5 वर्षांपूर्वी प्रेमविवाह; बायकोसोबत भांडण अन् सासरचा त्रास, कंटाळून तरुणाची रेल्वेखाली उडी; शे

5 वर्षांपूर्वी प्रेमविवाह; बायकोसोबत भांडण अन् सासरचा त्रास, कंटाळून तरुणाची रेल्वेखाली उडी; शे


अकोला: अकोल्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अकोल्यातील पारसमध्ये एका विवाहीत व्यक्तीने आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओ बनवला आहे, त्या व्हिडिओद्वारे बायकोसह सासरच्यांनी मारहाण आणि छळ केल्याचा आरोप करत मारहाण केल्याचं सांगत त्या व्यक्तीने टोकाचं पाऊल उचललं आहे. संघपाल खंडारे असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीची नाव आहे. ऑटो ड्रायव्हर असलेला संघपाल बाळापूर तालूक्यातील पारसचा रहिवाशी आहे. त्याने आत्महत्यापूर्वी व्हिडिओ बनवत बायकोसह सासरच्यांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. यातूनच त्याने रेल्वे समोर उडी घेत आत्महत्या केली आहे. 

आत्महत्यापूर्वी त्याने व्हिडिओमध्ये पत्नीसह सासरकडील 6 ते 7 लोकांनी आपल्याला मारहाण केली असल्याचा आरोप देखील केला आहे. आत्महत्यापूर्वीच त्याने हा व्हिडिओ बनवला आहे. त्यामध्ये त्याने त्रास देणाऱ्यांची नावंही सांगितली आहेत, तर त्यांनी संघपालला कर्ज देखील काढायला लावलं असल्याचं त्याने आपल्या शेवटच्या व्हिडीओमध्ये त्यानंतर तो सर्व नातेवाईकांना पाठवला आहे.  सासरच्या लोकांपासून आपल्या जिवाला धोका असल्याचे सांगत त्याने आयुष्य संपवलं आहे. व्हिडिओमधून आत्महत्याला जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाईची मागणी त्याने केली आहे. दरम्यान, या प्रकरणात रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी संघपालच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या लोकांवर गुन्हे दाखल केली आहे. तसेच 4 जणांना अटक केली आहे. यामध्ये पत्नी, सासूसह 3 महिला आणि एका पुरुषाचा अटकेत समावेश आहे. दरम्यान, संघपालने व्हिडिओमध्ये त्याच्यावर झालेल्या छळाची आपबिती सांगितली आहे. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.

संघपालने आत्महत्या पूर्वी बनविलेला व्हिडिओ

संघपालने आत्महत्या पूर्वी बनविलेला व्हिडिओ 58 सेकंदाचा आहे, त्यामध्ये तो सांगतो की, दादा मी काय म्हणतो ते कान देऊन ऐक, त्याची आणि त्याच्या पत्नीची भांडणं झाली. त्यानंतर तिचा चुलत भाऊ, सख्खा भाऊ त्यांचे मित्र अशी मिळून चार ते पाच जणांनी मला बेदम मारलं, आणि मला आठ दिवसांपूर्वू त्यांनी तीन लाख रूपये कर्ज काढायला लावलं, ते मला जगू देत नाहीयेत. मला ते धमक्या देत आहेत. बायको, तिचा भाऊ, तिची आई, तिची बहिण, तिच्या भावाचे मित्र असे सहा ते सात जण आहेत. ते मला मारून टाकतील, त्याआधी मी माझा जीव देतो, मी मेल्यावर त्यांना सोडू नको. हा व्हिडीओ तू पोलिसांना दाखव आणि तिच्यावर केस कर, कसंही कर, जातो दादा, आई आणि बाबाला तू सांग, बाय बाय, असं संघपाल आपल्या शेवटच्या व्हिडीओमध्ये म्हणतो आहे.

आणखी वाचा



Source link

पैसे दिले म्हणजे स्वतःच्या घरातून दिले नाही; मुख्यमंत्री शेतात वखरायला गेले होते का?: बच्चू कडू

पैसे दिले म्हणजे स्वतःच्या घरातून दिले नाही; मुख्यमंत्री शेतात वखरायला गेले होते का?: बच्चू कडू


Bacchu Kadu on Chandrashekhar Bawankule :  राज्याचे महसूल मंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी काल (3 ऑगस्ट) मोर्शी याठिकाणी कर्जमाफी वरून बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्यावर अप्रत्यक्षपणे सडकून टिका केली. यावेळी बावनकुळे म्हणाले की, कर्जमाफी वरून आंदोलन करायचं आणि नाटकं करायचे, पण हे लक्षात ठेवा दिव्यांगांना 1500 वरून 2500 रुपये मानधन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे, त्यांनाच ती मिळणार. पण काही लोकं याठिकाणी नौटंकी करत आहे. असा अप्रत्यक्ष टोला बावनकुळे यांनी लगावला.

दरम्यान याच मुद्यावरून बच्चू कडू यांनी प्रहार करत बावनकुळेंच्या टीकेला प्रत्त्युत्तर दिले आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला नौटंकी म्हणणे हा शेतकऱ्यांचा अपमान आहे. शेतकऱ्यांच्या वेदना बावनकुळेंना कळत नाही. ते मंत्री झाल्यामुळे त्यांचे पोट भरलं असेल. सहा लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यांच्या पत्नींचा आक्रोश आहे. त्यांचा आक्रोश रस्त्यावर येत असेल आणि तुम्ही जर त्याला नौटंकी म्हणत असाल तर हा अपमान आहे. अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली. शेतकऱ्यांना शिव्या देणे बावनकुळे यांनी बंद केले पाहिजे. तुम्ही पैसे दिले म्हणजे स्वतःच्या घरातून दिले नाही, त्यासाठी मुख्यमंत्री शेतात वखराला गेले होते का? अशी बोचरी टीका हि बच्चू कडू यांनी केली आहे.

शासकीय कार्यक्रमात राजकीय भाषण, तुम्हाला लाज वाटते का? – बच्चू कडू

आमचे पैसे आहे, आमचा अधिकार आहे. हे टोमणे मारणे बंद करा. आम्हाला देखील बोलता येतं, तुमच्यापेक्षा वाईट बोलता येतं, हे विसरू नका. काल शासकीय कार्यक्रमात राजकीय भाषण दिलं, तुम्हाला लाज वाटते का? पैसा सरकारचा आणि भाषण राजकीय. बोलायचं असेल तर स्वतःची राजकीय सभा घ्या, पैसे खर्च करा. शासकीय कार्यक्रमाचे राजकीय भाषण करत असाल तर तुमच्या सारखे महामूर्ख आहे. का आम्ही यावर तक्रार करू. एवढ्या महत्त्वाच्या कार्यक्रमात तिथल्या स्थानिक आमदार यांना बोलू दिले नाही. संत्रा बद्दल बोलायला तयार नाही. रामदेव बाबांना कारखाना सुरू केला, काय भाव घेणार आहे जाहीर करा ना. असेही बच्चू कडू म्हणाले.

धर्माच्या नावाखाली सुरू असलेली तुमची गुंडागर्दी बंद होणार- बच्चू कडू

मुख्यमंत्र्यांनी एखादा राजकीय पॅकेज जाहीर करतील, असं वाटलं होतं. पण त्यांनी राजकीय भाषण केलं. धर्माच्या नावाखाली सुरू असलेली तुमची गुंडागर्दी हे बंद होणार. आमची नौटंकी काढल्यापेक्षा तुम्ही काय सातबारा कोराची नवटंकी तुम्ही केली होती. आमचे पैसे आहे, आमचा अधिकार आहे, हे टोमणे मारणे बंद करा. मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीसाठी वरची कर्जमाफीची उपाययोजना जाहीर करावी. जेव्हा सभेत बोलले तेव्हा असं म्हटलं का की दोन वेळा कर्जमाफी करता येणार नाही. बोलताना अभ्यास करून बोलले नव्हते का? असा सवाल हि बच्चू कडू यांनी यावेळी उपस्थित केला.

संबंधित बातमी:

आणखी वाचा



Source link

प्रत्येक गोष्टीचा बाऊ करु नये, मंत्री कधी कधी गमतीनं बोलतात, नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?  

प्रत्येक गोष्टीचा बाऊ करु नये, मंत्री कधी कधी गमतीनं बोलतात, नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?  


Devendra Fadnavis : मंत्री आपल्या भाषणामध्ये कधीकधी गमतीने देखील बोलतात, प्रत्येक गोष्टीचा आपण बाऊ करु लागलो तर हे योग्य नसल्याची प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी दिली आहे. काही स्टेटमेंट महत्त्वाचे असतात तर काही चुकीची असतात, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) आणि मंत्री मेघना बोर्डीकर (Meghna Bordikar) यांच्या वक्तव्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर प्रतिक्रिया दिली.  

शिरसाट जे बोलले त्यांचं चुकीचं वाटत नाही 

शिरसाट जे बोलले त्यांचं चुकीचं वाटत नाही असे मुख्यमंत्री म्हणाले. मेघना बोर्डीकर सोबत बोलणं झालं आहे. त्यांचं बोलणं माध्यमांकडून अर्धवट दाखवण्यात येत असल्याचे फडणवीस म्हणाले. 

नेमकं काय म्हणाल्या होत्या मेघना बोर्डीकर?

राज्याच्या आरोग्य राज्यमंत्री तथा परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर एका कार्यक्रमात ग्रामसेवकाला काणाखाली मारण्याची धमकी देतानाचा एक व्हिडिओ राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ट्विट केला होता. या व्हिडीओमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या पार्श्वभूमीवर आता मेघना बोर्डीकर (Meghana Bordikar) यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. रोहित पवार यांनी अर्धवट माहितीच्या आधारे राज्यातील जनतेची दिशाभूल करू नये. बोरी येथील विधवा,मोलमजुरी करणाऱ्या सामान्य महिलांचा पंतप्रधान आवास योजनेच्या लाभासाठी हा ग्रामसेवक छळ करतो, त्यांच्याकडे पैशांची मागणी करतो, अशी तक्रार होती. त्याची वारंवार तक्रार करूनही तो ऐकत नव्हता. त्या कार्यक्रमात काही महिला माझ्याकडे आल्या. त्यामुळे मी एक पालक या नात्याने ग्रामसेवकाला ज्या भाषेत कळते त्याच भाषेत समज दिली. मी त्या रागातून संबंधित ग्रामसेवकाला बोलले, असे मेघना बोर्डीकर यांनी सांगितले. 

नेमकं काय म्हणाले होते मंत्री संजय शिरसाट?

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ हे अकोल्यातील सामाजिक न्यायभवनाचे उद्घाटनासाठी शहरात आले होते. यावेळी बोलताना त्यांनी केलेले एक विधान नवा वाद निर्माण करणारं ठरलं आहे. सामाजिक न्यायभवनाच्या वसतिगृहासाठी तुम्ही 5, 10 किंवा 15 कोटी अशी कितीही रक्कम मागा, आपण लगेच मंजूर करु. सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय असं वादग्रस्त वक्तव्य शिरसाट यांनी केलं आहे. यावेळी व्यासपीठावर भाजप आमदार हरीश पिंपळे, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि काँग्रेसचे साजिद खान पठाण उपस्थित होते. 

महत्वाच्या बातम्या:

Video : सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? मंत्री संजय शिरसाटांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

आणखी वाचा



Source link

मंत्री संजय शिरसाटांचं वादग्रस्त वक्तव्य, सुषमा अंधारेंनी थेटच सुनावलं; म्हणाल्या, ‘वाह्यात…

मंत्री संजय शिरसाटांचं वादग्रस्त वक्तव्य, सुषमा अंधारेंनी थेटच सुनावलं; म्हणाल्या, ‘वाह्यात…


Sushma Andhare On Sanjay Shirsat: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महायुतीतील (Mahayuti) मंत्र्यांना कडक तंबी दिल्यानंतरही सरकारमधल्या मंत्र्यांचे वादग्रस्त विधानं काही केल्या थांबता थांबत नसल्याचे दिसून येत आहे. आता पुन्हा एकदा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat)  यांच्या एका वादग्रस्त वक्तव्याचा शुक्लकाष्ठ सरकारच्या मागं लागण्याची चिन्ह आहेत. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ (Sanjay Shirsat) हे अकोल्यातील सामाजिक न्यायभवनाचे उद्घाटनासाठी आले असता यावेळी बोलताना त्यांनी केलेले एक विधान नवा वाद निर्माण करणारं ठरलं आहे. कितीही रक्कम मागा, आपण लगेच मंजूर करू, सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय, असं शिरसाट यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, याच मुद्द्यवरून शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी टीकास्त्र डागत मंत्री संजय शिरसाटांना खडे बोला सुनावले आहे. सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे मंत्री संजय शिरसाटांच्या राजीनाम्यासंदर्भात सवाल उपस्थित केला आहे.

नेमकं काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

निव्वळ 5 वर्षात 25 पट संपत्ती, वादग्रस्त ठरल्यानंतर विट्स हॉटेलच्या लिलावातून माघार. भल्या मोठ्या रोकड रकमेसह स्वतःच्याच बेडरूममधले व्हिडिओ व्हायरल. आता आपल्या बापाचा माल थोडीच आहे सरकारचा पैसा आहे लुटा.. हा बेतालपणा फडणवीसजी, वाह्या शिरसाटचा राजीनामा कधी होणार? अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे. एक्स या समाज माध्यमांवर त्यांनी हि प्रतिक्रिया देत टीका केली आहे.

मंत्री संजय सिरसाट यांच्या वक्तव्याचा माध्यमांनी पराचा कावळा केला– अमोल मिटकरी

दुसरीकडे याच मुद्दयांवर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी प्रतिक्रिया देत भाष्य केलंय. यावेळी ते म्हणाले कि, सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाट यांच्या अकोल्यातील वक्तव्याचा माध्यमांनी पराचा कावळा केल्याचा आरोप आमदार अमोल मिटकरींनी केलाय. आपण त्या व्यासपीठावर होतो. मात्र, संजय शिरसाटांच्या शिवसेना स्टाईल वक्तव्याचा माध्यमांनी चुकीचा संदर्भ दाखविल्यााचा आरोप त्यांनी केलाय.

दरम्यान, अकोल्यातील याच कार्यक्रमात स्वतः वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या संजय शिरसाटांनी मात्र राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांना बोलताना सांभाळून बोलण्याचा सल्ला दिला. मिटकरी तुमच्यामुळे माध्यमांना चांगला टीआरपी मिळतोय. मात्र, तू जास्त बोलू नकोस नाहीतर तुझेही आमच्यासारखे हाल होतील असा सल्ला शिरसाटांनी मिटकरींना दिला. 

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा





Source link

अकोल्यात खंडणी मागणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यासह एका सुरक्षारक्षकावर गुन्हा दाखल; कारवाई न करण्यासाठ

अकोल्यात खंडणी मागणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यासह एका सुरक्षारक्षकावर गुन्हा दाखल; कारवाई न करण्यासाठ


अकोला: खंडणी मागणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यासह एका सुरक्षारक्षकावर गुन्हा दाखल झाला आहे. कारवाई न करण्यासाठी पैसे मागणाऱ्या पोलिस शिपायासह मध्यवर्ती बस स्थानकाच्या सुरक्षारक्षकावर हा गुन्हा दाखल झाला आहे. छेडछाडीच्या आरोपावरून एका तरुणाला सुरक्षा रक्षक सुरज इंगळे आणि राहुल इंगळे या पोलीस कर्मचाऱ्याकडून तरुणाला बेदम मारहाण झाली होती. त्यानंतर कारवाई न करण्यासाठी त्याच्याकडून 1500 रुपये घेतले. या प्रकरणात अकोल्यातल्या सिव्हिल लाईन पोलिसांत कारवाईची भीती दाखवत खंडणी घेणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल झाले आहेत.

 दरम्यान, ओम कोरडे असं मारहाण झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर राहुल इंगळे असं पोलीस शिपायचं आणि सुरज इंगळे असं बस स्थानकाच्या सुरक्षारक्षकाचं नाव आहे. दरम्यान, सुरुवातीला पोलिस तक्रार घेण्यास टाळाटाळ करीत होते. मात्र, भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर आणि आमदार प्रकाश भारसाकळे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यावर कारवाईला वेग आला. या प्रकरणामुळ पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

अकोल्यात बातमी छापल्याच्या रागातून उर्दू दैनिकाच्या संपादकांपर्यंत हल्ला

अकोल्यात बातमी लावल्याचा रागातून पत्रकारांवर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना  घडली आहे. पाच ते सहा तरुणांनी कोयत्याने हल्ला चढवत जवळपास चार जणांना जखमी केले आहे. अकोल्यातल्या जनता भाजी बाजारात ही घटना घडलीये. दरम्यान अकोला पोलिसांनी 2 जणांना तडीपार केलं होतं. या संदर्भात स्थानिक उर्दू दैनिक ‘सुफ्फा’मध्ये बातमी प्रकाशित केल्यानंतर तडीपार केलेल्या तरुणांनी बातमी लावल्याच्या रागातून हल्ला चढवला. “सुफ्फा’चे मुख्य संपादक सज्जाद हुसेन आणि त्यांच्या तीन मुलांवर हा हल्ला करण्यात आला आहे. वृत्तपत्रामध्ये तडीपार संदर्भात बातमी प्रकाशित केली होती, त्यावरून हा संपूर्ण वाद झाला आहे. सर्व जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान, या घटनेनंतर काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांनी अकोला पोलिसांवर ताशेरे ओढले आहे.

आणखी वाचा



Source link

Video: सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

Video: सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य


अकोला : राज्यातील महायुती (Mahayuti) सरकारमधील मंत्र्‍यांच्या वक्तव्यावरुन सध्या काही मंत्री अडचणीत सापडले असून कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंकडून कृषि खातंही काढून घेण्यात आलं. कोकाटे यांची क्रीडामंत्री पदावर वर्णी लागली आहे. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोस्ट कॅबिनेट बैठकीत सर्वच मंत्र्‍यांना मोजून मापून बोलण्याचे आदेश दिले आहेत. त्यामध्ये, विशेषत: अजित पवारांच्या राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्‍यांना नाव न घेता सुनावलं होतं. काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य आणि हाती सिगारेट घेतलेला व्हिडिओ व्हायरल झाल्याने चर्चेत असलेल्या मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. कितीही रक्कम मागा, आपण लगेच मंजूर करू, सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय, असं शिरसाट यांनी म्हटलं आहे. 

मुख्यमंत्र्यांनी कडक तंबी दिल्यानंतरही राज्यातल्या महायुती सरकारमधल्या मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानं काही केल्या थांबता थांबताना दिसून येत नाही. आता पुन्हा एकदा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या एका वादग्रस्त वक्तव्याचा शुक्लकाष्ठ सरकारच्या मागं लागण्याची चिन्ह आहेत. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ हे अकोल्यातील सामाजिक न्यायभवनाचे उद्घाटनासाठी आज शहरात होते. यावेळी बोलताना त्यांनी केलेले एक विधान नवा वाद निर्माण करणारं ठरलं आहे. “सामाजिक न्यायभवनाच्या वसतिगृहासाठी तुम्ही 5, 10 किंवा 15 कोटी अशी कितीही रक्कम मागा, आपण लगेच मंजूर करू. सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय” असं वादग्रस्त वक्तव्य शिरसाट यांनी केलं आहे. यावेळी व्यासपीठावर भाजप आमदार हरीश पिंपळे, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि काँग्रेसचे साजिद खान पठाण उपस्थित होते.

अकोल्यातील याच कार्यक्रमात स्वतः वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या संजय शिरसाटांनी मात्र राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांना बोलताना सांभाळून बोलण्याचा सल्ला दिला. मिटकरी तुमच्यामुळे माध्यमांना चांगला टीआरपी मिळतोय. मात्र, तू जास्त बोलू नकोस नाहीतर तुझेही आमच्यासारखे हाल होतील असा सल्ला शिरसाटांनी मिटकरींना दिला. दरम्यान, राज ठाकरेंनी कुणाच्या व्यासपीठावर जाऊन काय बोलावं यावर आपण काही बोलू शकत नाही, असे म्हणत राज ठाकरेंच्या टीकेवर उत्तर देणं टाळलं. तर, राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांवर बोलताना त्यांनी राहुल गांधींना टोला लगावला. राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला पुरावे देण्यापूर्वी 2029 ची निवडणूक झालेली असेल, असे त्यांनी म्हटलं. 

हेही वाचा

अमरावतीतील महिला पोलिसाच्या हत्येचं गुढ उलगडलं; पतीनेच रचला कट, मित्रांनाही घेतलं सोबत

आणखी वाचा



Source link