ऐकलं तर ठीक नाही तर ‘हटा सावन की घटा’; शेतकरी, मेंढपाळांच्या आंदोलनातून बच्चू कडूंचा ‘प्रहार’  

ऐकलं तर ठीक नाही तर ‘हटा सावन की घटा’; शेतकरी, मेंढपाळांच्या आंदोलनातून बच्चू कडूंचा ‘प्रहार’  


अमरावती : मी भाषणात वारंवार म्हणतोय हिंदू शेतकरी, हिंदू मेंढपाळ. मी हे का बोलतोय कारण धर्माच्या नावाने काहीजण राजकारण करताय. एकीकडे शेतकरी मरतोय, दुसरीकडे मेंढपाळ मरतोय. राज्यात बगर मेहनतीच्या योजना सुरू केल्या. मात्र ज्यांना डोळे नाही, पाय नाही त्यांना चार महिन्यापासून पगार नाही. त्यामुळे अजितदादा कुठं गेला तुमचा वादा. अशा म्हणण्याची वेळ आली आहे. आज फक्त इशारा आहे. कायदा मोडून हात लावला तर उद्या हातात कायदा घेतल्या शिवाय राहणार नाही. असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे (Prahar Janshakti Party) अध्यक्ष बच्चू कडू (Bacchu Kadu)यांनी अमरावतीतील ‘वाडा आंदोलन सभेत बोलताना दिला आहे. अमरावतीत शेतकरी, मेंढपाळांच्या हक्कासाठी बच्चू कडूंच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. या आंदोलन सभेत बोलताना त्यांनी चौफेर फटकेबाजी करत सरकारवर निशाणा साधला आहे.

हम रुकने वाली नही, चलने वाली औलाद है- बच्चू कडू

चारा आहे पण हात लावू देणार नाही हा कसला कायदा आहे. बटेंगे को कंटेंगे म्हणताय, तर मग मेंढपाळ पण कटणार ना? आता जर कर्ज भरलं नाही तर पुढच्या वर्षी कर्ज भेटणार नाही, कृषिमंत्री म्हणाले की आर्थिक परिस्थिती चंगली नाही.  त्यामुळे चार पाच महिने कर्जमाफी होणार नाही. मग बोंबले कशाला. जेवायला बोलवायचं आणि पळून जायचं. मात्र हम रुकने वाले औलाद नही, चलने वाले औलाद है, न्याय हक्कासाठी मेलो तरी चालेल. असा निर्धारही  बच्चू कडूंनी यावेळी बोलताना केला आहे.  

आज आम्ही शांततेत आहोत, ऐकलं तर ठीक नाहीतर पुढच्या वेळी हटा सावन की घटा. आम्ही शांततेतच आंदोलन करणार आहोत. जो आमच्यात आडवं येईल त्याला दाखवू. पुढच्या वेळीस इथं आल्यावर पुन्हा जाणार नाही. मी विभागीय कार्यालयात आत जाऊन येतो, जर ऐकलं तर ठीक नाहीतर आत घुसू. असा इशाराही बच्चू कडू (Bacchu Kadu)यांनी अमरावतीतील ‘वाडा आंदोलन सभेत बोलताना दिला आहे.

पराभूत झाल्यानंतर बच्चू कडूंचं पहिलं मोठं आंदोलन

शेतमालाचा भाव, पीक कर्ज, मेंढपाळांना न्याय देण्यासाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केलं जातंय. आंदोलनाची सुरुवात पंचवटी चौकातील संत गाडगेबाबा समाधी मंदिरवरून दर्शन घेऊन मोर्चा निघाला. मोर्चा पंचवटी चौक वरून गर्ल्स हायस्कुल चौक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून थेट विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकनार.

काही दिवसांपूर्वी बच्चू कडू यांनी राज्य शासनाला शेतकरी आणि मेंढपाळ यांच्या काही मागण्यांसंदर्भात अल्टीमेटम दिला होता. मात्र, शासनाने दोघांच्याही मागण्यांकडे पाठ फिरवल्याने अखेर शेतकरी आणि मेंढपाळ यांना सोबत घेऊन बच्चू कडू हे अमरावतीत विभागीय आयुक्त कार्यालयासमोर “वाडा आंदोलन” करणार आहेत. राज्यातील मेंढपाळ आपल्या न्याय मागणीकरिता सरकारचे उंबरठे झिजवित असताना त्यांच्या मागण्यांच्या संबधात मुख्यमंत्री कुठलेही ठोस पाऊल उचलत नाहीत.

शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहीजे, वण्यप्राण्यांपासून त्याच्या पिकाचे संरक्षण झाले पाहीजे, त्याला पीक नुकसानीचे पिक विम्याव्दारे भरपाई मिळणे गरजेचे आहे, राज्य सरकारने विधानसभा निवडणूकीच्या काळात घोषीत केलेली सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांना तातडीने मिळावी, चराईकरिता परराज्यातून येणाऱ्या मेंढपाळांवर बंदी घालण्यात यावी, अश्या अनेक मागण्या यावेळी वाडा आंदोलनातून करण्यात येत आहे.

हे ही वाचा 

अधिक पाहा..



Source link

Akola : भाजप आमदार हरीश पिंपळेंचा रौद्रावतार; विमा कंपनीच्या अधिकार्‍यांना डांबलं विश्रामगृहात

Akola : भाजप आमदार हरीश पिंपळेंचा रौद्रावतार; विमा कंपनीच्या अधिकार्‍यांना डांबलं विश्रामगृहात


Akola News अकोला :  अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुरमध्ये भाजप आमदार हरीश पिंपळे यांचा रौद्रावतार बघायला मिळाला आहे. आमदार पिंपळे यांनी विमा कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांना चक्क मुर्तीजापुर येथील शासकीय विश्रामगृहाच्या खोलीत डांबलं असल्याचे पुढे आले आहे. विमा कंपनीच्या हलगर्जीपणामुळे 2023 मधील 530 शेतकऱ्यांना पंतप्रधान कृषी विमा योजनेचा (Pradhan Mantri Krishi Bima Yojana) लाभ मिळाला नाही. त्याच्याच रागातून आमदार पिंपळे (Harish Pimple) यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विश्रामगृहाच्या खोलीत डांबलंय.

परिणामी, शेतकर्‍यांना न्याय मिळेपर्यंत अधिकाऱ्यांना खोलीतून बाहेर काढणार नसल्याचा आमदार पिंपळे यांचा निर्धार केला आहे. या प्रकरणानंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण तयार झाले होते. त्यानंतर घटनास्थळावर पोलीस आणि महसूल अधिकारी दाखल झाले असता हे प्रकरण काहीसे शांत झाले आहे. 

बारदाने नसल्याने 8 दिवसांपासून शेतकरी ताटकळत

 दुसरीकडे, नाफेडच्या खरेदी केंद्रावर बारदाने (पोते) नसल्याने गेल्या आठ ते दहा दिवसापासून शेतकऱ्यांना कडाक्याच्या थंडीत रात्र जागून काढत सोयाबिनची रखवाली करावी लागत आहे. नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथील नाफेडच्या सोयाबीन खरेदी केंद्रावरील हे चित्र आहे. हदगाव येथील नाफेडच्या खरेदी केंद्रावर तालुक्यातील शेतकर्‍यांनी सोयाबीन विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी केली. विक्रीची तारीख कळल्यानंतर शेतकऱ्यांनी इथे सोयाबीन विक्रीसाठी आणले. काही शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी झाल्यानंतर मात्र बारदाने अर्थात पोते संपल्याचे कारण दाखवून खरेदी बंद करण्यात आली. 

दरम्यान, शेतकर्‍यांनी ओरड केल्यानंतर त्यांना स्वत: बारदाने आणा नाफेडकडून बारदाने आल्यास तुम्हाला बारदाने परत करू, असे सांगण्यात आले. पण एका बारदाण्याची किंमत ही 46 रुपये इतकी आहे. त्याचा भुर्दंड शेतकर्‍यांना बसतोय. बारदाने संपल्याने अनेक शेतकरी आठ ते दहा दिवसापासून रांगेत ताटकळत आहेत. एक दिवसाचा थांबण्याचा किराया ट्रॅक्टर मालक दीड ते हजार रुपये आकारत असल्याने त्याचा नाहक भुर्दंड बसत आहे. रात्री सोयाबीन चोरीला जाऊ नये म्हणून त्यांना कडाक्याच्या थंडीत रात्री आपल्या ट्रॅक्टर जवळ झोपावे लागत आहे. 

पीएम किसानचे पैसे कधी येणार?

पीएम किसान योजनेचा 18 वा हप्ता महाराष्ट्रातील निवडणुकीपूर्वी जारी करण्यात आला होता. हप्ता जाहीर होऊन जवळपास तीन महिने होत आहेत. 19 व्या हप्त्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.  केंद्र सरकार पुढील महिन्यात फेब्रुवारीमध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता जारी करू शकते. मात्र, सरकारने हप्त्याचे पैसे हस्तांतरित करण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला प्रथम अर्ज भरावा लागेल. अर्ज करताना काही चूक झाली तर त्याचा लाभ मिळणार नाही. दुसरे म्हणजे, बँक खात्याचा तपशील बरोबर असावा. तिसरे, तुमचा मोबाईल बँक खात्याशी जोडलेला असावा. यामध्ये काही त्रुटी राहिल्यास तुमचा हप्ता अडकू शकतो.

इतर महत्वाच्या बातम्या 

 

अधिक पाहा..



Source link

सोमनाथच्या मृत्यूनंतर पोलि‍सांकडून 50 लाख अन् नोकरीचं आमिष; सूर्यवंशी कुटुंबियांच्या गौप्यस्फोट

सोमनाथच्या मृत्यूनंतर पोलि‍सांकडून 50 लाख अन् नोकरीचं आमिष; सूर्यवंशी कुटुंबियांच्या गौप्यस्फोट


अकोला: परभणी दंगलीत (Parbhani Violence) न्यायालयीन कोठडीत मरण पावलेल्या सोमनाथ सूर्यवंशींचे (Somnath Suryawanshi) कुटुंबीय वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या भेटीला अकोल्यात आले आहे. अकोल्यातील कृषीनगर भागातल्या यशवंत भवन या निवासस्थानी सूर्यवंशी कुटुंबियांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. सोमनाथ सूर्यवंशी यांची आई, भाऊ, काका आणि मावशी यांनी ही भेट घेतली आहे. आई विजयाबाई व्यंकट सुर्यवंशी, भाऊ प्रेमनाथ सुर्यवंशी, मावशी तेजश्री दिगंबर विटकर, मावसा दिगंबर यलप्पा विटकर यांचा यात समावेश आहे. 

सोमनाथच्या मृत्यूनंतर पोलिसांकडून 50 लाख अन् नोकरीचं आमिष

या भेटी दरम्यान, सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांनी प्रकाश आंबेडकरांच्या भेटीत खळबळजनक‌ गौप्यस्फोट केला आहे.‌ सोमनाथच्या मृत्यूनंतर पोलिसांनी 50 लाख आणि नोकरीचा आमिष दिल्याचा सोमनाथ सूर्यवंशीचा भाऊ प्रेमनाथने हा खळबळजनक‌ आरोप केला आहे. सोमनाथच्या मृत्यूनंतर आपल्याला गप्प बसण्याचा पोलिसांनी सल्ला दिला होता, असा सोमनाथच्या भावाचा आंबेडकरांशी बोलताना दावा आहे. सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांच्या दाव्यानंतर प्रकरणातील नवीन तथ्य समोर आले आहे.

प्रकाश आंबेडकरच आपल्याला न्याय मिळवून देतील

सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूनंतर आतापर्यंत झालेल्या सर्व घडामोडींवर सोमनाथच्या कुटुंबियांनी प्रकाश आंबेडकरांशी चर्चा केली. राज्यात संतोष देशमुख यांनी सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूवरून राजकारण तापलेले असताना सूर्यवंशी कुटुंबीयांनी आंबेडकरांची भेट घेतली. या आधी आंबेडकरांनी परभणीत सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची आत्तापर्यंत राहुल गांधींसह राज्यातील अनेक मोठ्या नेत्यांनी घेतली भेट. दरम्यान, प्रकाश आंबेडकरच आपल्याला न्याय मिळवून देतील अशी सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना आशा आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

परभणीमध्ये मंगळवारी 10 डिसेंबरला स्टेशन रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करून विटंबना करण्यात आली. या विटंबनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी बुधवारी 11 डिसेंबर रोजी परभणी जिल्हा बंदची हाक दिली होती. या बंददरम्यान परभणीत जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या. त्यानंतर परभणी पोलिसांनी कोंबिग ऑपरेशन राबवत गुन्हे दाखल केले आणि त्यांना अटक केली.

अटक केलेल्यांपैकी सोमनाथ सूर्यवंशी या 35 वर्षीय तरूणाचा रविवारी सकाळी न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. सोमनाथ सूर्यवंशीच्या शरीरावर अनेक जखमा असल्याने सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पोलिसांच्या अमानुष मारहाणीमुळेच सोमनाथचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जात असून सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूस जबाबदार धरून परभणी एलसीबीचे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने बडतर्फ करण्याची मागणी आंबेडकरी अनुयायांनी केली होती.

हे ही वाचा 

अधिक पाहा..



Source link

महायुतीत दरी निर्माण झाली तर त्याला आमदार सुरेश धसच जबाबदार राहतील; अमोल मिटकरींचा हल्लाबोल

महायुतीत दरी निर्माण झाली तर त्याला आमदार सुरेश धसच जबाबदार राहतील; अमोल मिटकरींचा हल्लाबोल


अकोला: महायुतीत दरी निर्माण झाली तर त्याला भाजप आमदार सुरेश धसच जबाबदार राहतील, असं विधान अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे (Ajit Pawar NCP) आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केलंय. मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यावरही सुरेश धस कसे बोलतायेत?, असा सवालही त्यांनी यावेळी केलाय. अमोल मिटकरी(Amol Mitkari) यांनी कालच्या परभणीतल्या मोर्चातील सुरेश धस यांच्या भाषणावरही टीका केलीय. अजित पवारांवरची टीका आम्ही सहन करणार नसल्याचा इशारा त्यांनी यावेळी सुरेश धसांना दिलाय.

विरोधक धनंजय मुंडे यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करताय- अमोल मिटकरी

दरम्यान मस्साजोग प्रकरणात संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केलीय. सुरेश धसांना आता मुख्यमंत्र्यांनीच आवर घालावा, अशी मागणी त्यांनी केलीये. तर या प्रकरणात संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांऐवजी विरोधक धनंजय मुंडे यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करीत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. दरम्यान, आपल्याला सुरेश धसांच्या कार्यकर्त्यांकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचा गंभीर आरोप यावेळी अमोल मिटकरी यांनी केलाय.

देवेंद्र फडणवीसजी (Devendra Fadnavis) आपल्या पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी काल परभणी मधील मुक मोर्चात ‘क्या हुआ तेरा वादा अजितदादा’ अशा प्रकारे वक्तव्य करून आदरणीय अजितदादांविषयी जी गरळ ओकली त्याबद्दल आपण त्यांना जाब विचारणार, की त्यांचा बेभान सुटलेला बैल आणखी मोकाट सोडणार? असा सवाल करत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) जाब विचारला आहे. आमदार अमोल मिटकरींनी एक्सवर पोस्ट करत हा प्रश्न विचारला आहे. परिणामी  भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर केलेल्या टीकेनंतर आता राष्ट्रवादी आक्रमक झाली झाली असून आमदार सुरेश धस यांची दखल घेण्याचे आवाहन राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून करण्यात येत असल्याचे बघायला मिळत आहे. तर दुसरीकडे याचं मुद्यावरून आमदार सुरेश धसांना परत एकदा अमोल मिटकरींवर तोफ डागली आहे.  

नेमकं काय म्हणाले होते सुरेश धस?

ज्या पद्धतीने यांनी संतोषला मारले ती कोणती पद्धती आहे? छत्रपती संभाजीराजेंच्या हत्येप्रमाणेच ही हत्या झाली आहे. त्या लेकराने काय बिघडवले होते? आकाचे आका करलो, जल्दी तयारी, हम निकले है जेलवारी, असा जोरदार हल्लाबोल भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलाय. तर अजित दादा क्या हुआ तेरा वादा, काय को इसको अंदर लिया? असे म्हणत त्यांनी धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील समावेशावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ काल (4 जानेवारी) परभणीत सर्वपक्षीय मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाच्या सभेतून सुरेश धस बोलत होते.  

आणखी वाचा 

Suresh Dhas : आकाचे आका करलो जल्दी तयारी, हम निकले है जेलवारी; सुरेश धस यांचा जोरदार हल्लाबोल; म्हणाले, अजितदादा क्या हुवा तेरा वादा…

 

अधिक पाहा..



Source link

देवेंद्रजी, धस यांना जाब विचारणार की बेभान सुटलेला बैल आणखी मोकाट सोडणार? अमोल मिटकरींचा सवाल

देवेंद्रजी, धस यांना जाब विचारणार की बेभान सुटलेला बैल आणखी मोकाट सोडणार? अमोल मिटकरींचा सवाल


मुंबईदेवेंद्र फडणवीसजी (Devendra Fadnavis) आपल्या पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी काल परभणी मधील मुक मोर्चात ‘क्या हुआ तेरा वादा अजितदादा’ अशा प्रकारे वक्तव्य करून आदरणीय अजितदादांविषयी जी गरळ ओकली त्याबद्दल आपण त्यांना जाब विचारणार, की त्यांचा बेभान सुटलेला बैल आणखी मोकाट सोडणार? असा सवाल करत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) जाब विचारला आहे. आमदार अमोल मिटकरींनी एक्सवर पोस्ट करत हा प्रश्न विचारला आहे. परिणामी  भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर केलेल्या टीके नंतर आता राष्ट्रवादी आक्रमक झाली झाली असून आमदार सुरेश धस यांची दखल घेण्याचे आवाहन राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून करण्यात येत असल्याचे बघायला मिळत आहे.

सरपंच संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ (Santosh Deshmukh Case) शनिवारी परभणीत सर्वपक्षीय मूक मोर्चाचे (Parbhani Muk Morcha) आयोजन करण्यात आले होते. या मोर्चातील सभेतून भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी अजित दादा क्या हुआ तेरा वादा, काय को इसको अंदर लिया? असे म्हणत त्यांनी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या मंत्रिमंडळातील समावेशावरून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर निशाणा साधला होता. सुरेश धस यांनी अजित पवार यांना घेरताच राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. यावर आमदार अमोल मिटकरींनी एक्सवर पोस्ट करत आमदार सुरेश धसांची एक प्रकारे तक्रार थेट देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे. तर दुसरीकडे आरोपी स्वतः होऊन आत्मसमर्पण करत आहेत. मग गृह खातं झोपा काढत आहे का? असा सवाल राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते सुरज चव्हाण (Suraj Chavan) यांनी विचारला आहे. 

….तर तुमचा गृहमंत्र्यावर विश्वास नाही का? -सुरज चव्हाण

सुरज चव्हाण यांनी ‘एक्स’ पोस्ट शेअर करत सुरेश धस यांच्यावर हल्लाबोल केलाय. त्यांनी म्हटलंय की, स्व. संतोष देशमुख यांच्या हत्येवरून आ. सुरेश धस जाणीवपूर्वक राजकारण करत आहेत. परभणीच्या सभेत अजितदादांना क्या हुआ तेरा वादा… म्हणून दादांना प्रश्न विचारणाऱ्या सुरेश अण्णाला माझा प्रश्न आहे. आरोपी स्वतः होऊन आत्मसमर्पण करत आहेत. मग गृह खातं झोपा काढत आहे का? निष्पक्ष चौकशी होईल म्हणून तुमचा गृहखात्यावर आणि गृहमंत्र्यावर विश्वास नाही का? स्व. संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक जरी नेता, कार्यकर्ता जर चौकशीत दोषी आढळला तर अजितदादा त्यांच्यावर कार्यवाही करायला गय करणार नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे. 

नेमकं काय म्हणाले होते सुरेश धस?

पद्धतीने यांनी संतोषला मारले ती कोणती पद्धती आहे? छत्रपती संभाजीराजेंच्या हत्येप्रमाणेच ही हत्या झाली आहे. त्या लेकराने काय बिघडवले होते? आकाचे आका करलो, जल्दी तयारी, हम निकले है जेलवारी, असा जोरदार हल्लाबोल भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलाय. तर अजित दादा क्या हुआ तेरा वादा, काय को इसको अंदर लिया? असे म्हणत त्यांनी धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील समावेशावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ काल (4 जानेवारी) परभणीत सर्वपक्षीय मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाच्या सभेतून सुरेश धस बोलत होते.   

आणखी वाचा 

Suresh Dhas : आकाचे आका करलो जल्दी तयारी, हम निकले है जेलवारी; सुरेश धस यांचा जोरदार हल्लाबोल; म्हणाले, अजितदादा क्या हुवा तेरा वादा…

अधिक पाहा..





Source link

पती-पत्नीतील वाद विकोपाला, पतीने पत्नीची हत्या करून मृतदेह घरात दडवला, अन्…; अमरावती हादरली

पती-पत्नीतील वाद विकोपाला, पतीने पत्नीची हत्या करून मृतदेह घरात दडवला, अन्…; अमरावती हादरली


अमरावती : शहरातील फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या प्रभू कॉलनी परिसरात पतीने पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.  पत्नीचा मृतदेह घरात दडवून पती पसार झाला आहे. पोलिसांकडून पतीचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणामुळे अमरावती शहरात (Amravati Crime News) मोठी खळबळ उडाली आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भाग्यश्री अक्षय लाडे ही विवाहित युवती पती अक्षय सोबत वादविवाद झाल्याने माहेरी राहायला आली होती. काल रात्री सायंकाळी ती प्रभू कॉलनी येथे दुचाकी वाहनाने कपडे आणायला गेली. मात्र, रात्रभर घरी न आल्याने भाग्यश्रीच्या आईने फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात भाग्यश्री बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. फ्रेजरपुरा पोलिसांच्या पथकाने तातडीने दखल घेत भाग्यश्रीचा फोन ट्रेस केला असता भाग्यश्रीचे दुचाकी वाहन हे रेल्वे स्टेशन परिसरात आढळून आले. त्यातच तिचा फोन देखील होता. पोलिसांनी रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता  त्यात सदर वाहन हे भाग्यश्रीचा पती अक्षय लाडे यानेच रेल्वे स्टेशनपर्यंत आणल्याचे निष्पन्न झाले. 

पत्नीचा मृतदेह घरात दडवून पती पसार

या आधारे पोलिसांनी तत्काळ भाग्यश्रीचे प्रभू कॉलनी येथील घर गाठले असता घराला कुलूप लावलेले होते. मात्र पोलिसांना शंका आल्याने त्यांनी दाराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी भाग्यश्री ही बेडरूममध्ये मृत पडलेली दिसली. तसेच तिच्या मानेवर चाकूने आणि हाता पायावर देखील वार केल्याचे दिसून आले. पत्नीचा मृतदेह घरात दडवून पती पसार झाला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून भाग्यश्रीचा पती अक्षय लाडेच्या अटकेसाठी पोलिसांनी पथक रवाना केलेली आहेत. पोलीस पुढील तपास करीत आहेत. 

नागपुरात नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दुहेरी हत्याकांड

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नागपूरात दुहेरी हत्याकांड झाल्याची घटना घडली. यात पोटच्या मुलाने आई -वडिलांची हत्या केली आहे. नागपूरच्या कपिल नगर पोलीस ठाण्याअंतर्गत खसाळा कॅम्पसमध्ये ही घटना घडली आहे. लीलाधर डाखोडे आणि अरुणा डाखोडे अशी मृतांची नावे असून आरोपी हा त्याचाच मुलगा उत्कर्ष डाखोडे आहे. मृतक लीलाधर हे कोराडी थर्मल प्लांटमध्ये तंत्रज्ञ म्हणून काम करतात. तर अरुणा विनोबा भावे नगर येथील एका खाजगी शाळेत प्राथमिक शिक्षिका होत्या. आरोपी उत्कर्ष हा 6 वर्षांपासून अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. वारंवार अपयश आल्याने उत्कर्षच्या पालकांनी अभ्यास सोडून शेती करण्याचा सल्ला देत होते. पण उत्कर्ष अभियांत्रिकी पूर्ण करण्याच्या त्याच्या आग्रहावर ठाम होता. मात्र आरोपी उत्कर्षला एमडीचे व्यसन होते आणि या व्यसनामुळे त्याला अभ्यास करता येत नव्हता. आई-वडिलांच्या सततच्या समजुतीमुळे तो चिडला आणि रागाच्या भरात त्याने आपल्या आई-वडिलांची हत्या करण्याचा घातक प्लॅन तयार केला. आधी आई अरुणाचा गळा आवळून खून केला. त्यानंतर वडिलांवर धारदार शस्त्राने वार करून हत्या केली.

आणखी वाचा 

Mumbai Crime : बाप आहे की सैतान… पोटच्या अल्पवयीन मुलीसोबत नको ते कृत्य, मुंबईतील धक्कादायक घटना

अधिक पाहा..



Source link

YouTube
Instagram
WhatsApp