अजित दादांच्या मातोश्री म्हणाल्या पवार कुटुंब एकत्र यावं; अमोल मिटकरींनी घेतलं 2 नेत्यांचं नाव

अजित दादांच्या मातोश्री म्हणाल्या पवार कुटुंब एकत्र यावं; अमोल मिटकरींनी घेतलं 2 नेत्यांचं नाव


मुंबई : राज्याच्या राजकारणात गेल्या 5 वर्षात अनेक भूकंप पाहायला मिळाले. त्यामध्ये, शिवसेना पक्षात झालेली फूट, त्यानंतर अजित पवारांनी बंड करुन शरद पवारांची सोडलेली साथ. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षावर दावा करत थेट पक्षाची कायदेशीर मान्यता मिळवण्यातही ते यशस्वी ठरले होते. मात्र, विधानसभा निवडणुकांच्या निकालात घवघवीत यश मिळाल्यानंतर आता अजित पवारांच्या (Ajit pawar) राष्ट्रवादीकडे इतरही आमदारांचा कल वाढल्याचं दिसून येत आहे. शरद पवारांच्या 10 आमदारांचेही अजित पवार गटाशी मिळते जुळते वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे, दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र होणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. त्यातच, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मातोश्री यांनी पवार कुटुंब एकत्र व्हावं, अशी प्रार्थनाच आज पंढरीच्या पांडुरंगाकडे केली आहे. त्यानंतर, राष्ट्रवादीचे प्रवक्ते व आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनीही या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

पवार कुटुंबं एकत्र यावेत, असं अजित पवारांच्या मातोश्री आशाताई पवारांनी विठूरायाला साकडं घातल्याचं माध्यमांसमोर बोलतांना म्हटलंय. या संदर्भात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी प्रतिक्रिया दिली. रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड हे दोन नेते पवार कुटुंब एकत्र येण्यासाठी अडथळा ठरतायेत. या दोघांनाही पवार कुटुंब एकत्र यावं, असं वाटत नसल्याचं मिटकरी यांनी म्हटलं. आशाताईंनी व्यक्त केलेल्या भावना आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. शेवटी पवार कुटुंबातील वरिष्ठ लोक यावर एकत्र येण्यावर निर्णय घेतील असेही मिटकरी यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले.

अमोल मिटकरींचा नवा संकल्प

दरम्यान, 2024 हा काळ राष्ट्रवादीसाठी अतिशय संघर्षाचा काळ होता. पण अजितदादांनी आपलं अस्तित्व सिद्ध करून दाखवलं. आता 2025 हे वर्ष राष्ट्रवादीसाठी महत्त्वाचं असणार आहे. 2025 डिसेंबरपर्यत अजितदादांचं नेतृत्व महाराष्ट्रात आणखी ठळकपणे समोर येणार असल्याचे मिटकरी यांनी म्हटले. दरम्यान, आपण भूतकाळातील आपल्या चुका सावरत नवीन वर्षात काम करणार असल्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केलाय. मात्र, अमोल मिटकरी यांनी थेट शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील दोन नेत्यांचे, दोन आमदारांचे नाव घेऊन पवार कुटुंब एकत्र येण्यास हे दोनच नेते कारणीभूत ठरत असल्याचे म्हटले आहे. त्यामध्ये, रोहित पवार हे पवार कुटुंबातीलच आहेत. तर, जितेंद्र आव्हाड हे शरद पवारांना पितृतुल्य मानतात. त्यामुळे, मिटकरी यांच्या दाव्यावर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून काय प्रतिक्रिया येते हे पाहावे लागेल. 

हेही वाचा

अंगात जर्सी, हाती बॅट, डोक्यावर कॅप, डोळ्यावर गॉगल; विनोद कांबळीला डिस्चार्ज, म्हणाला मै छोडूंगा नही…

अधिक पाहा..



Source link

वर्षाखेरीस तुरीच्या दरात मोठी घसरण; बळीराजाच्या आनंदात विरजण, तुरीचे दर काय?

वर्षाखेरीस तुरीच्या दरात मोठी घसरण; बळीराजाच्या आनंदात विरजण, तुरीचे दर काय?


Tur Market Price अकोला अकोल्याच्या कृषी बाजारात 2024 अखेरच्या दिवशी नव्या तुरीच्या दरात मोठी घसरण झालीये. आज 465 रुपयांनी प्रतिक्विंटल मागे तुरीच्या दरात घसरण झालीये.  गेल्या काही दिवसांत तुरीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळाले होते. मात्र, कालपर्यंत तुरीच्या दरात पुन्हा काहीशी तेजी आली होती. परंतु, आज अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत नव्या तुरीला 6 हजार 550 रुपयांपासून 8 हजार 140 रूपयांपर्यंत कमाल भाव मिळालाय. कालच्या तुलनेत आज तुरीचे दरात 465 रुपयांनी खाली आलेयेत. मात्र, काल तुरीला कमाल भाव 8605 रुपये इतका क्विंटलमागे होताय. अकोल्यात सध्या तुरीला प्रति क्विंटल सरासरी  7700 रुपये भाव  मिळतो आहे.

गेल्या  15 दिवसांत अकोल्यात तुरीला मिळालेला भाव

  दिनांक            किमान     कमाल 
12 डिसेंबर          7900     9745
13 डिसेंबर          7900     9800
14 डिसेंबर          7500     9600
17 डिसेंबर          6000     8000
18 डिसेंबर          7000     7875
19 डिसेंबर          7000     8670
20 डिसेंबर          7000     8205
21 डिसेंबर          6400     8505
23 डिसेंबर          6300     7415
24 डिसेंबर          6000     8185
25 डिसेंबर          5800     7890
26 डिसेंबर          6200     7680
29 डिसेंबर          6300     8405
30 डिसेंबर          6300     8605
31 डिसेंबर          6550     8140

विदर्भातही रसाळ स्ट्रॉबेरीची चव!

आता विदर्भाच्या मातीतही तुम्हाला स्ट्रॉबेरीची चव चाखायला मिळणारेय. अकोल्यातल्या पातूर, अकोट आणि तेल्हारा तालुक्यांतील वातावरण स्ट्रॉबेरी’साठी पोषक असल्याचे समोर आलेये.. यामुळे या भागातही या पिकांचा प्रसार करण्याचा कृषी शास्त्रज्ञांचा मानस आहे. विशेष म्हणजे, तेल्हारा तालुक्यातल्या अंकित म्हसाळ या 26 वर्षीय तरुणाने स्ट्रॉबेरीची लागवड केली आहेय. इतकेच नव्हेतर वर्धा जिल्ह्यातल्या सेलसुरा कृषी विज्ञान केंद्रांतर्गत 8 शेतकऱ्यांनी महाबळेश्वर येथून रोपे आणून 18 हेक्टरवर स्ट्रॉबेरी लागवड केलीये.

हे ही वाचा 

अधिक पाहा..



Source link

भाजप आमदार प्रवीण तायडे विरोधात बच्चू कडूंची प्रहार आक्रमक; थेट आव्हान देत पोलिसांकडे तक्रार

भाजप आमदार प्रवीण तायडे विरोधात बच्चू कडूंची प्रहार आक्रमक; थेट आव्हान देत पोलिसांकडे तक्रार


अमरावती : अचलपूरचे माजी आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्याबद्दल भाजपचे विद्यमान आमदार प्रवीण तायडे यांनी केलेल्या अर्वाच्य वक्तव्यामुळे प्रहार संघटना (Prahar Janshakti Party) आक्रमक झाली आहे.  प्रहार संघटनेतर्फे आज अमरावती पोलीस अधीक्षकांना एक निवेदन देऊन तक्रार करण्यात आली. तसेच आमदार प्रवीण तायडे यांनी बच्चू कडूंच्या नादाला न लागता पहिले प्रहारच्या कार्यकर्त्यांचा सामना करून दाखवावा, असे आव्हान देखील प्रहारचे जिल्हाध्यक्ष बल्लू जवंजाळ यांनी आमदार प्रवीण तायडे यांना दिले आहे. दरम्यान, प्रहारच्या पदाधिकाऱ्यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर भाजप आमदार प्रवीण तायडे यांच्या विरोधात नेमकी काय कारवाई केली जाते आणि या आव्हानाला ते कसे उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

बहिरम येथे भाजप आमदाराचे फलक फाडले

अमरावतीच्या बहिरम येथे सध्या बहिरम बाबांची यात्रा सुरू आहे, या यात्रेत अचलपूरचे नवनिर्वाचित भाजप आमदार प्रवीण तायडे यांचे शुभेच्छा फलक फाडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. आमदार प्रवीण तायडेंचे शुभेच्छा फलक फाडल्यामुळे भाजप पदाधिकारी आक्रमक होण्याची शक्यता आहे. अचलपूर मतदारसंघात प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडूंना पराभूत करत प्रवीण तायडे हे निवडून आलेले आहेत.

तरुणाचा मृतदेह आढळल्यानं भंडाऱ्यात खळबळ

भंडाऱ्याच्या जवाहरनगर पोलिस स्टेशन हद्दीतील जवाहरनगर ते नांदोरा या मार्गावर रस्त्यालगत एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. या घटनेनं भंडाऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. अभय ढोके (23) रा. जवाहरनगर असं मृतकाचं नावं आहे. मृतक अभयच्या अंगावर त्याची स्पोर्ट्स बाईक पडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती जवाहरनगर पोलिसांना मिळाली होती. याप्रकरणी मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून उत्तरीय तपासणीसाठी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णात पाठवला आहे. अभयच्या मृत्यूचं नेमकं काय कारण आहे? याचा शोध आता जवाहरनगर पोलीस घेत असून शवविच्छेदन अहवालानंतर ते स्पष्ट होईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

गावातील 125 लोकांनी स्टॅम्प पेपरवर लिहून दिलंय, पण मला तिथं 60 मतं; बच्चू कडू कोर्टात जाणार

गावातील 125 लोकांनी स्टॅम्प पेपरवर लिहून दिलंय, पण मला तिथं 60 मतं; बच्चू कडू कोर्टात जाणार


अमरावती : विधानसभा निवडणुकानंतर राज्यात ईव्हीएमचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला होता. विरोधी पक्षांकडून ईव्हीएमवर (EVM) संशय व्यक्त करत थेट निवडणूक निकालास चॅलेंज दिले जात होते. महायुतीचा विजय हा ईव्हीएमचा विजय असल्याची टीका महाविकास आघाडीतील पक्षांच्या प्रमुख नेत्यांकडून करण्यात आली. मात्र, आता हा मुद्दा मागे पडला असताना प्रहार संघटनेचे प्रमुख आणि माजी आमदार बच्चू कडू (Bachhu kadu) यांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे. कडू यांनी एका गावातील मतदानाच्या आकडेवारीचा संदर्भ देत ईव्हीएममध्ये घोळ झाल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी या गावातील नागरिकांनीही ईव्हीएममध्ये घोळ असल्याचे सांगत फेरमतदानाची प्रक्रिया सुरू केली होती. 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी देखील ईव्हीएमवर संशय व्यक्त करत मारकडवाडी गावात आपणास मतदान कमी पडल्याचं म्हटलं होतं. तसेच, तेथील गावकऱ्यांशी बोलून एवढे मतदान कमी कसे झाले, यावर चर्चा केली होती. त्यानंतर,मारकडवाडी गावात ग्रामस्थांकडूनच फेरमतदान करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र, पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारत गावात कलम 144 लागू केल होते. आता, बच्चू कडू निवडणूक लढवत असलेल्या अचलपूर मतदारसंघातील गावात मला मतदान कमी झाल्याचं कडू यांनी म्हटलं आहे. ब्राह्मणवाडा थडी येथील मतदान केंद्रावर मला मागच्या निवडणुकीत 148 मतं मिळाली होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीत केवळ 60 मतं मिळाली आहेत. विशेष म्हणजे त्या गावातील 125 लोकांनी मला स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्रावर लिहून दिलं आहे, ज्यामध्ये आम्ही तुम्हालाच मतदान केल्याचं ते सांगत असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलंय. तसेच, या प्रकरणात आम्ही आता कोर्टात जाऊ, असेही ते म्हणाले. 

कोर्टही बदमाश पण आम्ही कोर्टात जाऊ

माझं मतं कुणाला गेलं हे माहिती असणं सामान्य मतदाराचा अधिकार आहे. मात्र, आता व्हीव्हीपॅट म्हणजे वरलीचा खेळ झाला आहे. त्यासाठी आम्ही आता कोर्टात जाऊ, कोर्टही बदमाश आहे, कोर्ट आम्हाला न्याय देईल असं वाटत नाही. पण आम्ही कोर्टात जाऊ असेही बच्चू कडू यांनी म्हटलंय. दरम्यान, विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर अनेकांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला असून महायुतीच्या नेत्यांनाही त्यांचा एवढा मोठा विजय झाल्यावर विश्वास नसल्याचे स्वत: शिवसेना युबीटी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.  

हेही वाचा

”प्राजक्ता माळीचा विषय माझ्यासाठी संपला; वाल्मिक कराडला अटक झाली का नाही, हे मला माहिती नाही”

अधिक पाहा..



Source link

भाजपकडून अकोल्यातील 11 बड्या नेत्यांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?

भाजपकडून अकोल्यातील 11 बड्या नेत्यांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?


Akola News : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024) महायुतीला (Mahayuti) स्पष्ट बहुमत मिळाले तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा फटका सहन करावा लागला. यंदाच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी बंडखोरी केली तर अनेकांनी पक्षाविरोधात काम केल्याचे पाहायला मिळाले. यानंतर सर्वच पक्षाकडून अशा नेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. आता भाजपने (BJP) अकोल्यात जिल्हा परिषद सदस्यासह अकरा जणांचे निलंबन (Suspension) केले आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षाविरोधात काम केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. 

अकोला जिल्ह्यात सन 2019 च्या तुलनेने 2024 मधील विधानसभा निवडणुकीत पीछेहाट झाल्यानंतर भाजपने आता कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. अकोट मतदारसंघात पक्षाच्या उमेदवाराविरोधात काम केल्याचा ठपका ठेवत जिल्हा परिषद सदस्यासह 11 पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकत्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. ही कारवाई भाजपचे जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांनी केली आहे. त्यांनी या कारवाईबद्दल प्रदेशाध्यक्षांना देखील कळवले आहे.

‘या’ 11 जणांची सहा वर्षासाठी हकालपट्टी

जि.प. सदस्य प्रकाश आतकड, पं.स. सदस्य राजेश उर्फ विष्णू येऊल, अकोट येथील माजी नगरसेवक मंगेश चिखले, किसान आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. राजेंद्र पुंडकर, प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी आघाडीचे विशाल गणगणे, अकोट माजी तालुकाध्यक्ष अरविंद लांडे, माजी तालुका सरचिटणीस राजेश पाचडे, ओबीसी आघाडी प्रदेश सदस्य विष्णू बोडखे, माजी तालुका सरचिटणीस सुनील गिरी, युवा मोर्चाचे माजी सरचिटणीस नीलेश तिवारी व माजी युवती प्रमुख अकोला ग्रामीणच्या चंचल पितांबरवाले यांचा समावेश आहे. 

काँग्रेसकडूनही बंडखोरांवर निलंबनाची कारवाई 

काँग्रेसने देखील विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केलेल्या नेत्यांवर निलंबनाची कारवाई काही दिवसांपूर्वी केली होती. यात रामटेक विधानसभा मतदारसंघातून राजेंद्र मुळक, काटोलमधून काँग्रेसचे दिवंगत नेते श्रीकांत जिचकार यांचे सुपुत्र याज्ञवल्क्य जिचकार, पर्वती विधानसभा मतदारसंघातून आबा बागुल आणि कसबा विधानसभा मतदारसंघातून कमल व्यवहारे यांना 6 वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. तर सांगली विधानसभेसाठी काँग्रेसने पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर नाराज झालेल्या वसंतदादा गटाने जयश्री पाटील यांना अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. यांनतर जयश्री पाटील यांचे देखील निलंबन करण्यात आले होते.

आणखी वाचा 

Walmik Karad: फरार वाल्मिक कराड पोलिसांच्या अंगरक्षरकांना घेऊन महाकालाच्या दर्शनाला? ‘ते’ फोटो समोर

मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेचा सरकारी तिजोरीवर भार, वाजवी खर्चात कपात करण्याची सूचना

अधिक पाहा..



Source link

अमरावतीत 32 विद्यार्थ्यांना मध्यान भोजनातून विषबाधा, 6 जणांची प्रकृती चिंताजनक

अमरावतीत 32 विद्यार्थ्यांना मध्यान भोजनातून विषबाधा, 6 जणांची प्रकृती चिंताजनक


Amravati News : अमरावतीच्या मोर्शी तालुक्यातील आडगाव विचोरी गावात जिल्हा परिषदेच्या शाळेतील 32 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. मध्यान भोजन आहारामध्ये दिल्या जाणाऱ्या खिचडी आणि मटकी या पदार्थातून विषबाधा झाल्याची माहिती मिळाली आहे. 

सहा विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती 

दरम्यान, आरोग्य विभागाच्या पथकाकडून विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांवर गावात उपचार सुरू आहेत.  शाळेतील 32 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. यामध्ये सहा विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

दरम्यान, मुलांना विषबाधा झाल्याची माहिती मिळताच आड वडिल नातेवाईतांनी रुग्णालयात धाव घेतल्याचं पाहायला मिळालं. डॉक्टरांकडून मुलांची तपाशणी झाली आहे. 32 पैकी 26 विद्यार्थ्यांची प्रकृती चांगली आहे. मात्र, 6 विद्यार्थ्यांची प्रकती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. विद्यार्थ्यांना अन्नातूनच विषबाधा झाल्याचे उघड झाले आहे. 

महत्वाच्या बातम्या:

लातूरमध्ये शासकीय वस्तीगृहातील मुलींना भोजनातून विषबाधा, उपचार सुरु, प्रकृती धोक्याबाहेर

 

 

अधिक पाहा..



Source link

YouTube
Instagram
WhatsApp