळ मांडला, पोलिसांनी धाड टाकताच…



Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अकोल्यात सट्टाबाजारवाल्यांचा हायटेक सेटअप, गोदामात गाद्या टाकून 34 जणांनी खेळ मांडला, पोलिसांनी धाड टाकताच…



Source link

YouTube
Instagram
WhatsApp