धक्कादायक! अमरावतीच्या गोल्डन फायबर कंपनीत विषबाधा; शेकडो कामगारांची प्रकृती बघडली

धक्कादायक! अमरावतीच्या गोल्डन फायबर कंपनीत विषबाधा; शेकडो कामगारांची प्रकृती बघडली


Food Poisoning : अमरावतीच्या (Amravati News)  नांदगाव पेठ MIDC मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील गोल्डन फायबर कंपनीत 100 पेक्षा अधिकच्या कामगारांना अचानक विषबाधा झाल्याची माहिती पुढे आली आहे. अन्न किंवा पाण्यातून विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यात अनेक महिलांना उलट्यांचा त्रास होत असल्याचे निदर्शनात आले आहे. घटनेची माहिती मिळताच यातील रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मात्र ही विषबाधा नेमकी कशी आणि कशातून झाली हे अद्याप कळू शकलेले नसले तरी त्या दिशेने तपास सुरू आहे.

 दरम्यान, अशीच एक संतापजनक घटना अमरावतीत घडली आहे. यात  बिस्किट पुड्यात चक्क अळ्या आढळल्याचा प्रकार घडला आहे. नारायण कराडे यांच्या घरी हा प्रकार घडला आहे. नारायण कराडे यांनी  दुपारी शहरातील डी मार्ट मॉलमधून अनेक वस्तू खरेदी केल्या होत्या. यासोबतच बिस्कीटांची देखील खरेदी केली होती. मात्र, घरी आल्यानंतर बिस्किट उघडताच त्यातून अळ्या बाहेर पडल्याचे प्रकार घडला. यामुळं ग्राहकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या विरुद्ध कारवाईची मागणी आता नारायण कराडे यांनी केली आहे. 

अन्न व औषधी प्रशासन या गंभीर विषयाची दखल घेणार का?

बिस्किटात अळ्या निघाल्याने नारायण कराडे आक्रमक झाले आहेत. त्यांनी या प्रकरणी कारवाई करण्याची मागमी देखील केली आहे. त्यामुळं आता त्यांच्या या मागणीवर अन्न व औषधी प्रशासन या गंभीर विषयाची दखल घेणार का याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. 

अनेकवेळा शालेय पोषण आहारातही अळ्या निघाल्याचा प्रकार 

शालेय विद्यार्थ्यांना शाळेसोबत शिक्षणाची गोडी लागावी यासाठी शालेय पोषण आहार योजना सुरु करण्यात आली आहे. मात्र या योजनेसाठी पुरवठा केला जाणार आहारातील माल निकृष्ठ दर्जाचा पुरवठा होत असल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात असल्याचा सवाल उपस्थित केला गेला आहे. शाळेत शालेय पोषण आहारासाठी या अगोदर अळ्या, किडे,  पाल पडल्याने विषबाधा झाल्याचे अनेक प्रकार समोर आले आहे. अशा प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी देखील होत आहे. शाळेत निकृष्ट दर्जाचं शालेय पोषण आहार देणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, आता मॉलमध्ये मिळणाऱ्या मालात देखील अळ्या निघाल्याचा प्रकार समोर आल्यानं संताप व्यक्त केला जात आहे. 

हे ही वाचा 

अधिक पाहा..



Source link

मेळघाटातील ‘त्या’ चौघी पंधरा दिवसांच्या रजेवर; वनअधिकाऱ्यांकडून हत्तींना विशेष रजा मंजूर 

मेळघाटातील ‘त्या’ चौघी पंधरा दिवसांच्या रजेवर; वनअधिकाऱ्यांकडून हत्तींना विशेष रजा मंजूर 


अमरावती: मेळघाट व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत कोलकास येथील हत्ती पंधरा दिवसांच्या रजेवर गेले आहेत. विशेष म्हणजे वनअधिकाऱ्यांनी त्यांची ही रजा मंजूर केली आहे. 10 ते 25 जानेवारी दरम्यान मेळघाटातील हे हत्ती पंधरा दिवसांच्या रजेवर गेले आहेत. हत्ती सफारी अंतर्गत पर्यटकांच्या सेवेत राबणाऱ्या सुंदरमाला, चंपाकली, लक्ष्मी आणि जयश्री या हत्तिणींना ही पंधरा दिवसांची विशेष रजा मंजूर करण्यात आल्यामुळे 15 दिवस पर्यटकांना मेळघाटात हत्ती सफारी बंद राहणार आहे. रजेवरील हत्तिणी 26 जानेवारीला कामावर परतणार आहेत. यामुळे 26 जानेवारीपासून हत्ती सफारी पूर्ववत सुरू होणार आहे.

रजा कालावधीत हत्तिणींच्या पायांचे चोपिंग केले जाते. त्यांच्या थकलेल्या पायांची शुश्रूषा केली जाते. गरम पाणी, तेल आणि वेगवेगळ्या वनौषधींचा वापर करून या हत्तिणींचे पाय शेकले जातात. हत्तिणींचे पाय मजबूत आणि निरोगी राहण्याकरिता त्यांच्या पायांना पडलेल्या भेगा भरून काढण्याकरिता सतत 15 दिवस त्यांचे पाय चोपिंग अंतर्गत शेकले जातात. आरोग्यवर्धक, शक्तिवर्धक आहार त्यांना दिला जातो. काम करताना, राबताना थकलेल्या पायांना पडलेल्या भेगा भरून काढण्याकरिता, पाय मजबूत आणि निरोगी ठेवण्याकरिता ही शुश्रूषा केली जाते.

मद्यप्राशन करून वाघिणीचे केलेत पाच तुकडे

रानटी डुकरांची शिकार करण्याकरिता 11 हजार केव्हीच्या विद्युत तारांवर आकोडा टाकला मात्र, त्यात तीन वर्षीय सुमारे दीडशे किलो वजनाची वाघीण अडकली आणि तिचा तडफडून मृत्यू झाला. तारांमध्ये फसून शिकार झाल्यानं अकरा केव्हीच्या तरांवरील विद्युत प्रवाह खंडित झाला. शिकारी जेव्हा घटनास्थळावर पोहोचले तेव्हा तिथं भलीमोठी वाघीण फासात अडकून मृत पावल्याचं लक्षात येताचं आरोपींची भंभेरी उडाली आणि त्यांनी मद्यप्राशन करून वाघिणीची विल्हेवाट लावण्याकरिता तिचे अक्षरश: चार नव्हे तर पाच तुकडे केलेत. 

आरोपींनी दिली घटनेची कबुली

यानंतर प्लास्टिक बोरीत वाघिणीचे तुकडे भरून ते सायकलवर ठेवून दोन फेऱ्यांमध्ये तिची जंगल परिसरातील तलावाशेजारी फेकून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केल्याची कबुली आरोपींनी मेमोरेंडम पंचनाम्यात कबुली दिलीय. घटना उघडकीस आल्यानंतर वनविभागानं राजू वरखडे, दुर्गेश लसुंते, राजेंद्र कुंजाम या तिन्ही आरोपींना ताब्यात घेतलेत. त्यांचा मेमोरेंडम पंचनामा केला, यावेळी त्यांनी या घटनेची कबुली दिली. सोबतच शेत तलावाच्या पाण्यात पुरविण्यात आलेले विद्युत सापळ्याचे साहित्य, अवजार आणि शिकारीचं संपूर्ण साहित्य आणि त्यात वापरण्यात आलेली सायकल वन विभागाच्या ताब्यात दिली. हे तिन्ही आरोपींना न्यायालयानं 13 जानेवारीपर्यंत वन कोठडी सुनावली असून आरोपींनी केलेल्या जुन्या शिकरींची माहिती मिळविण्याचा वन विभाग प्रयत्न करीत आहे.

हे ही वाचा 

अधिक पाहा..



Source link

धक्कादायक! डी मार्टमधून आणलेल्या बिस्किट पुड्यातच निघाल्या अळ्या, ग्राहक आक्रमक, कारवाईची मागणी

धक्कादायक! डी मार्टमधून आणलेल्या बिस्किट पुड्यातच निघाल्या अळ्या, ग्राहक आक्रमक, कारवाईची मागणी


Amravati News : अमरावतीत बिस्किट पुड्यात चक्क अळ्या आढळल्याचा प्रकार घडला आहे. नारायण कराडे यांच्या घरी हा प्रकार घडला आहे. नारायण कराडे यांनी  दुपारी शहरातील डी मार्ट मॉलमधून अनेक वस्तू खरेदी केल्या होत्या. यासोबतच बिस्कीटांची देखील खरेदी केली होती. मात्र, घरी आल्यानंतर बिस्किट उघडताच त्यातून अळ्या बाहेर पडल्याचे प्रकार घडला. यामुळं ग्राहकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या विरुद्ध कारवाईची मागणी आता नारायण कराडे यांनी केली आहे. 

अन्न व औषधी प्रशासन या गंभीर विषयाची दखल घेणार का?

बिस्किटात अळ्या निघाल्याने नारायण कराडे आक्रमक झाले आहेत. त्यांनी या प्रकरणी कारवाई करण्याची मागमी देखील केली आहे. त्यामुळं आता त्यांच्या या मागणीवर अन्न व औषधी प्रशासन या गंभीर विषयाची दखल घेणार का याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. 

अनेकवेळा शालेय पोषण आहारातही अळ्या निघाल्याचा प्रकार 

शालेय विद्यार्थ्यांना शाळेसोबत शिक्षणाची गोडी लागावी यासाठी शालेय पोषण आहार योजना सुरु करण्यात आली आहे. मात्र या योजनेसाठी पुरवठा केला जाणार आहारातील माल निकृष्ठ दर्जाचा पुरवठा होत असल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात असल्याचा सवाल उपस्थित केला गेला आहे. शाळेत शालेय पोषण आहारासाठी या अगोदर अळ्या, किडे,  पाल पडल्याने विषबाधा झाल्याचे अनेक प्रकार समोर आले आहे. अशा प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी देखील होत आहे. शाळेत निकृष्ट दर्जाचं शालेय पोषण आहार देणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, आता मॉलमध्ये मिळणाऱ्या मालात देखील अळ्या निघाल्याचा प्रकार समोर आल्यानं संताप व्यक्त केला जात आहे. 

महत्वाच्या बातम्या:

पोषण आहार विद्यार्थ्यांच्या जीवावर उठलाय का? प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेतील चॉकलेटमध्ये पुन्हा आढळल्या अळ्या, पालक संतप्त

अधिक पाहा..



Source link

जात पंचायतींचा कहर सुरूच, दीड वर्षापासून कुटुंब बहिष्कृत; अमरावतीत दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जात पंचायतींचा कहर सुरूच, दीड वर्षापासून कुटुंब बहिष्कृत; अमरावतीत दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल


अमरावती : पुरोगामी महाराष्ट्रात जातपंचायती अजूनही जिवंत असल्याचं उदाहरण अमरावतीत पाहायला मिळालं. जातपंचायतीमुळे एका कुटुंबाला समाजापासून बहिष्कृत करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. बहिष्कृत झालेल्या युवकाचं त्याच्याच जातीतील मुलीशी प्रेम झाले. लग्नाला नकार दिल्याने त्या मुलीने अमरावती येथील जात पंचायतेकडे तत्कार केली आणि पंचायतीने करण चव्हाण याच्या कुटुंबाला बहिष्कृत केलं असं पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.

जात पंचायत प्रमुखासह 10 व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल

अमरावती शहरातील गाडी लोहार समाजाच्या जातपंचायतीने करण चव्हाण यांच्या कुटुंबाला समाजातून बहिष्कृत केलं. तब्बल दीड वर्षापासून हे कुटुंब समाजापासून बहिष्कृत राहिलं. समाजातील कुठल्याही प्रसंगात या कुटुंबाला स्थान देण्यात आलं नाही. या विरोधात महिलेने गाडगे नगर पोलीस स्टेशन गाठून तेथे तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेची चौकशी करून जात पंचायत प्रमुखासह 10 व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केलाय.

इमारतीच्या टेरेसवर व्यसन करण्यास अटकाव; दोघा भावांना मारहाण

इमारतीच्या टेरेसवर मित्रांना घेऊन मद्यपान आणि धूमपान करणाऱ्या भावांना विरोध करणाऱ्या इमारतीच्या सेक्रेटरीला आणि त्याच्या भावाला टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. उल्हासनगर कॅम्प 1 मधील बेवस चौक येथे खेमदास अपार्टमेंट आहे. या इमारतीच्या 301 क्रमांकाच्या सदनिकेत संतोष चव्हाण हे राहतात. त्यांची मुलं शुभम चव्हाण आणि श्रेयस चव्हाण हे त्यांच्या मित्रांना घेऊन येऊन इमारतीच्या टेरेसवर धिंगाणा घालत धूम्रपान आणि मद्यपान करतात, असा इमारतीच्या रहिवाशांचा आरोप आहे. त्यामुळे इमारतीचे सेक्रेटरी पवन सेवानी आणि इतर सदस्य हे चव्हाण कुटुंबाकडे टेरेसची चावी मागण्यासाठी गेले. तेव्हा शुभम चव्हाण याने आम्ही चावी देणार नाही, ही बिल्डिंग कोणाच्या बापाची नाही, काय करायचे ते करून घ्या अशी भाषा वापरली. 

त्यानंतर झालेल्या वादात संतोष चव्हाण, शुभम चव्हाण, श्रेयस चव्हाण यांनी पवन सेवानी यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्या कपाळावर धारदार शस्त्राने मारून त्यांना जखमी केले. तसेच भावाला वाचवायला गेलेल्या सनी सेवानी याच्या गालावरही धारदार वस्तूने वार केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पंकज त्रिलोकाणी यांनी जखमींना मदत केली आणि पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या घटनेनंतर उल्हासनगर पोलिसांनी सुभम चव्हाण, संतोष चव्हाण, श्रेयस चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मात्र या सर्व प्रकारामुळे इमारतीतील रहिवासी दहशतीच्या वातावरणात जगत आहेत. 

आणखी वाचा 

अधिक पाहा..



Source link

पंढरपूर कॉरिडॉरच्या प्रकल्पावरून महायुतीत घमासान? अमोल मिटकरींचा तीव्र विरोध; नेमकं कारण काय?  

पंढरपूर कॉरिडॉरच्या प्रकल्पावरून महायुतीत घमासान? अमोल मिटकरींचा तीव्र विरोध; नेमकं कारण काय?  


Pandharpur Corridor : राज्यातील महायुती सरकारच्या प्रस्तावित पंढरपूर कॉरिडॉर (Pandharpur Corridor) विकास प्रकल्पावरून सरकारमधील घटक पक्षांमध्येच मतभेदाची ठिणगी पडतांना दिसतीये. सरकारच्या प्रस्तावित ‘पंढरपूर कॉरिडॉर विकास प्रकल्पा’ला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी तीव्र विरोध दर्शवलाय. ‘पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्प’ करतांना होळकर वाडा, शिंदे सरकार वाडा, नामदेव पायरी यांसह अनेक मंदिरांना पाडावे लागणारेय. ही गोष्ट वारकऱ्यांच्या आस्थेची असल्याने आपला त्याला विरोध असल्याचं मिटकरी म्हणालेय. काशी, उज्जैन आणि वाराणसीच्या धर्तीवर पंढरपूरचा विकास करण्याचा सरकारचं धोरण आहेय. मात्र, पंढरपूर या देवस्थानांपेक्षा सर्वार्थाने वेगळे असल्याने तेथील विकासाची तुलना पंढरपूरशी करता येणार नसल्याचं मिटकरी म्हणालेय. 

पंढरपुरातील ऐतिहासिक आणि धार्मिक वास्तूंना हात न लागता विकास होणार असेल तर आपली त्याला हरकत नसेल. मात्र, पंढरपुरातील वारकऱ्यांची आस्था असलेल्या इंचभर दगडालाही हात लागला तर आम्ही ते सहन करणार नाहीय, असा इशारा यावेळी आमदार अमोल मिटकरी यांनी दिलाय.‌ 

अमोल मिटकरींचा तीव्र विरोध; नेमकं कारण काय?  

पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्प’ करतांना होळकर वाडा, शिंदे सरकार वाडा, नामदेव पायरी यांसह अनेक मंदिरांना पाडावे लागणारेय. ही गोष्ट वारकऱ्यांच्या आस्थेची असल्याने आपला त्याला विरोध आहे. काशी, उज्जैन आणि वाराणसीच्या धर्तीवर पंढरपूरचा विकास करण्याचा सरकारचं धोरण आहे. मात्र, पंढरपूर या देवस्थानांपेक्षा सर्वार्थाने वेगळे असल्याने तेथील विकासाची तुलना पंढरपूरशी करता येणार नाही. पंढरपुरातील ऐतिहासिक आणि धार्मिक वास्तूंना हात न लागता विकास होणार असेल तर आपली त्याला हरकत नसेल. मात्र, पंढरपुरातील वारकऱ्यांची आस्था असलेल्या इंचभर दगडालाही हात लागला तर आम्ही ते सहन करणार नाही, असा  इशारा अमोल मिटकरी यांनी दिला आहे. त्यामुळे या प्रकल्पाबाबत नेमकं काय होईल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.  

मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराचे दार चांदीने मढविण्याचे काम सुरू

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराचे जतन व संवर्धन करण्याचे काम सुरू असून या अंतर्गत संत नामदेव पायरीवरील पितळी दरवाजा चांदीचा बनविण्याचा ठराव मंदिर समितीच्या बैठकीमध्ये करण्यात आला होता. दरम्यान नांदेड येथील अरगुलकर परिवाराच्यावतीने सदर दरवाजास चांदी बसवून देण्यात येत आहे. यासाठी तीस किलो चांदी लागणार असून याची किंमत जवळपास तीस लाख रूपये आहे. शंकर व नरसिमलू या बंधूंनी आपले वडील स्व. दिगंबर तुकाराम अरगुलकर व आई स्व. जनाबाई यांच्या स्मरणार्थ हा दरवाजा चांदीचा केला आहे. अरगुलकर परिवार श्री विठ्ठल रूक्मिणीचे निस्सीम भक्त आहेत. त्यानुसार मागील आठ दिवसापासून सदर काम सुरू आहे. यामुळे येथून भाविकांना प्रवेश बंद ठेवण्यात आला आहे. येत्या आठ दिवसात सदर काम पूर्ण झाल्यानंतर मंदिराच्या प्रवेशद्वाराला मोठी झळाळी मिळणार आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

 

अधिक पाहा..



Source link

सुरेश धसांचा CDR काढा, हत्येच्या 2 दिवसांपूर्वी वाल्मिक कराडशी संपर्क; आ. मिटकरींचे गंभीर आरोप

सुरेश धसांचा CDR काढा, हत्येच्या 2 दिवसांपूर्वी वाल्मिक कराडशी संपर्क; आ. मिटकरींचे गंभीर आरोप


अकोला : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्णपणे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay munde) यांच्या पाठिशी असून धनंजय मुंडेंवरचे आरोप म्हणजे मस्साजोग प्रकरणातून लक्ष विचलित करण्यासाठी आहेत. सध्या मस्साजोग प्रकरणात राजकारण सुरु आहे, बीडच्या अनेकांना धनंजय मुंडेंचा राजकीय काटा काढायचा आहे. सुरेश धस त्यांच्या प्रांताध्यक्षांचही ऐकत नाहीत. संतोष देशमुखांच्या हत्येआधीच्या दोनदिवसांपर्यंत सुरेश धस वाल्मिक कराडच्या संपर्कात होते. त्यामुळे, धस यांचा सीडीआर काढला पाहिजे, सुरेश धस (Suresh Dhas) यांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी एबीपी माझाशी संवाद साधताना केली आहे. तसेच, सुरेश धस यांच्यासंदर्भातील अनेक प्रकरणाचे पुरावे योग्यवेळी आपण बाहेर काढणार आहोत. जानेवारी 2001 साली पाथर्डी तालुक्यातील एका गावात दरोडा, त्याच दरोड्याच्या म्होरक्याचे संबंध कोणासोबत होते हेही समोर आणणार असल्याचे मिटकरी यांनी म्हटले. 

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजप आमदार आणि सध्या संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन सातत्याने राज्याचे कॅबिनेटमंत्री धनंजय मुंडेंना लक्ष्य करणाऱ्या सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आमदार धस यांच्यावर खंडणी, हत्या, जमिनी बळकावणे यांच्यासारखे गंभीर गुन्हे दाखल असून इतिहासात सुरेश धस हेच आका आहेत, असे आरोप मिटकरी यांनी म्हटले. विशेष म्हणजे संतोष देशमुखांच्या हत्येआधी 2 दिवस सुरेश धस यांनीच वाल्मिक कराड यांच्यासोबत फोनवरुन संपर्क केला होता, असा आरोपही मिटकरी यांनी केला आहे.  

दरोडा टाकणारी दारासिंग उर्फ मारुती भोसले गँगच्या दरोडेखोरांच्या अंगावर सुरेश धस मित्रमंडळ असे टी शर्ट होते. ही भोसले गँग माझ्यासाठी कोणाचाही काटा काढू शकते, असा हा नेता कोण ते सगळ्यांना माहिती असल्याचे मिटकरी यांनी म्हटलं. आपणचं शहराचं वासेपूर करत दुसऱ्यांकडे बोट दाखवतोय. सुरेश धस यांनीच आष्टी, पाटोद्यासह बीडमध्येही हुकूमत तयार केली होती. इतिहासात तेच आका होते. मी त्यांच्यावर आरोप केले की मला थेट हत्येच्या धमक्या येत आहेत. पण, धस यांच्यावर खंडणी, हत्या, जमिनी बळकावणे आरोपांची यादी प्रचंड मोठी आहे. निवडणूक निकालानंतर पालकमंत्रीपद आपणास मिळेल असं धस यांना वाटलं होतं, पण ते मिळत नाही हे दिसत असल्याने धनंजय मुंडेंचा काटा काढण्याचं काम सुरू अहे, असेही मिटकरी यांनी म्हटलं. 

सुरेश धस यांचा बोलवता धनी कोण?

8 हिंदू 2 मुस्लिम देवस्थानांची 1421 कोटींची 485 एकर जमीन कोणी हडप केली, हे बीडकरांना माहिती आहे. देवस्थानांच्या जमिनी हडप करत असताना किती निष्पापांचे मुडदे आष्टीतील बंगल्यात गाडले गेले हेही माहिती आहे. देवस्थानांच्या जमिनी हडप प्रकणात विरोध करणाऱ्या राम खाडे सारख्या तरुणांचे किती हाल केले, हे बीडकरांना विचारा, असे म्हणत गंभीर आरोप मिटकरी यांनी केले आहेत. तसेच, संतोष देशमुखांच्या कुटुंबाला सुरेश धस हेच उचवकावत आहेत. सुरेश धस यांना वरिष्ठांनी सांगूनही त्यांची भाषा सुधारत नसेल तर त्यांचा बोलविता धनी कोण हेही शोधावं लागेल. जर सुरेश धस यांच्या जीभेचा पट्टा थांबला नाही तर आम्हीही अनेक प्रकरणं बाहेर काढू, असा इशाराही मिटकरी यांनी दिला आहे. 

मिटकरींच्या टीकेला महत्त्व देत नाही

दरम्यान, अमोल मिटकरींच्या आरोपांना मी महत्व देत नाही, अशी प्रतिक्रिया सुरेश धस यांनी दिली आहे. तसेच, यापूर्वीदेखील त्यांनी अमोल मिटकरींना सज्जड दम दिला होता. तू कोणाचाही नाद कर, पण माझा नाद करु नको, असे धस यांनी मिटकरींच्या टीकेवर प्रत्त्युत्तर देताना म्हटले होते. 

लक्ष्मण हाकेंचेही धस यांच्यावर गंभीर आरोप

प्रभू रामचंद्राचे नाव घेऊन तुम्ही महाराष्ट्र आणि देशभरात देवस्थानाची जमीन हडपली. शंभू महादेवाच्या देवस्थानाचा फ्रॉड केला, असा गंभीर आरोप ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केले आहेत. सत्तेत असलेल्या मंत्र्यावर एसीबीची धाड पडून त्याच्या PA कडे घबाड सापडलेले देशातील एकमेव नेते सुरेश धस असल्याचेही हाके यांनी म्हटलं आहे. तसेच, जरांगे आणि धस यांच्यात कोल्डवार सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलं. 

हेही वाचा

बारामतीचा नादच खुळा… AI च्या माध्यमातून ऊस शेती, सत्या नाडेलांकडून ATD चं कौतुक; शरद पवारांचं खास ट्विट

अधिक पाहा..



Source link

YouTube
Instagram
WhatsApp