बांगलादेशी रोहिग्यांना बनावट जात प्रमाणपत्र; अमरावतीत 6 तर, अकोल्यात 11 जणांविरुद्ध कारवाई

बांगलादेशी रोहिग्यांना बनावट जात प्रमाणपत्र; अमरावतीत 6 तर, अकोल्यात 11 जणांविरुद्ध कारवाई

Amravati News : अमरावती जिल्ह्यातील बांगलादेशी (Bangladeshi) रोहिग्यांना बनावट जात प्रमाणपत्र दिल्याचे प्रकरण उजेडात आले आहे. अमरावती शहरात (Amravati News) सुद्धा बनावट जन्म दाखला दिल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. यात खोटे कागदपत्र सादर केल्या प्रकरणी अमरावतीच्या गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये  सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आला आहे. जन्म दाखल्यासाठी खोटे कागदपत्र देऊन प्रशासनाची फसवणूक केल्या प्रकरणी 6 लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी अमरावतीच्या अंजनगाव सुर्जी पोलीस स्टेशनमध्ये 8 लोकांवर गुन्हे दाखल झाले होते. त्यानंतर आता पुन्हा 6 जणांवर कारवाई केल्याने या प्रकरणात अमरावती जिल्ह्यात आरोपींची संख्या 14 वर गेली आहे.

अकोल्यात 11 जणांविरुद्ध गुन्हे दाखल

दुसरीकडे अकोल्यात ही बनावट जन्म दाखल्या प्रकरणी आणखी 11 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. जन्म दाखल्यासाठीबनावट कागदपत्रे दिल्याचे तपासात उघड झाले आहे. अकोल्यातील रामदासपेठ पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याआधी 3 फेब्रुवारीला बनावट कागदपत्र प्रकरणी 11 जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले होते. त्यानंतर आता नव्याने कारवाई केल्यामुळे अकोला पोलिसात आतापर्यंत एकूण 24 लोकांवर गुन्हे दाखल झाले आहे. अकोला जिल्ह्यात बनावट कागदपत्र बनवून जवळपास 80 बांगलादेशी नागरिकांनी नागरिकत्व घेतल्याची शंका ही या निमित्याने व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, आज पुन्हा एकदा भाजपनेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या रामदासपेठ पोलीस ठाण्यात भेट देणार आहेत. यावेळी ते पोलिसांना आणखी काही पुरावे देणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यानंतर किरीट सोमय्या पातुर तहसील कार्यालयाला भेट देणार असल्याची ही माहिती पुढे आली आहे.

बांगलादेशी रोहिणग्यांची हकुहळू व्याप्ती वाढतेय- किरीट सोमय्या

बांगलादेशी रोहिणग्यांची हकुहळू व्याप्ती वाढत आहे. आता माझं लक्ष अमरावती शहरावर आहे. याठिकाणी 5 हजार लोकं आहे जे इथले असूच शकत नाही. त्यांनी जे 50-70 वर्ष जुने पुरावे दिले ते आतापर्यंत काय करत होते. ज्यांनी जन्म प्रमाणपत्र मिळवले त्यांच्यावर या प्रकरणी कारवाई होईल. फॉरेन्सिक ऑडिटची मागणी मी केलेली आहे. दीड महिन्याच्या मोहिमेत 7 एफआयआर दाखल झालेत. काही दिवसात सरकार ज्यांना जन्म प्रमाणपत्र दिले त्यांचं ही रद्द होईल. तर पुढच्या टप्प्यात ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले ते सांगतील की जन्म कुठला आहे. अशी माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. ते अमरावती येथे बोलत होते.

हे ही वाचा

अधिक पाहा..

Source link

उच्चभ्रू वस्तीत घरातच वेश्याव्यवसाय, शेजाऱ्यांनी बाहेरुन कोंडलं; पोलिसांनी 4 तरुणींना बाहेर काढलं

उच्चभ्रू वस्तीत घरातच वेश्याव्यवसाय, शेजाऱ्यांनी बाहेरुन कोंडलं; पोलिसांनी 4 तरुणींना बाहेर काढलं

उच्चभ्रू वस्तीत घरातच वेश्याव्यवसाय, शेजाऱ्यांनी बाहेरुन कोंडलं; पोलिसांनी 4 तरुणींना बाहेर काढलं

Source link

Krushi Mahotsav Amravati : अमरावतीत कृषिमहोत्सव, सरकारच्या कृषी धोरणावर शेतकऱ्याची रोखठोक मतं

Krushi Mahotsav Amravati : अमरावतीत कृषिमहोत्सव, सरकारच्या कृषी धोरणावर शेतकऱ्याची रोखठोक मतं

Krushi Mahotsav Amravati : अमरावतीत कृषिमहोत्सव, सरकारच्या कृषी धोरणावर शेतकऱ्याची रोखठोक मतं
अमरावतीत कृषी महोत्सवात शेतकऱ्याचा संताप..  सरकारच्या धोरणावर केली टीका..  शेतकऱ्याचा व्हिडिओ व्हायरल..  अमरावती शहराच्या सायन्स्कोर मैदानात पाच दिवसीय कृषी महोत्सव चालू आहे, या ठिकाणी दररोज हजारो शेतकरी उपस्थिती लावत आहे, मात्र या ठिकाणी एका शेतकऱ्याचा व्हिडिओ प्रचंड वायरल होत आहे.. सरकारच्या धोरण, सरकारचं आयात निर्यात धोरण, शेतमालाला हमीभाव, तर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पिक विमा बाबत शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना केल्याने यावर या शेतकऱ्याने संताप व्यक्त केला..  सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर अमरावती जिल्ह्यात तुफान वायरल होत आहे, सध्याची शेतकऱ्यांची स्थिती मांडली त्यामुळे अनेक प्रतिक्रिया या व्हिडिओवर येत आहे, हा शेतकरी अमरावती जिल्ह्यातील बोरगाव धर्माळे येथील असून या शेतकऱ्याने कृषी महोत्सवात शेतकऱ्यांना आपल्या अडी अडचणी समस्या सांगून अनेक शेतकऱ्यांचे लक्ष वेधलं होतं…

Source link

वक्फ बोर्ड बंद करून सनातनी बोर्ड स्थापन करा;  नवनीत राणा यांची थेट पंतप्रधान मोदींकडे मागणी

वक्फ बोर्ड बंद करून सनातनी बोर्ड स्थापन करा;  नवनीत राणा यांची थेट पंतप्रधान मोदींकडे मागणी

अमरावती : राज्यात लव्ह जिहाद (Love Jihad) खूप वाढलेला आहे. या कायद्यामुळे येणाऱ्या पिढीला खुप फायदा होईल. अनेक समिती यावर काम करत होत्या, यातील अनेक मुलींना आम्ही वापस आणले आहे. मागील 5 वर्षात महाविकास आघाडीच्या वेळी मोठ्या प्रमाणात यात आरोपींना सहकार्य  मिळत होते. लव्ह जिहाद कायदा येईल तेव्हा अनेक मुली वाचलीत. अशी भावना व्यक्त करत माजी खासदार आणि भाजप नेत्या नवनीत राणा (Navneet Rana) यांनी राज्यातील ‘लव्ह जिहाद’विरोधात कायद्याच्या प्रस्तावावर भाष्य केलं आहे.

यासोबतच नवनीत राणा यांनी वक्फ बोर्डाविषयी (Waqf Board) मोठं वक्तव्य केलं. यात त्या म्हणाल्या की, वक्फ बोर्ड बंद करून सनातनी बोर्ड स्थापन करावा,  अशी मागणी मी पंतप्रधान (Prime Minister Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे करणार असल्याचं नवनीत राणा म्हणाल्या. आमचे सरकार असतांना वक्फ बोर्ड समाप्त झाला पाहिजे. यात लाखो करोडो जमीन यांनी लाटल्या असल्याचा आरोप ही त्यांनी यावेळी केला आहे.

‘लव्ह जिहाद’विरोधात कायदा, पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती

राज्यात लव्ह जिहादच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर लव्ह जिहाद व फसवणूक, बळाचा वापर करून केलेले धर्मांतरण रोखण्यासाठी कायदा करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारने पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती गठीत केली आहे. ही समिती राज्यातील सध्याची परिस्थितीचा अभ्यास करून लव्ह जिहाद फसवणूक आणि बळाचा वापर करून केलेले धर्मांतरण यावर उपाययोजना सुचवून कायद्याचा मसूदा तयार करणार आहे. त्यामुळे लव्ह जिहादच्या विरोधात कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील दहावे राज्य ठरणार आहे.

देशात आतापर्यंत उत्तर प्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश, गुजरात, झारखंड, मध्यप्रदेश, उत्तराखंड, ओडिसा आणि छत्तीसगड या नऊ राज्यांनी लव्ह जिहादविरोधी कायदा आणला आहे. या धर्तीवर महाराष्ट्रातही लव्ह जिहाद कायदा लागू करण्याची मागणी भाजपाचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांच्यासह राज्यातील विविध हिंदू संघटनांनी केली होती.

राज्यातल्या धर्मांतराच्या तक्रारीनंतर या विरोधात कायदा करण्याची ग्वाही तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली होती. त्यानुसार राज्य सरकारने पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती गठीत केली आहे.  या समितीत महिला व बालकल्याण विभागाचे सचिव, अल्पसंख्यांक विकास विभागाचे सचिव, विधी व न्याय विभागाचे सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव, गृहविभागाचे सचिव तसेच गृह विभागाचे (विधी) सचिव हे सदस्य असतील. राज्यातील सध्याची परिस्थितीचा अभ्यास करून लव्ह जिहाद व फसवणूक आणि बळाचा वापर करून केलेले धर्मांतरण यावर उपाययोजना सुचवून, इतर राज्यातील या कायद्याचा अभ्यास करणार आहे. तसेच कायद्याचा मसूदा तयार करणे तसेच कायदेशीर बाबींचा अभ्यास करण्याचे काम ही समिती करणार आहे.

समिती नेमली ते स्वागतार्ह आहे- खासदार अनिल बोंडे

लव्ह जिहाद विरोधात कायदा आणण्यासाठी पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली ते स्वागतार्ह आहे. लव्ह जिहाद राज्यात मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे. अशा घटना शाळा कॉलेज परिसरात ही पाहायला मिळत आहे. त्यामुळे याला आळा बसने गरजेचं आहे. मी पण समितीला सूचना पाठवणार आहे. ज्या मुलींचं लव्ह जिहादमुळे आयुष्य बर्बाद झालं आहे, त्यांना पण न्याय मिळाला पाहीजे. सोबतच लव्ह जिहाद प्रमाणे लँड जिहाद विरोधात कायदा आणला पाहिजे, अशी मागणी मी सरकारकडे करणार असल्याची प्रतिक्रिया भाजप नेते आणि खासदार अनिल बोंडे यांनी दिली आहे.

हे ही वाचा

अधिक पाहा..

Source link

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याला मृत्यूची लागलेली कुणकुण? वर्षभराआधी पुस्तकात लिहिलेली इच्छा क

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याला मृत्यूची लागलेली कुणकुण? वर्षभराआधी पुस्तकात लिहिलेली इच्छा क

अकोला: मूर्तिजापूरचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते तुकाराम बिरकड यांचं काल (गुरूवारी) अपघाती निधन झालं आहे. तुकाराम बिरकड हे विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी अध्यक्ष होते. काल त्यांचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ देखील समोर आला आहे. तर त्याच्या अपघातानंतर आता त्यांनी लिहलेल्या पुस्तकाबाबत आणि त्यांच्या इच्छेबाबत सध्या सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. वर्षभरापूर्वी त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं. त्यात त्यांनी स्वत:च्या मृत्यूबद्दल काही गोष्टी लिहून ठेवल्या होत्या. त्यामुळे बिडकर यांना स्वत:च्या मृत्यूची चाहूल वर्षभरापूर्वीच लागली होती का, अशी चर्चा आता होताना दिसत आहे.

काय लिहलं होतं पुस्तकात?

तुकाराम बिरकड यांनी वर्षभरापूर्वी ‘माझं गाव, माझ्या आठवणी’ नावाचं एक पुस्तक लिहिलं होतं. या पुस्तकात त्यांनी आपल्या मृत्यूबद्दलच्या काही गोष्टी लिहून ठेवल्या होत्या. त्यांच्या पुस्तकात त्यांनी लिहलं होतं, जन्मभूमीतच मला मरण येऊ दे, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. तर पुस्तकाच्या शेवटी या संत कबीरांच्या दोहे लिहले आहेत.
‘मन मरे माया मरे। मरमर गये शरिर…
आशा तृष्णा ना मरे। कह गये दास कबीर’
असा पुस्तकाचा शेवट तुकाराम बिरकडांना केला होता.

स्वत:च्या मृत्यूबद्दल बिरकड लिहतात…

बिरकडांनी त्यांच्या पुस्तकात स्वत:च्या मृत्यूबद्दल काही गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. ‘हे ईश्वरा मला मृत्यू जन्मभूमीत दे. माझ्या गावकऱ्यांच्या खांद्यावरुन मला शेवटच्या यात्रेला निघू दे. माझे पार्थिव गावातच आणा. जय बजरंग विद्यालयाच्या मैदानात ठेवावं. तेथे श्रमदान करुन माझे नेते शरदचंद्र पवार यांच्या कार्यक्रमासाठी व्यासपीठ उभारले होते. त्याच ठिकाणी माझे पार्थिव ठेवा. बी. पी. एड. कॉलेजच्या मैदानावर एका कोपऱ्यात माझ्यासाठी एक जागा ठेवा. तिथेच मला माझा मुलगा पवनच्या हातून अग्नी द्या. कोणताही विधी करु नका. माझी राख इतरत्र कोठेही नेऊ नका. ती लोणार नदीत विसर्जित करा. ओंकारेश्वर हे माझं अतिशय श्रद्धेचं ठिकाण. माझ्या अस्थी नर्मदा मातेच्या उदरात विसर्जित करा. काही राख जय बजरंग विद्यालयाच्या मैदानात टाका. जेणेकरुन माझ्या शाळेचे, मंडळाचे खेळाडू त्यावर खेळतील आणि मला त्यातून आनंद मिळेल,’ अशा गोष्टी बिडकरांनी पुस्तकात लिहिल्या आहेत.

कसा घडला अपघात?

अकोला शहरातील सिटी स्पोर्ट्स क्लब या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या अमरावती विभागातील नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची बैठक होती. या बैठकीला पाच ही जिल्ह्यातील सुमारे 800 कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीला राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कामगार मंत्री आकाश फुंडकर, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके देखील उपस्थित होते. माजी आमदार तुकाराम बिरकड हे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीसाठी सिटी स्पोर्ट्स क्लब येथे गेले होते. भेटीनंतर दुचाकीवरून परत जात असताना जनावरे वाहून नेणाऱ्या मालवाहू वाहनाने दुचाकीला जोरात धडक दिली. या धडकेत तुकाराम बिरकड यांच्यासह त्यांच्यासोबत असलेले त्यांचे सहकारी यांचा देखील जागीच मृत्यू झाला आहे.

Source link

YouTube
Instagram
WhatsApp