अमरावती : कुंभमेळ्यासाठी अमरावती जिल्ह्यातील भाविकांना प्रयागराज येथे घेऊन गेलेल्या एका व्यक्तीने त्या सर्वांनाच तिथेच सोडून पळ काढल्याची घटना घडली. सूरज मिश्रा असं त्या व्यक्तीचं नाव असून तो आमदार रवी राणांच्या (Ravi Rana) युवा स्वाभिमानी पक्षाचा कार्यकर्ता (Yuva Swabhimani Party) असल्याची माहिती समोर येत आहे. प्रयागराजमधून येताच भाविकांनी त्याच्याविरोधात अमरावती पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
सूरज मिश्रा याने अमरावतीवरून कुंभमेळासाठी तीन ट्रॅव्हल्स भरून भाविकांना प्रयागराजला नेले होते. पण त्याठिकाणी सूरज मिश्रा हा भाविकांना सोडून पळून गेला असा आरोप अमरावतीच्या केला. त्याच्या भरवशावर गेलेल्या भाविकांची फसवणूक झाल्याचं समोर आलं. त्यामुळे भाविकांनी सूरज मिश्राशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्याशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे भाविकांची तीन दिवस जेवण आणि झोपण्याची व्यवस्थाच झाली नसल्याचं समोर आलं.
तीन दिवस भाविकांची गैरसोय
प्रयागराजमध्ये तीन दिवस जेवणाची आणि झोपण्याची व्यवस्था झाली नसल्याने भाविक भडकले होते. शनिवारी हे भाविक अमरावतीत दाखल होताच त्यांनी थेट पोलिस स्टेशन गाठलं. सूरज मिश्रा हा आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानी पक्षाचा कार्यकर्ता असल्याने त्याच्या विरोधात तक्रार नोंद करून घेण्यासाठी पोलिस टाळाटाळ करत असल्याचं समोर आलं. त्यामुळेच भाविक अधिक संतप्त झाले.
पोलिस प्रतिसाद देत नसल्याने संतप्त भाविक पोलिस मुख्यालय येथे गृहराज्यमंत्री भोयर यांच्या भेटीला गेले. पण त्या ठिकाणीही त्यांना अडवलं गेलं. अखेर पोलिस उपायुक्तांनी फ्रेजरपुरा पोलिसांना भाविकांची तक्रार नोंदवणून घेण्याचे आदेश दिले.
चेंगराचेंगरीत 30 भाविकांचा मृत्यू
प्रयागराज महाकुंभ मेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत आतापर्यंत 30 भाविकांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी जाहीर झाली आहे . घटना घडल्यानंतर 17 तासांनी ही आकडेवारी जाहीर झाली. यातील 25 मृतांची ओळख पटली. या घटनेत तब्बल 60 भाविक जखमी झाले. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बॅरिकेट्स तुटल्याने झालेल्या गोंधळात ही चेंगराचेंगरी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
महाकुंभ चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबीयांना 25 लाखांची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. या संपूर्ण घटनेची चौकशी करण्यासाठी माजी न्यायाधीश हर्ष कुमार यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापना करण्यात आली आहे.
अमरावती: भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष असताना चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने(BJP) दैदिप्यमान यश संपादन केले. त्यानंतर पालकमंत्री झाल्यानंतर अमरावतीतील त्यांच्या प्रथम आगमनानिमित्त, तसेच त्यांच्या कार्याचा गौरव आणि सन्मान करण्यासाठी भाजप अमरावती शहर अध्यक्ष प्रविण पोटे पाटील यांनी सुवर्ण मुकुट चढवत भव्य सत्कार करण्यात आला आहे. प्रविण पोटे पाटील यांच्या इर्विन चौकातील जनसंपर्क कार्यालयात हा भव्य स्वागत सोहळा पार पडला. फटाक्यांची आतीषबाजी, फुलांची उधळण करत क्रेनद्वारे हार टाकून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे यावेळी जंगी स्वागत करण्यात आले.
दरम्यान, या दौऱ्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलतांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केलं. यावेळी बोलताना ते म्हणाले की, बीडमध्ये आपसात महायुतीमध्ये आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यात विसंवाद झालेला आहे. तो विसंवाद दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. सुरेश धस यांच्या काही बाबी न्याय मिळावा अशा आहेत. तर मुंडे यांचा म्हणणं आहे की, माझा दोष असेल तर माझी केव्हाही पदावरुन पायउतार होण्याची तयारी आहे. त्यामुळे या दोघांना बसवून यामधला मार्ग काढण्याचा आम्ही प्रयत्न करत असल्याचे ही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
कुणासोबत कोणी राहणं हा काही दोष नाही- चंद्रशेखर बावनकुळे
नावदेव शास्त्री महाराज यांच्यावर बावनकुळे म्हणाले की, धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे की माझा एक टक्का जरी दोष असेल तर मी पक्ष सांगेल ते करायला तयार आहे. त्यात जर खरंच त्यांचा दोष असेल तर तो दाखवला पाहिजेल, असे ही ते म्हणाले. या केसमध्ये चार्टशीट दाखल होत नाही, तोपर्यंत काहीच करता येणार नाही. परिचित असणं काही गुन्हा नाही. कुणासोबत कोणी राहणं हे काही दोष नाही. असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
चंद्रशेखर बावनकुळे यांची रवी राणा यांच्या निवासस्थानी भेट
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्री झाल्यानंतर प्रथमच आज (31 जानेवारीला)अमरावतीत दाखल झाले. यावेळी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. बावनकुळे यांनी आधी मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी विदर्भाची कुलस्वामिनी श्री अंबादेवी मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळचे अध्यक्ष पदमश्री प्रभाकरराव वैद्य यांच्या घरी जाऊन भेट घेतली. त्यानंतर त्यांनी आमदार रवी राणा यांच्या निवासस्थानी जात भेट ही घेतली.
दरम्यान या दौऱ्यात चंद्रशेखर बावनकुळे हे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा विकास आराखड्याबाबत आढावा बैठक घेतील. दुपारच्या सुमारास ते विभागीय आयुक्त यांचे सादरीकरण आणि आढावा घेतील. तर त्यानंतर ते नोंदणी उपमहानिरीक्षक यांचे सादरीकरण आणि आढावा घेतील. तर सायंकाळी बावनकुळे हे भूमी अभिलेख उपसंचालक यांचे सादरीकरण आणि आढावा घेतील. दरम्यान, सायंकाळी 6.30 ते 8 वाजेपर्यंत विश्रामगृह येथे भाजप पदाधिकारी कोअर ग्रुप बैठक आटपून रात्री 8 वाजता गृहभेटी आणि त्यानंतर रात्री 10 वाजता अमरावती येथून नागपूरकडे प्रस्थान करतील. अशी माहिती पुढे आली आहे.
अकोला : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू असल्याचं परखड मत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी व्यक्त केलंय. आजची पिढी विचार करीत नसून ती आत्मकेंद्रित झाल्याचं विधान आंबेडकरांनी केलंय. ते आज अकोल्यातील सीताबाई कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात एका राष्ट्रीय परिसंवाद कार्यक्रमात बोलत होते. ‘भारतीय संविधान देशाच्या नवीनतम सर्वांगीण विकासाचा पाया’ असा या परिसंवादाचा विषय होता. अमेरिकेतील नव्या ट्रम्प सरकारच्या धोरणामुळे 23 लाख भारतीयांना देशात परत यावं लागणार असल्याची भीती ही यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केलीये.
ब्रह्मपुत्रा ही ईशान्येतील ‘सेव्हन सिस्टर आणि वन ब्रदर’ यांना जोडणारी नदी आहे. मात्र याच नदीवर चीन सात धरणं बांधायची योजना आखत आहे. ही सात धरणं बांधली गेली तर ब्रह्मपुत्रेचं पाणी आपल्याला मिळणार नसल्याचं आंबेडकर म्हणालेय. असं झालं तर ईशान्येतील सात राज्य चीनसोबत जाण्याचा विचार करू शकतात, अशी धक्कादायक भीती आंबेडकरांनी व्यक्त केलीये.
भगवान गडाचा धनंजय मुंडेंना पाठिंबा, ही सामाजिक बाब- प्रकाश आंबेडकर
दरम्यान, भगवान गडाचे महंत नामदेवशास्त्री (Namdev Shastri) यांनी शुक्रवारी(31 जानेवारी) सकाळी एक पत्रकार परिषद घेत आपण धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे आहोत, असा संदेश दिला. यावर बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी आपली प्रतिक्रिया देत मत मांडले आहे. भगवान गडाने धनंजय मुंडे यांना दिलेला पाठिंबा ही सामाजिक बाब असल्याचं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील पुरावे पोलिसांनी सार्वजनिक करावेत, असं आंबेडकर म्हणालेय. असं केलं तरच या संदर्भातील लोकांच्या मनातला संभ्रम दूर होणार असल्याचं ही ते यावेळी म्हणालेय.
अकोला : जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यात चक्क साधूच्या वेशात बिबट्याची शिकार करून बिबट कातडीचा तस्करी केला जात असल्याचा प्रकार समोर आलाय. बिबट्याची कातडी विक्रीचा प्रयत्न करणाऱ्या या तिघांना अकोल्यातल्या अकोटमधून अटक करण्यात आलीये. पुणे कस्टम युनिटने बिबट कातडी विक्रीचा प्रकार उघडकीस आणला आहे. आतापर्यंत बिबट्याची शिकार करून कातडी विक्री करणाऱ्या तिघांना गजाआड करण्यात आले आहे. अटकेमध्ये दोन वाहक आणि एक मध्यस्थाचा यामध्ये समावेश आहे.
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आरोपींच्या ताब्यातून एक बिबट्याची कातडी जप्त केलीय. विशेष म्हणजे बिबट कातडी विक्रीचा संपूर्ण व्यवहार साधूचा वेशात चालत होता. दरम्यान, आशिष सिकची, नंदकिशोर सिकची आणि राजकुमार सिकची असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे. यातील एक आरोपी हा बाहेरील राज्यातील असल्याचेही तपासात पुढे आले आहे. सध्या या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.
पुणे विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला पर्दाफाश
विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे, राजस्व गुप्तचर संचालनालय (DRI), पुणे विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याच्या कातडीचा अवैध व्यापार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या व्यक्तींना अकोट, जिल्हा अकोला, महाराष्ट्रातील जंगल भागात पाठलाग करून पकडले. या कारवाईदरम्यान, तीन व्यक्तींना ज्यामध्ये दोन वाहक आणि एका मध्यस्थाला ताब्यात घेण्यात आले. तपासणीदरम्यान, त्यांच्या ताब्यातून ८०.५ इंच x २५ इंच आकाराची बिबट्याची कातडी जप्त करण्यात आलीय. बिबट्या हा वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ च्या अनुसूची I मध्ये समाविष्ट आहे. आणि त्याच्या कातडीचा व्यापार, खरेदी, विक्री किंवा ताबा कठोरपणे प्रतिबंधित आहे. जप्त करण्यात आलेली कातडी आणि ताब्यात घेतलेले तिन्ही आरोपी पुढील तपासासाठी अकोला जिल्हा वनविभागाकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.
समृद्धी मार्गावरून डिझेलची तस्करी ; आठ लाखाचा मुद्देमाल जप्त
वर्ध्यात अवैध डिझेल चोरट्या मार्गाने तस्करी करण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. समृद्धी महामार्गाने अवैध डिझेल वाहतुकीवर वर्ध्याच्या येळकळी येथे पोलिसांनी कारवाई केली आहे. यात 18 प्लास्टिक डबक्यामध्ये आयशर ट्रकने वाहून नेले जात असलेले डिझेल पोलिसांनी समृद्धी मार्गावर पकडले. पोलीस गस्तीवर असताना चालकविना उभा असलेला ट्रक रस्त्याच्या कडेला दिसला. पोलिसांनी पाहणी केली असता अवैध डिझेल आढळून आले आहेय. पोलिसांनी आठ लाख सहसष्ठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून याप्रकरणी सिंदी रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र के सोलापुर में सोमवार को गुइलेन-बैरे सिंड्रोम (GBS) के 9 और केस सामने आए। अब एक्टिव मरीजों की संख्या बढ़कर 110 हो गई है। स्वास्थ्य विभाग के मुताबिक इन मरीजों में 73 पुरुष और 37 महिलाएं हैं, जबकि 17 मरीज वेंटिलेटर सपोर्ट पर हैं।
इससे पहले 26 जनवरी को सोलापुर के रहने वाले 40 साल के शख्स की मौत इसी GB सिंड्रोम के कारण हुई थी, इसकी पुष्टि राज्य के स्वास्थ्य मंत्री प्रकाश अबितकर ने भी की।
सोलापुर सरकारी मेडिकल कॉलेज के डीन डॉ. संजीव ठाकुर के मुताबिक मरीज को सांस फूलने, निचले अंगों में कमजोरी और दस्त जैसे लक्षण थे। उसे 18 जनवरी से लगातार वेंटिलेटर सपोर्ट पर था।
डीन ने बताया कि मौत के कारणों का पता लगाने के लिए क्लिनिकल पोस्टमार्टम किया गया। जिसमें वजह GB सिंड्रोम बताई गई। जांच के लिए ब्लड सैंपल नेशनल इंस्टीट्यूट ऑफ वायरोलॉजी (NIV) भेजा गया है।
शहर के अलग-अलग हिस्सों से 34 वाटर सैंपल भी कैमिकल और बायोलॉजिक एनालिसिस के लिए पब्लिक हेल्थ लैब भेजे गए। इनमें से सात सैंपल में पानी के दूषित होने की सूचना मिली है।
गौरतलब है कि पुणे में 9 जनवरी को अस्पताल में भर्ती मरीज GBS पॉजिटिव आया था, यह पहला केस था। 19 दिन में एक्टिव केस बढ़ गए हैं।
राज्य सरकार ने 2 काम किए
पुणे नगर निगम ने कमला नेहरू अस्पताल में 45 बिस्तरों का स्पेशल वार्ड बनाया है।
यहां भर्ती होने वाले सभी मरीजों का इलाज पूरी तरह मुफ्त होगा।
जीबी सिंड्रोम- 6 जरूरी सवाल और उनके जवाब
जीबी सिंड्रोम क्या होता है- यह दुर्लभ ऑटोइम्यून स्थिति है। इसमें प्रतिरक्षा प्रणाली मस्तिष्क व रीढ़ की हड्डी से निकलकर शरीर के बाकी हिस्सों में फैली हुई नसों पर हमला करती है।
इसके लक्षण क्या होते हैं- इसमें सुन्नता, झुनझुनी, दस्त, मांसपेशियों में कमजोरी जैसे लक्षण होते हैं, जो पक्षाघात (मस्तिष्क में रक्त प्रवाह कम होना) तक बढ़ सकते हैं। हर 3 में से एक पीड़ित को सांस लेने में मुश्किल होती है। बोलने और निगलने में कठिनाई। आंखों को हिलाने में दिक्कत होती हैं।
लक्षण कब दिखते हैं- 70% लोगों में लक्षण 1 से 6 सप्ताह में दिखने शुरू हो गए थे। कुछ में चंद घंटों में दिखते हैं।
किन्हें ज्यादा खतरा है- जीबी सिंड्रोम किसी भी उम्र में हो सकता है, पर यह आमतौर पर 30 से 50 वर्ष के बीच के लोगों को ज्यादा प्रभावित करता है।
कितना खतरनाक है- इसमें जीवन प्रत्याशा सामान्य होती है। 2% से भी कम लाेगाें की जान जाती है। ज्यादातर लोग लक्षण शुरू होने के दो से तीन हफ्ते में ठीक होने लगते हैं। ज्यादा गंभीर केस में कई महीने से लेकर एक साल या उससे ज्यादा समय भी लग सकता है।
बचाव का क्या तरीका है- हाथ बार-बार धोएं। उन लोगों से दूर रहें, जिन्हें फ्लू या अन्य संक्रमण हो। स्वस्थ आहार लें। नियमित व्यायाम करें। टेबल, काउंटरटॉप, खिलौने, दरवाजे के हैंडल, फोन व बाथरूम के सामान आदि को साफ रखें।
स्वास्थ्य विभाग ने 35 हजार से ज्यादा घरों की जांच की सोलापुर में स्वास्थ्य विभाग की टीमें मरीजों की जांच के लिए सर्वे कर रही हैं। अब तक कुल 35,068 घरों का सर्वे किया जा चुका है। इनमें पुणे नगर निगम के 23,017 घर, पिंपरी-चिंचवाड़ नगर निगम के 4,441 घर और ग्रामीण क्षेत्रों के 7610 घर शामिल हैं।
स्वास्थ्य मंत्री प्रकाश अबितकर ने भी खुलासा किया कि GB सिंड्रोम के 80% मामले सिंहगढ़ रोड पर नांदेड़ गांव में एक बड़े कुएं के आसपास के इलाकों से रिपोर्ट किए गए हैं।
NIV को 44 स्टूल सैंपल भेजे गए हैं। सभी का एंटरिक वायरस पैनल टेस्ट किया गया। इनमें से 14 नोरोवायरस पॉजिटिव और 5 कैम्पिलोबैक्टर पॉजिटिव हैं। कैम्पिलोबैक्टर जेजुनी बैक्टीरिया, जो आमतौर पर पेट में संक्रमण का कारण बनता है, GBS रोग को ट्रिगर करता है। इस बैक्टीरिया से दूषित पानी पीने से नर्व डिसऑर्डर का खतरा बढ़ सकता है।
इसके अलावा NIV को 59 ब्लड सैंपल भी जांच के लिए भेजे गए थे। ये सभी जीका, डेंगू, चिकनगुनिया नेगेटिव मिले।
महाराष्ट्र सरकार की मदद करने केंद्र ने भेजी टीम GBS के बढ़ते मामलों को लेकर केंद्र सरकार ने महाराष्ट्र सरकार की मदद के लिए हाई लेवल स्पेशलिस्ट टीम भेजी है। स्वास्थ मंत्रालय की इस 7 सदस्यों वाली टीम में टीम में राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (एनसीडीसी) दिल्ली, निमहंस बेंगलुरु, स्वास्थ्य एवं परिवार कल्याण के क्षेत्रीय कार्यालय और राष्ट्रीय विषाणु विज्ञान संस्थान (एनआईवी), पुणे के विशेषज्ञ शामिल हैं।
हालांकि राज्य सरकार ने भी GB सिंड्रोम से बचने के लिए लोगों को सलाह दी है कि वे उबला हुआ पानी पिएं। ठंडा खाना खाने से बचें।
इलाज भी महंगा, एक इंजेक्शन की कीमत 20 हजार GBS का इलाज भी महंगा है। डॉक्टरों के मुताबिक मरीजों को आमतौर पर इम्युनोग्लोबुलिन (IVIG) इंजेक्शन लगवाना पड़ता है। निजी अस्पताल में एक इंजेक्शन की कीमत 20 हजार रुपए है। पुणे के अस्पताल में भर्ती 68 साल के मरीज के परिजन ने बताया कि इलाज के दौरान पेशेंट को 13 इंजेक्शन लगाने पड़े थे।
डॉक्टरों ने मुताबिक GBS की चपेट में आए 80% मरीज अस्पताल से छुट्टी के बाद 6 महीने में बिना किसी सपोर्ट के चलने-फिरने लगते हैं। लेकिन कई मामलों में मरीज को एक साल या उससे ज्यादा समय भी लग जाता है।
…………………………………………
वायरस से जुड़ी ये खबर भी पढ़ें…
HMPV वायरस से अस्थमा, डायबिटीज, हाइपरटेंशन के मरीजों को खतरा ज्यादा, कैसे रखें ख्याल
HMPV इन्फेक्शन के लक्षण कोरोना वायरस से मेल खाते हैं। इसके कारण हो रहे कॉम्प्लिकेशन भी कमोबेश कोरोना वायरस से हुए कॉम्प्लिकेशन जैसे ही हैं। HMPV वायरस का गंभीर संक्रमण होने पर निमोनिया और ब्रोंकाइटिस विकसित होने का जोखिम होता है। छोटे बच्चों को सबसे ज्यादा खतरा होता है। पूरी खबर पढ़ें…