अकोल्यातील अपार्टमेंटला भीषण आग; इमारतीच्या बेसमेंटसह अनेक वाहने जळून खाक

अकोल्यातील अपार्टमेंटला भीषण आग; इमारतीच्या बेसमेंटसह अनेक वाहने जळून खाक



Akola Accident : अकोल्यातील अपार्टमेंटला भीषण आग; इमारतीच्या बेसमेंटसह अनेक वाहने जळून खाक, अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात



Source link

बाळाच्या पोटातून दोन अविकसित बाळांचे अवशेष काढण्यात डॉक्टरांना यश; जगभरातली अतिशय दुर्मिळ घटना

बाळाच्या पोटातून दोन अविकसित बाळांचे अवशेष काढण्यात डॉक्टरांना यश; जगभरातली अतिशय दुर्मिळ घटना


बुलढाणा: जिल्ह्यातील एका 32 वर्षीय महिलेच्या पोटातील बाळाच्या पोटातही बाळ असल्याची दुर्मिळ घटना समोर आली होती. दरम्यान, या महिलेची बुलढाणा येथील स्त्री रुग्णालयात प्रसूती (Buldhana Pregnant Women) झाल्यानंतर या बाळाला अमरावती येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर आज (4 जानेवारी) या बाळावर अमरावतीच्या 5 डॉक्टर आणि 12 जणांच्या चमूने यशस्वी शास्त्रक्रिया करण्यात आली. दरम्यान, या बाळाच्या पोटातून दोन  अविकसित बाळांचे अवशेष यावेळी बाहेर काढण्यात आले. 

अशा प्रकारची ही जगभरातील केवळ 34वी घटना असू शकते, अशी शक्यता डॉ. उषा गजभिये यांनी यावेळी व्यक्त केली आहे. या यशस्वी शास्त्रक्रियेबद्दल बाळाचे वडिलांनी डॉक्टरांचे आभार मानले आहे. तर वैद्यकीय क्षेत्रातील अतिशय दुर्मिळ अशा घटनेतील महिलेची प्रसूती सुरक्षित झाल्याने डॉक्टरांच्या पथकाने ही समाधान व्यक्त केलं आहे. या दुर्मिळ परिस्थितीला वैद्यकीय भाषेत ” फिटस इन फेटू ” अस म्हटल्या जात. साधारणतः पाच लाख सामान्य गर्भवती महिलांत अशा प्रकारची एखादी घटना बघायला मिळते.असेही डॉक्टर म्हणाले.

फिटस इन फेटू म्हणजे काय? 

बुलढाणा जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्राच्या इतिहासातील एक दुर्मिळ घटना समोर आली होती. जगाच्या वैद्यकीय क्षेत्रातील इतिहासात आतापर्यंत 200 तर देशात मोजक्याच अशा घटना समोर आल्याच्या नोंदी आहेत. त्यामुळे ही नेमकी घटना काय आहे पाहूयात. 

बुलढाणा जिल्हा महिला रुग्णालयात एक 32 वर्षीय गर्भवती महिला आपल्या नियमित तपासणीसाठी रुग्णालयात आली. ही महिला 32 आठवड्यांची गर्भवती असल्याने डॉक्टरांनी तपासून तिला सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. स्त्री रुग्णालयातील सोनोग्राफी विभागात ही महिला सोनोग्राफीसाठी गेल्यानंतर कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी तिला तपासल्यानंतर त्यांना धक्काच बसला. सोनोग्राफी केल्यानंतर डॉक्टरांना समजलं की, महिलेच्या पोटात बाळ आहे आणि त्या बाळाच्या पोटातही एक दुसरे बाळ आहे. डॉक्टरांना विश्वासच बसेना म्हणून त्यांनी आपल्या सहकारी डॉक्टरांना बोलवून पुनर तपासणी करून निश्चित केलं.

दरम्यान, महिलेची तपासणी केल्यानंतर महिलेच्या पोटातील बाळाच्या पोटातही बाळ असल्याचं समोर आल्याने या परिस्थितीला “फिटस इन फिटो ” असं वैद्यकीय भाषेत म्हटले जाते हे अतिशय दुर्मिळ अशी परिस्थिती असून आतापर्यंत जगात फक्त 200 तर आपल्या देशात नऊ ते दहा अशा घटना समोर आल्याच्या नोंदी आहेत,  त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील इतिहासात बुलढाण्यात पहिल्यांदा अशा प्रकारची घटना समोर आली आहे.

नेमकं ही दुर्मिळ घटना काय?

-गर्भवती महिलेच्या पोटात असलेल्या बाळाच्या पोटातही एक बाळासारखाच गोळा दिसतो याला “फिटस इन फेटो” असं म्हटल्या जातं.

-“काँनजेनाईटल एबनॉर्मलिटी” मुळे ही अशी परिस्थिती उद्भवते.

-जवळपास ५ लाख सामान्य गरोदर महिलांमध्ये एक , तर २० लाख गरोदर महीलांमध्ये एखाद्या महिलेत अशी परिस्थिती दिसून येते.

-अशा वेळेस प्रसूतीनंतर ज्यावेळी बाळाला बाळाच्या पोटातील बाळाचा त्रास होतो त्यावेळी शस्त्रक्रिया करून त्या बाळाच्या पोटातील बाळ काढून घेतल्या जात.

बुलढाणा जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रातील इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारची घटना समोर आली आहे.

हे ही वाचा 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..



Source link

मुंबई एयरपोर्ट पर कार की टक्कर से 5 लोग घायल:  इनमें 2 विदेशी यात्री; पुलिस का दावा- ब्रेक की जगह एक्सीलरेटर दबाया, ड्राइवर गिरफ्तार

मुंबई एयरपोर्ट पर कार की टक्कर से 5 लोग घायल: इनमें 2 विदेशी यात्री; पुलिस का दावा- ब्रेक की जगह एक्सीलरेटर दबाया, ड्राइवर गिरफ्तार


मुंबई8 दिन पहले

  • कॉपी लिंक

मुंबई एयरपोर्ट पर हादसे के बाद खड़ी मर्सिडीज, इसे सहार पुलिस ने कब्जे में ले लिया है।

रविवार सुबह मुंबई इंटरनेशनल एयरपोर्ट पर एक मर्सिडीज कार ने दो विदेशियों समेत पांच लोगों को टक्कर मार दी, जिससे वे घायल हो गए। यह हादसा टर्मिनल 2 की पार्किंग में हुआ। लापरवाही से गाड़ी चलाने के आरोप में ड्राइवर को अरेस्ट कर लिया गया है।

घायलों में दो विदेशी नागरिकों को नानावटी अस्पताल में भर्ती कराया गया है। एयरपोर्ट के तीन क्रू मेंबर भी घायल हैं, जिनका कूपर अस्पताल में इलाज चल रहा है।

पुलिस ने कार चला रहे परशुराम चिंचोलप्पा दादानवरे को लेकर दावा किया है कि ब्रेक के बजाय एक्सीलेटर दबाया था, जिससे हादसा हो गया।

हादसे में घायल विदेशी नागरिक को एयरपोर्ट पर मौजूद स्वास्स्थ्य कर्मियों ने फर्स्ट एड दिया।

हादसे में घायल विदेशी नागरिक को एयरपोर्ट पर मौजूद स्वास्स्थ्य कर्मियों ने फर्स्ट एड दिया।

पुलिस बोली- नशे में नहीं था ड्राइवर

हादसे के बाद पुलिस ने बताया कि घटना के समय चालक शराब या नशा नहीं किया था। ड्राइवर यात्री को उतारने के लिए एयरपोर्ट पर आया था। उसने गलती से ब्रेक की जगह एक्सीलरेटर दबा दिया, जिससे वह गाड़ी पर से कंट्रोल खो बैठा। इससे टर्मिनल 2 की पार्किंग में यह हादसा हुआ। इसके बाद कार गेट के सामने रैंप से टकरा गई।

जनवरी में हुए कार हादसे

14 जनवरी : नवी मुंबई में कार ने महिला-पुरुष को टक्कर मारी​​​​​​​

महाराष्ट्र के मुंबई में एक बार फिर तेज रफ्तार कार का कहर देखने को मिला। नवी मुंबई के तलोजा एमआईडीसी इलाके में 14 जनवरी सुबह 9.46 बजे कार ने महिला-पुरुष को टक्कर मार दी। पुलिस के मुताबिक कार ड्राइवर का गाड़ी से कंट्रोल छूटने के कारण हादसा हुआ था, जिसमें एक की मौत हो गई, दूसरा गंभीर रूप से घायल हो गया था।

12 जनवरी: नासिक में 6 लोगों की मौत हुई थी

नासिक में 12 जनवरी की शाम करीब 7 बजे पिकअप गाड़ी लोहे की रॉड से भरी आयशर गाड़ी से टकरा गई थी। इस घटना में पिकअप सवार 6 लोगों की मौत हो गई थी। 5 लोग घायल हुए थे। हादसा नासिक-मुंबई हाईवे पर हुआ। पिकअप में 16 लोग सवार थे। ये सभी निफाड़ में आयोजित धार्मिक आयोजन से शामिल होकर सिडको लौट रहे थे। पूरी खबर पढ़ें…

खबरें और भी हैं…



Source link

पोकळ घोषणा, मोठ्या वल्गना, कृषीक्षेत्राचे हब बनविण्याऐवजी पर्यावरणपूरक खेळण्यांचा हब, अर्थसंकल्

पोकळ घोषणा, मोठ्या वल्गना, कृषीक्षेत्राचे हब बनविण्याऐवजी पर्यावरणपूरक खेळण्यांचा हब, अर्थसंकल्


Raju Shetti on Union Budget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी विविध घोषणा केल्या आहेत. मात्र, विरोधकांकडून या अर्थसंकल्पावर टीका होताना दिसत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी देखील या अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली आहे. अर्थसकल्पात पोकळ घोषणा, मोठ्या वल्गना आत्मनिर्भर सारखे शब्द यापलीकडे काहीही नाही नसल्याचं शेट्टींन म्हटलं आहे. 

नेमकं काय म्हणाले राजू शेट्टी?

अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्पात पोकळ घोषणा केल्या आहेत. आत्मनिर्भर सारखे शब्द त्यामध्ये आहेत. यापलीकडे त्यामध्ये काहीही नसल्याची टीका राजू शेट्टींन केली आहे. खतांच्या किंमती नियंत्रित करण्यासाठी बजेटमध्ये काहीही नाही. कृषी क्षेत्रासाठी हा अर्थसंकल्प निराशाजनक असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. देशात कृषीक्षेत्राचे हब बनवण्याऐवजी पर्यावरणपूरक खेळण्यांचा हब बनवण्याची घोषणा केल्याचे राजू शेट्टी म्हणाले. 

उद्योगपती आणि कॉर्पोरेट कंपन्यांनाच लाभ, अजित नवलेंची टीका

केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये शेती आणि शेतकऱ्यांना झुकते माप दिले गेल्याचे भासवण्यात येत आहे.  प्रत्यक्षात मात्र शेतीसाठी करण्यात आलेल्या बहुतांशी घोषणा या सुद्धा उद्योगपती आणि कॉर्पोरेट कंपन्यांनाच लाभ पोहोचवणाऱ्या असल्याचे मत किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी व्यक्त केलं आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून त्यांच्या कापसाला रास्त भाव मिळेल यासाठी ठोस तरतूद अर्थसंकल्पामध्ये केली असती तर ती खऱ्या अर्थानं कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देणारी ठरली असती. प्रत्यक्षात मात्र टेक्स्टाईल इंडस्ट्रीसाठी तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळं अप्रत्यक्षपणे शेतकऱ्यांचं भलं होणार असल्याचे भासवलं जात असल्याचे नवले म्हणाले. आसाम मध्ये युरिया प्लांट सुरू करून खतांबद्दल विशेषता युरिया बद्दल आत्मनिर्भर होण्याच्या बाबत पाऊल टाकल्याचं जाहीर करण्यात आले आहे. दुसऱ्या बाजूला मात्र गेल्या अनेक वर्ष खतांवरची सबसिडी कमी केली जाते आहे. परिणामी खतांचे भाव आणि शेतीचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढून शेती तोट्यात जात आहे. तेलबिया आणि डाळी बद्दल घोषणा करण्यात आली असली तरी मागील अनुभव पाहता, जोपर्यंत तेलबिया व डाळ पिकांना रास्त भावाची हमी मिळत नाही व त्यासाठी सरकारी खरेदी यंत्रणा सक्षम होत नाही तोपर्यंत या घोषणांचा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कोणताही लाभ होणार नाही. असे अजित नवले म्हणाले. 

12 लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर कुठलाही कर भरावा लागणार नाही

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी संसदेत देशाचा वार्षिक अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी सर्वसामान्य नोकरदार आणि मध्यमवर्गीयांच्यादृष्टीने मोठा निर्णय जाहीर केला. त्यानुसार आता नोकरदारांना 12 लाख रुपयांच्या उत्पन्नावर कुठलाही कर भरावा लागणार नाही. नव्या करप्रणालीनुसार 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर आयकर आकारला जाणार नाही. याशिवाय, 75 हजार रुपयांची कर वजावट (Tax Deduction) पकडून आता नोकरदारांना 12 लाख 75 हजार रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर आता कोणताही कर भरावा लागणार नाही.

कोणत्या उत्पन्न गटाला किती टॅक्स 

० ते ४ – Nil
४ ते ८- ५ टक्के
८ ते १२ लाख – १० टक्के
१२ ते १६ लाख – १५ टक्के
१६ ते २० लाख – २० टक्के
२० ते २४ लाख – २५ टक्के
२४ लाखापुढे – ३० टक्के

महत्वाच्या बातम्या:

Agriculture Budget 2025 : अर्थसंकल्पातील घोषणा उद्योगपती आणि कॉर्पोरेट कंपन्यांनाच लाभ पोहोचवणाऱ्या, शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच, किसान सभेचा हल्लाबोल  

अधिक पाहा..



Source link

Akola News : धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर पिंजऱ्यात कैद! अकोला वन विभागाच्या पथकाला यश

Akola News : धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर पिंजऱ्यात कैद! अकोला वन विभागाच्या पथकाला यश


Akola News : अकोल्यात धुमाकूळ घालणारा बिबट्या (Leopard) अखेर पिंजऱ्यात कैद झालाय. अकोला वन विभागाच्या (Forest Department) पथकाने रेस्क्यू करत या बिबट्याला पिंजराबंद केलंय. अकोल्यातल्या (Akola) बाळापूर शेताशिवारात एक बिबट्या असण्याची शक्यता गेल्या काही दिवसांपासून होती. या बिबट्याने गेल्या काही दिवसांपासून परिसरातील काही बकऱ्या आणि गाईची शिकार केली होती.  त्यानंतर शेतकर्‍यांमध्ये भीतीच वातावरण होतं.

अखेर बिबट्या पिंजऱ्यात कैद!

अखेर वन विभागाला या संदर्भात माहिती देण्यात आली, मात्र बिबट्याचा शोध काही केल्या लागत नव्हता. अखेर गावकऱ्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी ट्रॅप लावला होता आणि त्या ट्रॅपमध्ये बिबट्या फसला. वन विभागाला याची माहिती देण्यात आली असता अकोला वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झालं आणि बिबट्याला सुखरूप रेस्क्यू करत पिंजऱ्यात कैद केले आहे. 

परिसरात आणखी बिबट असल्याची शक्यता

पशुवैद्यकीय तपासणीनंतर बिबट्याला सुखरूप पणे जंगलात सोडून देण्यात येणार आहे. दरम्यान, मागील काही दिवसापासून बाळापूर शेतशिवाराच्या परिसरात वावरत होता. या बिबट्याने शेतकऱ्यांच्या जनावरांची देखील शिकार केली होती. अखेर आज बाळापुर न्यायालयाच्या पाठीमागे असलेल्या एका शेतात बिबट्या हा लावलेल्या ट्रॅपमध्ये अडकलाय. हा बिबट्या जवळपास दीड वर्षाचा असून नर आहे. विशेष म्हणजे या परिसरात आणखी बिबट असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे हा बिबट्या रात्रभर गावकऱ्यांनी लावलेल्या एका ट्रॅपमध्ये अडकलेला होता. सकाळी शेतात जाणाऱ्या शेतमजुरांना हा बिबट्या दिसून आला होता.

एमआयडीसीमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ

अकोल्यातल्या एमआयडीसीमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय. एमआयडीसी मधील ट्रान्सपोर्ट नगरमध्ये चार अज्ञात चोरट्यांनी वेगवेगळ्या कंपनीमध्ये चोरी केली. हा संपूर्ण प्रकार एमआयडीसीतील कंपनीच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. विशेष म्हणजे या चोरट्याने चार कंपनीमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केलाय. ऑटोमोबाईलच्या एका कंपनीमधून चोरट्यांनी एक लाख रुपयांचा रोख लंपास केलाय. तर उर्वरित तीन कंपन्यामधून चोरट्यांना चोरी करण्याचा प्रयत्न केलाय. मात्र येथे चोरट्यांचा डाव फसला. दोन चोरटे कंपनीच्या भिंतीवरून उडी मारत कंपनीमध्ये शिरतात आणि टेबलच्या कॅश काऊंटर उघडण्याचा प्रयत्न केला. परंतु कॅश काउंटर तोडता न आल्याने कंपनीतील जनरेटर बॅटरी सह इतर काही साहित्य सोबत पळवून नेलंय.

या प्रकरणात एमआयडीसी पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून चार अज्ञात चोट्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. दरम्यान, आता अकोला पोलिसांसमोर या चोरट्यांना पकडण्याचं आव्हान उभं ठाकलंय.

इतर महत्वाच्या बातम्या 

 

अधिक पाहा..



Source link

YouTube
Instagram
WhatsApp